बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 मध्ये मुदत संपलेल्या जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या एकूण 88 आहे. त्यापैकी 78 ग्रामपंचायतींमधील एकूण 299 मतदान केंद्रांवर दि.15 जानेवारी रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्री.सर्जेराव मस्के-पाटील यांनी दिली आहे या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकांचे मतदान शुक्रवार, दि.15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 वाजेपासून ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत होणार आहे. तर मतमोजणी दि.सोमवार दि.18 जानेवारी 2021 रोजी होणार आहे. या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीकरिता नामनिर्देशन सादर केलेल्या अर्जातील वैध,अवैध व माघार घेतलेल्या अर्जांची तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे:- अलिबाग- एकूण 140 अर्ज, त्यातील वैध 137, अवैध 3, माघार 57 एकूण शिल्लक 80. पेण- एकूण 181 अर्ज, त्यातील वैध 179, अवैध 2, माघार 69 एकूण शिल्लक 110. पनवेल- एकूण 691 अर्ज, त्यातील वैध 684, अवैध 7, माघार 252 एकूण शिल्लक 432. उरण- एकूण 247 अर्ज, त्यातील वैध 236, अवैध 11, माघार 64 एकूण शिल्लक 172. कर्जत- एकूण 297 अर्ज, त्यातील वैध 292, अवैध 5, माघार 11 एकूण शिल्लक 181. रोहा- एकूण 607 अर्ज, त्यातील वैध 598, अवैध 9, माघार 224 एकूण शिल्लक 374. माणगाव- एकूण 79 अर्ज, त्यातील वैध 79, अवैध 0, माघार 21 एकूण शिल्लक 58. महाड- एकूण 93 अर्ज, त्यातील वैध 93, अवैध 0, माघार 17 एकूण शिल्लक 76. श्रीवर्धन- एकूण 97 अर्ज, त्यातील वैध 96, अवैध 1, माघार 23 एकूण शिल्लक 73. म्हसळा- एकूण 43 अर्ज, त्यातील वैध 42, अवैध 1, माघार 10 एकूण शिल्लक 32. जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकरिता एकूण 2 हजार 475 अर्ज भरण्यात आले होते. त्यापैकी 2 हजार 436 अर्ज वैध, 39 अर्ज अवैध तर 848 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले असून एकूण 1 हजार 588 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बिनविरोध ग्रामपंचायतीचा तपशिल व मतदान केंद्र संख्या:- निवडणुका असलेल्या ग्रामपंचायतींची संख्या 88, एकूण सदस्य 840, एकही नामनिर्देशनपत्र प्राप्त झालेले नाही अशा जागांची एकूण संख्या 3, माघारीच्या दिनांकानंतर एका जागेसाठी एकच वैध नामनिर्देशनपत्र शिल्लक राहिल्याने बिनविरोध झालेल्या जागांची एकूण संख्या 225, ग्रामपंचायतींतील प्रत्यक्ष मतदान होणाऱ्या जागांची एकूण संख्या 612, पूर्णत: बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या 9, ग्रामपंचायतींच्या एकूण जागांपैकी काही जागी नामनिर्देशन पत्र अप्राप्त व उर्वरित जागा बिनविरोध झाल्यामुळे प्रत्यक्ष मतदान न होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या 1, प्रत्यक्ष निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या 78, निवडणूक होणाऱ्या मतदार केंद्रांची संख्या 299 आहे.

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी: लक्ष्मण राजे )
टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा रविवारी दुपारी तीनच्या सुमारास मुंबई ते पुणे असा प्रवास करत पुण्यातील कोथरूड येथील गांधी भवना शेजारी असलेल्या वूडलँड सोसायटीत आले होते. कोणताही बडेजाव किंवा सुरक्षिततेचा बाऊ न करता टाटा तिथे आले. या सोसायटीत राहणाऱ्या इनामदार यांच्या घरी जाऊन त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. सुमारे पाऊण तास त्यांनी आपल्या मित्रासह गप्पांची मैफल रंगवली. इनामदार यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देऊन टाटा तितक्याच सहजतेने परतलेही!
जुन्या मित्राला आवर्जून भेटायला आलेले ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचा अकृत्रिम स्नेह आणि साधेपणा रविवारी कोथरूड मधील एका सोसायटीतील रहिवाशांनी अनुभवला. त्यांची ही भेट जरी अल्पकालीन असली, तरी त्यांच्या सहवासाने आणि साधेपणाने त्यांना भेटलेल्यांच्या मनात कायमचे घर केले.
टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा रविवारी दुपारी तीनच्या सुमारास पुण्यातील कोथरूड येथील गांधी भवना शेजारी असलेल्या वूडलँड सोसायटीत आले होते. कोणताही बडेजाव किंवा सुरक्षिततेचा बाऊ न करता टाटा तिथे आले. या सोसायटीत राहणाऱ्या इनामदार यांच्या घरी जाऊन त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. सुमारे पाऊण तास त्यांनी आपल्या मित्रासह गप्पांची मैफल रंगवली. इनामदार यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देऊन टाटा तितक्याच सहजतेने परतलेही!
‘रतन टाटा स्नेह्याच्या भेटीसाठी अगदी अल्पकाळ आमच्या सोसायटीत आले होते; परंतु या भेटीत कुठेही सुरक्षेचा किंवा श्रीमंतीचा बडेजाव आम्हाला जाणवला नाही. त्यामुळेच ते येऊन गेल्याची माहितीही फारशी कोणाला समजली नाही,’ अशी माहिती सोसायटीतील रहिवासी अंजली पारडीकर यांनी दिली. ‘रविवारी दुपारी त्या बाहेरून सोसायटीत परत आल्या होत्या. त्या वेळी सोसायटीत टाटा मोटर्सच्या दोन नव्या गाड्या उभ्या होत्या. त्यातून रतन टाटांसारखी एक व्यक्ती उतरली आणि पटकन लिफ्टमध्ये शिरली. ते रतन टाटाच आहेत, हे समजायलाच काही क्षण लागले. त्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांना आम्ही विचारले, तेव्हा टाटा त्यांच्या मित्राला भेटण्यासाठी आले आहेत असे समजले,अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष अभिजित मकाशीर यांनी दिली. ‘रतन टाटा आवर्जून टाटा समूहाच्याच गाडीतून आले होते. त्यांचा साधेपणा पदोपदी जाणवत होता. त्यांची ही भेट कायम स्मरणात राहील,’ असेही ते म्हणाले.टाटांनी दिला कानमंत्र या भेटीनंतर रतन टाटा परतत असताना पार्किंगमध्ये अभिजित मकाशीर व त्यांची मुलगी आदिश्री यांनी त्यांच्याशी संवाद साधला. ‘टाटा यांच्या अनपेक्षित भेटीमुळे जणू काही परमेश्वराचीच भेट व्हावी, अशी आमची मन:स्थिती झाली होती. कोणताही बाऊ न करता त्यांनीही आमच्याशी गप्पा मारल्या. अवघ्या काही मिनिटांच्या संवादात रतन टाटांनी आम्हाला स्वत:च्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, त्यापासून कधीही विचलित होऊ नका, असा कानमंत्र दिला,’ असे मकाशीर म्हणाले.

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड:दि.6.प्रत्येकाने आपल्या स्वातंत्र्याच्या मर्यादा ओळखून वागण्याची गरज आहे.या मर्यादांचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द पोलीस आणि समाज या दोघांनाही गंभीर दखल घ्यावी लागेल असे प्रतिपादन पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी केले.
आज दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी पत्रकारांचा सन्मान करतांना प्रमोद शेवाळे बोलत होते.याप्रसंगी व्यासपिठावर अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे,निलेश मोरे,पोलीस उपअधिक्षक शहर विभाग विक्रांत गायकवाड आणि इतवारा उपविभागाचे डॉ.सिध्देश्र्वर भोरे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.प्रारंभी सर्व पत्रकारांना पुष्प आणि एक लेखणी देवून पोलीसांनी सर्वांचा सन्मान केला. याप्रसंगी पुढे बोलतांना प्रमोद शेवाळे म्हणाले पोलीसांचे वर्तन जसे आहे तसेच आपल्या शब्दात उल्लेखित करा त्या शब्द रचनेची आम्ही नक्कीच दखल घेवू आणि योग्य काम करू असे त्यांनी सांगितले.भारतीय राज्य घटनेत मुलभूत स्वातंत्र्य दिलेले आहे.
पण त्या मुलभूत स्वातंत्र्याच्या प्रमाणे वागत असतांना स्वातंत्र्याच्या मर्यादा प्रत्येकाला ओळखता आल्या पाहिजे.नाही तर ती समस्या भरपूर पुढे जाते आणि स्वातंत्र्याचा गैर अर्थ होतो. पत्रकारांनी सांगितलेल्या सर्व सुचनांवर आम्ही विचार करू आणि त्यानुसार काम करण्याचा प्रयत्न करू असे प्रमोदकुमार शेवाळे यांनी सांगितले.नांदेड शहर आणि नांदेड जिल्हा याच्या भल्यासाठी काम करतांना आम्ही अत्यंत बारकाईने प्रत्येक गोष्टीचा विचार करू आणि त्या प्रमाणे शहरात आणि जिल्ह्यात उन्नती होईल,शहरात आणि जिल्ह्यात शांतता नांदेल यासाठी प्रयत्न करू असे सांगितले.
याप्रसंगी भोकरचे अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांनी मी नांदेडमधील सर्वच पत्रकारांशी नांदेडमध्ये असतांना पत्रकार म्हणूनच ते कसे वागतात हे पाहिले आहे.नांदेड येथून गेल्यावर हे सर्व माझे मित्र होते. आता मी पुन्हा नांदेडला आलो आहे ते पत्रकार म्हणूनच वागतील याची मला जाणीव आहे. पोलीसांच्या कामावर नियंत्रण करण्याची अपारंपारिक पध्दत म्हणजे प्रसार माध्यमे आहेत. आमच्यावर टिका करा.आम्ही त्याला सकारात्मक घेवून आणि योग्य काम करू असे विजय कबाडे म्हणाले.नांदेडच्या वास्तव्यात झालेल्या अनेक घटनांचा उल्लेख करून त्यावेळी पत्रकारांनी दिलेल्या मदततीबाबत आठवण केली.
याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी यांनी सांगितले की,मी पत्रकारीता सुरू केली तेंव्हापासून आजपर्यंत मोठे बदल झाले आहेत.या बदलांमध्ये आलेली वेगवेगळी प्रवृत्ती मला आवडली नाही.युवा पत्रकारांनी वाचनावर लक्ष केंद्रीत करावे.सोबतच इंग्रजी भाषेवर प्रबुत्व मिळवावे. जेणे करून पत्रकारिता करतांना आपल्याकडे ज्ञानाचा भंडार असेल.
याकार्यक्रमाचे आभार व्यक्त करतांना अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे म्हणाले मी या जिल्ह्यात परिवेक्षाधिन अधिकारी म्हणून आलो होतो. माझी या जिल्ह्यातील ओळख त्यावेळी छोटीशी होती.पण आज काम करतांना मी या नांदेड जिल्ह्यातील मातीचा पुत्र आहे. असे समजूनच काम करणार आहे.
या कार्यक्रमात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, जनसंपर्क अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक राजू वटाणे यांच्यासह अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड:हॅकर्स मार्फत मोठ्या प्रमाणात गडबड घोटाळे करण्याचे प्रकार सर्वत्र सुरु असून, नांदेडच्या शंकर नागरी सहकारी बॅंकेचे आरटीजीएस व एनएफटीचे खाते आयडीबीआय नांदेड येथील शाखेत एका हॅकर्सने हॅक करुन जवळपास 14 कोटी 50 लक्ष रुपये लंपास केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आल्यानंतर शंकर नागरी बॅंकेच्या वतीने या संदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.
हॅकर्सच्या माध्यमातून अनेक ठिकाणी वेगवेगळ्या खात्यामार्फत रक्कम पळविण्याचे प्रकार देशभरात सुरु आहेत. त्याचा अनेेकांना फटका बसत आहे.नांदेडच्या शंकर नागरी सहकारी बॅंकेचे आरटीजीएस व एनएफटीचे खाते हॅकर्सने हॅक करुन जवळपास 14 कोटी 50 लक्ष रुपये लंपास केल्याचा प्रकार आज दुपारी उघडकीस आला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शंकर नागरी बॅंकेचे मुख्य व्यवस्थापक विक्रम राजे यांनी सदरचा प्रकार बॅंकेच्या संचालकांना कळविला. 27 डिसेंबर ते 2 जानेवारी या काळात शंकर नागरी सहकारी बॅंकेच्या खात्यातून हॅकर्सने आयडीबीआय बॅंकेचा आधार घेत 14 कोटी 46 लाख रुपये लंपास केले.ही बाब उघडकीस आल्यानंतर बॅंकेच्या खातेदारांत एकच खळबळ उडाली आहे.
सदरचा प्रकार बघून बॅंकेचे अधिकारी देखील हतबल झाले. याबाबत खुलासा करताना बॅंकेचे मुख्य व्यवस्थापक विक्रम राजे यांनी ही सर्वस्वी चूक आयडीबीआय बॅंकेची असून, त्यांना जबाबदार ठरवून त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी,अशी मागणी त्यांनी केली आहे.याबाबत आपण रितसर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.बॅंकेच्या खातेदारांना यामार्फत आवाहन करण्यात येते की,त्यांना कुठलाही धोका यामुळे नसून त्यांची खाती सुरक्षित असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
नेमका हा प्रकार कशामुळे घडला याची चौकशी आता पोलीस करणार असून,संबंधितांनी बॅंकेला तात्काळ नुकसान भरपाई द्यावी,व संबंधितावर गुन्हा दाखल करुन रितसर चौकशी करावी,अशी मागणी विक्रम राजे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केली आहे.शिवाजीनगर पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, नांदेडच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात तपास सुरु केला आहे. नांदेड शहरात या घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
प्रतिनिधी मयूर जाधव..
आज दिनांक 05/ 01 /2021 रोजी इलेक्ट्रॉनिक मीडिया व वन्यजीव अपराध नियंत्रण ब्यूरो सदस्य श्री रोहन भाटे यांचे कडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मौजे पांढरवाडी( वजरोशी) तालुका पाटण येथील. श्री. विनोद घाडगे नामक व्यक्तीने मौजे फडतरवाडी (घोट) तालुका पाटण येथे शिकार करून आणलेली मृत घोरपडीचे फोटो व्हाट्सअप वर वायरल केले त्यावरून रात्री नऊच्या सुमारास वन विभागाचे अधिकारी वनक्षेत्रपाल पाटण श्री विलास काळे श्री अशोक राऊत वनरक्षक श्री रवींद्र कदम व वनरक्षक आयटी .श्री. अरविंद जाधव व इतर व्यक्ती दोन व्यक्ती यांनी सापळा रचून मौजे, फडतरवाडी (घोट)येथून, श्री, विनोद घाडगे या व्यक्ती चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीअंती सदर घोरपड अनुसूची 1 मधील वन्यप्राण्यांची शिकार केलेल्या आरोपी ,श्री भाऊ गंगाराम साळुंखे. श्री, गणपत मारुती साळुंखे व सिंधू गणपत साळुंखे यांना ताब्यात घेऊन श्री गणपत मारुती साळुंखे यांचे रात्री घरातून घोरपडीची चुलीवर शिजवलेले मटण ताब्यात घेतली. तसेच ॲल्युमिनियमचे पातेले. कोयता .लाकडी ठोकळा. इत्यादी साहित्य जप्त केले. घटनास्थळी पंचनामा व जप्ती नामा करून भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम. 9. 39. 44 .48. (अ). व 51 अन्वये गुन्हा नोंदवला माननीय सहाय्यक वनरक्षक सातारा श्री किरण कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.

दर्पण दिनानिमित्त “भवताल, माध्यमे आणि आपण” परिसंवादात मान्यवरांचे मार्गदर्शन
नांदेड जिल्हा प्रतिनिध:संजीवकुमार गायकवाड
नांदेड:दि.6.माध्यमे ही समाजाचा आरसा असतात. समाजाचे प्रतिबिंब माध्यमात उमटतात.समाजातील चांगल्या वाईट बदलांचे प्रतिबिंब देत असतांना माध्यमांवर अधिक जबाबदारी येऊन पडते. समाजातील सहिष्णुता, एकात्मता टिकून राहण्यासाठी माध्यमांची जबाबदारी मोठी असून नव्या पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकारांचे योगदान अधिक आवश्यक व गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी केले.दर्पणदिनामित्त जिल्हा माहिती कार्यालय नांदेड व महात्मा गांधी मिशन संचलित वृत्तपत्र विद्या व माध्यमशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यामाने एमजीएम महाविद्यालयात आयोजित ‘भवताल,माध्यमे आणि आपण’ या परिसंवादाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर हे किनवट येथे आदिवासी आरोग्य शिबिरासाठी असल्याने त्यांनी झुमद्वारे सर्व पत्रकारांना पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार,प्राचार्य गणेश जोशी,ज्येष्ठ पत्रकार कमलाकर जोशी,संपादक शंतनु डोईफोडे,मुन्तजोबोद्दीन मुनिरोद्दीन,आकाशवाणीच्या श्रीमती राजश्री मिरजकर,भारत होकर्णे,कुंवरचंद मंडले,विजय जोशी,माजी जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे तसेच जिल्ह्यातील माध्यमाचे प्रतिनिधी,पत्रकार,विद्यार्थी आदी उपस्थित होते.
मागील 6 जानेवारी ते यावर्षीच्या 6 जानेवारीपर्यंत गेलेला कालखंड हा सर्वच दृष्टिने सर्व घटकाला नवे स्थित्यंतर देणारा ठरला आहे. कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे जी भयावता व धास्ती समाजात निर्माण झाली होती ती धास्ती घालवून समाजामध्ये विश्वास निर्माण करण्याचे काम माध्यमांनी व माध्यमातील प्रतिनिधींनी अत्यंत जबाबदारीने केले या शब्दात जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी पत्रकारांच्या योगदानाचा गौरव केला. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी,जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, कोविड-19 मुळे जे व्यक्ती बाधित झाले त्यांच्यावर वेळेत उपचार करण्यासाठी प्रशासनाने जी प्रयत्नाची पराकाष्ठा केली तेवढीच पराकाष्ठा पत्रकारांनीही समाजात अफवा पसरु नयेत यादृष्टिने वस्तुस्थिती वेळोवेळी समाजापुढे मांडून लोकशिक्षकाची भूमिका बजावली आहे.
लोकशाहीमध्ये प्रत्येकाच्या आवाजाला महत्व आहे.हे लक्षात घेऊन आज माध्यमातील क्रांतीमुळे जी वेगवेगळी डिजिटल माध्यमे समोर येत आहेत त्याचे आपण स्वागत करुन या माध्यमांसाठी काम करणाऱ्या नव्या पिढीला नैतिक आणि लोकशाही मुल्यांचे बळ दिले पाहिजे,असे रापतवार यांनी स्पष्ट केले.शाळेत विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची जशी आवश्यकता असते त्याच धरतीवर लोकशाही भक्कम करण्यासाठी पत्रकारांवर समाजाच्या शिक्षणासाठी लोकशिक्षकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जेष्ठ पत्रकार कमलाकर जोशी यांनी माध्यमशास्त्राच्या विद्यार्थी व विद्यार्थीनीना मार्गदर्शन करताना पत्रकार हा समाजाचा चौकीदार,पहारेकरी असून पत्रकारामध्ये नैतिकता व चारित्र्य या गोष्टी असणे अंत्यत आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी प्रजावाणीचे संपादक शंतनु डोईफोडे यांनी दर्पणदिन हा पत्रकारासाठी आत्मचिंतन करण्याचा दिवस असल्याचे स्पष्ट करुन गत एक वर्षातील कोरोनाचे आव्हान स्विकारुन माध्यमांनी केलेल्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला.या काळात बातम्या आणि बातम्यांचे संपादन करतांना कधी नव्हे तेवढी काळजी घ्यावी लागली असे स्पष्ट केले.घटनेतील 19 व्या कलमाने व्यक्ती स्वातंत्र्याला दिलेली मुभा ही कुणाच्या अधिकारावर व स्वातंत्र्याला धक्का पोहचविणारी तर नाही ना याची अधिक काळजी घेण्याचे शिक्षण गतवर्षाने माध्यमाला दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
दैनिक नांदेड टाइम्स उर्दूचे संपादक मुन्तजोबोद्दीन मुनिरोद्दीन यांनी आपल्या मनोगतात नांदेडच्या पत्रकारिता क्षेत्रात महिलांचा सहभाग कमी असून या क्षेत्रात काम करण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.तसेच यावेळी आकाशवाणीच्या राजश्री मिरजकर यांनी विद्यार्थींनींना या क्षेत्रात आवाहन करुन उपस्थिती विद्यार्थींनींना प्रोत्साहन दिले. इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे भारत होकर्णे,कुंवरचंद मंडले यांनीही यावेळी संवाद साधला.
प्राचार्य गणेश जोशी यांनी प्रारंभी सर्वांचे स्वागत करुन एमजीएम महाविद्यालयाने सामाजिक बांधिलकी जपत राबविलेल्या उपक्रमाची माहिती दिली. पत्रकारिता प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना सर्वगुण संपन्न होण्यासाठी महाविद्यालयातर्फे आवर्जुन पत्रकार दिनासारखे उपक्रम सातत्याने विनाखंड सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार शितल महाजन यांनी केले.


ज़िल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड:जिल्यात प्रथमच भाजीपाला व फळे सुकवून पावडर बनवणाऱ्या न्यूट्री कल्चर युनिटचा शुभारंभ,प्रॉडक्ट व http://www.nutriculturefoods.com या वेबसाईटची लॉंचिंग जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांच्या हस्ते करण्यात आला त्याप्रसंगी अंबुलगेकर यांनी उद्यागी महिलांनी व बचत गटांनी न्यूट्रीकल्चर डिहाड्रेरेशन सारखे युनिट उभारायला हवेत असे आव्हान केले.
जुनी भारतीय खाद्य संस्कृती ची परंपरा जोपासत नांदेड ज़िल्ह्यातील न्यूट्रीकल्चर या स्थानिक ब्रॅण्डने कोणतेही कलर,केमिकल,प्रीझर्वेटिव्ह न वापरता शुद्ध,पोषक, रुचकर,भाजीपाला,फळे,फुले, औषधी वनस्पती यांच्या पावडरी बनवून बाजारात न्यूट्रीकल्चर या व्रँड नावाने आणल्या आहेत.यात आवळा,कारला,बीटरूट,गाजर, आद्रक,कांदा,पालक.शेवगा, कोथिंबीर,कडीपत्ता यांची पावडर निर्मिती होत आहे.या पावडरीचा उपयोग कोणत्याही रेसिपीत, भाजीत फ्लेवर आणण्या साठी करता येतो तसेच अन्नपदार्थावर शिंपडून खाता येतो.कारला, आवळा यांच्या पावडर गरम पाण्यात टाकून शुगरचे रुग्ण पिऊ शकतात.जुन्या काळातील उसऱ्याची संकल्पना न्यूट्री कल्चरने विविध भाज्याना नवीन रूपात आणली आहेत.असे प्रकल्प ज़िल्ह्यातील उद्योगी महिलांनी व बचत गटांनी उभारून महिला सक्षमिकरणाचा पाया उभारावा असे मत व्यक्त केले आहे.
उपस्थित नांदेड उत्तर विधानसभेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी अश्या प्रकल्पाना ज़िल्हा परिषदेनी माळेगाव यात्रा,बचत गटांचे विविध स्टॉल,कृषीस्टॉल,ध्यान्य महोत्सव अश्या कृषी विभागाच्या अंतर्गत संधी उपलब्ध करून द्यावी असे मत व्यक्त केले.माजी ज़िल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर,ज़िल्हा परिषद शिक्षण सभापती संजय बेळगे,महिला बालकल्याण सभापती सुशीलाबाई बेटमोगरेकर यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या व शेतकऱ्यांचा भाजीपाल्याला चांगला भाव मिळण्यासाठी अश्या प्रकल्पाची गरज असल्याचे मत व्यक्त केले व शेतकऱ्याकडूनच भाजीपाला मोठया प्रमाणात विकत घ्यावा अश्या सूचना न्यूट्री कल्चर संचालिकेला दिल्या जेणेकरून शेतकरी समृद्ध झाला पाहिजे असे मत व्यक्त केले.न्यूट्री कल्चरच्या संकल्पने विषयी बालाजी बामणे यांनी सविस्तर अशी माहिती सांगितली.
प्रसंगी उपस्थित हिंदुस्थान क्रॉप साईन्सचे तुळशीराम शेळके,चायवेचे सीईओ आबा पाटील लोंढे,स्पीक फर्टीलायझरचे माधव सूर्यवंशी,कृषी विज्ञान केंद्राचे डॉ, देविकांत देशमुख, महालक्ष्मी ऑइल शोरूम चे गणेश शेठ चान्नावार,अखिल शिक्षक संघटनेचे राज्याधक्ष देविदासराव बस्वदे,ज़िल्हा अध्यक्ष अशोक पाटील मारतळेकर,प्रशांत भिंगोले,चंद्रकांत कुणके, बाळासाहेब लोणे,प्रह्लाद राठोड, दिगंबर शेळके,नगरसेवक राजकुमार बामणे,न्यूट्री कल्चर संचालिका रुक्मिण बामणे, फॅशन डिझाईनर यशस्वी बामणे,आदी उपस्थित होते.

लातूर शहरासाठी नव्याने सर्वांगीण विकास आराखडा तयार करावा त्याची अंमलबजावणीही तातडीने करावी या आराखड्यात प्रामुख्याने महापालिका हद्दीत किमान ३३ टक्के ग्रीन कव्हर असावे या दृष्टीने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात यावी, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी महापौर विक्रांत गोजमगुंडे आयुक्त श्री टेंकाळे यांच्यासह संबंधितांना दिल्या आहेत.
पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी लातूर महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध विकास योजनांचा विभागनीहाय व्यापक आढावा लातूर येथे नुकताच घेतला आहे. या आढाव्यानंतर पालकमंत्री देशमुख यांनी महापौर विक्रांत गोजमगुंडे, आयुक्त श्री. देवीदास टेकाळे व सर्व विभाग प्रमुखांना लातूर शहराचा सर्वांगीण विकास अराखडा तयार करण्याच्या सुचना दिल्या आहेत. या अराखडयात लातूर महानगरपालिका हद्दीमध्ये किमान 33 टक्के ग्रीन कव्हर असावे या दृष्टीने वृक्षारोपन करण्याचे दृष्टीने नियोजन करण्यास सांगितले आहे.
लातूर शहरात ग्रीन कव्हर निर्माण करीत असतानाच त्यासोबतच शहरांमध्ये वॉकिंग ट्रॅक, जॉगिंग ट्रॅक, सायकलिंग ट्रॅक, पार्कस, चिल्ड्रण पार्कस, प्लेग्राउंड, सिनीअर सीटीझन पाँइट, पब्लिक टॉयलेट, वॉटर फाउंटन, ड्रीकींग वॉटर यासह महत्वाच्या सुविधांचा या सर्वंकष आराखड्यामध्ये समावेश करून तो सादर करावा या आराखडयाची तातडीने अमंलबजावणी करण्याचे नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी महापौर, आयुक्त व संबंधितांना दिल्या आहेत.
———————–

लोहा, प्रतिनिधी(शिवराज पवार)
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजल्या जाणाऱ्या तमाम पत्रकार बांधवांना आज लोहा बसस्थानकात 6 जानेवारी रोजी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकारांचा पुष्पहार,पेन देवून, पेढा भरवून सत्कार करण्यात आला.
पत्रकार दिनानिमित्त लोहा येथे राजर्षी शाहू शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन तथा धावरीचे मुख्याध्यापक बी.वाय.चव्हाण, बहुजन प्रेरक संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष पी.आर. चिखलभोसीकर, प्रताप पाटील चिखलीकर कट्टर समर्थक पारडीचे पॅनल प्रमुख माधव पाटील पवार पार्डीकर, लोकमंगल को-ऑप क्रेडिट सोसायटी शाखा लोहा च्या वतीने केले. ‘दर्पण’ दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या तमाम पत्रकार बांधवांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्याचे सत्कार्य आज घडून आल्याचे प्रेरक संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष पि.आर.चिखलभोसीकर यांनी मत व्यक्त केले.
याप्रसंगी बोलताना माजी चेअरमन चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की 6 जानेवारी 832 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली, दर्पण नावाचे प्रथम वर्तमानपत्र काढून समाजातील सामान्यांना न्याय मिळवून दिला. त्याचबरोबर दैनिक केसरी चे लोकमान्य टिळक,आचार्य प्र.के. अत्रे यांचे मराठा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘जनता’ ‘प्रबुद्ध ‘भारत’ ‘मूकनायक’ या वर्तमानपत्रांनी केलेले कार्य यांची प्रेरणा आजच्या पत्रकारांनी घेऊन आपले कार्य करावे, समाजातील विविध प्रश्नावर आपली लेखणी निर्भिडपणे चालवावी असे प्रतिपादन बि.वाय. चव्हाण यांनी केले.
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
लोहा येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार सुरेश जोंधळे, डी एन कांबळे, विनोद महाबळे शिवराज पा.पवार बाळासाहेब बुद्धे, तुकाराम दाढेल सह पत्रकार उपस्थित होते.
याप्रसंगी मराठी पत्रकार संघाचे माजी लोहा तालुकाध्यक्ष साहेबराव सोनकांबळे, विजयकुमार चन्नावार, रत्नाकर महाबळे, शेख अहमद, माजी तालुकाध्यक्ष केशव पा.पवार, बाळासाहेब कतुरे,शेख इमाम लदाफ, विलास सावळे,युनूस शेख, गोविंद पा. कदम,श्याम पा.नळगे, बाळासाहेब बुद्धे प्रवीण महाबळे, संजय रहाटकर,शिवराज पा. पवार, संतोष चेऊलवार आदींसह पत्रकारांची उपस्थिती होती.

मिलिंद कावळगावकर
देगलूर/प्रतिनिधी
संपूर्ण राज्य भर दर्पण दिन आज साजरा होत आहे. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.पोलीस वर्धपण दिन व राष्ट्रीय पत्रकार दिन देगलूर पोलीस स्टेशन च्या वतीने शहरातील सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
आकाशवाणीदर्पण दिन अर्थात पत्रकार दिन आज राज्यभर साजरा होत आहे. यानिमित्त पोलीस स्टेशन च्या वतीने पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. तसेच पुढील वाटचालीत पत्रकार आणि प्रसार माध्यमांचं योगदान महत्त्वाचं आहे, असं ते म्हणाले. पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर नेहमीच सकारात्मक भूमिका घेईल, असं ही पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
यावेळी पोलीस निरीक्षक भगवान धबडगे,महिला पोलीस उपनिरीक्षक जनाबाई सांगळे,महिला पोलीस निरीक्षक पूनम सूर्यवंशी,मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष श्याम वदेवार,तसेच पत्रकार श्रीधर दीक्षित, फायकअल्ली,शेख नाझीम,नरहरी कोलगाणे,फजल मुल्ला, विशाल पवार,अस्लम शेख,मिलिंद कावळगावकर,साई कावटवार,अब्दुल मुबीन ,अजीम अन्सारी, सैफ भाई या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन देगलूर पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी दीपक जोगे तर आभार महिला पोलिस उपनिरक्षक जनाबाई सांगळे यांनी केले तसेच असंख्य पत्रकार बांधव उपस्थित होते.

पाटोदा ( बु),समराळा,माष्टी तीन.गावे बिनविरोध
२८ ग्रामपंचायतीमध्ये ८७ उमेदवार बिनविरोध निघाले तर १५४ उमेदवारांनी नामांकन अर्ज मागे घेतले
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड:धर्माबाद तालुक्यातील एकूण चाळीस ग्रामपंचायती निवडणूक ची
रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवार माघार घेवायाच्या दिवशी दि.४ जानेवारी रोजी एकुण १५४ उमेदवारांनी माघार घेतली आहे. पाटोदा ( बु),समराळा,माष्टी ही तीन गावे बिनविरोध निघाले असुन एकूण ८७ उमेदवार बिनविरोध निघाले आहेत. आता ३७ ग्रामपंचायती मध्ये २०४ जागेसाठी ४४९ उमेदवार रिंगणात आहेत.
धर्माबाद तालुक्यात एकूण ४५ ग्रामपंचायती पैकी ४० ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहेत.यातील समराळा,माष्टी, पाटोदा (बु) ही गावे बिनविरोध काढण्यात आले असुन ३७ ग्रामपंचायतीत निवडणूका होणार आहेत.२०४ जागेसाठी ४४९ उमेदवार रिंगणात असुन पुढील प्रमाणे गाव निवाह रिंगणातील अर्ज
अतकुर -८ उमेदवार रिंगणात, अल्लूर/ नेरली -१३ उमेदवार रिंगणात, करखेली- १८ उमेदवार रिंगणात ,कारेगाव ४, चिंचोली,१४, चिकना १५, चोंडी-७ ,चोळाखा-७ ,जारिकोट- २२, जुन्नी- ३ दिग्रस-२, धानोरा (खुर्द)- १४, नायगाव (ध)-१०, पांगरी-१२, पाटोदा (खुर्द )२, पाटोदा (थडी)१७ पिंपळगाव (ध)- १५,बन्नाळी- ७, बाचेगाव- १८, बाभळी(ध)- १६,बामणी -१४,बेलगुजरी/हारेगाव-
११,बेल्लुर (खु) -५,बेल्लुर (बु) -१३,मंगनाळी- १२,मनुर -६,,मोकली/क-हाळ-१३,येताळा-२५,येवती-१२, राजापूर-१८,विळेगाव (थ)-१४,विळेगाव (ध)-७, शेळगाव (थ)-८ संगम-१४,सायखेड-१५,सालेगाव (ध )-१६,सिरसखोड-२५ उमेदवार रिंगणात आहेत.असे एकूण २०४
जागेसाठी ४४९ उमेदवार रिंगणात आहेत.
जुन्नी,दिग्रस, पाटोदा (खु),कारेगाव, ही गावे बिनविरोध निघणारी केवळ एक जागेसाठी निवडणूक होत आहे.बेल्लुर( खु) येथे दोन जागेसाठी निवडणूक होत आहे.
२८ ग्रामपंचायतीमध्ये ८७ उमेदवार बिनविरोध निघाले आहेत.करखेली ग्रामपंचायतीत ५ उमेदवार बिनविरोध,बन्नाळी ग्रामपंचायतीत ६ उमेदवार बिनविरोध,जुन्नी ग्रामपंचायतीत ८ उमेदवार बिनविरोध,बेल्लूर (खु) ग्रामपंचायतीत ५ उमेदवार बिनविरोध,दिग्रस ग्रामपंचायतीत ५ उमेदवार बिनविरोध, पाटोदा ( खु) ग्रामपंचायतीत ६ उमेदवार बिनविरोध,कारेगाव ग्रामपंचायतीत ५ उमेदवार बिनविरोध असे चार, तीन, दोन विविध ग्रामपंचायतीत एकुण ८७ सदस्य बिनविरोध निघाले आहेत.

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड:दि.6. जिल्यात धर्माबाद तालुक्यातील नायगाव ( ध) येथे आमदार राजेश पवार यांच्या समर्थकाची देशी दारू दुकान अगदी तेलंगणा राज्याच्या सीमेलगत असून सदरील देशी दारू हटविण्याच्या मागणीसाठी गावातील संपूर्ण महीलांनी देशी दारू दुकानावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले होते.तसेच सोमवारी येथील तहसिलदार शिंदे व पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांची भेट घेऊन सदरील देशी दारू दुकान हटविण्याची लेखी मागणी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, धर्माबाद तालुक्यातील नायगाव (ध) येथे आमदार राजेश पवार यांचे कट्टर समर्थक तथा बाजार समितीचे संचालक,तालुका रुग्ण कल्याण समितीचे सदस्य रमेश गौड यांच्या मालकीची देशी दारू दुकान गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. सदरील देशी दारू दुकान हे तेलंगणा राज्याच्या अगदी सिमेलगत असून महाराष्ट्रातील देशी दारूला तेलंगणा राज्यात भरपूर मागणी असल्यामुळे सदरील दुकानातून दररोज तेलंगणा राज्यात देशी दारूची चढ्या भावाने विक्री करून आपले चांगलेभले करुन घेत आहेत.परंतु सदरील प्ररकरणाकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत. तसेच तेलंगणा राज्यातील असंख्य तळीराम देशी दारू पिण्यासाठी नायगाव मध्ये दररोज ये-जा करीत असल्याचे चित्र दिसत आहेत.व गावातील तरूण,मंजूर व शेतकरी गावतच देशी दारूचे दुकान असल्यामुळे सकाळ पासूनच देशी दारू पिऊन कर्जबाजारी होत आहेत.तसेच अनेक गोर गरीब लोकांचे संसार उद्धवस्त होत आहेत.व गावात दररोज लहान मोठे तंटे देशी दारू पिल्यानंतर होत असल्याचे चित्र दिसत आहेत.सदरील देशी दारूच्या जवळच मंदीर व शाळा असल्यामुळे शाळकरी मुलांना व भाविकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.तसेच तेलंगणा राज्यात दररोज देशी दारू काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी ठरविक माणसे नेमलेले आहेत. आजपर्यंत आती देशी दारू पिल्यामुळे गावातील अनेकांचा मुत्यु झाला आहे.त्यामुळे त्यांचे संसार उद्धवस्त होत असल्याचे चित्र गावातील रणरागिणींच्या निदर्शनास येताच,त्यांनी सदरील देशी दारू दुकान हटविण्याचा संकल्प केला आहे. व सदरील देशी दारू दुकानावर गावातील शेकडो महीलांनी मोर्चा काढून सदरील देशी दारू दुकान हटविण्याची मागणी करीत दुकानासमोर महीलांनी ठिय्या आंदोलन केले आहे.परंतु पोलिसांनी महीलांची समजूत घातल्यामुळे काही अनुचित प्रकार घडला नाही.लगेच गावातील असंख्य महीलांनी धर्माबाद गाठून येथील तहसिलदार शिंदे व पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांची भेट घेऊन सदरील देशी दारू दुकाना संदर्भात पाढा वाचला.व सदरील देशी दारू दुकान हटविण्याची लेखी मागणी केली आहे.सदरील देशी दारू दुकानाच्या मालका विरोधात महीलेमध्ये संतापाची लाट उसळली असल्याचे चित्र दिसत आहे.सदरील देशी दारू दुकानदार आपले काळे धंदे सुरळीत सुरू राहवे,यासाठी आमदार राजेश पवार यांच्याशी घनीष्ठ संबंध निर्माण करून आमदाराचे विश्र्वास संपादन केल्यामुळे आमदार राजेश यांनी सदरील देशी दारू दुकानाच्या मालकास तालुका रुग्ण कल्याण समितीचे सदस्यपदी निवड केल्यामुळे भाजपातील निष्ठावंतांनी त्यावेळेस नाराजी व्यक्त केली होती. परंतु सदरील रुग्ण कल्याण समितीचे सदस्य रमेश गौड जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याऐवजी गोर गरीब जनतेचे संसार उद्धवस्त करीत असल्याची चर्चा तालुक्यातील जनतेत होत आहे.सदरील देशी दारू दुकानाच्या मालकास आमदार राजेश पवार यांचा वरदहस्त असल्यामुळे संबधित अधिकारी व कर्मचारी सदरील दुकानाच्या नियमबाह्य परवाना व गैरकारभाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे.परंतु सदरील देशी दारू दुकान हटविल्याशिवाय गावातील महीला सुध्दा शांत बसणार नाहीत.व यासाठी लवकरच जन आंदोलन करण्याची तयारी गावातील महीला करीत असल्याचे चित्र दिसत आहे.त्यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सदरील देशी दारूची दुकान हटवावे,अशी मागणी तालुक्यातील जनतेतून होत आहे.
यासंदर्भात रमेश गौड यांना भ्रम्नधव्नीवरून विचार पुस केल्यास म्हणाले की,सदरील देशी दारूच्या दुकानाचा परवाना नियमानुसारच असून माझ्या आईच्या नावाने परवाना आहे. सदरील तक्रार राजकारणामुळे होत आहे.व यापुढे अनेक विषयांवर बोलण्यास टाळाटाळ केली आहे.

दुसऱ्या क्रमांकावर जिल्ह्याचा महसुल विभाग
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड:दि.6.जानेवारी ते डिसेंबर 2020 या बारा महिन्याच्या कालावधीमध्ये नांदेड जिल्ह्यात भ्रष्टाचार करणाऱ्यांमध्ये पोलीसांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.आठ कार्यवायांमध्ये दहा जण आरोपी झाले आहेत. दुसरा क्रमांक महसुल विभागाने मिळवला असून पाच कार्यवायांमध्ये त्यांचेही दहा लोक भ्रष्टाचाराचे आरोपी आहेत.नांदेड जिल्ह्यातील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने वर्षभरात 26 कार्यवाया केल्या असून त्यात 38 लोक आरोपी आहेत.
भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या वर्षभराच्या कार्यवाहीमध्ये नांदेड जिल्हा पोलीस दलाने भ्रष्टाचार करण्यात प्रथम क्रमांक कमावला आहे. पोलीस शिपाई ते पोलीस उपनिरिक्षक या पदाच्या एकूण 8 जणांनी भ्रष्टाचार करतांना केलेल्या लाच मागणीविरुध्द झालेल्या तक्रारीनंतर 8 गुन्हे दाखल झाले.त्यात एकूण 10 जणांना आरोपी करण्यात आले आहे.यातील लोकसेवक हे वर्ग 3 चे कर्मचारी आहेत. दुसरा क्रमांक जिल्ह्याच्या महसुल विभागाने घेतला आहे. यातही पाच दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये वर्ग 3 चेच कर्मचारी आहेत.त्यात तलाठी, मंडळाधिकारी आणि ग्रामविकास अधिकारी यांचा समावेश आहे. महसुल विभाग विरुध्दच्या पाच कार्यवाह्यांमध्ये 10 आरोपी आहेत. जिल्हा परिषदेमधील वित्त विभागामध्ये एक गुन्हा भ्रष्टाचारासाठी दाखल झाला. त्यात वर्ग 3 आणि वर्ग 4 चे दोन जण आरोपी आहेत. ग्राम पंचायतमधील चार जणांनाविरुध्द केलेल्या कार्यवाहीमध्ये 6 आरोपी आहेत.
यात ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी,उपसरपंच यांचा समावेश आहे.नगररचना विभाागतील नगरपंचायतमधील वर्ग 3 आणि वर्ग 4 चे दोन जण भ्रष्टाचाराचे आरोपी आहेत.वस्तु व सेवा कर कार्यालय नागपूर येथील वित्त विभागाचा अतिरिक्त आयुक्त भ्रष्टाचारात अडकला आहे.शिक्षण क्षेत्राशी संंबंधीत तीन गुन्ह्यामध्ये 5 आरोपी आहेत. त्यात मुख्याध्यापक, शिक्षक, खाजगी लिपीक आणि खाजगी इसम अशा लोकांचा समावेश आहे.दोन गुन्हे खाजगी इस्माविरुध्द दाखल झाले आहेत. वफ्फ बोर्डाचा जिल्हा वफ्फ अधिकारी वर्ग 3 आणि सेवक वर्ग 4 असे दोन जण भ्रष्टाचारात अडकले आहेत.
नांदेड जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकूण 26 सापळे आयोजित केले. त्यात वर्ग एकचा 1 अधिकारी, वर्ग दोनचे 24 व्यक्ती आणि खाजगी इसम अशा एकूण 38 जणांना आरोपी केले आहे. एकूण 26 सापळयामध्ये वर्ग एकचा फक्त एकच अधिकारी भ्रष्टाचारांच्या आरोपात अडकला आहे.बाकी सर्व वर्ग 3, 4 आणि खाजगी इसम भ्रष्टाचाराचे आरोपी झाले आहेत.

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड:दि.6.सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर राज्य शासनातील कर्मचारी व इतरांना सुधारीत दराने घरभाडे भत्ता देण्यासाठी एक नवीन शासन निर्णय आला आहे.या शासन निर्णयावर महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचे उपसचिव भालचंद्र गाडेकर यांची डिजिटल स्वाक्षरी आहे.नवीन प्रकारे घर भाडे भत्ता देण्याची वर्गवारी एक्स,वाय आणि झेड या शहर आणि गावांच्या वर्गीकरणानुसार मिळणार आहे.
राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर राज्यातील महराष्ट्र नागरी सेवा (सुधारीत वेतन) नियम 2019 प्रमाणे मॅट्रीक्स आणि वेतनस्तर लागू करण्यात आले.सोबतच 7 जुलै 2017 च्या आदेशानुसार सुधाारीत घरभाडे भत्ता कसा देण्यात यावा यासाठी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना व इतर पात्र कर्मचाऱ्यांना शहरे आणि गावे यांचे सुधारीत वर्गीकरण विचारात घेवून घरभाडे भत्ता देण्याचा निर्णय झाला.यामध्ये एक्स,वाय आणि झेड प्रकाराच्या गाव आणि शहराचे वर्गीकरण आहे.
एक्स प्रकारच्या वर्गीकरणामध्ये घरभाड्याचे विद्यमान दर 30 टक्के आहे ते दर मुळ वेतनाच्या टक्केवारीनुसार 24 टक्के करण्यात आले आहे.वाय प्रकारच्या वर्गीकरणातील घरभाडे 20 टक्के आहे.ते आता 16 टक्के करण्यात आले आहे. झेड प्रकारच्या वर्गीकरणात सध्याचे घरभाडे दर वेतनाच्या 10 टक्के आहे.तर सुधारीत दर मुळ वेतनाच्या 8 टक्के करण्यात आले आहे.सोबतच एक्स,वाय आणि झेड वर्गीकृत शहरांना अनुक्रमे 5400, 3600 आणि 1800 घरभाडे भत्ता अनुज्ञेय राहिल. ज्यावेळी सातव्या वेतन आयोगानुसार अनुज्ञेय केलेला महागाई भत्ता 25 टक्यांची मर्यादा ओलांडेल त्यावेळी एक्स, वाय आणि झेड वर्गीकृत शहरांना अनुक्रमे 30, 20 आणि 10 टक्के वाढीव दराने घरभाडे भत्ता मंजुर करण्यात येईल.सुधारीत दराने घरभाड्याची परिगणना करतांना मुळ वेतनात विशेष वेतन समावेश करता येणार नाही.घरभाडे भत्त्याच्या अनुज्ञेयतेसंबंधीतच्या विद्यमान आदेशातील इतर सर्व तरतुदी व अटी पुर्वीसारख्याच लागू राहतील.हा शासन निर्णय 1 जानेवारी 2019 पासून अंमलात आलेला आहे.हा शासन निर्णय राज्य शासनाच्या संकेतस्थळावर संकेतांक 201902051436462005 नुसार प्रसिध्द करण्यात आला आहे.

लोहा तालुका प्रतिनिधी:शिवराज पवार
लोहा:दि.6.”गाव करी ते राव न करी ” याचा प्रत्यय लोहा येथील तरुणांनी दिला.जुना लोहा येथील असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह परिसराचेही सुशोभिकरण करून एक नवा आदर्श निर्माण करून राजेंच्या विचारांचा वारसा जुन्या लोह्यातील मावळ्यांनी पुढे दैदिप्यमान केला आहे.
लोहा शहर हे (जुना लोहासह) मोठ्या लोकवस्तीचे व बाजारपेठेचे,दळणवळणाचे राष्ट्रीय महामार्गावरील एक महत्त्वाचे ठिकाण असून लोहा येथील जुन्या पिढी प्रमाणेच आजची तरूण पिढीही वेगवेगळे नवोपक्रम हाती घेतेय.नाटय, कला, जयंत्यासण- उत्सव इ. साजरे करणे,व त्यातूनच सामाजिक ऐक्याची भावना निर्माण करून त्या- त्या पिढीतील नवयुवक, तरुण समोर येऊन लोहाच काय..? तर,तालुका व जिल्ह्याचेही नेतृत्व करत राजकीय-सामाजिक, सांस्कृतिक,धार्मिक व आर्थिक चित्र बदलून टाकले आहे.
आज या आधुनिक शहराकडे वाटचाल करणाऱ्या लोहा येथील प्रत्येक पिढ्यांनी तालुक्याचे नेतृत्व करण्यासाठी तरुण तयार झाले आहेत.तशी त्यांना वेळोवेळी संधीही चालून आली. तोच आदर्श समोर ठेवूनच सामाजिक समतेचा संदेश रूजवला जातोय.
याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजेच सद्यस्थितीतील जुना लोहा येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाची राबविण्यात आलेली मोहीम ही होय.येथील सर्व तरुण एकत्र येऊन सुशोभीकरणाची कार्य पार पाडले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर चकाचक करून सुशोभीकरणाचे काम पूर्णत्वास नेले.पुतळ्याच्या सभोवताली स्टीलच्या जाळीचे संरक्षक कवच उभारले.यातून भावी पिढीलाही अप्रत्यक्ष संदेशच दिला. गावातील सर्व तरुण मंडळींनी, स्वतः स्वच्छेने एकत्र येऊन , कसलाही कमीपणा वाटू न देता, हेवेदावे न करता सर्वांनी पुढाकार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण केले.व सामाजिक बांधिलकीचा,एकतेचा, समानतेचा,स्वच्छतेचा, पर्यावरणाचा संदेश,एक आदर्श, नवा पायंडा निर्माण केला. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

सहा ग्राम पंचायती बिनविरोध तर १००३ जनांची घेतली माघार
मुखेड तालुका प्रतिनिधी:गणेश आडे
मुखेड:तालुक्यातील १०८ ग्राम पंचायतीसाठी ३ हजार १५ ईच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशणपत्र सादर केले होते यात १ हजार ३ जनांनी माघार घेतली असुन १ हजार ७९८ उमेदवार रिंगणात आहेत.
तालुक्यातील कोळनुर,भगनुरवाडी,हसनाळ प.दे.,जांब खु.कमळेवाडी,ईटग्याळ पमु.या 6 ग्राम पंचायती बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. तर ३८ प्रभागातून १४२ जागा बिनविरोध झाल्या आहेत.तालुक्यातील ग्राम पंचायतीचा निवडणूकीचा धुराळा दिवसेंदिवस जास्तच उडत असुन शहरातील हॉटेल,बार,दुकाने,पान टपया हाऊसफुल दिसत आहेत.
तालुक्यात मुक्रमाबादसह येवती, चांडोळा,बेटमोगरा,मंडलापुर,सावरगांव पि,बाऱ्हाळी,गोजेगाव अशा मोठया ग्राम पंचायतीकडे सर्वाचेच लक्ष लागले असुन अनेक दिग्गजांना गावातच मोठा विरोध पत्कारावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या गावात त्यांना मोठा विरोध दिसून येत असुन मुक्रमाबाद मध्ये गोजेगावकर पुरस्कृत पॅनल आमदार डॉ.तुषार राठोड यांच्या समर्थकाच्या विरोधात थांबले असल्याचे बोलले जात आहे.तर माजी आमदार हाणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या गावात सुध्दा तीन पॅनल थांबलेले असून बेटमोगरेकर यांना धक्का देण्यासाठी गावातील अनेक मंडळी एकत्र आल्याचे दिसून येते.
तीन पत्रकार मैदानात
मुक्रमाबाद ग्राम पंचायतमध्ये ८ हजार ५९ मतदार असुन तीन पॅनलमध्ये एकुण ५२ उमेदवार रिंगणात आहेत.याच भागात लेंडी नदी असून पुनर्वसनाचा, मावेजांचा मुद्दा यात प्रकर्षाने गाजणार आहे.या ग्राम पंचायतमध्ये प्रथमच तीन पत्रकार निवडणूकीच्या मैदानात आहेत.
२२ वर्षीय युवकाने केले पॅनल तयार – दिग्गजांना आव्हान
मुखेड तालुक्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत समजली जाणारी मुक्रमाबाद ग्राम पंचायत मध्ये २२ वर्षाच्या हेमंत खंकरे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत दिग्गजांना आव्हान दिले आहे.या युवकाच्या पॅनल विरोधात मुरब्बी राजकारणी शिवराजअप्पा आवडके व गोजेगावकर पुरस्कृत पॅनल आहे.

आजही पोलीस कर्मचारी पदाची पगार घेतात
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड:दि.6.सन 2013 पासून पोलीस उपनिरिक्षक होण्याची वाट पाहत वाट लागलेले सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आणि पोलीस हवालदार सन 2020 च्या शेवटच्या सत्रात अखेर फौजदार झाले.पण आजही त्यांची वेतन निश्चिती करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा त्रास कधी संपेल ही त्यांची विवंचना कायम आहे. नांदेड जिल्ह्यात 32 पोलीस कर्मचारी पोलीस उपनिरिक्षक झाले आणि राज्यात जवळपास 1 हजार पोलीस कर्मचारी फौजदार झाले आहेत.
सन 2013 मध्ये पोलीस विभागात झालेल्या एका विभागीय परिक्षेचा निकाल जाहीर झाला.पण त्या परिक्षेत्र उत्तीर्ण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरिक्षक पद प्राप्त करता-करता सन 2020 चा शेवट आला.2013 ते 2020 या दरम्यान या पोलीस उपनिरिक्षक होण्याच्या निर्णयावर अनेक त्रास या पोलीस कर्मचाऱ्यांनी पाहिले.अनेक याचिका न्यायालयात दाखल झाल्या.त्याचे निर्णय आले. अखेर शेवटी शासनाने पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरिक्षक पद देण्याचे ठरवले आणि राज्यभरात जवळपास एक हजार पोलीस कर्मचारी पोलीस उपनिरिक्षक झाले.नांदेड जिल्ह्यात या एक हजारमध्ये 32कर्मचाऱ्यांचा अधिकारी होण्यात सहभाग आहे.
मागील तीन महिन्यापासून पोलीस उपनिरिक्षक झालेल्या नांदेड येथील पोलीस कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती अद्याप झालेली नाही.आजही पोलीस उपनिरिक्षक पोलीस कर्मचारी पदाचे वेतन प्राप्त करत आहेत.त्यामुळे फौजदार झाल्यावर सुध्दा त्यांची न झालेली वेतन निश्चिती अद्याप त्यांना विवंचना देत आहे.वेतन निश्चिती होण्याअगोदर राज्यातील अनेक पोलीस उपनिरिक्षक सेवानिवृत्त झाले. सुदैवाने नांदेड जिल्ह्यातील एकही पोलीस उपनिरिक्षक सेवानिवृत्त झाला नाही.म्हणून त्यांना वेतन निश्चिती लवकर व्हावी अशी अपेक्षा होत आहे. वेतन निश्चिती झाल्यानंतर विविध भत्ते,सातवा वेतन आयोग अशा प्रकारे त्यांच्या दरमहिन्याच्या वेतनात चांगलीच वाढ होणार आहे.अधिकारी झालो पण वेतन निश्चिती कधी होणार ही चिंता त्यांना कायम आहे




नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड:प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ
नायगाव तालुका कार्यकारणी च्या वतीने आज 6 जानेवारी मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकारआचार्य बालशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्य नायगाव तालुका प्रेस संपादक व पत्रकारसेवा संघाच्या वतीने मौजे देगांव ता.नायगाव येथील साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या सभागृहात बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची कार्यकारणी ही नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख मारोती शिखारे,वैशाली इंगोले,जिल्हा समन्व्यक संदीप कांबळे,जिल्हा संघटक शंकर सिंघ ठाकूर,जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांच्या वतीने नायगाव तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली त्या मध्ये अविनाश अनेराये उपाध्यक्ष म्हणून अंकुशकुमार देंगावकर यांची सर्वानुमत्ते निवड जाहीर करण्यात आली आहे.व प्रेस संपादक व पत्रकार संघाच्या वतीने साहित्यिक अण्णाभाऊ साठे सभागृह, ड्रा.बाबासाहेब आंबेडकर सभागृह परिसरात व सामाजिक न्याय विशेष सयाग विभाग समाजकल्याण मुलांची शाळा नायगाव आदी ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे. व नंतर नवीन कार्यकारणीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी विक्रम पा.बामणीकर,संभाजी गायकवाड,ऋषिकेश रोडे,गौरव गायकवाड,प्रकाश कामळजकर, व्येव्हारे सोनकांबळे,भाऊसाहेब चव्हाण प्रकाश दडेकरआदी पत्रकार उपस्तिथ होते.

गोकुळ शिरगाव प्रतिनिधी
गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील ग्रामदैवत श्रीकृष्णाची १३ जानेवारी रोजी होणारी विशाळी यात्रा कोरोणा संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, शासनाच्या व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार रद्द करण्यात आली असल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे. तसेच भाविकांनी गर्दी न करण्याचे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच श्रीकृष्ण मूर्तीची पूजा-अर्चा अभिषेक व इतर धार्मिक विधी गावातील हक्कदार पुजारी गुरव यांच्याकडून अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात येणार आहे.
ग्रामदैवत श्री कृष्ण यात्रेसाठी गोकुळ शिरगाव मध्ये जिल्ह्यातून व सीमाभागातील लाखो भाविक गर्दी करत असतात. प्रथमच कोरोणा महामारी मुळे सदर यात्रा रद्द करावी लागत असल्याचे सांगण्यात आले.

इम्तिहाज मुलाणी :
इंदापूर (प्रतिनिधी):
माळशिरस //: दारू नको दूध प्या’, ‘३१ ची रात्र दुधाची रात्र’, ‘द दारूचा नाही, द दुधाचा’ अशा घोषणा देत आणि रस्त्यावरून येणाऱ्या- जाणाऱ्यांना २०० लिटर मसालेे दूध वाटप करत माळशिरस तालुक्यातील उंबरे दहिगाव या गावातील ज्ञानदेव तरंगे व अँड. विकास नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यादेवी तरुण मंडळ उंबरे दहिगाव यांनी ‘नववर्षांचे स्वागत दारू पिऊन नको’, तर दूध पिऊन करा असा संदेश दिला.
या वेळी गावातील नागरिकांना दुधाचे वाटप केले. ‘दारू पिऊन वाहन चालवल्यामुळे अपघातांत मृत्यू होण्याचे प्रमाण मोठे असून नववर्षांच्या आदल्या रात्री अनेक वाहनचालक दारू पिऊन वाहन चालवतात. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी लोकांचा सहभाग वाढायला हवा.’’असे आवाहन ज्ञानदेव तरंगे व अँड.विकास नारनवर यांनी केले.
सन २००४ सालापासून अहिल्यादेवी प्रतिष्ठान तरुण मंडळामार्फत वृक्षारोपण,रक्तदान शिबिर,गरीब मुलांना वस्त्र वाटप केले जाते.कै बबन ठोंबरे यांच्या स्मरणार्थ गेली १६ वर्षांपासून पाणपोई सुरु करण्यात आली आहे, त्याचे नियोजन ज्ञानदेव तरंगे व अँड.विकास नारनवर यांच्या माध्यमातून हे उपक्रमाचे नियोजन केले जाते,यामुळे माळशिरस तालुक्यात अहिल्यादेवी प्रतिष्ठान तरुण मंडळाच्या मार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाचं नेहमीच कौतुक केले जाते.
या वेळी सोपान (काका)नारनवर (तालुका अध्यक्ष भाजपा) , विष्णुपंत नारनवर (सरपंच) , शिवाजी पाटील चेरमन, संजय ढेकळे (ग्रा सदस्य) , माणिक ठोंबरे (पोलिस), अँड.महादेव वाघमोडे, अनिल पाटील, शंकर पाटिल , पांडुरंग ठोंबरे(उद्योजक), दिपक ढेकळे (उपसरपंच), राघु ठोंबरे ,नानासो नारनवर, दादा ढेकळे (मानुसकी प्रतिष्ठान), राजेंद्र वघमोडे (तालुका उपाध्यक्ष), राजेंद्र वघमोडे , रणजीत नारनवर ,सागर नारनवर , युवराज नारनवर, बापू गोरे , हनुमंत ढेकळे, सोमा वघमोड़े नवनाथ खरडेकर, हर्षल नारनवर , किरण पाटिल , विजय नारनवर ,विष्णु पाटिल, महेश पवार, विठल पाटील , सचिन पाटिल , गफूर मुलानी , राम जाधव , महेश चोरमले, पोपट वाघमोडे, स्वप्निल वाघमोडे, नितीन वाघमोडे, वैभव ठोंबरे शंकर ठोंबरे ,आदी तरुण उपस्थित होते.

भोकर प्रतिनिधी (दत्ता बोईनवाड )तालुक्यातील63 ग्रामपंचायती पैकी 12 ग्रामपंचायती बिनविरोध काढण्यात ग्रामस्थांना यश आल्याने बिनविरोध गावांची डोकेदुखी कमी झाली आहे आता 51 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चुरस होणार आहे 141 वॉर्डातून 333 जागेसाठी 757 उमेदवार आपले भवितव्य आजमावणार आहेत तालुक्यातील 63 ग्रामपंचायती पैकी मातुळ सोनारी पाळज पाकी सोमठाणा गारगोटवाडी पां बोरवाडी सावरगाव मेट लगळुद रहाटी बु ईळेगाव कांडली ही 12 गावे ग्रामस्थाच्या सांमजस्याने बिनविरोध काढण्यात यश आल्याने गावातील ताण तणाव कमी झाला आता 51 ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक होणार आहे उर्वरित गावांमध्येही काही वार्ड बिनविरोध निघाले आहेत 63 ग्रामपंचायतीमधुन 193 पैकी 52 प्रभाग बिनविरोध निघाल्याने 141 प्रभागात 333 जागेसाठी 757 उमेदवार रिंगणात आहेत या निवडणुकीसाठी 1188 जणांनी अर्ज दाखल केले होते त्यातील 22 अर्ज अवैध ठरले होते तर1164 वैध ठरली यापैकी 234 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली अनुसूचित जमातीचे उमेदवार न मिळाल्याने 10 जागा रिक्त आहेत



प्रतिनीधी.सुनील भोसले, विकासा पासुन वंचित राहीलेल्या गोर गरीब, शोषित,पिडीत लोकांपर्यंत कसा न्याय मिळेल व त्याच्यापर्यंत कशा प्रकारे शासकीय योजना पोहोचवता येतील असे विविध उपक्रम राबून तळागाळातील लोकांना न्याय देणारे आदिवासी समाजसेवक व साहित्यिक नामदेव भोसले हे आहेत ,आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ऊरुळी कांचन, नायगाव, शिंदेवाडी, अष्टापूर,पिंपरी सांडस, न्हावी सांगवी, वाडे भोलाई, येथिल खावटी अनुदान योजनेचे कांम शिदेवाडी येथे,क्रांती ज्योती सावित्रीबाई फले यांच्या 190 व्या जयंतीनिमित्त दि 2व 3 जानेवारीला रोजी ऐकुन 190 आदिवासी खावटी अनुदान योजनेचे फार्म भरुन शासनाला देण्यात आले,
या वेळी पत्रकार व प्रखरप्रवक्ते .शिदेवाडीचे माजी सरपंच .विकास लवांडे बोलत होते, ते पुढे म्हणाले की जो महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचाराची शिदोरी खांद्यावर घेऊन कांम करतो व जो
समाजहितासाठी झगडतो तोच खरा लोकांच्या नजरेत
समाजहीताचा नामदेव भोसले यांच्यासारखा आदिवासी समाजात आदर्श समाजसेवक घडतो ,
(आज खावटी योजने अंतर्गत कांम करताना गरीब शोषित, पिढीत कुटुंबातील लोकांची सेवा करण्यात मिळते हे आमंचे भाग्य समजतो असे मत आदिवासी समाजसेवक व साहित्यिक. नामदेव ज्ञानदेव भोसले मांडले,ते पुढे म्हणाले की डाॅ सतिश वाघमारे सर , सौ.रेणुकाताई अशोक जाधव,सौ.ज्योती दोडके ,
यांच्या सारखे तळागाळात जाउन कांम करणारे लोक थोडे आहेत,परंतू दुःखद बाब म्हणजे बारामती, इंदापूर, दौंड, या तालुक्यात खावटी योजनेचा कामासाठी नेमलेले अधिकारी व शिक्षक हे गेली दहा महिने शासनाचा घरात बसुन फुकट पगार घेऊन आपल्या घरात सुखाने दिवाळी साजरी केली परंतू,…….
त्यांच्या स्वार्थीपणामुळे आज पुणे जिल्ह्यातील 1लाख आदिवासी पारधी बांधवांची दिवाळी उपाशी पोटी रहात अंधरात गेली हे चिंताजनकबाब आहे. असी खंत भोसले यांनी व्येक्त केली,
हे अदिवासी मंत्रालयाला का दिसत नाही, त्यामुळे या तीन तालुक्यात काम करणारे शिक्षक व अधिकारी यांच्यावर शासन नेमानूसार कडक कारवाई घ्यावी असी मागणी आदिवासी संस्था व संघटना कडून केली जात आहे,)
या कार्यक्रमात ऊपस्थितीत अधिकारी व शिक्षकांचा शाल. श्रीफळ.व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले,
या वेळी, प्रवक्ते व माजी सरपंच. विकास लवांडे, जेष्ट साहित्यिक, भास्कर भोसले,आदिवासी समाजसेवक व साहित्यिक. नामदेव भोसले,डॉ. सतिश वाघामारे, रेणुकाताई जाधव,अशोक चव्हाण, ज्योती दोडके, स्वप्निल गारे,पत्रकार सुनिल भोसले,सुरेखा भोसले,तुषार भोसले,हे उपस्थित होते,.



पालघर/दिपेश पष्टे: जनसेवा सामाजिक संस्थे मार्फत संपूर्ण जिल्हात मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम वर्षभर राबविण्यात येत असतात. तसेच वाडा तालुक्यातील खरीवली गावात गेल्या अनेक वर्षापासुन या संस्थेमार्फत नूतन वर्षाची सुरवात सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करून केली जाते.यावर्षी सुद्धा दि.०१व ०२ जानेवारी २०२१ रोजी या दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन खरीवली गावातील साई मंदिर परिसरात केले होते.
सदर या दोन दिवसीय सामाजीक उपक्रमात पहिल्या दिवशी परिसरातील गरजू व आदिवासी कुटुंबाना एक मदतीचा हात म्हणुन ब्लॅंकेट व गृहउपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच यावेळी लहान मुलांना कपडे व खाऊ सुद्धा देण्यात आली. कोविड-१९ महामारी मध्ये ज्यांनी आपल्या आरोग्याची पर्वा न करता इतरांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी सेवा केली अश्या पत्रकार, आरोग्य सेविका,आशा वर्कर, डॉक्टर यांना कोविड योद्धा सन्मानपत्र देवून मानसन्मान करण्यात आला.तर दुसऱ्या दिवशी परीसरातील तरुणांनी राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला एक प्रतिसाद म्हणून व राज्यातील रुग्ण सेवेत आपलं सुद्धा हातभार असावा यासाठी मोठ्या संख्येने रक्तदान केले.
तसेच याठिकाणी मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर मध्ये नागरिकांनी सहभाग घेऊन तपासणी केली. यामध्ये आरोग्य तपासणी मध्ये साखरेचे प्रमाण,ईसीजी,ब्लडप्रेशर,अस्थी रोग इत्यादी आजाराची तपासणी मोफत करण्यात आली. ही तपासणी ऑरेंज हॉस्पिटल भिवंडी व स्किलमिट अकॅडमी अंबाडी यांच्या मार्फत करण्यात आली.तर नेत्र तपासणी शिबिर मध्ये ज्या वयोवृद्ध नागरिकांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया गरज आहे अश्या नागरीकांची मोफत शस्त्रक्रिया भुमीऑप्टिक्स अंबाडी-कुडूस यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे .
सदर या दोन दिवसीय कार्यक्रम अनेक मान्यवरांनी उपस्थिती दाखवली यामध्ये भाजपा पालघर जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील, वाडा पंचायत सभापती योगेश गवा,जिल्हा परिषद सदस्य शशिकांत पाटील,शिवसेना नालासोपारा विधानसभा सह समन्वयक गोविंद पाटील,मुबंई मधील दानशूर व्यक्तिमत्त्व नीलेश शहा, शशिकांत शाह,अल्पा बेन बेन,हरखचंदजी गड्डा,कल्पेश संगोइ,नितीनजी धरोड,योगेश जोशी,सिद्धार्थ जोशी,समाजसेवक रामचरण नाईक,मानवाधिकार सुरक्षा संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा सचिव दिपेश पष्टे,प्रहार अपंग क्रांती संघटनेचे वाडा तालुका अध्यक्ष संतोष निखुर्डे,समाजेवक केशव पाटील, भाई ठाकरे, रोहित ठाकरे, चर्मकार सेवा सोसायटी अध्यक्ष विजय माने आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रम प्रसंगी जनसेवा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नरेश जाधव यांनी सांगितले की या संस्थेच्या माध्यमातून येणाऱ्या काळात महिला बचत गटांना स्वयंरोजगार निर्मिती साठी मदत त्याच बरोबर निराधार व विधवा महिलांना अर्थिक स्वरूपात मदत करणार आहोत.
यावेळी जनसेवा सामाजिक संस्थेचे सचिव पत्रकार जयेश घोडविंदे, खजिनदार भूषण ठाकरे, सदस्य सुरज जाधव,वैभव भोईर, मयुरी बागुल,वत्सला पवार, जयवंती पाडोसा यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विषेश मेहनत घेतली.


कोपरगाव बिपिन गायकवाड हिंदू सम्राट तालुका प्रतिनिधी-
कोपरगाव नगरपरिषदेकडून माझीवसुंधराअभियानाअंतर्गत जलस्त्रोत स्वच्छता मोहिमेतून गोदावरी नदी पात्राची स्वच्छता करण्यात आली महाराष्ट्राची दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी कोपरगाव शहरा शेजारुण वाहते पूर्वी बाराही महिने वाहणारी नदी आता वाढत्या प्रदूषणामुळे पावसाचे प्रमाण कमी झाल्याने वाहताना दिसत नाही गणेशोत्सव शारदा उत्सव व धार्मिक कार्यक्रमांमध्ये नदीच्या पात्रात निर्माल्य विसर्जन मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे नदीपात्रामध्ये घाण पसरलेली आहे तसेच या ठिकाणी नियमित होत असणारे अस्थी विसर्जन विधी या कारणाने नदीपात्रातील पाणी प्रदूषित व अस्वच्छ होत आहे कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने माझी वसुंधरा अभियानातील जल घटकांतर्गत शहर व शहराच्या परिसरातील जल स्तोत्राची स्वच्छता अभियानांतर्गत राबविण्यात बाबतची कार्यवाही नुकतीच गोदावरी नदीचे पात्र स्वच्छ करुन करण्यात आले कचेश्वर शुकलेश्वर घाट येथे स्वच्छता मोहीम राबवून नदीपात्रातील व परिसरातील साफसफाई करण्यात आली या स्वच्छता मोहिमेमध्ये नदीपात्रातील तीन ट्रॅक्टर कचरा गोळा करून सदर कचरा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाकडे पाठवण्यात आला सदर स्वच्छता मोहीम यशस्वी करणे कामी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यधिकारी सुनील गोरडे सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी स्वच्छता विभागाचे कर्मचारी याच्यासह गोदामाई प्रतिष्ठान यांनी सक्रिय सहभागाने यशस्वी पणे राबवण्यात आली यावेळी मुख्याधिकारी प्रशांत सरोदे नगराध्यक्ष विजय वहाडणे नगरसेवक जनार्दन कदम नगरसेवक शिवाजी खांडेकर नगरसेवक सत्यजित मुदंडा सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ ढाकणे यांच्यासह कोपरगाव नगर परिषदेचे सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी व गोदामाई प्रतिष्ठान चे सर्व सदस्य यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाणी हे जीवन आहे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत स्वच्छ राहणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे जल जमीन जंगल हवा नैसर्गिक पर्यावरणाचे स्त्रोत आहेत निरोगी जीवनासाठी प्रत्येक नागरिकांनी स्वच्छता बाळगली पाहिजे व नैसर्गिक स्त्रोत प्रदूषित होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे स्वच्छता अभियान व माझी वसुंधरा अभियान यामध्ये सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा व पर्यावरण संवर्धनात सहकार्य करावे असे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे




. स्वप्निल तांडेल करावेगांव प्रतिनिधी : पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने दिनांक 6 जानेवारी 2021 रोजी पत्रकार दिनाचे औचित्य साधून पनवेल तालुक्यातील अतिदुर्गम भागातील फणसवाडी (खैरवाडी) येथील आदिवासी बांधवांना अन्नधान्य वाटपाचा मदत कार्यक्रम करण्यात आला. पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या या ठिकाणी असणाऱ्या आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून पनवेलमधील पत्रकारांकडून एक अनोखा संदेश देण्यात आला. आजही पत्रकार दिनाला प्रसिद्ध नेत्याला बोलावून चमकोगिरी करण्याचे फॅड सुरू असून यामध्ये स्वतःची प्रसिद्धी करून घेण्यासाठी अनेक स्वयंघोषित पत्रकार धडपडत असतात मात्र पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीने पत्रकार दिनी समाजाची सेवा करून एक वेगळा आदर्श निर्माण करून दिला आहे. यावेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे जेष्ठ सल्लागार माधवराव पाटील, प्रमोद वालेकर, अध्यक्ष रत्नाकर पाटील, उपाध्यक्ष केवल महाडिक, कार्याध्यक्ष संजय कदम, सचिव रवींद्र गायकवाड, सहसचिव सुधीर पाटील, खजिनदार हरेश साठे, सदस्य विवेक पाटिल, विशाल सावंत, प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्टचे अध्यक्ष ऍड. मनोहर सचदेव, रवींद्र पाटील यांच्यासह पदाधिकारी व सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.

पाटण हिंदू सम्राट प्रतिनिधी उमेश सुतार यांजकडून
पोलिस भरतीसंदर्भात ‘एसईबीसी’ प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करुन संबंधित विद्यार्थ्यांची पात्रता, वयोमर्यादा पाहून त्यांच्याकडून वाढीव परीक्षा शुल्क 15 दिवसांत भरुन घेतले जाणार आहे. त्यानंतर पोलिस महासंचालक कार्यवाहीचा अहवाल तत्काळ शासनास सादर करणार आहेत. तसे आदेश गृह विभागाने आज काढले. दरम्यान, हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम निर्णयाच्या तथा अंतरिम स्थगिती उठविण्याच्या अर्जावर अंतिम निकाल होईपर्यंत लागू राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
गृह विभागाच्या आदेशानुसार…
‘एसईबीसी’चे आरक्षण न ठेवता भरती प्रक्रिया पार पाडावी
‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्या उमेदवारांची पात्रता ठरविताना खुल्या प्रवर्गाची वयोमर्यादा लागू करावी
जे उमेदवार खुल्या प्रवर्गातील अटी व शर्तींची पूर्तता करतात, त्यांचा खुल्या प्रवर्गातून करावा विचार
‘एसईबीसी’तून अर्ज केलेल्यांना खुल्या प्रवर्गाचे परीक्षा शुल्क आकारावे
वाढीव परीक्षा शुल्क ऑनलाइन भरुन घेण्यात येईल; 15 दिवसांत कार्यवाही पूर्ण करावी
पोलिस महासंचालकांनी या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करुन शासनाला अहवाल सादर करावा
गृह विभागाने 2019 मध्ये पोलिस भरतीचा निर्णय घेतला आणि त्यानुसार जाहिरात प्रसिध्द करण्यात आली. मात्र, 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ‘एसईबीसी’ आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने पोलिस भरती प्रक्रिया थांबविण्यात आली. मात्र, आज गृह विभागाचे उपसचिव शिरीष मोहोड यांनी पोलिस भरतीच्या दृष्टीने आदेश काढले. दरम्यान, गृह, सार्वजनिक आरोग्य व मेडिकल विभागाअंतर्गत रिक्त पदांची भरती करण्यास वित्त विभागाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. त्यानुसार आता भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. मात्र, गृह विभागाच्या निर्णयात ‘एसईबीसी’ प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा खुल्या प्रवर्गातून विचार करावा आणि संबंधित पात्र विद्यार्थ्यांकडून वाढीव परीक्षा शुल्क भरून घ्यावे, असे आदेशात म्हटले आहे. मात्र, या आदेशात ‘एसईबीसी’ प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा ‘ईडब्ल्यूएस’मधून विचार करावा, असा उल्लेख करण्यात आलेला नाही. गृह विभागाने संबंधित विभागाला पूर्वीच्या निर्णयाचे शुध्दीपत्रक काढण्याचेही आदेश दिले आहे.
राहुरी तालुका प्रतिनिधी ( जावेद शेख ) 3 जानेवारी मा. प्राजक्त तनपुरे, मंत्री, आदिवासी विकास विभाग यांची अनुदानित आश्रमशाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी भेट घेऊन आदिवासी विकास विभागांतर्गत असणा-या अनुदानित आश्रमशाळेतील प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली व निवेदन दिले. अनुदानित आश्रमशाळेत निवासासाठी एका निवासी खोलीत कमाल दोन विद्यार्थी ठेवणे ही अट रद्द करुन कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी आरोग्याच्या दृष्टीने योग्य मार्गदर्शक सूचना प्राप्त व्हाव्यात, आश्रमशाळेत विद्यार्थी समूहाने निवासी असल्याने विद्यार्थ्यांना कोविड- १९ वर असलेली लस अथवा आवश्यक औषधोपचार प्राधान्याने उपलब्ध करुन देण्यात यावे किंवा आरोग्य विषयक विशेष उपाय योजना करावी जेणे करुन आश्रमशाळा- वसतिगृह नियमित सुरू करता येईल, कर्मचार्यांचे वेतन सतत अनियमित होणे, मागील तिन महिन्यांपासून कर्मचा-यांचे वेतन प्रलंबित आहे , सातव्या वेतन आयोगाचा फरक तात्काळ मिळावा, अन्य विभागातील कर्मचारी तसेच आदिवासी विकास विभागातीलच शासकीय आश्रमशाळेतील कर्मचार्यांचे वेतन अथवा फरक त्यांना नियमित अदा केले जाते मात्र अनुदानित आश्रमशाळेतील कर्मचारी त्यापासून वंचित आहे. माहे जानेवारी २०१६ ते माहे डिसेंबर २०१८ या कालावधीतील सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या हप्त्यांची समान विभागणी करुन प्रत्येक वर्षी एक याप्रमाणे पाच हप्त्यांत देण्याचे शासन आदेश आहेत. यामध्ये पेंशनपात्र कर्मचा-यांचे सर्व हप्ते भविष्य निर्वाह निधी मध्ये जमा होणे तसेच अंशदान निवृत्ती वेतन धारक कर्मचार्यांचा पहिला हप्ता जुलै २०१९ पर्यंत रोखीने देणे अपेक्षित होते मात्र अद्याप ते झाले नाही. या व अन्य प्रश्नांबाबतचे निवेदन मा. मंत्री यांना देण्यात आले. यावेळी आश्रमशाळेतील कर्मचारी शिष्टमंडळात संजयकुमार शिंदे, सी. आर. शिरोळे , एस्. बी. आंत्रे , एम् . बी. पगारे , एस्. एम् पवार , डी.एस. मलाव , जी.व्ही.खर्चे,जे.व्ही.सुर्यवंशी , व्हि. टी. लोंढे आदि मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

कोपरगाव हिंदूसम्राट तालुका प्रतिनिधी बिपिन गायकवाड –
जग कोरोना सारख्या महामारीतून मार्ग काढत असतांना शासनाच्या सर्व शासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कोरोना महामारी सोबत दोन हात करत असतानाच त्यांचा सोबतीला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ज्या कडे पाहिले जाते असा पत्रकार देखील गेल्या वर्षभरापासून लढतांना दिसून येत आहे.
त्याचेच एक ऋण म्हणून दि ६ जानेवारी २०२१ रोजी ओम साई ग्रामीण शिक्षण संस्था कोपरगाव च्या वतीने तालुक्यातील विविध वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्या प्रतिनिधींना पत्रकार दिनी माजी जिल्हा पोलिस अधीक्षक के पी रोकडे यांच्या शुभहस्ते व संस्थाप्रमुख परशराम साबळे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना योद्धा-२०२० असे सन्मानपत्र शाल गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी संस्थेच्या सचिव सुचित्रा साबळे, साई शक्ती इंग्लिश मीडियम स्कूल चे प्राचार्य विजय जाधव, विलास चव्हाण, सोनाली कापसे, निलेश देवकर, रेखा दिवे आदी उपस्थित होते.
या वेळी दैनिक लोकमंथन चे गणेश दाणे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे मनीष जाधव, तसेच विजय कापसे, शंकर दुपारगुडे,दिपक जाधव, रोहित टेके, फकिरराव टेके, जनार्धन जगताप, रविंद्र साबळे, अक्षय काळे, विनोद जवरे,मधुकर वक्ते,अनिल दीक्षित, हाफिज शेख,स्वप्नील कोपरे, सिद्धार्थ मेहेरखांब, युसूफ रंगरेज,बिपिन गायकवाड,पंडित भारुड आदींचा गौरव करण्यात आला.
या वेळी रोकडे यांनी बोलतांना सांगितले की पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असुन कोरोना सारख्या महामारीत देखील हा स्तंभ न डगमगता देशासाठी अहोरात्र आपल्या माध्यमातून कार्य करत आहे.त्याचा संपूर्ण देशवासियांना अभिमान आहे.आपले कार्य या पुढे ही असेच सुरू ठेवत उत्तरोत्तर आपली अशीच प्रगती होत जावो अशा शुभेच्छा दिल्या.
घटनेने पत्रकारांना लोकशाही मध्ये महत्वाचे स्थान दिले असल्यानेच आपल्या भारत देशाची लोकशाही ही मजबूत आहे.त्यामुळे प्रत्येकाने सर्वधर्म समभाव साधत काम करत राहावे.
परशराम साबळे
संस्थाप्रमुख ओम साई ग्रामिण शिक्षण संस्था

मिरज–अशोक मासाळ
आमच्या दि हिंद एज्युकेशन सोसायटी मिरज चे न्यू इंग्लिश स्कूल कवठे एकंद येथे 6 महाराष्ट्र गर्ल्स बटालियन चे युनिट आहे. यामधील कॅडेट तमीजा नदाफ हिला ले. कर्नल अशोक म्हात्रे ही 4000/- रुपयांची स्कॉलरशिप प्राप्त झाली आहे. यावर्षी प्रथमच विद्यालयातील कॅडेटला ही स्कॉलरशिप प्राप्त झाली आहे.
या स्कॉलरशिपचा धनादेश तिला 6 महाराष्ट्र गर्ल्स बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल मोहन तिवारी यांनी कोल्हापूर एनसीसी भवन मध्ये प्रदान केला. यावेळी ऍडम ऑफिसर कॅप्टन गुगामालती उपस्थित होत्या. तसेच रिटायर्ड जी. सी. आय. कॅप्टन निशा भोसले, व इतर स्टाफ उपस्थित होता.
तिच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव राहुल साळुंखे सर, अध्यक्ष मिलिंद जाधव सर, व संस्थेचे इतर पदाधिकारी यांनी तिचे कौतुक केले, तसेच आई- वडील, कवठेएकंद व नागाव परिसरातील ग्रामस्थांनीही तिचे अभिनंदन केले आहे.
तिला विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस. आर. पाटील सर, व्ही. एम साळुंखे सर, सेकंड ऑफिसर स्वाती पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी: लक्ष्मण राजे )
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात बरेच दिवस घरात बसलेल्या संगीतप्रेमी रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी आता सर्व थिएटर बंद असल्याने डिजिटल प्लॅटफॉर्म वरुन सुरेल गाण्यांची संगीत मैफल आयोजित करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे.या आॅनलाईन संगीत मैफलींना रसिक प्रेक्षकांनी पसंती दिली. त्याच अनुषंगाने निर्माता दिग्दर्शक. गायक अमित राजे प्रेझेंटस् ” रेअर ऑफ आर डी बर्मन ” या लोकप्रिय सुरेल हिंदी चित्रपटातील गीतांच्या मनोरंजक कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली होती. भारतीय चित्रपट सृष्टीतील महान संगीतकार आणि गायक आर डी बर्मन यांच्या ( ४ जानेवारी, २६ व्या पुण्यतिथी) स्मृतिदिना निमित्त निर्माता अमित राजे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सुमधुर, सुरेल, अविस्मरणीय, लोकप्रिय गीतांची “रेअर ऑफ आर डी बर्मन” ही सुरेल संगीत मैफल डिजिटल प्लॅटफॉर्म वरुन आॅनलाईन सादर करण्यात आली.निर्माता अमित राजे यांनी सादर केलेल्या आर डी बर्मन यांच्या अविस्मरणीय सुमधुर लोकप्रिय गाजलेल्या गाण्यांच्या “रेअर ऑफ आर डी बर्मन” या आॅनलाईन कार्यक्रमात गायक अमित राजे यांनी आर डी बर्मन – किशोर कुमार या जोडीची गाजलेली मधुर गीते सादर केली.या ऑनलाईन कार्यक्रमात तुम हो मेरे दिल की धडकन , ना जाने दिन कैसे जीवन में आए है,रूप ये तेरा किसने बनाया है , बहौत दूर हो के बहौत पास हो तुम, कहो कैसे रास्ता भुल पडे, ओ मेरे हेमराज कैसा है ये राज,रास्ता देखके तेरा अशी एका पेक्षा एक सरस मधुर हिंदी चित्रपट गीते सादर केली.या सुरेल संगीत मैफिलीचे सुत्रसंचलन , निवेदन रत्ना हिले यांनी केले. या यशस्वी आॅनलाईन कार्यक्रमाला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. विशेषतः भारतासह कॅनडा , मास्को , यूएसए , यूएई , यूके अशा जगभरातील संगीतकार आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या हिंदी चित्रपट गीतांच्या चाहत्यांनी या सुपरडुपर सुपरहिट कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. तसेच असंख्य रसिकांनी इव्हेंट आॅर्गनाईझर अमित राजे यांच्या यू ट्यूब चॅनल वरून अनेकदा आनंद घेतला. या सुरेल संगीतमय यशस्वी आॅनलाईन कार्यक्रमाला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. तसेच या अविस्मरणीय कार्यक्रमाच्या अभूतपूर्व यशानंतर अमित राजे यांनी डिजिटल प्लॅटफॉर्म वरुन विविध संकल्पना घेऊन सुरेल हिंदी गाण्यांच्या मैफलीचे आयोजन करून रसिकांना घरबसल्या आनंददायी सुरेल , मधुर हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहीन असे मनोगत व्यक्त केले .
फलटण दि. 6 जानेवारी –
फलटण प्रतिनिधी अभिषेक सरगर
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून मिळालेली माहिती नुसार, रविवार दि. ३ जानेवारी रोजी भाडळी खु. ता. फलटण येथे सकाळी नऊच्या सुमारास चोरमले वस्ती नजीक प्रशांत सोनवलकर यांच्या रानात, बैलगाड्यांच्या शर्यतीस शासनाची बंदी असतानाही, लोकांच्या मनोरंजनासाठी बेकायदेशीरपणे बैलांचा शर्यतीसाठी वापर केला, तसेच शर्यती बघण्यास आलेल्या कोणीही लोकांनी तोंडाला मास्क न लावता व सामाजिक अंतर न राखता एकत्र गर्दी करुन, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा लागु असताना, त्या संदर्भाने जिल्हा अधिकारी सो सातारा यांनी दिलेल्या CRPC 1973 चे कलम 144 अन्वये आदेशाचे उल्लंघन केले प्रकरणी सुभेदार तथा पिंटू जमादार डुबल, अमोल विठ्ठल कोळपे दोघेही रा. भाडळी खु., विकास चांगण रा. सासकल, सचिन गुंजवटे रा. झिरपवाडी, प्रणय नवनाथ भंडलकर तथा गुरव रा. तिरकवाडी ता. फलटण यांच्याविरोधात फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला जमावबंदीचे उल्लंघन, प्राण्यांना निर्दयीपणे व क्रुरपणे वागवणेस प्रतिबंध, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, भारतीय साथ रोग अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत भाडळी खु. चे पोलीस पाटील हणमंत सोनवलकर यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार एस व्ही खाडे करित आहेत.
हिंदूसम्राट विशेष प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
बीड:जिल्ह्यात अवैध वाळू उपसा व वाहतुकीच्या तसेच त्यातून घडलेल्या अपघातांच्या तक्रारी गंभीर असून पोलीस व महसूल प्रशासनाने अशा वाळू माफियांविरुद्ध तातडीने कडक कार्यवाहीचे सत्र सुरू करावे असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा पोलिस व महसूल प्रशासनास दिले आहेत. महसूल किंवा पोलीस खात्यातील कोणतेही अधिकारी किंवा कर्मचारी वाळू माफियांना पाठीशी घालत असल्याचा प्रकार जर उघडकीस आला तर त्याची अजिबात गय केली जाणार नाही, प्रशासनातील अशा अधिकाऱ्यांवर देखील कडक कारवाई करण्यात यावी असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. बीड जिल्ह्यात चोरट्या मार्गांनी अवैध वाळू उपसा व वाहतूक होत असल्याच्या तक्रारी सध्या वाढताना दिसत आहेत.त्यातच गेवराई तालुक्यात एका 60 वर्षीय शेतकऱ्याचा वाळूच्या वाहनाने चिरडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाचे कान टोचले आहेत.जिल्ह्यात वाळूची अवैध वाहतूक व माफियागिरी अजिबात चालणार नाही,असे सांगताना अशा प्रकारच्या माफियागिरीवर कठोर कार्यवाही करावी तसेच यात जाणीवपूर्वक कसूर करणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांवर देखील कार्यवाही करण्याचे निर्देश मुंडे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिले आहेत

विरेंद्र म्हात्रे नवी मुंबई प्रतिनिधी : प्रभाग ८६ मधील सारसोळे व नेरूळ सेक्टर सहामधील मार्गफलकांची दुरावस्था दूर करून डागडूजी तसेच सुशोभीकरण करण्याची मागणी सारसोळे गावचे ग्रामस्थ व महापालिका ‘ब’ प्रभाग समितीचे माजी सदस्य मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.महापालिका प्रभाग ८६ मध्ये सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहा परिसराचा समावेश होत आहे. या परिसरात आपण अंर्तगत भागातील रस्त्यावर तसेच चौकात फिरल्यास येथील मार्गफलकांची पूर्णपणे दुरावस्था झालेली असून त्या ठिकाणी बकालपणा आलेला आहे. मार्गफलकावरील माहिती असणाऱ्या पाट्या नाहीशा झाल्या असून केवळ चौथरेच पहावयास मिळतात. अनेक ठिकाणचे चौथरेही तुटलेले आहेत. अन्य सेक्टर व गावांमध्ये नव्याने स्टील रॉड व फायबरमध्ये मार्गफलक बसविण्यात आले आहेत. मग प्रभाग ८६ मधील सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहा परिसरात अशा प्रकारे मार्गफलक का बसविण्यात आले नाहीत. अनेक वर्षापासून मार्गफलकांची दुरावस्था असतानाही पालिका प्रशासनाकडून डागडूजी तसेच सुशोभीकरण करण्यात आलेले नाही. यासंदर्भात विभाग कार्यालयात १३ ऑक्टोबर २०२० रोजी निवेदनही सादर केलेले आहे. तथापि प्रशासनाकडून या पत्राची दखल न घेण्यात आल्याने पुन्हा समस्येचे गांभीर्य निदर्शनास आणून देण्यासाठी हा पत्रव्यवहार करत असल्याचे मनोज मेहेर यांनी निवेदनात म्हटले आहे.

विरेंद्र म्हात्रे नवी मुंबई प्रतिनिधी : भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा, ३ जानेवारी जयंतीदिन. स्त्री उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा ज्योतिराव फुले यांनी हाती घेतलेल्या समाजोद्धाराचा वसा तितक्याच नेटाने पुढे नेणाऱ्या सावित्रीबाईंना त्यांच्या १८९ व्या जयंती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन! त्यांच्याच पाऊलांवर पाऊल टाकत आज समाजातील प्रत्येक स्त्री समाजात अभिमानाने वावरत आहे,स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करून यशाचा डोंगर सर करीत आहे. समाजातील अश्याच सुशिक्षित, कर्तृत्वान,जिज्ञासू,मेहनती शिक्षका यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांसारखे विदयार्थी घडवण्याचे अमूल्य कार्य केले आहे, त्यामुळेच पनवेल मधील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणार्या शिक्षकांचा सत्कार सोहळा दिमाखदार पद्धतीत आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्याची सुरवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली, त्यानंतर उपस्थित सर्व मा. महिलावर्गाची फॉउंडेशन च्या सदस्यांनी महिलांना हळदीकुंकू लावून ओटी भरली व कार्यक्रमाला प्रारंभ झाला. उपस्थित सर्व मान्यवरांनी व्यासपीठावर जाऊन आपले मनोगत व्यक्त केले. क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन च्या कार्याचे कौतुक केले,त्यांना पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या. तसेच या सोहळ्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या ३ जानेवारी जयंतीनिमित्त दिनांक ५ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी 4 वाजता विसपुते महिला वसतिगृह नवीन पनवेल सेक्टर १५, प्लॉट नंबर ४१,पनवेल (पूर्व ) याठिकाणी क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन तर्फे पनवेल मधील शिक्षकांना सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
या सत्कार सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय श्री विसपुते कॉलेज व आदर्श शैक्षणिक समूह चे चेअरमन धनराजजी विसपूते,उद्योजक मा.श्री सतिशजी मोरे, माजी महापौर मा.सौ. चारुशीला घरत, ऍड सौ.संगीता रोकडे ,ऍड सौ.दीपाली बांद्रे, माजी नगरसेविका सौ.नीता माळी,
मा.श्री कादिरभाई कच्छी, ज्येष्ठ नेते शेतकरी कामगार पक्ष आर.डी.घरत, डी डी विसपुते प्राध्यापिका सौ.सीमा कांबळे, प्राध्यापिका श्रीमती इंदुमती ठक्कर, मुख्याध्यापक एम.यु.एम.इंटरनॅशनल स्कुल चंद्रकांत सूर्यवंशी,
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष मा.श्री रत्नाकर पाटील, उद्योग नगरी वृत्तपत्राचे पत्रकार कुमारी रुपाली वाघमारे, दैनिक हिंदू सम्राट वृत्तपेपर चे पत्रकार
मा.श्री विरेंद्र म्हात्रे, जागरूक महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे पत्रकार मा.श्री एकनाथ गोपाळ, सौ.मा.जयश्रीमाई सावार्डेकर
भारतीय महाक्रांन्ती सेना राष्र्टिय अथ्यक्ष महिला आघाडी, समाजसेविका वंदना बामणे, सह शिक्षक, शिक्षिका आदी उपस्थित होते तसेच क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ. रुपालिताई शिंदे व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.यावेळी क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ. रुपालिताई शिंदे, सदस्या सौ.मौसमी तटकरे, विचुंबे विभागीय अध्यक्षा सौ.रत्नमाला पाबरेकर, सदस्या सौ. यामिनी महाजन,सदस्या सौ. माणिनी घोडके व डी.डी.विसपुते कॉलेज चे शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.
प्रतिनिधी मयूर जाधव कराड.
मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास पाचवड फाटा येथे पुणे-बंगलोर महामार्गावर बिबट्या बसल्याच्या आढळल्याने आसपासच्या परिसरात खळबळ उडाली पाचवड येथील जेके पेट्रोल पंपासमोर घटना घडली आहे्
सुमारे अर्ध्या तासापेक्षा जास्त काळ त्यांनी रस्त्यावर ठाण मांडला होता त्यामुळे वाहतूक खोळंबली होती. आगाशिव येथील लेण्यातील सुरक्षारक्षक निघाले असता त्यांच्या ची गोष्ट लक्षात आली व त्यांनी लगेच वनविभागाला माहिती दिली . वनविभागाचे अधिकारी तिथे पोहोचेपर्यंत वाढलेली गर्दी व वाहनांच्या आवाजामुळे त्याने बाजूच्या उसात धूम ठोकली. मात्र काही वेळातच तिथे वनविभागाचे कर्मचारी पिंजर्यासह पोहोचले. त्यावेळी वनपाल.मा. ए.पी .सव्वाखंडे. वनरक्षक मा.मंगेश वंजारी. वनरक्षक रमेश जाधव वनरक्षक प्रशांत मोहिते वनरक्षक उत्तम पांढरे. सचिन खंडागळे. धनाजी गावडे व भाऊसाहेब नलवडे उपस्थित होते. त्यांच्यासोबत पर्यावरण अभ्यासक रोहन भाटे हे उपस्थित होते. मंगळवारी रात्रभर पाचवड फाटा. नांदलापुर. महामार्गालगत चा परिसर त्यांनी शोध मोहीम राबवली. उसात गडाच्या कडेला शोध घेण्याचे काम बुधवारी सकाळपर्यंत सुरू होते. त्या ठिकाणी बिबट्याचे ठसे आढळून आले .मात्र दिसला नाही. त्याचप्रमाणे शोधमोहीम चालू आहे.
आशिष चव्हाण / वाई प्रतिनिधी
दि.६
तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक लागलेली आहे पंचवार्षिक निवडणुकीत जोरदार प्रचार व धुराळा उडण्यास सुरुवात झालेली आहे अनेक वर्षे गावाची सत्ता भोगुनही आजी-माजी सरपंचासह नामधारी गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती जोर-बैठका मारण्यास सुरुवात करीत आहेत काहीही झालं तरी ग्रामपंचायतीमध्ये सत्तेचे वाटेकरी होण्यासाठी एकमेकांच्या विरुद्ध षड्यंत्र चा कार्यक्रम सुरू झाला आहे. गावचा विकास झाला नाही तरी चालेल पण ग्रामपंचायत सत्ता हस्तगत झाली पाहिजे या इर्षेने पेटलेल्या गावा गावातील चांडाळ चौकडी ने ग्रामपंचायत निवडणुकीवर डोळा ठेवलेला आहे. आज हि गावाच्या समस्या जैसे थे आहेत तरीदेखील खोटे आश्वासन देऊन पुन्हा सत्तेत येण्याचा प्रयत्न चालू झाला आहे.वाई तालुक्यातील 99 ग्रामपंचायती पैकी 76 गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाले आहे शासनाच्या धोरणामुळे गावच्या विकासासाठी येणारा निधी हा ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा होत आहे तसेच सरपंच व उपसरपंच यांचा निधीदेखील वाढलेला आहे. निवडणूक आली की तेवढ्यापुरतेच नेतेमंडळी जमा होतात. जो तो गावचा विकास करेन असं बोलतो परंतु निवडणूक झाल्यानंतर ते सगळे विसरून जातात. महिलांना 35 टक्के आरक्षण मिळाल्यामुळे राजकीय पटलावर त्यांना संधी मिळाली आहे. परंतु घोटाळे जास्त झाले असल्या कारणामुळे चांगल्या महिला राजकारणातून बाजूला निघून जातात. त्यामुळे महिलांच्या आरक्षण हे फक्त कागदावरच दिसून येते गावातील नेतेमंडळी त्यांच्या पत्नी किंवा जवळील महिला सरपंच किंवा सदस्य पाहायला मिळतात. प्रत्येक गावातील युवती युवक किंवा महिला यांना निवडणूक लढवण्याची तीव्र इच्छा असते परंतु गावटगे यांच्यामुळे कर्तृत्ववान युवक व महिला राजकारणापासून दूर जातात. सतत पाच वर्ष सत्ता भोगून देखील पुन्हा गावाला वेठीस धरण्यासाठी मी नाहीतर माझी बायको असा अट्टाहास करुन गावचा विकासाला खीळ घालण्याचे काम करत असतात असे होऊन देखील गावचे अनेक प्रश्न प्रलंबित राहून गेलेले दिसून येतात याला जबाबदार कोण असा प्रश्न प्रत्येक गावातील ग्रामस्थ करीत असतो.
स्वप्निल तांडेल करावेगांव प्रतिनिधी ऑनलाईन फसवणूक करणार्या टोळ्यांनी आता सोशल माध्यमांचा वापर करुन नातेवाईक अथवा मित्र असल्याचे भासवून समोरील व्यक्तीकडून ऑनलाईन पैसे उकळण्याचे प्रकार सुरु केले आहेत. असाच काहीसा प्रकार पनवेलच्या सुकापुर भागातील तरुणासोबत नुकताच घडला आहे. अज्ञात टोळीने या तरुणाच्या मामाच्या फोटोचा वापर करुन व्हॉट्सअॅपद्वारे त्याच्याकडून 38 हजार रुपये उकळल्याचे उघडकिस आले आहे. खांदेश्वर पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात टोळी विरोधात फसवणुकीसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणात फसवणूक झालेला अभिषेक पांडे (29) हा तरुण पनवेलच्या सुकापुर भागात राहाण्यास असून त्याचा रियल इस्टेटचा व्यवसाय आहे. अभिषेकचा मामा नितेश पांडे हा कर्नाटकात बंगलोर येथे कुटुंबासह राहण्यास असून त्यांच्याकडे मोबाईलचे वेगवेगळे नंबर आहेत. यातील मुख्य नंबरवर अभिषेक नियमित आपल्या मामासोबत व्हॉटसअॅपवरुन चॅटींग तसेच संपर्क साधत होता.
अभिषेकचा मामा त्याच्याकडे असलेल्या वेगवेगळ्या नंबरवरुन अभिषेक सोबत संपर्क साधत होता. याचाच फायदा ऑनलाईन फसवणुक करणार्या टोळ्यांनी घेतला. या टोळीने अभिषेकचा मामा नितेश पांडे याच्या फोटोचा वापर करुन अभिषेकचा मामा असल्याचे भासवून अज्ञात नंबरवरुन अभिषेक सोबत व्हॉट्सअॅपच्या माध्यमातुन संपर्क साधला. तसेच अभिषेकला इंग्रजीमधुन हिंदी भाषेत मित्राला हॉस्पीटलमध्ये पैशांची अर्जंट गरज असल्याचे व गुगल पेच्या माध्यमातून अर्जंट पैसे पाठविण्याबाबत मेसेज पाठविला. तसेच दुसर्या दिवशी सकाळी सदर पैसे परत करण्याबाबत देखील मेसेज पाठविला. सदर व्हॉट्अॅप नंबरवर अभिषेकचा मामा नितेश पांडे याचा फोटो असल्याने सदरचा मेसेज नितेश पांडे यानेच पाठविल्याचा समज झाल्याने अभिषेकने सदर मोबाईल नंबरवर फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो नंबर न लागल्याने अभिषेकने त्यांना किती पैसे पाठवायचे असा मेसेज पाठविला असता, समोरुन प्रथम 18हजार रुपये व त्यांनतर 10-10 हजार रुपये अर्जंट पाठविण्यास सांगितले. त्यानुसार अभिषेकने तत्काळ समोरील व्यक्तीने पाठविलेल्या युपीआय आयडी नंबरवरुन दोन वेळा 38 हजार रुपये पाठवून दिले. त्यानंतर समोरील व्यक्तीने पुन्हा 22 हजार रुपये पाठविण्या बाबतचा मेसेज अभिषेकला पाठविला. त्यानुसार अभिषेकने पुन्हा 22 हजार रुपये ऑनलाईन पाठवून दिले.
मात्र सदरची रक्कम न गेल्याने ती रक्कम दोन दिवसानंतर अभिषेकच्या खात्यात परत आली. दरम्यान, अभिषेकने पाठविलेली रक्कम त्याच्या मामाने दुसर्या दिवशी परत न पाठविल्याने अभिषेकने आपला मामा नितेश पांडे यांच्या मुख्य नंबरवर फोन करुन आपल्या पैशांची मागणी केली. यावेळी नितेश पांडे यांनी अभिषेकला कुठल्याही प्रकारचा मेसेज पाठविला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे अभिषेकने व्हॉट्अॅपवरुन त्याला मेसेज पाठविणार्या व्यक्तीला मेसेज पाठवून त्याच्याकडे पैशांची मागणी केली असता, समोरील व्यक्तीने त्याची फसवणूक केल्याचे सांगून तो त्याला ओळखत असल्याचे तसेच त्याचे पैसे 15 दिवसात परत करणार असल्याचे त्याला मेसेजद्वारे सांगितले. त्यानंतर आपली अज्ञात व्यक्तीकडून फसवणुक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने खांदेश्वर पोलीस ठाणे गाठुन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात टोळीविरोधात फसवणुकिसह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.

प्रशांत भोसले
महाराष्ट्र राज्यात शारीरिक शिक्षण शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये या पदाला प्राधान्य मिळणे आवश्यक असताना राज्य स्तरावर शिक्षक संचमान्यता (पोर्टल)ऑनलाइन भरती प्रक्रियेत बीपीएड व एमपीएड अर्हतेचा उल्लेख नाही त्यामुळे 2012 पासून शेकडो शारीरिक शिक्षण शिक्षकांची पदे रिक्त आहेत . अनेक शाळांमध्ये शारीरिक शिक्षणाचे शिक्षक उपलब्ध नाही यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासावर प्रश्न उभा राहिला आहे .शालेय स्पर्धांमध्ये सहभाग नोंदणी कमी होत आहे राज्याच्या क्रीडा विकासावर याचे गंभीर व दूरगामी परिणाम होण्याची शक्यता असल्याने शासनाच्या 14 मे 1987 च्या परिपत्रकाद्वारे नमूद केल्याप्रमाणे भरती प्रक्रियेमध्ये बीएड समकक्ष बीपीएड अर्हता समजून त्याचा समावेश पोर्टलमध्ये होणे अत्यावश्यक आहे .अशी मागणी राज्य महासंघाचे उपाध्यक्ष आर.डी.पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी विभागीय सचिव महेश सूर्यवंशी ,कोल्हापूर संघटनेचे सचिव संदीप पाथरे,दिलीप राऊत,संदीप पाटील उपस्थित होते .

करवीर पूर्व:प्रतिनिधी : गजानन रानगे
असंघटित स्थलांतरित कामगारांसाठी गोकुळ शिरगावच्या युवा ग्रामीण विकास संस्थेचे मोफत आरोग्य जनजागृतीसाठीचे उपक्रम समाजाला दिशादर्शक आहेत असे मत प्रकल्प संचालक नंदकुमार निर्मळे यांनी व्यक्त केले.
एक डिसेंबर २० ते ३१ डिसेंबर २० अखेर युवा संस्थेच्या वतीने विविध घटकातील स्थलांतरीत कामगारासाठी मोफत आरोग्य जनजागृती उपक्रम घेण्यात आले या सांगता समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी युवा ग्रामीण विकास संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक मोहन सातपुते म्हणाले
समाजातील सर्वच घटकांनी जागतिक एकता, सामूहिक जबाबदारी स्वीकारून एचआयव्ही/एड्स विरुद्ध लढा देण्यासाठी पुढाकार घ्यावा . एड्स मुक्त महाराष्ट्र ,स्वप्न नव्हे ध्येय गाठण्यासाठी एकत्रितपणे लढा देण्याची गरज आहे.स्थलांतरित कामगार लक्षगट हस्तक्षेप प्रकल्प ,गोकुळ शिरगाव यांच्या वतीने ऊसतोड मजूर,वित्तभट्टी कामगार,हॉटेल कामगार,स्टोन क्रशर कामगार,गुऱ्हाळ घर कामगार,ट्रक डायव्हर,हमाल यांच्यासाठी मोफत आरोग्य जनजागृती शिबीर घेण्यात आली.
जागतिक एड्स दिना निमित्य पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत” जागतिक एकता व सामूहिक जबाबदारी ” या घोष् वाक्याचे प्रकाशन करण्यात आले, यावेळी पोस्टर प्रदर्शन,माहिती पत्रक वाटप करण्यात आले. त्यानंतर गेली महिनाभर विविध ठिकाणी एचआयव्ही/ एड्स गुप्तरोग, क्षयरोग या विषयी प्रबोधन करण्यात आले.या शिबिराचा लाभ मोठ्या प्रमाणात घेतला. ऐच्छिक एचआयव्ही तपासणीही मोफत करण्यात आली.
यावेळी प्रकल्प संचालक नंदकुमार निर्मळे, समुपदेशक हेमंत सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ती सौ. दीपाली सातपुते, सुजाता कांबळे, पौर्णिमा गुरव,अजय कांबळे, कौस्तुभ भोसले,प्रल्हाद कांबळे, सूरज मांडे,डॉ. स्वप्नील जाधव,डॉ. सत्येंन माळकर,यांच्यासह स्टेक होल्डर,१५ पिअर लीडर ,समाजातील विविध घटक यांचे सहकार्य लाभले.

करवीर पूर्व : प्रतिनिधी : गजानन रानगे
चिंचवाड (ता करवीर ) येथील पीरपाणंद रस्ता ते सुर्यापा पाणंद रस्ताच्या दरम्यान उसाच्या फडाला आग लागली .या आगीमध्ये तीस एकरातील ऊसपीक जळाले .यामध्ये ऊस उत्पादक शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने जळीत ऊस पीक क्षेत्राचे पंचनामे केले.
गेली दोन वर्षे २०१८ साली वातावरणातील बदलामुळे ऊसाचे टनेज मोठ्या प्रमाणावर घसरले, तर २०१९ मध्ये हाता तोंडाशी आलेले पीक अतिवृष्टीमुळे १०० टक्के नुकसानग्रस्त झाले या सगळ्यातुन बाहेर पडत असताना व कोरोनाजण्य परिस्थितीतून जात असताना पिकवलेल्या शेतीतील ऊस पिकाना आग लागून झालेल्या नुकसानीने शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी गावातील ग्रामस्थांनी वेळीच आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले म्हणून मोठे नुकसान टळले. यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्यात आले . तसेच कारखान्यानी जळीत ऊस कपात करु नये अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. यावेळी चिंचवाड गावचे सरपंच सुदर्शन उपाध्ये, पोलिस पाटील रविंद्र कांबळे,ग्रामसेवक विजय माळी तलाठी शामराव कांबळे ,कोतवाल तेजस्विनी कोळी,आण्णासो कोळी(गुरुजी),यशवंत खानविलकर,राजगोंडा नांद्रे,महादेव कोळी,बाबा सरकार यांच्या सह जळीत ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते

करवीर पूर्व : प्रतिनिधी : गजानन रानगे
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दिन गडमुडशिंगी तालुका करवीर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ‘पीढी घडविते भारी माता कोल्हापुरी ‘ याविषयी चर्चासत्र व सावित्री उत्सव साजरा करण्यात आला.
पीढी घडविते भारी माता कोल्हापुरी कोल्हापूर उत्सव अंतर्गत क्रीडा स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या मुलींच्या मातांचा तसेच स्पर्धा परीक्षेत निवड झालेल्या मुलींच्या मातांचा एक किंवा दोन मुलीवर शस्त्रक्रिया केलेल्या मातांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच विशेष प्राविण्य मिळवलेल्या मातांना ताराराणी प्राधान्य कार्डचे वाटप करण्यात आले. एकात्मिक बाल विकास प्रकल्प कोल्हापूर ग्रामीण यांच्या अनुषंगाने स्त्री भ्रूण हत्या तसेच मुलींचे संगोपन याविषयी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे मार्गदर्शन आयसीडीएस सुपरवायझर प्रज्ञा भांगरे ,आरोग्यसेविका संध्या महाजन, म.बा.क. विभाग जिल्हा कार्यक्रम अधिकारी सोमनाथ रसाळ प्रकल्प अधिकारी ज्योती पाटील यांनी याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांतर्गत मुलींच्या शिक्षणा विषयी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास अंगणवाडी सेविका स्नेहल पाटील, नंदा गवळी, महादेवी माळी, रेखा खोत ,विश्रांती कोगले, माया गाडगीळ, नंदा सोनुले. विद्यार्थिनी पालक माता आदी उपस्थित होत्या.
प्रशांत भोसले
रुकडी :- ( दि.४-१-२०२१)
भारतीय राज्यघटनेत स्त्री-पुरुष समानता आहे.
परंतु आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक
कारणे असमानतेस जबाबदार आहेत. स्त्रीयांमध्ये
समानतेची जाणिव निर्माण करून दिली पाहिजे.
कायद्यानुसार समान हक्क, समान संरक्षण आहे,
परंतु अजूनही स्त्री-पुरुष यामध्ये भेदभाव केला
जातो. देशाला बलवान बनविण्यासाठी स्त्री-पुरुष
समानता असणे आवश्यक आहे. असे मत अॅड.
मेघा ठोंबरे यांनी व्यक्त केले त्या येथील राजर्षी शाहू
कला व वाणिज्य महाविद्यालयातील जेन्डर चम्पिअन
क्लबच्या वतीने आयोजित केलेल्या स्त्री-पुरुष
समानता या विषयावरील व्याख्यानात बोलत होत्या.
अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन
राजगे होते. स्वागत व प्रास्ताविक डॉ.शर्मिला
साबळे यांनी केले.
अॅड. मेघा ठोंबरे पुढे म्हणाल्या स्त्रीयांना स्थानिक
स्वराज्य संस्थेत पन्नास टक्के आरक्षण मिळाले, परंतु
कारभार मात्र पतीच पाहतात. स्त्रीयांनी सुद्धा
आपल्याला मिळालेल्या हक्काची जाणिव ठेवून
कारभार पहिला पाहिजे, यासाठी स्त्रीयांमध्ये
जनजागृतीची गरज आहे.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अर्जुन राजगे म्हणाले
निसर्गतः स्त्री-पुरुष हे समान आहेत, पण स्त्री-पुरुष समानता आली पाहिजे हे सांगणे दुर्दैवी आहे. स्त्री-पुरुष समानतेसाठी शैक्षणिक प्रगतीच्या मार्गाने सामाजिक,आर्थिक व राजकीय अडथळे दूर केले पाहिजेत.त्यासाठी स्त्रीयांनी शैक्षणिक प्रगती करून स्वतः च्या पायावर उभे राहिले पाहिजे. जो पर्यंत त्यांचे आर्थिक परावलंबित्व कमी होत नाही, तो पर्यंत समानता प्रस्तापित होण्यात अडचण येईल असे स्पष्ठ मत डॉ. राजगे यांनी व्यक्त केले. ते पुढे म्हणाले मुलगीला तु मुलगी आहेस तु असे वर्तन ठेवले पाहिजे असे वारंवार सांगून एक प्रकारे दबाव आणला जातो , तो नष्ट झाला पाहिजे. म्हणजे समाजात निश्चित स्त्री-पुरुष समानता येईल. ऑनलाईन संपन्न झालेल्या या व्याख्यानात महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते. आभार डॉ. माधवी सोळांकुरकर यांनी मानले. .
रेदांळ(हिंदूसम्राट प्रतिनिधी सचिन उगळे)
तळंदगे हुपरी रोडवर एका युवकाच्या मोटरसायकला आडवी मोटारसायकल मारून युवकाला चाकूचा धाक दाखवून अज्ञात चोरट्यांनी युवकाच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चेन अज्ञात चोरट्यांनी लूटमार करून लंपास केल्याची घटना दुपारी सव्वाबाराच्या सुमारास घडली असून ऋषिकेश अनिल सपाटे रा.हुपरी यांनी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या नावे फिर्याद रविवारी नोंद केली आहे.याबाबत हुपरी पोलीस स्टेशन मधून मिळालेली अधिक माहिती अशी,ऋषिकेश दुपारी सव्वाबाराच्या सुमारास मोटारसायकलवरून तळंदगे रोड मार्गे हुपरीकडे येत होता.अज्ञात दोन आरोपींनी पाठीमागून मोटारसायकलवरून येऊन ऋषिकेश च्या आडवी मोटारसायकल मारून त्याला थांबवून चाकूचा धाक दाखवून गळ्यातील सोन्याची चेन काढून घेतली.त्यावेळी ऋषिकेशने प्रतिकार केला असता.एका आरोपीने त्याच्या डाव्या हातावर वार करून त्याला जखमी केले.व चेन गळ्यातून काढून घेतली.आणि चोरट्यांनी पलायन केले.सदर तपास हुपरी पोलीस स्टेशन करीत आहे
प्रतिनिधी मयूर जाधव .
सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओळखले जाणारे माजी सहकारमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांचे सातारा येथे दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
विलासराव पाटील-उंडाळकर यांनी 1967 साली राजकारणात प्रवेश केला सातारा जिल्हा बँकेचे संचालक म्हणून प्रवेश केल्यानंतर गेली पाच दशके ते जिल्हा बँकेवर संचालक म्हणून कार्यरत होते 1962 आली जिल्हा बँकेत प्रवेश केल्यानंतर जवळ पास तेरा वर्षे सक्रिय राजकारणात ते कार्यरत होते . त्यानंतर त्यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून सलग ३5 वर्ष त्यांनी राष्ट्रीय कॉंग्रेसचे प्रतिनिधित्व केले 1999 साले राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर सातारा जिल्ह्यात कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून विलासराव पाटील-उंडाळकर यांनी अबाधित ठेवला होता.
2014 सली विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विलासराव पाटील-उंडाळकर यांचा पराभव केला होता त्यावेळी अपक्ष निवडणूक लढविणारे विलासराव पाटील उंडाळकर यांनी राष्ट्रीय काँग्रेस चा विचारधारेपासून फारकत न घेता आपली तत्वे विचार आणि निष्ठा कायम ठेवली होती.
तीन महिन्यापूर्वी जिल्ह्यात पुन्हा राष्ट्रीय कॉंग्रेस बळकट करण्यासाठी सर्व मतभेदांना तिलांजली देत विलासराव पाटील-उंडाळकर यांनी आणि माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण हे दोन नेते एकत्र आले होते. ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसचे कार्यकर्ते एकदिलाने निवडणूक लढवत असताना विलासराव पाटील उंडाळकर यांच्या निधनाने राष्ट्रीय काँग्रेसला जबर धक्का बसला.
मागील काही दिवसांपासून विलासराव पाटील-उंडाळकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर सातारा येथे उपचार सुरू होते उपचारादरम्यान त्यांचे दुःखद निधन झाल्याने संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे
साके येथे बालिकादिन उत्सहात ः, अनंतशांती,फिरंगोजी संस्थेमार्फत विद्यार्थ्यीना शालेय वस्तू वाटप
कोल्हापूर
महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या हेतून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात शिक्षण देवून त्यांना शिक्षणाची योग्य दिशा देण्याचे काम सावित्रिबाई फुले यांनी केले आहे. त्यांच्या या कार्याचा जागर अखंड स्त्रीशक्तीसाठी महत्वाचे योगदान ठरला आहे. शिवाय स्त्रियांच्या मुक्ती दात्या असणा-या सावित्रिबाई फुले यांनी दिलेले शैक्षणिक योगदान त्यांनी आचरणात आणलेली स्त्री उद्धारासाठीची मुल्ये भावी पिढीसाठी अत्यंत मोलाची आहेत. क्रांतीजोती सावित्रिबाई फुले यांचे स्त्रीशिक्षणातील योगदान व त्यांचे कार्य समाजाजित सर्व घटकापर्यंत पोहचवने व त्यांनी रूजवलेली शैक्षणिक मुल्य पुढील पीढीस सक्रमीत होणे गरजेचे आहे. सावित्रिबाई फुले यांचे स्त्रिशिक्षणातील योगदान मोलाचे असल्याचे प्रतिपादन अनंतशांतीचे संस्थापक भगवान गुरव यांनी केले.
साके ता.कागल येथे बालिका दिनानिमित्त ओयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अनंतशांती,फिरंगोजी शिंदे, संस्थेमार्फत अंगणवाडीतील मुलींना पाटी,पेन्शील, अंकलपी, शैक्षणिक साहित्य खाऊ वाटप संस्थापक भगवान गुरव,वस्ताद प्रमोद पाटील यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी सावित्रिबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन अनंतशांतीच्या अध्यक्षा माधुरी खोत,सचिव अरूणा पाटील, अंगणवाडी सेविका मंगल पाटील, तेजस्वीनी पाटील,यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माधुरी खोत म्हणाल्या, सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून 1995 पासून 3 जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन ” म्हणून साजरा केला जातो. 19 व्या शतकाच्या मध्यार्थात भारतासारख्या रूढीवादी परंपरा असणाऱ्या देशात स्त्रीला समाजात ‘चूल आणि मूल ‘ एवढेचं स्थान होतं. त्याकाळात स्त्रियांना शिक्षणाच्या माध्यमातून एक नवी दिशा, नव संजीवनी देण्याचे काम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
बालिकादिनानिमित्त आंगणवाडीतील मुलींनी साडी चोळी असा सावित्रिबाई फुले यांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या. कार्यक्रमास रामचंद्र कांबळे, विश्वजीत पाटील, सैा.प्रियंका पाटील,उज्वला जाधव,आनंदी पाटील, शोभा जाधव, मगल तुरंबे,सरिता कांबळे आदी उपस्थीत होत्या .
स्वागत रेखा पाटील यांनी केले आभार जयश्री निऊंगरे यांनी मानले.
फोटो ओळी ः साके ता.कागल येथे बालिकादिनानिमित्त आंगणवाडीतील मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप करतांना अनंतशांतीचे भगवान गुरव ,वस्ताद प्रमोद पाटील आदी छाया ः सागर लोहार,साके
कोल्हापूर ,ता.२: कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायी असलेली पंचगंगा नदी उद्योगधंद्यात बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे प्रदूषित झाली आहे. त्यामुळे या प्रदूषणावर नियंत्रण करण्यासाठी आवश्यक निधीसह पंचगंगा नदीसाठी स्वतंत्र अधिकार असलेले प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. सदर बैठक मुंबई येथील मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा बंगल्यावर झाली.यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व संपर्कमंत्री कोल्हापूर उदय सामंत,नाम.राजेंद्र पाटील यड्रावकर,संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर, खासदार प्रा.संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, मा.आमदार उल्हास पाटील, मा.आमदार राजेश क्षिरसागर, मा.आमदार चंद्रदिप नरके, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, मा.आमदार सत्यजित पाटील, मा.आमदार डॉ.सुजित मिणचेकर आदी उपस्थित होते. दरम्यान,कोल्हापूर जिल्ह्यासाठी जिवनदायीनी असलेली पंचगंगा नदी उद्योगधंद्यातून बाहेर पडणाऱ्या प्रदुषित
पाण्यामुळे दुषित झाली आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघातील इचलकरंजी सह हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील अनेक गावांना नदी प्रदूषणाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे पंचगंगा प्रदूषण मुक्त होण्यासाठी भरीव निधी सह स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी खासदार धैर्यशील माने यांनी केली आहे प्रदूषणाचा विळखा मोठ्या प्रमाणात असल्याने जलचर प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून याचा परिणाम नदीकिनारी असलेल्या गावातील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे सदर प्रश्नाचे गांभीर्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिल्याने या प्रश्नाबाबत लवकरच उच्चस्तरीय बैठक घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली.
पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.यासाठी पक्षाचे माजी आमदार बळ देणार आहेत. –खासदार धैर्यशील माने.

कोल्हापूर- सुभाष भोसले
श्री शाहू हायस्कूल ज्यूनि कॉलेज कागल येथे सावित्रीबाई फुले जंयती महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करणेत आला . या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक सौ .एस .ए .फकीर यांनी केले .
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य श्री जे.डी पाटील, उपप्राचार्य श्री बी. के .मडिवाळ, पर्यवेक्षिका सौ .एस ए . कुलकर्णी, तंत्र विभागप्रमुख श्री . एस .ए.देशमुख यांनी केले .
या दिनाचे औचित्य साधून माता पालक सौ . रूपाली पिसे यांचा सत्कार सौ .आर. आर .कुलकर्णी यांनी तर माधवी कांडेकरी यांचा सत्कार सौ . कुडतरकर यांनी केला . कु वैष्णवी पाटील, कु सानिका गुरव यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जंयती निमित्त आपले मनोगत व्यक्त केले .
पर्यवेक्षिका सौ . एस . ए . कुलकर्णी यांनी सावित्रीबाई फुले व ज्ञानसूर्य ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाची सुरवात समाजातील विरोध झुगारून कशा प्रकारे केली यांची माहिती दिली . तसेच उच्च शिक्षणामुळे माणसातील माणूसपण हरविले आहे तसेच शिक्षणामुळे विद्वतेबरोबरच नम्रता प्रामाणिकपणा निर्माण होणे गरजेचे आहे . त्यांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट विशद केला .
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री . जे . डी . पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सावित्रीबाई यांना अभिवादन केले व कु . वैष्णवी कु . सानिका या मुलींचे अभिनंदन केले . ते म्हणाले की महिलांना आज जे सर्व क्षेत्रात आरक्षण मिळाले आहे त्याचे श्रेय ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जाते . त्यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ उभी केली त्यामुळे आज सर्वच क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत . दरवर्षी हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो . त्यांनी आवाहन केले की महिलांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा . मुलींनी उच्य शिक्षण घेवून आपले कुंटुब व देशाचे नाव उज्ज्वल करावे .
कार्यक्रमाचे आभार सौ . एस . ए .फकीर यांनी मानले . या कार्यक्रमाला शाहू हायस्कूल, ज्यूनि कॉलेज व तंत्रविभाग चे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .

कोल्हापूर- सुभाष भोसले
श्री शाहू हायस्कूल ज्यूनि कॉलेज कागल येथे सावित्रीबाई फुले जंयती महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करणेत आला . या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक सौ .एस .ए .फकीर यांनी केले .
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य श्री जे.डी पाटील, उपप्राचार्य श्री बी. के .मडिवाळ, पर्यवेक्षिका सौ .एस ए . कुलकर्णी, तंत्र विभागप्रमुख श्री . एस .ए.देशमुख यांनी केले .
या दिनाचे औचित्य साधून माता पालक सौ . रूपाली पिसे यांचा सत्कार सौ .आर. आर .कुलकर्णी यांनी तर माधवी कांडेकरी यांचा सत्कार सौ . कुडतरकर यांनी केला . कु वैष्णवी पाटील, कु सानिका गुरव यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जंयती निमित्त आपले मनोगत व्यक्त केले .
पर्यवेक्षिका सौ . एस . ए . कुलकर्णी यांनी सावित्रीबाई फुले व ज्ञानसूर्य ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाची सुरवात समाजातील विरोध झुगारून कशा प्रकारे केली यांची माहिती दिली . तसेच उच्च शिक्षणामुळे माणसातील माणूसपण हरविले आहे तसेच शिक्षणामुळे विद्वतेबरोबरच नम्रता प्रामाणिकपणा निर्माण होणे गरजेचे आहे . त्यांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट विशद केला .
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री . जे . डी . पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सावित्रीबाई यांना अभिवादन केले व कु . वैष्णवी कु . सानिका या मुलींचे अभिनंदन केले . ते म्हणाले की महिलांना आज जे सर्व क्षेत्रात आरक्षण मिळाले आहे त्याचे श्रेय ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जाते . त्यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ उभी केली त्यामुळे आज सर्वच क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत . दरवर्षी हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो . त्यांनी आवाहन केले की महिलांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा . मुलींनी उच्य शिक्षण घेवून आपले कुंटुब व देशाचे नाव उज्ज्वल करावे .
कार्यक्रमाचे आभार सौ . एस . ए .फकीर यांनी मानले . या कार्यक्रमाला शाहू हायस्कूल, ज्यूनि कॉलेज व तंत्रविभाग चे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .
#
करवीर पूर्व : प्रतिनिधी : गजानन रानगे
गांधीनगर (ता.करवीर ) येथील मेनरोडवरील विशाल फुले यांच्या चायनीज कट्टा सेंटरचे उद्घाटन महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्ये यांच्या हस्ते झाले. लवकरच गांधीनगर आणि पंचक्रोशीतील खवय्यांच्या प्रथम पसंदीचे ,प्रथम ठिकाण विशाल चायनीज कट्टा ठरेल असे उदघाटन समयी
महाराष्ट्र पत्रकार संघाचे करवीर तालुकाध्यक्ष बाबासाहेब नेर्ले यांनी नमूद केले.
या उदघाटन समयी पत्रकार राहुल मगदूम, गजानन रानगे, राजू शिंदे , अनिल निगडे, दलित महासंघाचे गांधीनगर शहराध्यक्ष राजू कांबळे, अमित कुकरेजा आदींची प्रमुख उपस्थिती होती.

गांधीनगर मेन रोडवरील चायनीज कट्टा सेंटरचे उद्घाटन करताना महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्ये. शेजारी बाबा नेर्ले , राहुल मगदूम, अनिल निगडे, राजू शिंदे व राजू कांबळे आदि.


अनेक मान्यवरांसह शिक्षक, नेत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव करून
लोहा, (ता. प्रतिनिधी )
मराठवाडयातील ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक तथा ज्येष्ठ पत्रकार अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील सर यांचा ५४ वा वाढदिवस लोहा येथे साहित्यप्रेमी, नगराध्यक्ष, नगरसेवक, प्राचार्य, प्राध्यापक,शिक्षक संघटनेचे नेते, व पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत साजरा करून त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.
सद्य:स्थितीत अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे किमान साडेतीन दशकापेक्षाही अधिक कालावधी ते लोहा येथील श्री. संत गाडगे महाराज महाविद्यालय लोहा येथे मराठी या विषयाचे अध्यापन केले होते. त्यांनी महाविद्यालयात विद्यार्थी हिताचे विविध उपक्रम राबवले होते. तसेच त्यांच्या लेखणीतून अनेक गरीब पीडित सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला. त्यांची लेखणी सडेतोड व अतिशय धारदार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली. लोकमत मधील लेखणीसह, त्यांचे अन्य वर्तमानपत्रातील लेख हे तर विशेषच होत. लेखणीचे बादशहा म्हणून त्यांच्या कार्याची संबंध महाराष्ट्रभरातून आगळी वेगळी ओळख आहे.
१जानेवारी २१ या रोजी लोहा येथील ‘आविष्कार’ निवासस्थानी अनेक मान्यवरांनी सामाजिक अंतर राखून त्यांचे अभीष्टचिंतन केले.’दै. वतन वाला’ चे कार्यकारी संपादक दत्ताभाऊ शेंबाळे, शेवडी (बा.) येथील सेवा सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष बालाजी तमकुटे, शिक्षक काँग्रेसचे विभागीय उपाध्यक्ष विठूभाऊ चव्हाण, महेंद्र कांबळे, राजर्षी शाहू शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन तथा धावरीचे मुख्याध्यापक बी.वाय. चव्हाण, अखिल प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शेख मुर्तूज सर ,केंद्रप्रमुख विठ्ठल आचणे, सुनेगावचे केंद्रीय मुख्याध्यापक पंदेलवाड, पर्यवेक्षक बी.वाय.पाटील, दै.रिपब्लिकन गार्डचे कार्यकारी संपादक, सतीश सोणवणे,ज्येष्ठ पत्रकार सुरेश जोंधळे, साहेबराव सोनकांबळे, संजय कहाळेकर, टीकाराम कतूरे, शिवराज पवार, बाळासाहेब बुद्धे आदींनी तसेच नगराध्यक्ष, नगरसेवक, प्राचार्य, प्राध्यापक, आदिनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या व नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
लोहा बसस्थानकात पत्रकारांकडून स्वागत
लोहा बस स्थानकात पत्रकार बांधवांकडून प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांचे अभिष्टचिंतन केले. तरुण भारतचे प्रतिनिधी डी.एन.कांबळे, समीक्षाचे विजयकुमार चन्नावार, पांडुरंग रहाटकर, लोकपत्रचे केशव पवार, टीकाराम कतुरे , संतोष मद्रेवार, गोविंद कोयाडे, परमेश्वर इंगळे, आदींसह पत्रकार व इतर मान्यवरांनी वाढदिवसाच्या व नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
मिरज–अशोक मासाळ
डॉ सावंत विद्यामंदिर कोल्हापूर येथे कार्यरत सर्व शिक्षक यांचे दिनांक 29 12 2020 चे निवेदन व तक्रार अर्जाची छाननी करून शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांच्या आदेशानुसार चौकशी समिती नेमून प्रशासन अधिकारी कोल्हापूर महापालिका यांच्या अध्यक्षतेखाली चौकशीला सुरुवात झाली आहे. चौकशी चालू असताना जय भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्षा सुमित्रा जाधव, खजिनदार धैर्यशील जाधव हे शिक्षकांना धमकी देत असल्याचे आढळले त्यावेळी प्रशासन अधिकारी शंकर यादव याने त्यांना चांगलेच खडसावले व तेथून निघून जाण्यास भाग पाडले. या चौकशीच्या वेळी काही गंभीर आरोप संस्थाचालक परशुराम जाधव यांच्यावर असल्याचे समोर येत आहेत तसेच ही चौकशी समिती पुढील आठ दिवस सखोल चौकशी करणार असल्याचे प्रशासन अधिकारी शंकर यादव यांनी सांगितले.
पाटण हिंदू सम्राट प्रतिनिधी उमेश सुतार यांजकडून
पुणे – दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी खासगीरीत्या म्हणजे फॉर्म नंबर १७ भरून नावनोंदणी करण्यासाठी ११ जानेवारीपासून अर्ज करता येईल. यासाठी २५ जानेवारीपर्यंत मुदत असून, हे अर्ज आणि शुल्क ऑनलाइन भरावे, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले.
अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शुल्क भरल्याची पावती तसेच मूळ कागदपत्रे संबंधित शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा करायचे आहे. यासाठी १२ ते २७ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तसेच शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचे अर्ज, ऑनलाइन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याच्या पावतीची एक छायाप्रत, मूळ कागदपत्रे आणि यादी विभागीय मंडळाकडे दोन फेब्रुवारीपर्यंत जमा करता येणार आहे, अशी माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या प्राप्त अर्जातील दुरुस्त्या १० जानेवारीपर्यंत विभागीय मंडळामार्फत करण्यात येणार आहेत.
यासाठी संबंधित विद्यार्थ्यांनी आपली शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत विभागीय मंडळाशी संपर्क साधावा, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे. ऑनलाइन अर्ज भरताना कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत दूरध्वनी क्रमांक : ०२०-२५७०५२०७/ २५७०५२०८, तसेच इतर बाबींसाठी २५७०५२७१ वर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे.
मिरज:- संजय पवार
जिल्हाअध्यक्ष महेश शरनाथे सर,सरचिटणीस कृष्णा पोळ,कोषाध्यक्ष बालम मुल्ला,पार्लमेंटरी बोर्ड उपाध्यक्ष दीपक काळे,जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर माने,मिरज तालुका अध्यक्ष संजयकुमार कवठेकर, यांनी शिक्षक बांधवांची मिरज शिक्षक भारती संघटना पदाधिकारी निवडी केल्या.
शिक्षक भारती संघटनेच्या कामाची महेश शरनाथे यांनी माहिती दिली.आमदार कपिल पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक भारती संघटना राज्यभर कार्यरत आसून प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करत आहे. सरचिटणीस कृष्णा पोळ यांनी शिक्षक भारती संघटनेमध्ये सहभागी होत असलेल्या शिक्षकांचे स्वागत केले.शिक्षकांच्या प्रश्नांसाठी लढत राहू अशी ग्वाही दिली.
मिरज तालुकाध्यक्ष-चंद्रकांत कांबळे,
मिरज तालुका उपाध्यक्ष-श्रीधर सुर्यवंशी,
मिरज तालुका सरचिटणीस-विकास देवके,
शिक्षक भारती सांगली जिल्हा उपाध्यक्ष -अन्वर मुजावर
शिक्षक भारती सांगली जिल्हा कार्यवाहक-विकास वायदंडे
श्रीधर सूर्यवंशी ,सदानंद सवाईराम, प्रकाश कांबळे ,दिलीप ढास ,रमेश वायदंडे ,सिकंदर मुजावर, अनिल भोळे, जितेंद्र बनसोडे ,ज्योती पाटील, सुदर्शना रकटे,राणी सूर्यवंशी या उपस्थित शिक्षक बंधू भगिनीनी शिक्षक भारती संघटनेच्या विचाराने काम करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी माध्यमिक जिल्हाध्यक्ष सुधाकर माने,संजय पवार,आरिफ गोलंदाज, सुधाकर वसगडे,अन्सारअली जमादार,राजेंद्र दोरकर,हेमंत भाट,दिगंबर सावंत,बाळासाहेब सोलनकर,मलय्या नांदगांव,सहदेव पांढरे,चंद्रकांत भोसले,अविनाश सुतार,एकनाथ जाधव,सुभाष वाघमारे,बाळासाहेब सोलनकर,प्रकाश डुबुले, सुधाकर संग्रामे,नंदकुमार पाटील,दादासो खोत,प्रताप टकले,शहानवाज मणेर,उदयकुमार रकटे,संतोष दरेकर,निलिमा शहा,वनिता बोडके,प्रिती ठाकूर,हे शिक्षक बंधू -भगिनी उपस्थित होते.
मुरुम, ता.२ (प्रतिनिधी) : येथील नगर परिषदेचे नुतन उपनगराध्यक्ष म्हणून सहदेव गायकवाड यांची निवड झाल्याने शनिवार (ता.२) रोजी विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना, मुरुम येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या हस्ते गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे माजी अध्यक्ष बापुराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष शरणाप्पा गायकवाड, माजी नगरसेवक चंद्रकांत गोडबोले, आनंदनगरचे सरपंच उमेश सोनकांबळे, प्रा.आण्णाराव सोनकांबळे, आर. के. गायकवाड, किरण गायकवाड, विजय कांबळे, प्रणित गायकवाड, सुरज कांबळे, प्रशांत मुरुमकर, उत्कर्ष गायकवाड, संतोष कांबळे आदि उपस्थित होते.
पाटण हिंदू सम्राट प्रतिनिधी उमेश सुतार यांजकडून
जगभरातील विविध देशांनी नववर्षाचं स्वागत मोठ्या उत्त्साहात केलं. फटाक्यांची आतषबाजी आणि रोषणाई करुन सरत्या वर्षाला निरोप देण्यात आला. इटलीमध्येही नवीन वर्षाच्या स्वागतचा उत्साह पाहायला मिळाला. पण यादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली.
इटलीची राजधानी रोममध्ये नागरिकांनी रस्त्यावर उतरुन मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी केली. पण यामुळे शेकडो पक्षी मरून पडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून राजधानी रोमच्या रस्त्यावर अनेक मृत पक्ष्यांचा खच पडल्याचं दिसतंय. इटलीतील प्राणी-पक्षी अधिकार संरक्षण कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून हे एकप्रकारचं ‘हत्याकांड’ असल्याचं म्हटलं आहे.
अचानक इतक्या पक्ष्यांच्या झालेल्या मृत्यूचं नेमकं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. पण आंतरराष्ट्रीय प्राणी संरक्षण संघटनेने, मध्यरात्री अचानक झालेल्या फटाक्यांच्या कर्कश्य आवाजाने पक्षी घाबरले आणि जीव वाचवण्यासाठी उडण्याचा प्रयत्न केला असावा पण अंधारात घरांच्या खिडक्यांना ठोकल्याने किंवा उडताना एकमेकांना धडकल्याने आणि उच्च व्होल्टेज विद्युत केबल्समध्ये अडकल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवली आहे. जीव जाण्याच्या भीतीने घाबरल्यामुळे पक्ष्यांचा मृत्यू झालेला असू शकतो, किंवा हृदयविकाराचा झटका आल्यामुळेही पक्ष्यांचा मृत्यू होऊ शकतो, असं संघटनेच्या प्रवक्त्या लोरिडेना डिग्लीओ (Loredana Diglio) यांनी सांगितलं. फटाके फोडल्यामुळे दरवर्षी अनेक वन्य आणि पाळीव प्राणी जखमी होत असतात, असंही डिग्लीओ यांनी नमूद केलं.
विशेष म्हणजे रोममध्ये फटाके फोडण्यावर बंदी आहे, त्यातच करोनामुळे रात्री 10 नंतर बाहेर फिरण्यास नियमावली घातली आहे.
सातारा प्रतिनिधी – केदार जाधव
एस पी फायनान्स अकॅडमीच्या फ्रांसीसी च्या उद्घाटन प्रसंगी मराठीतील प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी यांच्या हस्ते ओपनिंग करण्यात आले याप्रसंगी उपस्थित मान्यवर एस पी फायनान्स अकॅडमी चे संस्थापक सचिनजी बानगुडे, राजेशजी पारखे, बबनशेठ चौगुले, इंद्रजीत पाटील संदीप सर दळवी व गणेशजी मोहिते मनीषा मोहिते सर्व फॅन्सी सी चे पदाधिकारी व स्मिताताई लोंढे उपस्थित होते एस पी फायनान्स अकॅडमी कन्सल्टन्सी चे प्रोप्रायटर गणेश मोहिते यांनी स्वप्नील जोशी व सचिनजी बानगुडे या सर्वांचे आभार मानले
( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी: लक्ष्मण राजे )
महाराष्ट्र कुंभार विकास संस्थेच्या संकल्पनेनुसार नवीन वर्षाची वाटचाल सुरू करण्यासात आली*
श्री गणेशाय नमः श्री संत शिरोमणी गोरोबाकाका आशीर्वादाने दिनांक ०१/०१/२०२१ रोजी अखिल महाराष्ट्र कुंभार विकास संस्था रजिस्टर मुंबई, शाखा जिल्हा सातारा , सातारा तालुका कार्यकारिणी ग्रुपच्या संकल्पनेनुसार सातारा तालुक्यातून सेंट्रल विलेज पॉटरी इन्स्टिट्यूट खानापुर जिल्हा बेळगाव येथे मातीकला प्रशिक्षणासाठी मातीकला बोर्डाचे अध्यक्ष श्री दत्ताजी डाळजकर व श्री प्रकाश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आले.यावेळी सेंट्रल विलेज पाॅटरी इन्स्टिट्यूटचे प्राचार्य श्री प्रभाकरजी , आणि महाराष्ट्र कुंभार विकास संस्थेच्या सातारा तालुका कार्यकारिणीतील सदस्य उपस्थित होते.

सातारा जिल्हा प्रतिनिधी- केदार जाधव कृष्णा कॅनॉल ते गोवारे हद्दीतून जाणारा क्यानल जलपर्णी च्या विळख्यात लवकरात लवकर साफ सफाई केली नाही तर बळीराजा शेतकरी संघटना बैलगाडीत जलपर्णी भरुन कार्यकारी अभियंता रेड्डीयार साहेब टेंभू सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभाग ओगलेवाडी यांच्या कार्यालयात नेऊन टाकणार मागील वर्षी अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झाले क्रुष्णा क्यानल हा सैदापूर चौंडेश्वरी नगर गोवारे हनुमान नगर या हद्दीमधून जातो पुढे जातो अतिवृष्टी त क्यानल चा बराच भाग खचला खचलेल्या काही भागांमध्ये तातडीचे उपाय म्हणून संरक्षक भिंत बांधली परंतु चौंडेश्वरी नगर लगत मोठ्या प्रमाणात क्यानल खचला आहे परंतू प्रशासनाचे याकडे झाले आहे चौंडेश्वरी नगर गजानन सोसायटी गोवारे हनुमान नगर या ग्रामपंचायत हद्दीतील नागरीक क्यानाल लगतच्या रस्त्याचा वापर दळणवळणा साठी मोठ्या प्रमाणावर करतात विद्यार्थी विद्यार्थिनी ही याच रस्त्यावरून शाळा कॉलेज ला जात असतात ढासळलेल्या क्यानलमुळे एखादा विद्यार्थी दगावला तर याला जबाबदार कार्यकारी अभियंता हेच राहतील क्रुष्णा क्यानल ते गोवारे हद्दीपर्यंत क्यानलमध्ये जलपर्णी या वनस्पतीचा विळखा मोठ्या प्रमाणात पडला आहे त्यामुळे क्यानलला धोका निर्माण झाला आहे तात्काळ कार्यकारी अभियंता यांनी लक्ष घालून क्यानल ची स्वच्छता करून जलपर्णी ची विल्हेवाट लावावी अन्यथा बळीराजा शेतकरी संघटना बैलगाडीत जलपर्णी भरुन कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात नेऊन टाकणार याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील असे बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी सांगितले
दौंड,प्रतिनिधी:-
महाराष्ट्र सरकार च्या आवाहन ला प्रतीसाद देत रक्तसंकलन करण्याचा संकल्प साधत रोटरी क्लब ऑफ दौंड,भारतीय जैन संघटना आणि रोटरॅक्ट क्लब ऑफ दौंड काॅलेज यांच्या संयुक्त विद्यमाने महा रक्तदान शिबिर चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी १५० बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. रक्तदान महादान आहे राज्यात रक्ताची प्रतिकूल परिस्थिती असताना हा उपक्रम हाती घेऊन रक्तदात्यास रक्तदान करण्याचे आवाहन या तरुणांनी केले नि परिसरातून या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, या रक्तदान शिबिर चे उद्घघाटन नगराध्यक्षा शितल कटारिया यांचे हस्ते झाले.
भारतीय जैन संघटना व सचिव महावीर पारख,तसेच रोटरी क्लब चे अध्यक्ष सुशील शहा मेडीकल डायरेक्टर डाॅ.राजेश दाते, तसेच रोटरॅक्ट क्लब ऑफ दौंड याचे मोलाचे सहकार्य लाभले. रक्त संकलन करण्याकरीता रोटरी ब्लड बॅंक दौंड चे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता भारतीय जैन संघटना, रोटरी क्लब ऑफ दौंड,रोटरॅक्ट क्लब ऑफ दौंड काॅलेज इत्यादी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी योगदान दिले.
दौंड,प्रतिनिधी:-
नवीन वर्षाच्या मुहूर्तावर राजेगाव ता.दौंड येथे दिव्य निर्माण संस्था, संस्थापक अध्यक्ष रमेश शितोळे यांच्या वतीने दारू नको दूध प्या हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमास परिसरातील तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी तरुणांमध्ये व्यसनमुक्ती चा संदेश रुजावा तरुण व्यसनापासून दूर रहावा यासाठी व्यसनमुक्ती काळाची गरज या विषयावर ह.भ.प.तानाजी पांडुळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले यावेळी पांडूळे यांनी व्याख्यानाच्या माध्यमातून तरुणांना प्रेरित करण्याचे काम केले, दिव्य समाज संस्था व्यसनमुक्ती वरती काम करते वेगवेगळे उपक्रम हाती घेऊन तरुणांना सतत प्रोत्साहित करण्याचे काम करते,यावेळी वर्षाच्या अखेरीस नि नव्या वर्षाच्या स्वागतास हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला,यासही ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला


ढवळगाव ( हिंदू सम्राट शिरसगाव बोडखा प्रतिनिधी आदेश उबाळे यांच्याकडून )
ढवळगाव ; कोरोनाच्या काळामध्ये मनुष्याला ऑक्सिजनची किती गरज आहे याचे महत्त्व सर्व मानव जातीला कळाले आहे व सध्या होत असलेल्या वृक्षतोडीमुळे वातावरणामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले आहे व झाडे लावून पुन्हा हरित क्रांती झाली पाहिजे असे मनात ध्येय बाळगून ढवळगाव चे सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध आचारी श्री.आप्पा दादाभाऊ ढवळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त व्यर्थ खर्च टाळुन व केक न कापता गावातील खंडोबा मंदिरासमोरील परिसरामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला तसेच या वेळी गावातील सर्व तरुणांना आव्हान केले आहे की वाढदिवसाचा व्यर्थ खर्च न करता येत्या काही दिवसात मंदिर परिसरामध्ये तसेच ढवळगावांमध्ये प्रत्येकाच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात यावा असे आवाहन तरुणांना त्यांनी केले. त्यांच्या या उपक्रमाचे पंचक्रोशीतून व तरुणांमधून स्वागत केले आहे. वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे. परंतु फक्त वृक्षारोपण करून न थांबता त्यांची काळजी घेणे व संगोपन करणे ही एक मोठी जबाबदारी आहे.
यावेळी ढवळगाव चे मा.सरपंच श्री.विजय शिंदे मा.सरपंच श्री.रविंद्र शिंदे ग्रामपंचायत सदस्य गणेश ढवळे पाटील
मा.सरपंच तुकाराम बोरगे मा.सरपंच दत्तु बोरगे, माजी ग्रामपंचायत सदस्य अमोल बोरगे, युवा नेते राहुल बोरगे,गणेश शिंदे ग्रामपंचायत सदस्य बाळू शिंदे, तात्या भाऊ शिंदे, राजू बनकर, कैलास ढवळे,अरुण जांभळकर, दैनिक लोकमतचे पत्रकार पंकज गणवीर,सुरेश आढाव, रमेश सावंत,तसेच आनेक मान्यवर उपस्थित होते






आज विज्ञानयुगात सुद्धा आश्चर्यचकित करणारी घटना गुंडेवाडी गावात घडली
मिरज–अशोक मासाळ
सांगली जिल्ह्यामध्ये मिरज तालुक्यात गुंडेवाडी हे गांव वसले असून गुंडेवाडी या गावास पूर्वीपासूनच पुरातन वारसा लाभला आहे गुंडेवाडी गावचे हनुमान मंदिर हे दक्षिणमुखी असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे श्री प्रभू रामचंद्र यांचे ग्रंथ करून पाहिला असता या ग्रंथामध्ये गुंडेवाडी गावालगत असलेले दंडोबा अरण्याचा उल्लेख बघायला मिळेल त्यामुळे गुंडेवाडी हे गाव त्यामुळे गुंडेवाडी हे गाव श्री प्रभू रामचंद्र यांच्या पावन स्पर्शाने पावन ठरले आहे हनुमानाचे मंदिर हे गुंडेवाडी गावचे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध आहे. आज शनिवार दिनांक 21 2021 रोजी हनुमान मंदिरात एक कपि राज (वानर) चालत आले.
आज शनिवार असल्याने कोरूना काळाची जाणीव ठेवून भाविक सोशल डिस्टन्स पाळून हनुमंताचे दर्शन घेत होते. त्याच वेळी एक कपिराज मंदिरात प्रवेश करतो व मंदिरात असलेल्या अन्य देवदेवतांचे हात जोडून दर्शन घेतो व मंदिराच्या गाभाऱ्यात असणाऱ्या हनुमंताच्या समोर उंबर्यावर दक्षिणेकडे तोंड करून आपला प्राण अर्पण करतो. ही घटना पाहिल्यानंतर असे वाटते की आजच्या विज्ञान युगात सुद्धा आश्चर्यचकित करणारी घटना निश्चितच घडली आहे (अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही) वास्तविकता ही घटना शंभर टक्के सत्य आहे.
यावेळी गुंडेवाडी गावचे सरपंच त्यांचे सर्व सदस्य सर्व गावकरी मंडळी वारकरी मंडळी यांनी भारतीय संस्कृतीच्या व्यक्ती रिवाजानुसार कपिराजचे दपन विधी केली आहे.



इम्तिहाज मुलाणी :
इंदापूर प्रतिनिधी:-
भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी,न्हावी (ता.इंदापूर) येथे १ जानेवारी १८१८ च्या विजयी लढ्यातील शूरवीरांना विनम्र अभिवादन केले.त्यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ महाराष्ट्रातील जनता एक जानेवारी हा दिवस शौर्य दिन म्हणून विजय लढ्यातील शूरवीरांना विनम्र अभिवादन व मानवंदना देत असते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य भारतीयांना प्रेरणादायी आहे .आज याठिकाणी शौर्य दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीची स्थापना केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कर्तुत्वाने आपल्या देशासाठी हजारो वर्षासाठीचे मोठे रचनात्मक महान कार्य केले आहे. राज्यघटना, समता, सदभावना, सर्वधर्मसमभावनेच्या विचाराबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील गरीब असो श्रीमंत माणूस असो या सर्वांना लोकशाहीचा मूलभूत अधिकार देण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या विचारांची उपासना या बुद्ध विहाराच्या माध्यमातून व्हावी. युवकांनी हे विचार सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवावेत.’
बापूराव घाडगे व समता सोशल क्लब न्हावी यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी ॲड.अशोक घोगरे, बापूराव घाडगे, बापू मारकड, पप्पू डोंबाळे, विजय भोसले, अनिल गायकवाड, सुनील कणसे, सुनील अवघडे, विनोद घोगरे, विशाल घाडगे, प्रकाश शिंदे उपस्थित होते.
हादगाव ता. प्र. विकास राठोड याज कडून ) हदगाव तालूक्यातिल मौजे वाटेगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटेगाव तर्फे नुकताच गटशिक्षणाधिकारी पि वाय जाधव यांना शाळेतर्फे सेवानिवृत्ती निरोप देऊन त्यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला सर्व शिक्षक व गावकऱ्यांनी शिक्षण अधिकारी जाधव यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त करून त्यांना मन भरून शुभेच्छा दिल्या तसेच गट शिक्षण अधिकारी पी वाय जाधव यांनी सेवानिवृत्ती जरी झाली मी आपल्या शाळेवर गावकरी या नात्याने लक्ष ठेवेल आणि शाळेला स्वखर्चाने कमान बांधून देईल व शाळेची कुठली अडचण असेल तर नक्कीच शाळेला सहकार्य करेल असे सांगून लहानपणी शिक्षकांचा मार खाऊन मोठे झालो तसेच आजकाल सर्व विद्यार्थ्यांनी तन-मन-धनाने अभ्यास करून निर्व्यसनी कसे राहता येईल याची काळजी करून आपले ध्येय गाठावे म्हणत उपस्थित सर्व शिक्षक गावकरी यांना शिक्षकी टोप्या घालून कालदर्शिका कॅलेंडर व दिपोस्तव भेट देऊन सत्कार करून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत सेवानिवृत्ती निरोप दिल्याबद्दल उपस्थितांचे आभार व्यक्त केले त्यावेळी मुख्याध्यापक कदम सर, सहशिक्षक खंडाळे सर, शिंदे सर, चव्हाण सर ,साळुंके मॅडम, लोने मॅडम, झाडे मॅडम, व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विद्यानंद जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष राजु पाटील, शालेय समिती सदस्य गजानन जाधव ,मदतनीस मंचक माने गोविंदवाड, इंदिराबाई माने गोविंदवाड ,पत्रकार मंडळी व गावकरी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
भोकर तालुका प्रतिनिधी:दता बोईनवाड
भोकर:दि.2.औरंगाबाद येथील एका युवतीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांनी बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला असताना पोलिस तपासाच्या प्रक्रियेनुसार सदरील महिलेला न्याय मिळण्यासाठी व कायद्याच्या दृष्टीने या आरोपीला पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांनी चौकशीसाठी बोलावणे बंधनकारक अपेक्षित होते. असे न करता आघाडी सरकारने आरोपींना पाठीशी घालून पडद्यामागून मदत करण्याचे षड्यंत्र चालू आहे,आरोपींची हीम्मत वाढवली व या आघाडी सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील महिलांमध्ये भीति व घबराटीचे वातावरण निर्माण झाले. गृहमंत्री व त्यांच्या पक्षाचा जर बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला मदत करत असेल तर हे दुर्दैवी आहेत सदरील आरोपीला तात्काळ पोलिसांसमोर चौकशीसाठी बोलावण्यात यावे व योग्य ती कार्यवाही करावी जेणेकरून जे काय सत्य आहे ते जनतेपुढे येईल परंतु गृहमंत्री व त्यांच्या पक्षाने एका आरोपीला राजरोसपणे मदत केल्यामुळे या घटनेचा भारतीय जनता युवा मोर्चा व भाजपा तीव्र शब्दात निषेध करीत आहे व बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला मदत केल्याची नैतिक जिम्मेदारी स्वीकारून माननीय गृहमंत्री जयंत पाटील महाराष्ट्र राज्य यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यात यावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे वरील प्रमाणे मागण्या मान्य न झाल्यास भारतीय जनता युवा मोर्चा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल असे या निवेदनात नमूद केले आहे निवेदन सादर करताना निवेदनावर गणेश कापसे,विजया ताई घिसेवाड, श्रीकांत किन्हाळकर,विशाल माने,अजय टाक,आकाश शिरसागर,अमर सोनटक्के, अनिता साबळे,पुनम देशपांडे , दीक्षीत ताई,बालाजी तेलंगे साईनाथ,गंगाधर,इत्यादी महिला व पुरुष युवक भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लातुर :प्रतिनिधी :
सध्या महाराष्ट्रात राज्यात ग्रामपंचायतिच्या निवडणूका लागलेल्या असून काही दिवसांपूर्वी च लातुर जिल्हातील बऱ्याच गावातील आरक्षणाची सोडत सुटलेल्या होत्या पण निवडणूक विभागाने आरक्षण रद्द करून अगोदर निवडणूक मग आरक्षण हा फार्मूला आवलंबला आहे त्या मुळे अनेक पॅनल प्रमुखाचे दणाणले आहेत . अशातच औसा तालुक्यातील तपसे चिंचोली येथे अनुसूचित राखीव असलेल्या वॉर्डात भाग्यश्री लक्ष्मण कांबळे या ग्रामपंचायत तपसे चिंचोली येथे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असता फार्म भरण्यासाठी औसा तहसील कार्यालयात गेले असता त्यांचे कर्नाटकातील बसवकल्याण तालुक्यातील जातीचा दाखला आहे व त्या जातीच्या दाखल्यावरून महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणूक लढवता येत नाही असे म्हणत निवडणुकीचा अर्ज बाद करण्यात आला
सविस्तर वृत्तांत असा की
मी लक्ष्मण कांबळे जात महार राहणार तपसे चिंचोली ता औसा जिल्हा लातुर येथील रहिवाशी असून मी माझे लग्न कर्नाटकातील बसवकल्याण तालुक्यातील एकंबा गावातील हणमंत दरगु गायकवाड जात महार यांची मुलगी भाग्यश्री ही चे सोबत दिनांक २५/०५/२००५/ रोजी तपसे चिंचोली येथे लग्न करण्यात आले होते आज आमच्या लग्नाला जवळपास १५ वर्ष झालेले आहेत .लग्न झालेल्या प्रत्येक महिलेला तिच्या लग्नाच्या नंतर वडिलांचे नाव न लावता पतीचे नाव लावणे हे परंपरा असून त्या प्रमाणे मी
माझी पत्नी भाग्यश्री च्या नावा पुढे लक्ष्मण कांबळे हे नाव लावण्यात आले
म्हणजेच उदाहरणात मतदान यादीत आधार कार्ड बँक पासबुक रेशनकार्ड
आदी कार्डावर पतीचे नाव नोंद करण्या आलेली आहे इ स २०२० डिसेंबर रोजी महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागलेल्या आहेत त्या मुळे मी लक्ष्मण कांबळे माझी पत्नी भाग्यश्री लक्ष्मण कांबळे हिला ग्रामपंचायत तपसे चिंचोली येथील अनुसूचित जाती वॉर्ड क्रमांक( १) मधून निवडणुकीत च्या रिंगणात उभा करण्यासाठी औसा तहसील कार्यालयात फार्म भरण्यासाठी भाग्यश्री हिच्या माहेरकडील जातींच्या दाखल्या च्या आधारावर निवडणुकी साठी फॉर्म भरण्यासाठी गेलो असता निवडणूक विभागाने कर्नाटकातील महिलेला निवणुकीसाठी महाराष्टातील ग्रामपंचायत साठी निवडणूक लढवता येत नाही हा निवडणूक विभागाचा जी आर आहे म्हणत भाग्यश्री लक्ष्मण कांबळे हिचा अर्ज स्वीकारला गेला नसले मुळे निवडणूक विभागाने भाग्यश्री कांबळे याचे वर केलेला हा एक अन्याय आहे
ह्या निवडणूक विभागाला माझे महाराष्ट्रात लोकसभा असेल विधानसभा असेल जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायत असेल या साठी माझ्या पत्नीचे मत चालते तर मग माझ्या पत्नीला ग्रामपंचयात ला निवडणुक का ? लढवता येत नाही
याचा निवडणूक विभागाने त्वरित याचा खुलासा द्यावा अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकु असा इशारा भाग्यश्री कांबळे हिचे पती लक्ष्मण कांबळे भिम आर्मीचे जिल्हा महासचिव लक्ष्मण कांबळे यांनी इशारा दिला आहे
【 या वरील विषयावर त्वरित निर्णय घेण्यात यावा जोपर्यंत निर्णय येत नाही तो पर्यन्त निवडणुकीवर बंदी घालण्यात यावी ) अशी मागणी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त तसेच मुख्यमंत्री व निवडणुकीच्या संबंधित सर्व विभाग याचे कडे ई-मेल द्वारे पाठवलेल्या निवेदनात मागणी केली आहे


कागल■गोरख कांबळे.
कागल तालुक्यातील होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूकीचे प्रशिक्षण आज राज्य निवडणूक आयोग नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार शिल्पा ठोकडे व नायब तहसीलदार शिवाजी गवळी यांनी कर्मचाऱ्यांना दिले.कागल तालुक्यातील ५५ गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे मतदान प्रक्रियेचे प्रत्यक्ष कामकाज ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया याविषयी प्रशिक्षण दिले.निवडणूक प्रक्रियेत प्रत्यक्ष कामकाज कसे करावे? याविषयीची माहिती देण्यात आली. कागल तालुक्यात ५५ गावातील ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.याचाच एक भाग म्हणून आज कागल तालुक्यातील ५५ गावातील ग्रामपंचायत निवडणूकीत मतदान केंद्रावर कामकाज पहाणारे केंद्राध्यक्ष, सहाय्यक कर्मचारी, मतदान अधिकारी क्रमांक १ व मतदान अधिकार क्रमांक 2 व 3 अशा सर्व लोकांना प्रशिक्षण आरटीओ गोदाम नवीन पोस्ट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ पश्चिम बाजू कागल येथे देण्यात आले.
या प्रशिक्षणात प्रत्यक्ष मतदान केंद्रावर आदर्श आचारसंहिता नियमांचे पालन,मतदान यंत्र हाताळणी, व मतदान यंत्राची प्राथमिक माहिती,तसेच कोरोना संसर्ग काळात घ्यावयाची काळजी यासह मतदान प्रक्रियेबाबत मोठ्या पडद्यावर चलचित्र दाखवून मार्गदर्शन केले. हे प्रशिक्षण सकाळी ९ ते १२ व दुपारी २ ते ५ या दोन सत्रात देण्यात आले. पुढील प्रशिक्षण शनिवार दि.९ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे. सदर प्रशिक्षणास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, इतर सर्व प्रशिक्षणार्थी व कागल तहसील कार्यालय,व कागल नगरपरिषद कार्यालयातील नियुक्त कर्मचारी उपस्थित होते.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड:दि.2.जिल्ह्यात एकूण २०२ वाळू घाट आहेत.गेल्या वर्षी वाळू घाटांचे लिलाव रखडले होते.जिल्ह्यात पर्यावरण विभागाची संमती मिळाली नसल्याने वाळूघाटांचा लिलाव होऊ शकला नाही.प्रशासनाने अनेक वेळा वाळूतस्करांवर कारवाई करुनही अवैधरित्या वाळूचा उपसा सुरूच होता.जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व त्यांच्यासोबत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देखील कारवाया केल्या होत्या.
नांदेड जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावाला अखेर मुहुर्त लागला आहे. देगलूर, बिलोली व माहूर तालुक्यातील एकूण ३२ वाळूघाटांच्या लिलावाची प्रक्रिया नवीन वर्षात शनिवारपासून (ता. दोन) सुरू होत आहे.
नांदेड जिल्ह्यात एकूण २०२ वाळू घाट आहेत.गेल्या वर्षी वाळू घाटांचे लिलाव रखडले होते. जिल्ह्यात पर्यावरण विभागाची संमती मिळाली नसल्याने वाळूघाटांचा लिलाव होऊ शकला नाही.प्रशासनाने अनेक वेळा वाळूतस्करांवर कारवाई करुनही अवैधरित्या वाळूचा उपसा सुरूच होता.जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व त्यांच्यासोबत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देखील कारवाया केल्या होत्या. महसूलच्या पथकाने वाळू घाटावरील मोठ्या प्रमाणात तराफे जाळून नष्ट केले होते. या शिवाय बिहारी मजुरांवर मोठ्या संख्येने गुन्हे दाखल करण्यात आले होते. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी स्वत:कार्यवाही केली होती.
पर्यावरण विभागाची मान्यता
यापूर्वी विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने ही वाळू घाटलिलाव प्रक्रिया लांबणीवर पडली होती. दरम्यान,या कालावधीत पर्यावरण विभागाने जिल्ह्यातील ३२ वाळू घाटांच्या लिलावाला मान्यता दिली होती.याबाबत जिल्हा प्रशासनाने याबाबत निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागितले होते.निवडणूक आयोगाने वाळूघाटांचे लिलाव करण्यास परवानगी देताना ग्रामसभा घेण्यास सांगितले होते. परंतु, कुठल्याही वाळूस्थळाचा लिलाव करण्यापूर्वी त्या-त्या गावात ग्रामसभेची मान्यता घेतली जाते. ही प्रक्रिया संबंधित गावात ग्रामसभा घेऊन पूर्वीच पार पाडण्यात आली.त्यामुळे प्रशासनाने जिल्ह्यातील ३२ वाळूघाटांच्या ई- लिलावाची प्रक्रिया चालू केली आहे. ता.दोन जानेवारीपासून सायंकाळी पाच ते रात्री ११ वाजेपर्यंत ही प्रक्रिया ता.१७ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.त्यामुळे आता वाळूसाठी ठप्प झालेल्या घरकुलांच्या बांधकामांना वेग येणार आहे.तसेच सर्वसामान्यांना देखील माफक दरात वाळू मिळण्याची शक्यता आहे.
रखडलेली कामे मार्गी लागणार
जिल्ह्यातील अनेक वाळू घाटावर अवैधरित्या वाळूचा उपसा होत आहे.जिल्हा प्रशासन,महसूल प्रशासनाने कारवाही करूनही वाळू माफियांवर परिणाम झाला नाही.जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पहाटेच्या वेळी वाळू घाटांवर जाऊन कारवाई केली,तराफे जाळले या शिवाय मजुरांवर गुन्हे दाखल केले.दरम्यान,आता ३२ वाळू घाटांचा लिलाव होणार असल्याने बांधकाम करणाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.अनेकांची घरकुलांची कामे थांबली आहेत. यासोबतच विविध योजनांची कामे रखडली आहेत.ती पूर्ण होण्यास मदत मिळणार आहे
नांदेड जिल्हा प्रतिनिधी उद्धव मामडे रावधानोरकर
नांदेड मुखेड – अखिल भारतीय ब.ओ.बि.सी.अल्पसंख्याक भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशनची बैठक मराठवाडा अध्यक्ष राजु पाटील सुरनर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. त्या बैठकीत महाराष्ट्रात समितीचे मजबूत संघटन करून त्यांच्या अडीअडचणी व समस्या सोडवण्यासाठी समितीच्यावतीने नूतन जिल्हाउपाध्यक्ष पदी निवडण्यात आली.या बैठकीत अखिल भारतीय ब.ओ.बि.सी.अ. भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशन नांदेड जिल्हाउपाध्यक्ष पदी येवती येथील सामाजिक कार्यकर्ते मारोती हिरमलवाड यांची निवड केल्याचे मराठवाडा अध्यक्ष यांनी जाहीर केले. तसे निवडीचे पत्र मराठवाडा अध्यक्ष राजु पाटील सुरनर यांच्या हस्ते मारोती हिरमलवाड यांना देण्यात आले. यावेळी बोलताना मारोती हिरमलवाड यांनी समितिचे कार्य सर्वदूर पोहचविण्यासाठी व विशेष करून पीडित वर्गांच्या न्याय हक्कासाठी काम करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले आणि संघटनेने दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले.
सोबत मराठवाडा युवा अध्यक्ष उद्धव मामडे रावधानोकर,मराठवाडा उपाध्यक्ष आरीफ शेख निमटेकर,चंद्रकांत नागेश्वर,गोविंद माधवराव कांबळे,राजु लक्ष्मण हिरमलवाड,व्यंकटेश मनोहर घुमावार,अजय शंकरराव नागरगोजे,माधव संतुका येवते,रोहिदास माधवराव येवते,अविनाश हणमंत कांबळे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
अविनाश जाधव यांचा अभिष्टचिंतन सोहळा!!
उमरी तालुका प्रतिनिधी; उद्धव मामडे
उमरी;दि.31 डिसेंबर ला पार पडला
पाच दिवसांचा हा आठवडा एक संदेश देणारा ठरला 27 तारखेला सर्व विद्यार्थी मित्रांनी शाळा साफसफाई केली 28 ला गावातील रस्ते साफ केले 29 ला गावातील नाल्या साफ करून पूर्ण गावाचं मन जिंकत पूर्ण गावातील लोकांना या ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत गावातील लोकांना समाविष्ट करून घेतले 30 तारखेला विद्यार्थ्यांकडून 8 ते 1 अस पाच तास अभ्यास करून विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी निर्माण केली 31 डिसेंबर सकाळी लहान मुलांनी शाळेत वाढदिवस साजरा केला नंतर डॉ.माधवराव विभुते साहेब यांनी त्यांच्या क्लिनिक मद्ये साजरा केला डॉ.राहुल जाधव दत्ताहारी कांगुलकर, दिगंबर सावंत, केदार तम्मेवर,योगेश मुक्कावार आदींनी सर्वांनी त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी बोलवून शाल श्रीफळ हार असा सत्कार केला
सायंकाळी सहा वाजता पळसगाव तांडा येथे अविनाश जाधव मित्रपरिवार यांच्याकडून वाढदिवसाचा आयोजन केलं होत त्यात अविनाश जाधव यांच्याकडून गुणवंत विद्यार्थ्याचं सत्कार करण्यात आला त्यानंतर स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महत्त्वाची पुस्तक देण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असलेले शिरीष भाऊ देशमुख गोरठेकर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला शिरिशभाऊ देशमुख गोरठेकर पंचायत समिती उपसभापती, गजु भाऊ खांडरे न.पा.सभापती प्रतिनिधी ,अभिषेक देशमुख,गंगाधर सर,अंकुश राठोड सर, गणेश राठोड मामा कवळे पाटील शेलगाव, रामदास पाटील शेलगाव,नागराज राठोड गावातील आजी माजी सरपंच,उपसरपंच, नायक, ग्रा. प.सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला विद्यार्थी मित्र मैत्रीण आणि मित्रपरिवार आदी मान्यवर उपस्थित होते, या कार्यक्रमच सूत्रसंचालन दत्तराज कोटुरवर सिंधिकर आणि आभार अमोल राठोड सर नांदेडकर यांनी केलं
अन्यथा उस्माननगर येथील बँकेला टाळे ठोकण्याचा इशारा
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड:दि.2.सध्या बँकाचा कारभार जनतेच्या हिताचा उरला नसून उस्माननगर महाराष्ट्र ग्रामीण बँकेत सध्या कोणत्याही कामासाठी लक्ष्मी चा वावर वाढला आहे लक्ष्मी द्या कामे करा अशी जणू संकल्पना बँकेने केली का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.सध्या बँकेत शेतकऱ्या कडून पैसे घेऊन कामे करणाऱ्या दलालांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत आनागोदी कारभाराला सुरुवात झाली आहे. या कारभारास मूकसंमती देणाऱ्या महाराष्ट्र ग्रामीण शाखा उस्माननगर चे शाखा अधिकारी यांना तात्काळ निलंबित करावे व उस्मानगर शाखेतून त्याची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी शिवराज्य युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम पाटील बामणीकर यांनी जिल्हाधिकारी साहेब व महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.ग्राहक हेच बँकेचे दैवत हे गेल्या अनेक वर्षापासून बँकेला लागू होते परंतु सध्या आता हे ब्रीद लोक पावत चालले की काय ? अशी धारणा देखील जण माणसाची झालेली आहे उस्माननगर येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेची शाखा असून या बँकेत जवळपास पाच ते आठ गावाच्या ग्रहकांचे खाते आहेत सध्याच्या युगात माणूस बँकेच्या निगडीत आला आहे शासनाने मानस व जनतेस बँकेशी जोडले आहे शासनाच्या अनेक योजना जनतेच्या हितासाठी बँकांना जोडल्या आहेत तशा सूचना दिल्या आहेत शेतकऱ्यांना कर्ज वाटप करणे पिक कर्ज सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज नोकरदारांना गृहकर्ज वैयक्तिक कर्ज महिला बचत गटांना कर्ज शेतकऱ्यांना शेतात घर बांधणे कर्ज अशा विविध योजनेअंतर्गत बँकांना कर्ज वाटप करणे बंद कारक केले असताना या सर्व नियमांची पायपली या बँकेत होत असताना दिसून येत आहे तेथील शाखा अधिकारी मनमानी कारभार करत आहेत कर्जासाठी शासनाने व बँकेने दिलेले नियम व अटी पूर्तता करून देखील कर्ज प्रकरणे मंजूर केले जात नाहीत कर्ज देणे बंधनकारक असताना या शाखा अधिकाऱ्यांना मात्र कुठेच भान राहत नाही शाखा अधिकारी यांनी सर्व नियमांना केराची टोपली दाखवली आहे या बँकेत ग्राहकांना कुठेच सुविधा दिल्या जात नाहीत शाखा अधिकाऱ्याकडून नेहमीच कुठल्याही कामाला टाळाटाळ केली जात आहे विशेष म्हणजे दलालामार्फत कर्ज प्रकरणे केले तर त्यावर तात्काळ शाखा अधिकारी अंमलबजावणी करतात हे मात्र उस्माननगर महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील शाखा अधिकाऱ्याचा मोठा नियम दलालांमार्फत घेतल्या जात आहे परंतु जन सामान्य लोकांचे प्रश्न हाताळताना त्यांच्याकडून न्याय मिळत नाही सध्या बँकेत खाजगी माणसाचा वावर म्हणजेच दलालांचा सुळसुळाट वाढलेला आहे त्यामुळे सामान्य जनतेची हेडसाळ होत आहे शेतकरी नोकरदार सुशिक्षित बेरोजगार महिला बचत गटाच्या महिला बँकेत व बँकेच्या दारात दररोज चक्र मारत आहेत त्यामुळे बँकेचे कुठलीच कामे वेळेवर होत नाहीत व प्रकरणे निकाली निघत नाहीत त्यामुळे संपूर्ण ग्राहकही वैतागले आहेत या बँकेत ग्राहकांची व शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत असताना दिसून येत आहे अशा उस्माननगर महाराष्ट्र ग्रामीण बँकाच्या शाखा अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करून या ठिकाणी सर्वसामान्य जनतेची व शेतकर्याची कामे करणाऱ्या अधिकार्याची नियुक्ती करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र ग्रामीण शाखा उस्माननगर बँकेला टाळे ठोकण्यात येईल असा गंभीर इशारा शिवराज्य युवा संघटनेच्या वतीने निवेदनात देण्यात आला आहे दलालांच्या तावडीतून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी व पैसे घेऊन काम करणाऱ्या बँक शाखा अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी व उस्माननगर महाराष्ट्र ग्रामीण बँक दलाला पासून कामे रून शेतकर्यांची लुबाडणूक करणाऱ्या दलालाला देखील शाखाधिकारी याप्रमाणे त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करण्यात यावा असे निवेदन शिवराज्य युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम पाटील बामणीकर यांनी जिल्हाधिकारी व महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनावर त्यांची स्वाक्षरी आहे
नामदेव केंगार यांची निवड
प्रशांत भोसले
घुणकी ,ता. १: किणी हायस्कूल किणीचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी नामदेव शंकर केंगार यांची हातकणंगले तालुका माध्यमिक खाजगी शाळा चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या हातकणंगले तालुका कार्याध्यक्ष व कोल्हापूर जिल्हा सदस्यपदी निवड झाली. या निवडीबद्दल त्यांचे शिक्षण क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
त्यांना मुख्याध्यापिका सुरेखा शिरोटे ,पर्यवेक्षक डी.एच. पाटील ,किणी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आण्णासाहेब पाटील, उपाध्यक्ष सुहास माने, सचिव राजेंद्र पाटील व सर्व संचालक यांचे मार्गदर्शन लाभले.
अंभेरी ग्रामपंचायत बिनविरोध
खटाव तालुका प्रतिनिधी(रामदास देशमुख ):- संपूर्ण तालुक्यातील जवळपास 90 ग्रामपंचायत निवडणुका जाहीर होऊन उमेदवार अर्ज भरले गेले आहेत यामध्ये काही ग्रामपंचायत व काही वार्ड बिनविरोध झाले असून यामध्ये अंभेरी ( वरची) खटाव या ग्रामपंचायत एकूण नऊ सदस्य संख्या सर्वच्या सर्व बिनविरोध जागा झाल्या आहेत
या मध्येमहादेव वार्ड -१
१)सोमनाथ हिंदुराव शिंदे -सर्वसाधारण.
२)सौ.मीना हणमंत शिंदे.-सर्वसाधारण महिला.
३)सौ.माया शशिकांत शिंदे-सर्वसाधारण महिला.
कार्तिकस्वामी वार्ड नं -२
१)संतोष नवनाथ निकम -सर्वसाधारण
२)सौ.रोहिणी कुंडलिक यादव .-सर्वसाधारण महिला.
३)सौ.दिपाली अमर जाधव इतर मागासर्वगीय महिला.
हनुमान वार्ड नं-३
१)रविंद्र दत्तात्रय शिंदे -सर्वसाधारण
२)सोमनाथ भगवान मदने इतर मागासर्वगीय पुरूष
३)उज्वला विलास ननावरे- मागासर्वगीय महिला.
हे सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत
सर्वांनी गावचा विकास एवढे देह डोळ्या समोर ठेवून या बिनविरोध निवडणुकीचा पायंडा इतर गावासाठी घालून दिला आहे सरपंच पदाचे आरक्षण कोणतेही पडो आम्ही फक्त गावचा विकास करण्यासाठी प्रयत्न करू असे प्रतिक्रिया नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली
५३९ खासदारांमध्ये पटकावला ४ था क्रमांक
( हिंदू सम्राट मुंबई प्रतिनिधी: लक्ष्मण राजे)
मुंबईच्या भाजपा उत्तर मुंबईचे लोकप्रिय खासदार मा.गोपाळ शेट्टी हे देशातील सर्वोत्कृष्ट खासदार ठरल्याने भाजपा आमदार योगेश सागर, नगरसेवक व चारकोप विधानसभा अध्यक्ष बाळा तावडे, नगरसेवक आणि मुंबई महानगरपालिका गट उपनेते कमलेश यादव तसेच स्थानिक नगरसेविका ,भाजपाचे पदाधिकारी , कार्यकर्ते व सर्व सामान्य नागरिक यांनी बोरीवली पश्चिम येथील लोकमान्य नगर येथील गोपाळ शेट्टीं यांच्या कार्यालयात हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी व अभिनंदन करण्यासाठी गर्दी केली होती. खासदार गोपाळ शेट्टी यांना संसदीय क्षेत्रातील काम , जनतेतील लोकप्रियता, संपर्क, संसदीय उपस्थिती, व विकासाचे स्थानिक मुद्दे , अशा विषयां मध्ये ५ पैकी ४.९ असे भरघोस गुण मिळाले आहेत. त्यांनी ५३९ खासदारांमध्ये ४ था क्रमांक पटकावला आहे. प्रशासनाकडून रितसर मार्गाने जर प्रश्न सुटत नसतील तर रस्त्यावर उतरून, आंदोलन करून प्रश्न सोडविण्यासाठी प्रथम गोपाळ शेट्टी नगरसेवक,आमदार व आता खासदार असल्यापासूनच प्रयत्नशील असल्याने भाजपात व नागरिकात त्यांची लोकप्रियता वरचेवर वाढतच आहे.खासदार गोपाळ शेट्टी यांना सर्वोत्कृष्ट कामगिरी बद्दल प्रथम क्रमांक व सर्व खासदारात ४ था क्रमांक मिळाल्याने भाजपा उत्तर मुंबई भटके विमुक्त आघाडीचे अध्यक्ष दत्तात्रय महाजन , मार्गदर्शक गिरीधर साळुंके, अनंत भालेकर, व चारकोप विधानसभा ( भटके विमुक्त ) अध्यक्ष भारत कवितके यांनी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या कार्यालयात जाऊन पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.व पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड:दि.1.जानेवारी रोजी जिल्यातील धर्माबाद येथील ग्रामीण रुग्णालय मध्ये प्रसिद्ध उधोगपती ज्यांनी आपल्या श्रमावर विश्वास ठेऊन अल्पावधीतच नावलौकिक मिळीवले कर्तव्याची जाण असलेले कोविड-19च्या लोकडाऊन मध्ये संपूर्ण परिसरात गरजू वंताना मुक्तहाताने अन्न साहित्य,अन्न वाटप,धन वाटप करणारे गरजू वंतांच्या हाकेला धावून जाणारे व्येक्तीमत्व मा.मारोती कवळे गुरुजी यांच्या वाढदिवसा निमित्य रुग्णांना ब्ल्याॅंकेट व फळ वाटप करण्यात आली यावेळी धर्माबाद तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. दत्ताहारी पाटील कदम चोळाखेकर,नगरसेवक भोजराम गोणारकर,पांडुरंग देसाई, प्रभाकर पुयड,गणेश पाटील ढोलउमरीकर,रवी शेट्टी,पिराजी पाटील पाटोदेकर,माधव पाटील चोंडीकर,बालाजी पाटील कारेगावकर,हुलजीं पाटील बेलगुजरीकर,नरवाडे पाटील गोविंद पाटील रोषनागावकर, लक्ष्मण पाटील हरेगावकर, हणमंत पाटील धानोरकर,गणेश पाटील कोडगावकर,मारोती माकणे,ताहेर पठाण,पंडित जाधव,ज्येष्ठ पत्रकार कृष्णा तिमापुरे,संपादक मनोज बुंदले,वैद्यकीय अधीक्षक ड्रा.शेख इकबाल,ड्रा.पंडित व राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्तीथी होती.आदिचा सहभाग होता
कोपरगाव बिपिन गायकवाड हिंदूसम्राट तालुका प्रतिनिधी –
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद कोपरगाव नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न
नुकताच आठरा पगड जाती धर्मातील सर्वांना सामावून एकत्र घेऊन अ.भा.महात्मा फुलें समता परिषदे च्या नूतन पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड करण्यात आली. या वेळी कोपरगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष श्री.मंगेश पाटील,हिंदूवाडा मंडळाचे संस्थापक श्री.बाळासाहेब रुईकर,व माजी नगरसेवक कृष्णा आढाव यांच्या हस्ते गळ्यातील थंडीची उलनची मफलर व गुलाब पुष्प देऊन आगळा वेगळा सत्कार करण्यात आला व सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात
या वेळी तालुका पदाधिकाऱ्यांच्या निवड करण्यात आली
ती पुढीलप्रमाणे
कोपरगाव तालुका अध्यक्ष श्री. संतोष ( बापू ) वढणे,
श्री.रमेश टिक्कल तालुका उपाध्यक्ष,श्री. संदीप अनर्थे तालुका उपाध्यक्ष, श्री. विशाल निकम तालुका संघटक , श्री.संतोष जाधव तालुका प्रसिद्धी प्रमुख,श्री.मयूर बोरावके तालुका सहसचिव,श्री.किरण थोरात शहर उपाध्यक्ष,श्री.रवींद्र राऊत शहर सहसचिव,श्री.गिरीश हिवाळे शहर संघटक,श्री.सतीश भुजबळ शहर कार्यकारणी सदस्य,श्री.विशाल निकम,श्री.बाळकृष्ण जाधव या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला..
प्रतिनिधी.पोर्णिमा प्रकाश बुचके
दिनांक २९-१२-२०२० मुंबई यूनिवर्सिटी जे पी नायक भवन नेहरू युवा केंद्र एवं खेल मंत्रालय भारत सरकार आणि द ह्यूमन योगा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने फिट इंडिया कोविड-19 वॉरियर्स ज्या लोकांनी नागरीकांच्या सवेचे काम केले आहे, रात्र दिवस मेहनत केली आहे , लोकांना ध्यान्य वाटप करुन मदत केली आहे, अशा सर्व वारियर्स सर्टिफिकेट आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम खुप धुमधाम झाला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री डॉ. योगेश दुबे आणि नॅशनल स्पीकर श्री.रत्नाकर आहिरे यांची प्रमुख भुमिका होती. समाजकार्य हे कोणत्या ही प्रकारचे अस हे कार्य करणाऱ्यांना आम्ही सम्मानित करणार आहे.
द ह्यूमन योगा फाउंडेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री योग गुरु राधे शाम जैसवार आणि मुंबई जिल्हा समन्वय डॉ. कविता श्रीवास्तव यांच्या कार्यलयात सुत्र संचालन खुप छान झाले.
कार्यक्रमात नाशिक , पुणे आणि मुंबई, या ठिकाणा वरुन आलेल्या सर्व पाहुण्यांन मुळे कार्यक्रमाला कार्यक्रम चांगला झाला. कार्यक्रमामध्ये अनेक प्रकारचे भाषण ऐकायला मिळाले. यामध्ये श्री रत्नाकर अहीरे यांचे भाषण खुप प्रभावी झाले. सर्व पाहुण्यांनी भाषण लक्षपुर्वक ऐकले. अरे यांनी नेहरू युवा केंद्रा मध्ये जो अनुभव आला तो सर्वोना सांगितला. त्यांनी आपल्या भाषणातुन सर्वांना मंत्रमुग्ध व प्रेरणा दायी ठरले त्यांना जो मेसेज द्यायचा होता तंदरुस्त भारत तो त्यांनी योग्य प्रकारे दिला.
कार्यक्रमात उपस्थित डॉ . जोशना अरुणा,डॉ.पाटील,डॉ. विश्वकर्मा, समाज सेविका श्रीमती शीला शर्मा , समाजसेविका सुरेखा तुकाराम भोसले, पत्रकार कमल कचर कर्डक.
पुणे येथील सुनिल ज्ञानदेव भोसले संपादक स्टार टि.व्ही.9 उपाध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ, पत्रकार.मराठवाडा केसरी हिंदुसम्राट.
निधी अनिल पवार नेहरू युवा केंद्र मुंबई (भारत सरकार, खेळ एव युवा मंत्रालय ) तर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक म्हणून घाटकोपर ब्लॉक मध्ये कार्यरत आहोत.
स्नेहा उत्तम मडावी समाजसेवीका
चंद्रपुर,नरेंद्र चौधरी संपादक राजरंग टाइम्स धुळे जिल्हा.
द ह्यूमन योगा फाउंडेशन चे सर्व सदस्य संजय सिंह योगा टीचर ,सुयोग शेट्टी योगा टीचर, सुनील भारतीय योगा, टीचर अमित जैसवार योगा टीचर, खुशी गुप्ता योगा टीचर ,शिवम शर्मा योगा टीचर ,प्रीति सोनार योगा टीचर, नीलेश यादव योगा टीचर ,अजय योगा टीचर ,अर्चना जैसवार योगा टीचर,वॉलिंटर निलम हर्षदा यादव, शैलेश सरोज, प्रभात मिश्रा, राकेश जायस्वर, श्रीकांत बर्वे योगा टिचर डॉ. कल्पना, अतिरूद्ध त्रिपाठी, जया फांडिशन, सचिव सुमन त्रिपाठी जी डॉ. जोशी सर, डॉ. पाटील सर आणि नेहरू युवा केंद्र चे सर्व वॉलिंटियर यांनी कोविड-19 कालावधीत जोरदार मेहनत केली त्यामुळे खुप लोकांना मदत झाली. हे वॉरियर्स यांनी ज्यावेळी काम केले त्यावेळी लोक घराबाहेर फिरत अथवा निघत नव्हते.
द ह्यूमन योगा फाउंडेशन चे योग गुरु श्री राधेश्याम जायसवार यांनी द्वारा गेल्या 4 महिण्या पासुन झोपड़पट्टी मध्ये जाऊन लोकांना घरेलू उपचार सांगितले स्वःताच्या जीवाची पर्वा न करता योग गुरु या सर्व लोकांना जीवन जगण्याचे मार्ग योग्य प्रकारे योगा च्या माध्यम तुन सांगत होते.
आज हा कार्यक्रम त्यांचा समाप्त झाला आणि भारत सरकार ला मागणी केली कि त्यांच्या फाउंडेशन ला भारत सरकार ने मदद केली पाहिजे. इतके निस्वार्थ भावना ने काम करत आहे. त्यामुळे फाउंडेशन ला सर्वप्रथम दर्जा दिला पाहिजे.
भारत सरकार ला श्रीमती डॉक्टर कविता श्रीवास्तव नेहरू युवा केंद्र संघटना भारत सरकार चे जिल्हा समन्वय या पदावर ठेवून सर्व वॉलिंटियर यांना चांगल्या प्रकारे निर्देशन केले. आपले कर्तव्योंचे पालन केले. महाराष्ट्र में भाषांची अडचण होती. परंतु त्यांनी आपल्या सर्व समस्या लक्षात घेऊन. कविता श्रीवास्तव यांनी ज्या प्रकारे योग गुरु राधे श्याम आणि त्यांची टीम यांना मदत केली हे खुप कौतुका पात्र आहे.
नेहरू युवा केंद्र चे सर्व वॉलिंटियर मैडम चे सांगणे ऐकतात. व त्या प्रमाणे आपले कर्तव्योंचे पालन करतात त्यामुळे महाराष्ट्र आणि मुंबई मध्ये कोणत्याही प्रकार ची अडचण आली नाही. गेल्या सहा महिण्यांपासुन त्यांनी काम केले.
सर्वात चांगले काम वॉलिंटियर सरिता फांसी यांनी आपला जीवाची पर्वा न करता रियल कोरोना वैरीयस का चे काम केले.
योग गुरु राधे श्याम यांच्या निर्देशन नुसार योगा घरेलू उपचार कायम चांलु होते त्यामुळे महाराष्ट्र लोकांना संदेश मिळाला मास वापरा , योगा करा ,हात ग साबनाने कायम धुत रहा. हे योग गुरु यांनी लोकांना याविषयी मार्गदर्शन केले.
त्यामुळे महाराष्ट्र मध्ये मुंबई चे लोकांमध्ये कोविड चे प्रमाण कमी झाले.
नेहरू युवा केंद्र आणि क्रिडा मंत्रालय भारत सरकार चे सर्व अधिकारी यांनी मदत केली त्यामुळे लोक काम करत राहिले
सर्वात महत्वाचे नेहरू युवा केंद्र मुंबई जिल्ह्याचे सर्व अधिकारी सर्व काम सांगत स्वःता उपस्थित राहिले.
संजय जाधव, मालती मदन घोघटे ,सोनावने, मुंबई जिल्हा डायरेक्टर सर यांनी पण सर्व नेहरू युवा केंद्र चे अधिकारी यांना मदत करून हा कार्यक्रम कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केली.
हिंदूसम्राट विशेष प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
बीड: बँक खात्यातील रकमेवर डल्ला मारण्यासाठी भामट्यांनी नवी शक्कल शोधल्याची घटना बीडमध्ये उघडकीस आली आहे. भामट्यांनी चक्क बनावट एटीएम कार्ड तयार करून शिक्षकाच्या पगारी खात्यातून ८० हजार रुपये काढून घेतले. याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अभिमान भीमराव पायाळ (रा. पंचशीलनगर, बीड) हे बीड तालुक्यातील कुर्ला येथील शाळेवर शिक्षक आहेत.त्यांचे बीडच्या एसबीआय बँकेत पगारी खाते आहे.मागील शुक्रवारी (दि.२५) सकाळी त्यांनी एटीएम कार्डद्वारे खात्यातून ११ हजार रुपये काढले.त्यानंतर दि.२८ ते ३१ दरम्यान वेळोवेळी एटीएम कार्ड वापरून त्यांच्या खात्यातून एकूण ८० हजारांची रक्कम काढून घेतल्याचे एसएमएस त्यांच्या मोबाईलवर आहे.त्यामुळे त्यांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता मुंबईतील दादर आणि चेंबूर येथील एटीएम मधून सदरील रक्कम काढण्यात आल्याची माहिती त्यांना मिळाली.परंतु, एटीएम कार्ड बीडमध्ये स्वतःजवळ असताना मुंबईच्या एटीएम मधून रक्कम काढल्याने भामट्यांनी बनावट एटीएम कार्ड तयार करून सदरील व्यवहार झाल्याची त्यांना खात्री पटली.याप्रकरणी अभिमान पायाळ यांच्या फिर्यादीवरून अज्ञात भामट्यावर फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.पुढील तपास पोलीस निरिक्षक ठोंबरे करत आहेत
विरेंद्र म्हात्रे नवी मुंबई प्रतिनिधी : नववर्षाच्या सुरूवातीला अनेक रथी-महारथी थर्टी फर्स्टच्या पार्टीचा थकवा घालविण्यासाठी बिछान्यात निद्रादेवीच्या आधीन असताना नवी मुंबईचे लोकनेते आ. गणेश नाईक यांचे नेरूळमधील कडवट समर्थक असणारे भाजपाचे गणेश भगत मात्र सकाळीच उठून अनाथ मुलांना चॉकलेट व बिस्किटचे वाटप करून त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देताना नेरुळवासियांना पहावयास मिळाले. गणेश भगत यांच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमांची नेरुळवासियांकडून प्रशंसा करण्यात येत आहे.
शुक्रवार, दि. १ जानेवारी, नववर्षाचा पहिलाच दिवस. अनेक जण थर्टी फर्स्टचा थकवा घालवत निद्रादेवीच्या स्वाधीन असताना गणेश भगत हे सकाळी साडे नऊ-दहा वाजण्याच्या सुमारास आपल्या सहकाऱ्यांसमवेत नेरूळ सेक्टर १६ एमधील जीवनज्योती आशालय ट्रस्ट येथे पोहोचले. या ट्रस्टकडून सांभाळ केल्या जाणाऱ्या अनाथ मुलांना गणेश भगत यांनी बिस्किट व चॉकलेटचे वाटप करत या मुलांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. या मुलांचा सांभाळ करणाऱ्या ट्रस्टींचे व कर्मचाऱ्यांचे कौतुक करताना त्यांचे कार्य हे खरोखरीच देवपुजेसम असल्याचे गणेश भगत यांनी यावेळी सांगितले. यावेळी गणेश भगत यांच्यासमवेत विभागातील ज्येष्ठ नागरिक शिवाजी पिंगळे, गोरक्षनाथ गांडाळ, विश्वास देसाई, धनाजी कचरे, हरिश्चंद्र पातेरे, वासुदेव पाटील, रामदास गर्जे, मंगेश कदम, विशाल पाटील, रविंद्र भगत उपस्थित होते.
ओरीपीला अटकपूर्व जामीन मंजूर
याला आशिर्वाद कोणाचा!!
उमरी:दि.01,जानेवारी उमरी तालुक्यातील मौ.धानोरा बु.येथील श्री.दत्त मंदिरचे पुजारी आनंद पुरी महाराज यांना राहुल रूक्माजी पांचाळ रा.धानोरा बु.यांनी दि.31-12 रोजी पहाटे 6 वाजता मारहाण केली.
सविस्तर माहिती अशी की,दरवर्षी प्रमाणेच श्री.दत्त मंदिर परिसरात दत्त जयंती उत्सव साजरा करतात. भजन, पारायण,महापूजा असा कार्यक्रम राबविण्यात येत तसेच दि.31-12-2020रोजी गुरूवार सकाळी 6 वाजता महापूजा चालु असताना अचानक येवुन “आबे गोसारड्या महाराज हे काय महापुजा,आरती,भजन करतोस” या आवाजाचा मला त्रास होत आहे म्हणून महाराजास ला लाथा बुक्या मारून गोसारड्या जाती वाचक शिवीगाळ करून तुला दुसऱ्या महाराज सारख मारून टाकतो म्हणून जिवे मारण्याची धमकी देऊन, कार्यक्रमात नासधूस करत असतांना काही भक्त गण आई भगणी महाराजास का मारतोस म्हणून सोडवण्यास गेल्या त्याला पण मारहाण केली व निघुन गेला.
सदर गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार महाराजांनी 25,30 भक्त गण घेऊन धर्माबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.त्याच्यावर भा.द.वी.कलम 323,504,506 असा गुन्हा दाखल करण्यात आला.
जिल्ह्य़ातील साधुसंतावर वारंवार प्राण घातक हल्ले होत आहेत व आरोपी बिनधास्त फिरत आहेत हा विषय लक्षात घेता प्रशासनाने काळजीपूर्वक लक्ष देऊन साधुसंतावर होणारे प्राण घातक हल्ले रोखावे.
काही दिवसापूर्वीच नागठाणा येथील संत योगी महाराजांस आपला जिव गमवा लागला आहे.
या साधुसंतावर हल्ला करून आरोपी सिनेस्टाईल मोकाट फिरत आहेत,याला आशिर्वाद कोणाचा असा प्रश्न पंचक्रोशीतील सुज्ञान नागरिकांकडून साधू संताना मारणाऱ्या वर कडक कार्रवाही करण्याची मागणी होत आहे.
मिरज–अशोक मासाळसांगली, दि. 31 ,कौशल्य विकासाच्या विविध योजनांव्दारे जिल्ह्यास लागणारे आवश्यक कुशल मनुष्यबळ उद्योगांच्या गरजेनुसार तयार करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील विशिष्ट भौगोलिक तथा सामाजिक स्थिती, परंपरागत व्यवसाय, नैसर्गिक संसाधन तथा साधनसामुग्री इत्यादीच्या आधारे जिल्ह्यातील रोजगार/स्वयंरोजगासाठी अधिक मागणी असलेली क्षेत्रे विचारात घेऊन अधिक मागणी असलेल्या क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी युवक यवुतींना उपलब्ध करून माहे जानेवारी 2020 पासून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कौशल्य योजना 3.0 सुरू करण्यात येत आहे. यामध्ये विविध कोर्सचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रशिक्षण घेण्यासाठी http://bit.ly/3aOuFMO या लिंकवर सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे. कौशल्य विकास प्रशिक्षणाकरीता पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार दिनांक व वेळ एसएमएस अलर्टव्दारे कळविण्यात येईल. Cnc Setter cum operator - Turning, Repair - Welder, Dth Set Top Box installation and service Technician, Cctv installation Technician, Field Technician - computing and peripherals, Junior software developer अशा विविध कोर्ससचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अधिक माहिीतसाठी 0233-2600554 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. करीम यांनी केले आहे.

सांगली–सुरेश संकपाळसांगली, दि. 31, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत लोककला व पथनाट्य यांची निवडसूची तयार करण्यासाठी संबंधित क्षेत्रातील अनुभवी संस्थाकडून दि. 1 जानेवारी 2021 पासून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक संस्थांनी जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रासह दि. 1 जानेवारी 2021 ते 21 जानेवारी 2021 पर्यंत मिळतील अशा बेताने पाठवावेत, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे. शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोककला व पथनाट्य (उदाहरणार्थ गण-गवळण, अभंग, पोवाडे, पथनाट्य, बहुरूपी, भारूड इत्यादी) निवडसूची तयार करण्याचे काम सुरू आहे. इच्छुक संस्थांनी जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधून अर्जाचा नमुना व माहितीपत्रक प्राप्त करून घ्यावे. अर्जाचे नमुना व माहितीपत्रक www.maharashtra.gov.in आणि dgipr.maharashtra.gov.in या वेबसाईटवरही उपलब्ध आहे. पथकाला विविध विषयांवर (शासकीय योजनांसह) कार्यक्रम/पथनाट्य करण्याचा अनुभव असावा. पथक किमान दहा जणांचे असावे. यामध्ये स्त्री-पुरूष, वादक यांचा समावेश असावा. लोककला/पथनाट्य पथक ज्या जिल्ह्यातील असेल त्याच जिल्ह्यातून अर्ज दाखल करावा. केंद्र सरकारच्या गीत व नाट्य विभागाकडे नोंदणीकृत असल्यास प्राधान्य. संस्थेकडे स्वत:ची ध्वनीक्षेपण यंत्रणा असणे अपेक्षित आ

सांगवी- रघूनाथ राजे नाईक निबांळकर बाबा यांच्या आर्शीवादाने फलटण येथे संतोष ( सनी ) मोरे यांनी सांगवी गावातून निवडणूक उमेदवारी साठी अर्ज दाखल केलेला आहे फलटण मध्ये रघूनाथ राजे नाईक निबांळकर ( बाबा ) यांच्या माध्यमातून सांगवी गाव पुर्ण विकसीत केला आहे फलटण तालुक्यातील सांगवी गावासाठी नविन युवा चेहरा समोर येणार असल्याचे चर्चा सांगवी गावात सर्वत्र चालू आहेत सांगवी गावात विकास हा महत्व पुर्ण निर्णय गावातील तरूण वर्गाने विचार केला आहे सांगवी गावात फक्त नि फक्त रघूनाथ राजे नाईक निंबाळकर ( बाबा ) यांच्या नेतृत्व मध्ये ( संतोष ) सनि मोरे पाहीजेत असा विचार सांगवी गावचे तरूण युवा वर्ग बोलत आहेत युवा वर्ग एकत्र येऊन फक्त आणि फक्त सनि मोरे यांच्या नावाची चर्चा सांगवी गावामध्ये करत आहेत सांगवी गावामध्ये एकच ध्येय युवा वर्गातून होणार आहे की या पुढे सांगवी गावचा निर्णय रघूनाथ राजे नाईक निबांळकर( बाबा ) यांनीच सांगवी साठी घेतला पाहीजे असे सांगवी गावात युवा वर्ग बोलत आहेत सांगवी गावातील बोलणारे फक्त स्वार्थी लोक राजकरण करण्या पुरते येतात आणि गप्प राहतात या शिवाय यांनी आज पर्यंत कुठलेच काही गावासाठी केले नाही सांगवी गावामध्ये सर्व तरूण युवा पिढी लवकरच एकत्र येऊन गावासाठी चांगल्या प्रकारचे रघूनाथ राजे नाईक निबांळकर नेतृत्व तयार करू व गावाचा विकास चागंल्या प्रकारे करू असे बोलले जात आहे


( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी:लक्ष्मण राजे )
वसई : धडक कामगार युनियनचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष उत्तम कुमार यांनी वसईत आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचे धडक कामगार युनियनचे सर्वेसर्वा संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या शुभहस्ते उदघाटन करण्यात आले.
यूनिव्हर्सल हेल्थ केअर सेंटर हॉस्पिटल व प्राथमिक आरोग्य केंद्र नवघर वसई यांच्या विशेष सहयोगातून उत्तम कुमार यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 500 हुन अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
अभिजीत राणे यांनी यावेळी बोलताना, आज उत्तम कुमार यांचा वाढदिवस आहे त्यांना त्यांच्या भावीवाटचालीस शुभेच्छा देतो. त्यांच्याकडून भविष्यात वसई-विरारमधील जास्तीत जास्त कामगारांना न्याय मिळवून द्यावा. असे यावेळी ते म्हणाले.
उत्तम कुमार यांनी यावेळी बोलताना, साहेब तुमचा फक्त आशीर्वाद माझ्या पाठीशी खंबीरपणे राहू द्या अशी ग्वाही अभिजीत राणे यांना दिली.


( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी:लक्ष्मण राजे )
वसई : धडक कामगार युनियनचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष उत्तम कुमार यांनी वसईत आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचे धडक कामगार युनियनचे सर्वेसर्वा संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या शुभहस्ते उदघाटन करण्यात आले.
यूनिव्हर्सल हेल्थ केअर सेंटर हॉस्पिटल व प्राथमिक आरोग्य केंद्र नवघर वसई यांच्या विशेष सहयोगातून उत्तम कुमार यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 500 हुन अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
अभिजीत राणे यांनी यावेळी बोलताना, आज उत्तम कुमार यांचा वाढदिवस आहे त्यांना त्यांच्या भावीवाटचालीस शुभेच्छा देतो. त्यांच्याकडून भविष्यात वसई-विरारमधील जास्तीत जास्त कामगारांना न्याय मिळवून द्यावा. असे यावेळी ते म्हणाले.
उत्तम कुमार यांनी यावेळी बोलताना, साहेब तुमचा फक्त आशीर्वाद माझ्या पाठीशी खंबीरपणे राहू द्या अशी ग्वाही अभिजीत राणे यांना दिली.

!! श्री विघ्नहर्त्रेः नमः !!
🗒️ दैनिक पंचांग🗒️
📅 ईंग्रजी दिनांक १
जानेवारी २०२१
🔥 अग्निवास ०९|३४ पर्यंत अग्निवास पृथ्वीवर आहे.
🥄 आहुती मंगळ मुखात आहुती.
⏲️ युगाब्द -५१२२
⏱️ संवत -२०७७
🕰️ भारतीय राष्ट्रीय सौर कार्तिक शके १९४२
👑 शालिवाहन शके -१९४२
⌛ संवत्सर – शार्वरी
🧭 अयन – उत्तरायण
🌤️ सौर ऋतु शिशिर
⛅ ऋतु – हेमंत
🪐 मास – मार्गशीर्ष
🌗 पक्ष – कृष्ण
🌕 तिथी – द्वितीया (०९|३४)
☀️ वार – शुक्र (भृगु वासरे)
🌟 नक्षत्र – पुष्य (२०|१५)
💫 योग – वैधृति (१३|३७)
✨ करण – गर (०९|३४)
– वणिज (२१|२५)
🌝 चंद्र राशी – कर्क
🌞 सूर्य राशी – धनु
🌟 सूर्य नक्षत्र – पूर्वाषाढा (२)
🪐 गुरू राशी – मकर
🌟 गुरू नक्षत्र – उत्तराषाढा (४)
🌅 सुर्योदय – ०७|१३
🌄 सुर्यास्त – १८|११
🕉 दिन विशेष
भद्रा २१|२५ पासून, मृत्यु २०|१५ पासून
🔅 दिशा शूल पश्चिम
☀ ताराबळ आश्विनी, कृत्तिका, मृग, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, मघा, उत्तराफाल्गुनी, चित्रा, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, उत्तराषाढा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा, रेवती
☀ चंद्रबळ वृषभ, कर्क, कन्या, तुळ, मकर, कुंभ
✡ शुभ मुहूर्त अभिजित १२|२० ते १३|०४
🌑 अशुभ वेळ
राहूकाळ ११|२० ते १२|४२
⏳ शिवलिखीत चौघडीया
🔅 लाभ ०८|३५ ते ०९|५८
🔅 अमृत ०९|५८ ते ११|२०
🔅 शुभ १२|४२ ते १४|०४
🔅 लाभ २१|२७ ते २३|०५
🔅 शुभ २४|४२ ते २६|२०
🔅 अमृत २६|२० ते २७|५८
🙏 उपासना 🙏
“ॐ श्री कुलदेव्यै नमः ।”
“ॐ शुं शुक्राय नमः ।”
ग्रहपीडा निवारणार्थ दान
चणे, तांदुळ, तूप, सफेद वस्र सत्पात्री दान करावे. ग्रहांची अनुकुलता प्राप्त होईल.
शुभाशुभ दिन
१३|३७ पासून चांगला दिवस आहे.
मार्गशीर्ष मासातील मुहूर्त
🍫 साखरपुडा मुहूर्त
जानेवारी ३, ६, ७
🐣 डोहाळ जेवण मुहूर्त
जानेवारी १
🐥 बारसे
जानेवारी १, १०
🪒 जावळ मुहूर्त
जानेवारी ६, ७, ८,
🏬 वास्तु मुहूर्त
जानेवरी ६, ८, ९
🏠 गृहप्रवेश (लौकिक)
जानेवारी १, ६, १०
🎺 विवाह मुहुर्त
जानेवारी ३, ५, ६, ७, ८, ९, १०
🌱 बीज पेरण्यास
जानेवारी ६, ७, ८
🚰 कूपनलिका
जानेवारी ३, ५, ६, ७, ८
✂️ कापणी
जानेवारी १, ३, ६, ८,
🏞️ बागकाम
जानेवारी ३, ८, १०,
🚩 सुभाषित
अनित्यानि शरीराणि विभवो नैव शाश्वतः | नित्यं संनिहितो मृत्युः कर्तव्यो धर्मसङ्ग्रहः||
इस संसार में समस्त प्राणियों का जीवन क्षणिक होता है तथा धन संपत्ति और समृद्धि भी शाश्वत (सदा बनी रहने वाली) नहीं होती है | मृत्यु भी हर समय उनके प्राणहरण के लिये उद्यत रहती है | ऐसी स्थिति में मनुष्यों का कर्तव्य है कि वह धर्म के सिद्धान्तों को अपना कर उनका पालन करे |
आपला दिवस सुखाचा जावो, मन प्रसन्न राहो.

🙏🏼जय गुरुदेव🙏🏼
🌺दैनिक राशी भविष्य🌺
उमेश सुतार, ज्योतिषाचार्य, विशारद, पंडित, ज्योतिष वास्तू भूषण
1) मेष राशी भविष्य (Friday, January 1, 2021)
तुम्ही आहार व्यवस्थित घ्या विशेषत: अर्धशीशीच्या रुग्णांनी अन्नसेवन योग्य वेळी न केल्यास त्यांना विनाकारण भावनिक ताणाचा सामना करावा लागेल. या राशीतील काही लोकांना आज संतान पक्षाकडून आर्थिक लाभ होण्याची अपेक्षा आहे. आज तुम्हाला आपल्या मुलांवर गर्व वाटेल. आजच्या दिवशी नवा लूक, नवा पेहराव आणि नवे मैत्र लाभेल. तुमच्या प्रिय व्यक्तीला भावनिकदृष्ट्या धमकी देणे टाळा. अतिस्पष्टवक्तेपणा आणि भावनांना व्यावसायिक बैठकांमध्ये आवर घाला. आपल्या व्यावसायिक स्थानाला त्यामूळे अगदी सहजपणे धक्का बसू शकतो. आज टीव्ही किंवा मोबाइलवर काही सिनेमा पाहण्यात तुम्ही इतके व्यस्त होऊ शकतात की, तुम्ही गरजेच्या कामांना करणे विसराल. तुमचा/तुमची जोडीदार तुमच्या दैनंदिन गरजा भागविणे थांबवेल, त्यामुळे दिवसभर निराश असाल.
उपाय :- घरात निळे पडदे लावून सकारात्मक परिवाराचा अनुभव घ्या.
2) वृषभ राशी भविष्य (Friday, January 1, 2021)
तुमच्या जोडीदाराचे धाडस आणि निष्ठेमुळे तुम्हाला आनंद मिळेल. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला तुमची प्रलंबित देणी आणि बिले देण्यास उपयोगी पडतील. कुटुंबातील लोकांमध्ये पैश्याला घेऊन आज वाद होऊ शकतात. पैश्याच्या बाबतीत तुम्हाला कुटुंबातील सर्व लोकांसोबत स्पष्ट होण्याचा सल्ला दिला जातो. कामदेवाच्या कचाट्यातून सुटण्याची अगदी लहानशी संधी मिळेल. कोणताही नवीन प्रकल्प हाती घेताना नीट विचार करा. अनपेक्षित प्रवासामुळे धावपळ व ताणतणाव वाढेल. तुमचा जोडीदार तुमच्या नाजूकपणाला गोंजारणार आहे. त्यामुळे तुम्हाला परमानंद लाभणार आहे.
उपाय :- नोकरी/बिझनेस मध्ये लाभ होण्यासाठी तेजफळाने दात घास.
3) मिथुन राशी भविष्य (Friday, January 1, 2021)
तुमची संध्याकाळ काहीशा मिश्र भावनांमुळे तणावाची ठरू शकते. परंतु, चिंता करण्याचे कारण नाही – कारण निराशेपेक्षा आनंद-समाधान यामुळे तुम्ही खुशीत राहाल. विचार न करता कुणाला ही आपला पैसा देऊ नका तुम्हाला येणाऱ्या काळात मोठी समस्या येऊ शकते. घरगुती प्रश्न आणि प्रलंबित घरगुती कामं पूर्ण करण्यासाठी लाभदायक दिवस. लवमेट आज तुमच्या कडून कुठल्या गोष्टीची डिमांड करू शकतो परंतु, तुम्ही त्याला पूर्ण करू शकणार नाही ज्यामुळे तुमचा लवमेट तुमच्याशी नाराज होऊ शकतो. तुमच्या योजनांबद्दल सर्वत्र बडबड कराल तर त्यामुळे तुमचा प्रकल्प रखडेल, बारगळेल. तुम्हाला आपल्या घरातील लहान सदस्यांसोबत वेळ घालवणे शिकले पाहिजे. जर तुम्ही असे केले नाही तर, तुम्ही घरात सद्भाव बनवण्यात यशस्वी होणार नाही. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही जे काही कष्ट घेत होतात, त्यांचे आज चीज होणार आहे.
उपाय :- वाढीव आर्थिक परिस्थितीसाठी, एक केळीचे झाड लावा, त्यास वाढवा आणि त्याची पूजा करा.
4) कर्क राशी भविष्य (Friday, January 1, 2021)
तुमच्या दयाळू स्वभावामुळे आज अनेक आनंदाचे क्षण अनुभवाल. जर तुम्ही घरापासून बाहेर राहून जॉब किंवा शिक्षण घेतात तर, अश्या लोकांपासून दूर राहणे शिका जे तुमचे धन आणि वेळ बर्बाद करतात. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी, उत्साही, प्रेमळ अशा मूड मुळे आपल्या सभोवतालच्या सर्वाना आनंद आणि सुख लाभेल. आज तुम्ही आपल्या प्रेमी सोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकतात परंतु, गरजेचे काम आल्यामुळे हा प्लॅन यशस्वी होणार नाही त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये वाद ही होऊ शकतो. स्पर्धात्मक परीक्षेला बसणाºयांनी शांत मनाने सामोरे जावे. परीक्षेच्या भीतीमुळे ग्रासून जाऊ नका. तुमचे प्रयत्न तुम्हाला निश्चितपणे सकारात्मक निकाल मिळवून देतील. प्रवासाच्या संधी शोधाल. तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आज मनसोक्त गप्पा माराल.
उपाय :- कोणीही म्हातारी स्त्री (चंद्राची कारक) ला पांढऱ्या वस्तु (तांदुळ, साखर, पीठ, मैदा, दुध) ने बनवलेल्या वस्तु जेवणास दिल्या तर नोकरी/बिझनेस मध्ये प्रगती होईल.
5) सिंह राशी भविष्य (Friday, January 1, 2021)
तुमची प्रचंड बौद्धिक क्षमता तुम्हाला दुबळेपणाशी, अपंगत्वाशी सामना करण्यास मदतगार ठरू शकेल. केवळ सकारात्मक विचारसरणी अवलंबिल्यामुळे या समस्येशी दोन हात करू शकेल. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा – आणि फक्त महत्त्वाच्या आवश्यक गोष्टींचीच आज खरेदी करा. मुलं खेळावर आणि इतर आऊटडोअर उपक्रमांवर अधिक वेळ घालवतील. आजचा दिवस आनंद आणि खुशीने परिपूर्ण अशा संदेशानी भरलेला आहे. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्ही काहीतरी खास करणार आहात. आज तुमच्याजवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृती यामुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. तुमची पत्नी आज खूपच छान वागत आहे. तुम्हाला तिच्याकडून कदाचित काही सरप्राइझ मिळण्याची शक्यता आहे.
उपाय :- नेहमी आपल्या शरीरावर आणि आपल्या जवळच्या खिशात / वॉलेटमध्ये कापडाचा पिवळा तुकडा ठेवा. पिवळा रंग एक चांगला मूड वाढवणारा आहे.
6) कन्या राशी भविष्य (Friday, January 1, 2021)
प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदलायला हवी आणि हीच त्यासाठी योग्य वेळ आहे. ज्या लोकांनी कुणी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर काही धन गुंतवणूक केली होती आज त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमचा मोकळा वेळ मुलांच्या सहवासात घालवा – मग त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळी क्लृप्ती करावी लागली तरी चालेल. प्रेमीला आज तुमच्या कुठल्या गोष्टीचे वाईट वाटू शकते. ते तुमच्याशी नाराज होतील त्याच्या आधीच आपली चूक मान्य करा आणि त्यांची मनधरणी करा. तुमच्या अवतीभवती काय घडतेय याकडे लक्ष द्या – आज तुम्ही केलेल्या कामाचे श्रेय दुसरेच कुणीतरी घेण्याची शक्यता आहे. आपल्या जवळच्या लोकांसोबत तुम्हाला वेळ घालवण्याची इच्छा होईल परंतु, तुम्ही असे करण्यात सक्षम होऊ शकणार नाही. वैवाहिक आयुष्याच्या दृष्टीने आजचा दिवस खूपच चांगला आहे.
उपाय :- आई किंवा कुठल्याही मोठ्या महिलेकडून तांदुळ घेऊन पांढऱ्या कपड्यामध्ये बांधून आपल्या जवळ पास ठेवल्याने नोकरी/बिझनेस साठी शुभ आहे.
7) तुला राशी भविष्य (Friday, January 1, 2021)
आजच्या दिवशी आपल्या आरोग्याची कसलीही काळजी करण्याची गरज नाही. आपल्या सोभवतालचे लोक आपले मनोधैर्य आणि चैतन्य वाढवतील. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल. तुमच्या ओळखीचे कुणतरी तुमची आर्थिक स्थिती पाहून विचित्र पद्धतीने प्रतिक्रिया देईल, त्यामुळे घरात तुम्हाला अवघडल्यासारखे वाटेल. आपल्या प्रियकर/प्रेयसीला न आवडणारे कपडे वापरू नका, त्यामुळे तो/ती नाराज होऊ शकते. आजच्या दिवशी नवी भागीदारी आशाजनक असेल. जी गोष्ट तुमच्यासाठी आवश्यक नाही त्यावर तुमचा अधिक वेळ घालवू शकतात. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला वैवाहिक आयुष्यात थोडीशी खासगी स्पेस आवश्यक आहे.
उपाय :- कुटुंबाच्या भावना आणि आनंद टिकवून ठेवण्यासाठी अल्कहोल घेणे टाळा.
8) वृश्चिक राशी भविष्य (Friday, January 1, 2021)
तुम्ही आज ऊर्जेने भारलेले आहात आणि तुम्हाला आज काहीतरी निराळे, अतिरिक्त असे काही करावेसे वाटेल व तुम्ही ते कराल. या राशीतील काही लोकांना आज जमिनीने जोडलेल्या काही मुद्यांना घेऊन धन खर्च करावे लागू शकते. घरगुती कामं कंटाळवाणी होतील आणि मानसिक तणावाला निमंत्रण देणारी असतील. रेशमी धागे आणि टॉफी प्रिय व्यक्तीसोबत वाटण्याची शक्यता आहे. नवीन उपक्रम, उद्योग हा आकर्षक आणि योग्य परतावा मिळण्याबाबत आशादायी असेल. जे लोक बऱ्याच दिवसापासून खूप व्यस्त होते त्यांना आज स्वतःसाठी वेळ मिळू शकतो. तुमच्या नेहमीच्या दिवसापेक्षा आजचा दिवस हा वैवाहिक आयुष्यातील वेगळा दिवस असेल, तुम्हाला आज काहीतरी वेगळा अनुभव मिळणार आहे.
उपाय :- दररोज शिवलिंगाचा अभिषेक करा आणि आर्थिक स्थिती चांगली ठेवाल.
9) धनु राशी भविष्य (Friday, January 1, 2021)
आयुष्यातील उच्च दर्जाची महानता अनुभवण्यासाठी तुमचे आयुष्य उदात्त बनवा. चिंता करणे विसरून जाणे हे त्यादृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असेल. या राशीतील विवाहित जातकांना आज सासरच्या पक्षाकडून धन लाभ होण्याची शक्यता आहे. तुम्ही एखाद्या सोहळ्याला गेलात तर नवीन मित्रमंडळी, नवीन व्यक्तींच्या ओळखी होतील आणि तुमचा मित्रपरिवार विस्तारेल. रेशमी धागे आणि टॉफी प्रिय व्यक्तीसोबत वाटण्याची शक्यता आहे. शारीरिक अस्तित्व हे आता गौण आहे कारण तुम्ही सदासर्वकाळ एकमेकांच्या प्रेमाची अनुभूती घेत आहात. परिस्थितीपासून तुम्ही दूर पळून जाऊ लागलात, तर येनकेनप्रकारे ती तुम्हाला खिंडीत पकडेल आणि तिचा सामना हा करावाच लागेल. हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती येईल.
उपाय :- संध्याकाळी कच्या कोळश्याला पाण्यामध्ये प्रवाहित करून आरोग्याला चांगले ठेवले जाईल.
10) मकर राशी भविष्य (Friday, January 1, 2021)
ज्येष्ठांनी त्यांच्या तब्येतीला जपून राहण्याची गरज आहे. आज तुम्ही मित्रांसोबत पार्टीमध्ये खूप पैसा खर्च करू शकतात परंतु, तरी ही तुमचा आर्थिक पक्ष आज मजबूत राहील. जीवनसाथीचे आरोग्यामुळे तुम्हाला काळजी वाटेल. तुमचे धैर्य पाहून तुम्ही प्रेर्म ंजकाल. नवीन प्रकल्प आणि खर्च लांबणीवर टाका. तुमची बलस्थाने कोणकोणती आहे याचा आढावा घ्या आणि भविष्यातील तुमच्या योजना आखा. तुमचा/ तुमची जोडीदार तुम्हाला जाणवून देईल की पृथ्वीवरच खरा स्वर्ग आहे.
उपाय :- चंद्राच्या प्रकाशात १५ ते २० मिनिट बसल्याने आरोग्यासाठी चांगले राहील.
11) कुंभ राशी भविष्य (Friday, January 1, 2021)
आजच्या दिवशी आपल्या आरोग्याची कसलीही काळजी करण्याची गरज नाही. आपल्या सोभवतालचे लोक आपले मनोधैर्य आणि चैतन्य वाढवतील. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. घरगुती कामं बराच काळ व्यस्त ठेवतील. आपल्या प्रेमिकेशी अश्लील चाळे करू नका. आपल्या नव्या योजना आणि उपक्रमाबद्दल पालक कमालीचे उत्साही असतील. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत नाहीत. आजचा दिवसही त्यापैकीच एक आहे. एका लहानशा बाबीवरून तुमच्या जोडीदाराने खोटेपणा केल्यामुळे तुम्ही नाराज असाल.
उपाय :- दारूच्या सेवनाने मंगळ बिघडतो, म्हणुन परिवाराच्या सुखासाठी याचा त्याग करा.
12) मीन राशी भविष्य (Friday, January 1, 2021)
तुमच्यापैकी काही जण बºयाच कालावधीपासून कामकाजासाठी खूप अतिरिक्त वेळ देत आहात आणि त्यामुळे तुमची ऊर्जा कमी झाली आहे – आज सगळ्या तणाव व द्विधा मन:स्थितीचा आजचा शेवटचा दिवस असावा असे तुम्हाला वाटेल. जे लोक आपल्या जवळच्या किंवा नातेवाईकांसोबत मिळून बिझनेस करत आहे त्यांना आज खूप विचार करून पाऊल ठेवण्याची आवश्यकता आहे अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. तुमच्या वेळीच मदत करण्यामुळे एखाद्याचे प्राण वाचतील. या बातमीमुळे तुमचे कुटुंबीय तुमचा अभिमान बाळगतील, प्रेरित होतील. लवमेट आज तुमच्या कडून कुठल्या गोष्टीची डिमांड करू शकतो परंतु, तुम्ही त्याला पूर्ण करू शकणार नाही ज्यामुळे तुमचा लवमेट तुमच्याशी नाराज होऊ शकतो. कोणत्याही संयुक्त व्यवसायात पडू नका, भागीदार आपला फायदा घेतील. तुमची विनोदबुद्धी तुमचा सर्वोत्कृष्ट गुणविशेष आहे. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत कदाचित बाहेर जाल आणि खूप चांगला वेळ एकमेकांसोबत घालवाल.
उपाय :- चांगल्या आर्थिक जीवनासाठी चांदीच्या हत्तीची स्थापना करा.
🙏🏼इति सुर्यार्पणमस्तु🙏🏼

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड: लॉयन्सचा डबा उपक्रमाच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार दि. 1 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता सर्व अन्नदाते आणि माध्यम प्रतिनिधींचा रयत रुग्णालय, सोमेश कॉलनी,नांदेड येथे सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रलचे अध्यक्ष लॉ. संजय अग्रवाल व प्रोजेक्ट चेअरमन धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.
रयत रुग्णालय येथे गेली दोन वर्ष लोकसहभागातून दररोज तीस डबे देण्यात आले.ज्या ज्या अन्नदात्यांनी लॉक डाऊन मध्ये तसेच रयत व श्रीगुरुजी रुग्णालयात डबे दिलेले आहेत त्यांचा लॉयन्सचे ज्येष्ठ पदाधिकारी सन्मान करणार आहेत.तसेच लॉयन्सचा डब्याची माहिती महाराष्ट्रभर देणाऱ्या माध्यम प्रतिनिधींचा देखील गौरव करण्यात येणार आहे.नूतन वर्षानिमित्त अल्पोहार ठेवण्यात आलेला आहे.वर्ष 2021 मध्ये रयत रुग्णालयात डबे देऊ इच्छिणाऱ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. दानशूर नागरिकांनी आपल्या परिवारातील सदस्यांच्या वाढदिवसानिमित्त अथवा दिवंगत नातेवाइकांच्या स्मरणार्थ एका दिवसाचे रुपये दीड हजार भरून नोंदणी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन झोनल चेअरमन लॉ. डॉ.विजय भारतीया, लॉयन्स सेंट्रलचे सचिव लॉ. उमेश मेगदे, कोषाध्यक्ष लॉ. सुनील साबू,लॉयन्स अन्नपूर्णाचे अध्यक्ष लॉ.नागेश शेट्टी,सचिव लॉ.धनराजसिंह ठाकूर, कोषाध्यक्ष लॉ.अनिल चिद्रावार व प्रोजेक्ट चेअरमन लॉ. राजेशसिंह ठाकूर यांनी केले आहे
पीडित बालिकेच्या कुटुंबियांना मनोधैर्य व दक्षता समिती योजनेमधून तात्काळ मदत करण्याचे जिल्हाधिकार्यांना दिले निर्देश बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) रायगड जिल्ह्यातील पेण मळेघरवाडी प्रकरणामध्ये आवश्यक ती चौकशी करून, जास्तीत जास्त पुरावे गोळा करून लवकरात लवकर परिपूर्ण आरोपपत्र दाखल केले जाईल, जेणेकरून आरोपीस जास्तीत जास्त कडक शिक्षा होईल, असे प्रतिपादन राज्याचे गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे केले. आज सकाळी त्यांनी पेण येथे पीडित बालिकेच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी गृह (ग्रामीण), वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई हे पीडित बालिकेच्या कुटुंबियांच्या घरी आले असता ते बोलत होते.
यावेळी आमदार महेंद्र दळवी, पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार,आदिवासी प्रकल्प अधिकारी श्रीमती अहिरराव,पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव,पेण तहसिलदार अरुणा जाधव उपस्थित होते.
यावेळी गृह (ग्रामीण), वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, पेण मळेघरवाडी येथील घटना ही निश्चितच अत्यंत दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणाचा तपास काटेकाेरपणे पूर्ण करुन लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविण्यात येणार असून या खटल्यासाठी प्रख्यात ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तर पीडितेच्या कुटुंबियांना या घटनेतून सावरण्यासाठी शासनाच्या मनोधैर्य याेजना व दक्षता समितीच्या माध्यमातून पीडित बालिकेच्या कुटुंबाला तात्काळ मदत करण्याचे त्याचबराेबर पीडित कुटुंबाच्या राहत्या घराची परिस्थिती पाहून ते घर शासनाच्या योजनेतून परिपूर्ण बांधून देण्याची आवश्यक ती कार्यवाही त्वरित करावी, असे त्यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना निर्देश दिले.


( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी:लक्ष्मण राजे )
जोगेश्वरी पूर्व येथील सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, वृत्तपत्रलेखक, पत्रकार व जॉय ऑफ गिविंग चे संस्थापक गणेश हिरवे सर यांनी २०२० या वर्षीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबर २०२० ला ३१ व्या वेळी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जपत थर्टीफर्स्ट एका वेळग्या पद्धतीने साजरा कसा करता येईल याचे उत्तम उदाहरण दाखवून दिले. आजकाल थर्टीफस्ट लोक अनेक प्रकारे साजरा करीत असतात,पण हा दिवस एका वेगळ्या कारणाने सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान करून साजरा करण्याचं भाग्य मला मिळाले अशी भावना हिरवे सरांनी बोलून दाखविली. तरुणाईने गणेश हिरवे सर यांचा आदर्श समोर ठेवून जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान करावे. विशेषत: याआधी देखील अनेक सामाजिक उपक्रम व कामे स्वतः सरांनी अग्रेसर राहून पदरमोड करत , तसेच आपल्या जॉय संस्थेच्या माध्यमातून केली आहेत. एक गुणी व्यक्तिमत्त्व म्हणून सरांना सर्वजण मुंबई व महाराष्ट्रात ओळखतात. लॉकडाउन काळातही हजारो गरजू, गोर-गरीब व वंचित कुटुंबीयांना किराणा समान,आरोग्य व स्वच्छता किट, मास्क, अल्पोपहार , सॅनिटायझर व इतर अनेक जीवनावश्यक वस्तू वितरण केल्या आहेत , त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल दिल्ली व महाराष्ट्रतील अनेक सामाजिक संस्थानी घेऊन त्यांना जवळपास ६३ कोविड योध्दा सन्मानपत्र देऊन गौरव केला. गणेश हिरवे सर अनेक संस्था व मंडळांवर सल्लागार व मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. यापुढेही आपण करीत असलेलं हे सामाजिक काम असच सुरू राहणार असल्याचे मनोगत गणेश हिरवे यांनी यानिमित्ताने व्यक्त केले.


राहुरी तालुका प्रतिनिधी ( जावेद शेख ), दि. 31 डिसेंबर, 2020
विद्यापीठाचे प्रक्षेत्र, मालमत्ता, कर्मचारी यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे आहे. विद्यापीठाचे प्रक्षेत्र मोठे असून प्रक्षेत्रावर अनुचीत प्रकार घडू नये, मालमत्तेचे, प्रक्षेत्राचे संरक्षण व्हावे, मोकाट जनावरांपासून प्रक्षेत्राचे संरक्षण व्हावे तसेच हिंस्त्र प्राण्यांपासून कर्मचार्यांचे संरक्षण व्हावे या हेतूने कृषि विद्यापीठाची सुरक्षा व्यवस्था बळकटीकरणाचे काम सुरु आहे. यासाठीच महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाचे (मेस्को) 15 माजी सैनिक कंत्राटी पध्दतीने घेण्यात आले आहे. विद्यापीठातील कायम आस्थापनेवरील, कंत्राटी पध्दतीचे सुरक्षा रक्षक आणि मेस्कोचे जवान यांच्या समन्वयाने विद्यापीठाच्या सुरक्षेचे नविन वर्षापासून चांगले काम सुरु करु या असे प्रतिपादन कुलसचिव श्री. मोहन वाघ यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ (मेस्को) यांचे मार्फत माजी सैनिक मधून एक सहाय्यक सुरक्षा अधिकारी व 14 सुरक्षा पर्यवेक्षक हे सुरक्षा व्यवस्था पाहणीसाठी कंत्राटी पध्दतीने घेण्यात आले. या सर्व जवानांना मार्गदर्शन करतांना कुलसचिव मोहन वाघ बोलत होते. यावेळी बैठकीला विद्यापीठाचे नियंत्रक श्री. विजय कोते, सहयोगी संशोधन संचालक डॉ. बाबासाहेब माळी, प्रभारी सुरक्षा अधिकारी प्रा. सुनिल फुलसावंगे व अहमदनगर येथील माजी सैनिक महामंडळाचे जिल्हा पर्यवेक्षक श्री. सखाराम गवळी, महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाचे सहा. सुरक्षा अधिकारी श्री. नंदु राऊत उपस्थित होते.
श्री. गवळी यांनी सर्व सुरक्षा कर्मचार्यांची उपस्थित मान्यवरांना ओळख करून दिली. कुलसचिव यांनी सर्व सुरक्षा कर्मचारी यांचे विद्यापीठामध्ये स्वागत केले. नियंत्रक श्री. विजय कोते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ. सुनिल फुलसावंगे म्हणाले विद्यापीठामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सर्वानी प्रयत्न करावेत. कार्यक्रमाचे सूचसंचालन व आभार डॉ. सुनिल फुलसावंगे यांनी मानले. यावेळी बियाणे विभागाचे डॉ. विवेकानंद कुलकर्णी, कामगार कल्याण विभागाचे श्री. सचिन पवार, सुधीर खेसम्हाळसकर आणि मेस्कोचे जवान उपस्थित होते.
सातारा तालुक्यात सर्वाधिक रूग्णवाढ
पाटण हिंदू सम्राट प्रतिनिधी उमेश सुतार यांजकडून
कराडसह आठ तालुक्यात एक अंकी रूग्णवाढ
जावली, पाटण तालुका निरंक
कोरेगांवला 8 तर माणला 7 बाधित
महाबळेश्वरला 3 बाधित
एकाही बाधिताचा मृत्यू नाही
नव्या वर्षाची चाहूल लागली असतानाच सरत्या वर्षात कराड, जावली, वाई, खंडाळा, कोरेगांव तालुक्यात कोरोना वाढीचा वेग मंदावला आहे. सातारा तालुक्यात वाढीचा वेग आणखी कमी होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. दरम्यान जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 75 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असलयाची अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यात 28 बाधित
सातारा 10, गुरुवार पेठ 1, शुक्रवार पेठ 4, सदरबझार 3, गडकर आळी 2,लोधावडी 1, पाटखळ 2, जिहे 1, देगाव रोड 1, अतित 1, आसनगाव 1, नुने 1,
कराड तालुक्यात 2 बाधित
विद्यानगर 1, कोयना वसाहत 1,
फलटण तालुक्यात 4 बाधित
ननवरे वस्ती 1, कोळकी 1, चव्हाणवाडी 1, साखरवाडी 1, मुरुम
खटाव तालुक्यात 7 बाधित
आबाचीवाडी 1, वडूज 1, खटाव 2, अंबवडे 2, निमसोड 1,
माण तालुक्यात 7 बाधित
वरकुटे मलवडी 1, म्हसवड 3, मार्डी 1, दहिवडी 1, गोंदवले बु 1,
कोरेगाव तालुक्यात 8 बाधित
कोरेगाव 1,एकसळ 1, वाठार किरोली 2, दुघी 1, रहिमतपूर 1, आदर्की 1, अंबवडे 1,
खंडाळा तालुक्यात 3 बाधित
धावरवाडी 1, शिरवळ 1, सांगवी
- वाई तालुक्यात 5 बाधित
पसरणी 2, व्याहळी 3 महाबळेश्वर तालुक्यात 3 बाधित
महाबळेश्वर 2, पाचगणी 1
इतर 3
अंधोरी 1, बेलवडे 1, तडवळे 1
बाहेरील जिल्ह्यातील 2
बारामती 2,
गुरूवारपर्यंत जिल्ह्यात
एकूण नमुने -285111
एकूण बाधित -54831
घरी सोडण्यात आलेले -51918
मृत्यू -1795
उपचारार्थ रुग्ण-1118
प्रतिनिधी.पोर्णिमा प्रकाश बुचके
दिनांक २९-१२-२०२० मुंबई यूनिवर्सिटी जे पी नायक भवन नेहरू युवा केंद्र एवं खेल मंत्रालय भारत सरकार आणि द ह्यूमन योगा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने फिट इंडिया कोविड-19 वॉरियर्स ज्या लोकांनी नागरीकांच्या सवेचे काम केले आहे, रात्र दिवस मेहनत केली आहे , लोकांना ध्यान्य वाटप करुन मदत केली आहे, अशा सर्व वारियर्स सर्टिफिकेट आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रम खुप धुमधाम झाला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री डॉ. योगेश दुबे आणि नॅशनल स्पीकर श्री.रत्नाकर आहिरे यांची प्रमुख भुमिका होती. समाजकार्य हे कोणत्या ही प्रकारचे अस हे कार्य करणाऱ्यांना आम्ही सम्मानित करणार आहे.
द ह्यूमन योगा फाउंडेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री योग गुरु राधे शाम जैसवार आणि मुंबई जिल्हा समन्वय डॉ. कविता श्रीवास्तव यांच्या कार्यलयात सुत्र संचालन खुप छान झाले.
कार्यक्रमात नाशिक , पुणे आणि मुंबई, या ठिकाणा वरुन आलेल्या सर्व पाहुण्यांन मुळे कार्यक्रमाला कार्यक्रम चांगला झाला. कार्यक्रमामध्ये अनेक प्रकारचे भाषण ऐकायला मिळाले. यामध्ये श्री रत्नाकर अहीरे यांचे भाषण खुप प्रभावी झाले. सर्व पाहुण्यांनी भाषण लक्षपुर्वक ऐकले. अरे यांनी नेहरू युवा केंद्रा मध्ये जो अनुभव आला तो सर्वोना सांगितला. त्यांनी आपल्या भाषणातुन सर्वांना मंत्रमुग्ध व प्रेरणा दायी ठरले त्यांना जो मेसेज द्यायचा होता तंदरुस्त भारत तो त्यांनी योग्य प्रकारे दिला.
कार्यक्रमात उपस्थित डॉ . जोशना अरुणा,डॉ.पाटील,डॉ. विश्वकर्मा, समाज सेविका श्रीमती शीला शर्मा , समाजसेविका सुरेखा तुकाराम भोसले, पत्रकार कमल कचर कर्डक.
पुणे येथील सुनिल ज्ञानदेव भोसले संपादक स्टार टि.व्ही.9 उपाध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ, पत्रकार.मराठवाडा केसरी हिंदुसम्राट.
निधी अनिल पवार नेहरू युवा केंद्र मुंबई (भारत सरकार, खेळ एव युवा मंत्रालय ) तर्फे राष्ट्रीय स्वयंसेवक म्हणून घाटकोपर ब्लॉक मध्ये कार्यरत आहोत.
स्नेहा उत्तम मडावी समाजसेवीका
चंद्रपुर,नरेंद्र चौधरी संपादक राजरंग टाइम्स धुळे जिल्हा.
द ह्यूमन योगा फाउंडेशन चे सर्व सदस्य संजय सिंह योगा टीचर ,सुयोग शेट्टी योगा टीचर, सुनील भारतीय योगा, टीचर अमित जैसवार योगा टीचर, खुशी गुप्ता योगा टीचर ,शिवम शर्मा योगा टीचर ,प्रीति सोनार योगा टीचर, नीलेश यादव योगा टीचर ,अजय योगा टीचर ,अर्चना जैसवार योगा टीचर,वॉलिंटर निलम हर्षदा यादव, शैलेश सरोज, प्रभात मिश्रा, राकेश जायस्वर, श्रीकांत बर्वे योगा टिचर डॉ. कल्पना, अतिरूद्ध त्रिपाठी, जया फांडिशन, सचिव सुमन त्रिपाठी जी डॉ. जोशी सर, डॉ. पाटील सर आणि नेहरू युवा केंद्र चे सर्व वॉलिंटियर यांनी कोविड-19 कालावधीत जोरदार मेहनत केली त्यामुळे खुप लोकांना मदत झाली. हे वॉरियर्स यांनी ज्यावेळी काम केले त्यावेळी लोक घराबाहेर फिरत अथवा निघत नव्हते.
द ह्यूमन योगा फाउंडेशन चे योग गुरु श्री राधेश्याम जायसवार यांनी द्वारा गेल्या 4 महिण्या पासुन झोपड़पट्टी मध्ये जाऊन लोकांना घरेलू उपचार सांगितले स्वःताच्या जीवाची पर्वा न करता योग गुरु या सर्व लोकांना जीवन जगण्याचे मार्ग योग्य प्रकारे योगा च्या माध्यम तुन सांगत होते.
आज हा कार्यक्रम त्यांचा समाप्त झाला आणि भारत सरकार ला मागणी केली कि त्यांच्या फाउंडेशन ला भारत सरकार ने मदद केली पाहिजे. इतके निस्वार्थ भावना ने काम करत आहे. त्यामुळे फाउंडेशन ला सर्वप्रथम दर्जा दिला पाहिजे.
भारत सरकार ला श्रीमती डॉक्टर कविता श्रीवास्तव नेहरू युवा केंद्र संघटना भारत सरकार चे जिल्हा समन्वय या पदावर ठेवून सर्व वॉलिंटियर यांना चांगल्या प्रकारे निर्देशन केले. आपले कर्तव्योंचे पालन केले. महाराष्ट्र में भाषांची अडचण होती. परंतु त्यांनी आपल्या सर्व समस्या लक्षात घेऊन. कविता श्रीवास्तव यांनी ज्या प्रकारे योग गुरु राधे श्याम आणि त्यांची टीम यांना मदत केली हे खुप कौतुका पात्र आहे.
नेहरू युवा केंद्र चे सर्व वॉलिंटियर मैडम चे सांगणे ऐकतात. व त्या प्रमाणे आपले कर्तव्योंचे पालन करतात त्यामुळे महाराष्ट्र आणि मुंबई मध्ये कोणत्याही प्रकार ची अडचण आली नाही. गेल्या सहा महिण्यांपासुन त्यांनी काम केले.
सर्वात चांगले काम वॉलिंटियर सरिता फांसी यांनी आपला जीवाची पर्वा न करता रियल कोरोना वैरीयस का चे काम केले.
योग गुरु राधे श्याम यांच्या निर्देशन नुसार योगा घरेलू उपचार कायम चांलु होते त्यामुळे महाराष्ट्र लोकांना संदेश मिळाला मास वापरा , योगा करा ,हात ग साबनाने कायम धुत रहा. हे योग गुरु यांनी लोकांना याविषयी मार्गदर्शन केले.
त्यामुळे महाराष्ट्र मध्ये मुंबई चे लोकांमध्ये कोविड चे प्रमाण कमी झाले.
नेहरू युवा केंद्र आणि क्रिडा मंत्रालय भारत सरकार चे सर्व अधिकारी यांनी मदत केली त्यामुळे लोक काम करत राहिले
सर्वात महत्वाचे नेहरू युवा केंद्र मुंबई जिल्ह्याचे सर्व अधिकारी सर्व काम सांगत स्वःता उपस्थित राहिले.
संजय जाधव, मालती मदन घोघटे ,सोनावने, मुंबई जिल्हा डायरेक्टर सर यांनी पण सर्व नेहरू युवा केंद्र चे अधिकारी यांना मदत करून हा कार्यक्रम कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत केली.
लोहा,प्रतिनिधी(शिवराज पवार)
राजभवन,मुंबई येथे राज्यपाल मा.भगतसिंघ कोश्यारी व महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी २९ डिसेंबर २०२० रोजी भेट घेतली त्यात औरंगाबाद पदवीधर निवडणूकीत झालेली मतपत्रिकांची हेराफेरी,संगणकपरिचालकांना आय टी महामंडळाकडून नियुक्ती देणे,बेरोजगार पदवीधरासाठी पदवीधर महामंडळ स्थापन करणे,विना अनुदानित शिक्षक,जुनी पेन्शन योजना,तासिका तत्वावरील प्राध्यापक,उमेद योजना,कंत्राटी कर्मचारी,शासकीय नौकर भरती करणे यासह अनेक विषयांचे निवेदन देऊन व्यापक व सविस्तर चर्चा केली,झालेल्या चर्चेनुसार राज्यपाल महोदय कारवाई करतील असे सिद्धेश्वर मुंडे म्हणाले.यावेळी शिष्टमंडळात मयूर कांबळे,विजयानंद येडेकर,संग्राम डिकळे व ज्ञानेश्वर सूर्यवंशी उपस्थित होते.
याबाबत सविस्तर वृत्त की,नुकत्याच औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडली,त्यात मतपत्रिकांची हेराफेरी झाल्याचा आक्षेप सिद्धेश्वर मुंडेसह अन्य ५ उमेदवारांनी घेतला होता.त्याबाबतची तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे केली असून या विषयासह इत्तर विषयाचे निवेदन देऊन चर्चा करण्यासाठी राज्यपाल मा.भगतसिंघ कोश्यारी यांच्याकडे वेळ मागितला होता त्यानुसार २९ डिसेंबर २०२० रोजी त्यांनी दिलेल्या वेळेनुसार महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी शिष्टमंडळासोबत राज्यपाल महोदयांची भेट घेतली.त्यात औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात कशा प्रकारे मतपत्रिकांची हेराफेरी केली त्याची लेखी कागदपत्रांच्या पुराव्यानिशी निवेदन देऊन माहिती दिली व मा.राज्य निवडणूक आयोगाला सत्यता पडताळण्याचे आदेश देण्याची विनंती केली. त्याचबरोबर संग्राम व आपले सरकार प्रकल्पात मागील १० वर्षापासून काम करणार्या संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळात घेण्याचे आश्वासन राज्य सरकारने देऊन सुद्धा किमान वेतन व कर्मचारी दर्जा दिला नाही,त्याबाबत राज्य शासनाला आदेश द्यावेत तसेच आपले सरकार प्रकल्पात csc –spv या कंपनीने कोट्यावधींचा भ्रष्टाचार केला असून त्या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली.
या प्रश्नाबरोबर राज्यातील सुमारे ४०००० विनाअनुदानित शिक्षकांना प्रचलित नियमांनुसार १३ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयानुसार १ एप्रिल २०१९ पासून अनुदान देणे,अघोषित शाळांना घोषित करणे महत्वाचे असून अनेक विनाअनुदानित शाळेच्या शिक्षकांनी आत्महत्या केल्याची बाब राज्यपाल महोद्यांच्या निदर्शनास आणली व याबाबत तातडीने निर्णय घेण्याबाबत राज्य शासनाला आदेश देण्याची मागणी केली.त्याचबरोबर राज्यात तासिका तत्वावरील सुमारे ३५००० प्राध्यापक असून त्यांना कोरोना काळापासून नियुक्ती देण्यात आलेली नाही तसेच इत्तर राज्यात ११ महिन्याच्या मानधन तत्वावर त्यांची नियुक्ती असून आपले राज्य सधन असताना असा अन्याय का यासह २००५ नंतर नियुक्ती देण्यात आलेल्या राज्यातील शिक्षक,प्राध्यापक,शासकीय कर्मचारी व अधिकारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे,कंत्राटी व उमेद कर्मचारी यांची नियुक्ती csc –spv कंपनी सारख्या बाहय यंत्रणे कडून न करणे,राज्यात अनेक वर्षापासून शासकीय नौकर भरती केली नसून बेरोजगार पदवीधर/पदविका धारक यांना दिलासा देण्यासाठी नौकर भरती करणे यासह सर्व विषयांचे निवेदन दिले व राज्य शासनाला आदेश देण्याची मागणी केली.
पदवीधरांसाठी पदवीधर महामंडळ स्थापन करण्याची मागणी
राज्यात सुमारे २ कोटीच्या वर बेरोजगार पदवीधर असून बेरोजगार पदवीधर/पदविकाधारकां साठी एकीकडे शासकीय नौकर भरती नाही तर दुसरीकडे राज्य शासनाची कुठलीही योजना नाही,तसेच कुठला उद्योग–व्यवसाय नाही.पदवीधराना शासनाचा कोणत्याही प्रकारचा आधार नाही म्हणून राज्यातील अनेक युवक – युवतींनी वैतागून आत्महत्या केल्या आहेत.पदवीधर म्हणजे या राज्याचे व देशाचे उद्याचे भविष्य आहे आणि कुटुंबातील तरुण व्यक्ती निराशेपोटी जीवन संपवत असतील तर राज्य शासन गप्प का? त्यासाठी राज्य शासनाने पदवीधरांच्या विकासासाठी पदवीधर महामंडळाची स्थापना करावी व त्या अंतर्गत राज्यातील पदवीधरांच्या विकासासाठी व्यापक योजना आखून पदवीधराना सक्षम बाववावे,यासाठी राज्य शासनाला मा.राज्यपाल महोदयांनी निर्देश द्यावेत अशी मागणी प्रत्यक्ष निवेदन देऊन सिद्धेश्वर मुंडे यांनी केली आहे.यावेळी शिष्टमंडळात मयूर कांबळे,विजयानंद येडेकर,संग्राम डिकळे व ज्ञानेश्वर सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
तालुका प्रतिनिधी भोकर दत्ता बोईनवाड
ता.भोकर ग्रामपंचायतीच्या निवडणुका चुरशीच्या होत आहेत.परंतू प्रस्थापित पँनाल प्रमुख श्रीमंतीच्या जोरावर आपल्या मर्जीतल्या गुलामा प्रमाणे वागणाऱ्या नागरिकांना निवडणूकीत उभे करून मताची खरेदी करून निवडणूक जिंकल्यानंतर कारभार मात्र स्वतःचालवतो तेव्हा निवडून आलेल्या सरपंच,उपसरपंचानी कुणाचे बाहुले न बनता स्वतः कारभारी बनन्याचे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे नेते नामदेव आयलवाड यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
ओबीसी नेते नामदेव आयलवाड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की पूर्वी राजा रूढीपंरमपरे नुसार घराणेशाहीतूंन जन्माला येत असे परंतु आता भारतीय संविधानाने दिलेल्या मताचा अधिकारामुळे व लोकशाही स्वातंत्र्यामुळे तमाम वंचित घटकांना आपला राजा निवडण्याचा अधिकार आहे.म्हणून तमाम ओबीसी एससी एसटी भटक्या समाजाचे लोकप्रतिनिधी सतेत निवडून जात असतांना प्रस्थापित मंडळी ग्रामपंचायतचा कारभार आपल्याच हातात रहावा म्हणून श्रीमंतीच्या जोरावर गरीब बहुजन समाजातील मागासवर्गीय सरपंच, उपसरपंच यांचा अधिकार हिरावून स्वताच कारभार चालवतात आणि आपल्या मर्जीप्रमाणे वापर करून त्यांना सह्याजीरावा पुरते बैलोबा सारखा वागणूक देत ग्रामपंचायतीचा कारभार आपणच चालवत असतात हे कुठेतरी थांबले पाहिजे निवडूण आलेल्या सर्व वंचित बहुजन घटकातील सरपंच उपसरपंचानी कुणाच्या हातचे बाहुले न रहाता आपल्या अधिकाराचा वापर स्वतः संविधानाने दिलेल्या अधिकारानूसार चालवून गावच्या विकासासाठी काम करावे सत्तेतून पैसा पैशातून सत्ता मिळवू पहाणाऱ्या भ्रष्टाचाऱ्या पासून सावध रहावून स्वाभिमानाने गावचा कारभार चालवण्याचे आवाहन आयलवाड यांनी केले आहे.


काम होऊन महिना होत नाही तोच खडी बाहेर येऊ लागली
इम्तिहाज मुलाणी :
इंदापूर (प्रतिनिधी):
इंदापूर तालुक्यातील रेडणी – बोराटवाडी रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत एक ते दोन महिने होत नाही तोच रस्त्याची खडी बाहेर येऊ लागल्याने रस्ता किती दिवस टिकणार असा प्रश्न ग्रामस्थांन पुढे उभा राहिला आहे ? सदरील रस्ता अत्यंत वर्दळीचा असून या मार्गाने शेकडो वाहनांची ये-जा सुरू असते त्यामुळे हा रस्ता मजबूत होणे आवश्यक होते. परंतु हा रस्ता निकृष्ट दर्जाचा बनवल्या कारणाने महिन्या दोन महिन्यातच रस्त्याला खड्डे पडू लागले आहेत. त्यामुळे हा रस्ता किती दिवस तघ धरणार हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे. रस्ताचे काम करणारे ठेकेदार डांबरीकरणासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरतात. कामाची कुठलेही माहिती नसताना ठेकेदार मंडळी किती वापरावे हे ठरवत असतात.त्यामुळे सातत्याने निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण पुन्हा पुन्हा त्याच रस्त्यावर केले जाते. यात शासनाचा पैसा वाया जातो असे प्रकार रोखण्यासाठी निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अनेक सामाजिक कार्यकर्ते व रेडणी - बोराटवाडी गावातील ग्रामस्थांनी केली आहे. बराच वेळी नागरिकांनी कामाचा दर्जा लक्षात आणून दिल्यानंतरच सदरील विभागाचे अधिकारी तेथे धाव घेतात.सदरील रस्त्यावरून ये-जा करणार्या नागरिकांना असा मनस्ताप देण्यापेक्षा सदरील प्रशासनाने अगोदरच कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यावे. अशी देखील मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
संबंधित रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई न झाल्यास सामाजिक कार्यकर्ते व भटक्या विमुक्त जाती-जमाती महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तानाजी धोत्रे यांनी सदरील विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे.

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी:लक्ष्मण राजे )
अहमदाबाद किंगस्टार स्पोर्ट्स ग्राऊंड
अहमदाबाद येथे नुकतेच 7A साईड फुटबॉल लीग आयोजित करण्यात आली होती. १५ ते १७ वयोगटातील
या टुर्नामेंट मध्ये अहमदाबाद, सुरत, राजकोट आणि वडोदरा येथून
जवळजवळ १२ संघांनी सहभाग दर्शवला.
यामध्ये मुंबईची फूटी फर्स्ट टीम आणि कॉसमॉसच्या फुटबॉल संघात अंतिम सामना झाला. संपुर्ण स्पर्धेत फूटी फर्स्टच्या संघाने आपले वर्चस्व कायम ठेवले. आणि गोल करण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण कॉसमॉस संघाचा गोलरक्षक मानस याने तो गोल रोखला आणि संघाला पराभवापासून वाचवून पेनल्टी शूटआऊटसाठी नेले आणि कॉसमॉस संघाने पेनल्टी शूटमध्ये फूटी फर्स्ट संघाचा पराभव केला. प्रशिक्षक तुषार सर आणि चौहान सर यांनी आपल्या संघाला चांगले प्रशिक्षण दिले जेणेकरुन फूटी फर्स्ट संघाने अंतिम फेरी गाठली. कॉसमॉस टीम अहमदाबादचे प्रशिक्षक मयूर आणि गोल्डी सायनी यांनी आपल्या संघाला अंतिम फेरीत आणण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि कॉसमॉस संघ अंतिम विजेता ठरला. या महत्त्वपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट गोलकीपर मानस, उत्कृष्ट खेळाडू ब्रिज शहा आणि संपुर्ण संघातील उत्कृष्ट खेळाडू म्हणुन क्रिश चौहान यांना गौरविण्यात आले. क्रिश संपूर्ण स्पर्धेत एक अतिशय लोकप्रिय खेळाडू असल्याचे सिद्ध झाले. उपस्थित मान्यवरांनी त्याचे खुप कौतुक केले आणि तो पुढे जाऊन भारतीय संघाकडून खेळू शकेल, अशी ग्वाही दिली. किंग स्टार स्पोर्ट्स अकॅडमीचे हितेंद्र वाघेला म्हणाले की आम्ही जगद्विख्यात फुटबॉलपटू दिएगो मेरोडनाच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आयोजीत केली. त्यामुळे आम्हाला त्यांना श्रद्धांजली वाहण्याची संधी मिळाली आणि त्यासाठी आम्हाला मुंबईतील फूटी फर्स्ट टीमचे प्रशिक्षक चौहान सर आणि टूर्नामेंटच्या सर्व सदस्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.अशी माहिती महेश्वर भिकाजी तेटांबे यांनी दिली.
विरेंद्र म्हात्रे नवी मुंबई प्रतिनिधी : उद्यानांची नियमित स्वच्छता आणि देखभाल तसेच तातडीने आवश्यक दुरूस्ती या महत्वाच्या बाबींची दक्षता घेत उद्यान सहाय्यकांनी आपापल्या क्षेत्रातील उद्यानांची स्थिती सुधारण्याकडे बारकाईने लक्ष द्यावे, त्यासाठी दररोज उद्यानांना भेटी द्याव्यात व आवश्यक सुधारणा करून घ्याव्यात असे निर्देश देत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी यापुढील काळात उद्यानांची स्थिती पाहण्यासाठी कुठेही अचानक भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करणार असून कामात निष्काळजीपणा आढळल्यास जबाबदारी निश्चित करण्यात येईल असे स्पष्ट संकेत दिले.
उद्यान विभागाच्या १६ डिसेंबर रोजीच्या बैठकीत दिलेल्या निर्देशांचा आढावा घेताना प्रत्येक ठिकाणची आधीची व आत्ताची छायाचित्रे पाहून आयुक्तांनी सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती जाणून घेतली. या आढावा बैठकीस अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, उद्यान उप आयुक्त मनोज महाले, उद्यान सहाय्यक आयुक्त अनंत जाधव तसेच सर्व विभागांचे उद्यान सहाय्यक उपस्थित होते.
प्रत्येक काम करताना आपले त्या कामाशी असलेल्या उत्तरदायित्वाची जाणीव ठेवली पाहिजे. उद्यानांची स्वच्छता व देखभाल दुरुस्ती तत्परतेने झालीच पाहीजे अशाप्रकारे काम करावे अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. लेखी अथवा सोशल मिडीयावरून प्राप्त झालेल्या तक्रारींचे निवारण २४ तासापेक्षा कमी वेळेत झालेच पाहिजे व तक्रार प्राप्त झाल्यानंतर १ तासात त्याठिकाणी पोहचलेच पाहिजे असे कडक निर्देशही त्यांनी दिले.
कंत्राटदाराकडून व त्याच्या कामगांराकडून काम करून घेणे ही आपली जबाबदारी आहे असे उद्यान सहाय्यकांना सूचित करण्यात आले. सध्या उद्यानाच्या कामासाठी उपयोगात असलेल्या ॲपमध्ये उद्यान सहाय्यकाने दाखल केलेल्या तक्रारींबाबत कंत्राटदाराकडून तक्रार निवारण झाले नसले तरी निवारण केल्याचे दाखविले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. ही नोंद चुकीची असल्याचे नमूद करण्याचा पर्याय ॲपवर उपलब्ध असणे आवश्यक आहे. तशा प्रकारचा बदल ॲपमध्ये करून घेण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले.
आपल्या उद्यानांना पूर्वीपेक्षा अधिक आकर्षकता प्राप्त करून देणे हे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवून काम करताना उद्यानांची केवळ नियमित देखभाल व दुरुस्ती यापुढे जात उद्यानातील हिरवळ, झाडे आवश्यकतेनुसार पुनर्जिवित करण्यावर भर द्यावा अशाही सूचना आयुक्तांनी केल्या. सध्या बंद असलेल्या उद्यानांचा आढावा घेऊन ती कार्यान्वित करण्यासाठी नियोजन करावे तसेच महापालिका क्षेत्रातील सर्व उद्यानांची वेळ समान असावी व ती ठळकपणे प्रदर्शित करावी असे आयुक्तांनी सूचित केले.
जास्त वर्दळ असणाऱ्या उद्यानांकडे विशेष लक्ष द्यावे असे निर्देश देत उद्यानांप्रमाणेच शहरातील सुशोभित जागा, चौक यांच्याही सुशोभिकरणाकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यामध्ये विशेषत्वाने चौकांमध्ये लावण्यात आलेली वृक्षरोपे, फुलझाडे यांची सलगता मधली काही फुलझाडे नसली तर खंडीत झाल्यासारखी विशोभित दिसते. त्याठिकाणी तशीच वृक्षरोपे लावून गॅप फिलींग करून शोभा वाढविण्यावर भर देण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या. उद्यान उप आयुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांनीही विविध उद्यानांना दररोज भेटी द्याव्यात आणि त्यांचे स्वरुप चांगले होण्यासाठी सूचना कराव्यात तसेच सूचनांच्या पूर्ततेवर बारकाईने लक्ष द्यावे असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले, उद्याने ही शहराचे वैभव असल्याने उद्यान विभागातील प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी ओळखून झोकून देऊन काम करावे व उद्यानांच्या स्थितीत आमुलाग्र सुधारणा घडवून आणावी असे आयुक्त अभिजीत बांगर यांनी सूचित केले.
श्रीगोंदा ( हिंदू सम्राट शिरसगाव बोडखा प्रतिनिधी आदेश उबाळे यांच्याकडून )
श्रीगोंदा – डोळ्यांचे महत्व द्रुष्टी नसलेल्या व्यक्तीला समजते , द्रुष्टी असेल तरच स्रूष्टी आहे. द्रुष्टीहिनांना ही द्रुष्टी दाखवण्यासाठी ग्रामिण भागात शिवनेरी प्रतिष्ठान च्या माध्यमातून सुरु करण्यात आलेले मोफत नेत्र तपासणी व अल्प दरातील मोतीबिंदू शिबिराचे कार्य अत्यंत कौतुकास्पद असून कोरेगव्हाण सारख्या ग्रामिण भागात या नेत्र तपासणी शिबिरांची अत्यंत गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदे च्या मा. सभापती अँड. कमल सावंत यांनी केले.
आनंद ऋषिजी नेत्रालय व फिनिक्स सोशल फाऊंडेशन अहमदनगर आणि शिवनेरी प्रतिष्ठान कोरेगव्हाण यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगव्हाण येथे रविवार , दिनांक 27 डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात मोतीबिंदू शस्रक्रिया शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अँड. कमल सावंत बोलत होत्या. यावेळी या कार्यक्रमास मा. जिल्हा परिषद सदस्य दिनकर पंधरकर , मा. पंचायत समिती सदस्य महेंद्र वाखारे , उद्योजक अतुल लोखंडे , फिनिक्स फाऊंडेशन चे अध्यक्ष जालिंदर बोरूडे , आनंद ऋषिजी नेत्रालय अहमदनगर चे डॉ. संजय शिंदे , आर्यन कराळे, किरण कवडे , सहाय्यक स्वप्नील गव्हाणे , कोरेगव्हाण चे मा. सरपंच संतोष नरोडे , मा. सरपंच संपत इधाटे , मा. सरपंच महादेव नरोडे , मा. सरपंच गणेश आढाव , क्रुषि उत्पन्न बाजार समितीचे मा. संचालक अप्पा आढाव , सामाजिक कार्यकर्ते रामदास लोंढे , विसापूर चे सरपंच अरविंद जठार , सारोळा सोमवंशी चे मा. उप सरपंच दत्तात्रय नवले , युवा उद्योजक राहुल आढाव , माहिती आधिकार कार्यकर्ता समिती चे जिल्हाध्यक्ष सोमनाथ नवले व श्रीगोंदा तालुकाध्यक्ष बाळासाहेब नवले , भारतीय जनता पार्टी चे प्रवीण मापारे , तंटामुक्त समिती चे जगन्नाथ कातोरे , गोरक्ष बारगुजे , कोंडेगव्हाणच्या मा. सरपंच बेबीताई मगर , निंबवी च्या मा. सरपंच सुरेखा शिर्के , कोरेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक रमजान सय्यद , कवी संदीप बोरगे , सामाजिक कार्यकर्ते सदाशिव गोंटे , सुदाम आढाव व शिवनेरी प्रतिष्ठान चे अध्यक्ष जितेंद्र आढाव आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात शिवनेरी प्रतिष्ठान चे अध्यक्ष जितेंद्र आढाव यांनी समाजातील गोरगरीब , शेतकरी , कष्टकरी , मजूर महिलांसह आर्थिक दुर्बल घटकातील द्रुष्टी दोष असलेल्यांसाठी शिवनेरी प्रतिष्ठान च्या वतीने हॆ शिबिर घेतले जात असून या भागातील नागरिकांनी या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले. कोरेगव्हाण गावातील विठ्ठल रुख्मीनी मंदिरात घेण्यात आलेल्या या शिबिरात तब्बल अडीचशे रुग्णांची तपासणी करण्यात आली त्याचबरोबर पंचे चाळीस रुग्णांवर अल्प दरात मोतीबिंदू शस्रक्रिया केली जाणार आहे. या शिबिरासाठी कोरेगव्हाण , सारोळा सोमवंशी , निंबवी , कडूस , हिंगणी , कोंडेगव्हाण , विसापूर , पाडळी , पिंपळगाव पिसा , चांभुर्डि , सुरेगाव , मुंगुसगाव आदी गावातील नागरिकांसह महिलांनी हजेरी लावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते देवराम उदार यांनी केले. आभार युवा नेते ईश्वर आढाव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोरेगव्हाण मा. उपसरपंच निजाम सय्यद , युवा उद्योजक शरद नरोडे , मच्छिंद्र गोंटे , सोपाना आढाव गुरुजी , युवा नेते विजय आढाव , कोरेगव्हाण सोसायटी अध्यक्ष रामदास ईधाटे , संतोष गोंटे , नंदकुमार गोंटे , गणेश ईधाटे , संतोष आढाव , अशोक विटेकर व शिवनेरी प्रतिष्ठान च्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
➖➖➖➖➖➖➖➖➖
( फोटो ओळ – कोरेगव्हाण येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन करतांना जि. प. च्या मा. सभापती अँड. कमल सावंत , मा. जि. प. सदस्य दिनकर पंधरकर , मा. पं. स. सदस्य महेंद्र वाखारे , फिनिक्स चे अध्यक्ष जालिंदर बोरूडे तसेच शिवनेरी प्रतिष्ठान चे अध्यक्ष जितेंद्र आढाव व आदी.
सातारा,खंडाळा तालुका प्रतिनिधी/ मंगेश माने
लोणंद -ता.खंडाळा येथील श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपच्या वतीने महाराष्ट्राचे एव्हरेस्ट कळसुबाई शिखरावर तिरंग्यातुन महाराष्ट्राचा नकाशा साकारत शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली होती.तसेच मालवण – तारकर्लीच्या अरबी समुद्रात ३२१ फुट तिरंगा फडकावित विजय दिवस साजरा करण्यात आला होता.या दोन्ही उपक्रमाने लोणंदचे नाव हे चांगले प्रकाशझोतात आलेले आहे.या ग्रुपने ऐतिहासिक अशीच कामगिरी केल्याने ग्रुपवर कौतुकांचा वर्षाव होतो आहे.
यांमध्ये सहभागी झालेल्या भैरवनाथ डॉगर ग्रुपच्या सर्व सदस्यांचा सन्मान व कौतुक सोहळा हा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत असताना यावेळी अॅड.बाळासाहेब बागवान,माजी समाजकल्याण सभापती आनंदराव शेळके पाटील, मुख्याधिकारी हेमंत ढोकले, सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी,
नगराध्यक्ष सचिन शेळके-पाटील,विरोधी पक्षनेते राजेंद्र डोईफोडे,माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव शेळके-पाटील
नगरसेवक हणमंतराव शेळके पाटील,नगरसेवक विकास केदारी, डॉ.मकरंद डोंबाळे, रमेश अण्णा कर्णवर,
सुरेश जाडकर, भिकू दादा कुरणे, राहुल घाडगे,शामसुंदर डोईफोडे, रवींद्र क्षीरसागर ,विश्वासराव शिरतोडे,
डॉ.नितीन सावंत, विश्वनाथ शानभाग, प्रवीण चांदवडकर
डॉ.देशमुखे, विठ्ठल टेंगळे, लोणंद फौंडेशनचे अध्यक्ष
दयानंद खरात, विनय रावखंडे, मस्कु अण्णा शेळके पाटील, साथ प्रतिष्ठाणचे अध्यक्ष कय्युम मुल्ला,
संतोष जाधव, भगवान घाडगे,भरत बोडके,दीपक बाटे
सुनील शहा आदींसह इतर मान्यवर व डोंगर मॉर्निंग ग्रुपचे सदस्य, लोणंद रनर्स ग्रुप सदस्य तसेच सातारा
सॅटरडे ट्रेकरर्सचे सदस्य उपस्थित होते.
डोंगर ग्रुपच्या उपक्रमाचे विशेष कौतुक करताना सपोनि संतोष चौधरी यांनी भैरवनाथ डोंगर ग्रुपची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.डोंगरावर वृक्ष संवर्धन करण्याचा मानस ग्रुपकडुन चांगल्या प्रकारे जपला जात आहे.डोंगर ग्रुपच्या वतीने डोंगरावर झाडे लावली जात आहेत.परंतु काही विघ्नसंतोषी लोकांकडून चुकीचे प्रकार केले जात आहेत.वणवा लावण्याचे प्रकार थांबले पाहिजेत.अशा प्रतिक्रिया यावेळी देण्यात आल्या.उपक्रमात सहभागी असलेले लहानांपासून ते मोठ्यांपर्यंतच्या तसेच वैयक्तिक रित्या विशेष कामगिरी पार पाडलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.यावेळी काही मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.यावेळी ग्रुप सह ग्रुपचे संस्थापक शशिकांत जाधव आणि ज्यांच्या संकल्पनेतून हे उपक्रम पार पडले ते एव्हरेस्टवीर प्राजित परदेशी यांचे ही विशेष कौतुक करण्यात आले.तसेच शंभूराज भोसले, तानाजीराव धायगुडे, डॉ.अविनाश शेळके,संभव शहा यांनी मोहिमेतील स्वतःचे अनुभव सांगितले.यावेळी सन्मान सोहळ्याचे प्रास्ताविक हेमंत निंबाळकर यांनी केले.सूत्रसंचालन राजेंद्र काकडे आणि हनुमंत बोराटे यांनी केले.तर आभार प्रदर्शन संदीप शेळके यांनी मानले.
विरेंद्र म्हात्रे नवी मुंबई प्रतिनिधी-
श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट, जुईनगर,येथे ट्रस्ट चे संस्थापक/अध्यक्ष श्री.संतोष सुतार दादा यांच्या ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ दिनदर्शिका-२०२१ चे प्रकाशन ह.भ.प श्री. हरीश्चंद्र सुतार(दत्त संप्रदाय), श्री.अशोक ठाकुर, श्री.नाना काका, ह.भ.प श्री.मुरलीधर गावडे, ट्रस्ट चे सचिव श्री.प्रदिप पाटील सर, कार्यध्यक्ष श्री .गोविंद साटम व श्री.अशोक मोहीते ह्या मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रकाशीत करण्यात आले.