Categories
नांदेड

लोकाभिमुख प्रशासनासाठी कार्यालय प्रमुखांची तत्परता आवश्यक..विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि. 7. सर्वसामान्य जनतेची कामे प्रशासन स्तरावर त्वरित मार्गी लागण्यासाठी शासकिय यंत्रणेने सदैव तत्पर असले पाहिजे. विशेषत:ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांबाबत अधिक जागरुकता बाळगून त्यांच्याशी निगडित असलेल्या प्रश्नांचा त्वरित निपटारा झाला पाहिजे.अशी अपेक्षा विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी व्यक्त केली.नांदेड जिल्ह्यातील विविध शासकिय योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन आढावा घेतला.या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वर्षा ठाकुर यांनी याबाबत सादरीकरण केले.

अवैध रेतीचे उत्खनन व यात होणारे गैर व्यवहार हे केवळ महसूल विभागापुरते मर्यादित नाहीत तर पर्यावरणाच्यादृष्टिनेही हा प्रश्न अत्यंत कळीचा बनला आहे.चांगल्या पर्यावरणासाठी उपलब्ध असलेली नैसर्गिक संशाधने ही तेवढ्याच काळजीने जपत यात नियमाप्रमाणे ज्याबाबी अंतर्भूत केल्या आहेत त्याचे काटेकोरपणे पालन करुन नांदेड जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या मोहिमेची माहिती जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दिली.

अवैध रेती वाहतूक रोखण्यासाठी,रेती वाहतूक करता येऊ शकणाऱ्या अथवा तशी क्षमता असणाऱ्या प्रत्येक वाहनांना जीपीएस बसवून व याचबरोबर ज्या-ज्या ठिकाणी रेतीचे घाट आहेत त्या सर्व ठिकाणी जीपीएसचे फेन्सिंग बसवून कसा आळा घालता येऊ शकेल याबाबत जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी सादरीकरण केले.या प्रस्तावावरही बैठकीत चर्चा करण्यात आली.परिवहन विभागाशी समन्वय साधून सदर बाब अनिवार्य कशी होईल याचा पाठपुरावा करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी देवून या मोहिमेबद्दल समाधान व्यक्त केले.

प्लॉस्टिक कॅरिबॅग व इतर अनावश्यक निसर्गाला हानी पोहचविणाऱ्या वस्तुंच्या वापरावर बंदी,स्वच्छ शहर आणि खुले क्रिडांगण ही प्रत्येक शहरासाठी आवश्यक आहे.याचबरोबर आरटीपीसीआर चाचण्या कमी होता कामा नयेत.कोविड-19 चे अजूनही समूळ उच्चाटन झालेले नाही हे कायम लक्षात ठेवून त्याबाबत समाजात अधिकाधिक जनजागृतीवर भर देण्याबाबतही त्यांनी सांगितले.प्रशासनासमवेत जनतेचा सकारात्मक सहभाग घेऊन चांगल्या वातावरण निर्मितीसाठीही प्रशासकिय यंत्रणांनी काम करणे अभिप्रेत असून जिल्हा परिषदेमार्फत विविध उपाययोजना व विकास कामांच्या प्रगतीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.नांदेड जिल्ह्यातील जैवविविधता जपणे व त्याचे संगोपन करणे हे आवश्यक आहे.वन विभागात जनावरांसाठी पानवठे तयार करणे,जंगली जनावरांचे संवर्धन याबाबतही विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी सूचना दिल्या.

Categories
नांदेड

बरबडा अंतरगाव रुई रस्त्याचे काम चालू करा : विक्रम पाटील बामणीकर

यांची अधीक्षक अभियंत्याकडे मागणी

नायगाव प्रतिनिधी अंकुश कुमार देगावंकर
नायगाव तालुक्यातील अत्यंत वर्दळीचा रस्ता असलेला बरबडा अंतरगाव रुई या रस्त्याच्या कामाची सुरुवात एक वर्षा अगोदर करण्यात आली वर्षभरात फक्त रस्ता सर्वत्र खोदून ठेवून रस्त्याच्या बाजूला गिटीचे ठिका ठिकाणी ढगारे टाकण्यात आले पण रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात न झाल्यामुळे रस्त्यावरून प्रवास करण्यास नागरिकांना अत्यंत अडचणीचा सामना करून आपला जीव मोठी मध्ये धरून या रस्त्यावरून प्रवास करण्याची वेळ या परिसरातील नागरिकांना आली आहे त्यातच आता शाळेला सुरुवात झाल्यामुळे विद्यार्थ्यांना देखील पायी चालणे कठीण झाले आहे कारण रस्त्याच्या बाजूला गिटिचे ढिगारे फोडून ठेवल्यामुळे व संपूर्ण रस्ता खोदून ठेवण्यात आलेला आहे याकडे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग मंडळ लक्ष देत नसल्यामुळे गुत्तेदाराची मनमानी कारभार चालत असल्याचे दिसून येत आहे त्यासाठी शिवराज्य युवा संघटनेच्या वतीने अधीक्षक अभियंता साहेब सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेड यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे बरबडा अंतरगाव रुई या रस्त्याच्या कामाची तात्काळ सुरुवात करण्यात यावी व या रस्त्याचे काम लवकरात पूर्ण करण्यात यावे अन्यथा शिवराज्य युवा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा विक्रम पाटील बामणीकर जिल्हा प्रमुख यांनी दिला आहे अंतरगाव मनुर इज्जतगाव या परिसरातील जनतेला रस्त्या अभावी मरण यातना सोसाव्या लागत आहेत गेल्या पंधरा वर्षापासून बरबडा अंतरगाव रुई हा रस्ता अत्यंत खराब व रस्त्याची दयनीय अवस्था झाली असल्यामुळे प्रत्यक्षात रस्त्याचे काम चालू झाल्यामुळे या परिसरातील जनतेच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद दिसत होता पण गेल्या एक वर्षभरापासून या रस्त्यावर फक्त गिट्टी फोडून ठेवण्यात आली आहे व रस्तादेखील खोदून ठेवण्यात आला आहे पण पुढे काम चालू करण्यात आले नसल्यामुळे या परिसरातील नागरिकांना पुन्हा एकदा रस्त्या अभावी मरण यातना सोसण्याची वेळ आली आहे त्यामुळे या भागातील एकांदा पेशंट जर बीमार असेल तर त्यांना वेळेवर दवाखान्यात देखील पोहोचता येत नाही एवढा खराब रस्ता झाला असल्यामुळे या रस्त्यावरून दोन चाकी वाहन देखील चालवणे म्हणजे तारेवरची कसरत व जीव मुठीत घेऊन या रस्त्यावरून प्रवास करावे लागत आहे त्यासाठी हा रस्ता तात्काळ व रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात यावी अन्यथा शिवराज्य युवा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे निवेदन अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ नांदेड यांना देण्यात आले आहे दिलेल्या निवेदनावर विक्रम पाटील बामणीकर जिल्हाप्रमुख नांदेड भाऊसाहेब पाटील चव्हाण तालुकाप्रमुख नायगाव यांच्या स्वाक्षर्‍या आहेत

Categories
नांदेड

कृष्णुर एम आयडीसीतिल कंपन्यांच्या दुर्गंधियुक्त पाण्याच्या विरोध्दात न्यायालयात याचिका दाखल करणार :देविदास जेटेवाड

ःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःः
नायगाव प्रतिनिधी ः अंकुश कुमार देगाकर नायगाव तालुक्यातिल कृष्णुर येथिल पंचतारांकित औध्योगिक वसाहतितील कंपन्यामधुन गेल्या आनेक दिवसापासुन सोडल्या जात असलेल्या केमिकल्स व दुर्गंधी युक्त गहाण सांडपाण्यामुळे बरबडा , अंतरगाव ,कृष्णुर ,या गावातिल बर्‍याच शेतकर्‍यांचे जनावरे दुषित पाणी पिउन बिमार पडले आसुन काही शेतकर्‍याची जनावरे दगावली आहेत अश्या परिस्थितीत जनहितार्थ कृष्णुर एम आयडीसीतिल कंपन्यांच्या दुर्गंधियुक्त पाण्याच्या विरोध्दात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे———– देविदास जेटेवाड यांनी पुण्यनगरीशी कळवले आहे.
या पाण्यामुळे शेतकरी महिला व पुरुषांच्या पायाला जखमा.झाल्या आहेत कारण शेतकर्‍यांना , त्यांच्या महिलांना त्या पाण्यातुन दिवसा तिन चार वेळेस कामानिम्त येजा करावे लागत आहे त्यामुळे ते दुषित पाणी त्यांच्या पायाला जखमा करण्याचे काम करत आहे अगोदरच लंम्पि आजार ,ओला दुष्काळा, कोरोणा या नैर्सगिक संकटात सांपडलेल्या शेतकर्‍यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम किर्ति गोल्ड, ,,मेडिसिन , ईतर बायो कोल , व्हेकेज,सिट्रस,मेडिशन ओरगा, हि जपानचि कंपनि दुषित पाणी सोडुण नदिचे पाणी दुषित करत आहेत या ठिकाणी प्रत्यक्ष पाहाणी केल्यास यामध्ये जपानचि ( orga treatment ) हि कंपनि दुषित पाणी सोडण्यात अग्रेसर आसल्याचे दिसुन येत आहे.
या विषयी प्रदुषण नियंत्रण मंडळ व औध्योगिक विकास माहामंडळ याच्याकडे वारंवार शेतकरी लेखी तक्रारी देउन शेतकरी वैतागले आहेत कारण कंपणीचे मालक व प्रदुषन नियंत्रण मंडळ व औध्योगिक विकास माहामंडळ यांच्यात साठेलोटे आसल्यामुळेच कसलिच ठोस कार्यवाही केलि जात नसल्यामुळे आता बरबडा येथिल शेतकरी देविदास जेटेवाड यांनी न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आसल्याचे निवेदन जिल्हाधिकारी नांदेड , पोलिस अधिक्षक नांदेड ,कार्यकारी अभियंता माहाराष्ट्र औध्योगिक विकास महामंडळ नांदेड , माहाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ नांदेड यांना निवेदन सादर करण्यात आले ज्या शेतकर्‍यांचे जनावरे दगावली आहेत त्या शेतकर्‍यांना नुकासन भरपाई देण्यात यावि व दुषित पाणी सोडणार्‍या कंपन्यावर फोजदारी कार्यवाही, व दुषित पाणी सोडणे लवकरात लवकर बंद करावे अशी मागणी केली आहे नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यावर काय ? कार्यवाही करतिल या कडे शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे

Categories
नांदेड

2020-2021 ची शैक्षणिक फी माफ करा.. निलेश गोधने

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि.7.जागतिक महाभयंकर आशा कोरोना कोव्हीड(19) च्या महामारी मुळे विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष थांबलेले शिक्षण,पालकांचे गेलेले रोजगार,नोकर कपात ,वेतन कपातीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक कुचंभना.च्या पेचप्रसंगामुळे पालकांकडून शाळेने शैक्षणिक 2020-21मधील कोणत्याच प्रकारचे शुल्क वसुली करू नका.

उपरोक्त विषयी सविनय सेवेत विनंती करण्यात येते की जागतिक महाभयंकर कोरोना (covid-19 )या महामारी मुळे केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशानुसार याचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने मागील वर्षभरापासून (मार्च 2020) सर्वच शाळा पूर्णतः बंद आहेत परिणामी विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष वा थेट अशा सर्व प्रकारचे शिक्षण थांबलेले आहे प्रत्यक्षातील अध्ययन-अध्यापन प्रक्रिया बंदच आहे कोरोना या महामारी मुळे अनेक पालकांचे काम धंदे बुडाले असल्यामुळे उपासमारीची वेळ येऊन गेली आहे.नोकरी कपातीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या,लाँकडाऊन मुळे अनेकांच्या उत्पन्नाची साधने मोडीत निघाली,अनेकांना वेतन कपातिला सामोरे जावे लागत असल्यामुळे अनेकांचा जगण्यासाठीचा संघर्ष निर्माण झाला असून आर्थिक कुचंबणा होत आहे.तेव्हा जगावे की मुलांच्या शिक्षणाची फी भरावी असे मोठे संकट उभे आहे.प्रत्यक्ष शाळा भरत नसल्यामुळे शाळेचा सर्व व्यवस्थापनावरील खर्च निरंक आहे.कोणताही आगाऊ खर्च लागत नाही.महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी कोणत्या प्रकारच्या शुल्काची सक्ती न करण्याचे आदेश दिले आहेत.करिता शाळेने सामाजिक दायित्व म्हणून शैक्षणिक वर्ष 2020-21 ची सर्व प्रकारची फीस वसुली न करता पालकांची आर्थिक ओढाताण थांबवावी ही नम्र विनंती.
या निवेदनावर खालील व्यक्तींच्या सह्या आहेत .
निलेश गोधने,अनिल कदम,राजू राठोड,सुमित वंडकार,सोनल ऊके,उज्वला गौरवले,प्रल्हाद टेहरे शिवप्रसाद जोगदंड, राजकुमार नवलकार,वंदना पुरी, सुनिता कराडे,लोकेश पाईकराव, कैलास पोहरे,गजानन लिंगायत, धीरज आगलावे,सविता मुनेश्वर,मीरा तावडे,दत्ता ढवळे,हिराचंद्र कदम पंचकिरण कंधारे श्रीकांत खाडे यासह शकडो पालकांच्या स्वाक्षऱ्या या निवेदनावर आहेत.

Categories
नांदेड

त्या 14 कोटी 50 लाखला आहे विमा सुरक्षा कॅवच विक्रम राजेंनी दिली माहिती

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि.7.आयडीबीआय बॅंक आणि शंकर नागरी बॅंक ही दोन्ही प्रतिष्ठाणे 14 कोटी 50 लाख रुपयांच्या हॅकींगबद्दल हात झटकतांना दिसत आहे. आयडीबीआय ही बॅंक वजिराबाद भागात असल्याने वजिराबाद पोलीस ठाण्यात सुध्दा याबद्दल तक्रार देण्यात आली आहे. वजिराबादचे पोलीस निरिक्षक संदीप शिवले यांनी सांगितले की, सायबर तंत्रज्ञ व्यक्ती या प्रकरणाची तपासणी करतील आणि त्यानंतर हा गुन्ह्याचा प्रकार आहे काय याचा निर्णय होईल. दोन्ही बॅंकांनी आपल्या रक्कमांचा विमा केलेला आहे. त्यामुळे या घटनेला कांही वेगळे वळण लागणा काय अशी चर्चा आज सुरू झाली आहे.

शंकर नागरी सहकारी बॅंकेचे व्यवस्थापक विक्रम राजे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार आयडीबीआय बॅंकेत शंकर नागरी बॅंकेचे खाते आहे. 27 डिसेंबर ते 2 जानेवारी या दरम्यान शंकर नागरी सहकारी बॅंकेच्या खात्यातून 14 कोटी 46 लाख 5 हजार 347 रुपये हॅर्कसने आरटीजीएस माध्यमातून गायब केल्याची बाब समोर आल्यनंतर 5 जानेवारी रोजी पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे तक्रार दिली आणि आपल्या 14 कोटी 50 लाख रुपयांची भरपाई करून देण्याची मागणी केली. शिवाजीनगरला दिलेल्या तक्रारीत आयडीबीआय बॅंकेच्या वजिराबाद शाखेतून हा सर्व प्रकार घडल्याचे लिहिले आहे. त्यामुळे दुसरी तक्रार पोलीस ठाणे वजिबाद येथे देण्यात आली.

याबाबत प्राप्त झालेल्या माहितीनुसार आयडीबीआय बॅंक सांगते आहे की,शंकर नागरी सहकारी बॅंकेचे संदेश आल्यानंतरच आयडीबीआय बॅंकेने त्यांच्या खात्यातील रक्कम त्यांच्या संदेशाप्रमाणे वळती केलेली आहे.त्यामुळे जबाबदारी कोणाची हा प्रश्न उपस्थित झाला आहे. वजिराबादचे पोलीस निरिक्षक संदीप शिवले यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की,शंकर नागरी बॅंक रिजर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या नियमावलीप्रमाणे आयडीबीआयने आमचे 14 कोटी 50 लाख रुपये द्यावेत असे सांगत आहेत.आयडीबीआय शंकर नागरीच्या संदेशाप्रमाणेच आमच्या बॅंकेतील खात्यातून रक्कमा वळती झाल्या असे सांगते आहे.त्यामुळे या प्रकरणात सर्व्हर तंत्रज्ञ असलेल्या व्यक्तीकडून याबाबतची सर्व माहिती घ्यावी लागेल, कोणाच्या संदेशाने कोणाच्या खात्यात करोडो रुपये वळवले गेले याची महिती घ्यावी लागेल आणि तंत्रज्ञ सांगतील त्याप्रमाणे या बाबीचा निर्णय पुढे होईल.

शंकर नागरी सहकारी बॅंकेचे व्यवस्थापक विक्रम राजे यांनी दुरध्वनी वरून विचारणा केली असता त्यांनी सांगितले की,शंकर नागरी सहकारी बॅंकेच्या ठेवीदारांना यामुळे कांही अडचण येणार नाही. कारण शंकर नागरी सहकारी बॅंकेचे 114 कोटी रुपये आयडीबीआय बॅंकेत जमा आहेत.सोबतच शंकर नागरीच्या आणि आयडीबीआयच्या रक्कमांचा विमा असल्याची माहिती विक्रम राजे यांनी दिली. विमा प्रकरणांमध्ये इतिहासात अनेक घोटाळे झालेले आहेत. त्यामुळे आयडीबीआय आणि शंकर नागरी यांच्यामध्ये विमा संदर्भाने हा घोटाळा झाला असेल काय?अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

Categories
नांदेड

प्रत्येकाने स्वातंत्र्याच्या मर्यादा ओळखण्याची गरज-प्रमोद शेवाळे

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि.6.प्रत्येकाने आपल्या स्वातंत्र्याच्या मर्यादा ओळखून वागण्याची गरज आहे.या मर्यादांचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द पोलीस आणि समाज या दोघांनाही गंभीर दखल घ्यावी लागेल असे प्रतिपादन पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी केले.

आज दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीदिनी पत्रकारांचा सन्मान करतांना प्रमोद शेवाळे बोलत होते.याप्रसंगी व्यासपिठावर अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे,निलेश मोरे,पोलीस उपअधिक्षक शहर विभाग विक्रांत गायकवाड आणि इतवारा उपविभागाचे डॉ.सिध्देश्र्वर भोरे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.प्रारंभी सर्व पत्रकारांना पुष्प आणि एक लेखणी देवून पोलीसांनी सर्वांचा सन्मान केला. याप्रसंगी पुढे बोलतांना प्रमोद शेवाळे म्हणाले पोलीसांचे वर्तन जसे आहे तसेच आपल्या शब्दात उल्लेखित करा त्या शब्द रचनेची आम्ही नक्कीच दखल घेवू आणि योग्य काम करू असे त्यांनी सांगितले.भारतीय राज्य घटनेत मुलभूत स्वातंत्र्य दिलेले आहे.

पण त्या मुलभूत स्वातंत्र्याच्या प्रमाणे वागत असतांना स्वातंत्र्याच्या मर्यादा प्रत्येकाला ओळखता आल्या पाहिजे.नाही तर ती समस्या भरपूर पुढे जाते आणि स्वातंत्र्याचा गैर अर्थ होतो. पत्रकारांनी सांगितलेल्या सर्व सुचनांवर आम्ही विचार करू आणि त्यानुसार काम करण्याचा प्रयत्न करू असे प्रमोदकुमार शेवाळे यांनी सांगितले.नांदेड शहर आणि नांदेड जिल्हा याच्या भल्यासाठी काम करतांना आम्ही अत्यंत बारकाईने प्रत्येक गोष्टीचा विचार करू आणि त्या प्रमाणे शहरात आणि जिल्ह्यात उन्नती होईल,शहरात आणि जिल्ह्यात शांतता नांदेल यासाठी प्रयत्न करू असे सांगितले.

याप्रसंगी भोकरचे अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांनी मी नांदेडमधील सर्वच पत्रकारांशी नांदेडमध्ये असतांना पत्रकार म्हणूनच ते कसे वागतात हे पाहिले आहे.नांदेड येथून गेल्यावर हे सर्व माझे मित्र होते. आता मी पुन्हा नांदेडला आलो आहे ते पत्रकार म्हणूनच वागतील याची मला जाणीव आहे. पोलीसांच्या कामावर नियंत्रण करण्याची अपारंपारिक पध्दत म्हणजे प्रसार माध्यमे आहेत. आमच्यावर टिका करा.आम्ही त्याला सकारात्मक घेवून आणि योग्य काम करू असे विजय कबाडे म्हणाले.नांदेडच्या वास्तव्यात झालेल्या अनेक घटनांचा उल्लेख करून त्यावेळी पत्रकारांनी दिलेल्या मदततीबाबत आठवण केली.

याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी यांनी सांगितले की,मी पत्रकारीता सुरू केली तेंव्हापासून आजपर्यंत मोठे बदल झाले आहेत.या बदलांमध्ये आलेली वेगवेगळी प्रवृत्ती मला आवडली नाही.युवा पत्रकारांनी वाचनावर लक्ष केंद्रीत करावे.सोबतच इंग्रजी भाषेवर प्रबुत्व मिळवावे. जेणे करून पत्रकारिता करतांना आपल्याकडे ज्ञानाचा भंडार असेल.

याकार्यक्रमाचे आभार व्यक्त करतांना अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे म्हणाले मी या जिल्ह्यात परिवेक्षाधिन अधिकारी म्हणून आलो होतो. माझी या जिल्ह्यातील ओळख त्यावेळी छोटीशी होती.पण आज काम करतांना मी या नांदेड जिल्ह्यातील मातीचा पुत्र आहे. असे समजूनच काम करणार आहे.
या कार्यक्रमात स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, जनसंपर्क अधिकारी सहाय्यक पोलीस निरिक्षक राजू वटाणे यांच्यासह अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

Categories
गुन्हेगारी नांदेड

नांदेड मध्ये IDBI बँकेतील 14 कोटी 50 लाख हँकर्सनी गायब केले

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:हॅकर्स मार्फत मोठ्या प्रमाणात गडबड घोटाळे करण्याचे प्रकार सर्वत्र सुरु असून, नांदेडच्या शंकर नागरी सहकारी बॅंकेचे आरटीजीएस व एनएफटीचे खाते आयडीबीआय नांदेड येथील शाखेत एका हॅकर्सने हॅक करुन जवळपास 14 कोटी 50 लक्ष रुपये लंपास केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आल्यानंतर शंकर नागरी बॅंकेच्या वतीने या संदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.

हॅकर्सच्या माध्यमातून अनेक ठिकाणी वेगवेगळ्या खात्यामार्फत रक्कम पळविण्याचे प्रकार देशभरात सुरु आहेत. त्याचा अनेेकांना फटका बसत आहे.नांदेडच्या शंकर नागरी सहकारी बॅंकेचे आरटीजीएस व एनएफटीचे खाते हॅकर्सने हॅक करुन जवळपास 14 कोटी 50 लक्ष रुपये लंपास केल्याचा प्रकार आज दुपारी उघडकीस आला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शंकर नागरी बॅंकेचे मुख्य व्यवस्थापक विक्रम राजे यांनी सदरचा प्रकार बॅंकेच्या संचालकांना कळविला. 27 डिसेंबर ते 2 जानेवारी या काळात शंकर नागरी सहकारी बॅंकेच्या खात्यातून हॅकर्सने आयडीबीआय बॅंकेचा आधार घेत 14 कोटी 46 लाख रुपये लंपास केले.ही बाब उघडकीस आल्यानंतर बॅंकेच्या खातेदारांत एकच खळबळ उडाली आहे.

सदरचा प्रकार बघून बॅंकेचे अधिकारी देखील हतबल झाले. याबाबत खुलासा करताना बॅंकेचे मुख्य व्यवस्थापक विक्रम राजे यांनी ही सर्वस्वी चूक आयडीबीआय बॅंकेची असून, त्यांना जबाबदार ठरवून त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी,अशी मागणी त्यांनी केली आहे.याबाबत आपण रितसर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.बॅंकेच्या खातेदारांना यामार्फत आवाहन करण्यात येते की,त्यांना कुठलाही धोका यामुळे नसून त्यांची खाती सुरक्षित असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

नेमका हा प्रकार कशामुळे घडला याची चौकशी आता पोलीस करणार असून,संबंधितांनी बॅंकेला तात्काळ नुकसान भरपाई द्यावी,व संबंधितावर गुन्हा दाखल करुन रितसर चौकशी करावी,अशी मागणी विक्रम राजे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केली आहे.शिवाजीनगर पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, नांदेडच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात तपास सुरु केला आहे. नांदेड शहरात या घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Categories
नांदेड Uncategorized

पत्रकारितेतील नव्या पिढीला मार्गदर्शनासाठी ज्येष्ठ पत्रकारांनी पुढे सरसावण्याची गरज..जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे

दर्पण दिनानिमित्त “भवताल, माध्यमे आणि आपण” परिसंवादात मान्यवरांचे मार्गदर्शन

नांदेड जिल्हा प्रतिनिध:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि.6.माध्यमे ही समाजाचा आरसा असतात. समाजाचे प्रतिबिंब माध्यमात उमटतात.समाजातील चांगल्या वाईट बदलांचे प्रतिबिंब देत असतांना माध्यमांवर अधिक जबाबदारी येऊन पडते. समाजातील सहिष्णुता, एकात्मता टिकून राहण्यासाठी माध्यमांची जबाबदारी मोठी असून नव्या पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकारांचे योगदान अधिक आवश्यक व गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांनी केले.दर्पणदिनामित्त जिल्हा माहिती कार्यालय नांदेड व महात्मा गांधी मिशन संचलित वृत्तपत्र विद्या व माध्यमशास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यामाने एमजीएम महाविद्यालयात आयोजित ‘भवताल,माध्यमे आणि आपण’ या परिसंवादाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर हे किनवट येथे आदिवासी आरोग्य शिबिरासाठी असल्याने त्यांनी झुमद्वारे सर्व पत्रकारांना पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार,प्राचार्य गणेश जोशी,ज्येष्ठ पत्रकार कमलाकर जोशी,संपादक शंतनु डोईफोडे,मुन्तजोबोद्दीन मुनिरोद्दीन,आकाशवाणीच्या श्रीमती राजश्री मिरजकर,भारत होकर्णे,कुंवरचंद मंडले,विजय जोशी,माजी जिल्हा माहिती अधिकारी रामचंद्र देठे तसेच जिल्ह्यातील माध्यमाचे प्रतिनिधी,पत्रकार,विद्यार्थी आदी उपस्थित होते.
मागील 6 जानेवारी ते यावर्षीच्या 6 जानेवारीपर्यंत गेलेला कालखंड हा सर्वच दृष्टिने सर्व घटकाला नवे स्थित्यंतर देणारा ठरला आहे. कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे जी भयावता व धास्ती समाजात निर्माण झाली होती ती धास्ती घालवून समाजामध्ये विश्वास निर्माण करण्याचे काम माध्यमांनी व माध्यमातील प्रतिनिधींनी अत्यंत जबाबदारीने केले या शब्दात जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी पत्रकारांच्या योगदानाचा गौरव केला. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी,जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी, कोविड-19 मुळे जे व्यक्ती बाधित झाले त्यांच्यावर वेळेत उपचार करण्यासाठी प्रशासनाने जी प्रयत्नाची पराकाष्ठा केली तेवढीच पराकाष्ठा पत्रकारांनीही समाजात अफवा पसरु नयेत यादृष्टिने वस्तुस्थिती वेळोवेळी समाजापुढे मांडून लोकशिक्षकाची भूमिका बजावली आहे.
लोकशाहीमध्ये प्रत्येकाच्या आवाजाला महत्व आहे.हे लक्षात घेऊन आज माध्यमातील क्रांतीमुळे जी वेगवेगळी डिजिटल माध्यमे समोर येत आहेत त्याचे आपण स्वागत करुन या माध्यमांसाठी काम करणाऱ्या नव्या पिढीला नैतिक आणि लोकशाही मुल्यांचे बळ दिले पाहिजे,असे रापतवार यांनी स्पष्ट केले.शाळेत विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांची जशी आवश्यकता असते त्याच धरतीवर लोकशाही भक्कम करण्यासाठी पत्रकारांवर समाजाच्या शिक्षणासाठी लोकशिक्षकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जेष्ठ पत्रकार कमलाकर जोशी यांनी माध्यमशास्त्राच्या विद्यार्थी व विद्यार्थीनीना मार्गदर्शन करताना पत्रकार हा समाजाचा चौकीदार,पहारेकरी असून पत्रकारामध्ये नैतिकता व चारित्र्य या गोष्टी असणे अंत्यत आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी प्रजावाणीचे संपादक शंतनु डोईफोडे यांनी दर्पणदिन हा पत्रकारासाठी आत्मचिंतन करण्याचा दिवस असल्याचे स्पष्ट करुन गत एक वर्षातील कोरोनाचे आव्हान स्विकारुन माध्यमांनी केलेल्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला.या काळात बातम्या आणि बातम्यांचे संपादन करतांना कधी नव्हे तेवढी काळजी घ्यावी लागली असे स्पष्ट केले.घटनेतील 19 व्या कलमाने व्यक्ती स्वातंत्र्याला दिलेली मुभा ही कुणाच्या अधिकारावर व स्वातंत्र्याला धक्का पोहचविणारी तर नाही ना याची अधिक काळजी घेण्याचे शिक्षण गतवर्षाने माध्यमाला दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
दैनिक नांदेड टाइम्स उर्दूचे संपादक मुन्तजोबोद्दीन मुनिरोद्दीन यांनी आपल्या मनोगतात नांदेडच्या पत्रकारिता क्षेत्रात महिलांचा सहभाग कमी असून या क्षेत्रात काम करण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.तसेच यावेळी आकाशवाणीच्या राजश्री मिरजकर यांनी विद्यार्थींनींना या क्षेत्रात आवाहन करुन उपस्थिती विद्यार्थींनींना प्रोत्साहन दिले. इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे भारत होकर्णे,कुंवरचंद मंडले यांनीही यावेळी संवाद साधला.
प्राचार्य गणेश जोशी यांनी प्रारंभी सर्वांचे स्वागत करुन एमजीएम महाविद्यालयाने सामाजिक बांधिलकी जपत राबविलेल्या उपक्रमाची माहिती दिली. पत्रकारिता प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना सर्वगुण संपन्न होण्यासाठी महाविद्यालयातर्फे आवर्जुन पत्रकार दिनासारखे उपक्रम सातत्याने विनाखंड सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार शितल महाजन यांनी केले.

Categories
नांदेड

उद्योगी महिलां, बचत गटांनी न्यूट्रीकल्चर डिहाड्रेशन सारखे प्रकल्प उभारले पाहिजे

ज़िल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:जिल्यात प्रथमच भाजीपाला व फळे सुकवून पावडर बनवणाऱ्या न्यूट्री कल्चर युनिटचा शुभारंभ,प्रॉडक्ट व http://www.nutriculturefoods.com या वेबसाईटची लॉंचिंग जिल्हा परिषद अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर यांच्या हस्ते करण्यात आला त्याप्रसंगी अंबुलगेकर यांनी उद्यागी महिलांनी व बचत गटांनी न्यूट्रीकल्चर डिहाड्रेरेशन सारखे युनिट उभारायला हवेत असे आव्हान केले.
जुनी भारतीय खाद्य संस्कृती ची परंपरा जोपासत नांदेड ज़िल्ह्यातील न्यूट्रीकल्चर या स्थानिक ब्रॅण्डने कोणतेही कलर,केमिकल,प्रीझर्वेटिव्ह न वापरता शुद्ध,पोषक, रुचकर,भाजीपाला,फळे,फुले, औषधी वनस्पती यांच्या पावडरी बनवून बाजारात न्यूट्रीकल्चर या व्रँड नावाने आणल्या आहेत.यात आवळा,कारला,बीटरूट,गाजर, आद्रक,कांदा,पालक.शेवगा, कोथिंबीर,कडीपत्ता यांची पावडर निर्मिती होत आहे.या पावडरीचा उपयोग कोणत्याही रेसिपीत, भाजीत फ्लेवर आणण्या साठी करता येतो तसेच अन्नपदार्थावर शिंपडून खाता येतो.कारला, आवळा यांच्या पावडर गरम पाण्यात टाकून शुगरचे रुग्ण पिऊ शकतात.जुन्या काळातील उसऱ्याची संकल्पना न्यूट्री कल्चरने विविध भाज्याना नवीन रूपात आणली आहेत.असे प्रकल्प ज़िल्ह्यातील उद्योगी महिलांनी व बचत गटांनी उभारून महिला सक्षमिकरणाचा पाया उभारावा असे मत व्यक्त केले आहे.
उपस्थित नांदेड उत्तर विधानसभेचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी अश्या प्रकल्पाना ज़िल्हा परिषदेनी माळेगाव यात्रा,बचत गटांचे विविध स्टॉल,कृषीस्टॉल,ध्यान्य महोत्सव अश्या कृषी विभागाच्या अंतर्गत संधी उपलब्ध करून द्यावी असे मत व्यक्त केले.माजी ज़िल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर,ज़िल्हा परिषद शिक्षण सभापती संजय बेळगे,महिला बालकल्याण सभापती सुशीलाबाई बेटमोगरेकर यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या व शेतकऱ्यांचा भाजीपाल्याला चांगला भाव मिळण्यासाठी अश्या प्रकल्पाची गरज असल्याचे मत व्यक्त केले व शेतकऱ्याकडूनच भाजीपाला मोठया प्रमाणात विकत घ्यावा अश्या सूचना न्यूट्री कल्चर संचालिकेला दिल्या जेणेकरून शेतकरी समृद्ध झाला पाहिजे असे मत व्यक्त केले.न्यूट्री कल्चरच्या संकल्पने विषयी बालाजी बामणे यांनी सविस्तर अशी माहिती सांगितली.
प्रसंगी उपस्थित हिंदुस्थान क्रॉप साईन्सचे तुळशीराम शेळके,चायवेचे सीईओ आबा पाटील लोंढे,स्पीक फर्टीलायझरचे माधव सूर्यवंशी,कृषी विज्ञान केंद्राचे डॉ, देविकांत देशमुख, महालक्ष्मी ऑइल शोरूम चे गणेश शेठ चान्नावार,अखिल शिक्षक संघटनेचे राज्याधक्ष देविदासराव बस्वदे,ज़िल्हा अध्यक्ष अशोक पाटील मारतळेकर,प्रशांत भिंगोले,चंद्रकांत कुणके, बाळासाहेब लोणे,प्रह्लाद राठोड, दिगंबर शेळके,नगरसेवक राजकुमार बामणे,न्यूट्री कल्चर संचालिका रुक्मिण बामणे, फॅशन डिझाईनर यशस्वी बामणे,आदी उपस्थित होते.

Categories
नांदेड

देगलूर पोलीस स्टेशनच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान

मिलिंद कावळगावकर
देगलूर/प्रतिनिधी
संपूर्ण राज्य भर दर्पण दिन आज साजरा होत आहे. दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.पोलीस वर्धपण दिन व राष्ट्रीय पत्रकार दिन देगलूर पोलीस स्टेशन च्या वतीने शहरातील सर्व पत्रकार बांधवांचा सत्कार करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
आकाशवाणीदर्पण दिन अर्थात पत्रकार दिन आज राज्यभर साजरा होत आहे. यानिमित्त पोलीस स्टेशन च्या वतीने पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. तसेच पुढील वाटचालीत पत्रकार आणि प्रसार माध्यमांचं योगदान महत्त्वाचं आहे, असं ते म्हणाले. पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर नेहमीच सकारात्मक भूमिका घेईल, असं ही पोलीस निरीक्षक भगवान धबडगे यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
यावेळी पोलीस निरीक्षक भगवान धबडगे,महिला पोलीस उपनिरीक्षक जनाबाई सांगळे,महिला पोलीस निरीक्षक पूनम सूर्यवंशी,मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष श्याम वदेवार,तसेच पत्रकार श्रीधर दीक्षित, फायकअल्ली,शेख नाझीम,नरहरी कोलगाणे,फजल मुल्ला, विशाल पवार,अस्लम शेख,मिलिंद कावळगावकर,साई कावटवार,अब्दुल मुबीन ,अजीम अन्सारी, सैफ भाई या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन देगलूर पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी दीपक जोगे तर आभार महिला पोलिस उपनिरक्षक जनाबाई सांगळे यांनी केले तसेच असंख्य पत्रकार बांधव उपस्थित होते.

Categories
नांदेड

धर्माबाद तालुक्यातील ३७. ग्रामपंचायतीत २०४ जागेसाठी ४४९ उमेदवार रिंगणात

पाटोदा ( बु),समराळा,माष्टी तीन.गावे बिनविरोध

२८ ग्रामपंचायतीमध्ये ८७ उमेदवार बिनविरोध निघाले तर १५४ उमेदवारांनी नामांकन अर्ज मागे घेतले

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:धर्माबाद तालुक्यातील एकूण चाळीस ग्रामपंचायती निवडणूक ची
रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवार माघार घेवायाच्या दिवशी दि.४ जानेवारी रोजी एकुण १५४ उमेदवारांनी माघार घेतली आहे. पाटोदा ( बु),समराळा,माष्टी ही तीन गावे बिनविरोध निघाले असुन एकूण ८७ उमेदवार बिनविरोध निघाले आहेत. आता ३७ ग्रामपंचायती मध्ये २०४ जागेसाठी ४४९ उमेदवार रिंगणात आहेत.

धर्माबाद तालुक्यात एकूण ४५ ग्रामपंचायती पैकी ४० ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहेत.यातील समराळा,माष्टी, पाटोदा (बु) ही गावे बिनविरोध काढण्यात आले असुन ३७ ग्रामपंचायतीत निवडणूका होणार आहेत.२०४ जागेसाठी ४४९ उमेदवार रिंगणात असुन पुढील प्रमाणे गाव निवाह रिंगणातील अर्ज
अतकुर -८ उमेदवार रिंगणात, अल्लूर/ नेरली -१३ उमेदवार रिंगणात, करखेली- १८ उमेदवार रिंगणात ,कारेगाव ४, चिंचोली,१४, चिकना १५, चोंडी-७ ,चोळाखा-७ ,जारिकोट- २२, जुन्नी- ३ दिग्रस-२, धानोरा (खुर्द)- १४, नायगाव (ध)-१०, पांगरी-१२, पाटोदा (खुर्द )२, पाटोदा (थडी)१७ पिंपळगाव (ध)- १५,बन्नाळी- ७, बाचेगाव- १८, बाभळी(ध)- १६,बामणी -१४,बेलगुजरी/हारेगाव-
११,बेल्लुर (खु) -५,बेल्लुर (बु) -१३,मंगनाळी- १२,मनुर -६,,मोकली/क-हाळ-१३,येताळा-२५,येवती-१२, राजापूर-१८,विळेगाव (थ)-१४,विळेगाव (ध)-७, शेळगाव (थ)-८ संगम-१४,सायखेड-१५,सालेगाव (ध )-१६,सिरसखोड-२५ उमेदवार रिंगणात आहेत.असे एकूण २०४
जागेसाठी ४४९ उमेदवार रिंगणात आहेत.
जुन्नी,दिग्रस, पाटोदा (खु),कारेगाव, ही गावे बिनविरोध निघणारी केवळ एक जागेसाठी निवडणूक होत आहे.बेल्लुर( खु) येथे दोन जागेसाठी निवडणूक होत आहे.
२८ ग्रामपंचायतीमध्ये ८७ उमेदवार बिनविरोध निघाले आहेत.करखेली ग्रामपंचायतीत ५ उमेदवार बिनविरोध,बन्नाळी ग्रामपंचायतीत ६ उमेदवार बिनविरोध,जुन्नी ग्रामपंचायतीत ८ उमेदवार बिनविरोध,बेल्लूर (खु) ग्रामपंचायतीत ५ उमेदवार बिनविरोध,दिग्रस ग्रामपंचायतीत ५ उमेदवार बिनविरोध, पाटोदा ( खु) ग्रामपंचायतीत ६ उमेदवार बिनविरोध,कारेगाव ग्रामपंचायतीत ५ उमेदवार बिनविरोध असे चार, तीन, दोन विविध ग्रामपंचायतीत एकुण ८७ सदस्य बिनविरोध निघाले आहेत.

Categories
नांदेड

आमदार समर्थकाच्या देशी दारू दुकानासमोर महीलांचा ठिय्या आंदोलन,देशी दारू दुकान हटविण्याची मागणी

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि.6. जिल्यात धर्माबाद तालुक्यातील नायगाव ( ध) येथे आमदार राजेश पवार यांच्या समर्थकाची देशी दारू दुकान अगदी तेलंगणा राज्याच्या सीमेलगत असून सदरील देशी दारू हटविण्याच्या मागणीसाठी गावातील संपूर्ण महीलांनी देशी दारू दुकानावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले होते.तसेच सोमवारी येथील तहसिलदार शिंदे व पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांची भेट घेऊन सदरील देशी दारू दुकान हटविण्याची लेखी मागणी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, धर्माबाद तालुक्यातील नायगाव (ध) येथे आमदार राजेश पवार यांचे कट्टर समर्थक तथा बाजार समितीचे संचालक,तालुका रुग्ण कल्याण समितीचे सदस्य रमेश गौड यांच्या मालकीची देशी दारू दुकान गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. सदरील देशी दारू दुकान हे तेलंगणा राज्याच्या अगदी सिमेलगत असून महाराष्ट्रातील देशी दारूला तेलंगणा राज्यात भरपूर मागणी असल्यामुळे सदरील दुकानातून दररोज तेलंगणा राज्यात देशी दारूची चढ्या भावाने विक्री करून आपले चांगलेभले करुन घेत आहेत.परंतु सदरील प्ररकरणाकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत. तसेच तेलंगणा राज्यातील असंख्य तळीराम देशी दारू पिण्यासाठी नायगाव मध्ये दररोज ये-जा करीत असल्याचे चित्र दिसत आहेत.व गावातील तरूण,मंजूर व शेतकरी गावतच देशी दारूचे दुकान असल्यामुळे सकाळ पासूनच देशी दारू पिऊन कर्जबाजारी होत आहेत.तसेच अनेक गोर गरीब लोकांचे संसार उद्धवस्त होत आहेत.व गावात दररोज लहान मोठे तंटे देशी दारू पिल्यानंतर होत असल्याचे चित्र दिसत आहेत.सदरील देशी दारूच्या जवळच मंदीर व शाळा असल्यामुळे शाळकरी मुलांना व भाविकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.तसेच तेलंगणा राज्यात दररोज देशी दारू काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी ठरविक माणसे नेमलेले आहेत. आजपर्यंत आती देशी दारू पिल्यामुळे गावातील अनेकांचा मुत्यु झाला आहे.त्यामुळे त्यांचे संसार उद्धवस्त होत असल्याचे चित्र गावातील रणरागिणींच्या निदर्शनास येताच,त्यांनी सदरील देशी दारू दुकान हटविण्याचा संकल्प केला आहे. व सदरील देशी दारू दुकानावर गावातील शेकडो महीलांनी मोर्चा काढून सदरील देशी दारू दुकान हटविण्याची मागणी करीत दुकानासमोर महीलांनी ठिय्या आंदोलन केले आहे.परंतु पोलिसांनी महीलांची समजूत घातल्यामुळे काही अनुचित प्रकार घडला नाही.लगेच गावातील असंख्य महीलांनी धर्माबाद गाठून येथील तहसिलदार शिंदे व पोलिस निरीक्षक सोहन माछरे यांची भेट घेऊन सदरील देशी दारू दुकाना संदर्भात पाढा वाचला.व सदरील देशी दारू दुकान हटविण्याची लेखी मागणी केली आहे.सदरील देशी दारू दुकानाच्या मालका विरोधात महीलेमध्ये संतापाची लाट उसळली असल्याचे चित्र दिसत आहे.सदरील देशी दारू दुकानदार आपले काळे धंदे सुरळीत सुरू राहवे,यासाठी आमदार राजेश पवार यांच्याशी घनीष्ठ संबंध निर्माण करून आमदाराचे विश्र्वास संपादन केल्यामुळे आमदार राजेश यांनी सदरील देशी दारू दुकानाच्या मालकास तालुका रुग्ण कल्याण समितीचे सदस्यपदी निवड केल्यामुळे भाजपातील निष्ठावंतांनी त्यावेळेस नाराजी व्यक्त केली होती. परंतु सदरील रुग्ण कल्याण समितीचे सदस्य रमेश गौड जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्याऐवजी गोर गरीब जनतेचे संसार उद्धवस्त करीत असल्याची चर्चा तालुक्यातील जनतेत होत आहे.सदरील देशी दारू दुकानाच्या मालकास आमदार राजेश पवार यांचा वरदहस्त असल्यामुळे संबधित अधिकारी व कर्मचारी सदरील दुकानाच्या नियमबाह्य परवाना व गैरकारभाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे.परंतु सदरील देशी दारू दुकान हटविल्याशिवाय गावातील महीला सुध्दा शांत बसणार नाहीत.व यासाठी लवकरच जन आंदोलन करण्याची तयारी गावातील महीला करीत असल्याचे चित्र दिसत आहे.त्यासाठी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सदरील देशी दारूची दुकान हटवावे,अशी मागणी तालुक्यातील जनतेतून होत आहे.
यासंदर्भात रमेश गौड यांना भ्रम्नधव्नीवरून विचार पुस केल्यास म्हणाले की,सदरील देशी दारूच्या दुकानाचा परवाना नियमानुसारच असून माझ्या आईच्या नावाने परवाना आहे. सदरील तक्रार राजकारणामुळे होत आहे.व यापुढे अनेक विषयांवर बोलण्यास टाळाटाळ केली आहे.

Categories
नांदेड

सन 2020 मध्ये भ्रष्टाचारात नांदेड जिल्हा पोलीस प्रथम क्रमांकावर

दुसऱ्या क्रमांकावर जिल्ह्याचा महसुल विभाग

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि.6.जानेवारी ते डिसेंबर 2020 या बारा महिन्याच्या कालावधीमध्ये नांदेड जिल्ह्यात भ्रष्टाचार करणाऱ्यांमध्ये पोलीसांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.आठ कार्यवायांमध्ये दहा जण आरोपी झाले आहेत. दुसरा क्रमांक महसुल विभागाने मिळवला असून पाच कार्यवायांमध्ये त्यांचेही दहा लोक भ्रष्टाचाराचे आरोपी आहेत.नांदेड जिल्ह्यातील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने वर्षभरात 26 कार्यवाया केल्या असून त्यात 38 लोक आरोपी आहेत.

भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या वर्षभराच्या कार्यवाहीमध्ये नांदेड जिल्हा पोलीस दलाने भ्रष्टाचार करण्यात प्रथम क्रमांक कमावला आहे. पोलीस शिपाई ते पोलीस उपनिरिक्षक या पदाच्या एकूण 8 जणांनी भ्रष्टाचार करतांना केलेल्या लाच मागणीविरुध्द झालेल्या तक्रारीनंतर 8 गुन्हे दाखल झाले.त्यात एकूण 10 जणांना आरोपी करण्यात आले आहे.यातील लोकसेवक हे वर्ग 3 चे कर्मचारी आहेत. दुसरा क्रमांक जिल्ह्याच्या महसुल विभागाने घेतला आहे. यातही पाच दाखल झालेल्या गुन्ह्यांमध्ये वर्ग 3 चेच कर्मचारी आहेत.त्यात तलाठी, मंडळाधिकारी आणि ग्रामविकास अधिकारी यांचा समावेश आहे. महसुल विभाग विरुध्दच्या पाच कार्यवाह्यांमध्ये 10 आरोपी आहेत. जिल्हा परिषदेमधील वित्त विभागामध्ये एक गुन्हा भ्रष्टाचारासाठी दाखल झाला. त्यात वर्ग 3 आणि वर्ग 4 चे दोन जण आरोपी आहेत. ग्राम पंचायतमधील चार जणांनाविरुध्द केलेल्या कार्यवाहीमध्ये 6 आरोपी आहेत.

यात ग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी,उपसरपंच यांचा समावेश आहे.नगररचना विभाागतील नगरपंचायतमधील वर्ग 3 आणि वर्ग 4 चे दोन जण भ्रष्टाचाराचे आरोपी आहेत.वस्तु व सेवा कर कार्यालय नागपूर येथील वित्त विभागाचा अतिरिक्त आयुक्त भ्रष्टाचारात अडकला आहे.शिक्षण क्षेत्राशी संंबंधीत तीन गुन्ह्यामध्ये 5 आरोपी आहेत. त्यात मुख्याध्यापक, शिक्षक, खाजगी लिपीक आणि खाजगी इसम अशा लोकांचा समावेश आहे.दोन गुन्हे खाजगी इस्माविरुध्द दाखल झाले आहेत. वफ्फ बोर्डाचा जिल्हा वफ्फ अधिकारी वर्ग 3 आणि सेवक वर्ग 4 असे दोन जण भ्रष्टाचारात अडकले आहेत.

नांदेड जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकूण 26 सापळे आयोजित केले. त्यात वर्ग एकचा 1 अधिकारी, वर्ग दोनचे 24 व्यक्ती आणि खाजगी इसम अशा एकूण 38 जणांना आरोपी केले आहे. एकूण 26 सापळयामध्ये वर्ग एकचा फक्त एकच अधिकारी भ्रष्टाचारांच्या आरोपात अडकला आहे.बाकी सर्व वर्ग 3, 4 आणि खाजगी इसम भ्रष्टाचाराचे आरोपी झाले आहेत.

Categories
नांदेड

शासकीय कर्मचाऱ्यांना एक्स,वाय आणि झेड वर्गीकरणानुसार आता घरभाडेभत्ता मिळणार

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि.6.सातवा वेतन आयोग लागू झाल्यानंतर राज्य शासनातील कर्मचारी व इतरांना सुधारीत दराने घरभाडे भत्ता देण्यासाठी एक नवीन शासन निर्णय आला आहे.या शासन निर्णयावर महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचे उपसचिव भालचंद्र गाडेकर यांची डिजिटल स्वाक्षरी आहे.नवीन प्रकारे घर भाडे भत्ता देण्याची वर्गवारी एक्स,वाय आणि झेड या शहर आणि गावांच्या वर्गीकरणानुसार मिळणार आहे.

राज्य शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर राज्यातील महराष्ट्र नागरी सेवा (सुधारीत वेतन) नियम 2019 प्रमाणे मॅट्रीक्स आणि वेतनस्तर लागू करण्यात आले.सोबतच 7 जुलै 2017 च्या आदेशानुसार सुधाारीत घरभाडे भत्ता कसा देण्यात यावा यासाठी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना व इतर पात्र कर्मचाऱ्यांना शहरे आणि गावे यांचे सुधारीत वर्गीकरण विचारात घेवून घरभाडे भत्ता देण्याचा निर्णय झाला.यामध्ये एक्स,वाय आणि झेड प्रकाराच्या गाव आणि शहराचे वर्गीकरण आहे.

एक्स प्रकारच्या वर्गीकरणामध्ये घरभाड्याचे विद्यमान दर 30 टक्के आहे ते दर मुळ वेतनाच्या टक्केवारीनुसार 24 टक्के करण्यात आले आहे.वाय प्रकारच्या वर्गीकरणातील घरभाडे 20 टक्के आहे.ते आता 16 टक्के करण्यात आले आहे. झेड प्रकारच्या वर्गीकरणात सध्याचे घरभाडे दर वेतनाच्या 10 टक्के आहे.तर सुधारीत दर मुळ वेतनाच्या 8 टक्के करण्यात आले आहे.सोबतच एक्स,वाय आणि झेड वर्गीकृत शहरांना अनुक्रमे 5400, 3600 आणि 1800 घरभाडे भत्ता अनुज्ञेय राहिल. ज्यावेळी सातव्या वेतन आयोगानुसार अनुज्ञेय केलेला महागाई भत्ता 25 टक्यांची मर्यादा ओलांडेल त्यावेळी एक्स, वाय आणि झेड वर्गीकृत शहरांना अनुक्रमे 30, 20 आणि 10 टक्के वाढीव दराने घरभाडे भत्ता मंजुर करण्यात येईल.सुधारीत दराने घरभाड्याची परिगणना करतांना मुळ वेतनात विशेष वेतन समावेश करता येणार नाही.घरभाडे भत्त्याच्या अनुज्ञेयतेसंबंधीतच्या विद्यमान आदेशातील इतर सर्व तरतुदी व अटी पुर्वीसारख्याच लागू राहतील.हा शासन निर्णय 1 जानेवारी 2019 पासून अंमलात आलेला आहे.हा शासन निर्णय राज्य शासनाच्या संकेतस्थळावर संकेतांक 201902051436462005 नुसार प्रसिध्द करण्यात आला आहे.

Categories
नांदेड

मुखेड तालुक्यात १०८ ग्राम पंचायतीमध्ये १ हजार ७९८ उमेदवार रिंगणात

सहा ग्राम पंचायती बिनविरोध तर १००३ जनांची घेतली माघार

मुखेड तालुका प्रतिनिधी:गणेश आडे

मुखेड:तालुक्यातील १०८ ग्राम पंचायतीसाठी ३ हजार १५ ईच्छुक उमेदवारांनी नामनिर्देशणपत्र सादर केले होते यात १ हजार ३ जनांनी माघार घेतली असुन १ हजार ७९८ उमेदवार रिंगणात आहेत.

तालुक्यातील कोळनुर,भगनुरवाडी,हसनाळ प.दे.,जांब खु.कमळेवाडी,ईटग्याळ पमु.या 6 ग्राम पंचायती बिनविरोध निवडल्या गेल्या आहेत. तर ३८ प्रभागातून १४२ जागा बिनविरोध झाल्या आहेत.तालुक्यातील ग्राम पंचायतीचा निवडणूकीचा धुराळा दिवसेंदिवस जास्तच उडत असुन शहरातील हॉटेल,बार,दुकाने,पान टप­या हाऊसफुल दिसत आहेत.

तालुक्यात मुक्रमाबादसह येवती, चांडोळा,बेटमोगरा,मंडलापुर,सावरगांव पि,बाऱ्हाळी,गोजेगाव अशा मोठया ग्राम पंचायतीकडे सर्वाचेच लक्ष लागले असुन अनेक दिग्गजांना गावातच मोठा विरोध पत्कारावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या गावात त्यांना मोठा विरोध दिसून येत असुन मुक्रमाबाद मध्ये गोजेगावकर पुरस्कृत पॅनल आमदार डॉ.तुषार राठोड यांच्या समर्थकाच्या विरोधात थांबले असल्याचे बोलले जात आहे.तर माजी आमदार हाणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या गावात सुध्दा तीन पॅनल थांबलेले असून बेटमोगरेकर यांना धक्का देण्यासाठी गावातील अनेक मंडळी एकत्र आल्याचे दिसून येते.

तीन पत्रकार मैदानात
मुक्रमाबाद ग्राम पंचायतमध्ये ८ हजार ५९ मतदार असुन तीन पॅनलमध्ये एकुण ५२ उमेदवार रिंगणात आहेत.याच भागात लेंडी नदी असून पुनर्वसनाचा, मावेजांचा मुद्दा यात प्रकर्षाने गाजणार आहे.या ग्राम पंचायतमध्ये प्रथमच तीन पत्रकार निवडणूकीच्या मैदानात आहेत.


२२ वर्षीय युवकाने केले पॅनल तयार – दिग्गजांना आव्हान
मुखेड तालुक्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत समजली जाणारी मुक्रमाबाद ग्राम पंचायत मध्ये २२ वर्षाच्या हेमंत खंकरे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत दिग्गजांना आव्हान दिले आहे.या युवकाच्या पॅनल विरोधात मुरब्बी राजकारणी शिवराजअप्पा आवडके व गोजेगावकर पुरस्कृत पॅनल आहे.

Categories
नांदेड

तीन महिन्यापूर्वी पोलीस उपनिरिक्षक झालेले अधिकारी वेतन श्रणी पाऊन वंचित

आजही पोलीस कर्मचारी पदाची पगार घेतात

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि.6.सन 2013 पासून पोलीस उपनिरिक्षक होण्याची वाट पाहत वाट लागलेले सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक आणि पोलीस हवालदार सन 2020 च्या शेवटच्या सत्रात अखेर फौजदार झाले.पण आजही त्यांची वेतन निश्चिती करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा त्रास कधी संपेल ही त्यांची विवंचना कायम आहे. नांदेड जिल्ह्यात 32 पोलीस कर्मचारी पोलीस उपनिरिक्षक झाले आणि राज्यात जवळपास 1 हजार पोलीस कर्मचारी फौजदार झाले आहेत.

सन 2013 मध्ये पोलीस विभागात झालेल्या एका विभागीय परिक्षेचा निकाल जाहीर झाला.पण त्या परिक्षेत्र उत्तीर्ण झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरिक्षक पद प्राप्त करता-करता सन 2020 चा शेवट आला.2013 ते 2020 या दरम्यान या पोलीस उपनिरिक्षक होण्याच्या निर्णयावर अनेक त्रास या पोलीस कर्मचाऱ्यांनी पाहिले.अनेक याचिका न्यायालयात दाखल झाल्या.त्याचे निर्णय आले. अखेर शेवटी शासनाने पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस उपनिरिक्षक पद देण्याचे ठरवले आणि राज्यभरात जवळपास एक हजार पोलीस कर्मचारी पोलीस उपनिरिक्षक झाले.नांदेड जिल्ह्यात या एक हजारमध्ये 32कर्मचाऱ्यांचा अधिकारी होण्यात सहभाग आहे.

मागील तीन महिन्यापासून पोलीस उपनिरिक्षक झालेल्या नांदेड येथील पोलीस कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती अद्याप झालेली नाही.आजही पोलीस उपनिरिक्षक पोलीस कर्मचारी पदाचे वेतन प्राप्त करत आहेत.त्यामुळे फौजदार झाल्यावर सुध्दा त्यांची न झालेली वेतन निश्चिती अद्याप त्यांना विवंचना देत आहे.वेतन निश्चिती होण्याअगोदर राज्यातील अनेक पोलीस उपनिरिक्षक सेवानिवृत्त झाले. सुदैवाने नांदेड जिल्ह्यातील एकही पोलीस उपनिरिक्षक सेवानिवृत्त झाला नाही.म्हणून त्यांना वेतन निश्चिती लवकर व्हावी अशी अपेक्षा होत आहे. वेतन निश्चिती झाल्यानंतर विविध भत्ते,सातवा वेतन आयोग अशा प्रकारे त्यांच्या दरमहिन्याच्या वेतनात चांगलीच वाढ होणार आहे.अधिकारी झालो पण वेतन निश्चिती कधी होणार ही चिंता त्यांना कायम आहे

Categories
नांदेड

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने दर्पणदिन उत्सहात साजरा

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ
नायगाव तालुका कार्यकारणी च्या वतीने आज 6 जानेवारी मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकारआचार्य बालशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्य नायगाव तालुका प्रेस संपादक व पत्रकारसेवा संघाच्या वतीने मौजे देगांव ता.नायगाव येथील साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या सभागृहात बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची कार्यकारणी ही नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख मारोती शिखारे,वैशाली इंगोले,जिल्हा समन्व्यक संदीप कांबळे,जिल्हा संघटक शंकर सिंघ ठाकूर,जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांच्या वतीने नायगाव तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली त्या मध्ये अविनाश अनेराये उपाध्यक्ष म्हणून अंकुशकुमार देंगावकर यांची सर्वानुमत्ते निवड जाहीर करण्यात आली आहे.व प्रेस संपादक व पत्रकार संघाच्या वतीने साहित्यिक अण्णाभाऊ साठे सभागृह, ड्रा.बाबासाहेब आंबेडकर सभागृह परिसरात व सामाजिक न्याय विशेष सयाग विभाग समाजकल्याण मुलांची शाळा नायगाव आदी ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे. व नंतर नवीन कार्यकारणीस शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी विक्रम पा.बामणीकर,संभाजी गायकवाड,ऋषिकेश रोडे,गौरव गायकवाड,प्रकाश कामळजकर, व्येव्हारे सोनकांबळे,भाऊसाहेब चव्हाण प्रकाश दडेकरआदी पत्रकार उपस्तिथ होते.

Categories
नांदेड

नांदेड जिल्ह्यातील वाळूघाटांच्या लिलावाला अखेर मुहुर्त सापडला

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि.2.जिल्ह्यात एकूण २०२ वाळू घाट आहेत.गेल्या वर्षी वाळू घाटांचे लिलाव रखडले होते.जिल्ह्यात पर्यावरण विभागाची संमती मिळाली नसल्याने वाळूघाटांचा लिलाव होऊ शकला नाही.प्रशासनाने अनेक वेळा वाळूतस्करांवर कारवाई करुनही अवैधरित्या वाळूचा उपसा सुरूच होता.जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व त्यांच्यासोबत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देखील कारवाया केल्या होत्या.

नांदेड जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावाला अखेर मुहुर्त लागला आहे. देगलूर, बिलोली व माहूर तालुक्यातील एकूण ३२ वाळूघाटांच्या लिलावाची प्रक्रिया नवीन वर्षात शनिवारपासून (ता. दोन) सुरू होत आहे.

नांदेड जिल्ह्यात एकूण २०२ वाळू घाट आहेत.गेल्या वर्षी वाळू घाटांचे लिलाव रखडले होते. जिल्ह्यात पर्यावरण विभागाची संमती मिळाली नसल्याने वाळूघाटांचा लिलाव होऊ शकला नाही.प्रशासनाने अनेक वेळा वाळूतस्करांवर कारवाई करुनही अवैधरित्या वाळूचा उपसा सुरूच होता.जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व त्यांच्यासोबत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देखील कारवाया केल्या होत्या. महसूलच्या पथकाने वाळू घाटावरील मोठ्या प्रमाणात तराफे जाळून नष्ट केले होते. या शिवाय बिहारी मजुरांवर मोठ्या संख्येने गुन्हे दाखल करण्यात आले होते. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी स्वत:कार्यवाही केली होती.

पर्यावरण विभागाची मान्यता
यापूर्वी विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता त्यानंतर ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने ही वाळू घाटलिलाव प्रक्रिया लांबणीवर पडली होती. दरम्यान,या कालावधीत पर्यावरण विभागाने जिल्ह्यातील ३२ वाळू घाटांच्या लिलावाला मान्यता दिली होती.याबाबत जिल्हा प्रशासनाने याबाबत निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागितले होते.निवडणूक आयोगाने वाळूघाटांचे लिलाव करण्यास परवानगी देताना ग्रामसभा घेण्यास सांगितले होते. परंतु, कुठल्याही वाळूस्थळाचा लिलाव करण्यापूर्वी त्या-त्या गावात ग्रामसभेची मान्यता घेतली जाते. ही प्रक्रिया संबंधित गावात ग्रामसभा घेऊन पूर्वीच पार पाडण्यात आली.त्यामुळे प्रशासनाने जिल्ह्यातील ३२ वाळूघाटांच्या ई- लिलावाची प्रक्रिया चालू केली आहे. ता.दोन जानेवारीपासून सायंकाळी पाच ते रात्री ११ वाजेपर्यंत ही प्रक्रिया ता.१७ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.त्यामुळे आता वाळूसाठी ठप्प झालेल्या घरकुलांच्या बांधकामांना वेग येणार आहे.तसेच सर्वसामान्यांना देखील माफक दरात वाळू मिळण्याची शक्यता आहे.

रखडलेली कामे मार्गी लागणार
जिल्ह्यातील अनेक वाळू घाटावर अवैधरित्या वाळूचा उपसा होत आहे.जिल्हा प्रशासन,महसूल प्रशासनाने कारवाही करूनही वाळू माफियांवर परिणाम झाला नाही.जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः पहाटेच्या वेळी वाळू घाटांवर जाऊन कारवाई केली,तराफे जाळले या शिवाय मजुरांवर गुन्हे दाखल केले.दरम्यान,आता ३२ वाळू घाटांचा लिलाव होणार असल्याने बांधकाम करणाऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.अनेकांची घरकुलांची कामे थांबली आहेत. यासोबतच विविध योजनांची कामे रखडली आहेत.ती पूर्ण होण्यास मदत मिळणार आहे

Categories
नांदेड

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय बहुजन ओ बी सी अल्पसंख्याक भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशन पदी राजू पाटिल सुरनर या‌ंच्या हस्ते मारोती इरबा हिरमलाड यांची नांदेड जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड!!

नांदेड जिल्हा प्रतिनिधी उद्धव मामडे रावधानोरकर
नांदेड मुखेड – अखिल भारतीय ब.ओ.बि.सी.अल्पसंख्याक भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशनची बैठक मराठवाडा अध्यक्ष राजु पाटील सुरनर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. त्या बैठकीत महाराष्ट्रात समितीचे मजबूत संघटन करून त्यांच्या अडीअडचणी व समस्या सोडवण्यासाठी समितीच्यावतीने नूतन जिल्हाउपाध्यक्ष पदी निवडण्यात आली.या बैठकीत अखिल भारतीय ब.ओ.बि.सी.अ. भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशन नांदेड जिल्हाउपाध्यक्ष पदी येवती येथील सामाजिक कार्यकर्ते मारोती हिरमलवाड यांची निवड केल्याचे मराठवाडा अध्यक्ष यांनी जाहीर केले. तसे निवडीचे पत्र मराठवाडा अध्यक्ष राजु पाटील सुरनर यांच्या हस्ते मारोती हिरमलवाड यांना देण्यात आले. यावेळी बोलताना मारोती हिरमलवाड यांनी समितिचे कार्य सर्वदूर पोहचविण्यासाठी व विशेष करून पीडित वर्गांच्या न्याय हक्कासाठी काम करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले आणि संघटनेने दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले.
सोबत मराठवाडा युवा अध्यक्ष उद्धव मामडे रावधानोकर,मराठवाडा उपाध्यक्ष आरीफ शेख निमटेकर,चंद्रकांत नागेश्वर,गोविंद माधवराव कांबळे,राजु लक्ष्मण हिरमलवाड,व्यंकटेश मनोहर घुमावार,अजय शंकरराव नागरगोजे,माधव संतुका येवते,रोहिदास माधवराव येवते,अविनाश हणमंत कांबळे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

Categories
नांदेड

उस्माननगर महाराष्ट्र ग्रामीण बँकेत लक्ष्मीसाठी शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या शाखा अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करा : विक्रम पाटील बामणीकर

अन्यथा उस्माननगर येथील बँकेला टाळे ठोकण्याचा इशारा

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि.2.सध्या बँकाचा कारभार जनतेच्या हिताचा उरला नसून उस्माननगर महाराष्ट्र ग्रामीण बँकेत सध्या कोणत्याही कामासाठी लक्ष्मी चा वावर वाढला आहे लक्ष्मी द्या कामे करा अशी जणू संकल्पना बँकेने केली का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.सध्या बँकेत शेतकऱ्या कडून पैसे घेऊन कामे करणाऱ्या दलालांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत आनागोदी कारभाराला सुरुवात झाली आहे. या कारभारास मूकसंमती देणाऱ्या महाराष्ट्र ग्रामीण शाखा उस्माननगर चे शाखा अधिकारी यांना तात्काळ निलंबित करावे व उस्मानगर शाखेतून त्याची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी शिवराज्य युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम पाटील बामणीकर यांनी जिल्हाधिकारी साहेब व महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.ग्राहक हेच बँकेचे दैवत हे गेल्या अनेक वर्षापासून बँकेला लागू होते परंतु सध्या आता हे ब्रीद लोक पावत चालले की काय ? अशी धारणा देखील जण माणसाची झालेली आहे उस्माननगर येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेची शाखा असून या बँकेत जवळपास पाच ते आठ गावाच्या ग्रहकांचे खाते आहेत सध्याच्या युगात माणूस बँकेच्या निगडीत आला आहे शासनाने मानस व जनतेस बँकेशी जोडले आहे शासनाच्या अनेक योजना जनतेच्या हितासाठी बँकांना जोडल्या आहेत तशा सूचना दिल्या आहेत शेतकऱ्यांना कर्ज वाटप करणे पिक कर्ज सुशिक्षित बेरोजगारांना कर्ज नोकरदारांना गृहकर्ज वैयक्तिक कर्ज महिला बचत गटांना कर्ज शेतकऱ्यांना शेतात घर बांधणे कर्ज अशा विविध योजनेअंतर्गत बँकांना कर्ज वाटप करणे बंद कारक केले असताना या सर्व नियमांची पायपली या बँकेत होत असताना दिसून येत आहे तेथील शाखा अधिकारी मनमानी कारभार करत आहेत कर्जासाठी शासनाने व बँकेने दिलेले नियम व अटी पूर्तता करून देखील कर्ज प्रकरणे मंजूर केले जात नाहीत कर्ज देणे बंधनकारक असताना या शाखा अधिकाऱ्यांना मात्र कुठेच भान राहत नाही शाखा अधिकारी यांनी सर्व नियमांना केराची टोपली दाखवली आहे या बँकेत ग्राहकांना कुठेच सुविधा दिल्या जात नाहीत शाखा अधिकाऱ्याकडून नेहमीच कुठल्याही कामाला टाळाटाळ केली जात आहे विशेष म्हणजे दलालामार्फत कर्ज प्रकरणे केले तर त्यावर तात्काळ शाखा अधिकारी अंमलबजावणी करतात हे मात्र उस्माननगर महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील शाखा अधिकाऱ्याचा मोठा नियम दलालांमार्फत घेतल्या जात आहे परंतु जन सामान्य लोकांचे प्रश्न हाताळताना त्यांच्याकडून न्याय मिळत नाही सध्या बँकेत खाजगी माणसाचा वावर म्हणजेच दलालांचा सुळसुळाट वाढलेला आहे त्यामुळे सामान्य जनतेची हेडसाळ होत आहे शेतकरी नोकरदार सुशिक्षित बेरोजगार महिला बचत गटाच्या महिला बँकेत व बँकेच्या दारात दररोज चक्र मारत आहेत त्यामुळे बँकेचे कुठलीच कामे वेळेवर होत नाहीत व प्रकरणे निकाली निघत नाहीत त्यामुळे संपूर्ण ग्राहकही वैतागले आहेत या बँकेत ग्राहकांची व शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत असताना दिसून येत आहे अशा उस्माननगर महाराष्ट्र ग्रामीण बँकाच्या शाखा अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करून या ठिकाणी सर्वसामान्य जनतेची व शेतकर्याची कामे करणाऱ्या अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात यावी अन्यथा महाराष्ट्र ग्रामीण शाखा उस्माननगर बँकेला टाळे ठोकण्यात येईल असा गंभीर इशारा शिवराज्य युवा संघटनेच्या वतीने निवेदनात देण्यात आला आहे दलालांच्या तावडीतून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी व पैसे घेऊन काम करणाऱ्या बँक शाखा अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी व उस्माननगर महाराष्ट्र ग्रामीण बँक दलाला पासून कामे रून शेतकर्‍यांची लुबाडणूक करणाऱ्या दलालाला देखील शाखाधिकारी याप्रमाणे त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा देखील दाखल करण्यात यावा असे निवेदन शिवराज्य युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम पाटील बामणीकर यांनी जिल्हाधिकारी व महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनावर त्यांची स्वाक्षरी आहे

Categories
नांदेड

मारोतराव कवळे गुरुजी यांच्या वाढदिवसा निमित्य ग्रामीण रुग्णालय धर्माबाद येथे रुग्णांना ब्ल्याॅंकेट व फळ वाटप

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि.1.जानेवारी रोजी जिल्यातील धर्माबाद येथील ग्रामीण रुग्णालय मध्ये प्रसिद्ध उधोगपती ज्यांनी आपल्या श्रमावर विश्वास ठेऊन अल्पावधीतच नावलौकिक मिळीवले कर्तव्याची जाण असलेले कोविड-19च्या लोकडाऊन मध्ये संपूर्ण परिसरात गरजू वंताना मुक्तहाताने अन्न साहित्य,अन्न वाटप,धन वाटप करणारे गरजू वंतांच्या हाकेला धावून जाणारे व्येक्तीमत्व मा.मारोती कवळे गुरुजी यांच्या वाढदिवसा निमित्य रुग्णांना ब्ल्याॅंकेट व फळ वाटप करण्यात आली यावेळी धर्माबाद तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. दत्ताहारी पाटील कदम चोळाखेकर,नगरसेवक भोजराम गोणारकर,पांडुरंग देसाई, प्रभाकर पुयड,गणेश पाटील ढोलउमरीकर,रवी शेट्टी,पिराजी पाटील पाटोदेकर,माधव पाटील चोंडीकर,बालाजी पाटील कारेगावकर,हुलजीं पाटील बेलगुजरीकर,नरवाडे पाटील गोविंद पाटील रोषनागावकर, लक्ष्मण पाटील हरेगावकर, हणमंत पाटील धानोरकर,गणेश पाटील कोडगावकर,मारोती माकणे,ताहेर पठाण,पंडित जाधव,ज्येष्ठ पत्रकार कृष्णा तिमापुरे,संपादक मनोज बुंदले,वैद्यकीय अधीक्षक ड्रा.शेख इकबाल,ड्रा.पंडित व राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्तीथी होती.आदिचा सहभाग होता

Categories
नांदेड

लॉयन्सचा डबा उपक्रमाच्या तिसऱ्या वर्धापन दिनी, अन्नदाते आणि माध्यम प्रतिनिधींचा सत्कार

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड: लॉयन्सचा डबा उपक्रमाच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार दि. 1 जानेवारी 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता सर्व अन्नदाते आणि माध्यम प्रतिनिधींचा रयत रुग्णालय, सोमेश कॉलनी,नांदेड येथे सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रलचे अध्यक्ष लॉ. संजय अग्रवाल व प्रोजेक्ट चेअरमन धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.

रयत रुग्णालय येथे गेली दोन वर्ष लोकसहभागातून दररोज तीस डबे देण्यात आले.ज्या ज्या अन्नदात्यांनी लॉक डाऊन मध्ये तसेच रयत व श्रीगुरुजी रुग्णालयात डबे दिलेले आहेत त्यांचा लॉयन्सचे ज्येष्ठ पदाधिकारी सन्मान करणार आहेत.तसेच लॉयन्सचा डब्याची माहिती महाराष्ट्रभर देणाऱ्या माध्यम प्रतिनिधींचा देखील गौरव करण्यात येणार आहे.नूतन वर्षानिमित्त अल्पोहार ठेवण्यात आलेला आहे.वर्ष 2021 मध्ये रयत रुग्णालयात डबे देऊ इच्छिणाऱ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. दानशूर नागरिकांनी आपल्या परिवारातील सदस्यांच्या वाढदिवसानिमित्त अथवा दिवंगत नातेवाइकांच्या स्मरणार्थ एका दिवसाचे रुपये दीड हजार भरून नोंदणी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन झोनल चेअरमन लॉ. डॉ.विजय भारतीया, लॉयन्स सेंट्रलचे सचिव लॉ. उमेश मेगदे, कोषाध्यक्ष लॉ. सुनील साबू,लॉयन्स अन्नपूर्णाचे अध्यक्ष लॉ.नागेश शेट्टी,सचिव लॉ.धनराजसिंह ठाकूर, कोषाध्यक्ष लॉ.अनिल चिद्रावार व प्रोजेक्ट चेअरमन लॉ. राजेशसिंह ठाकूर यांनी केले आहे

Categories
नांदेड

मुखेडात स्वच्छतेच्या नावाखाली लाखो रूपये जातात तरी कुठे

नगराध्यक्ष जोमात मुखेड शहर कोमात

सफाई कंत्राटदाराचा बेपत्ता मुख्याधिकाय्राचे दुर्लक्ष

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

मुखेड:दि.31.मुखेड शहरात स्वच्छतेच्या नावाखाली लाखो रूपये खर्च केले जातात.मात्र मुळात स्वच्छता हि केलीच जात नाही.त्यामुळे शहरात स्वच्छतेचे तिन तेरा झाले आहेत.मुख्यअधिकरी विजय चव्हाण यांच्या दुर्लक्ष पणामुळे मुखेड शहाराची कचरा कंडी झाली आहे.

शहरात अनेक ठिकाणी ठेवण्यात आलेल्या कचरा कुंडी कचय्राने भरले आहेत.मात्र ते रिकामी केले जात नसल्याने कचरा कुंडीच्या भोवतीच रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात कचरा साचत आहे. कचरा घेऊन जाणारी घंटा गाडीच फिरत नसल्याने नागरिक रस्त्यावर कुठेही जाऊन कचरा टाकत आहेत.तर शहारात साफसफाई ही केली जात नसल्याने अनेक ठिकाणी कचरा जसाच्या तसाच पडून राहतो.

मुखेड नगरपरिषदेच्या वतिने लाखो रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या स्वच्छता गृहाची तर अत्यंत बिकट अवस्था झाली आहे.स्वच्छता गृहाला दरवाजे नाहीत.तर आत्ता मध्ये नुस्ती घाण पडलेली आहे.एकदा ही साफसफाई केली जात नसल्याने मोठी दुर्गंधी येत आहे.त्यामुळे स्वच्छतेच्या नावाखाली लाखो रूपये खर्च केले जातात तर ते पैसे जातात तरी कुठे असा प्रश्न मुखेड शहरवासीयांना पडला आहे.

स्वच्छतेच्या नावाखाली लाखो रूपये कागदोपत्रीच खर्च केले जातायत. त्यामुळे मुखेडमध्ये मोठ्या प्रमाणात सर्वत्र कचरा साचल्याने स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. तसेच नालेसफाई देखील रखडल्याने शहरात सर्वत्र दुर्गंधी पसरलीय. स्वच्छतेसाठी देण्यात आलेला कंत्राटदार बेपत्ता झाल्याने मुखेड शहराची कचराकुंडी बनलीय. या प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाने सर्रासपणे दुर्लक्ष केल्याने मुखेडकर नरकयातना सहन करतायत.मात्र नगराध्यक्ष बाबूराव देबडवार हे जोमात आहेत.त्यामुळे मुखेड शहर कोमात आहे.त्यामुळे आत्ता तरी ते स्वच्छतेकडे लक्ष देतील का आणि मुखेड शहरवासीयांना या दुर्गंधीतून मुक्त करतील का हा प्रश्न पडला आहे.

Categories
नांदेड

पीएचडी कोर्स वर्क परीक्षेत लातूर च्या केंद्रावर गैरप्रकार

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:विद्यापीठाची चोराला सोडून संन्याशाला फाशी अशी भूमिका- प्रा सूरज दामरे सिनेट सदस्य
नुकत्याच झालेल्या पीएचडी कोर्स वर्क मध्ये लातूर येथील दयानंद विज्ञान महाविद्यालय हे केंद्र होते सदर केंद्रावर एकूण 112 विद्यार्थी परीक्षेस पात्र होते पण सदर 112 पैकी 36 विद्यार्थी यांनी गैरप्रकार केला असे निदर्शनास आले . 36 विद्यार्थ्यांनी व्हाट्स अप ग्रुप तयार करून परीक्षेतील उत्तरे एकमेकांना या ग्रुपद्वारे सांगितले.सदर गैरप्रकार निदर्शनास येताच विद्यापीठाने चौकशी समिती नेमून सदर विद्यार्थ्यांची चौकशी केली आणि त्या केंद्रावरील सर्वच विद्यार्थ्यांची पुनः परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला.जो की अत्यंत चुकीचा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केला त्यांना दोषी ठरवून त्यांच्यावर कारवाही करायचे सोडून विद्यापीठाने त्या केंद्रावरील सर्वांची पुनः परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देणे असाच काहीसा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे .तरी विद्यापीठाने आपला निर्णय मागे घेऊन खालील पैकी एक निर्णय घ्यावा जो विद्यार्थी हिताचा आहे.
1) 36 विद्यार्थी जे दोषी आहेत त्यांचीच फक्त पुनः परीक्षा घेण्यात यावी बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे निकाल जाहीर करावे
2) पुनः परीक्षा घ्यायचीच असेल तर संपूर्ण विद्यापीठातील विद्यार्थ्यांची घ्यावी
सदर बाबीचा आपण गांभीर्याने विचार करावा ही विनंती अन्यथा विद्यार्थी हितासाठी रस्त्यावर उतरू याची नोंद घ्यावी.
असे प्रा सुरज दामरे,
सिनेट सदस्य,नांदेड विद्यापीठ यांनी सांगितले आहे.

Categories
नांदेड

कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यात ताळेबंदीच्या (लॉकडाउन) कालावधीत 31 जानेवारीपर्यंत वाढ

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि.30.कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनाच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात ताळेबंदीचा (लॉकडाउन) कालावधी रविवार 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढविण्यात आला आहे. याबाबतचा आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी निर्गमीत केला आहे.

साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 च्या मधील तरतुदीनुसार 14 मार्च 2020 रोजीच्या अधिसुचनेनुसार जिल्हादंडाधिकारी यांना कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणुन घोषित केले आहे. तसेच फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 नुसार जिल्हादंडाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांना प्राप्त अधिकारान्वये फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये या आदेशाद्वारे संदर्भात नमुद आदेश 31 ऑक्टोंबर 2020, 4, 15 व 28 नोव्हेंबर 2020 मधील अटी व शर्ती जशास तसे लागू करुन संपूर्ण नांदेड जिल्ह्यात रविवार 31 जानेवारी 2021 पर्यंत ताळेबंदीचा कालावधी वाढविण्यात आला आहे.

या आदेशाची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी वरील नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे,नियमाला धरुन व मानवी दृष्टीकोनातून करावी. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती,संस्था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल. तसेच या आदेशाची अंमलबजावणी करीत असताना सद्हेतुने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विरुद्ध कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही,असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दि.30 डिसेंबर 2020 रोजी निर्गमित केले आहेत.

Categories
नांदेड

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर पल्स पोलिओ लसीकरणासाठी प्रशासन सज्ज

17 जानेवारी रोजी पल्स पोलिओ मोहिमीचे आयोजन

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि. 30 :- 1995 पासून पल्स पोलिओ लसीकरण मोहिम संपूर्ण देशभर नियमितपणे राबविण्यात येत असूनही पोलिओचे आव्हान पूर्णत:संपुष्टात आले असे नाही. महाराष्ट्रात 2010 मध्ये मालेगाव शहरात 4 व बीड जिल्ह्यात 1 असे एकुण 5 पोलिओ रुग्ण आढळले होते.यातील मालेगाव शहरातील 4 पोलिओ रुग्णांनी नियमित लसीकरणांतर्गत एकही लसीची मात्रा घेतली नव्हती तर बीड जिल्ह्यातील रुग्ण हा स्थलांतरीत कुटुंबातील असल्याने त्याला पोलिओची लस मिळाली नव्हती.ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन शासनातर्फे सातत्याने पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन केले जात असून नांदेड जिल्ह्यात ही मोहिम यशस्वी राबविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात आवश्यक असणारी प्राथमिक तयारी पूर्ण झाली असून ही मोहिम यशस्वी करु असा निर्धार जिल्हा प्रशासनातर्फे व्यक्त केला.

या समन्वय समितीच्या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शरद कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) एस.व्ही.शिंगने, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ.विद्या झिने,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे,जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे डॉ. संतोष शिरसीकर यांची उपस्थिती होती.

संपूर्ण देशात 13 जानेवारी 2011 नंतर आज पर्यंत एकही पोलिओचा रुग्ण आढळून आला नाही हे आजवर सातत्यपूर्ण राबविल्या गेलेल्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे यश आहे. तथापि आजूनही या मोहिमेची अत्यावश्यकता असून कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर 17 जानेवारी 2021 रोजी राबविल्या जाणाऱ्या लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे,असे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी सांगितले. या मोहिमेत (BOPV) बायव्हायलंट पोलिओ लसीचा वापर करण्यात येईल. मे 2016 पासून नियमित लसीकरणांतर्गत शुन्य ते 1 वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओची इंजेक्शन माध्यमातून आयपीव्ही लस देण्यात येते. या मोहिमेत 17 जानेवारी रोजी बुथवर व त्यानंतर ग्रामीण भागात 3 दिवस व शहरी भागात 5 दिवस याप्रमाणे घर भेटीचेही नियोजन करण्यात आले आहे. ग्रामीण क्षेत्र व स्थलांतरित / भटकी लोकसंख्या व जोखीमग्रस्त कार्यक्षेत्रात लसीकरणांतर्गत विशेष लक्ष दिले जात आहे.यात अतिदुर्गम भाग,डोंगराळ भागातील पाडे,वस्त्या, शहरी भागातील झोपडपट्टी,विट भट्ट्या / बांधकामे,स्थालांतरीत वस्त्या / ऊसतोड वस्त्या, सलग तीन सदरे रद्द झालेली गावे यावर भर दिला जात आहे.या भागातील एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य विभागाचा संक्षिप्त आढावा घेऊन आरोग्य विभागाला निर्देश दिले.

Categories
नांदेड

नांदेडमध्ये कोरोना बाधेतीत रुग्णांची संख्या वाढ:

प्रशासनाची चिंता वाढली

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:30 डिसेंबर रोजी खाजगी रुग्णालयात एका 83 वर्षीय पुरूष रुग्णाचा कोरोना बाधेने मृत्यू झाला आहे.आज कोरोना बाधीत नवीन रुग्णांची संख्या वाढली आहे.कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांची आजची संख्या 40 आहे.

प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या कोरोना माहितीनुसार आज 30 डिसेंबर रोजी खाजगी रुग्णालयात देऊळगल्ली ता.लोहा येथील 83 वर्षीय पुरूष रुग्णांचा कोरोना बाधेने मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजपर्यंत कोरोना बाधेने मरण पावणाऱ्या रुग्णांची संख्या 573 झाली आहे.

एनआरआय/पंजाबभवन/महसूल भवन/घरी-14, सरकारी रुग्णालय विष्णुपूरी-10, खाजगी रुग्णालय-5, हदगाव-5, कंधार-1, जिल्हा रुग्णालय-2, मुखेड-3 अशा एकूण 40 रुग्णांची उपचारानंतर बरे झाले म्हणून त्यांना सुट्टी झाली आहे. त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 20333 झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण 94.90 टक्के आहे. आज प्राप्त झालेल्या 969 अहवालांमधील 894 अहवाल निगेटीव्ह आहेत, 65 अहवाल पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे आज एकूण रुग्ण संख्या 21425 एवढी झाली आहे. आज प्राप्त झालेल्या आरटीपीसीआर तपासणीमध्ये 28 आणि अँटीजेन तपासणीमध्ये 37 असे एकूण 65 रुग्ण आहेत.

आजच्या 65 रुग्णांमध्ये सर्वाधिक नांदेड मनपा क्षेत्रात 16 रुग्ण आहेत. तसेच नायगाव येथे पण 16 रुग्ण आहेत. आज 631 स्वॅब तपासणी अहवाल प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब 9 आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब 1 आहेत. आजच्या आरटीपीसीआर तपासणीमध्ये मनपा क्षेत्र-9, बिलोली-1, देगलूर-1, नांदेड ग्रामीण-1, किनवट-4, नायगाव-11, लातूर-1 असे 28 रुग्ण आहेत. आज प्राप्त झालेल्या ऍन्टीजेन तपासणीमध्ये मनपा क्षेत्र-7, भोकर-1, देगलूर-8,मुखेड-4, कंधार-1, लोहा-1,नांदेड ग्रामीण-2,नायगाव-5,हदगाव-3, उमरी-1,बिलोली-2, लातूर-2 असे 37 रुग्ण आहेत.

आज कोरोनाचे 318 ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर शासकीय रुग्णालय विष्णुपूरी-14,जिल्हा रुग्णालय-18,जिल्हा रुग्णालय नवीन इमारत-25,नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण-140, मुखेड-16, देगलूर-17, हदगाव-1,किनवट-3,नांदेड जिल्ह्यातील तालुकाअंतर्गत गृह विलगिकरण-63, खाजगी रुग्णालय-20, हैद्राबाद-1 असे उपचार सुरू आहेत.यात अती गंभीर स्वरुपात 11 रुग्ण आहेत. आजच्या स्थितीत रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी-174,जिल्हा रुग्णालय कोविड केअर हॉस्पीटल-59.

Categories
नांदेड

नांदेड महापालिकेत ‘स्थायी’च्या सभापतीपदी विरेंद्रसिंग गाडीवाले

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि.30.वाघाळा महापालिकेत कॉँग्रेसचे स्पष्ट बहुमत आहे.त्यामुळे त्यांच्याकडेच महापौर, उपमहापौरांसह इतर समित्यांची सर्व पदे आहेत.पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण यांनी स्थायी समिती सभापतीपदासाठी कॉँग्रेसचे सभागृह नेते विरेंद्रसिंग गाडीवाले यांची निवड केली आणि त्यानुसार बुधवारी दुपारी महापौर मोहिनी येवनकर यांच्या कक्षात बैठक झाली आणि त्यात श्री.गाडीवाले यांची घोषणा करण्यात आली.त्यानंतर नगरसचिव अजितपालसिंग संधू यांच्याकडे अर्ज दाखल करण्यात आला.

नांदेड वाघाळा महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी कॉँग्रेसचे सभागृह नेते विरेंद्रसिंग गाडीवाले यांनी बुधवारी (ता. ३०) नगरसचिव अजितपालसिंग संधू यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे.त्यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची निवड निश्चित असून गुरूवारी (ता.३१) सभागृहात निवडीची औपचारिकता बाकी राहिली आहे.

नांदेड वाघाळा महापालिकेत कॉँग्रेसचे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे त्यांच्याकडेच महापौर, उपमहापौरांसह इतर समित्यांची सर्व पदे आहेत.स्थायी समितीच्या आठ सदस्यांची निवड झाल्यानंतर श्री.गाडीवाले यांची निवड होणार हे जवळपास निश्चित होते.सभापतीपदासाठी आठ जणांनी अर्ज दाखल केले होते.त्यामुळे आता स्थायी समितीच्या सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

विरेंद्रसिंग गाडीवाले यांची निवड
त्यानंतर पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यापैकी श्री. गाडीवाले यांची निवड केली आणि त्यानुसार बुधवारी दुपारी महापौर मोहिनी येवनकर यांच्या कक्षात बैठक झाली आणि त्यात श्री. गाडीवाले यांची घोषणा करण्यात आली. त्यानंतर नगरसचिव संधू यांच्याकडे अर्ज दाखल करण्यात आला.यावेळी माजी पालकमंत्री डी.पी.सावंत, आमदार मोहन हंबर्डे,महापौर मोहिनी येवनकर, विजय येवनकर,माजी सभापती अमितसिंह तेहरा,किशोर स्वामी, उमेश पवळे,माजी उपमहापौर सतीश देशमुख यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.

सलग पाच वेळा नगरसेवक
नांदेड महापालिकेत तब्बल पाच वेळा (दोन वेळ शिवसेना आणि तीन वेळ कॉँग्रेस) नगरसेवक म्हणून निवडून येण्याचा विक्रम विरेंद्रसिंग गाडीवाले यांनी केला आहे.त्यांचे वडील बलवंतसिंग गाडीवाले हे देखील तीन वेळा निवडून आले आणि त्यांनी विरोधी पक्षनेते आणि महापौरपदही सांभाळले होते. वडील आणि मुलगा सलग तीन वेळा निवडून येण्याचा विक्रमही गाडीवाले यांच्या नावावर आहे. गेल्या वेळेस सलग पाच वर्षे आणि सध्‍याचे तीन वर्षे अशी आठ वर्षे विरेंद्रसिंग गाडीवाले यांनी सभागृह नेते म्हणून काम पाहिले आहे.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनुभवी नेते म्हणून त्यांची सभापतीपदी निवड करण्यात आली आहे.

पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवू – गाडीवाले

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा नांदेड पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू.कॉँग्रेसचे आजी,माजी पदाधिकारी तसेच पालिकेतील पदाधिकाऱ्यांनी माझी निवड केल्याबद्दल त्यांचा आभारी आहे.आत्तापर्यंतचा कामाचा अनुभव तसेच नांदेड शहराच्या विकासाच्या दृष्टीने जे जे महत्वाचे आहे,ते पूर्ण होण्यासाठी विशेष प्रयत्न करू.

  • विरेंद्रसिंग गाडीवाले.
Categories
नांदेड लोहा

विस्तार अधिकारी रामकृष्ण पांडे:बाल विकास कार्यात विशेष योगदान

लोहा येथील बाल विकास प्रकल्प कार्यालयातील विस्तार अधिकारी सांख्यिकी रामकृष्ण पांडे यांनी आपल्या कार्यकाळात बालविकास कार्यालयामार्फत शासनाच्या विविध योजनांचा उत्कृष्ट प्रसार-प्रचार केल्यामुळे त्यांना शासनाच्या वतीने विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आज वयोमानानुसार विस्ताराधिकारी पांडे हे शासकीय सेवेतून 31 डिसेंबर 2020 रोजी सेवानिवृत्त होत आहेत एक शिस्तप्रिय सामाजिक प्रशासकीय कार्यातील उच्चशिक्षित अभ्यासू पांडे साहेब यांच्या कार्याबाबत सेवानिवृत्तीनिमित्त घेतलेला आढावा.

राम कृष्ण अंबादासराव पांडे हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर तालुक्यातील धोत्रा या गावचे त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला अत्यंत शिस्तप्रिय कठीण प्रसंगात मार्ग काढणे, संयमी दुसऱ्यांना मार्गदर्शन करण्यास सतत कार्य हे गुण त्यांच्या अंगी आई-वडिलांकडून लहानपणी त्यांना संस्काराचे बाळकडू मिळत गेले पोत्रा या गावातील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेत त्यांचे पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण झाले. त्यांचे वडील अंबादास राव हे शेतकरी असले तरी त्यांना शिक्षणाची प्रचंड आवड असल्याने व गावात पुढील शिक्षणाची सोय नसल्याने नांदेडला शिक्षण घेण्याचे ठरले. आठवी ते बारावी चे शिक्षण प्रतिभा निकेतन हायस्कूल व महाविद्यालय नांदेड येथे झालेले बहिण-भाऊ रूम करून राहत असत.
B.Sc. नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, नांदेड येथे झाले. B.Sc. चे विषय Physics, Mathematics and Stat. असे होते. M.Sc. Stat, चे शिक्षण मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे पूर्ण झाले. शिक्षण घेत असताना त्यांना खुप संघर्ष करावा लागला. अत्यंत संघर्षमय परिस्थिती सोम्यपणे, आनंदाने, हसतखेळत, तकार न करता त्यांनी उत्तम वाटचाल केली. ‘कमवा व शिका या योजनेतून काम करुन त्यांनी M.Sc. चे शिक्षण औरंगाबाद येथे पूर्ण केले. त्यांचा मुळ स्वभाव संयमी, न्यायप्रिय, परिश्रमी व शांतताप्रिय आहे. गरीबीची जान असणारा आहे.

शासकीय सेवेस प्रारंभ

4 में 1987 रोजी DRDA (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा) नांदेड येथे विस्तार अधिकारी म्हणून शिरो बजेटच्या कालावधीत नौकरी लागलो. तेव्हा कुटुंबातील सर्वांना आनंद झाला. आई वडीलांना तर खुपच आनंद झाला. सरकारी नोकरी मिळाल्याचा आनंद काही वेगळाच असतो. या आनंदा बरोबरच त्यांना कामाची जबाबदारी समजत गेली. आणि अतिशय उत्साहात व संयमाने ऑफीस जबाबदारी पार पाडली. ते आपल्या कामात उत्साह वाढवत होते व त्याच बरोबर आत्मविश्वास वाढत होता.

नौकरीमध्ये कामाची जबाबदारी

विस्तार अधिकारी पांडे यांनी आपले कार्य चोखपणे पार पाडले. नांदेड मध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या ऑफिसमध्ये असताना ऍडव्हान्स इन्क्रिमेंट मिळाले नेहमी ऑफिस कामासाठी दोरा करत दिल्ली मुंबईला ऑफिस कामानिमित्त जात असत.

प्रवासाची खूप आवड आहे कुटुंबांना समवेत प्रवास करण्याची खूपच आवड आहे जवळपास भारतातील पन्नास टक्के भाग बघून झाला आहे जम्मू काश्मीर, अमरनाथ, दिल्ली, म्हैसूर, बेंगलोर, कर्नाटक, गुजरात, अष्टविनायक, श्रीवर्धन ,हरिहरेश्वर, मंजूर ,जंजिरा ,गणपतीपुळे अशा अनेक प्रेक्षणीय ठिकाणे विस्ताराधिकारी पांडे यांनी पाहिली आहेत यातून त्यांनी पर्यटनाचा अभ्यास केला आहे.

उत्कृष्ट कार्याचा गौरव सत्कार

DRDA नांदेड येथून मुखेड येथे तांत्रिक बाबींमुळे बदली झाली येथील कार्यक्रम फक्त अठरा दिवस होते परत त्यांची बदली DRDA झाली. या ठिकाणी आपल्या कार्याचा वेगळा ठसा दाखवून कार्य केले. या कार्याची दखल घेऊन स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजना 2002 ते 2004 उत्कृष्ट अंमलबजावणी केल्यावर येथील पुरस्कार मिळाल व भव्य कोणत्या श्रेणीत आहे त्याविषयी वजन किती व त्यांच्या वयानुसार वजन किती असाव्यात पाहिजे याची माहिती बालका घरातील प्रत्येक व्यक्तीला होण्यासाठी बालकांचे “वज व सनियंत्रण” कार्ड केले त्यांची अंमलबजावणी केली याबाबत त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व सभापती व सर्व समिती सदस्य यांनी कौतुक करून हे कार्ड संपूर्ण जिल्ह्यात लागू केले. घेतली होती या विशेष कार्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली हे उल्लेखनीय कार्य त्यांच्या काळात घडले आहे.

2014 ते 2019 साडेपाच वर्ष अतिरिक्त बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री डीपी म्हणून कार्यभार संभाळला या पदावर असताना पदाचे कर्तव्य व हक्क चोखपणे सांभाळून सर्वांना न्याय मिळवून दिला याचं काळात अतिशय उत्तम कार्यभार सांभाळून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अनेक पुरस्कार मिळाले व सन्मान देऊन सत्कार केला व प्रशस्तीपत्र मिळाले.

शौचालय स्वच्छ भारत मिशन अंतर्गत काम केले पाणी फाऊंडेशनचे काम केले याबद्दल तत्कालीन आमदार श्री चिखलीकर साहेब यांच्या हस्ते सत्कार करून पांडे साहेब यांचा गौरव करण्यात आला.

दरवर्षी माळेगाव यात्रा येथील उत्कृष्ट नियोजन व आयोजन करण्यात त्यांचा हातखंडा होता ग्रामीण भागातील जनतेपर्यंत बाल विकास योजना पोचविण्याचे कार्य दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रे मधून त्यांनी केले विविध पोस्टर्स बॅनर कुपोषणमुक्त बालक महिला सशक्तिकरण यासह अनेक योजना या यात्रेतून त्यांनी प्रसार आणि प्रचार करून ग्रामीण भागापर्यंत पोहोचून बाल विकास विभागाचे विशेष कार्य केले आहे.

डीआयडी या ऑफिसमध्ये पुन्हा 2006 पर्यंत उत्कृष्ट काम केल्याबद्दल दोन आडवास इन्क्रिमेंट मिळाले.

2007 ते 2020 पर्यंत लोह्यात उत्कृष्ट कार्य

आयसीडीएस लोहा या ऑफिसमध्ये काम करताना अंगणवाडी कामकाज पाहणी दौरा करणे कर्मचार्‍यांच्या अडचणी पार त्यांना व्यवस्थित समजावून सांगणे नवीन योजनांची अंमलबजावणी करणे नवीन कल्पना व कामाचे स्वरूप कर्मचाऱ्यांना सांगून कार्य पार पाडत असत.

  • वैवाहिक जीवन आणि यशस्वी कुटुंब*

दिनांक 26/6/1992 रोजी सौ.अनिता राजाभाऊ बर्दापूरकर यांच्याशी विवाह संपन्न झाला. प्रा. रत्नाकर राजाभाऊ बर्दापूरकर अंबाजोगाई ची सासरवाडी आहे. त्यांची पत्नी खोलेश्वर महाविद्यालय अंबाजोगाई येथे प्राध्यापक म्हणून कार्य करत आहे व्यवहारिक जीवनात अतिशय आनंदात पार पाडत असताना त्यांना कौटुंबिक जबाबदारीची जाणीव आहे आई-वडील थकलेले आहेत बहीण-भावंडांची शैक्षणिक जबाबदारी व भावी आयुष्याची जबाबदारी त्यांच्यावर होती त्यांना एकूण पाच बहिणी व दोन भाऊ आहेत.

कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे व पत्नीला नोकरीची व शिक्षणाची खूप आवड असल्यामुळे अंबाजोगाई खोलेश्वर महाविद्यालयात आजही नोकरी करताहेत श्रीरामकृष्ण पांडे येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला समर्थपणे तोंड देता सुयोग्य पणे उत्तर देतात व त्यातून मार्ग काढतात ही त्यांची नैसर्गिक प्रवृत्ती आहे.

त्यांना दोन मुले आहेत चि.ओमकार राम कृष्ण आज अमेरिकेत मध्ये California State मध्ये San Diego येथे सॉफ्टवेअर इंजिनियर या पोस्टवर कार्यरत आहे.VIT college pune येथून B.E केले व CALIFORNIA STATE मध्ये M.S करून सध्या तेथेच नोकरी करत आहे.

चि. ऋषिकेश राम कृष्ण पोत्रेकर भारती विद्यापीठ पुणे येथून बीएफ 2020 सालि First class with Distinction उत्तम रीतीने पास झाला आहे पुढील उच्च शिक्षण घेणार आहे.

कुपोषण मुक्तीसाठी आरोग्य तपासणी शिबिर ठेवून प्रत्येक बालक सुदृढ झाला पाहिजे, हसता खेळता बालक झाला पाहिजे असे वाटत असे पालकांची डॉक्टरांच्या मदतीने तपासणी करून कुपोषित बालकांची व्हीसीडीसी घेऊन त्यांना शोषणातून मुक्त करण्यासाठी सतत त्यांनी प्रयत्न केले. 2012 साली नांदेड विभागात उत्कृष्ट कामाची अंमलबजावणी केल्याबद्दल यशोदामाता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अंगणवाडी सेविकांच्या वैयक्तिक पत्रिका तयार करणे त्यांना सन्मानाने वागणूक दिली. विस्तार अधिकारी पंडित सरांचे कार्य उल्लेखनीय असून त्यांचा प्रशासनात वेगळा कार्याचा ठसा त्यांनी उमटविला होता. आपले कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यामध्ये हे योगदान दिले प्रशासनातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहण्यात येते.आज ते वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत भावी आयुष्य त्यांना सुख समृद्धी भरभराटीचे जावो.

सुर सुर चैतन्याचा

रोम रोम झाले…….

अशा आनंदी विभूतिसाठी सेवानिवृत्ती

हो केवळ तांत्रिक बाब ठरते.

कारण सतत आवरत कार्यरत……

अशा उत्साह व चैतन्याचा

निर झारा श्री राम कृष्ण पांडे

साहेबराव सोनकांबळे
पत्रकार,ता.लोहा जि.नांदेड
मो.9921893325, 9421933606

Categories
नांदेड लोहा

ए.बा.वि. प्रकल्पचे विस्ताराधिकारी राधाकृष्ण पांडे आज ३१ रोजी सेवानिवृत्त

लोहा,प्रतिनिधी (शिवराज पवार)
एकात्मिक बाल विकास सेवा योजना केंद्र लोहा येथील सांख्यिकी विस्ताराधिकारी तथा माजी प्रभारी बाल विकास अधिकारी राधाकृष्ण पांडे हे लोहा कार्यालयातुन आज ३१ डिसेंबर 2020 रोजी सेवेतून वयाच्या ५८ व्या वर्षी सेवा निवृत्त होणार आहेत.
त्यांच्या कारकिर्दीत प्रभारी राज मध्ये कुपोषण मुक्तीसाठीचे काम चांगल्याप्रकारे हाताळलेले आहे.लोहा तालुक्याला पारितोषिकाचा मानही मिळवून दिला.आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला.अनेक कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस यांना त्यांनी कधी कटू तर कधी रागाने तर कधी समजावून सांगून तर कधी पर्यवेक्षकेच्या मार्फत नोटीसा पाठवून कामे करून घेतली.तर यांना आज रोजी कार्यालयाच्या वतीने सेवानिवृत्ती घ्या शुभेच्छा देणार आहेत.

Categories
नांदेड

लोहा,मुखेड,मुदखेड सह धर्माबाद बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई

उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.शिंगणे यांच्या सूचना

नांदेड तालुका प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि.30.केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील लोहा,मुखेड,मुदखेड व धर्माबाद प्रकल्प कार्यालयाकडून राजीव गांधी किशोरी सशक्तीकरण (सबला) योजना दिनांक १९ नोव्हेंबर २०१० पासून राबविण्यात येते.परंतु या योजनेचे गांभीर्य लक्षात न घेता शासनाची दिशाभूल करून आपल्या अधिकाराचा गैरवापर करीत लाखो रुपयांचा अपहार या योजनेत संबधीत प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिकांकडून झाल्याची गंभीर तक्रार इंडियन पँथर सेना प्रमुख,संविधान दुगाने यांनी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर,मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षाताई ठाकूर यांच्याकडे करून एका लेखी निवेदनाद्वारे चौकशीची मागणी केली होती.

आत्मविश्वास आणि सशक्तीकरण हेतूने किशोरींना सक्षम बनविणे,त्यांचे पोषण आणि आरोग्य यात सुधारणा करणे.आरोग्य, स्वच्छता, पोषण, किशोरी प्रजनन, योजनास्वास्थ्य परिवार आणि बाल देखरेख या विषयी जागरूकता निर्माण करणे.त्यांचे घरातील कौशल्य, जीवन कौशल्य विकास करणे आणि व्यावसायिक कौशल्याच्या हेतूने त्यांचे एक राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमाशी जोडणे.शिक्षण सोडलेल्या किशोरी मुलींना औपचारिक व अनौचारिक शिक्षणाच्या प्रवाहात आणणे.प्राथमिक आरोग्य केंद्र, सामुदायिक आरोग्य केंद्र, पोस्ट,बँक,पोलिस स्टेशन इ. सार्वजनिक सेवांच्या बाबतीत सूचना आणि मार्गदर्शन करणे.यासाठी सदर प्रत्येकी प्रकल्पासाठी तीन लक्ष ऐंशी हजार रुपये इतका निधी शासन दरवर्षी किशोरी मुलींच्या प्रशिक्षणासाठी खर्च करतो मात्र सदर योजनेची संबधित तालुक्यात मात्र फक्त कागदोपत्रीच अंमलबजावणी झाल्याचे विदारक चित्र दिसून येत असल्याचे जिल्हाधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (एबाविसेयो)जि.प नांदेड यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर या गंभीर बाबीची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ.इटनकर व उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तत्काळ चौकशीचे आदेश देत तीन दिवसाच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी श्री.चटलावर(लोहा),श्री.तिडके(मुदखेड),श्री.राजुरे(मुखेड,प्रभारी),श्रीमती पवार(धर्माबाद) यांना तीन महिन्यांपूर्वी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.एस.व्ही शिंगणे यांनी आदेशीत करूनही त्यांच्या आदेशाला संबधित बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवत पत्राकडे दुर्लक्ष केले.

फक्त फोटो काढण्यापूरते प्रशिक्षण घेऊन अनेकांनी प्रशिक्षण न घेता खोटा व दिशाभूल करणारा अहवाल प्रकल्प अधिकाऱ्यांकडे सादर करून पर्यवेक्षिकानी व विस्तार अधिकाऱ्यांनी शासनाच्या डोळ्यात उघडपणे धूळ फेकण्याचे काम केले आहे.ही बाब बालविकास प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर कठोर भूमिका घेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क) यांनी दिनांक ०१/११/२०२० रोजी संबधित बालविकास प्रकल्प अधिकारी यांना दिलेल्या पत्रात तीन दिवसांच्या आत चौकशी करून अहवाल सादर न केल्यास आपल्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियमानुसार कारवाई प्रस्तावित करण्यात येईल असे स्पष्ट पणे नमूद केले होते.परंतु तसे पत्र देऊनही संबधितांनी अहवाल सादर न केल्याने बालविकास विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
श्री शिंगणे यांच्या पत्रानुसार बालविकास प्रकल्प अधिकारी श्री चटलावर,श्री तिडके,श्री राजुरे,श्रीमती पवार यांच्यावर शिस्तभंगाच्या कार्यवाहीसह निलंबनाची कारवाई प्रस्तावित होणार का?की महिला व बालविकास विभाग दोषींना पाठीशी घालणार याकडे संपुर्ण नांदेड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Categories
नांदेड

नायगाव तालुक्यात रेतीची चोरटी वाहतूक आणि महसूल प्रशासन मूग गिळून गप्प..का?

नांदेड:दि.30.जिल्ह्यातील
नायगाव तालुक्यात रेती लिलावाचे कोणतेही टेंडेरिंग सद्या नसताना ही नदी पत्रातून व शासन ताब्यातील रेती साठ्यातून सर्रास पणे रेतीची चोरटी वाहतूक नायगाव महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकारी आणि ठेकेदार पत्रकार दलाल पुढारी यांच्या कृपा आशीर्वादाने चालू तर नाही ना….? रेतीची खुलेआम चोरी वाहतूक चालू असताना महसूल प्रशासन गप्प कसे असे प्रश्न जणसामान्यातून केले जात आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नायगाव तालुक्यातील कौडगाव, सतेगाव,बळेगाव आदी ठिकाणावरून वाळू माफियांनी तहसील प्रशासनातील व पोलीस प्रशासनातील अधिकारी दलाल पुढारी व ठेकेदार पत्रकार यांना हाताशी धरून गौण खनिज उतख्तनांचे नियम धाब्यावर बसवून रोज सर्रास पणे रेती चोरीचा गोरख धंदा रेती माफियांनी चालवला असल्याचे जनसामान्य माणसात बोलल्या जात आहे.रेती माफिया खुलेआम पणे रात्रीच्यावेळी तरफ्याच्या मदतीने रेतीचे उत्खनन व शासन ताब्यातील रेतीची चोरी करून अव्वाच्या सव्वा किमतीत बाजारात विक्री करीत आहेत.या अवैध रेती चोरीने महसूल प्रशासनास लाखोंचा फटका बसत आहे. याकरिता चोरीच्या रेती उत्खनाकडे व वाहतुकीकडे करडी नजर ठेवून या वाळू माफियांना आवर घालण्याची गरज असून याकडे महसुल प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांनी विशेष लक्ष देऊन रेतीची चोरी करणाऱ्या वाळू माफियावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Categories
नांदेड भोकर

भाजपा युवा मोर्चाच्या भोकर तालुकाध्यक्षपदी श्रीकांत किन्हाळकर

भोकर
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या भोकर तालुकाध्यक्षपदी बापूसाहेब गोरठेकर समर्थक श्रीकांत व्यंकटराव किन्हाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भोकर /अनिल डोईफोडे/येथील भाजपा पदाधिकाऱ्यांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नांदेड येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत युवा मोर्चाच्या भोकर तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी श्रीकांत किन्हाळकर यांच्यावर टाकण्यात आली. यावेळी खा. प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर , युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष किशोर देशमुख , जि प.सदस्या.सौ.प्रणिताताई देवरे , कुशाल पाटील उमरदरीकर यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले.या निवडीबद्दल जिल्हा उपाध्यक्ष दिलीप सोनटक्के, तालुकाध्यक्ष किशोर पाटील लगळुदकर, बाजार समितीचे संचालक गणेश पाटील कापसे, राजू अंगरवार, विशाल माने यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.
या निवडीनंतर किन्हाळकर म्हणाले की, खा. प्रताप पाटील आणि बापूसाहेब गोरठेकर यांनी माझ्यावर टाकलेल्या जबाबदारीला तडा जाऊ न देता मिळालेल्या पदाचा उपयोग युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी करीन. पक्षाची ध्येयधोरणे गावागावात पोहचविण्यासाठी काम करणार आहे.

Categories
नांदेड

नांदेड ते भीमा कोरेगाव मोटार सायकल रॅलीतील 12 जणांना घेतले ताब्यात

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि.29.रोजी भिमा कोरेगाव येथील विजय स्थंभास अभिवादन करण्यासाठी ड्रा.बाबा साहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पासून सुरुवात करण्यात आली होती. ही रॅली 1जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजय स्थभास अभिवादन करणार होते पण सध्या राज्यात चालू असलेल्या कोविड-19चे कारण सांगून तेथील प्रशासनाने आज पासून येणाऱ्या तीन दिवस जमावबंदीचे आदेश काडून या इतिहासिक ठिकाणी येणाऱ्याना प्रतिबधीत केले असल्यामुळे या रॅलीचे आयोजन करणाऱ्या 12 कार्यकर्त्यांना वजिराबाद पोलिसांचे पोलीस निरीक्षक शिवले यांनी तांब्यात घेऊन स्थानबद्ध केली आहे.

पहिले कर्त्यव्य मगचं घरच्यांचा विचार

खरे तर ज्याविजयी स्थंभास ही मंडळी अभिवादन करण्यासाठी जाणार होती.त्या शूरवीरांचे वजिराबाद पोलीस निरीक्षकहे त्यांचे वंशज आहेत.

Categories
नांदेड

31 डिसेंबर व नववर्षासंदर्भात नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि.28.शासन निर्णयान्वये दि. 22 डिसेंबर 2020 ते 5 जानेवारी 2021 या कालावधीत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. कोविड -19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता 31 डिसेंबर 2020 व नूतन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करणे अपेक्षित आहे.त्यादृष्टीने संपूर्ण नांदेड जिल्ह्याच्या हद्दीत 31 डिसेंबर 2020 व नुतन वर्षाचे स्वागत करावयाच्या संदर्भात खालीलप्रमाणे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.

कोरोनाच्या अनुषंगाने दि. 31 डिसेंबर 2020 रोजी दिवसभर संचारबंदी नसली तरी देखील सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व दि. 1 जानेवारी 2021 रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे.

31 डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी नदी किनारी,बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग (सामाजिक अंतर) राहील तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.नांदेड शहरातील काही ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असते त्यादृष्टीने कोरोनाचा प्रादूर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 60 वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात.अशावेळी त्याठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे.कोविड-19 या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पूनर्वसन, आरोग्य,पर्यावरण,वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका,पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहिल. तसेच या परिपत्रकानंतर 31 डिसेंबर 2020 व नूतन वर्ष सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती,संस्था,समुह भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005,मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहिले. परंतू आदेशाची अंमलबजावणी करताना सद्भावनेने केलेल्या कृत्यासाठी कोणत्याही अधिकारी,कर्मचाऱ्यांविरुद्ध कार्यवाही केली जाणार नाही, असे आदेश जिल्हदंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज निर्गमीत केले आहेत.

Categories
गुन्हेगारी नांदेड

भाग्यनगर पोलीसांनी एक चोरटा पकडला; चोरीची दुचाकी आणि सोन्याचे गंठण जप्त केले

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:25.डिसेंबर रोजी सप्तगिरी कॉलनीतील एका महिलेची 15 ग्रॅम सोन्याचे गंठन लुटणाऱ्या चोरट्याला भाग्यनगर पोलीसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून पकडले. त्याच्याकडून 75 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

सप्तगिरी कॉलनीतील रसिका रामराव कांबळे या आपल्या मुलीसह माणिकनगरकडे दुचाकीवर जात असतांना पाटील हॉस्पीटलसमोर एका गाडीवर आलेल्या अनोळखी माणसाने चालत्या मोटार सायकलवरून रसिका कांबळेची 15 ग्रॅम सोन्याचे एक गंठन बळजबरीने चोरून घेवून गेला होता.

27 डिसेंबर रोजी राज कॉर्नर ते चैतन्यनगर जाणाऱ्या रस्त्यावर एक दुचाकी क्रमांक एम.एच.26 बी.डी.1938 चा संशय पोलीसांना आल्याने त्यांचे सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्या दुचाकीच्या फिल्मीस्टाईल पाठलाग करून त्याला पकडले.त्याचे नाव शेख जावेद शेख जमालसाब (38) रा.लेबर कॉलनी नांदेड असे आहे.

या चोरट्याकडून पोलीसांनी 1938 क्रमांकाची 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी आणि 15 ग्रॅम सोन्याचे गंठन 45 हजार रुपयांचे असा 75 हजारांचा मुद्दमाल जप्त केला आहे. दुचाकी गाडी क्रमांक 1938 शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेली आहे.चोरट्याला पकडणाऱ्या पोलीस पथकाचे पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे,पोलीस उपअधिक्षक सिध्देश्र्वर भोरे यांनी भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक अभिमन्यु साळुंके,सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोद चव्हाण,पोलीस उपनिरिक्षक राजाभाऊ जाधव, पोलीस कर्मचारी संजय कळके, दत्ता वाणी,कमलाकर जायभाये, राजू कांबळे,प्रदीप गर्दनमारे आणि झगडे यांचे कौतुक केले आहे.

Categories
नांदेड

लोहा तालुक्यात तब्बल 6 जण कोरोना बाधित आढळले तर आरोग्य विभाग हादरले

लोहा तालुका प्रतिनिधी:शिवराज पवार

लोहा:आज दि. 28 डिसेंबर सायंकाळी 5 वाजेदरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नीळकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने निघालेल्या प्रेस नोट नुसार लोहा तालुक्यात तब्बल 6 जण कोरोना बाधित आढळल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे.
लोहा तालुक्यातील कोरोनाची साखळी पूर्णपणे खंडित करण्यासाठी नागरिकांसह आरोग्य विभागाने प्रयत्न चालविले होते.जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार व स्थानिक पातळीवर परिस्थितीचा आढावा घेवुन लोहा नगरपालीकेने वेळोवेळी जनता कर्फ्यु घोषित केला.आरोग्य विभाग प्रशासनाने देखील जीवाची पर्वा न करता लोकांची काळजी घेतली.वाखानण्याजोगे कार्य केले.कोरोनाचे बाधीतांचा आकडा दिवसागणिक कमी होत असतांनाच दिवाळी नंतर हळूहळू रुग्ण संख्येत भर पडत एक-एक करून वाढणारी संख्या कधी 2 तर आज दिनांक 28 डिसेंबर 2020 रोजी अँटीजन चाचणीद्वारे तब्बल 6 जण कोरोना बाधित आढळल्याने आरोग्य विभाग हादरलेआहे.आजच्या आकडेवारीने कोरोनाची संख्या वाढत असल्याने नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे,शासन प्रशासनाच्या कोरोना अटी, नियमांचे पालन न केल्यामुळे संभाव्य परिस्थिती निर्माण झाले असल्याचे दिसून येत आहे.सदरिल रिपोर्ट नुसार लोहा तालुक्यासहीत जिल्ह्याचीच आकडेवारी वाढल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.नागरीकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Categories
नांदेड

39 कोरोना बाधितांची भर तर दोघांचा मृत्यू 34 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि. 28 :- सोमवार 28 डिसेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 39 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 26 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 13 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 34 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आजच्या 909 अहवालापैकी 862 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 21 हजार 319 एवढी झाली असून यातील 20 हजार 263 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 285 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 13 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. रविवार 27 डिसेंबर रोजी तरोडा नाका नांदेड येथील 60 वर्षाच्या एका महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर देगलूर नाका नांदेड येथील 65 वर्षीय पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 572 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 20, माहूर तालुक्यांतर्गत 2, औरंगाबाद 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 1, मुखेड कोविड रुग्णालय 3, खाजगी रुग्णालय 5 असे एकूण 34 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.04 टक्के आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 20, माहूर तालुक्यात 1, कंधार 1, नांदेड ग्रामीण 1, लोहा 2, मुखेड 1 असे एकुण 26 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 5, लोहा तालुक्यात 6, मुदखेड 1, कंधार 1 असे एकुण 13 बाधित आढळले.

जिल्ह्यात 285 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 26, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 17, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 19, मुखेड कोविड रुग्णालय 21, देगलूर कोविड रुग्णालय 8, हदगाव कोविड रुग्णालय 5, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 132, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 39, हैद्राबाद येथे संदर्भीत 1, खाजगी रुग्णालय 17 आहेत.

सोमवार 28 डिसेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 162, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 63 एवढी आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 78 हजार 653
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 52 हजार 831
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 21 हजार 319
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 20 हजार 263
एकुण मृत्यू संख्या-572
उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.04 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-4
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-3
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-869
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-285
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-13.

Categories
नांदेड

नांदेड जिल्यात काँग्रेसचा 136 वर्धापन दिवस उत्साहात साजरा

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि.28.जिल्यात काँग्रेस पक्ष कार्यलयात 136 वा वर्धापन दिवस नांदेड जिल्हा काँग्रेस पक्ष्याचे जिल्हाध्यक्ष गोविंद पाटील नागेलीकर यांच्या हस्ते धोजारोहण करून उत्साहात साजरा करण्यात आला आहे. यावेळी महिला काँग्रेसच्या नांदेड जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगरानी अंबुलगेकर,महानगर पालिकेच्या महापौर मोहानीताई येवनकर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य मा. नागोराव केशवे,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मा.बी.आर.कदम,सचीव सुरेंद्र घोडजकर,कोषाध्यक्ष विजय येवनकर, अखिल भारतीय काँग्रेस कमेटी सदस्य (महिला )मंगलाताई निमकर, महिला जिल्हाध्यक्ष कविता कळसकर,मंगला धुळेकर,सुमती व्यहाळकर,एकनाथ मोरे, राम भारती, सेवा दाल जिल्हाध्यक्ष आनंद गुंडले,सतीश देशमुख, रोहिदास जाधव,निलेश पावडे,मासवर्गीय विभागाचे जिल्हाध्यक्ष गंगाधर सोंडारे,उमाकांत पवार, प्रमोद भुरेवार,संतोष देवराय,अनिता इंगोले,शिल्पा नरवाडे,नारायण श्रीरामवार,हरजीत सिंघ संधू, प्रबुद्ध बनसोडे,श्रीनिवास शिंदे, मसूद अहेमद खान,रोहिदास जाधव.बालाजी जाधव,गोविंद तोरणे,शिवराज कांबळे,सुनील अटकोरे,बालाजीराव पांडागळे, जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे.संजय पापटवार,नितीन वारपडे,नगरसेवक प्रतिनिधी सुरेश हटकर व सर्व नगरसेवक नगरसेविका.जिल्यातील काँग्रेस पदाधिकारी यांनी उपस्थितीथ होते.

Categories
नांदेड

तुर खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरु

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि. 28 :- जिल्ह्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत हंगाम 2020-21 मध्ये हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी मार्केटिंग फेडरेशनमार्फत ऑनलाईन शेतकरी नोंदणी आजपासून सुरु करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर जावून नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील यांनी केले आहे.

जिल्ह्यातील खरीप हंगाम 2020-21 साठी नांदेड (अर्धापूर), मुखेड,हदगाव, किनवट, बिलोली (कासराळी), देगलूर,कंधार,लोहा याठिकाणी मार्केटिंग फेडरेशनमार्फत ऑनलाईन शेतकरी नोंदणी आजपासून सुरु करण्यात आली आहे. या खरीप हंगामात तुरीचा हमीभाव प्रती क्विंटल 6 हजार रुपये आहे.जिल्ह्यातील शेतकरी बांधवानी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी चालू हंगामातील तुर या पिकांचा ऑनलाईन पिकपेरा नोंद असलेला सातबारा उतारा, आधारकार्ड व राष्ट्रीयकृत बँकेचे पासबूक प्रत आदी कागदपत्रे तालुक्यातील खरेदी केंद्रावर देऊन शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असेही आवाहन जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील यांनी केले आहे.

Categories
नांदेड भोकर

वंचित बहुजन आघाडी भोकर नगर परिषद निवडणूक लढविणार

भोकर तालुका प्रतिनिधी:दता बोईनवाड

भोकर:दि.28.वंचित बहुजन आघाडी भोकर नगरपरिषदेची निवडणूक लढविणार असल्याची घोषणा मराठवाडा वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष तथा पक्षनिरीक्षक दीपक डोके यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केली.
भोकर येथील संगम फंक्शन हॉल मध्ये रविवार दि.27 डिसेंबर रोजी वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांचा मेळावा नुकताच संपन्न झाला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते एल.ए.हिरे हे होते.प्रथम प्रास्ताविक नवनिर्वाचित वंचित बहुजन आघाडीचे भोकर ता.अध्यक्ष सुनील कांबळे यांनी पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर अध्यक्षपदाची धुरा टाकली तालुक्यात पक्ष संघटना बांधणीसाठी जोमाने कामाला लागणार असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना दीपक डोके म्हणाले राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर हे तमाम वंचित घटकांना न्याय देण्यासाठी सतत धडपडत असतात एकेकाळी भोकर मतदार संघात भारिप बहुजन महासंघाला चांगले दिवस होते अल्पशा मताने बहुजन उमेदवारांचा पराभव झाला पक्षाची पुनर्बांधणी करून कार्यकर्त्यांनी भोकर  नगरपालिका ताब्यात घेतली पाहिजे त्यासाठी जोमाने लागावे.
  यावेळी बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष भीमराव दुधारे म्हणाले भोकर नगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता असून नगरपालिका भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे.धनशक्तीच्या जोरावर सतेत आलेल्याना खाली खेचण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कामाला लागून निवडणुकीमध्ये आव्हान निर्माण करावे लागणार आहे.
यावेळी नांदेड शहर वंचित आघाडीचे महासचिव गौतम कापुरे,इजि.राज अटकोरे,भारिपचे माजी अध्यक्ष सुभाष तेले, तालुका वंचित आघाडीचे महासचिव बालाजी आनंतवाड, सुनील कांबळे किनीकर,शेख शबीर आदींनी विचार मांडले अध्यक्षीय समारोप करताना हिरे म्हणाले एकेकाळी भोकर मतदार संघात भारिप बहुजन महासंघाचा दबदबा होता.बहुजन मतदारांनी आम्हाला भरभरून मतदान केल्याने विधानसभेचे उमेदवार तीन वेळा दुसऱ्या क्रमांकावर ह़ोते भोकर ग्रा.प.वर सता आली जि.प.,प.स.चे उमेदवार ही निवडूण आले होते 2005 नंतर भारिपला गळती लागली होती.१डिसेंबर २०१८ला झालेल्या भिमा कोरेगाव दंगल प्रकरणात बाळासाहेबानी चांगली भुमिका घेतल्यानंतर जनता त्यांच्या पाठीशी एक वठली होती लोकसभेला चांगले मतदान झाले विधान सभा निवडणूकीत मात्र मतदान घटले,कार्यकर्ते एक दिलाने काम केले. मतदारसंघात पक्षाची बांधणी करणे गरजेचे असल्याचे सांगून नगरपालिका निवडणुकीमध्ये समविचारी पक्षासोबत यूती करूणे गरजेचे असल्याचे सांगितले.यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते आनंद एडके,विजय मोरे,माणिक जाधव,दत्ता शिरवळकर,दता गटुवाड,सम्यक चौदंते,बालाजी बाबळे,प्रशांत शहाणे, पूजा बनसोडे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.आभार गजू ढोले यांनी मानले.पक्ष निरीक्षक दीपक डोके,हिगोली जिल्हा वंचित ब.आघाडीचे अध्यक्ष वसीम देशमुख यांनी शहीद प्रफुल नगर,महात्मा फुले नगर समता नगर,शेख फरीद नगर,अशा अनेक वॉर्डांमध्ये भेटी देवून नागरिकांचे मते आजमावून घेतली.
 

Categories
उमरी नांदेड

ऑनलाईन सेवा विस्कळीत नेटवर्क डाऊन मुळे फॉर्म भरण्यासाठी अडचणीचा सामना करीत कडाक्याच्या थंडीत इच्छुक उमेदवाराची धावपळ!!

उमरी तालुका प्रतिनिधी;उद्धव मामडे रावधानोरकर
उमरी;तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीसाठीचा अर्ज भरण्याची कालवधी कमी असल्याने उमेदवार निवडणुकीसाठी अर्जासोबत लागणाऱ्या कागदपत्र काढण्यासाठी धावपळ करीत असल्यांचे चित्र तहसील कार्यालयाच्या परिसरात दिसून येत आहे.
तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूकाचे रंगधुमाळी सुरु झाले असुन या ग्रामपंचायतील सरपंच पदाचे आरक्षण ही जिल्हाधिकारी यांच्या सुचणेनुसार सोडण्यात आले होते. पण शासनाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत घोडे बाजार होऊ नये म्हणून सोडलेले आरक्षण रद्द करण्याचे आदेश देऊन सदरील आरक्षण हे निवडणुकीच्या नंतर सोडणार असल्याने इच्छुक उमेदवारांचे हिरमोड झाले असल्याने निवडणूकीत इच्छुक उमेदवारांचा खर्च व निवडणुकीसाठी लागणारे कागदपत्रे यांची जुळवाजुळवी करणार कोण? असा प्रश्न उपस्थित झाल्याने उमेदवारांना लागणारे कागदपत्रे काढण्यासाठी विलंब झाला असून आत्ता निवडणूकीसाठीचा अर्ज स्वीकारण्याची तारीख जवळ येताच उमेदवारांची पळापळी करून कागदपत्राची जुळवाजुळवी करीत आहेत.
ग्रामपंचायत निवडणूकीसाठी दि. २३ डिसेंबर ते 30 डिसेंबर पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत यात प्रत्येक गावातील इच्छुक उमेदवार आपले भवितव्य शोधण्यासाठी धावपळ धावपळ करून निवडणुकीसाठी लागणारे कागदपत्रे काढण्यासाठी जिवाचा आटापिटा करतांना दिसून येत आहे.

Categories
नांदेड

स्थानिक गुन्हा शाखेत परमेश्र्वराची परमेश्र्वरी ताकत

इतरांच्या बीटमध्ये हस्तक्षेप करून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:वरिष्ठ अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देवून दोन अधिकाऱ्यांमध्ये दरी निर्माण करणाऱ्या स्थानिक गुन्हा शाखेतील एका सहाय्यक पोलीस उपनिरिक्षकाने आपले बीट सांभाळून इतरांच्या बीटमध्ये हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली असून गुपचूपपणे खंडणीचे प्रकार त्यात घडतात अशी धक्कादायक माहिती हाती आली आहे.

भ्रष्टाचार कायदा 1988 पासून आला असला तरी भ्रष्टाचार हा अर्वाचीन काळापासून सुरू आहे. अनेक कारणांनी कुटूंबात सुध्दा भ्रष्टाचार होत असतो.पण त्यावर कार्यवाही होत नसते.त्यामुळे भ्रष्टाचार हा विषय खुप मोठा आहे किंवा त्यावर चर्चा करण्याची गरज आहे.अशी आजची परिस्थिती नाही.भारतीय पोलीस सेवेत राज्य पोलीस सेवेत कार्यरत होतांना आपल्याला दिलेली शपथ आपण लक्षात ठेवली तर आपल्या हातून कांही वाईट घडणार नाही.पण नेमके तेच आपण करत नाही.अशी परिस्थिती आज आहे आणि या परिस्थितीला कधी चर्चेत आणले तर चर्चा करणाऱ्यांना मुर्खात काढले जाते आणि आम्हीच बरोबर आहोत असे प्रमाणपत्र निर्गमित केले जाते.त्यामुळे भ्रष्टाचाराबद्दल बोलण्याची कांही एक मुभा नाही आणि कोणी बोललेच तर त्याची किंमत पण केली जात नाही.कारण भ्रष्टाचार हा पुर्णपणे आपल्या शरीरातील रक्त वाहिण्यातून वाहणाऱ्या रक्ताप्रमाणे आपल्या जीवनाला भिनला आहे.

नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेत एक सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक (ए.एस.आय.) परमेश्र्वर थानुसिंग चव्हाण असे त्यांचे नाव आहे.स्थानिक गुन्हा शाखेत त्यांचे नाव सहाय्यक पोलीस निरिक्षक (ए.पी.आय.) असे संबोधले जाते. त्यांनी आणि त्यांच्या एका सहकाऱ्याने मिळून दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांबदल आपसात मोठी दरी निर्माण होईल असे सादरीकरण केल्यानंतर दोघांची तैनाती मांडवी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानंतर श्री.परमेश्र्वरजी चव्हाण यांनी अनेक उंबरठे झिजवल्यानंतर पुन्हा त्यांना स्थानिक गुन्हा शाखेत घेण्यात आले.त्यानंतर कांही दिवसांनी त्यांचा दुसरा सहकारी पण आला. या दोघांना पुन्हा स्थानिक गुन्हा शाखेत आणले तेंव्हा त्यांना बऱ्याच सुचना देण्यात आल्या होत्या. पण उगवणारे पिक कोणालाच नको नसते ना आणि हे पिक कसे उगवायचे यामध्ये श्री परमेश्र्वरजी चव्हाण यांचा मोठा हातखंडा आहे. त्याचा वापर करत त्यांनी आपल्यासाठी एक स्वतंत्र कक्ष तयार करण्याची भली मोठी योजना आखली होती. त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी त्यांच्या या योजनेला पाठींबा सुध्दा दाखवला होता. पण कोठे माशी शिंकली हे कोणालाच कळले नाही आणि त्यांचा कक्ष आज दि.28 डिसेंबर पर्यंत तरी तयार झाला नव्हता.

शेतातील पिके त्यांच्या वेळेप्रमाणे उगवतात आणि शेतकऱ्याला उत्पादन देतात.पण परमेश्र्वर चव्हाणमध्ये पोलीस शेतीत हंगाम नसतांना पिक उगविण्याची कला भली मोठी आहे. खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक हंगाम संपला म्हणजे एक महिना संपला कि नवीन महिन्यात त्या हंगामाला दुपटीने उगवण आणण्याची शक्ती श्री पमेश्र्वरजी चव्हाण यांच्यात आहे. असे ना का? पण नांदेडमध्ये जगणाऱ्या लोकांना परमेश्र्वर चव्हाण यांची ही कला भारतीय दंडसंहितेच्या कलम 384, 385, 392 सारखी वाटते. कांही लोक आता आत्महत्या करण्याच्या तयारीत आले आहेत. परमेश्र्वरजी चव्हाण यांच्याकडे 20 लाख रुपये किंमतीची चार चाकी गाडी आहे म्हणे, नांदेडपासून 130 किलो मिटर अंतरावर एक तीन मजली इमारत ज्याची किंमत एखाद्या खोक्याची असेल अशी ती इमारत त्यांच्या मालकीची आहे म्हणे.आपल्या सेवाकाळात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा सोसण्याची ताकत श्री परमेश्र्वर चव्हाण यांना परमेश्र्वराने दिलेली आहे.

पोलीस खात्यात बीट हा एक प्रकार आहे. त्यांच्यातील परमेश्र्वरी ताकतीप्रमाणे त्यांना बरेच बीट प्राप्त आहेत.स्थानिक गुन्हा शाखेत एकच बीट मिळविण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना गुढगे घासावे लागतात.आपल्या बीटला सांभाळून इतरांच्या बीटमध्ये हस्तक्षेप करण्याची परमेश्र्वरी ताकत आणखी पाच-दहा इमारती,दहा-वीस गाड्या मिळेपर्यंत कायम राहो अशीच परमेश्र्वराकडे प्रार्थना.मुझको भी तो लिफ्ट करादे,थोडीसी तो भी लिफ्ट करा दे,कैसे कैसे को दिया है हे अदनान सामीचे गाणे किती छान आहे.
स्थानिक गुन्हा शाखेतील परमेश्र्वराने आपली ताकत गुन्हेगारांवर वापरली तर किती छान होईल.जे गुन्हेगार सर्वसामान्य माणसाला त्रासदायक आहेत.त्याबद्दल भारतीय दंडसंहितेतील कोणतेही कलम वापरले तर परमेश्र्वरावर त्याबद्दल कोणी आक्षेप घेणार नाही.पोलीस दलाच्या माध्यमातून समाजाचे भले करण्याचे व्रत अंगीकारून गुन्हेगारांना भिती निर्माण केली तर किती मोठे कर्तव्य ते मानले जाईल.

Categories
गुन्हेगारी नांदेड

महिला पोलीस कर्मचाऱ्याची चार चाकी गाडी चोरीला गेली

सहा घटनांमध्ये 6 लाख 84 हजारांचा ऐवज लंपास

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:बाळापूर ता.धर्माबाद येथील एक प्राथमिक शाळा फोडून चोरट्यांनी 24 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. हिमायतनगर येथील एक दुकान फोडून चोरट्यांनी 60 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. शहरातील वजिराबाद आणि शिवाजीनगर तसेच नायगाव येथून 1 लाख 10 हजार रुपये किंमतीच्या तीन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत.पोलीस कॉलनी स्नेहनगर येथून एका महिला पोलीसाचे चार चाकी वाहन चोरीला गेले आहे.एकूण 6 प्रकारांमध्ये 6 लाख 84 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला आहे.

शहरातील स्नेहनगर येथे असलेल्या पोलीस वसाहतीमध्ये उकाताई मालू जाधव या महिला पोलीस कर्मचारी(बकल नंबर 2961) ह्या राहतात.त्यांचे घर वैनगंगा इमारतीमध्ये आहे. 23 डिसेंबरच्या रात्री 10 ते 24 डिसेंबरच्या पहाटे 7 वाजेदरम्यान त्यांची चार चाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.क्यू.5072 ही गाडी चोरीला गेली.या गाडीची किंमत 4 लाख 90 हजार रुपये आहे.भाग्यनगर पोलीसांनी या प्रकरणी गुन्ह दाखल केला असून पोलीस नाईक मंगनाळे अधिक तपास करीत आहेत.

शहरातील वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंगोली गेट येथून राजेश केंद्रे यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.एस.0717 ही 50 हजार रुपये किंमतीची गाडी 26 नोव्हेंबरच्या सकाळी 9.30 ते 9.45 या वेळेदरम्यान चोरीला गेली.या गाडीची किंमत 50 हजार रुपये आहे.वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस हवालदार शिंदे हे करीत आहेत. परसराम भोसले यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.बी.1938 ही दुचाकी गाडी 24 डिसेंबरच्या दुपारी 3 वाजेच्यादरम्यान चोरीला गेली आहे.या गाडीची किंमत 25 हजार रुपये आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस नाईक पाटील करीत आहेत.अंकुश चंद्रकांत पाटील यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.12 एल.एन.6303 ही दुचाकी 24 नोव्हेंबर ते 25 डिसेंबर दरम्यान त्यांच्या घरासमोरून मौजे रातोळी येथून चोरीला गेली.या गाडीची किंमत 35 हजार रुपये आहे. नायगाव पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार वडजे अधिक तपास करीत आहेत.

बाळापूर ता.धर्माबाद येथील जि.प.शाळेचे मुख्याध्यापक संतोष दिनकरराव नाईक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 24 डिसेंबरच्या पहाटे 4.30 ते 26 डिसेंबरच्या सकाळी 9.30 वाजेदरम्यान शाळेचे दक्षीण बाजूकडील खिडकीचे गज काढून कोणी तरी चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि संगणकाचे विविध साहित्य असा एकूण 24 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.धर्माबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरिक्षक सनगले हे करीत आहेत.

हिमायतनगर येथील रुक्मीणीनगर भागातील गिरीष अरविंद चिंतावार यांचे दुकान चोरट्यांनी 20 डिसेंबरच्या रात्री 8 ते 21 डिसेंबरच्या पहाटे 4.30 वाजेदरम्यान फोडले.त्यातून वेगवेगळे साहित्य असा 60 हजारांचा ऐवज चोरून नेल आहे. हिमायतनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केल असून पोलीस नाईक लक्षटवार अधिक तपास करीत आहेत.

Categories
उमरी नांदेड

निवडणूकीसाठी लागणाऱ्या कागदपत्राची जुळवाजुळवी

उमरी तालुका प्रतिनिधी;उद्धव मामडे रावधानोरकर

उमरी:तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीसाठीचा अर्ज भरण्याची कालवधी कमी असल्याने उमेदवार निवडणुकीसाठी अर्जासोबत लागणाऱ्या कागदपत्र काढण्यासाठी धावपळ करीत असल्यांचे चित्र तहसील कार्यालयाच्या परिसरात दिसून येत आहे.
तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूकाचे रंगधुमाळी सुरु झाले असुन या ग्रामपंचायतील सरपंच पदाचे आरक्षण ही जिल्हाधिकारी यांच्या सुचणेनुसार सोडण्यात आले होते.पण शासनाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत घोडे बाजार होऊ नये म्हणून सोडलेले आरक्षण रद्द करण्याचे आदेश देऊन सदरील आरक्षण हे निवडणुकीच्या नंतर सोडणार असल्याने इच्छुक उमेदवारांचे हिरमोड झाले असल्याने निवडणूकीत इच्छुक उमेदवारांचा खर्च व निवडणुकीसाठी लागणारे कागदपत्रे यांची जुळवाजुळवी करणार कोण? असा प्रश्न उपस्थित झाल्याने उमेदवारांना लागणारे कागदपत्रे काढण्यासाठी विलंब झाला असून आत्ता निवडणूकीसाठीचा अर्ज स्वीकारण्याची तारीख जवळ येताच उमेदवारांची पळापळी करून कागदपत्राची जुळवाजुळवी करीत आहेत.
ग्रामपंचायत निवडणूकीसाठी दि. २३ डिसेंबर ते 30 डिसेंबर पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत यात प्रत्येक गावातील इच्छुक उमेदवार आपले भवितव्य शोधण्यासाठी धावपळ धावपळ करून निवडणुकीसाठी लागणारे कागदपत्रे काढण्यासाठी जिवाचा आटापिटा करतांना दिसून येत आहे.

Categories
गुन्हेगारी नांदेड

पळवलेला बालक स्थानिक गुन्हा शाखेने 60 मिनिटात सुरक्षीत केला

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:27 डिसेंबर रोजी गायब झालेला एक बालक स्थानिक गुन्हा शाखेने 60 मनिटाच्या आत आपल्या ताब्यात घेवून त्याची सुरक्षा केली.याबद्दल स्थानिक गुन्हा शाखेचे कौतुक करायलाच हवे.

मौजे सरेगाव ता.मुदखेड येथून रुपेश कामाजी गिरे (19) या बालकाला कोणी तरी 27 डिसेंबर रोजी दुपारी अज्ञात कारणासाठी अज्ञात माणसांनी पळवून नेल्याचा प्रकार घडला.माहिती प्राप्त होताच स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी आपल्या पथकातील सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल नाईक, राजेश आलेवार,पोलीस कर्मचारी शंकर मैसनवाड, मातोराम पवार,गजानन बैनवाड, शंकर केंद्रे आणि सखाराम नवघरे यांना या बालकास शोधण्याची जबाबदारी दिली.या पोलीस पथकाने 60 मिनिटातच या बालकाला नांदेडच्या रेल्वे स्थानकावरून आपल्या ताब्यात घेतले.पुढील कार्यवाहीसाठी या बालकाला बारड पोलीसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पोलीस अधिक्षक प्रमोदकुमर शेवाळे,अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी अत्यंत जलदगतीने कार्यवाही करणाऱ्या पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.

Categories
नांदेड

40 वर्ष सत्ता राखणारा नेता हरपला

नांदेडमधील ग्रामपंचायतीत आता भाजप vs भाजप

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि.28.मधील मरळक गावात बापूराव शिंदे यांच्या निधनामुळे मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे.

नांदेड तालुक्यातील मरळक ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे. जागृत महादेवाचे मंदिर असल्याने मरळक गावाला तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे. महादेव मंदिरामुळे सबंध जिल्ह्यात मरळक गावाची ओळख आहे. 40 वर्ष सत्ता राखणाऱ्या नेत्याच्या निधनानंतर या गावातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे दोन गट आमनेसामने आल्याने चर्चा रंगली आहे.

मरळक ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सध्या अनेकांचे उमेदवारी अर्ज भरणे सुरु आहे . या गावाची लोकसंख्या 6000 असून गावात 2500 मतदार आहेत.गावातील ग्रामपंचायतीची सदस्य संख्या 11 आहे.मरळक ग्रामपंचायत पूर्वी भाजपच्या ताब्यात होती.

बापूराव शिंदेंच्या निधनानंतर राजकीय पोकळी

गावातील बापूराव शिंदे यांच्या गटाकडे ग्रामपंचायतीची सत्ता आहे.गेल्या चाळीस वर्षांपासून शिंदे यांचा शब्द हा गावासाठी प्रमाण होता. मात्र गेल्या वर्षी बापूराव शिंदे यांचं निधन झालं. त्यामुळे गावात मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे.

बापूराव शिंदेंच्या निधनामुळे मरळक गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजप अशी लढत होणार आहे. एक जुना भाजप गट आणि एक नवखा भाजप गट अशा दोन्ही गटांनी आपापली कंबर कसली आहे.गावात ताकदवान असलेल्या स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड संघटनेचे कार्यकर्ते भाजपच्या जुन्या गटासोबत आहेत.

भाजपच्या नव्या गटासोबत शिवसेना-काँग्रेस

दुसरीकडे,शिवसेना आणि काँग्रेस भाजपच्या दुसऱ्या गटासोबत असल्याने भाजप विरुद्ध भाजप अशीच लढत या गावात राहणार आहे. त्यामुळे भाजपच्या नव्या-जुन्या पुढाऱ्यात या गावात सामना रंगणार आहे. त्यामुळे मरळक ग्रामपंचायतच्या निवडणुकीकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.

सायाळ ग्रामपंचायत : भाजप-काँग्रेसमध्ये चढाओढ

नांदेड तालुक्यातील सायाळ ग्रामपंचायतीवर काँग्रेसची दीर्घकाळ सत्ता राहिली आहे. मात्र आता सायाळमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यात मोठी वाढ झाली आहे.त्यामुळे नऊ सदस्य संख्या असलेल्या सायाळमध्ये सत्तेसाठी भाजप-काँग्रेसमध्ये चढाओढ लागली आहे. अवघे अठराशे मतदार असलेल्या या गावाच्या निवडणुकीत मतदारांची आतापासून बडदास्त ठेवण्यात येत आहे.

दर्यापूरची बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम

नांदेड तालुक्यातील दर्यापूर इथल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोधपणे काढण्याचे जाहीर केलं आहे. दर्यापूर या गावाने गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याची परंपरा जोपासली आहे.गावात बहुसंख्य असणाऱ्या मराठा समाजाने वादविवाद टाळण्यासाठी ही प्रथा जोपासली आहे.या गावाची लोकसंख्या 740 असून गावकऱ्यांनी एकोपा आणि बंधुभाव कायमस्वरुपी जपला आहे.त्यातून जिल्ह्यात एक चांगले गाव म्हणून दर्यापूर गावाने आपली ओळख निर्माण केली आहे.

Categories
नांदेड

धर्माबाद शहर व तालुका काँग्रेस कमिटी तर्फे कॉग्रेस स्थापना दिवस साजरा

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:जिल्यातील धर्माबाद येथे सोमवार दि.28 डिसेंबर 2020 रोजी सकाळी11ः 00 वा.काँग्रेस स्थापना दिनानिमित्त तालुका पक्ष कार्यालय धर्माबाद येथे देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी कॉग्रेस पक्षाच्या शंभर वर्षांपूर्वी च्या व स्वातंत्र्याच्या काळातील कॉग्रेसच्या योगदानाबद्दल व पक्षातील मागील काळात जेष्ठ नेत्यांच्या पक्षनिष्ठेचे उदाहरण देऊन कार्यकर्त्यांनी व पदाधिकार्यानी त्यांचे आदर्श समोर ठेऊन काम करावे असे गोविंदराव पाटील रोषणगावकर यांनी मनोगत व्यक्त केले.कॉग्रेसच्या महान नेत्यांचे देशावरचे बलिदान व्यर्थ जाणार नाही येणाऱ्या काळात कॉग्रेस ला चांगले बळ मिळेल असे मत नगरसेवक सायारेड्डी यांनी मांडले.
महाराष्ट्रातील व नादेंड जिल्ह्यातील युवक काँग्रेस भक्कम असून युवक व जेष्ठ नेत्यांची मोठ बांधून काम केल्यास नांदेड जिल्हयासह धर्माबाद तालुका व शहर कॉग्रेस मय झाल्याशिवाय राहणार नाही.असे प्रखट मत नगरसेवक निलेश पाटील बाळापुरकर यांनी व्यक्त केले.तरी या कार्यक्रमांच्या अध्यक्ष स्थानी तालुका अध्यक्ष दत्ताहरी पाटील चोळाखेकर हे होते तर प्रास्ताविक शहराध्यक्ष ताहेर पठाण यांनी केले तर आभार मारोती माकणे यांनी मानले. यावेळी महाराष्ट्र सामाजिक सुरक्षा समितीचे नांदेड जिल्हाध्यक्ष तथा मागासवर्गीय विभागाचे तालुका अध्यक्ष संजीवकुमार गायकवाड माजी नगराध्यक्ष दिगंबर लखमावाड,विठ्ठल कोंडलवाडे, प्रतिष्ठीत व्यापारी संजय कोडगिरे, पाटोदा येथील जारीकोटे पाटील,राम पाटील नायगाव, सय्यद बाबर,मिनाजी लखमावाड,व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते

Categories
नांदेड

बाभळी बंधाऱ्याची सुरक्षा वाऱ्यावर

गेट क्रमांक आठच्या बेसमेंट मधून पाण्याचा प्रवाह चालू सुरक्षा बांधलाही भयंकर भेगा
भविष्यात दुर्घटना होण्याचे संकेत

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड:दि.28.धर्माबाद आंध्र प्रदेश व महाराष्ट्राच्या वादाने ढवळून निघालेल्या व सर्वोच्च न्यायालयाच्या अटी नियमाच्या अधीन राहून पूर्णत्वास गेलेल्या बाभळी बंधाऱ्याची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र दिसत असून, गेट क्रमांक आठच्या पायालाच मोठे भगदाड पडल्यामुळे तेथून गेट बंद असतानाही खालच्या बाजूने पाण्याचा मोठा प्रवाह चालू असल्याचे चित्र असून, सुरक्षा बांधलाही फार मोठ्या भेगा पडल्यामुळे भविष्यात फार मोठी दुर्घटना घडली घडण्याचे संकेत मिळत असून या बाबीकडे प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याची गरज जाणकार बोलून दाखवत आहेत. बाभळी बंधारा हा महाराष्ट्र व तत्कालीन आंध्र प्रदेश व सद्यस्थितीत तेलंगाना सीमेपासून अवघ्या सात किलो मीटर आत महाराष्ट्राच्या सीमेत धर्माबाद तालुक्यातील बाबळी येथे बांधण्यात आला. बाभळी बंधाऱ्याच्या पाण्याची क्षमता केवळ दोन पॉईंट 74 अब्ज घनफूट आहे.यावर्षी पावसाळ्यात मुबलक पाऊस पडल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 28 ऑक्टोबर पासून बाभळी बंधाऱ्याचे गेट लावण्यात आल्यामुळे मुबलक पाणीसाठा निर्माण झाला आहे.बाभळी बंधाऱ्याचे सभोवताली अगदी नयनरम्य चित्र दिसत असले तरी गेट क्रमांक आठच्या पायथ्याशी मोठे भगदाड पडले असून तेथून पाण्याचा प्रवाहात चालू आहे. हे भगदाड भविष्यात उग्र रूप धारण केले तर बाभळी बंधारा दुर्घटनेच्या स्वरूपात समोर येण्याची शक्यता असून बाबळी बंधाऱ्याच्या सुरक्षा बांधालाच भयंकर भेगा पडल्या असून त्या भागांची खोली जवळपास तीन फुटापर्यंत पोहोचल्याचे चित्र सद्यस्थितीत दिसत आहे. भविष्यात ही खोली जर वाढली तर हा बांध तुटून सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटातील दुर्घटने प्रमाणे बंधाऱ्या खालील गावांना धोका पोहोचण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत बाबळी बंधाऱ्यावर कोणताही सक्षम अधिकारी दररोज उपस्थित नसल्याचे चित्र असून, फक्त एक डे-नाईट वाचमेन बाभळी बंधाऱ्याची अल्प मानधनावर सुरक्षा करीत असल्याचेही चित्र आहे. चौकट बाभळी बंधाऱ्याच्या डागडुजीसाठी प्रतिवर्षी किमान दहा लक्ष रुपये खर्च राखीव असून तो खर्च होतो किंवा नाही या गोष्टीकडे ही लक्ष देणे गरजेचे आहे बंधाऱ्याच्या सुरक्षा बांधाच्या बाजूने काटेरी कुंपण झाडे-झुडपे प्रचंड प्रमाणात वाढली आहे त्या झाडांच्या मुळ्या बांधात घुसून नुकसान पोहोचत आहेत उपरोक्त पृष्ठभूमीवर भविष्यातील दुर्घटना टाळावयाची असल्यास संबंधित प्रशासनाने बाभळी बंधाऱ्याची सद्यस्थिती काय आहे यासंदर्भात उच्चस्तरीय समिती नेमून बाभळी बंधाऱ्याच्या सुरक्षेविषयी अभ्यासपूर्ण अंदाज घेणे गरजेचे आहे.
यासंदर्भात बाभळी बंधारा प्रकल्पचे उपविभागीय अभियंता अनिल पडवळ यांना भ्रम्नधव्नीवरून विचार पुस केल्यास म्हणाले की,बंधाऱ्यात असलेल्या पाण्याची गळती होऊनये,यासाठी प्लाटमध्ये रबर सील बसविलेले असते,सदरील रबर सील मधून पाणी प्लाट मध्ये पडत आहे.पाण्याची पातळी त्या बाजूला जास्त असल्यामुळे सदरील ठिकाणी पाण्याची गळती रबर सील मधून होत असले. परंतु बंधाऱ्याला कुठलेच भेगा पडलेले नाहीत.व बंधाऱ्यांच्या देखरेख ठेवण्यासाठी कुलीच निधी वर्षाकाठी आलेली नाही.उलट बंधाऱ्यावरील संबंधित अभियंताची पोस्टींग दुसरीकडे करण्यात आली आहे.सध्या बंधाऱ्याच्या देखभालीसाठी दोन कर्मचारी आहेत.परंतू ते दोन्ही कर्मचारी सध्या पाणीपट्टी वसुली करण्यासाठी फिरत असल्याचे अनिल पडवळ यांनी बोलताना सांगितले आहे.

Categories
नांदेड भोकर

भाजपा युवा मोर्चाच्या भोकर तालुकाध्यक्षपदी श्रीकांत किन्हाळकर

भोकर प्रतिनिधी दत्ता बोईनवाड
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या भोकर तालुकाध्यक्षपदी बापूसाहेब गोरठेकर समर्थक श्रीकांत व्यंकटराव किन्हाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भोकर येथील भाजपा पदाधिकाऱ्यांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नांदेड येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत युवा मोर्चाच्या भोकर तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी श्रीकांत किन्हाळकर यांच्यावर टाकण्यात आली. यावेळी खा. प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर , युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष किशोर देशमुख , जि प.सदस्या.सौ.प्रणिताताई देवरे , कुशाल पाटील उमरदरीकर यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले.या निवडीबद्दल जिल्हा उपाध्यक्ष दिलीप सोनटक्के, तालुकाध्यक्ष किशोर पाटील लगळुदकर, बाजार समितीचे संचालक गणेश पाटील कापसे, राजू अंगरवार, विशाल माने यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.
या निवडीनंतर किन्हाळकर म्हणाले की, खा. प्रताप पाटील आणि बापूसाहेब गोरठेकर यांनी माझ्यावर टाकलेल्या जबाबदारीला तडा जाऊ न देता मिळालेल्या पदाचा उपयोग युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी करीन. पक्षाची ध्येयधोरणे गावागावात पोहचविण्यासाठी काम करणार आहे.

Categories
नांदेड

इंग्लंडहुन कोरोना नांदेडात दाखल

नांदेड:दि.27.कोरोनाचा प्रभाव काही प्रमाणात कमी होत असतानाच इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूचे नवे रुप समोर आले आहे.हा नवा विषाणू सुपरस्प्रेडर म्हणजे अतिशय वेगाने पसरणारा असल्याचे त्या देशातील बातम्यांमधून पुढे आले आहे.त्यामुळे या नव्या विषाणूची साऱ्या जगाने धास्ती घेतली आहे.

१२ डिसेंबरला आलेले दोन प्रवासी पॉझिटिव्ह

संपर्कातील दहाजण रुग्णालयात क्वारंटाईन

इंग्लंडहून नांदेडला परतलेल्या दोन प्रवाशांना गेल्या १२ डिसेंबरला कोरोना विषाणूची बाधा झाल्याचे तपासणीदरम्यान समोर आले आहे.गृह विलगीकरणानंतर हे दोघेही कोरोनातून बाहेर पडले असले तरी खबरदारीचा उपाय म्हणून या दोघांसह त्यांच्या संपर्कात आलेल्या एकूण दहा जणांना जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील विलगीकरण कक्षात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.

कोरोनाचा प्रभाव काही प्रमाणात कमी होत असतानाच इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूचे नवे रुप समोर आले आहे. हा नवा विषाणू सुपरस्प्रेडर म्हणजे अतिशय वेगाने पसरणारा असल्याचे त्या देशातील बातम्यांमधून पुढे आले आहे. त्यामुळे या नव्या विषाणूची साऱ्या जगाने धास्ती घेतली आहे.

जगभरात अजूनही यावर संशोधन सुरू आहे.भारतात 22 डिसेंबरपासून इंग्लंडहून येणार्‍या व जाणार्‍या सर्व विमानसेवा बंद करण्यात आल्या आहेत. तत्पूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून संबधित देशातून आलेल्या सर्व प्रवाशांना विमानतळावरच ताब्यात घेऊन सक्तीने विलगीकरणात पाठविले जात आहे.बॉलिवूडच्या अनेक कलाकारांसह अतिमहत्वाच्या व्यक्तींनाही त्यातून कोणतीच सूट दिली गेली नाही.

विमानसेवा बंद झाली असली तरी गेल्या महिनाभरापासून कोरोनाचा नवा विषाणू इंग्लंडसह युरोपीयन देशात पसरल्यामुळे त्या देशांमधून मागील महिन्याभरात परतलेल्या सर्व प्रवाशांची यादी शासनाने संबंधित जिल्हाधिकारी व महापालिकेकडे पाठविली आहे.त्यानुसार नांदेड शहरात दाखल झालेल्या आठ ते दहा प्रवाशांना जिल्हा प्रशासनाने जिल्हा शासकीय रुग्णालयात सक्तीच्या विलगीकरणात पाठविले आहे.

नांदेड शहरातील काबरानगर, तरोडा नाका,वसंतनगर व पाटनूूरकरनगर या चार परिसरातील पाच कुटुंब नांदेडमध्ये 10 ते 12 डिसेंबरदरम्यान विमानाने दाखल झाले.या सर्वांची विमानतळावरच कोरोना चाचणी केल्यानंतर 12 डिसेंबर रोजी त्यातील दोन पुरुष प्रवासी पॉझिटिव्ह आढळले. त्यांना तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर प्रवाशांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले. परंतु केंद्र आणि राज्य शासनाने 22 डिसेंबर रोजी सुधारीत सूचना जारी करून खबरदारीचा उपाय अशा प्रवाशांना सक्तीच्या संस्थात्मक विलगीकरणाचे निर्देश दिले आहेत.त्यामुळे या दोन प्रवाशांसह त्यांच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील आठ जणांना शुक्रवारी (दि.25) जिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात देखरेखीसाठी दाखल करून घेण्यात आले आहे.या सर्वांना सध्या कोणतीही लक्षणे नाहीत,तसेच त्यांचा आहार नियमितपणे चांगला सुरू असल्याचे सांगण्यात येते.

दोन बाधित प्रवाशांचे स्वॅब पुण्याला पाठविले!

इंग्लंडहून परतलेले जे दोन रुग्ण नांदेडमध्ये १२ डिसेंबर रोजी पॉझिटिव्ह आढळले होते. आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार ते आता कोरोनामुक्त झाले आहेत.त्यांना भारतात आल्यानंतर कोविडची लागण झाली होती की इंग्लंडमधूनच विषाणूंचा त्यांच्या शरीरात शिरकाव झाला, यावर संशोधन करण्यासाठी दोघांचेही आरटीपीसीआर स्वबचे नमुने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संशोधन प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्यांच्यात आढळलेला कोरोनाचा विषाणू हा नेहमीचा आहे की वेगवान पसरणारा नवा विषाणू आहे, याची सविस्तर माहिती हाती येण्यासाठी किमान आठ दिवसांचा कालावधी लागेल.तोपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या दोन्ही प्रवाशांना तसेच त्यांच्या संपर्कातील इतर प्रवासी तसेच कुटुंबीयांना रुग्णालयातील विलगीकरणात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. शासन निर्देशानुसार त्यावर पुढील प्रक्रिया केली जाईल,असे नोडल ऑफिसर डॉ.निळकंठ भोसीकर यांनी सांगितले.

Categories
नांदेड

भोकर येथे युवक काँग्रेस ची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि.27.भोकर येथे युवक काँग्रेस ची महत्वपूर्ण बैठक दि २६ रोजी चिंचाळकर काम्पलेक्स येथे युवव चे जिल्हा अध्यक्ष पप्पू पाटील कोंडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आढावा बैठक पार पडली.

या बैठकीत मदन देशमुख अध्यक्ष भोकर विधानसभा काँग्रेस, संदीप सोनकांबळे नगरसेवक नांदेड, मा.नगरअध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर सह आदि.

प्रमुख कार्यकर्त्यांनी मार्गदर्शक करून कार्यक्रमाचा आढावा घेतला व पुढील कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली तसेच ग्रामपंचायत नगरपरिषद निवडणूक हा मुद्दा लक्षात घेऊन जास्तीत जास्त कार्यकर्तेना सहभाग करून घेण्यासाठी काही धोरणे ठरवण्यात आली.यावेळी केशव पाटील,शहर अध्यक्ष खाजूभाई ईनामदार,साहेबराव सोमेवाड,मधुकर गोवंदे.विक्रम क्षीरसागर,मनोज गिमेकर विलास हटकर
सना इनामदार,गौतम भाऊ कसबे,शेख साबेर,अफरोज इनामदार,सय्यद अशपाक(आशु),आरेफ इनामदार, तोसिफ इनामदार, गोविंद देशमुख,शिवेवार, मो.जमील मामू,इम्तितिया ईनामदार,आदि मान्यवर उपस्थित होते.या बैठकीला तरुणांची उपस्थिती ही लक्षणीय ठरली. सुमारे १५० युवक यात सामील झाले होते.बैठकीचे नियोजन युवक काँग्रेस पक्षाचे विकास क्षीरसागर,व गोविंद मेटकर यांनी केले होते.

Categories
नांदेड

व्हीसेरा तपासणीतील दिरंगाई दुर करण्यासाठी शासनाने केले नियोजन

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि.26.न्यायवैधक प्रयोग शाळेला तपासणीसाठी पाठवलेले व्हीसेरा अहवाल तीन-तीन वर्ष प्रलंबित राहत असल्याने महाराष्ट्राच्या मानवी हक्क आयोगाने स्वत: याचिका दाखल करून दिलेल्या आदेशाप्रमाणे मुंबईसह राज्यभरातील पोलीसांना त्यांच्याकडील व्हीसेरा अहवाल तपासणीसाठी कोठे पाठवायचे याबद्दलचा सविस्तर शासन निर्णय वैद्यकीय शिक्षक व औषधी द्रव्य विभागाच्या कार्यासन अधिकारी स्वाती लोहार यांच्या डिजिटल स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आला आहे.

एखाद्या व्यक्तींच्या मृत्यूनंतर त्याचा प्राथमिक श्वविच्छेन अहवाल तयार होतो. तरीही सविस्तर तपासणीसाठी त्या मयत व्यक्तीच्या व्हीसेरा न्यायवैध शाळेला तपासणीसाठी पाठविला जातो. त्यात होणारी दिरंगाई आणि अतिउशीर त्या प्रकरणाच्या अंतिम अहवालासाठी अडचणीचा ठरतो. याबद्दल प्रसार माध्यमांनी आवाज उठवला तेंव्हा. महाराष्ट्र मानवी हक्क आयोगाने स्वत: याचिका दाखल करून घेतली आणि त्यावर दिलेल्या निर्णयानुसार व्हीसेरा तपासणीत होणारा विलंब अत्यंत जलदगतीने दुर करण्याचे आदेश राज्य शासनाला दिले.त्यानुसार राज्य शासनाने त्यासाठी एक सविस्तर शासन निर्णय जारी केला आहे. त्यात मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना वेगवेगळी विभागणी करून त्या रुग्णालयात आपल्याकडील व्हीसेरा तपासणीसाठी पाठववावे. असे सुनिश्चित केले आहे. मुंबई शिवाय राज्य भरातील प्रत्येक जिल्ह्यातील कोणत्या रुग्णालयात हे व्हीसेरा तपासणीसाठी पाठवावे याला सुनिश्चित केले आहे. त्यात एक-एका शासकीय महाविद्यालयाला 3 ते 5 जिल्ह्यांचे व्हीसेरा तपासणी अहवाल तपासावेत असे सुचित केले आहे. हा शासन निर्णय संकेतांक क्रमांक 202012231101497313 नुसार शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केला आहे.

नांदेड येथील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालयात नांदेड आणि हिंगोली या दोन जिल्ह्यामधील सर्व पोलीस ठाण्यांचे व्हीसेरा अहवाल तपासण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सोबतच शासकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे औरंगाबाद, जालना आणि नाशिक जिल्ह्यांची तपासणी होईल. परभणी आणि बीड या जिल्ह्यांचे व्हीसेरा अहवाल शाकीय महाविद्यालय अंबेजोगाई येथे तपासले जातील. लातूर एकच जिल्हा असा आहे. ज्यासाठी शासकीय वैद्यकिय विज्ञान संस्था लातूर यांची व्हीसेरा तपासणीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे

Categories
नांदेड

हुजूरी खालसा फायनान्सच्या दिपूसिंघवर तेलंगणा राज्यात महिलेच्या विनयभंग केल्याचा गुन्हा

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:येथील फायनान्स व्यवसायात नामांकित असलेल्या रणदिपसिंघ विरुध्द तेलंगणा राज्यातील सायबराबाद जिल्ह्याच्या राजेंद्रनगर पोलीस ठाण्यात महिलेच्या विनयभंग केल्याप्रकरणी गुन्सहा दाखल झाला आहे. तेलंगणा पोलीसांनी नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेच्या मदतीने रणदिपसिंघला पकडून नेले आहे.

एका 28 वर्षीय महिलेने तेलंगणा राज्याच्या सायबराबाद जिल्ह्यातील राजेंद्रनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार तिच्या घटस्फोट झाल्यानंतर तिची ओळख नांदेडच्या हुजूरी खालसा फायनान्सचे मालक रणदिपसिंघ ईश्र्वरसिंघ सरदार सोबत झाली. त्यानंतर ती त्याच्यासोबत नांदेडमध्ये राहत होती. या सोबतच्या वास्तव्यात कांही व्हिडीओ तयार करण्यात आले आणि त्या व्हिडीओ आणि छायाचित्रांच्या आधारावर रणदिपसिंघ सरदार त्या युवतीला बॅल्कमेल करत होता. त्या युवतीने दुरध्वनीवरून सांगितले की, माझ्यावर केलेल्या अन्यायाबाबत मी नांदेड पोलीसांकडे, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे भरपूर तक्रारी केल्या पण मला नांदेड पोलीसांनी मदत केली नाही. त्यामुळे मला तेलंगणा राज्यातील पोलीसांकडे मदत मागावी लागली. घडलेला सर्व प्रकार जुना आहे. त्यात 12 ऑक्टोबर 2020 पासून रणदिपसिंघ सरदार त्या महिलेला बॅल्कमेल करत होता. युवतीच्या तक्रारीवरुन आता राजेंद्रनगर पोलीस, तेलंगणा यांनी गुन्हा क्रमांक 1758/2020 भारतीय दंड संहितेच्या कलम 454 आणि 506 नुसार दाखल केला आहे.

हा गुन्हा 24 ऑक्टोबर 2020 रोजी दाखल झालेला आहे. काल दि.25 डिसेंबर रोजी तेलंगणा पोलीसांनी नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखा पोलीसांची मदत घेवून रणदिपसिंघ ईश्र्वरसिंघ सरदारला पकडून तेलंगणात नेले आहे. या गुन्ह्याच्या हाकीकतीलमध्ये युवतीचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल केल्याची बाब नमुद आहे. पण गुन्ह्यात कलमे जोडली जातात. त्या ठिकाणी मात्र भारतीय तंत्रज्ञान कायदा किंवा त्याची कलमे लिहिलेली नाहीत. नांदेड येथील एका विधिज्ञाला या गुन्ह्याची कागदपत्रे दाखवून विचारणा केली असता या गुन्ह्यात भारतीय तंत्रज्ञान कायदा आणि त्याची कलमे आज अंतरभूत नसली तरी पुढे ती जोडली जातील असे सांगितले. तेलंगणा राज्यात आज 26 डिसेंबर रोजी या गुन्ह्याची काय परिस्थिती आहे याबद्दल माहिती मिळू शकली नाही.

Categories
नांदेड

नांदेड वाघाळा महापालिकेत सातवा वेतन आयोग लागू

कर्मचाऱ्यांना अटीची पूर्तता करावी लागणार

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:वाघाळा महापालिकेला ता. एक जानेवारी २०१६ पासून सुधारित वेतनश्रेणी लागू करून ता. एक डिसेंबर २०२० पासून प्रत्यक्ष वेतन देण्यास शासनाने मान्यता दिली आहे.मात्र, शासनाकडून यावर होणाऱ्या खर्चासाठी कोणतीही स्वतंत्र अनुदान दिले जाणार नसल्याचे पत्रात नमूद केले आहे.

नांदेड वाघाळा महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने बुधवारी (ता. २३) एका पत्राद्वारे सातवा वेतन आयोग लागू केला आहे. त्यामुळे अधिकारी,कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला असला तरी दुसरीकडे कर निर्धारण, कर वसुली,थकबाकी वसुलीआणि इतर बंधनेही टाकली आहेत. त्यामुळे भविष्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांना आणखी चांगल्या पद्धतीने कामे करावी लागणार आहेत.

नांदेड वाघाळा महापालिकेला ता. एक जानेवारी २०१६ पासून सुधारित वेतनश्रेणी लागू करून ता. एक डिसेंबर २०२० पासून प्रत्यक्ष वेतन देण्यास शासनाने मान्यता दिली आहे.मात्र, शासनाकडून यावर होणाऱ्या खर्चासाठी कोणतीही स्वतंत्र अनुदान दिले जाणार नसल्याचे पत्रात नमूद केले आहे. त्याचबरोबर महापालिकेतील विकासकामे,त्यासाठी घेतलेले कर्ज आणि व्याज यांच्या परतफेडीसाठी पुरेसा निधी शिल्लक राहिल, याची खात्री करावी, असेही सांगितले आहे.

उपाययोजना बंधनकारक
सातवा वेतन आयोगाचा भार पेलण्यासाठी शासनाने महापालिकेला काही वित्तीय सुधारणांच्या अटी बंधनकारक केल्या आहेत. त्यानुसार महापालिकेच्या उत्पन्न स्त्रोतात वाढ करून त्याचा आस्थापना खर्च निरंतर ३५ टक्केच्या मर्यादेत राहील,याबाबत उपाययोजना करणे अनिवार्य राहील. जीआयएस मॅपिंग अथवा अन्य मार्गाने मालमत्तेचे अद्ययावत सर्व्हे करून जुलै २०२१ पूर्वी शंभर टक्के मालमत्ता कराच्या कक्षेत आणण्यासाठी उपाययोजना बंधनकारक आहे.

महापालिकेला हे बंधनकारक
शंभर टक्के मालमत्तेच्या बाबतीत मालमत्ता कराची पुनर्निधारणा करण्याची कार्यवाही मार्च २०२१ पूर्वी करणे बंधनकारक राहील. अशा तऱ्हेने सुधारित होणाऱ्या मालमत्ता कराच्या चालू मागणीपैकी ९० टक्के वसुली मार्च २०२१ पर्यंत करणे महापालिकेवर बंधनकारक राहील. मालमत्ता कराच्या मागणीबाबत पुनर्निधारणा केल्यानंतर मालमत्ता कराच्या थकबाकीपैकी किमान पन्नास टक्के वसुली मार्च २०२१ पूर्वी करणे बंधनकारक राहील. पाणीपट्टीच्या रक्कमेपैकी ९० टक्के रक्कम संबंधित पाणी पुरवठा योजनेची सुधारणा, पाणी पुरवठा विषयक अनिवार्य व आवश्यक कामे यांच्यासाठीच करणे महापालिकेवर बंधनकारक राहणार आहे.

कामाचा वेग वाढवावा लागणार
सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी महापौर मोहिनी येवनकर,आयुक्त डॉ.सुनील लहाने यांच्यासह पदाधिकारी व इतरांचे आभार मानले असले तरी आता महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडे देण्यात आलेल्या कामांचाही वेग वाढवावा लागणार आहे. कर निर्धारण,करवसुली,थकबाकी वसुलीवर लक्ष केंद्रित करून ती कामे वेळेवर पूर्ण करावी लागणार आहेत.अन्यथा सातव्या वेतन आयोगाला मुकण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

Categories
नांदेड

पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत किनवट तालुक्यातील शिवसेना पदाधिकार्‍यांची निवड

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:किनवट तालुका शिवसेनेत एकनिष्ठेने पक्षवाढीसाठी व जनहितासाठी काम करणारे सुरेश घुमडवार यांची तालुका उपसंघटक व अल्पसंख्यांक तालुका संघटक म्हणून शेख अफसर यांची निवड नांदेड येथे पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत व संपर्कप्रमुख आनंद जाधव जिल्हाप्रमुख दत्तात्रय कोकाटे जिल्हा प्रमुख बोंढारकर जिल्हाप्रमुख उमेश मुंडे जिल्हा उपप्रमुख ज्योतिबा खराटे तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे यांच्या शिफारशीने निवड करण्यात आली.
पक्षाचे हितसंबंध जोपासत तळागाळातील जनतेपर्यंत शिवसेनेचे धोरण पोहोचवत काम करीत असल्यामुळे सदर कार्यकर्त्यांची पदाधिकारी म्हणून निवड करण्यात आल्याचे तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे यांनी सांगितले.येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका व जिल्हा परिषद निवडणूकित शिवसेनेला चांगले यश प्राप्त होणार असल्याचे भाकित ठरविल्या जात आहे. खासदार हेमंत पाटील हिंगोली लोकसभा निवडणुकीत विजय प्राप्त झाल्यामुळे तालुक्यात शिवसेनेला पोषक वातावरण दिसत आहे.सदर पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल शहर प्रमुख सुरत सातूर वार संतोष एलचलवार तालुका युवा सेना प्रमुख प्रमोद केंद्रे अतुल दर्शनवाढ राम मुंढे चंदू जायभाये सह इतर शिवसैनिकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

Categories
नांदेड

देगलूर तालुक्यातील लिंगन केरुर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध

सुज्ञ ग्रामस्थांच्या प्रयत्नांना यश

माधव जाधव व बालाजी कदम यांची सरपंच पदासाठी फिफ्टी – फिफ्टी

देगलूर (प्रतिनिधी) मिलिंद कावळगावकर तालुक्‍यातील लींगन केरुर ग्रामपंचायत निवडणूक ही सुज्ञ ग्रामस्थांच्या मध्यस्थीतून बिनविरोध पार पडली आहे. दहा वर्षापूर्वी अनुसूचित जातीतील सुधांशू कांबळे यांना खुल्या प्रवर्गातून बिनविरोध सरपंच करण्याचा विक्रम याच गावाने केला होता.

दीड हजारांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या गावात २०२० च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दोन गट तयार होऊन निवडणूक होण्याचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक जाणकार राजकिय पुढाऱ्यांना येथील होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत विनाकारण वाद होऊन गावात दुफळी निर्माण होण्याची शंका वाटत असल्याने माजी सरपंच नरसिंग पा. कदम, तुकाराम पा.कदम, सुधांशू कांबळे, गिरीश देशमुख व्यंकट पा. जाधव,शामराव माने, सर्जेराव पा कदम, दिगंबर पा. कदम,विजय पा . भरत पा कदम,हनुमंत जाधव, निवृत्ती बजिरे, नागोराव वाघमारे, सोपान पांडवे, चंद्रकांत वाघमारे ,शेषराव चव्हाण, नागेश कदम, माजी उपसरपंच बाजीराव कदम,आनंद पा. कदम, भुजंग जोंधळे, देवराव ठावरे, मारुती कांबळे, दाऊ कांबळे आदींनी सामंजस्याची भूमिका घेऊन बिनविरोध निवडणुकीसाठी चर्चा घडवून आणली. यास ग्रामस्थ व निवडणुकीसाठी समोर आलेल्या गटाने संमती दिली. याचेच फलित लिंगन केरुर ग्रामपंचायत आज मितीस बिनविरोध निघाली आहे .

सदर ग्रामपंचायत दीड हजार लोकसंख्येची असून ग्रामपंचायतीवर सात सदस्य निवडून येतात. या सन २०२० च्या सार्वत्रिक निवडणुकीत तीन अनुसूचित जातीसाठी दोन ओबीसीसाठी तर दोन जागा या खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित आहेत . सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असल्याने संभाजी ब्रिगेडचे सक्रिय कार्यकर्ते महादेव सुधाकर जाधव व बालाजी वामनराव कदम यांनी सरपंच पदासाठी आपापले गट तयार करून फिल्डिंग लावली होती. दरम्यान येथील ग्रामपंचायत निवडणूक ही चुरशीची होणार असे चित्र दिसत दिसत असताना परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सरपंच पदाच्या शर्यतीत असलेल्या माधव जाधव व बालाजी कदम या दोघांना फिफ्टी-फिफ्टी सरपंच पद वाटून देण्याची ऑफर देऊन ग्रामस्थांनी होणाऱ्या निवडणुक नाट्यावर शिताफीने पडदा टाकला. सोबतच वार्ड क्रमांक एक मध्ये संजय माने,मारुती कांबळे ,वार्ड क्रमांक तीन मध्ये सिताराम चव्हाण या सदस्यांचीही निवड बिनविरोध करण्यात आली .
दरम्यान वार्ड क्रमांक दोन मध्ये मारुती पांडवे यांना बिनविरोध निवडण्यात आले असून एका जागे साठी बिनविरोध होण्यास अडचण येत असली तरीही त्यावर लवकरच तोडगा निघणार असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. या निवडणुकीत ०५ सदस्यासह सरपंच पदाच्या उमेदवारांची बिनविरोध निवड करून ग्रामस्थांनी मोठा आदर्श निर्माण केला आहे. मागील दहा वर्षांपूर्वी सन २००५ च्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच पद हे खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असताना यावेळी सर्व ग्रामस्थ एकत्रित बसून अनुसूचित जातीतील उमदे नेतृत्व तथा बेधडक पत्रकार म्हणून ओळख असलेले सुधांशू कांबळे यांना बिनविरोध सरपंच करण्याचा मोठा विक्रम येथील ग्रामस्थांनी केला होता . पुन्हा दुसऱ्यांदा खुल्या प्रवर्गासाठी ही निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. सरपंच म्हणून गावकऱ्यांनी आमच्या नावावर शिक्कामोर्तब केला असून आम्ही गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची भावना निर्वाचित बिनविरोध सरपंच पदाचे दावेदार बालाजी कदम व माधव जाधव यांनी व्यक्त केली आहे. नवनिर्वाचित बिनविरोध सरपंच व सदस्यांचा ग्रामस्थांनी पुष्पहार व गुलालाची उधळण करून सत्कार केला तसेच आनंदोत्सव साजरा केला. या बिनविरोध निवडीसाठी तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Categories
नांदेड

धर्माबादेत अनाधिकृत फ्लाटिंगची विक्री,जनतेची फसवणूक होण्याची शक्यता?

जनतेची फसवणूक करू नका- नगरसेवक संजय पवार

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि.26.जिल्यातील धर्माबाद नगरपरीषदेच्या क्षेत्रीतील बाळापुर शिवारात शहरातील सुप्रसिद्ध डॉ.कमलकिशोर काकाणी व व्यापारी माधव बिजमवार यांच्या मालकीची तरीची जमीन असून सदरील जमीनीवर आरक्षण आहे.परंतु ती अंदाजित ३ एकर १४ गुंटे तरीची जमीन नांदेड येथील एका कापड दुकानाच्या मालकास विक्री करण्यात आली आहे.व सदरील जमीनीची सौदा चीठी करण्यात आली आहे.अजून सदरील जमीनीची दस्तनोंदणी झाली नाही.परंतु सदरील जमीनीवर नियमबाह्य पद्धतीने प्लाटींग करून शहरातील काही दलाल मंडळी प्लाटची विक्री करीत असल्याचे उघडकीस आल्यामुळे गोर गरीब जनतेची फसवणूक होत असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल सुध्दा बुडत असल्याची चर्चा शहरातील जनतेत होत आहे.
धर्माबाद शहरातील सुप्रसिद्ध डॉ.कमलकिशोर काकाणी व व्यापारी माधव बिजमवार यांच्या मालकीची बाळापुर शिवारात तरीची जमीन असून सदरील जमीनीवर आरक्षण असल्याची चर्चा होत आहे.ती अंदाजित ३ एकर १४ गुंठे जमीन नांदेड येथील एका कापड दुकानाच्या मालकास विक्री करण्यात आली आहे.व सदरील जमीनीची सौदा चीठी सुध्दा करण्यात आली आहे.परंतु ठरल्याप्रमाणे सदरील जमीनीचे पैसे जमीन खरेदीदार मुदतीत दिला नाही.व उलट सदरील जमीनीवर नियमबाह्य पद्धतीने प्लाटींग करून विक्री करीत असल्याचे उघडकीस आल्यामुळे जमीन मालकांनी सदरील जमीनीवर नियमबाह्य पद्धतीने प्लाटींग करून खांबे रोपण्यात आलेले जमीनदोस्त केले आहे.सदरील प्ररकरणाची माहिती प्लाट विकत घेतलेल्या गोर गरीब जनतेला कळाली आहे.त्यामुळे सदरील गोर गरीब नागरीक आपली फसवणूक होत आहे कि काय? यासंदर्भात शहरातील अनेक नगरसेवकांशी संपर्क साधत असल्याचे चित्र दिसत आहे.परंतु सदरील अनाधिकृत प्लाटींग प्ररकरणात शहरातील एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेच्या मुलाचा पुढाकार असल्यामुळे शहरातील जनतेत उलट सुलट चर्चा सुरू आहे. सदरील तरीच्या जमीनीवर नियमबाह्य पद्धतीने अंदाजित ६४ प्लाट तयार करण्यात आले असून त्यापैकी ३० ते ३५ प्लाटची विक्री करून सौदा चीठी करून दिले.व प्रत्येकाकाडून २ लक्ष रुपय बयाना घेऊन अंदाजित ६० ते ६५ लाख रुपये जमा करण्यात आले असल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.वार्डातील लोकांना मुलभूत सुविधा वेळेवर उपलब्ध व्हावे,यासाठी मतदारांनी चांगल्या व्यक्तीस निवडणुकीत मतदान करून पालिकेत पाठवितात.परंतु त्याच नगरसेवकांनी पालिकेचा लाखोंचा महसूल बुडवत जनतेची फसवणूक करीत असल्याची चर्चा शहरातील जनतेत होत आहे. त्यामुळे सदरील तरीच्या जमीनीवर नियमबाह्य पद्धतीने प्लाटींग करून विक्री करणारे व दलांलावर कठोर कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झोपडपट्टी मुक्त अभियान राबवून गोर गरीब जनतेला घरे उपलब्ध करून देत आहेत.परंतु अशा नियमबाह्य पद्धतीने प्लाट खरेदी केल्यास सदरील योजनेचा लाभ मिळणार नाही.व सदरील घराची नोंद पालिकेत सुध्दा राहणार नाही.त्यामुळे अनाधिकृत प्लाटे विकत घेऊनका व प्लाटींग करणाऱ्यांनी सुध्दा नियमानुसार कारवाई करूनच प्लाटे विक्री करा,असे आवाहन भाजपचे नगरसेवक संजय पवार यांनी केले आहे.
शहरात अनाधिकृत प्लाटींग करून गोर गरीब जनतेची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक गंगाधरोड साय्यारेड्डी यांनी केले आहे.
बाळापुर शिवारातील आमच्या मालकीची जमीन नांदेड येथील एका कापड दुकानाच्या मालकास विक्री केलो आहे.व सौदा चीठी सुध्दा झालेली आहे.परंतु जमीन विक्री केलेली पूर्ण रक्कम अद्याप आम्हाला मिळली नाही.आमचा सौदा कायम आहे.परंतु सदरील जमीनीचे मालक होण्यापूर्वीच सदरील जमीनीवर नियमबाह्य पद्धतीने प्लाटींग करून विक्री करणे चूकीचे असल्याचे डॉ.कमलकिशोर काकाणी व व्यापारी माधव बिजमवार यांनी बोलताना सांगितले आहे.

Categories
नांदेड

माकपच्या लढ्याने झाला ख्रिश्चन दफनभूमिचा कायापालट !

एक सप्टेंबर ते तेवीस डिसेंबर पर्यंत केलीत सात आंदोलने, इतर मागण्यासाठी लढणार न्यायालयीन व रस्त्यावरची लढाई

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:सीटू आणि मा.क.प.च्या यशस्वी प्रयत्नाने नांदेड येथील एकमेव ख्रिश्चन दफन भूमी चे गंभीर प्रश्न महापालिका आयुक्त डॉ.सुनिल लहाने आणि जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर तसेच उपायुक्त बाबूराव बीक्कड यांच्या निदर्शनास आणून देत आतापर्यंत सात वेळा आंदोलन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आणि आयुक्तांनी संबंधित विभागांना कार्य तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत परंतु बांधकाम,विद्युत,पाणीपुरवठा व वित्त विभागातील काही कामचुकार अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक काम पूर्ण करण्यास विलंब केला होता.
साफसफाईचे काम ऐंशी टक्के पूर्ण झाले असून ते पूर्ण करावे तसेच दफनभूमितील अंतर्गत रस्ते,विद्युत पुरवठा,स्ट्रीट लाईट, पाणी पुरवठा व लोकसंख्येच्या आधारावर दहा एकर जमीन ख्रिश्चन दफनभूमिसाठी शासनाने महापालिका हद्दीत द्यावी ह्या मुख्य व कळीच्या मागण्या अपूर्णच आहेत. त्या साठी पुढील काळात लढा आणखी तीव्र करणार असल्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा कमिटी सभासद तथा सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी जाहीर केले.
मागील अनेक आंदोलनात ह्या मागण्या सातत्याने केल्या असून वरिष्ठांच्या आदेशाला कनिष्ठांनी केराची टोपली दाखाविली होती परंतु त्या संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलन करण्याची नोटीस देऊन केली होती.परंतु मनपाच्या कामचुकार व आडमुठे धोरण राबविणार्या सहाय्यक आयुक्तांनी व अभियंत्यांनी पूर्वीप्रमाणेच काम न करण्याची भूमिका घेतली. तेव्हा सीटू व माकपच्या कार्यकर्त्यांनी दि.21 डिसेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर कॉ.मारोती केंद्रे व कॉ.अनुराधा परसोडे यांच्या वतीने अमरण उपोषण सुरू केले होते.तरीसुद्धा प्रशासनातील मुजोर अधिकाऱ्यांनी न जुमानता कसलाही प्रतिसाद दिला नाही.शेवटी दि.23 डिसेंबर पासून तेवीस कार्यकर्त्यांनी सुरू असलेल्या उपोषणास पाठिंबा देत निवेदन देऊन दोन दिवस उपोषण करणार असल्याचे पत्र जिल्हाधिकारी,आयुक्त,पोलीस अधिक्षक आदींना दिले.
तेव्हा कुठे प्रशासकीय अधिकारी जागे झाले व तातडीने कारवाई करण्यात आली.ख्रिस्ती बांधवांचा महत्त्वपूर्ण सन नाताळ असल्याने मानपाचे कर्तव्यदक्ष उपायुक्त बीकड साहेबांनी दफनभूमीतील काम सुरू केले. तसेच एम.जी.एम.कॉलेज समोरील बजरंग कॉलनी येथील दलित समुदायांच्या घरा समोर सर्व नागरी सुविधा तातडीने पुरविण्यात येतील असे लेखी अश्वासन दिले आहे. एकंदरीतच ख्रिश्चन दफनभूमीचा कायापालट झाल्याने ख्रिस्ती बांधवामध्ये आनंद दिसत आहे.या साठी सीटू संलग्न अ.सं.कामगार संघटनेचे युनिट अध्यक्ष कॉ.रविंद्र जाधव यांनी परिश्रम घेतले.इतर मागण्या मध्ये सर्वे नंबर ५६ बी वजिराबाद मधील पिडीता अल्का राजीव गुल्हाने यांना त्यांचा दहा लक्ष रूपये मावेजा अग्रीम रक्कम स्वरूपात मिळवून दिला व मनपाने कबूल केलेली पैसे देण्याची तारीख गेल्यामुळे तात्काळ सर्व रक्कम त्यांना मिळावी या साठी लढा चालूच राहील.पोलीस ठाणे वजिराबाद येथील गु.र.न.६/२०२० ॲट्रॉसीटी कायदा मधील मुख्य आरोपी आर.मंगाचार्यलू व एस.के.वल्ली यांचे नावे तपास अधिकारी तथा उप विभागीय पोलीस अधिकारी अभिजित फस्के यांनी दोषारोप पत्रातून वगळली आहेत.ते पूर्ववत घेण्यासाठी व तपास अधिकारी यांच्यावर कलम चार नुसार कारवाई करण्याची लढाई मंत्रिमंडळात व न्यायालयात ताकीदीने लढण्याचे ठरले आहे. गोदावरी नदीपात्रात पाण्यात बूडून मृत्यू झालेल्या आनंद केंद्रे व इतर दोन मुलांच्या मरणास कारणीभूत ठरलेल्या तहसिलदार,मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करणे व कॉ.गंगाधर गायकवाड यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्याच्या अनुषंगाने पोलीस अधिक्षक नांदेड यांना भेटावे असे पत्र देण्यात आले आहे.उपोषण सोडविण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सिध्देश्वर भोरे आणि पोलीस निरीक्षक संदिप शिवले यांनी यशस्वी प्रयत्न केले आहेत. कॉ.विजय गाभणे,कॉ.गंगाधर गायकवाड व कॉ.उज्वला पडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आंदोलनात कॉ.सं.ना.राठोड,कॉ.दत्तोपंत इंगळे,कॉ.मुकेश गर्दनमारे,कॉ.मिरा बहादूरे,कॉ.शे.मगदूम पाशा,कॉ.रब्बाणा बी पठाण,कॉ.बंटी वाघमारे,कॉ.सचिन आंबटवाड,कॉ.सत्यभामा बोईनवाड,कॉ.सिमा गजभारे,कॉ.रमा खिल्लारे,कॉ.पंचशिला सिरसाठ,कॉ.पुष्पा लोणे,कॉ.भारतीबाई सदावर्ते आदींनी सहभाग नोंदविला.रास्त मागण्या असल्या कारणाने भाकप युनायटेड चे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी कॉ.सदाशिव भूयारे व कॉ.अंबादास भंडारे,बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष सुखदेव चिखलीकर,एम.आर.पी.एस.चे जिल्हा अध्यक्ष संजय गोटमुखे,प्रहार चे जिल्हा अध्यक्ष संतोष बोराळकर व इतरही समविचारी संघटनांच्या वतीने पाठिंब्याचे पत्र जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.
कॉ.गंगाधर गायकवाड
जनरल सेक्रेटरी सीटू नांदेड जिल्हा कमिटी.
मो. 7709217188.

Categories
नांदेड Uncategorized

इतवारा पोलीसांनी एक चोरटा पकडला; जवळपास चोरीचे 40 मोबाईल जप्त केले

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि. 25.नोव्हेंबर महिन्यात घडलेल्या एका चोरी प्रकरणातून चोरी गेलेल्या 55 हजार 500 रुपयांच्या ऐवजापैकी इतवारा पोलीसांनी 42 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. यासोबतच एकूण 36 दुसरे मोबाईल जप्त केले आहेत. या चोरट्याला न्यायालयाने 27 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

दि.2 नोव्हेंबर आणि 3 नोव्हेंबरच्या रात्री खान मोबाईल शॉपी देगलूर नाका येथील टीनपत्रे काढून त्यातील विविध कंपन्यांचे मोबाईल असा एकूण 55 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक बाळू गिते यांच्याकडे होता.

24 डिसेंबर रोजी पोलीस उपनिरिक्षक एम.जे.बेग,पोलीस कर्मचारी सत्तार,चाऊस, साहेबराव शिंदे,निवृत्ती घुले यांनी हमीदीया कॉलनी खुदबेईनगर येथील मोहम्मद अली शेख नबी (20) या युवकास ताब्यात घेवून त्याच्याकडून खान मोबाईल शॉपीमधील चोरलेल्या ऐवजापैकी 42 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. तसेच नांदेड शहरातील वाजेगाव आणि अनेक जागी मोबाईलची दुकाने फोडून मोहम्मद अली शेख नबीने चोरलेले 36 मोबाईल पोलीसांकडे जप्तीत दिले आहेत. मोहम्मद अली शेख नबीला न्यायालयाने 27 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे,अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे,पोलीस उपअधिक्षक सिध्देश्र्वर भोरे,पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे यांनी या पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.

Design a site like this with WordPress.com
Get started