Categories
भोकर

भाजपा युवा मोर्चाच्या भोकर तालुकाध्यक्षपदी श्रीकांत किन्हाळकर

भोकर
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या भोकर तालुकाध्यक्षपदी बापूसाहेब गोरठेकर समर्थक श्रीकांत व्यंकटराव किन्हाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भोकर /अनिल डोईफोडे/येथील भाजपा पदाधिकाऱ्यांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नांदेड येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत युवा मोर्चाच्या भोकर तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी श्रीकांत किन्हाळकर यांच्यावर टाकण्यात आली. यावेळी खा. प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर , युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष किशोर देशमुख , जि प.सदस्या.सौ.प्रणिताताई देवरे , कुशाल पाटील उमरदरीकर यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले.या निवडीबद्दल जिल्हा उपाध्यक्ष दिलीप सोनटक्के, तालुकाध्यक्ष किशोर पाटील लगळुदकर, बाजार समितीचे संचालक गणेश पाटील कापसे, राजू अंगरवार, विशाल माने यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.
या निवडीनंतर किन्हाळकर म्हणाले की, खा. प्रताप पाटील आणि बापूसाहेब गोरठेकर यांनी माझ्यावर टाकलेल्या जबाबदारीला तडा जाऊ न देता मिळालेल्या पदाचा उपयोग युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी करीन. पक्षाची ध्येयधोरणे गावागावात पोहचविण्यासाठी काम करणार आहे.

Categories
भोकर

नवीन वर्षाच्या निमित्ताने अर्चित पॅथॉलॉजी लॅबच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त शुगर तपासणी.

भोकर (अनिल डोईफोडे) येथील नव्यानेच नावारुपास आलेली आर्चीत पॅथॉलॉजी लॅब तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त विविध रक्ताच्या तपासण्या अल्पशा दरात करण्यात येणार आहे अशी माहिती मुकुंद धानोरकर व लॅब टेक्नीशियन सय्यद अखिल यांनी दिली दिनांक 3 जानेवारी रोज रविवार सकाळी साडेसात ते दुपारी दोन वाजेपर्यंत तपासणी करण्यात येईल असेही त्यांनी कळवले नाव नोंदणीसाठी केवळ गरजू 50 जनासाठी आवश्यक असून रक्त तपासणीसाठी उपाशीपोटी येण्याचे आवाहनही त्यांनी केले तपासणीचे स्थळ स्पंदन हॉस्पिटल वेंकटेश टॉकीज भोकर असेही त्यांनी शेवटी कळवले व जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहनही करण्यात आले. शेवटी अर्चित लॅब च्या या उपक्रमाचे भोकर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष शेख युसूफ भाई यांनी कौतुक केले.

Categories
मुंबई

कनिष्क कांबळे अध्यक्षपदी तर डॉ. माकणीकर सह अन्य 4 विविध महामंडळावर नियुक्त. पक्षाची शिफारस

विरेंद्र म्हात्रे नवी मुंबई प्रतिनिधी इंजि. कनिष्क कांबळे, डॉ. राजन माक्निकर व कॅ. श्रावण गायकवाड सह अन्य 3 जणांना विविध महामंडळावर नियुक्त करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाकडून शिफारस करण्यात आली आहे.

प्रमुख पदाधिकारी व निष्ठवंत कार्यकर्त्यांची नुकतीच एक बैठक संपन्न झली त्यात हा निर्णय घेण्यात आला. पक्षाध्यक्षा नंदाताई कांबळे यांच्या आदेशाने या नावांची शिफारस राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या कडे करण्यात आली आहे.

पक्षसंथापक, आमदार टी एक कांबळे यांच्या नंतर युवाध्यक्ष कनिष्क कांबळे यांनी पक्षाची धुरा उत्तमपणे सांभाळून लोकसभा व विधानसभा निवडणुकीत घटक पक्ष म्हणून यशस्वी कामगिरी बजावली. आंबेडकरी समूहात एक वेगळे स्वच्छ आणि स्वाभिमानी व्यक्तिमत्व प्रस्थापित केले. समाज हितासाठी लढा उभारत असंख्य संकटांना चार हात करून खंबीरपणे पक्षनेतृत्व सांभाळले. त्यामुळे कनिष्क कांबळे यांना महामंडळावर घटक पक्ष या नात्याने अध्यक्ष पद द्यावे असा ठराव पास करण्यात आला.

तसेच राष्ट्रीय पदाची सूत्रे हातात घेऊन पक्षाला खऱ्या अर्थाने बळकटी देऊन भारतीय संविधान शालेय शिक्षणात सक्तीने शिकवले जावे यासाठी मागील 10 वर्षांपासून प्रयत्न करणारे, समाज व देश सेवेसाठी संबंध आयुष्य समर्पित समाजभूषण, पत्रकार, ग्रेट पँथर पारितोषिक विजेते डॉ. राजन माकणीकर.

अंगावरची कपडे ही कुणी मागितली तर काढून देणारे, कुणी आपल्या जवळ मागणी केली आणी ती पूर्ण होऊ नये, लग्न समारंभ अंत्यविधी, आदी सर्व ठिकाणी आवर्जून उपस्तिथी दर्शविणारे, रात्री अपरात्री कोणत्याही प्रसंगाला मदतीस धावून जाणारे व्यक्तिमत्व कॅप्टन श्रावण गायकवाड.

उल्हास नगर येथे टी. एम. कांबळे साहेबांच्या हयातीत विधानसभा लोकसभा व महापालिकेत उमेदवार उभे करून निवडून आणण्यासाठी कसोसिने प्रयत्न करून पक्षनिष्ठा जोपासणारे महाराष्ट्र राज्य उपनिरीक्षक श्रीधर गुडदे.

सर्वसमावेशक धर्मनिरपेक्ष तत्वे जोपासून टी एम कांबळे साहेबांचे सहकारी पक्ष व चळवळीसाठी स्वतःला झोकुन समाज हितावह कार्य करणारे पक्षाचे जेष्ठ निष्ठावंत व्यक्तिमत्व, राज्याचे समन्वय समिती अध्यक्ष बळवंतराव पाटील.

या पक्ष पदाधिकारी व निष्ठवंतांचा शासनाच्या विविध महामंडळाच्या कार्यकरणीवर नियुक्ती करण्यात यावी यासाठी शिफारस करन्यात आली आहे.

Categories
इंदापूर

हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते प्रा. फिरोज शेख यांचा सत्कार

इम्तिहाज मुलाणी :
इंदापूर (प्रतिनिधी):

कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर येथे कार्यरत असलेले प्रा. फिरोज नसरुद्दीन शेख यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पी. एच. डी पदवी प्रधान करण्यात आली. प्रा. फिरोज शेख यांनी पी.एच.डी पदवी संपादन केल्याने महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील तसेच नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी त्यांचा यथोचित सन्मान केला
प्रा. फिरोज शेख यांनी इंग्लिश या विषयात “A Study of Speech Acts with Special Reference to Vijay Tendulkar’s Selected Plays.” या विषयावर प्रबंध सादर केला. प्रा. फिरोज शेख यांना कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनाई (अहमदनगर)येथील डॉ संदीप प्रभाकर खेडकर यांनी मार्गदर्शन केले. प्रा. शेख यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या Institute of Advanced Studies in English औंध पुणे या अभ्यास केंद्रावर आपले संशोधन पूर्ण केले.
Application Oriented Research असल्यामुळे अनेक मान्यवरांनी प्रा. फिरोज शेख आणि त्यांच्या प्रबंधाचे कौतुक केले.
संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, संस्थेच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले, संस्थेचे सचिव मुकुंद शहा, नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील, जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी प्रा. फिरोज शेख यांचे अभिनंदन केले.

Categories
मायणी

डॉ.श्रीधर सावंत विद्यामंदिर या शाळेच्या संस्था प्रमुखांची चौकशी करून प्रशासक नेमावा.उपसंचालक सत्यवान सोनवणे यांचेकडे संघटनांची

मागणी मिरज ----अशोक मासाळ

कोल्हापूर दि.29- जय भारत शिक्षण संस्थेचे डॉ. डॉक्टर श्रीधर सावंत विद्यामंदिर चे मुख्याध्यापक श्री एस एम पाटील यांना झालेल्या शिवीगाळ धक्काबुक्की बद्दल काल शाहुपुरी पोलिस स्टेशनमध्ये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या कारभाराची चौकशी करून शाळेवर प्रशासक नेमावा अशी मागणी सर्व संघटना कृती समितीच्या वतीने मा शिक्षण उपसंचालकांचेकडे करणेत आली आज सर्व संघटनांच्या वतीने कोल्हापूरचे उपसंचालक सत्यवान सोनवणे साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी कोल्हापुरातील सर्व संघटना उपस्थित होते यावेळी सत्यवान सोनवणे साहेब यांनी घडलेली बाब गंभीर स्वरूपाचीअसून त्याबाबत लवकरच चौकशी समिती नेमून चौकशी करण्याचे आश्वासन दिले.यावेळी बोलताना ते म्हणाले मुख्याध्यापक यांच्यावर घडलेली घटना ही गंभीर स्वरूपाची असून अशा प्रकारचT फौजदारी गुन्हा दाखल झालेल्या संस्था चालकाची व शाळेची चौकशी केली जाईल.,प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षकांवर अन्याय होत असेल तर अशा शिक्षकांच्या पाठीशी समाज म्हणून तुम्हीथांबला आहातही बाब शिक्षण क्षेत्राला दिलासादायक आहे या शाळेचे पटसंख्या चांगली आहे अशा घटना शिक्षकांच्या बाबतीत प्रकार घडत असेल तर हे चुकीचे असल्याचे नमूद केले. यावेळी सर्व संघटनेच्या वतीने मीटिंग घेण्यात आली त्यावेळी बोलताना शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे शिक्षकांच्या पाठीशी नेहमी संघटना ठामपणे उभी असल्याचे नमूद केले तर महासंघाचे संतोष आयरे यांनी कोल्हापूर मध्ये अशा अनेक शाळा आहेत ज्यामध्ये शिक्षकांना त्रास दिला जातो त्या शिक्षकांनाही या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. पुरोगामी शिक्षक संघटनेचे शहराध्यक्ष विलास पिंगळे यांनी घडलेली घटना गंभीर स्वरूपाचे असून या सर्व संघ शिक्षकांच्या पाठीशी आमची संघटना ठामपणे उभी असल्याचे जाहीर केले. तसेच प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य सचिव सुधाकर सावंत यांनी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या शिक्षकांना अशाप्रकारे लुटारू संस्थापक मिळत असते तरी ही बाब गंभीर रुपयाचे आहे त्याच्यावर उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी केली. सर्व संघटनांनी या सर्व शिक्षकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचT निर्धार केला तसेच महासंघाचे विभागीय अध्यक्ष राजेंद्र कोरे यांनी या शाळेतील सर्व शिक्षक आहेत संघटितपणे काम करत असल्याचे दिसून आल्याचे नमूद केले.शालेय कामकाज प्रामाणिकपणे करून अनेक शिक्षक आदर्श आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त असल्याचे नमूद केले तर शिक्षक समितीच्या शरद शहराध्यक्ष सविता गिरी यांनी या शाळेतील महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर वाचा फोडणार असल्याचे नमूद केले . त्यावेळी सर्व संघटनेच्या मीटिंग झालेल्या चर्चेनुसार ही लढा तीव्रपणे उभा करण्याचे ठरवले आहे. यावेळी कोल्हापुरातील सर्व संघटनांचे पदाधिकारी यामध्ये आनंदराव हिरुगडे, महादेव डावरे अनिल सरक, राजेश कोंडेकर,कुमार पाटील, अशोक पाटील, शंकर पाटील, अनिल खोत, रंगराव कुसाळे, छाया हिरुगडे, उज्वला जाधव, साक्षी कांबळे, सूर्यकांत बर्गे, संजय पाटील शंकर गुरव, श्रीधर सावंत विद्यामंदिर सर्व शिक्षक शिक्षिका सर्व संघटना पदाधिकारी पतसंस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रति,
माननीय संपादक ,
वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्ध करून सहकार्य करावे ही विनंती.

Categories
Uncategorized

नवी मुंबई येथील ज्ञानेश्वर शैलार समाज मंदीरा मध्ये ७९ बाटल्या रक्त संकलन

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी:लक्ष्मण राजे )

महाराष्ट्र राज्यात सर्वत्र रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईने विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईच्या सदस्यानी यांनी शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवला. त्यामुळे एका दिवसात ७९ बाटल्या रक्त संकलित झाले आहे.
लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे संस्थापक अध्यक्ष विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे,लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई, उपाध्यक्ष अक्षय पाचारणे. लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईसचिव सचिन कोकरे ,लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई खजिदार रोशन पाटील, लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई उपखजिदार आलताफ शेख,लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई सदस्य प्रशांत पाटील, सोपनिल सोनवणे, किरण पंतगे,सोमनाथ बारवे,विक्की वांडे यांनी रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. विशेषत: महाराष्ट्र राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक नैसर्गिक संकट आणि राष्ट्रीय आपत्ती यांमध्ये लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईमधील सदि आणि अन्य घटक नेहमीच साहाय्यासाठी पुढे येत असतात. त्यामुळे रक्तदानाचा तुटवडा भरून काढण्यासाठी आवाहन केल्यानंतर लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईमध्ये रांगा लागल्या होत्या.

Categories
मुंबई

लोकशाही विघातक ईडी क्षेपणास्त्राचे मास्टर माईंड मोदी शहा फडणवीस – स्वातीताई मोराळे

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी: लक्ष्मण राजे )

सत्तेचा व कायद्याचा दुरुपयोग करून विरोधी पक्षातील लोकांना संपुष्टात आणण्याचा प्रयत्न आज केला जात आहे. ईडी, इनकम टॅक्स यासारख्या कायद्याचा वापर सत्ता आणण्यासाठी व ती टिकवून ठेवण्यासाठी केला जात आहे. याचे मास्टरमाईंड पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा व माजी मुख्यमंत्री फडणवीस आहेत. विरोधी पक्ष संपुष्टात आणण्यासाठी याचा सर्रास वापर केला जात आहे. तसेच यामुळे विरोधी पक्ष खिळखिळा होऊन लोकशाही दुबळी करणे व हुकूमशाहीला बळ देऊन सत्ता मिळवणे आणि टिकवण्याचा प्रयत्न केला जात आहे , असे विधान करून स्वाती ताई मोराळे यांनी पुण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. मा. एकनाथराव खडसे जोपर्यंत भाजपात होते तोपर्यंत त्यांना क्लीन चीट देणारा भाजपा त्यांनी विरोधी पक्षात प्रवेश करताच त्यांच्यावर ईडीची चौकशी लावली आहे. शिवसेना जो पर्यंत मित्रपक्ष होती तोपर्यंत चांगली आणि बाहेर पडली की त्यांच्या नेत्यांवर त्यांच्या कुटूंबावर ईडीच्या चौकशीचा ससेमिरा मागे लावून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न हे मास्टर माईंड करत आहेत. आम्ही लोकशाहीचे रखवालदार म्हणणारे लोकशाहीचा कणा विरोधी पक्ष नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. राज्यपाल यांना भाज्यपाल करून टाकले आहे. विधान परिषदे वर शिफारस केलेल्या लोकांची नियुक्तीही करायची नाही आणि त्यांना नकारायचे ही नाही त्यामुळे या नियुक्तीला जो विलंब होत आहे हेही लोकशाहीला विघातक आहे. जे लोक त्या कॅटेगिरीमध्ये बसत नाहीत त्यांना नाकारून बाकीच्या नियुक्त्या करणे व बाकीच्या रिक्त जागासाठी योग्य सूचना देणे राज्यपाल महोदयाने करणे अपेक्षित आहे.
शेतकरी विरोधी व अंबानी अदानी पोषक कायदे करून हे मास्टर माईंड कोणाची रखवालदारी करत आहेत.BSNL चे Jio करण करून त्यांना काय साध्य करायचे आहे. आणि याबद्दल कोणी बोलले तर ते देशद्रोही बनवत असतील तर मास्टर माईंड यांचे पाय चाटणे म्हणजे देशप्रेम होय काय ? असा जाब स्वातीताई मोराळे यांनी या त्रिकुटाला विचारला आहे.

Categories
सातारा

नव्या वर्षांत १५० ई-बसची पुणेकरांना भेट

पाटण हिंदू सम्राट प्रतिनिधी उमेश सुतार यांजकडून

केंद्र सरकारच्या फेम-२ योजनेअंतर्गत पीएमपी विजेवर धावणाऱ्या (इलेक्ट्रिकल बस- ई-बस) १५० गाडय़ा भाडेतत्त्वावर घेणार आहे. नव्या वर्षांत या गाडय़ा टप्प्याटप्प्याने पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणार असून प्रति बस ५५ लाख रुपयांचे अनुदान पीएमपीला केंद्र सरकारकडून मिळणार आहे. नव्याने गाडय़ात प्राप्त होणार असल्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवाशांना उच्च दर्जाची सुविधा मिळेल, असा दावा पीएमपीकडून करण्यात आला आहे.

केंद्र सरकारकडून फास्टर अ‍ॅडॉप्शन अ‍ॅण्ड मॅन्युफॅ क्चरिंग ऑफ इलेक्ट्रिकल व्हेइकल्स-२ ही योजना हाती घेण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पीएमपीने ६०० ई-बससाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारला दिला होता. केंद्र सरकारने १५० गाडय़ा भाडेकराराने घेण्यास मान्यता दिली आहे. त्याबाबतची माहिती खासदार गिरीश बापट आणि पीएमपीचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक डॉ. राजेंद्र जगताप यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने या वेळी उपस्थित होते.

केंद्र सरकारकडून प्रति बस ५५ लाख रुपये पीएमपीला मिळणार आहेत. त्यामुळे पीएमपीने ई-बस साठीची निविदा प्रक्रिया राबविली होती. मात्र योग्य दर प्राप्त न झाल्यामुळे ही निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली. त्याबाबतची माहिती केंद्र सरकारला दिल्यानंतर केंद्राने ३१ डिसेंबपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यास पीएमपीला मुदतवाढ दिली होती, असे डॉ. राजेंद्र जगताप यांनी सांगितले. शहराची वाढती लोकसंख्या, इंधनवाढ अशा कारणांमुळे पीएमपीचा तोटा वाढत आहे. नागरिकांच्या सोईसाठी ६०० ई-बस खरेदीचे नियोजन आहे. ई-बस मुळे प्रदूषणमुक्त सेवा प्रवाशांना मिळणार असल्याचे खासदार गिरीश बापट यांनी सांगितले.

Categories
मुंबई

बेलापूर किल्ल्याच्या सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

सिडकोच्या शहर अभियंताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसने घातला घेराव

विरेंद्र म्हात्रे नवी मुंबई प्रतिनिधी : नवी मुंबई शहरातील बेलापुर किल्ल्याचे सुरू असलेले काम समाधानकारक होत नसल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सिडको अधिकाऱ्यांना धाऱ्यावर धरले आहे.
राज्य पुरातत्व विभाग यांनी पाहणी केल्यानंतर देखील पुरातन व संवर्धनाचे नियम डावलून बेलापूर किल्ल्याचे केलेले सिमेंटीकरणाचे काम अद्यापि सिडकोकडून हटवले न गेल्याने राष्ट्रवादी युवक कॉग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष नितीन नाना चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्त्यासमवेत सिडको शहर अभियंता यांना घेराव घातला.
किल्याच्या कामासाठी नेमलेले ‘किमया कन्सलटंट’ यांनी सिडकोला दिलेल्या अर्धवट माहिती व सिडको कार्यकारी अभियंता यांच्या निष्काळजीपणामुळे किल्ल्याच्या झालेल्या 10 टक्के कामामध्ये साधारण 50 लाखाचे सिमेंटिकरण झाले असून ते तात्काळ हटवावे व अशा कंत्रातदारावर कारवाई करून झालेली नुकसान भरपाई वसूल करावी, तसेच या कामावर अंकुश ठेवण्यासाठी पुरातत्व विभागाने 10 दिवसात संवर्धन अधिकारी नेमावा, तोपर्यंत काम थांबवावे अशी मागणी नितीन चव्हाण यांनी केली.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बेलापुर विधानसभा उपाध्यक्ष आकाश पाटील, संदीप मोहिते, अमोल मापारी, विशाल भिलारे, राम पुजारे, विश्‍वजित भोईटे व इतर पदाधिकारी होते.

Categories
मुंबई

७५१ वी नामदेवमहाराज जयंती वर्षाची सुरुवात विशेषांकाने

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी:लक्ष्मण राजे )

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७५१ व्या जयंती वर्षाची सुरुवात नामदेव समाजोन्नती परिषद, पुणे शहर संस्थेचे अध्यक्ष संदिप लचके व प्रशांत सातपुते यांच्या पुढाकाराने सचिव सुभाष वासुदेव मुळे यांनी संपादित कलेला नामदेव महाराज यांचे जीवनचरित्र परिपूर्ण विशेषांकाचे पुनर् प्रकाशन रविवार दि. १३ डिसेंबर २०२० रोजी सा. फु. पुणे विद्यापीठ येथे कुलपती महामहीम राज्यपाल मा. भगत सिंह कोश्यारी, व कुलगुरू, डॉ. नितीन करमळकर सर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे मा. उपकुलगुरू डाॅ. एन. एस. उमराणी सर, कुलसचिव मा. डाॅ. प्रफुल्ल पवार सर, शिख समाजाचे नेते संत सिंग मोखा, नामदेव अध्यापन प्रमुख डाॅ. सदानंद मोरे सर, श्री. राजेश पांडे सर, संजय नहार, मा. आ. रामदास फुटाणे, डाॅ. अशोक कामत, सतीश पोरे सर, मा. नगरसेवक किरण बारटक्के आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.

नामदेव समाजोन्नती परिषदेचे सरचिटणीस डाॅ. अजय फुटाणे, विभागीय उपाध्यक्ष संजय नेवासकर यांचे सह मोहन मुळे, विजय कालेकर, सुभाष पांढरकामे, अरूण काळे, महेश मांढरे, संजय वैद्य, विक्रांत सदरे, रामचंद्र होमकर, राजेंद्र भुतकर, अक्षय मांढरे, सागर मांढरे, रमेश हिरवे, प्रकाश शिंदेकर, दिंगबर क्षीरसागर, रजनीकांत निखळ, राजकीशोर सुपेकर यांचे सह नामदेव समाजोन्नती परिषद, ना.स.प पुणे शहर, पुणे, पिंपरी, चिंचवड शहरातील शहरातील ज्ञातीसंस्थाचे प्रमुख पदाधिकारी, विद्यापीठातील सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी व यांच्यासह पुणे शहरातील निमंत्रित उपस्थित होते. अशी माहिती गणेश हिरवे यांनी दिली.

Categories
कोल्हापूर हातकणंगले

वडगांव प्रिमीयर लिग टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष पदी – मा.श्री.संताजी भोसले-सर व उपाध्यक्षपदी मा. श्री.डॉ सुरज कुडाळकर – (सर) यांची निवड

प्रशांत भोसले

वडगांव :वडगांव प्रिमीयर लिग 2020 ऐतिहासिक पर्व वडगांव शहरात आई अबांबाईच्या आशिर्वादाने नुकतेच पार पडले .या व्हि.पी.एल.क्रिकेट स्पर्धेमुळे वडगांव शहरात उत्कृष्टरित्या खेळणारे जिगरबाज, बलाढ्य खेळाडू आहेत हे आपल्या वडगांव नगरीचं भाग्यच आहे . खरच या सर्व खेळाडूंच कौतुक कराव तितकं थोडच आहे.
आज या वडगांव प्रिमीयर लिग टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या संचालक मंडळाची निवड एक मताने निवड करण्यात आली .तसेच वडगांव प्रिमीयर लिग टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष पदी – मा.श्री.संताजी भोसले-सर व उपाध्यक्षपदी मा. श्री.डॉ सुरज कुडाळकर – (सर) यांची आणि श्री.संतोष देसाई खजीनदारपदी , श्री.संतोष माळी (बंडा)सचिव पदी. तसेच संचालक मंडळ – रोहीत माळी ,अभिनंदन (बबलू) सालपे सुकमार देसाई ,धनाजी केर्लेकर-DK
,सचिन चव्हाण-भैय्या ,प्रतीक शिंदे ,अंकुश माने,
सागर गुरव ,प्रवीण दुर्गुळे ,संतोष माने अजित टोमके, नितीन सणगर, सुजित पोवार इत्यादी
मान्यवरांची एक मताने संचालक मंडळाची निवड करण्यात आली. यावेळी सर्व मान्यवर खेळाडू उपस्थित होते.

Categories
नांदेड

मुखेडात स्वच्छतेच्या नावाखाली लाखो रूपये जातात तरी कुठे

नगराध्यक्ष जोमात मुखेड शहर कोमात

सफाई कंत्राटदाराचा बेपत्ता मुख्याधिकाय्राचे दुर्लक्ष

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

मुखेड:दि.31.मुखेड शहरात स्वच्छतेच्या नावाखाली लाखो रूपये खर्च केले जातात.मात्र मुळात स्वच्छता हि केलीच जात नाही.त्यामुळे शहरात स्वच्छतेचे तिन तेरा झाले आहेत.मुख्यअधिकरी विजय चव्हाण यांच्या दुर्लक्ष पणामुळे मुखेड शहाराची कचरा कंडी झाली आहे.

शहरात अनेक ठिकाणी ठेवण्यात आलेल्या कचरा कुंडी कचय्राने भरले आहेत.मात्र ते रिकामी केले जात नसल्याने कचरा कुंडीच्या भोवतीच रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात कचरा साचत आहे. कचरा घेऊन जाणारी घंटा गाडीच फिरत नसल्याने नागरिक रस्त्यावर कुठेही जाऊन कचरा टाकत आहेत.तर शहारात साफसफाई ही केली जात नसल्याने अनेक ठिकाणी कचरा जसाच्या तसाच पडून राहतो.

मुखेड नगरपरिषदेच्या वतिने लाखो रूपये खर्च करून बांधण्यात आलेल्या स्वच्छता गृहाची तर अत्यंत बिकट अवस्था झाली आहे.स्वच्छता गृहाला दरवाजे नाहीत.तर आत्ता मध्ये नुस्ती घाण पडलेली आहे.एकदा ही साफसफाई केली जात नसल्याने मोठी दुर्गंधी येत आहे.त्यामुळे स्वच्छतेच्या नावाखाली लाखो रूपये खर्च केले जातात तर ते पैसे जातात तरी कुठे असा प्रश्न मुखेड शहरवासीयांना पडला आहे.

स्वच्छतेच्या नावाखाली लाखो रूपये कागदोपत्रीच खर्च केले जातायत. त्यामुळे मुखेडमध्ये मोठ्या प्रमाणात सर्वत्र कचरा साचल्याने स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. तसेच नालेसफाई देखील रखडल्याने शहरात सर्वत्र दुर्गंधी पसरलीय. स्वच्छतेसाठी देण्यात आलेला कंत्राटदार बेपत्ता झाल्याने मुखेड शहराची कचराकुंडी बनलीय. या प्रकाराकडे स्थानिक प्रशासनाने सर्रासपणे दुर्लक्ष केल्याने मुखेडकर नरकयातना सहन करतायत.मात्र नगराध्यक्ष बाबूराव देबडवार हे जोमात आहेत.त्यामुळे मुखेड शहर कोमात आहे.त्यामुळे आत्ता तरी ते स्वच्छतेकडे लक्ष देतील का आणि मुखेड शहरवासीयांना या दुर्गंधीतून मुक्त करतील का हा प्रश्न पडला आहे.

Categories
नांदेड

पीएचडी कोर्स वर्क परीक्षेत लातूर च्या केंद्रावर गैरप्रकार

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:विद्यापीठाची चोराला सोडून संन्याशाला फाशी अशी भूमिका- प्रा सूरज दामरे सिनेट सदस्य
नुकत्याच झालेल्या पीएचडी कोर्स वर्क मध्ये लातूर येथील दयानंद विज्ञान महाविद्यालय हे केंद्र होते सदर केंद्रावर एकूण 112 विद्यार्थी परीक्षेस पात्र होते पण सदर 112 पैकी 36 विद्यार्थी यांनी गैरप्रकार केला असे निदर्शनास आले . 36 विद्यार्थ्यांनी व्हाट्स अप ग्रुप तयार करून परीक्षेतील उत्तरे एकमेकांना या ग्रुपद्वारे सांगितले.सदर गैरप्रकार निदर्शनास येताच विद्यापीठाने चौकशी समिती नेमून सदर विद्यार्थ्यांची चौकशी केली आणि त्या केंद्रावरील सर्वच विद्यार्थ्यांची पुनः परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला.जो की अत्यंत चुकीचा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी गैरप्रकार केला त्यांना दोषी ठरवून त्यांच्यावर कारवाही करायचे सोडून विद्यापीठाने त्या केंद्रावरील सर्वांची पुनः परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देणे असाच काहीसा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे .तरी विद्यापीठाने आपला निर्णय मागे घेऊन खालील पैकी एक निर्णय घ्यावा जो विद्यार्थी हिताचा आहे.
1) 36 विद्यार्थी जे दोषी आहेत त्यांचीच फक्त पुनः परीक्षा घेण्यात यावी बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्यांचे निकाल जाहीर करावे
2) पुनः परीक्षा घ्यायचीच असेल तर संपूर्ण विद्यापीठातील विद्यार्थ्यांची घ्यावी
सदर बाबीचा आपण गांभीर्याने विचार करावा ही विनंती अन्यथा विद्यार्थी हितासाठी रस्त्यावर उतरू याची नोंद घ्यावी.
असे प्रा सुरज दामरे,
सिनेट सदस्य,नांदेड विद्यापीठ यांनी सांगितले आहे.

Categories
Uncategorized

आमदार.अरुण गणपती लाड यांचा पदवीधर मतदान संघात मिळालेल्या यशाबद्दल कार्यकत्यांना त्यांचे आभार पत्र वितरण सत्कार व साधना महिला नागरी महिला पतसंस्था शिरूर यांच्या दिनदर्शिका प्रकाशन

प्रतिनिधी.पोर्णिमा बुचके आमदार.अरुण गणपती लाड यांचा पदवीधर मतदान संघात मिळालेल्या यशाबद्दल कार्यकत्यांचे आभार पत्र वितरण व साधना महिला नागरी महिला पतसंस्था शिरूर यांच्या दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन समिती माजी सभापती विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सौ.सुजाता(भाभी) अशोक पवार प्रमुख उपस्थितीत करण्यात आला,यावेळी नितीन जाधव सर व त्यांचे सहकारी यांनी सर्व कार्यकर्त्यांना अरुण काका लाड यांच्या वतीने आभार पत्र व सत्कार जि.प सदस्या सौ.सुजाता (भाभी )अशोक पवार, पंचायत समिती सभापती.मोनिका ताई हरगुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मा.श्री.रवींद्र(बापु)काळे,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष.मा.श्री.मुजफ्फर कुरेशी,मा.नगरसेवक श्री.जाकिरखान पठान या सर्वांच्या हस्ते आभार पत्र व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस मा.श्री.रविंद्र काळे यांनी प्रास्ताविक केले,त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचे व सोशल मीडिया यांचे कौतुक केले. त्यानंतर साधना माहिला नागरी सह.पतसंस्थेच्या दिनदर्शिके चे प्रकाशन करण्यात आले. जि.प.सदस्य.सौ.सुजाता (भाभी)अशोक पवार यांनी सर्वांना मार्गदर्शन केले त्या म्हणाल्या सर्व महिला आत्मनिर्भर झाल्य पाहिजे व ज्या अशिक्षित महिला आहे,त्यांना स्व:ताची सही करता आली पाहिजे यासाठी मोहिम राबविणार असल्याचे सांगितले. यावेळी सौ.साधना संतोष शितोळे सौ.संगिता ताई शेवाळे, सौ.पल्लवी ताई शहा, सौ.तनिष्का ताई कर्डिले, युवक अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस रंजनभैय्या झांबरे,राहील शेख, हाफिज बागवान, कलिम सय्यद, राजद्दीन सय्यद,निलेश पवार,प्रतिक काशीकर, संतोष शितोळे, इरफान पठान,श्री.प्रशांत पवार सोशल मीडिया उपस्थित होते.

आमदार अरुण काका लाड यांच्या वतीने नितीन जाधव सर यांनी सर्वांचे आभार मानले.

Categories
मुंबई

भारतीय जनता पार्टी उत्तर मुंबई जिल्हा भटके विमुक्त आघाडी पदाधिकारी यांची निवड व कार्यकर्ता मेळावा संपन्न

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी: लक्ष्मण राजे )

उत्तर मुंबई जिल्हा कार्यालयाच्या सभागृहात भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीवर पदाधिकारी यांची निवड पत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच येत्या महानगरपालिका निवडणूकीत भाजपाचाच महपौर आणून महानगर पालीकेत भाजपाची सत्ता आणणे साठी आता पासूनच पक्ष संघटन मजबूत करण्याच्या उद्देशाने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे.या साठी भटके विमुक्त आघाडीच्या पदाधिकारी यांची निवड करून गौरविण्यात आले.सदर कार्यक्रम सरकारी नियमांचे पालन करून संपन्न झाला. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष गणेश खणकर , दत्तात्रय महाजन , गिरीधर साळुंके , आनंद कुराडे, नरेंद्र राठोड , दिलीप पंडीत, कमलाकर कोलपाटे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच भारत कवितके,किरण कुचेकर, मल्हारी लाळगे, विजय पाल,उदयराज यादव, निवृत्ती भोजणे, संतोष चांगण, संतोष भोजणे, बाळासाहेब कुचेकर , ध्रुपद रवंदळे हे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Categories
लोहा

लोहा तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतीकरिता १५२८ अर्ज दाखल; रायवाडी,अंतेश्वर, भारसावडा,सोनमांजरी ग्रामपंचायत बिनविरोध!

लोहा, प्रतिनिधी (शिवराज पवार)
तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतीच्या ७७४ जागेची निवडणुक रनधुमाळी सुरु झाली असून या जागेसाठी १५ जानेवारीला मतदान आहे. या दिवशी १ लाख ७३ हजार महिला व पुरुष मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ग्रामपंचायतीच्या संरपचपदाचे आरक्षण निवडणुक पुर्वी जाहिर झाले होते पण शासनाच्या आदेशामुळे संर्पुण आरक्षण रद्द ठरवुन पुन्हा निकालानंतर नव्याने ते जाहीर करण्यात येणार असल्याचे जाहिर केले आहे त्यामुळे संरपंच पदाचे डोहाळे लागलेल्याचा उत्साह थंडावला आहे. निवडणुक लढवुन सरपंच होणाऱ्या सदस्याला शिक्षणाची आट लागु असा आदेश प्राप्त होताच निवडणुकिच्या रंगात भंग झाला या पुर्वी आरक्षण जाहिर झाल्याने अनेक जेष्ठाना उसने अवसान देऊन निवडणुकिच्या फडात आणले होते पुन्हा जेष्ठाचा हिरमोड झाला. १९९४ च्या पुर्वीचा जन्म असेल त्याला शिक्षणाची आट लागु नाही पुन्हा शिथीलता असल्याने पुन्हा शिक्षणाच्या कागदपञाची किट किट नको म्हणुन पुन्हा आंगठे बहारदाराना भाव आला पॅनल प्रमुखावर जेष्ठाला शोधन्याची वेळ आली या पुर्वी निवडणुकीत शक्ती प्रदर्शन करुन उमेदवारी अर्ज सादर करण्यात येत होता पण ऑनलाईन अर्जाची पोच पावती देण्यासाठीच उमेदवाराला तहसिल कार्यालयात घेवून येत आहेत .अर्ज सादर करण्याचा एकच दिवस अवधी राहिला असुन या पुर्वीच्या दिवसात एकुन ८४४ अर्ज दाखल केले आहेत या पुर्वी सहा अर्ज सादर केले होते. आता पर्यंत तहसिल कार्यालयात निवडणुक विभागाला ऑनलाईन करण्यासाठी ८४४ निवडणुक विभागात अर्ज दाखल व शेवटीच्या दिवशी ७८४ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती मिळाली आहे.लोहा तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतची निवडणुक प्रक्रिया सुरू झाली असून २८ टेबलवरुन एकूण १५२८ अर्ज दाखल झाले आहेत या निवडणुकिसाठी शनिवारी पहिले निवडणुक प्रशिक्षण झाले त्यात अनेक परिक्षिणार्थी अनुपस्थीत होते यावर तहसिलदार तथा निवडणुक निर्णय अधिकारी विठ्ठल परळीकर काय कारवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुकिसाठी नायब तहसीलदार राम बोरगावकर,अशोक मोकले,नायब तहसिलदार देवराये,प्रशांत गायकवाड,पेशकार प्रमोद बडवणे, आपशेटे,पांचाळ
निवडणुक विभागांचे टि.के.मुंगरे आदी परिश्रम घेत आहेत.

Categories
मुंबई Uncategorized

ग्रामपंचायत निवडणूकीत रत्नागिरी , संगमेश्वर मतदार संघात शिवसेनेची बाजी

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी:लक्ष्मण राजे )

राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री व रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी केली पहिल्याच दिवशी विरोधकांवर मात, मतदार संघात मोठ्या प्रमाणात शिवसेना उमेदवार बिनविरोध , सामंत यांच्या खेळीने विरोधक निष्प्रभ झाले आहेत. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात देखील शिवसेनेचाच आवाज आणि दबदबा आहे.
शिवसेनेचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार
पाली ११ पैकी १० शिवसेना
खानु ९ पैकी ६ शिवसेना
कापडगाव ९ पैकी ७ शिवसेना
कशेळी ७ पैकी ३ शिवसेना
हातखंबा ११ पैकी १ शिवसेना
उकक्षी ७ पैकी ७ शिवसेना
खलगाव ११ पैकी ८ शिवसेना
चावे ७ पैकी ७ शिवसेना
पानवल ७ पैकी ७ शिवसेना
नाचणे १७ पैकी ५ शिवसेना
हरचेरी ११ पैकी ९ शिवसेना
कुरताडे ९ पैकी ७ शिवसेना
चिंद्रावली९ पैकी व ७ शिवसेना
झरेवाडी ९ पैकी ५ शिवसेना
गावखडी ११ पैकी ३ शिवसेना
मांजरे ७ पैकी ६ शिवसेना
परचुरी ९ पैकी ९ शिवसेना
मेढे ७ पैकी ७ शिवसेना
डावखोल ७ पैकी ७ शिवसेना
कोंडे ९ पैकी ७ शिवसेना
कुरधुंडा ७ पैकी २ शिवसेना
खरवते ७ पैकी ६ शिवसेना
जांभरून ७ पैकी ७ शिवसेना.
येत्या ४ जानेवारीला शिवसेनेच्या बिनविरोध होणा-या उमेदवारांच्या संख्येत वाढ होईल अशी माहिती बंड्या साळवी यांनी दिली आहे.

Categories
नांदेड

कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नांदेड जिल्ह्यात ताळेबंदीच्या (लॉकडाउन) कालावधीत 31 जानेवारीपर्यंत वाढ

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि.30.कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनाच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात ताळेबंदीचा (लॉकडाउन) कालावधी रविवार 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढविण्यात आला आहे. याबाबतचा आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी निर्गमीत केला आहे.

साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 च्या मधील तरतुदीनुसार 14 मार्च 2020 रोजीच्या अधिसुचनेनुसार जिल्हादंडाधिकारी यांना कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणुन घोषित केले आहे. तसेच फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 नुसार जिल्हादंडाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांना प्राप्त अधिकारान्वये फौजदारी प्रक्रिया दंड संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) अन्वये या आदेशाद्वारे संदर्भात नमुद आदेश 31 ऑक्टोंबर 2020, 4, 15 व 28 नोव्हेंबर 2020 मधील अटी व शर्ती जशास तसे लागू करुन संपूर्ण नांदेड जिल्ह्यात रविवार 31 जानेवारी 2021 पर्यंत ताळेबंदीचा कालावधी वाढविण्यात आला आहे.

या आदेशाची अंमलबजावणी करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांनी वरील नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे,नियमाला धरुन व मानवी दृष्टीकोनातून करावी. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती,संस्था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल. तसेच या आदेशाची अंमलबजावणी करीत असताना सद्हेतुने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विरुद्ध कुठल्याही प्रकारची कायदेशीर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही,असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी दि.30 डिसेंबर 2020 रोजी निर्गमित केले आहेत.

Categories
मुंबई

उदगीर नगरपालिकेच्या हद्द वाढीला शासनानाची मान्यता

*शासनाचा एतिहासिक निर्णय *उदगीर शहराचा भुगोल बदलला

*राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रयत्नास यश

मुंबई :उदगीर नगरपालिकातील सर्वे नंबर .3,155 ते 338.
यांना शासनाने उदगीर नगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे .अनेक दिवसांपासून येथील नागरिकाची हद्दीत समाविष्ट करण्याची मागणी होती शासनाने या मागणीला मान्यता दिली आहे अशा माहिती राज्याचे पर्यावरण, पाणी पुरवठा राज्यमंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी दिली आहे.
राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले की उदगीर शहराचा विकास झपाट्याने होत आहे शहरात विविध विकास कामे सुरू आहेत शहराचा विस्तार होत आहे सर्वे नंबर 3,155,ते 338 येथील नागरिकाची अनेक दिवसांपासून नगरपालिका क्षेत्रात समाविष्ट करण्याची मागणी होती हे सर्वे नंबर लगतच्या ग्रामपंचायत मघ्ये समाविष्ट नव्हते त्यामुळे येथील नागरिकांना खरेदी खत बनविणे,अशा अनेक महसूली समस्या निर्माण होत होत्या याबाबत राज्य शासनाकडे हद्द वाढीचा प्रस्ताव सादर केला होता. याला शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये मलकापूर, सोमनाथ पुर ,निडेबन,पिंपरी मादलापुर येथील काही सर्वे नंबर नगरपालिका हद्दीत समाविष्ट करण्यात येणार आहेत यात उदगीरच्या
उत्तरेस सर्वे नं 97 च्या उत्तर पश्चिम कोपरा ते सर्वे नं 193 च्या उत्तर पुर्व कोपरा पर्यंत
पूर्व दिशेला
सर्वे नंबर 193 च्या उत्तर पुर्व कोपरा पासून सर्वे नंबर 254च्या दक्षिण पुर्व कोपरा
दक्षिण दिशेला
सर्वे नंबर 254 दक्षिण पुर्व कोपरा ते सर्वे नंबर 332 च्या पश्चिम दक्षिण कोपऱ्या पर्यंत
पश्चिम दिशेला
सर्वे नंबर 333 च्या दक्षिण पश्चिम कोपरा ते सर्वे नंबर 97 उत्तर पश्चिम पर्यंत हद्द वाढीस शासनाने मान्यता दिली आहे. नगरपालिकेच्या हद्दी मुळे या परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे नागरिकांच्या महसूली अडचणी दुर होणार आहेत अनेक वर्षी पासून शासन स्तरावर प्रलंबित असलेली हद्द वाढीची मागणी सहा माहिण्यात पाठपुराव्याने मार्गि लागली आहे लातूर जिल्हा परिषद, औरंगाबाद विभागीय आयुक्त, व मंत्रालयातील नगरविकास विभागात या संदर्भात सतत पाठपुरावा केला गेला होता आज शासनाने या हद्द वाढीस मान्यता दिली आहे अशी माहिती राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.

Categories
नांदेड

कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर पल्स पोलिओ लसीकरणासाठी प्रशासन सज्ज

17 जानेवारी रोजी पल्स पोलिओ मोहिमीचे आयोजन

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि. 30 :- 1995 पासून पल्स पोलिओ लसीकरण मोहिम संपूर्ण देशभर नियमितपणे राबविण्यात येत असूनही पोलिओचे आव्हान पूर्णत:संपुष्टात आले असे नाही. महाराष्ट्रात 2010 मध्ये मालेगाव शहरात 4 व बीड जिल्ह्यात 1 असे एकुण 5 पोलिओ रुग्ण आढळले होते.यातील मालेगाव शहरातील 4 पोलिओ रुग्णांनी नियमित लसीकरणांतर्गत एकही लसीची मात्रा घेतली नव्हती तर बीड जिल्ह्यातील रुग्ण हा स्थलांतरीत कुटुंबातील असल्याने त्याला पोलिओची लस मिळाली नव्हती.ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन शासनातर्फे सातत्याने पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन केले जात असून नांदेड जिल्ह्यात ही मोहिम यशस्वी राबविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात आवश्यक असणारी प्राथमिक तयारी पूर्ण झाली असून ही मोहिम यशस्वी करु असा निर्धार जिल्हा प्रशासनातर्फे व्यक्त केला.

या समन्वय समितीच्या बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शरद कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) एस.व्ही.शिंगने, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ.विद्या झिने,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बालाजी शिंदे,जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे डॉ. संतोष शिरसीकर यांची उपस्थिती होती.

संपूर्ण देशात 13 जानेवारी 2011 नंतर आज पर्यंत एकही पोलिओचा रुग्ण आढळून आला नाही हे आजवर सातत्यपूर्ण राबविल्या गेलेल्या पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे यश आहे. तथापि आजूनही या मोहिमेची अत्यावश्यकता असून कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर 17 जानेवारी 2021 रोजी राबविल्या जाणाऱ्या लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे,असे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी सांगितले. या मोहिमेत (BOPV) बायव्हायलंट पोलिओ लसीचा वापर करण्यात येईल. मे 2016 पासून नियमित लसीकरणांतर्गत शुन्य ते 1 वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओची इंजेक्शन माध्यमातून आयपीव्ही लस देण्यात येते. या मोहिमेत 17 जानेवारी रोजी बुथवर व त्यानंतर ग्रामीण भागात 3 दिवस व शहरी भागात 5 दिवस याप्रमाणे घर भेटीचेही नियोजन करण्यात आले आहे. ग्रामीण क्षेत्र व स्थलांतरित / भटकी लोकसंख्या व जोखीमग्रस्त कार्यक्षेत्रात लसीकरणांतर्गत विशेष लक्ष दिले जात आहे.यात अतिदुर्गम भाग,डोंगराळ भागातील पाडे,वस्त्या, शहरी भागातील झोपडपट्टी,विट भट्ट्या / बांधकामे,स्थालांतरीत वस्त्या / ऊसतोड वस्त्या, सलग तीन सदरे रद्द झालेली गावे यावर भर दिला जात आहे.या भागातील एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी जिल्ह्यातील ग्रामीण आरोग्य विभागाचा संक्षिप्त आढावा घेऊन आरोग्य विभागाला निर्देश दिले.

Categories
लोहा

लोह्यात गॅस सिलेंडर लिकेज होऊन आगीचा भडका,जीवितहानी नाही;

लोहा, ता.प्रतिनिधी(शिवराज पवार)
लोहा शहरातील देऊळ गल्ली भागातील रहिवासी नंदकुमार श्रीराम भोसकर यांच्या घरातील घरगुती वापराचे नवे भरलेले गॅस सिलेंडर दिनांक 30 12 2020 रोजी बुधवारी लिकेज होऊन आगीचा भडका उडाला आग एवढी प्रचंड होती की त्यामध्ये घरातील सर्व संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या त्यामध्ये अन्नधान्य कपडे कपाट दागदागिने व इतर साहित्याचा समावेश आहे हे सर्व काही क्षणातच जळून खाक झाली आगीचे रुप पाहता तात्काळ नगरपालिका लोहा येथील अग्निशमन गाडीला पाचारण करण्यात आले व गाडी आल्यानंतर अथक परिश्रमानंतर आग नियंत्रणात आली या आगीमध्ये हे जवळपास सर्व संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाले असून यात जवळपास दोन लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे सदरील आग विझवण्यासाठी लोहा नगरपालिकेच्या अग्निशामन दलाला दीड ते दोन तास परिश्रम घ्यावे लागले यावेळी नगरसेवक अमोल व्यवहारे ,स्वप्नील दमकोंडवार, नबी शेख, लोहा नपचे अधीक्षक उल्हास राठोड, भूषण मनोज कवटीकवार, आग्निशमन गाडीचे चालक संग्राम नागरगोजे अग्निशमन कर्मचारी बालाजी मंजलवार, चांदु राजकौर, विष्णू भिसे आदींनी आग विझविण्यासाठी परिश्रम घेतले.

Categories
नांदेड

नांदेडमध्ये कोरोना बाधेतीत रुग्णांची संख्या वाढ:

प्रशासनाची चिंता वाढली

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:30 डिसेंबर रोजी खाजगी रुग्णालयात एका 83 वर्षीय पुरूष रुग्णाचा कोरोना बाधेने मृत्यू झाला आहे.आज कोरोना बाधीत नवीन रुग्णांची संख्या वाढली आहे.कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांची आजची संख्या 40 आहे.

प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या कोरोना माहितीनुसार आज 30 डिसेंबर रोजी खाजगी रुग्णालयात देऊळगल्ली ता.लोहा येथील 83 वर्षीय पुरूष रुग्णांचा कोरोना बाधेने मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजपर्यंत कोरोना बाधेने मरण पावणाऱ्या रुग्णांची संख्या 573 झाली आहे.

एनआरआय/पंजाबभवन/महसूल भवन/घरी-14, सरकारी रुग्णालय विष्णुपूरी-10, खाजगी रुग्णालय-5, हदगाव-5, कंधार-1, जिल्हा रुग्णालय-2, मुखेड-3 अशा एकूण 40 रुग्णांची उपचारानंतर बरे झाले म्हणून त्यांना सुट्टी झाली आहे. त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 20333 झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण 94.90 टक्के आहे. आज प्राप्त झालेल्या 969 अहवालांमधील 894 अहवाल निगेटीव्ह आहेत, 65 अहवाल पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे आज एकूण रुग्ण संख्या 21425 एवढी झाली आहे. आज प्राप्त झालेल्या आरटीपीसीआर तपासणीमध्ये 28 आणि अँटीजेन तपासणीमध्ये 37 असे एकूण 65 रुग्ण आहेत.

आजच्या 65 रुग्णांमध्ये सर्वाधिक नांदेड मनपा क्षेत्रात 16 रुग्ण आहेत. तसेच नायगाव येथे पण 16 रुग्ण आहेत. आज 631 स्वॅब तपासणी अहवाल प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब 9 आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब 1 आहेत. आजच्या आरटीपीसीआर तपासणीमध्ये मनपा क्षेत्र-9, बिलोली-1, देगलूर-1, नांदेड ग्रामीण-1, किनवट-4, नायगाव-11, लातूर-1 असे 28 रुग्ण आहेत. आज प्राप्त झालेल्या ऍन्टीजेन तपासणीमध्ये मनपा क्षेत्र-7, भोकर-1, देगलूर-8,मुखेड-4, कंधार-1, लोहा-1,नांदेड ग्रामीण-2,नायगाव-5,हदगाव-3, उमरी-1,बिलोली-2, लातूर-2 असे 37 रुग्ण आहेत.

आज कोरोनाचे 318 ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर शासकीय रुग्णालय विष्णुपूरी-14,जिल्हा रुग्णालय-18,जिल्हा रुग्णालय नवीन इमारत-25,नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण-140, मुखेड-16, देगलूर-17, हदगाव-1,किनवट-3,नांदेड जिल्ह्यातील तालुकाअंतर्गत गृह विलगिकरण-63, खाजगी रुग्णालय-20, हैद्राबाद-1 असे उपचार सुरू आहेत.यात अती गंभीर स्वरुपात 11 रुग्ण आहेत. आजच्या स्थितीत रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी-174,जिल्हा रुग्णालय कोविड केअर हॉस्पीटल-59.

Categories
नांदेड

नांदेड महापालिकेत ‘स्थायी’च्या सभापतीपदी विरेंद्रसिंग गाडीवाले

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि.30.वाघाळा महापालिकेत कॉँग्रेसचे स्पष्ट बहुमत आहे.त्यामुळे त्यांच्याकडेच महापौर, उपमहापौरांसह इतर समित्यांची सर्व पदे आहेत.पालकमंत्री अशोकरावजी चव्हाण यांनी स्थायी समिती सभापतीपदासाठी कॉँग्रेसचे सभागृह नेते विरेंद्रसिंग गाडीवाले यांची निवड केली आणि त्यानुसार बुधवारी दुपारी महापौर मोहिनी येवनकर यांच्या कक्षात बैठक झाली आणि त्यात श्री.गाडीवाले यांची घोषणा करण्यात आली.त्यानंतर नगरसचिव अजितपालसिंग संधू यांच्याकडे अर्ज दाखल करण्यात आला.

नांदेड वाघाळा महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी कॉँग्रेसचे सभागृह नेते विरेंद्रसिंग गाडीवाले यांनी बुधवारी (ता. ३०) नगरसचिव अजितपालसिंग संधू यांच्याकडे अर्ज दाखल केला आहे.त्यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची निवड निश्चित असून गुरूवारी (ता.३१) सभागृहात निवडीची औपचारिकता बाकी राहिली आहे.

नांदेड वाघाळा महापालिकेत कॉँग्रेसचे स्पष्ट बहुमत आहे. त्यामुळे त्यांच्याकडेच महापौर, उपमहापौरांसह इतर समित्यांची सर्व पदे आहेत.स्थायी समितीच्या आठ सदस्यांची निवड झाल्यानंतर श्री.गाडीवाले यांची निवड होणार हे जवळपास निश्चित होते.सभापतीपदासाठी आठ जणांनी अर्ज दाखल केले होते.त्यामुळे आता स्थायी समितीच्या सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

विरेंद्रसिंग गाडीवाले यांची निवड
त्यानंतर पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यापैकी श्री. गाडीवाले यांची निवड केली आणि त्यानुसार बुधवारी दुपारी महापौर मोहिनी येवनकर यांच्या कक्षात बैठक झाली आणि त्यात श्री. गाडीवाले यांची घोषणा करण्यात आली. त्यानंतर नगरसचिव संधू यांच्याकडे अर्ज दाखल करण्यात आला.यावेळी माजी पालकमंत्री डी.पी.सावंत, आमदार मोहन हंबर्डे,महापौर मोहिनी येवनकर, विजय येवनकर,माजी सभापती अमितसिंह तेहरा,किशोर स्वामी, उमेश पवळे,माजी उपमहापौर सतीश देशमुख यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.

सलग पाच वेळा नगरसेवक
नांदेड महापालिकेत तब्बल पाच वेळा (दोन वेळ शिवसेना आणि तीन वेळ कॉँग्रेस) नगरसेवक म्हणून निवडून येण्याचा विक्रम विरेंद्रसिंग गाडीवाले यांनी केला आहे.त्यांचे वडील बलवंतसिंग गाडीवाले हे देखील तीन वेळा निवडून आले आणि त्यांनी विरोधी पक्षनेते आणि महापौरपदही सांभाळले होते. वडील आणि मुलगा सलग तीन वेळा निवडून येण्याचा विक्रमही गाडीवाले यांच्या नावावर आहे. गेल्या वेळेस सलग पाच वर्षे आणि सध्‍याचे तीन वर्षे अशी आठ वर्षे विरेंद्रसिंग गाडीवाले यांनी सभागृह नेते म्हणून काम पाहिले आहे.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनुभवी नेते म्हणून त्यांची सभापतीपदी निवड करण्यात आली आहे.

पक्षश्रेष्ठींचा विश्वास सार्थ ठरवू – गाडीवाले

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा नांदेड पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवू.कॉँग्रेसचे आजी,माजी पदाधिकारी तसेच पालिकेतील पदाधिकाऱ्यांनी माझी निवड केल्याबद्दल त्यांचा आभारी आहे.आत्तापर्यंतचा कामाचा अनुभव तसेच नांदेड शहराच्या विकासाच्या दृष्टीने जे जे महत्वाचे आहे,ते पूर्ण होण्यासाठी विशेष प्रयत्न करू.

  • विरेंद्रसिंग गाडीवाले.
Categories
कोपरगाव

कोपरगाव तालुक्यातील २९ ग्रामपंचायती साठी ९९६ अर्ज दाखल- तहसिलदार योगेश चंद्रे


कोपरगाव बिपिन गायकवाड हिंदूसम्राट प्रतिनिधी –

कोपरगांव तालुक्यातील २९ ग्रामपंचायतीच्या उमेदवार अर्ज भरणे प्रक्रीयेच्या शेवटच्या दिवशी ५४० उमेदवारी अर्ज दाखल झाले असून एकुण ९९६ अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोग नियुक्त प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार योगेश चंद्रे यांनी दिली आहे.
२३ डिसेंबर – राज्‍य निवडणूक आयोगाचे आदेशानुसार ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्‍यात आलेला असुन कोपरगाव विधानसभा मतदार संघातील उक्कडगाव ३८ ( पुरुष-२०,स्री-१८ ), तिळवणी २१ ( पुरुष-०८ ,स्री-१३ ), अंजनापुर २८ ( पुरुष-११,स्री-१७ ), घारी ३४ ( पुरुष-१७,स्री-१७ ), मनेगाव २५ ( पुरुष-१२ ,स्री-१३ ), मळेगाव थडी ३६ ( पुरुष-१५,स्री-२१ ), सांगवी भुसार ३२ ( पुरुष-१५ ,स्री-१७ ), वेळापूर ३२ ( पुरुष-१७ ,स्री-१५ ), जेऊर पाटोदा ३४ ( पुरुष-१६ ,स्री-१९ ), काकडी म.३६ ( पुरुष-२०,स्री-१६ ),नाटेगांव २१ ( पुरुष-१०,स्री-११ ), कासली २५ ( पुरुष-०९ ,स्री-१६ ), ओगदी २२ ( पुरुष-०९ ,स्री-१३ ), अंचलगाव २३ ( पुरुष-१०,स्री-१३ ), कोळगाव थडी ५८ ( पुरुष-३१,स्री-२७ ), मायगाव देवी २७ ( पुरुष-१४,स्री-१३ ), हिंगणी २७ ( पुरुष-१२,स्री-१५ ), रवंदे २७ ( पुरुष-१३,स्री-१४ ), संवत्सर ११७ ( पुरुष-६३,स्री-५४ ), देर्डे चांदवड २० ( पुरुष-१०,स्री-१० ), मढी खुर्द ३० ( पुरुष-१४,स्री-१६ ), मढी बुद्रुक ३३ ( पुरुष-१५,स्री-१८ ), धोंडेवाडी ३१ ( पुरुष-०९,स्री-२२ ), सोनारी २१ ( पुरुष-०९ ,स्री-१२ ), आपेगाव ३४ ( पुरुष-१६,स्री-१८ ), येसगाव ३६ ( पुरुष-१३,स्री-२३ ), टाकळी ३५ ( पुरुष-२१,स्री-१४ ), कोकमठाण ५८ ( पुरुष-२९,स्री-२९ ), जेऊर कुंभारी ३५ ( पुरुष-१५, स्री-२० ) याप्रमाणे एकूण ९९६ अर्ज दाखल झाले आहे.
२९ ग्रामपंचायतीत दाखल झालेल्या अर्जाची छाननी दि.३१ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ११:०० वाजता होत असून या प्रक्रिये करिता निवडणूक निरीक्षक तथा उपविभागीय अधिकारी डॉ.अर्चना पठारे उपस्थित राहणार आहे.
तसेच सोमवारी ४ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ११ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत देण्यात आली आहे. ४ जानेवारी २०२१ रोजी दुपारी ३ वाजेनंतर चिन्ह वाटप व अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल. मतदान शुक्रवारी १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ०७:३० ते सायंकाळी ०५:३० वाजेपर्यंत राहणार आहे मतमोजणी सोमवारी १८ जानेवारी २०२१ रोजी तहसील कार्यालय कोपरगाव येथे सकाळी १०:०० वाजेपासून सुरू होईल. अशी माहिती कोपरगाव तहसीलदार तथा निवडणुक निर्णय अधिकारी योगेश चंद्रे यांनी दिली आहे.सदर निवडणूक प्रक्रिया कामी निवडणूक शाखा अधिकारी अरुण रणनवरे यांचे सह विविध खातेनिहाय कर्मचारी सहाय्य करीत आहेत .

Categories
उमरी

तुराटी गाव ग्राम पंचायत मधुन बिनविरोध निघाल्याने उद्योजक मारोतराव कवळे गुरूजी उमेदवाराचा सन्मान करताना.


उमरी तालुका प्रतिनिधी उद्धव मामडे
उमरी ३०,तालुक्यातील तेलगंणा लगत असलेल्या तुराटी हे गाव ग्राम पंचायत मधुन सात सदस्य बिनविरोध काढुन तालुक्याला आर्दशाचा पायंडा दाखऊन दिल्याने भागाचे उद्योजक मारोतराव कवळे गुरूजी यांनी या तुराटी च्या ग्राम पंचायत निवार्चित सदस्याचे सन्मान केले.या तुराटी गावाला एसटी महिला सरपंच पदाचे आरक्षण झाल्याने सरपंच पदाचे दावेदार सौ.कलावतीबाई पोशट्टी पोसलवाड ह्याचे एकमेव अर्ज दाखल करण्यात आले तर सदस्यामध्ये वाघे साईनाथ गंगाधर, लक्ष्मण पाटिल सावंत,सौ.शोभाबाई भोजराम सावंत,सौ.शोभाबाई रविकुमार वाघे, श्रीमती विमलबाई सावंत,बाबु अम्रता जोंधळे आधी चा ही सन्मान करत उद्योजक मारोतराव कवळे गुरूजी हे सामाजिक बांधिलकी जोपासत भागातील शेतकरी सुधारला पाहिजे हे लक्षात घेऊन गावाच्या सार्वजनिक विकास कामासाठी गावा लागत असलेल्या तळ्यातील गाळ ऊपसा करुन घेण्यासाठी व ती गाळ शेतात टाकण्यासाठी एक जेसीबी देतो असे आश्वासन दिले. यावेळी मुकूंदराव पाटिल सावंत, मल्लाना वाघे,बाबु पाटिल सावंत,पिराजी मुदलोड आदी यांच्यासह बहुसंख्य गावकरी उपस्थित होते.

Categories
सांगली

रेशनकार्डमध्ये लाभार्थ्यांचे शंभर टक्के आधार सिडींगसाठी मोहिमजिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे

सांगली—सुरेश संकपाळ
सांगली, दि. 30, केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी मोहिम राबवून लाभार्थ्यांचे आधार व मोबाईल सिडींग सुधारणे आवश्यक आहे. याकरीता रास्तभाव दुकानांतील ई पॉस उपकरणांमधील e kyc व मोबाईल सिडींग सुविधेचा अधिकतम वापर करुन आधार व मोबाईल क्रमांक सिडींगचे प्रमाण वाढवणेची मोहिम सुरु करण्यात आलेली आहे. दिनांक 31 जानेवारी 2021 पूर्वी प्रत्येक रेशनकार्डमध्ये लाभार्थ्यांचे 100 टक्के आधार सिडींग आणि किमान एक वैध मोबाईल क्रमांक सिड करण्याच्या उद्दिष्टाने सांगली जिल्ह्यात मोहिम राबविण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी दिली.
एक राष्ट्र एकच रेशनकार्ड ही केंद्रशासनाची महत्वाकांक्षी योजना असून शिधापत्रिकेस आधार सिडींग 100 टक्के पूर्ण असणे हा या मोहिमेचा महत्वाचा टप्पा आहे. ही मोहीम राज्य पातळीवर राबविण्याबाबत केंद्र शासनाने सुचना दिलेल्या आहेत. ही मोहिम फलद्रुप होण्यासाठी राष्टीय अन्नसुरक्षा योजनेतील शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक व आधार सिडींग 100 टक्के पूर्ण असणे आवश्यक आहे. या योजनेमुळे भविष्यात देशातील कोणतीही व्यक्ती कोणत्याही ठिकाणी रेशनकार्डवर धान्य घेवू शकणार आहे. यासाठी 100 टक्के लाभार्थ्यांनी त्यांचे आधार सिडींग करणे व एक वैध मोबाईल नंबर रेशनकार्डास जोडणे आवश्यक आहे.
सांगली जिल्ह्यामध्ये प्राधान्य कुटुंब योजनेमधील एकूण 379099 शिधापत्रिकेपैकी 84 टक्के लाभार्थ्यांचे आधार सिडींग झाले असून अद्याप 269580 लाभार्थ्यांनी अजून त्यांचे आधार रेशनकार्डास जोडलेले नाही . तसेच अंत्योदय अन्न योजनेतील एकूण 31740 शिधापत्रिकेपैकी 82 टक्के शिधापत्रिकेचे आधार सिडींग पूर्ण झाले असून अद्याप 23570 लाभार्थ्यांनी अजून त्यांचे आधार रेशनकार्डास जोडलेले नाही. तसेच शिधापत्रिकेस मोबाईल नंबर ही जोडणे आवश्यक असून शिधापत्रिकाधारकांनी दिलेले बरेच मोबाईल नंबर हे अवैध आहेत. तरी राष्टीय अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट असणाऱ्या लाभार्थ्यांनी त्यांचा वैध नंबर ही शिधापत्रिकेस जोडणे आवश्यक आहे.
धान्याचे मासिक वाटप करतेवेळी ई पॉस उपकरणाव्दारे रास्तभाव दुकानदार यांच्यामार्फत शिधापत्रिकेतील लाभार्थ्यांचा आधार व मोबाईल क्रमांकाचे सिडींग करण्यात येणार आहे. तहसिल कार्यालयामार्फत रास्त भाव दुकाननिहाय आधार सिडींग न झालेल्या लाभार्थ्यांची रास्त भाव दुकाननिहाय यादी करण्यात येणार असून 31 जानेवारी 2021 पूर्वी यादीमधील लाभार्थ्यांचे आधार व मोबाईल क्रमांक 100 टक्के सिडींग करण्यात येणार आहे.
प्राधान्य कुटुंब लाभार्थी येाजना व अंत्योदय अन्न योजनेतील ज्या लाभार्थ्यांचे रेशनकार्डमधील आधार क्रमांक सिडींग केलेले नाही त्यांनी संबंधित रास्त भाव दुकानदारास संपर्क साधून आपले आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक ekyc करुन घ्यावे. केंद्र शासनाच्या सुचनेनुसार 31 जानेवारी 2021 पर्यंत आधार सिडींग न झालेल्या लाभार्थ्यांचे अनुज्ञेय धान्य पुढील महिन्यापासून आधार सिडींग होईपर्यंत निलंबित करुन त्या लाभार्थ्यास धान्य मिळणार नाही. तरी अन्नसुरक्षा लाभार्थ्यांनी आपला आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक रेशनकार्डास संलग्न करुन घ्यावा. ही मोहिम दिनांक 31 जानेवारी 2021 अखेर 100 टक्के पूर्ण करावी, असे आवाहन श्रीमती बारवे यांनी केले आहे.

Categories
सांगली

पालकमंत्री जयंत पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा


मिरज–अशोक मासाळ सांगली, दि. 30, राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील गुरूवार, दि. 31 डिसेंबर 2020 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरूवार, दि. 31 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता मुंबईहून इस्लामपूरकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता इस्लामपूर येथे आगमन व राखीव. सकाळी 11.30 वाजता राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना लि. राजारामनगरच्या डिस्टीलरी प्लांटच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ - कारखाना, साखराळे. दुपारी राखीव. शुक्रवार, दि. 1 जानेवारी 2021 रोजी राखीव.

Categories
Uncategorized

कै.अंबुबाई भिमण्णा घोडके यांचे दुःखद निधन मुरूम,

प्रतिनिधी) : केसरजवळगा, ता.उमरगा येथील रहिवाशी कै.अंबुबाई भिमण्णा घोडके यांचे बुधवारी (ता.३०) रोजी राहत्या घरी सायंकाळी ६ वाजता वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले. त्या ८७ वर्षाच्या होत्या. त्यांच्या वरती केसरजवळगा, ता.उमरगा येथील सार्वजनिक स्मशानभूमीत गुरुवार (ता.३१) रोजी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात्य दोन मुले, तीन मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.सायबण्णा घोडके यांच्या त्या मातोश्री होत्या.

Categories
ब्रेकिंग न्युज

राज्यात ३१ जानेवारीपर्यंत लॉकडाऊन कायम; ‘या’ सवलती सुरु राहणार


पाटण हिंदू सम्राट प्रतिनिधी उमेश सुतार यांजकडून
राज्यात करोनामुक्तांचं प्रमाण वाढत असलं तरी नवीन करोना स्ट्रेनचं संकट अद्यापही राज्यावर आहे. भारतात करोनाच्या नव्या विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. राज्यात नवीन करोना स्ट्रेनचा अद्याप एकही रुग्ण सापडला नसला तरी खबरदारी म्हणून राज्यातील लॉकडाऊन ३१ जानेवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा आदेश आज ठाकरे सरकारकडून जारी करण्यात आला आहे. राज्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये हा लॉकडाऊन असणार असल्याचंही या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

राज्यात आत्तापर्यंत मिशन बिगिन अगेन अंतर्गंत अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. आतापर्यंत ज्या सवलती देण्यात आल्या आहेत त्या यापुढेही कायम ठेवतानाच कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊन ३१ जानेवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच, लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्यात यावं, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

राज्यात करोनाच्या नवीन स्ट्रेनचा धोका कितपत?; आरोग्यमंत्र्यांनी दिलं दिलासादायक

तसंच याआधी ३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबरला मिशन बिगीन अगेन अंतर्गत निर्बंध शिथील करत प्रसिद्ध करण्यात आलेल्या गाईडलाइन्स ३१ जानेवारीपर्यंत लागू राहतील असंही आदेशात स्पष्ट केलं आहे. तसंच, याआधी परवानगी देण्यात आलेल्या सर्व गोष्टी नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहेत.

Categories
कोपरगाव

तुम्ही फलक फाडु शकता, परंतु आमदारआशुतोषदादा काळे यांचे ध्येय धोरण, संकल्प आणि विकास गंगेला आडवु शकत नाही.


कोपरगाव बिपिन गायकवाड हिंदूसम्राट प्रतिनिधी –
कोपरगाव तालुक्याचं ऐतिहासिक व्यासपीठ म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान. या मैदानावर आजपर्यंत अनेक सामाजिक सांस्कृतिक राजकीय असे एक ना अनेक कार्यक्रम पार पडले, नगरपालिका असेल, विधानसभा अथवा लोकसभा असेल प्रत्येक राजकीय घडामोडीचे बिगुल याच मैदानावर वाजवलं जातं, निवडणुका येतात जातात परंतु एकदा निवडणुका संपल्या की सर्वांना या ऐतिहासिक मैदानाचा विसर पडायचा मैदानाच्या झालेल्या दुर्दशेवर कोणाचं चुकून लक्ष जात नव्हते ही देखील एक शोकांकिका म्हणावी लागेल पावसाळ्यात या मैदानाला डबक्याचे स्वरूप येऊन हे मोकाट जनावरांच माहेरघर असल्या सारखं वाटत असे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्या कारणाने हे शहराच्या वैभवात भर टाकणार आहे. याची दुर्दशा होता कामा नये या मैदानाची अवस्था बदलली पाहिजे ही संकल्पना मनाशी बाळगुन कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोषदादा काळे यांनी या मैदानावर कॉंक्रीटीकरण व्हायला हवे या मैदानाची दशा बदलायला हवी हा संकल्प पूर्ण करत पाठपुरावा केला आणि या कामाचा शुभारंभ कालच पार पाडला, परंतु काही जळाऊ वृत्तीच्या हरामखोरांनी रात्रीच्या पडद्याआड ह्या शुभारंभाचा फलक फाडला. मी या जळाऊ वृत्तीना सांगु इच्छितो तुम्ही फलका वरील अक्षर पुसु शकता, फलक फाडु शकता, परंतु आमचे सुसंस्कृत आणि संयमी नेते आदरणीय आशुतोषदादा काळे यांचे ध्येय धोरण संकल्प आणि विकास गंगेला आडवु शकत नाहीत.
तुम्ही फलक फाडून तुमच्या वाईट आणि जळाऊ वृत्तीची ओळख करून दिली. या वृत्तीचा मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो नवाज कुरेशी
शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस कोपरगांव

Categories
मायणी सातारा

खटाव माण अँग्रोचे १५ डिसेंबर पर्यंतचे बिल २५०० रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग

मायणी : सातारा खटाव तालुका विशेष प्रतिनिधी तानाजी चव्हाण दि.३०/१२/२०२०

खटाव माण साखर कारखान्याच्या द्वितीय गळीत हंगाम २०२०-२१ चा गळीताचे दि १६ नोव्हेंबर ते दि १५ डिसेंबर २०२० पर्यंतचा पहिल्या बिलाचा दुसरा टप्पा २५०० रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन,माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी दिली.
खटाव माण तालुका अँग्रो प्रो लि पडळ कारखान्याच्या कार्यस्थळी चेअरमन प्रभाकर घार्गे, को-चेअरमन मनोजदादा घोरपडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे व संचालकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत हा निर्णय सर्वानुमते जाहीर करण्यात आला.
यावेळी बोलताना प्रभाकर घार्गे म्हणाले, यंदाच्या हंगामातील आजपर्यंत दोन लाख एकसष्ठ हजार मेट्रिक टनाचे उसाचे विक्रमी गाळप खटाव माण अँग्रो ने केले आहे, चांगल्या पर्जन्यमानामुळे उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर वाढल्याने आज कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या बिलास वेळेवर प्राधान्य देण्यात येत असल्यामुळे याठिकानची विश्वासहर्ता वाढून “खटाव माण अँग्रो” कडे उसाची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. गतवर्षी ऊस दिलेल्या सर्व शेतकऱ्यांना प्राधान्य देऊन राहिल्या अन्य ऊस पट्ट्यातील ऊसाला तोडणी यंत्रणा देऊन सर्व उसाची आवक कारखान्यात होऊन भागातील शेतकऱ्यांना दिलासा देणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
या वेळी कारखान्याचे को-चेअरमन मनोजदादा घोरपडे म्हणाले, साखरेच्या गुणवत्तेत खटाव माण अँग्रोने महाराष्ट्रात अव्वल दर्जा मिळवला असून कारखान्यातील अन्य उत्पादने ही कारखान्यातून विक्री होत आहेत. त्यामाध्यमातून खटाव माण बरोबर कराड उत्तर मध्ये शेतकऱ्यांत निर्माण झालेल्या विश्वासामुळे त्यांच्या हितासाठी कारखान्याबरोबरच जास्तीतजास्त शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टया सक्षम बनवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे मत मनोजदादा घोरपडे यांनी व्यक्त केले.

Categories
राहुरी

गोरगरीब कष्टकरी शेतकरी व तरूणाच्या न्यायहक्कासाठी मी ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात : सलीम शेख

राहुरी तालुका प्रतिनिधी
( जावेद शेख ) 30 डिसें

वरवंडी मुळानगर ग्रुप ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका 2021 करिता विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक आयोगाने हाती घेतली असून निष्क्रिय सदस्यांना जागा दाखविण्यासाठी युवकांनी निर्धार केला आहे तसेच जनतेच्या हितासाठी सदैव कार्यरत असणारे जनतेच्या विकासासाठी झटणारे उमेदवार जनतेनेच यावेळी रिंगणात उतरले आहेत. निस्वार्थपणे कायमच जनतेला मतदान करणारे माजी ग्रामपंचायत सदस्य सलीम शेख प्रियंका त्रिभुवन व मुन्नाबाई परदेशी तसेच अर्चना पवार यांची उमेदवारी विकासाच्या मुद्द्यावर जनतेने दिली असून भरघोस मतांनी निवडून देण्याची शपथ घेतली आहे.आरोग्य रस्ता पर्यटन शिक्षण पाणीपुरवठा या मुद्द्यावर सतत कार्य त्रास देऊन जनता पिण्याच्या पाण्याच्या विचाराधीन आहे. याकामी त्यांना सामाजिक कार्यकर्ते यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते प्रवीण लोखंडे,वायसे मामा,दिलीप बर्डे,कैलास बर्डे,राजेश परदेशी,शक्तीलाल गंगे,रंगलाल परदेशी,संदीप घोरपडे,अशोक गायकवाड,जावेद इमामभाई शेख,अल्ताफ पठाण,जैद खान,साहिल शेख,सुरेश बर्डे,सोन्या शेरकर,आकाश पंडीत, संतोष डूबल,विश्वास पटारे, अन्सार पठाण आदेश हाके,नागेश पवार वैभव खरात,रवी परदेशी,बाळू भाऊ जाधव साहेबराव जाधव ,विजू माळी,सुनील माळी, गणेश मोरे,अमोल शेलार,अमोल गायकवाड,अभिजित पाटोळे,शुभम त्रिभुवन,मुज्जू शेख,मुन्ना शेरकर,अनिल पवार,नितीन भोसले,दादा,पाटोळे,साजिद शेख,असिफ पठाण ,अर्जुन सूर्यवंशी, करण सूर्यवंशी,आदेश गंगे,आकाश बिराडे,हर्षद बिराडे,विजय बर्डे,रवी पवार,गणेश पवार,सागर वायसे,विनोद प्रजापती,भाऊ मणतोडे,सिद्धार्थ मणतोडे,सुमित पलघडमल,सुदाम साळुंखे,हरिष जाधव,बाळू रणदिवे,किशोर बर्डे,सुनील पवार,समस्त युवक वर्ग तसेच समस्त ग्रामस्थांनी प्रस्थापिना धडा शिकवण्यासाठी ही निवडणूक हातात घेतली आहे.

Categories
कोल्हापूर

ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा कोल्हापूर व करवीर तहसील कार्यालय यांच्यावतीने राष्ट्रीय ग्राहक दिन वरणगे पाडळी येथे उत्साहात साजरा


कोल्हापूर- सुभाष भोसले
२४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन या निमित्ताने ग्राहक पंचायत महाराष्ट्र करवीर तालुक्याच्या वतीने वरणगे पाडळी येथे सदर कार्यक्रमाचे नियोजन करवीर तालुका अध्यक्ष श्री यशवंतराव शेळके व सदस्य जनार्दन पाटील यांनी केले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून करवीर पुरवठा अधिकारी श्री. दत्तात्रय पाडळकर साहेब उपस्थित होते. यावेळी ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले….!
प्रथम पाहुण्यांचे स्वागत सरपंच अनिता पाटील यांनी केले….!
यानंतर प्रमुख पाहुणे मां.दत्तात्रय पाडळकर साहेब यांनी ग्राहक पंचायतचे काम उत्कृष्ट पध्दतीने सूरू असून गावो गावी ग्राहक जाग्रुती व प्रबोधन करणेचे काम ग्राहक पंचायत करत आहे. अनेक संघटना काम करत असतात पण हि संघटना शासनाशी संलग्न राहून लोकांचे प्रश्न सोडवते खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांच्या मार्फत आम्ही बर्याच लोकांचे प्रश्न सोडवण्यास सहकार्य केले आहे व ईथून पुढे ही असेच सहकार्य राहिल अशी ग्वाही त्यांनी दिली. यानंतर जिल्हाध्यक्ष बी.जे.पाटील यांनी ग्राहक पंचायतच्या कामाचा आढावा सांगताना खते, बि बियाने घेताना शेतकर्याची होणारी फसवणूक, विज वितरणाच्या तक्रारी, बॅका,पत संस्था,बचत गट मधील फसवणूक, गॅस सिलिंडर व पेट्रोल मध्ये होणारी फसवणूक व ग्राहकांनी घ्यावयाची काळजी या विषयी सविस्तर माहिती सांगितली. यानंतर उपाध्यक्ष जगदीश पाटील यांनी गेली तिन चार वर्षे ग्राहक पंचायत मार्फत शेतकऱ्या पासुन उदयोजगापर्यंत अनेक तक्रारी सोडवणेत आल्या या विषयावर उदाहरणासह केलेल्या कामाची माहिती सांगितली. यानंतर महानगर अध्यक्ष अशोक पोतनीस यांनी ग्राहक पंचायतची स्थापना व ग्राहक पंचायतचे कार्य या विषयावर आपल्या विनोदी शैलीत आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर करवीर तालुका अध्यक्ष श्री यशवंतराव शेळके यांनी करवीर तालुक्यातील ग्राहकांचे सोडवलेले प्रश्न, ग्राहक जाग्रुती व भविष्यातील नियोजन या विषयावर मार्गदर्शन केले. सरपंच अनिता पाटील यांनी ग्राहक पंचायतचे काम निश्चितच वाखानन्याजोगे असुन लवकरच गावातील ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी गावपातळीवर शाखा काढणेसाठी प्रयत्न करणार असे सांगितले. यानंतर पोलीस पाटील सौ.कांबळे यांनी ग्राहक पंचायत मार्फत गावातील ग्राहकांच्या तक्रारींचे निरसन करावे अशी सुचना करत आपले मनोगत व्यक्त केले….!
यानंतर ग्राहकांच्या तक्रारी ऐकुन घेऊन अनेक लोकांच्या तक्रारी सोडवणेत आल्या….!
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा संघटक सुरेश माने यांनी केले व आभार शाहू सेवा सोसायटी चेअरमन संदिप पाटील यांनी मानले.
यावेळी गावातील अनेक मांन्यवर, शेतकरी, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते…

Categories
शिरसगाव

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदी पत्रकार दत्तात्रय पाचपुते यांची तिसऱ्यांदा फेर निवड


श्रीगोंदा ( हिंदुसम्राट शिरसगाव बोडखा प्रतिनिधी आदेश उबाळे यांच्याकडून )
आज दिनांक 29 डिसेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण मंडळ कार्यालय परिसर , स्टेशन रोड , अहमदनगर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या अहमदनगर दक्षिण विभाग जिल्हाध्यक्ष व कार्यकारणी निवड बैठक पार पडली
या बैठकीत चुरशीच्या तसेच अटीतटीच्या निवडणुकीत श्रीगोंदा तालुक्याचे सुपुत्र , दैनिक पुढारीचे पत्रकार दत्तात्रय पाचपुते यांची अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदी फेर निवड , तिसऱ्यांदा करण्यात आली .
यावेळी उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्रवीण सपकाळे, राज्य सरचिटनिस विश्वासराव आरोटे, खान्देश विभाग प्रमुख किशोर राय साकडा, खानदेश विभागीय उपाध्यक्ष प्रवीण सोनवणे, प्रदेश कार्यकारणी सदस्य निळकंठ कराड, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातपुते, श्रीराम जोशी, जिल्हा कार्याध्यक्ष सूर्यकांत नेटके,
यांच्या सह श्रीगोंदा,कर्जत,जामखेड,पाथर्डी,पारनेर शेवगाव येथील अनेक पत्रकार पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकार दत्तात्रय पाचपुते यांच्या तिसऱ्यांदा फेरनिवडीबद्दल त्यांच्यावर श्रीगोंदा तालुक्यासह नगर जिल्ह्यातून पत्रकारांसह नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

Categories
कोरेगाव

भारतीय मराठा महासंघाच्या जिल्हा सह-संघटकपदी अभिजीत लेंभे याची निवड

कोरेगाव तालुका प्रतिनिधी अभिजीत लेंभे

भारतीय मराठा महासंघाच्या जिल्हा सह -संघटक पिंपोडे बुद्रुक तालुका कोरेगाव येथील श्री अभिजीत भगवान लेंभे यांची निवड करण्यात आली
भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून मराठा समाजातील युवकांना येणाऱ्या अडचणी युवकांना व्यवसाय व नोकरी मेळावे व युवकांना सबलीकरण अशा अनेक उपक्रमाचे आयोजन महासंघाच्या माध्यमातून समाजात राबविणार असल्याचे असल्याचे निवड नंतर सांगितले त्याचबरोबर जिल्ह्यातील मराठा समाजातील प्रामुख्याने कुणबी दाखले शेतकरी वर्गाचे प्रश्न सोडवण्याचे काम चालू असल्याचे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष संदीप चव्हाण यांनी सांगितले आगामी काळात गाव तिथे शाखा स्थापन करणार. जिल्ह्यातील दिव्यांग लोकांना ही न्याय मिळवून देणार त्याची त्यांची अडीअडचणी सोडविणार असे दिव्यांग जिल्हा अध्यक्ष राजू लेंभे यांनी सांगितले .
भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री किशनराव वरखिंडे (माजी राज्यमंत्री) डॉ आप्पासाहेब पुंडलिक आहेर राष्ट्रीय अध्यक्ष श्री बन्सी दादा डोके महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री सागर पवार महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष श्री विक्रम वाघ सातारा जिल्हाध्यक्ष श्री संदीप चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष श्री मकसूद शेख सातारा जिल्हा सचिव श्री राजू लेंभे दिव्यांग जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला यावेळी नवनाथ चव्हाण सर, संतोष कुंभार ,संतोष महाजन, गणेश महाजन ,बंदेनवाज शेख, हेमंत कदम ,योगेश साळुंखे, संदीप साळुंखे ,सागर लेंभे , सुधीर लेंभे, मिथुन निकम ,तुषार निकम, अजित निकम ,देवेंद्र कदम शैलेश लेंभे, अमित साळुंखे अनिकेत साळुंखे ,संतोष साळुंखे , अमृत लेंभे, कांतीलाल निकम मनोज सावंत ,आदेश धुमाळ ,पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Categories
नांदेड लोहा

विस्तार अधिकारी रामकृष्ण पांडे:बाल विकास कार्यात विशेष योगदान

लोहा येथील बाल विकास प्रकल्प कार्यालयातील विस्तार अधिकारी सांख्यिकी रामकृष्ण पांडे यांनी आपल्या कार्यकाळात बालविकास कार्यालयामार्फत शासनाच्या विविध योजनांचा उत्कृष्ट प्रसार-प्रचार केल्यामुळे त्यांना शासनाच्या वतीने विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आज वयोमानानुसार विस्ताराधिकारी पांडे हे शासकीय सेवेतून 31 डिसेंबर 2020 रोजी सेवानिवृत्त होत आहेत एक शिस्तप्रिय सामाजिक प्रशासकीय कार्यातील उच्चशिक्षित अभ्यासू पांडे साहेब यांच्या कार्याबाबत सेवानिवृत्तीनिमित्त घेतलेला आढावा.

राम कृष्ण अंबादासराव पांडे हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर तालुक्यातील धोत्रा या गावचे त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला अत्यंत शिस्तप्रिय कठीण प्रसंगात मार्ग काढणे, संयमी दुसऱ्यांना मार्गदर्शन करण्यास सतत कार्य हे गुण त्यांच्या अंगी आई-वडिलांकडून लहानपणी त्यांना संस्काराचे बाळकडू मिळत गेले पोत्रा या गावातील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेत त्यांचे पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण झाले. त्यांचे वडील अंबादास राव हे शेतकरी असले तरी त्यांना शिक्षणाची प्रचंड आवड असल्याने व गावात पुढील शिक्षणाची सोय नसल्याने नांदेडला शिक्षण घेण्याचे ठरले. आठवी ते बारावी चे शिक्षण प्रतिभा निकेतन हायस्कूल व महाविद्यालय नांदेड येथे झालेले बहिण-भाऊ रूम करून राहत असत.
B.Sc. नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, नांदेड येथे झाले. B.Sc. चे विषय Physics, Mathematics and Stat. असे होते. M.Sc. Stat, चे शिक्षण मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे पूर्ण झाले. शिक्षण घेत असताना त्यांना खुप संघर्ष करावा लागला. अत्यंत संघर्षमय परिस्थिती सोम्यपणे, आनंदाने, हसतखेळत, तकार न करता त्यांनी उत्तम वाटचाल केली. ‘कमवा व शिका या योजनेतून काम करुन त्यांनी M.Sc. चे शिक्षण औरंगाबाद येथे पूर्ण केले. त्यांचा मुळ स्वभाव संयमी, न्यायप्रिय, परिश्रमी व शांतताप्रिय आहे. गरीबीची जान असणारा आहे.

शासकीय सेवेस प्रारंभ

4 में 1987 रोजी DRDA (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा) नांदेड येथे विस्तार अधिकारी म्हणून शिरो बजेटच्या कालावधीत नौकरी लागलो. तेव्हा कुटुंबातील सर्वांना आनंद झाला. आई वडीलांना तर खुपच आनंद झाला. सरकारी नोकरी मिळाल्याचा आनंद काही वेगळाच असतो. या आनंदा बरोबरच त्यांना कामाची जबाबदारी समजत गेली. आणि अतिशय उत्साहात व संयमाने ऑफीस जबाबदारी पार पाडली. ते आपल्या कामात उत्साह वाढवत होते व त्याच बरोबर आत्मविश्वास वाढत होता.

नौकरीमध्ये कामाची जबाबदारी

विस्तार अधिकारी पांडे यांनी आपले कार्य चोखपणे पार पाडले. नांदेड मध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या ऑफिसमध्ये असताना ऍडव्हान्स इन्क्रिमेंट मिळाले नेहमी ऑफिस कामासाठी दोरा करत दिल्ली मुंबईला ऑफिस कामानिमित्त जात असत.

प्रवासाची खूप आवड आहे कुटुंबांना समवेत प्रवास करण्याची खूपच आवड आहे जवळपास भारतातील पन्नास टक्के भाग बघून झाला आहे जम्मू काश्मीर, अमरनाथ, दिल्ली, म्हैसूर, बेंगलोर, कर्नाटक, गुजरात, अष्टविनायक, श्रीवर्धन ,हरिहरेश्वर, मंजूर ,जंजिरा ,गणपतीपुळे अशा अनेक प्रेक्षणीय ठिकाणे विस्ताराधिकारी पांडे यांनी पाहिली आहेत यातून त्यांनी पर्यटनाचा अभ्यास केला आहे.

उत्कृष्ट कार्याचा गौरव सत्कार

DRDA नांदेड येथून मुखेड येथे तांत्रिक बाबींमुळे बदली झाली येथील कार्यक्रम फक्त अठरा दिवस होते परत त्यांची बदली DRDA झाली. या ठिकाणी आपल्या कार्याचा वेगळा ठसा दाखवून कार्य केले. या कार्याची दखल घेऊन स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजना 2002 ते 2004 उत्कृष्ट अंमलबजावणी केल्यावर येथील पुरस्कार मिळाल व भव्य कोणत्या श्रेणीत आहे त्याविषयी वजन किती व त्यांच्या वयानुसार वजन किती असाव्यात पाहिजे याची माहिती बालका घरातील प्रत्येक व्यक्तीला होण्यासाठी बालकांचे “वज व सनियंत्रण” कार्ड केले त्यांची अंमलबजावणी केली याबाबत त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व सभापती व सर्व समिती सदस्य यांनी कौतुक करून हे कार्ड संपूर्ण जिल्ह्यात लागू केले. घेतली होती या विशेष कार्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली हे उल्लेखनीय कार्य त्यांच्या काळात घडले आहे.

2014 ते 2019 साडेपाच वर्ष अतिरिक्त बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री डीपी म्हणून कार्यभार संभाळला या पदावर असताना पदाचे कर्तव्य व हक्क चोखपणे सांभाळून सर्वांना न्याय मिळवून दिला याचं काळात अतिशय उत्तम कार्यभार सांभाळून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अनेक पुरस्कार मिळाले व सन्मान देऊन सत्कार केला व प्रशस्तीपत्र मिळाले.

शौचालय स्वच्छ भारत मिशन अंतर्गत काम केले पाणी फाऊंडेशनचे काम केले याबद्दल तत्कालीन आमदार श्री चिखलीकर साहेब यांच्या हस्ते सत्कार करून पांडे साहेब यांचा गौरव करण्यात आला.

दरवर्षी माळेगाव यात्रा येथील उत्कृष्ट नियोजन व आयोजन करण्यात त्यांचा हातखंडा होता ग्रामीण भागातील जनतेपर्यंत बाल विकास योजना पोचविण्याचे कार्य दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रे मधून त्यांनी केले विविध पोस्टर्स बॅनर कुपोषणमुक्त बालक महिला सशक्तिकरण यासह अनेक योजना या यात्रेतून त्यांनी प्रसार आणि प्रचार करून ग्रामीण भागापर्यंत पोहोचून बाल विकास विभागाचे विशेष कार्य केले आहे.

डीआयडी या ऑफिसमध्ये पुन्हा 2006 पर्यंत उत्कृष्ट काम केल्याबद्दल दोन आडवास इन्क्रिमेंट मिळाले.

2007 ते 2020 पर्यंत लोह्यात उत्कृष्ट कार्य

आयसीडीएस लोहा या ऑफिसमध्ये काम करताना अंगणवाडी कामकाज पाहणी दौरा करणे कर्मचार्‍यांच्या अडचणी पार त्यांना व्यवस्थित समजावून सांगणे नवीन योजनांची अंमलबजावणी करणे नवीन कल्पना व कामाचे स्वरूप कर्मचाऱ्यांना सांगून कार्य पार पाडत असत.

  • वैवाहिक जीवन आणि यशस्वी कुटुंब*

दिनांक 26/6/1992 रोजी सौ.अनिता राजाभाऊ बर्दापूरकर यांच्याशी विवाह संपन्न झाला. प्रा. रत्नाकर राजाभाऊ बर्दापूरकर अंबाजोगाई ची सासरवाडी आहे. त्यांची पत्नी खोलेश्वर महाविद्यालय अंबाजोगाई येथे प्राध्यापक म्हणून कार्य करत आहे व्यवहारिक जीवनात अतिशय आनंदात पार पाडत असताना त्यांना कौटुंबिक जबाबदारीची जाणीव आहे आई-वडील थकलेले आहेत बहीण-भावंडांची शैक्षणिक जबाबदारी व भावी आयुष्याची जबाबदारी त्यांच्यावर होती त्यांना एकूण पाच बहिणी व दोन भाऊ आहेत.

कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे व पत्नीला नोकरीची व शिक्षणाची खूप आवड असल्यामुळे अंबाजोगाई खोलेश्वर महाविद्यालयात आजही नोकरी करताहेत श्रीरामकृष्ण पांडे येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला समर्थपणे तोंड देता सुयोग्य पणे उत्तर देतात व त्यातून मार्ग काढतात ही त्यांची नैसर्गिक प्रवृत्ती आहे.

त्यांना दोन मुले आहेत चि.ओमकार राम कृष्ण आज अमेरिकेत मध्ये California State मध्ये San Diego येथे सॉफ्टवेअर इंजिनियर या पोस्टवर कार्यरत आहे.VIT college pune येथून B.E केले व CALIFORNIA STATE मध्ये M.S करून सध्या तेथेच नोकरी करत आहे.

चि. ऋषिकेश राम कृष्ण पोत्रेकर भारती विद्यापीठ पुणे येथून बीएफ 2020 सालि First class with Distinction उत्तम रीतीने पास झाला आहे पुढील उच्च शिक्षण घेणार आहे.

कुपोषण मुक्तीसाठी आरोग्य तपासणी शिबिर ठेवून प्रत्येक बालक सुदृढ झाला पाहिजे, हसता खेळता बालक झाला पाहिजे असे वाटत असे पालकांची डॉक्टरांच्या मदतीने तपासणी करून कुपोषित बालकांची व्हीसीडीसी घेऊन त्यांना शोषणातून मुक्त करण्यासाठी सतत त्यांनी प्रयत्न केले. 2012 साली नांदेड विभागात उत्कृष्ट कामाची अंमलबजावणी केल्याबद्दल यशोदामाता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अंगणवाडी सेविकांच्या वैयक्तिक पत्रिका तयार करणे त्यांना सन्मानाने वागणूक दिली. विस्तार अधिकारी पंडित सरांचे कार्य उल्लेखनीय असून त्यांचा प्रशासनात वेगळा कार्याचा ठसा त्यांनी उमटविला होता. आपले कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यामध्ये हे योगदान दिले प्रशासनातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहण्यात येते.आज ते वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत भावी आयुष्य त्यांना सुख समृद्धी भरभराटीचे जावो.

सुर सुर चैतन्याचा

रोम रोम झाले…….

अशा आनंदी विभूतिसाठी सेवानिवृत्ती

हो केवळ तांत्रिक बाब ठरते.

कारण सतत आवरत कार्यरत……

अशा उत्साह व चैतन्याचा

निर झारा श्री राम कृष्ण पांडे

साहेबराव सोनकांबळे
पत्रकार,ता.लोहा जि.नांदेड
मो.9921893325, 9421933606

Categories
नांदेड लोहा

ए.बा.वि. प्रकल्पचे विस्ताराधिकारी राधाकृष्ण पांडे आज ३१ रोजी सेवानिवृत्त

लोहा,प्रतिनिधी (शिवराज पवार)
एकात्मिक बाल विकास सेवा योजना केंद्र लोहा येथील सांख्यिकी विस्ताराधिकारी तथा माजी प्रभारी बाल विकास अधिकारी राधाकृष्ण पांडे हे लोहा कार्यालयातुन आज ३१ डिसेंबर 2020 रोजी सेवेतून वयाच्या ५८ व्या वर्षी सेवा निवृत्त होणार आहेत.
त्यांच्या कारकिर्दीत प्रभारी राज मध्ये कुपोषण मुक्तीसाठीचे काम चांगल्याप्रकारे हाताळलेले आहे.लोहा तालुक्याला पारितोषिकाचा मानही मिळवून दिला.आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला.अनेक कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस यांना त्यांनी कधी कटू तर कधी रागाने तर कधी समजावून सांगून तर कधी पर्यवेक्षकेच्या मार्फत नोटीसा पाठवून कामे करून घेतली.तर यांना आज रोजी कार्यालयाच्या वतीने सेवानिवृत्ती घ्या शुभेच्छा देणार आहेत.

Categories
नांदेड

लोहा,मुखेड,मुदखेड सह धर्माबाद बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई

उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.शिंगणे यांच्या सूचना

नांदेड तालुका प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि.30.केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्या वतीने एकात्मिक बालविकास सेवा योजने अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील लोहा,मुखेड,मुदखेड व धर्माबाद प्रकल्प कार्यालयाकडून राजीव गांधी किशोरी सशक्तीकरण (सबला) योजना दिनांक १९ नोव्हेंबर २०१० पासून राबविण्यात येते.परंतु या योजनेचे गांभीर्य लक्षात न घेता शासनाची दिशाभूल करून आपल्या अधिकाराचा गैरवापर करीत लाखो रुपयांचा अपहार या योजनेत संबधीत प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिकांकडून झाल्याची गंभीर तक्रार इंडियन पँथर सेना प्रमुख,संविधान दुगाने यांनी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर,मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षाताई ठाकूर यांच्याकडे करून एका लेखी निवेदनाद्वारे चौकशीची मागणी केली होती.

आत्मविश्वास आणि सशक्तीकरण हेतूने किशोरींना सक्षम बनविणे,त्यांचे पोषण आणि आरोग्य यात सुधारणा करणे.आरोग्य, स्वच्छता, पोषण, किशोरी प्रजनन, योजनास्वास्थ्य परिवार आणि बाल देखरेख या विषयी जागरूकता निर्माण करणे.त्यांचे घरातील कौशल्य, जीवन कौशल्य विकास करणे आणि व्यावसायिक कौशल्याच्या हेतूने त्यांचे एक राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रमाशी जोडणे.शिक्षण सोडलेल्या किशोरी मुलींना औपचारिक व अनौचारिक शिक्षणाच्या प्रवाहात आणणे.प्राथमिक आरोग्य केंद्र, सामुदायिक आरोग्य केंद्र, पोस्ट,बँक,पोलिस स्टेशन इ. सार्वजनिक सेवांच्या बाबतीत सूचना आणि मार्गदर्शन करणे.यासाठी सदर प्रत्येकी प्रकल्पासाठी तीन लक्ष ऐंशी हजार रुपये इतका निधी शासन दरवर्षी किशोरी मुलींच्या प्रशिक्षणासाठी खर्च करतो मात्र सदर योजनेची संबधित तालुक्यात मात्र फक्त कागदोपत्रीच अंमलबजावणी झाल्याचे विदारक चित्र दिसून येत असल्याचे जिल्हाधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (एबाविसेयो)जि.प नांदेड यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर या गंभीर बाबीची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ.इटनकर व उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तत्काळ चौकशीचे आदेश देत तीन दिवसाच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी श्री.चटलावर(लोहा),श्री.तिडके(मुदखेड),श्री.राजुरे(मुखेड,प्रभारी),श्रीमती पवार(धर्माबाद) यांना तीन महिन्यांपूर्वी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे मा.उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.एस.व्ही शिंगणे यांनी आदेशीत करूनही त्यांच्या आदेशाला संबधित बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवत पत्राकडे दुर्लक्ष केले.

फक्त फोटो काढण्यापूरते प्रशिक्षण घेऊन अनेकांनी प्रशिक्षण न घेता खोटा व दिशाभूल करणारा अहवाल प्रकल्प अधिकाऱ्यांकडे सादर करून पर्यवेक्षिकानी व विस्तार अधिकाऱ्यांनी शासनाच्या डोळ्यात उघडपणे धूळ फेकण्याचे काम केले आहे.ही बाब बालविकास प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर कठोर भूमिका घेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क) यांनी दिनांक ०१/११/२०२० रोजी संबधित बालविकास प्रकल्प अधिकारी यांना दिलेल्या पत्रात तीन दिवसांच्या आत चौकशी करून अहवाल सादर न केल्यास आपल्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियमानुसार कारवाई प्रस्तावित करण्यात येईल असे स्पष्ट पणे नमूद केले होते.परंतु तसे पत्र देऊनही संबधितांनी अहवाल सादर न केल्याने बालविकास विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
श्री शिंगणे यांच्या पत्रानुसार बालविकास प्रकल्प अधिकारी श्री चटलावर,श्री तिडके,श्री राजुरे,श्रीमती पवार यांच्यावर शिस्तभंगाच्या कार्यवाहीसह निलंबनाची कारवाई प्रस्तावित होणार का?की महिला व बालविकास विभाग दोषींना पाठीशी घालणार याकडे संपुर्ण नांदेड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Categories
नांदेड

नायगाव तालुक्यात रेतीची चोरटी वाहतूक आणि महसूल प्रशासन मूग गिळून गप्प..का?

नांदेड:दि.30.जिल्ह्यातील
नायगाव तालुक्यात रेती लिलावाचे कोणतेही टेंडेरिंग सद्या नसताना ही नदी पत्रातून व शासन ताब्यातील रेती साठ्यातून सर्रास पणे रेतीची चोरटी वाहतूक नायगाव महसूल व पोलीस प्रशासनातील अधिकारी आणि ठेकेदार पत्रकार दलाल पुढारी यांच्या कृपा आशीर्वादाने चालू तर नाही ना….? रेतीची खुलेआम चोरी वाहतूक चालू असताना महसूल प्रशासन गप्प कसे असे प्रश्न जणसामान्यातून केले जात आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, नायगाव तालुक्यातील कौडगाव, सतेगाव,बळेगाव आदी ठिकाणावरून वाळू माफियांनी तहसील प्रशासनातील व पोलीस प्रशासनातील अधिकारी दलाल पुढारी व ठेकेदार पत्रकार यांना हाताशी धरून गौण खनिज उतख्तनांचे नियम धाब्यावर बसवून रोज सर्रास पणे रेती चोरीचा गोरख धंदा रेती माफियांनी चालवला असल्याचे जनसामान्य माणसात बोलल्या जात आहे.रेती माफिया खुलेआम पणे रात्रीच्यावेळी तरफ्याच्या मदतीने रेतीचे उत्खनन व शासन ताब्यातील रेतीची चोरी करून अव्वाच्या सव्वा किमतीत बाजारात विक्री करीत आहेत.या अवैध रेती चोरीने महसूल प्रशासनास लाखोंचा फटका बसत आहे. याकरिता चोरीच्या रेती उत्खनाकडे व वाहतुकीकडे करडी नजर ठेवून या वाळू माफियांना आवर घालण्याची गरज असून याकडे महसुल प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांनी विशेष लक्ष देऊन रेतीची चोरी करणाऱ्या वाळू माफियावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Categories
कोपरगाव

भूमिपूजन फलक फाडल्याने कोपरगाव शहरात तणावाचे वातावरण


कोपरगाव बिपिन गायकवाड हिंदूसम्राट तालुका प्रतिनिधी

कोपरगाव शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या पाठीमागे असलेल्या मैदानाचे कॉंक्रिटीकरणाचा शुभारंभ दि.२९ डिसेंबर २०२० रोजी सकाळी कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष दादा काळे व प्रथम नगराध्यक्ष विजयराव वहाडणे व स्थानिक नगरसेवक व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे भूमिपूजनाचा फलक याठिकाणी लावण्यात आला होता मात्र काही तासांच्या आतच कोणीतरी अज्ञात समाजकंटका कडून सदरचा भूमिपूजनाचा फलक पाडण्यात आला याची माहिती स्थानिक पदाधिकारी संदीप वर्पे सुनील गंगुले नगरसेवक मंदार पहाडे राजेंद्र वाघचौरे संदीप पगारे यांच्यासह नगर परिषदेचे अभियंता वाघ आदी त्या ठिकाणी येऊन बोर्डाची पाहणी करण्यात आली यावेळी सदर घटनेची खबर कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना देतात ते आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले व सदर घटनेचा पंचनामा केला व पालिकेच्या अधिकाऱ्यांना फिर्याद दाखल करण्याच्या सूचना केल्या व जमलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्याकडे मागणी केली की अज्ञात समाजकंटकांचा छडा लावून कडक कारवाई करावी अशी मागणी सर्व पदाधिकार्‍यांच्या वतीने करण्यात आली.

Categories
कागल कोल्हापूर

शेवटच्या दिवशी ग्रामपंचायत निवडणूकीसाठी लागणाऱी कागदपत्रे दाखल करण्यासाठी उमेदवारांची धावपळ,मात्र सोशल डिस्टन्सचा नियम धाब्यावर.


कागल/प्रतिनिधी●गोरख कांबळे.
कागल तालुक्यातील एकूण ५५ गावातील ग्रामपंचायत निवडणूकीचा हंगाम सुरू असल्याने अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांची कागल तहसील कार्यालयातील धान्य गोडाऊन व शासकीय सभागृह येथे गर्दीच गर्दी दिसून येत आहे. कालावधी कमी असल्याने उमेदवार निवडणुकीसाठी अर्जासोबत लागणाऱ्या कागदपत्रे काढण्यासाठी धावपळ करीत असल्यांचे चित्रही कागल तहसील कार्यालयाच्या परिसरात दिसून येत आहे.मात्र सँनिटाइजचा वापर,सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर या गोष्टी टाळल्याचे चित्र परीसरात पहायला मिळाले.
पण ग्रामपंचायत पदासाठी १६ प्रकारची कागदपत्रे व ४ प्रमाणपत्रे अशी सर्व कागदपत्रे सादर करावी लागणार असल्याने उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे कागल तहसील कार्यालयातील धान्य गोडाऊन येथे मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.त्यामुळे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला आहे.तसेच ग्रामपंचायतीच्या निवडणूकाचे रंगधुमाळी जोरदार सुरु झालीे असुन या ग्रामपंचायतील सरपंच पदाचे आरक्षणही जिल्हाधिकारी यांच्या सुचणेनुसार जाहीर केले होते.
पण शासनाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत घोडे बाजार होऊ नये यासाठी सोडलेले आरक्षण रद्द करण्याचे आदेश देऊन सदर आरक्षण हे निवडणुकीच्या निकालानंतर नंतर जाहीर होणार असल्याने इच्छुक उमेदवारांची निराशा झाली असल्याने निवडणूकीत इच्छुक उमेदवारांचा खर्च व निवडणुकीसाठी लागणारी कागदपत्रे यांची जुळवाजुळवी कोण करणार? असा प्रश्न उपस्थित झाल्याने उमेदवारांना लागणारे कागदपत्रे काढण्यासाठी विलंब होत असून सर्व्हरही सारखा डाऊन होत असल्याने दिवसभर ताटकळत बसावे लागते.
त्याचबरोबर आता निवडणूकीसाठीचा अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीखही संपत आल्यानंतर उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे. ग्रामपंचायत निवडणूकीसाठी दि. २३ डिसेंबर ते 30 डिसेंबर पर्यंतच अर्ज स्वीकारले जाणार आहेत.आजची शेवटची सायंकाळी ५.३० पर्यंत मुदत असल्याने त्यामुळे प्रत्येक गावातील इच्छुक उमेदवार आपले भवितव्य अजमावसाठी धावपळ करून निवडणुकीसाठी लागणारे कागदपत्रे मिळवण्यासाठी धावपळ करत असल्याने तहसील कार्यालय धान्य गोडाऊन व शासकीय सभागृहात जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

Categories
क्रीडा सोलापूर

दिवंगत स्व. भारत भालके यांच्या स्मरणार्थ पंढरपूर शहरात उभारणार भव्य क्रीडा संकुल

(क्रीडामंत्री सुनील केदार यांची माहिती)

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यातील, पंढरपूर शहरामध्ये क्रीडा प्रेमीसांठी उभारणार भव्य क्रीडा संकुल यामध्ये बॅडमिंटन हॉल,हॉकी, कुस्ती मॅट,ट्रक,इत्यादी अनेक खेळांचे प्रशिक्षण घेण्यासाठी शासकीय सुसज्ज क्रीडासंकुल उभारण्यात येईल व त्या क्रीडासंकुलास दिवंगत आमदार श्री.भारत नाना भालके यांचेच नाव देण्यात येईल असे आश्वासन क्रीडा मंत्री मा.ना.श्री. सुनील केदार यांनी दिले,तसेच समंधीत पंढरपूर क्रीडासंकुल यांचा सविस्तर प्रस्ताव शासनाकडे तातडीने सादर करावा असे आदेश माननीय क्रीडा मंत्री मोहदयांनी सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी यांना दूरध्वनीवरून आदेश दिले या पंढरपूर क्रीडा संकुल विषयी मा.भगीरथ दादा भालके (चेअरमन)श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखाना,मर्यादित वेणूनगर यांनी दिनांक:29/12/2020 रोजी माननीय क्रीडा मंत्री यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी भेट घेऊन दिवंगत आमदार भारत नाना यांचे अपूर्ण राहिलेले पंढरपूर क्रीडासंकुलाचे स्वप्न उभारणेसाठी पुढाकार घेतला असून त्यासाठी क्रीडामंत्री मोहदयानां निवेदन देऊन सदर पंढरपूर तालुक्यातील क्रीडा प्रेमींना न्याय देण्याची आग्रही विनंती केली, भगीरथ दादांची मागणी क्रीडा मंत्री यांनी तातडीने मान्य करून तात्काळ सूचना दिल्या त्यामुळे पंढरपूर मतदारसंघातील क्रीडा प्रेमी व तरुण युवकांमध्ये क्रीडा विषयीं आवड निर्माण होऊन त्या क्रिडा संकुलात शिक्षण घेऊन राज्य, देश,व आंतरराष्ट्रीय स्तरावर पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याचे नाव सातासमुद्रापार जाण्यास मदत होऊन,उत्तमोत्तम खेळाडू निर्माण होतील यात काही शंका असणार नाही-
मा. भगिरथ (दादा) भालके यांच्या प्रयत्नामुळे सर्व पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील सर्व क्रीडाप्रेमीमध्ये अतिशय आनंदाचे उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Categories
कागल कोल्हापूर

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात तीन लाख ६१ हजार साखर पोत्यांचे पूजन.

कार्यस्थळावरील दत्त मंदिर परिसराचा सुशोभीकरणाचे उद्घाटन


    .
कागल/प्रतिनिधी●गोरख कांबळे.
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या तीन लाख, ६१ हजार साखर पोत्याचे पूजन अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. कारखाना कार्यस्थळावरील श्री दत्त मंदिर परिसर सुशोभीकरण कामाचे उद्घाटनही झाले. श्री दत्त मंदिर परसिर सुशोभिकरण उट्घाटनासह,  या हंगामात उत्पादित ३ लाख ६१ हजार पोती पुजन,दोन कोटी १० लाख युनिट विज निर्यात टर्बाईन पुजन व एक कोटी ३३ हजार इथेनॉल
करारापैकी सात लाख लिटर्स इथेनॉल पुरवठा टॅकर्स पुजन अशा संयुक्त कार्यक्रमासाठी अध्यक्ष नवीद मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
    यावेळी बोलताना अध्यक्ष नवीद मुश्रीफ म्हणाले, या हंगामाच्या ५८ दिवसात तीन लाख, ४५ हजार टन ऊस गाळपानंतर तीन लाख, ६१ हजार क्विटल साखर उत्पादित झाली आहे. सरासरी साखर उतारा १०.४६ टक्के असून बी हेवी मळीपासून इथेनॉल निर्मितीचा उतारा धरून एकूण सरासरी ११.९६ टक्के होतो. सध्या देशात वाढत चाललेल्या साखर उत्पादनाचा विचार करता बी हेवी मळीपासून इथेनॉल निर्मीतीचा निर्णय संस्थापक व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतलेला आहे.या हंगामात ९०.४७ युनिट विज निर्मीती प्रतीटन सरासरीने आजअखेर एकूण तीन कोटी १० लाख  युनिट विजनिर्मीती केली आहे. त्यापैकी दोन कोटी १० लाख युनिट निर्यात केले आहेत.    
चौकट…….
ऊस विकास योजना
हेक्‍टरी उत्‍पादन वाढीसाठी ऊस लागण व खोडवा पिकासाठी बेसलडोस, सूक्ष्म अन्नद्रव्यांची खते व कांडी बियाणे तसेच ऊस रोपांचे बिनव्याजी क्रेडिटवर वाटप…..ठिबक सिंचन प्रणाली करीता सवलतीच्या दरात कर्ज पुरवठा व शेतकऱ्यांना रोख अनुदान……ऊस शेतीचा शास्त्रशुद्ध पॅटर्न तयार करून आदर्श उस प्लॉट योजना कार्यरत…….उसावरील कीड नियंत्रणासाठी रासायनिक, जैविक कीटकनाशके व बुरशीनाशकांचा क्रेडिट वर बिनव्याजी पुरवठा……
     श्री.मुश्रीफ पुढे म्हणाले, पेटोलमध्ये १०% इथेनॉल मिसळण्याच्या शासनाच्या धोरणानुसार ऑईल कंपनीना एकूण एक कोटी ३३ हजार लिटर्स इथेनॉल पुरवठ्याचा करार आहे. आजअखेर सात लाख लिटर्स इथेनॉलचा पुरवठा केलेला आहे. पेट्रोलिअम कंपनीच्या इथेनॉल मागणी विचारात घेता डिस्टीलरी प्लॅन्टची क्षमता प्रतिदिनी ३०,००० लिटर्स वरुन प्रतिदिनी ५०,००० लिटर्स इतके विस्तारीकरण केले आहे.
चालू हंगामामध्ये एकूण ३२ लाख, २५ हजार लिटर्स इतके अल्कोहोलचे उत्पादन घेतले असून त्यापैकी २१ लाख, २५ हजार लिटर्स रेक्टीफाईड स्पिरीट व ११ लाख लिटर्स इथेनॉलचे उत्पादन झाले आहे.तसेच डिस्टीलरीमधून निघणारे सांडपाणी (स्पेट वॉश) याची घनता वाढवून,बॉयलरला त्याचा इंधन म्हणून वापर केला आहे व त्यापासून निर्माण होणारी स्टीम ही पुन्हा डिस्टीलरीसाठी वापरलेली आहे. त्यामधून निघणारे कंन्डेंसेट याच्यावरती प्रकिया करुन निघणारे पाणी हे पुन्हा डिस्टीलरीकरीता वापरलेले आहे. यामुळे डिस्टीलरी प्रकल्पासाठी कमीत कमी पाण्याचा वापर करावा लागतो व कोणत्याही प्रकारचे प्रदुषण होत नाही.ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पिकविलेल्या सर्वच्या सर्व ऊस गाळपासाठी कारखान्याकडे पाठवावा, असे आवाहन अध्यक्ष श्री. मुश्रीफ यांनी यावेळी केले.
    

Categories
नांदेड भोकर

भाजपा युवा मोर्चाच्या भोकर तालुकाध्यक्षपदी श्रीकांत किन्हाळकर

भोकर
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या भोकर तालुकाध्यक्षपदी बापूसाहेब गोरठेकर समर्थक श्रीकांत व्यंकटराव किन्हाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भोकर /अनिल डोईफोडे/येथील भाजपा पदाधिकाऱ्यांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नांदेड येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत युवा मोर्चाच्या भोकर तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी श्रीकांत किन्हाळकर यांच्यावर टाकण्यात आली. यावेळी खा. प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर , युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष किशोर देशमुख , जि प.सदस्या.सौ.प्रणिताताई देवरे , कुशाल पाटील उमरदरीकर यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले.या निवडीबद्दल जिल्हा उपाध्यक्ष दिलीप सोनटक्के, तालुकाध्यक्ष किशोर पाटील लगळुदकर, बाजार समितीचे संचालक गणेश पाटील कापसे, राजू अंगरवार, विशाल माने यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.
या निवडीनंतर किन्हाळकर म्हणाले की, खा. प्रताप पाटील आणि बापूसाहेब गोरठेकर यांनी माझ्यावर टाकलेल्या जबाबदारीला तडा जाऊ न देता मिळालेल्या पदाचा उपयोग युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी करीन. पक्षाची ध्येयधोरणे गावागावात पोहचविण्यासाठी काम करणार आहे.

Categories
मुंबई

विजेँद्र पवार यांची होणारी नाहक बदनामी थांबेल कां…!

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी:लक्ष्मण राजे )

केवळ भटक्या कुत्रीच्या अपघाती निधन प्रकरणामुळे होणारी मानहानी रहिवाश्यांकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक त्याचबरोबर अर्वाच्य शिव्या हे कितपत योग्य आहे… असा सवाल केला आहे नालासोपारा येथील छेडा नगर मधील विनी हाईट सोसायटी मधिल स्थानिक रहिवाशी विजेँद्र पवार यांनी. सकाळी नेहमीप्रमाणे विजेँद्र पवार कामाला जायला निघाले कारण व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाच्या मिटिंगसाठी दुसऱ्या शहरात जाणं आवश्यक होतं. पत्नी आणि मुलांचा निरोप घेऊन नियमितपणे गाडीत बसून कामाचा रस्ता धरला. डोक्यात कामासंबंधी विचार चालले असल्यामुळे आणि त्यांत नेहमीच्या जागी गाडी लावता न आल्याने गेटबाहेर यायला थोडा उशीरच झाला होता. रोजची कामं मार्गी लावून मिटिंग आटपेपर्यंत नवं रामायण विजेँद्रची वाट पाहत होतं. सकाळी सोसायटी बाहेर निघताना नेमकं एक भटक्या कुत्र्याचं पिल्लू विजेंद्रच्या गाडीखाली आलं आणि मृत पावलं. रस्ता खडबडीत असल्याने विजेँद्रला काहीच कळलं नाही. कुण्या एका विक्षिप्त बाईने विजेँद्र पवार यांची पोलिसात अशी काय तक्रार केली जसं काय त्याने एखाद्याचा खून केला की काय… इतकंच नव्हे तर या बाईने सोशल मिडीयावर सोसायटी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व्हायरल करून त्यांची नाहक बदनामी केली. सोबत अँनिमल राईटस् संघटना सामील झाल्याने गोंधळ आणखी वाढला होता. नक्की कोणत्या क्षणी कुत्र्याचं पिल्लू आपल्या गाडीखाली आलं ते विजेँद्र पवार यांना कळेना. जेव्हा त्यांनी स्वतः सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमे-यातलं फूटेज पाहिलं. ते सर्व त्याच्या नजरचुकीने म्हणा किंवा अनावधानाने घडले असं त्या फुटेज मध्ये पाहताक्षणी आढळले. तरीही विजेँद्र पवार यांनी झाल्या प्रकाराची माफी मागून प्रकरण मिटवा अशी याचना देखील केली. या आधी सुद्धा विजेँद्र पवार यांनी भटक्या कुत्र्यांसदर्भात पालिकेत तक्रार केली होती पण पालिकेच्या थंड प्रतिसादामुळे कुत्र्यांची पैदास जास्तच वाढू लागली FIR दाखल झाल्यामुळे विजेँद्र पवार जेव्हा पोलिस स्टेशनमध्ये गेल्यावर त्यांच्यावर प्राणीहत्येचं कलम लावण्यात आलं होतं. शिवाय अपघाताला हत्येचा रंग देऊन सोशल मिडीयावर सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यामुळे त्याला शिव्याशाप देणारे फोन सुद्धा येऊ लागले होते.
याचा परिणाम बराच तीव्र झाला. पोलिस स्टेशनच्या चकरा, त्यात गेलेला वेळ, बिघडलेलं रूटीन, पत्नी-मुलांची काळजी, कॅन्सल कराव्या लागलेल्या मिटींग्ज, त्यामुळे व्यावसायिक नुकसान तर झालंच शिवाय मानसिक त्रास झाला हा वेगळाच. केवळ बदनामी करून दुस-याला त्रास देणं हाच त्या बाईचा हेतू असावा हे निश्चित झालं. पण यामागचं कारण कळत नव्हतं. अनेकदा नकळत अपघात होतो पण त्याचा इतका बाऊ केला जातो की आपण फार मोठा अपराध केलाय. पण आपण जे काही पाहतो, वाचतो त्याची दुसरी बाजू माहित नसताना सहजपणे आपलं मत व्यक्त करून मोकळे होतो पण सत्य काय आहे याचा उलगडा न लावता एखाद्या निरपराध व्यक्तीची सोशल मीडियावर केलेली नाहक बदनामी हीं त्याच्या व्यवसायावर.. त्याच्या जनजीवनावर किती घातक ठरते हे या विक्षिप्त बाईला आणि तिला साथ देणाऱ्या विक्रुत प्रवृत्तीच्या लोकांना कसं समजणार. तेव्हा अशा प्रकारामुळे विजेँद्र सारखे अनेक युवक बळी पडताहेत त्याचं काय…! तेव्हा हे कुठंतरी थांबलं पाहिजे.
अशी माहिती महेश्वर भिकाजी तेटांबे यांनी दिली.

Categories
कोपरगाव

कोरोनाच्या महामारीत आणि निवडणुकीच्या रणधुमाळीत कोपरगावकर हरवणार कोणाला

कोपरगाव बिपिन गायकवाड हिंदूसम्राट तालुका प्रतिनिधी-
कोरोना कोविड 19 या महा मारीची दुसरी लाट येणार असल्याची भीती ही सर्वसामान्य जनतेच्या मनात असताना त्यावर मात करण्यासाठी सर्वत्र उपाययोजना राबविण्यात येत असताना कोपरगाव तालुक्यातील एकूण 29 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असताना कोपरगाव तहसील कार्यालयात होत असलेल्या गर्दीमुळे कोपरगावकर हे कोरोना वर मात करतात की आपल्या प्रतिस्पर्ध्यावर अशी संतप्त प्रतिक्रिया सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहेत कोपरगाव तालुक्यातील 29 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची बिगुल वाजले असताना यामध्ये दिनांक 29 डिसेंबर रोजी तालुक्यातील ग्रामपंचायत मधून एकाच दिवसात 195 पुरुषांनी व 205 महिलांचे असे एकूण 400 अर्ज एकाच दिवसात दाखल झाले शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी यांची महाविकास आघाडी तसेच भाजप व बळीराजा पार्टी व अपक्ष यांच्यासह सर्वच प्रमुख पक्षांनी ग्रामपंचायत निवडणुकांच्या रिंगणात उडी घेतली आहे त्यामुळे गाव पातळीवरील निवडणुका रंगतदार होणार आहे मात्र सरपंचाचे आरक्षण नंतर जाहीर होणार असल्यामुळे स्थानिक पातळीवर थोडी गळचेपी झालेली दिसून येत आहे निवडणुकीसाठी प्रत्येक जण एक दुसर्‍याकडे बघत असून स्थानिक ग्रामपंचायतीचा हा खेळ मोठ्या सम्राटांना नवीन तर अजिबात नाही त्यामुळे यावेळेस तालुक्यात फार काही आपल्याला मिळेल असे एकंदरीत वाटत नाही आज सातव्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यास इच्छुकांनी सकाळी 9 वाजेपासूनच कोपरगाव तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणात आपआपल्या पक्षाच्या आदेशा प्रमाणे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती यामध्ये आज दि. 29 रोजी तालुक्यातील ग्रामपंचायती पैकी उकडगाव 20 तिळवणी 20 घारी 01 मनेगाव 05 मळेगाव थडी 15 वेळापूर 11 जेऊर पाटोदा 12 कासली03 ओगदी 07 अंचलगाव 13 कोळगाव थडी 22 मायगाव देवी 6 हिंगणी 18 रवंदे 26 सवंत्सर 68 देर्डे चांदवड 18 मढी खुर्द 12 मढी बुद्रुक 18 धोंडेवाडी 03 आपेगाव 14 येसगाव 15 टाकळी 13 कोकमठाण 47 जेऊर कुंभारी 13 असे एकूण 195 पुरुष व 205 महिलांनी मिळून चारशे जणांनी अर्ज दाखल केले आहे आता दिवसागणिक या निवडणुकीत रंग भरला जाणार असून कोपरगाव तालुक्यात ग्रामपंचायती बिनविरोध होण्याची शक्यता मावळत चाललेली दिसत असून आता सत्ताधारी व विरोधक यांनी आजपर्यंत कुठेही हस्तक्षेप होताना दिसला नसून उद्या दि. 30 डिसेंबर हा शेवटचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता असून उद्याच्या निर्णयाकडे सत्ताधारी व विरोधक शेवटच्या दिवशी काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून आहे सदरच्या अर्जाची छाननी 31 डिसेंबर रोजी होणार आहे तर दि. 4 जानेवारी 2021 पर्यंत अर्ज मागे घेण्याची शेवटची वेळ असून तर त्याच दिवशी दुपारनंतर निवडणूक चिन्ह वाटप करण्यात येणार असून मतदान दि.15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 07:30 ते सायंकाळी 05:30 पर्यंत होणार आहे तर मतमोजणी दि.18 जानेवारी 2021 रोजी सकाळ पासून सुरू होणार आहे यासाठी तालुक्यातील मोठे सम्राट आपल्याकडे जास्तीत जास्त ग्रामपंचायती आपल्या ताब्यात असाव्यात यासाठी सगळेजण मोर्चेबांधणी करत आहेत तर ग्रामपंचायतीवर आपणच विराजमान व्हावे यासाठी प्रतिस्पर्ध्याला हरवण्यासाठी एक एकर जमीन विकावी लागली तरी बेहतर या इरषेत प्रत्येक उमेदवार हे आपले निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र सादर करण्यासाठी कोपरगाव तहसील कार्यालयात तुडुंब गर्दी करत आहेत दरम्यान कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी सर्वत्र सोशल डिस्टंसिंग ठेवण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन हे विशेष मोहीम हाती राबवून नागरिकांन मध्ये जनजागृती करताना दिसत नसून कोपरगाव तहसील कार्यालय परिसरात व कार्यालयत जातांना नियमांची पायमल्ली होत असल्याने कोपरगावकर कोरोनावर मात करतात की निवडणुकीतील आपल्या प्रतिस्पर्ध्यावर अशी खंत तालुक्यातील सर्व सामान्य नागरिकांकडून व्यक्त होतांना दिसत दिसून येत आहे

Categories
इंदापूर ब्रेकिंग न्युज

विठोबा (तात्या) भरणे अनंतात विलीन; भरणे कुटुंबाचे छत्र हरपले.

इम्तिहाज मुलाणी :
इंदापूर (प्रतिनिधी):

इंदापूर 30 // राज्याचे सार्वजनिक बांधकाम,वने, दुग्ध व पशुसंवर्धन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना पित्रृशोक झाला. त्यांचे वडील विठोबा (तात्या ) रामा भरणे यांचे वयाच्या 92 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्यावर आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भरणेवाडीत हजारोंच्या उपस्थिती अंत्यसंस्कार करण्यात आले.

गेल्या काही दिवसापासून तात्या आजारी असल्यामुळे त्यांना पुणे येथे उपचारासाठी हलवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान मंगळवारी रात्री सव्वाअकरा वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या पाठीमागे पत्नी,राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह चार मुले व तीन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे

अंत्यविधीस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी सहकार व संसदीय मंत्री हर्षवर्धन पाटील, दौंडचे आमदार राहुल कुल,करमाळाचे आमदार संजय शिंदे, माजी आमदार रामहरी रुपनवर, दौंडचे माजी आमदार व पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, महाराष्ट्र राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक ,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, युवानेते राजवर्धन पाटील यांच्यासह हजारो जनसमुदाय उपस्थित होता.

Categories
सोलापूर

पोलीस पाटील यांच्या विविध प्रलंबित मागण्या व विशेष सहाय्यक सहकारी अभियोक्ता यांच्या मानधनामध्ये वाढ होण्याकरीता आ. प्रणिती शिंदे यांनी मा. अनिल देशमुख, गृहमंत्री यांची भेट घेतली

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

आमदार प्रणिती शिंदे यांनी पोलीस पाटील यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात व विशेष सहाय्यक सहकारी अभियोक्ता यांच्या मानधनामध्ये वाढ होण्याकरीता मा. अनिल देशमुख साहेब, गृहमंत्री महाराष्ट् शासन यांची भेट घेवून निवेदनाव्दारे मागणी केली.

यामध्ये पोलीस पाटील हे पद शासन यंत्रणेतील गाव पातळीवर शासनाच्या अत्यंत जवळचा घटक म्हणून प्रशासन ओळखते गाव पातळवर गृह व महसूल विभागात अत्यंत प्रामाणिकपणे काम करीत आहेत. पोलीस पाटील हे गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व तसेच कोरोना या भयंकर महामारीमध्ये सुध्दा गांव पातळीवर आपले जिव धोक्यात घालून कार्य करत आहे. त्यांच्या प्रलंबित मागण्या 1) पोलीस पाटलांचे मानधन दरमहा 15,000/- करण्यात यावे. 2) पोलीस पाटलांची वयोमर्यादा 60 वर्षे वयोवरून 65 वर्षे करण्यात यावे. 3) पोलीस पाटलांचे नुतनीकरण कायमचे बंद करण्यात यावे. 4) पोलीस पाटलांना जिल्हा व तालुका पातळीवर पोलीस पाटील भवन करावे. 5) पोलीस पाटलांना विनाअट शस्त्र परवाना द्यावे. 6) पोलीस पाटलांना गाव पातळीवर स्वतंत्र कार्यालयाचे शासन जी.आर. आहे. त्याचे गाव पातळीवर अंमलबजावणी करण्यात यावी. आदि. पोलीस पाटील यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण होण्याबाबत.

तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये सन 1998 पूर्वी शासनाचे अभियोग पक्षाचे कामकाज पाहण्याकरीता अभियोक्ता यांची मा. पोलीस अधिक्षक व पोलीस आयुक्त यांच्यामार्फत नियुक्ती केली जात होती. त्यानंतर मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अभियोग संचनालय नव्याने निर्मित करण्यात आले व त्यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असणारे पोलीस अधियोक्ते यांना सहाय्यक सहकारी अभियोक्ता हे पद देण्यात आले. त्यांची सेवा अभियोग संचनालय यांच्या अधिपत्याखाली शासन निर्णयान्वय कायम ठेवण्यात आली. यांची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात आली व त्यानंतर त्यांना महाराष्ट्रातील कार्यरत असणातरया सर्व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयामध्ये अभियोग पक्षाचे कामकाज पाहण्याकरीता नेमण्यात आले. आजमितीस 450 सहाय्यक सहकारी अभियोक्ते व साधारण: विशेष सहकारी अभियोक्ते न्यायालयीन कामकाज पाहत आहेत. विशेष सहाय्यक सहकारी अभियोक्ते यांच्या नेमणुका या मा. जिल्हाधिकारी, मा. पोलीस आयुक्त, मा. पोलीस अधिक्षक व सहाय्यक संचालक, सरकारी अभियोक्ता यांच्यामार्फत करण्यात येते. विशेष सहाय्यक सहकारी अभियोक्ता यांना गृह विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडील दि. 21/08/1999 रोजीच्या निर्देशानुसार प्रतिदिन 450 इतके मानधन देण्यात येत होते. त्यानंतर 2009 साली रु. 700 प्रतीदिन, सन 2013 पासून रु. 1000 इतके तुटपुंज्ये मानधन प्रतिदिन देण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना महिन्याकाठी जास्तीत जास्त रु. 22 हजार इतके मानधन मिळत आहे. वास्तविक पाहता सहाय्यक सहकारी अभियोक्ता व विशेष सहाय्यक सहकारी अभियोक्ता यांचे न्यायालयीन कामकाजेचे स्वरुप एकाच प्रकारचे आहे. परंतू सहाय्यक सहकारी अभियोक्ता यांना दरमहा रु. 90 हजार पेक्षा जास्त वेतन व इतर लाभ देण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्यात कार्यरत असणाऱ्या विशेष सहाय्यक सहकारी अभियोक्ता यांना प्रतिमहा रु. 60 हजार रुपये इतके वेतन अदा करण्यात यावी व इतर सोयी-सुविधांचा लाभ मिळण्याकरीता आमदार प्रणिती शिंदे यांनी मा. अनिल देशमुख साहेब, गृहमंत्री महाराष्ट् शासन यांची भेट घेवून निवेदनाव्दारे मागणी केली.

यासंदर्भात मा. अनिल देशमुख साहेब, गृहमंत्री महाराष्ट् शासन यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून सांगितले कि, वरील विषयांसंदर्भात तात्काळ बैठक आयोजित करून त्यामध्ये निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले.

Categories
मुंबई

कै वीर लक्ष्मणराव अण्णाजी राणे पत्रभूषण व समाजभूषण पुरस्कार सोहळ्यातचे २ जानेवारी २०२१ रोजी आयोजन

(हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी:लक्ष्मण राजे )

अभिजित राणे युथ फौंडेशन,महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने ऑगस्ट २०२० मध्ये आयोजित करण्यात आलेल्या वृत्तपत्र लेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा शनिवार दि २ जानेवारी २०२१ रोजी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विजेते पत्रलेखक, निवडक पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या निवडक गुणिजनांना प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते कै वीर लक्ष्मणराव अण्णाजी राणे पत्रभूषण व समाजभूषण पुरस्कार २०२० देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे स्थळ :-
केशव गोरे स्मारक ट्रस्ट हॉल, गोरेगाव पश्चिम, (स्टेशनजवळ) मुंबई ,
दिनांक व वेळ :- २ जानेवारी २०२१ सायंकाळी ५.०० वा
सर्व पुरस्करप्राप्त मान्यवरांनी वेळेवर उपस्थित रहावे.अशी माहिती स्पर्धाप्रमुख गणेश हिरवे यांनी दिली.

Categories
नाशिक

कृषी मंत्री श्री दादाजी भुसे यांना कोरोनाची लागण , सोशल मीडियाव्दारे दिली स्वता माहिती .


नाशिक शहर प्रतिनिधी सुनील बेलदार
नाशिक दि ३० डिसेंबर :-देशासह राज्यात कोरोना महामारीने थैमान घातले असतांना काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्हयातील मालेगाव शहरात कोरोनाचा विस्फोट झाला होता त्या काळात मालेगावकरांना मानसिक आधार देण्याचे काम राज्याचे कृषी मंत्री श्री दादाजी भुसे यांनी केले होते , एवढ्या भयाण परिस्तितीत सुद्धा कृषी मंत्री श्री दादाजी भुसे यांनी गल्लोगल्ली फिरून कोरोना रुग्णाच्या भेटी गाठी घेऊन त्यांचे मानसिक मनोबल वाढविण्याचे काम करत होते , एवढेच नव्हे तर मालेगाव तालुक्यातील प्रसिद्ध असणारी तीन पावली नृत्य कला त्यांनी कोरोना रुग्णाच्या समवेत नाचून त्याचे मनोबल व धैर्य वाढविण्याचे काम त्यांनी प्रगतीपथावर केले होते , त्यांच्या अशा कामांमुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले गेले होते ,
परंतु काल त्यांनी आपली कोरोना चाचणी पॉजिटीव्ह आली असून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे सोशल मीडिया च्या माध्यमातून सांगितले आहे , प्रकृती ठणठणित असून काही घाबरण्याचे काम नाही असे सुद्धा त्यांनी सांगितले आहे , मागील दोन दिवसांत ज्या कार्यकर्त्यांनी किंवा जनतेशी संपर्क झाला असेल त्यांनी सर्वानी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असे सुद्धा आव्हान त्यांनी केले आहे ,

Categories
कवठेमहांकाळ

कामगारांचे लाभाचे अर्ज त्वरित मंजूर व्हावेत महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशन आयटक यांच्या वतीने सांगलीत मा.जिल्हाधिकार्‍यांना निवेदन


दि.२९/१२/२०२०
कवठेमहांकाळ- विद्याधर रास्ते.

23 जुलै 2020 रोजी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळामार्फत राज्यातील सर्व सहाय्यक कामगार आयुक्त व सरकारी अधिकाऱ्यांना आदेश करण्यात आले आहेत की, त्यांनी 30 नोव्हेंबर पर्यंत सर्व प्रलंबित अर्जांचा निपटारा करावा. तरीसुद्धा सांगली जिल्ह्यामध्ये दहा हजारापेक्षाही जास्त अर्ज प्रलंबित आहेत. याबाबत सांगली कामगार आयुक्तांना अनेक वेळा निवेदने देऊन सुद्धा कार्यवाही झालेली नाही. सध्या महाराष्ट्रामध्ये काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत. त्या निमित्ताने अचारसंहिता लागू आहे. परंतु ज्या लाभार्थींच्या अर्जा बद्दल यापूर्वी निर्णय झालेले आहेत, तसेच आचारसंहिता लागू होण्यापूर्वी संबंधित खात्याकडे अर्ज दाखल केलेले आहेत, त्या अर्जांच्या संदर्भात कार्यवाही करण्यास आचारसंहिता काळामध्ये सुद्धा कोणतीही अडचण नसते. तरीसुद्धा आचारसंहितेचा चुकीचा अर्थ काढून सरकारी कामगार अधिकारी कार्यालयामध्ये सर्वच कामे थांबवण्यात आलेली आहेत. ही कामे त्वरित सुरू करावीत अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशन आयटक यांच्या वतीने देण्यात आले आहे.
१) सांगली जिल्ह्यात 20 पेक्षा जास्त बांधकाम कामगारांचा आज पर्यंत मृत्यू झाला आहे. त्यांच्या विधवा पत्नींना अद्यापि अंत्यविधीची रक्कम अथवा आर्थिक सहाय्य, नुकसान भरपाई मंडळाच्या नियमाप्रमाणे अर्ज करून ही अद्याप मिळालेली नाही.
२) मागील वर्षी महापुराने सांगली जिल्ह्यात अनेक बांधकाम कामगारांची घरे पडून प्रचंड नुकसान झाले आहे, अशा कामगारांची घरे बांधण्यासाठी त्वरित कार्यवाही करावी. असे आदेश दोन वर्षापासून बांधकाम कल्याणकारी महामंडळाकडून देऊन सुद्धा अद्याप कार्यवाही झालेली नाही.
३)27 /07 /2020 पूर्वी पाच हजारपेक्षा जास्त कामगारांचे नाव नवीन सभासद होणे, ओळखपत्राचे नूतनीकरण करणे, व लाभ मिळण्याचे अर्ज मंजूर होणे प्रलंबित आहेत. तसेच डिसेंबर 2019 पूर्वी ज्या कामगारांनी अवजारे साहित्य विकत घेण्यासाठी ५००० रुपये मिळण्यासाठी अर्ज केलेले आहेत. त्याचीही अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.४)बांधकाम कामगारांच्या मुलांची शिष्यवृत्ती, प्रसुतीसाठीचे अर्थसहाय्य, गंभीर आजाराचे आर्थिक सहाय्य, विवाहासाठी चे आर्थिक सहाय्य याबाबत योजनानिहाय प्रलंबित अर्जाची यादी निवेदनासोबतहि या अर्जासोबत जोडलेली आहेत. त्याची पूर्तता होणे आवश्यक आहे.
५)23 जुलै पूर्वीपासूनचे सर्व अर्ज ऑनलाईन करण्याच्या नावाखाली प्रलंबित ठेवल्याने बांधकाम कामगारांवर अन्याय केला जात आहे. जवळपास दहा हजारांपेक्षा जास्त प्रलंबित अर्ज निकाली काढण्याबाबत सहाय्यक कामगार आयुक्तांना सत्वर आदेश करावा ही विनंती.

या शिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व भारत सरकार यांच्याकडे खालीलप्रमाणे मागण्या करण्यात येत आहेत.

१)देशातील 44 कामगार कायदे रद्द करून कामगारांचे मूलभूत हक्क काढून घेऊन जो श्रमसंहिता लागू करण्याचा प्रयत्न सुरू आहे तो तातडीने रद्द करावा.
२)देशातील एकूणच शेतकऱ्यांच्या विरोधी केंद्र सरकारने केलेले तीन कायदे त्वरित रद्द करावेत.
३) वीज दुरुस्ती विधेयक भारत सरकारने मागे घ्यावे.
अशा आशयाचे निवेदन आज महाराष्ट्र राज्य बांधकाम फेडरेशन सांगली जिल्हा यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या निवेदनावर ती कॉम्रेड शंकर पुजारी जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशन आयटक. कॉम्रेड विजय बचाटे जनरल सेक्रेटरी निवारा बांधकाम कामगार संघटना. त्याचबरोबर
सुमन पुजारी, विशाल बडवे, राम कदम ,तुकाराम जाधव, शंकर कुंभार ,हनुमंत माळी, निलोफर डांगे ,संजय डबे, दादा बुद्रुक ,संतोष बेलदार, विष्णू माळी, शीतल मगदूम, रावसो पाटील, जोत्स्ना रास्ते, वर्षा गडदे, रोहिणी कांबळे, सुरेखा पाटील, प्रदीपकुमार जाधव, बाळासो सुतार, संतोष सूर्यवंशी, दीपक मोरे, विद्या भोरे, यांच्यासह अनेक बांधकाम कामगार निवेदन यावेळी मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजर होते.

Categories
कला व मनोरंजन सातारा

ग्रामिण तरुणांनी मराठी सोबतच हिंदी चित्रपटसुष्टीत करीअर करावे – रोहीत काटे


सातारा पाटण तालुका प्रतिनिधी महेश मस्कर
चित्रपट सृष्टी मध्ये करीअर करण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत . ग्रामिण कलाकारांच्यात टँलेंट असुन शाँर्टफिल्म , वेबसिरीज या माध्यमातुन अनेक ग्रामिण कलाकारांनी आपल्यातील कला दाखवुन दिली आहे . तरीसुद्धा मराठी हिंदी टि.व्ही.सिरीयल व चित्रपटांमध्ये योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने ग्रामिण कलाकारांना अनेक आवाहनांना सामोरे जावे लागते.ग्रामिण कलाकारांनी चित्रपटसृष्टी मध्ये करीअर करावे या साठी मुंबई येथील मराठी व हिंदी चित्रपट क्षेत्रातील प्रोडक्शन मँनेजर रोहीत काटे R. K. लवकरच बारामती मध्ये SHOW TALENT – आर्टस & एन्टरटेनमेंट या नावाने कार्यालय सुरू करत आहेत व त्या माध्यमातुन चित्रपटांची निर्मिती करणार आहेत तसेच आगामी बहुचर्चित 9वी पास या चित्रपटाचे शुटींग सुद्धा याच भागात करणार असुन स्थानिक कलाकारांना प्राधान्य राहील असे यावेळी स्पष्ट केले. तरी स्थानिक कलाकारांनी 7998313236 या नंबर वर संपर्क साधुन अधिक माहीती घेत रहावी अशी विनंती केली.

Categories
मुंबई

बाळासाहेब ठाकरे की दि. बा. पाटील; नवी मुंबई विमानतळाचा नामांतर प्रश्न चर्चेत

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पाचे काम सिडकोच्या माध्यमातून प्रगतिपथावर असून या विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मात्र या मागणीला नवी मुंबई परिसरातील प्रकल्पग्रस्तांनी विरोध दर्शविला आहे. नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, अशी मागणी करण्यात येत असून याबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
         नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्याच्या मागणीचे निवेदन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल सर्वांनाच नितांत आदर आहे, परंतु नवी मुंबई विमानतळासाठी दि. बा पाटील यांचेच नाव द्यावे, अशी मागणी स्थानिक प्रकल्पग्रस्तांकडून करण्यात येत आहे. नवी मुंबईची उभारणी करताना भूमिपुत्रांच्या जमिनी सिडकोने सक्तीने संपादित केल्या. त्यावेळी भूमिपुत्रांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी दि. बा. पाटील यांनी लढा उभारला आणि सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी ते लढले. आज भूमिपुत्रांना मिळणारा मोबदला दि. बा. पाटील यांच्याच त्यागामुळे मिळाला आहे. मात्र आतापर्यंत नवी मुंबईत उभ्या राहिलेल्या कोणत्याच मोठ्या प्रकल्पाला त्यांचे नाव देण्यात आलेले नाही. त्यामुळे आता उभ्या राहत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचे नाव मिळावे, अशी भूमिपुत्रांची इच्छा आहे. 
        नवी मुंबई विमानतळाच्या नामांतर प्रश्नाचे राजकारण होऊ नये, अशी भावना प्रकल्पग्रस्तांकडून व्यक्त केली जात आहे. नवी मुंबई विमानतळासाठी दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी सुरवातीपासूनच केली जात आहे. या मागणीला येथील राजकीय नेत्यांनीही पाठिंबा दर्शविला आहे. परंतु एकनाथ शिंदे यांनी विमानतळास बाळासाहेबांचे नाव देण्याची मागणी केल्याने हा प्रश्न पुन्हा चर्चेला आला आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल सर्वांच्या मनात आदर आहे. महाराष्ट्रात अनेक प्रकल्पांना बाळासाहेबांचे नाव देण्यात आले आहे. नवी मुंबईची उभारणी करताना भूमिपुत्रांच्या जमिनी सिडकोने सक्तीने संपादित केल्या. त्यावेळी भूमिपुत्रांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी दि. बा. पाटील यांनी लढा उभारला आणि सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी ते लढले. असे असताना नवी मुंबईत उभ्या राहिलेल्या कोणत्याच मोठ्या प्रकल्पाला त्यांचे नाव देण्यात आलेले नाही. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव द्यावे, अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.

Categories
मिरज सांगली

श्री उमेश नवाळे यांनी केलेल्या कामाची चौकशी करून त्यांना बडतर्फ करून त्यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल असे प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी द्वारे निवेदन

मिरज–अशोक मासाळ
श्री उमेश नवाळे हे ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी म्हणून त्यांनी मिरज तालुक्यामध्ये वड्डी एरंडोली नरवाड टाकळी नांद्रे सध्या माधवनगर व आटपाडी येथे केलेल्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता वगैरे व्यवहार केलेला आहे. श्री नवाळे यांनी कामकाज केलेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभा व ग्रामसभेचे प्रोसिडिंग तपासले असता अनेक गंभीर बाबी निदर्शनास येतील. श्री नवाळे यांनी आत्तापर्यंत केलेल्या कामकाजामध्ये ठेकेदारांनी कामे केलेली नसतानाही व ती केल्याचे भासवून ठेकेदारांना मूल्यांकन न करता लाखो रुपयांची बिले अदा केलेली आहेत तसेच श्री नवाळे यांनी प्रत्येक ठिकाणी शासनाचे नियम व आदेश डावलून बोगस नोंदी घातल्या आहेत व तसेच परस्पर ठराव देणे अशा गंभीर बाबीही श्री नवाळे यांनी केलेले आहेत त्यामुळे श्री नवाळे यांनी केलेल्या कामकाजाचे मस्त अधिकारी नेमून चौकशी करावी तसेच स्थानिक निधी लेखा परिक्षक कार्यालयाकडून विशेष लेखा पथक नेमून फिरलेखाकापरीक्षण केल्यास कोट्यावधी रुपयांचा घोटाळा उघडकीस येईल त्यामुळे येत्या 15 दिवसात या गंभीर बाबी चा सखोल चौकशी करून श्री नवाळे यांना बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अन्यथा आम्ही पक्षाच्यावतीने मा हसन मुश्रीफ साहेब ग्राम विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या निवासस्थानासमोर मुदत या आंदोलन करणार आहोत याची आपण दखल घेऊन कारवाई करावी असे निवेदन मा मुख्य कार्यकारी अधिकारी सो जिप सांगली यांना देण्यात आले यावेळी प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख स्वप्निल खांडेकर जिल्हा उपाध्यक्ष गौतम भगत व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Categories
कला व मनोरंजन जागतिक मुंबई

सुपरस्टार राजेश खन्ना फॅन क्लब इंडियाचे प्रमुख विलास घाटे यांच्या कडील राजेश खन्ना संग्रहाची लिम्का बुकमध्ये नोंद

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी: लक्ष्मण राजे )

ठाण्यातील सुपरस्टार राजेश खन्ना फॅन क्लब इंडियाचे प्रमुख आणि सुपरस्टार राजेश खन्ना यांचे जबरदस्त चाहते श्री. विलास घाटे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी 29 डिसेंबर रोजी, सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या जन्मदिनी सुपरस्टार राजेश खन्ना यांचे फॅन क्लब इंडियाची स्थापना करण्यात आली. त्यावेळी नामांकित सिने पत्रकार , चित्रपट समीक्षक , लेखिका अनिता पाध्ये , उत्कर्षा मालिया , संजीव पाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच सुपरस्टार राजेश खन्ना यांचे असंख्य चाहते उपस्थित होते. श्री. विलास घाटे यांच्याकडे सुपरस्टार राजेश खन्ना संबंधित माहिती संग्रह , राजेश खन्ना यांच्या सर्व चित्रपटांच्या , गीतांच्या व्हिडिओ / आॅडिओ कॅसेट , सीडी , एल पी रेकाॅर्ड , अनेक चित्रपट परिक्षणे , आणि लेखांची पेपर कात्रणं असे जे मोठे कलेक्शन आहे ते या देशात बहुतेक कुणाकडेच नाही. श्री.विलास घाटे ह्यांच्या सुपरस्टार राजेश खन्ना या मोठ्या संग्रहाची नोंद लिम्का बुक मध्ये झाली आहे. श्री.विलास घाटे यांना सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या असंख्य चाहत्यांनी मनःपुर्वक अभिनंदनीय हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत ‌.

Categories
राहुरी

हवामान बदलाचा परिणाम अभ्यासण्यासाठी पीक हवामान प्रतिमाने व कृषि सल्ला सेवा उपयुक्त

  • कृषि हवामान सल्ला सेवा विभाग प्रमुख डॉ. के.के. सिंग

राहुरी तालुका प्रतिनिधी
( जावेद शेख ) दि. 29 डिसें 2020कृषि उत्पादनात सुधारणा, प्रमाण आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी पीक हवामान प्रतिमाने ही उपयुक्त प्रणाली आहे. पीक हवामान प्रतिमाने व कृषि हवामान सेवा सल्ला यांचे महत्व वेगवेगळ्या पिकांच्या हवामान परिस्थितीची मुलभुत व अचूक हवामानाची पुर्व माहिती वेळेवर मिळाली तर ती उपयुक्त ठरु शकते. कृषि सल्ला सेवेद्वारे मिळालेल्या माहितीमुळे हवामान बदलाचा कृषि पध्दतीवर होणारा परिणाम वाढविण्यासाठी उपयुक्त असल्याचे प्रतिपादन नवी दिल्ली येथील भारतीय हवामान विभागाच्या कृषि हवामान सल्ला सेवा विभागाचे प्रमुख डॉ. के.के. सिंग यांनी केले. जागतिक बँक अर्थसहाय्यीत राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत असून या प्रकल्पांतर्गत पीक हवामान प्रतिमाने, हवामान अद्ययावत शेतीची साधने या विषयावर दि. 21 ते 25 डिसेंबर, 2020 या कालावधीत एक आठवड्याचा ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या सांगता समारंभासाठी डॉ. के.के. सिंग प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अशोक ढवण होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन व्हिएन्ना आंतरराष्ट्रीय केंद्र, ऑस्ट्रीया येथील बाह्य अंतराळ प्रकरण संयुक्त राष्ट्र संघ कार्यालय, यूएन स्पायडर प्रोग्राम, बिजींग कार्यालयाचे प्रमुख डॉ. शिरीष रावण यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, संशोधन तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, प्रमुख संशोधक डॉ. सुनिल गोरंटीवार, सह समन्वयक डॉ. मुकुंद शिंदे, आयोजन सचिव डॉ. रवि आंधळे, सह सचिव व कृषि हवामानशास्त्र विभाग प्रमुख डॉ. जयवंत जाधव उपस्थित होते. यावेळी कुलगुरु डॉ. अशोक ढवण प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करतांना म्हणाले की हवामान अद्ययावत शेतीसाठी पीक हवामान प्रतिमाने मोलाची भुमिका बजावत असून पीक उत्पादनवाढीसाठी त्याचा कार्यक्षम उपयोग कसा व्हावा या दृष्टीने प्रयत्न करणे जास्त गरजेचे आहे. पीक हवामान प्रतिमाने या विषयावर संशोधन व विस्तार करण्यास महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी कटीबध्द आहे. प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी हवामान अद्ययावत शेतीचे प्रकल्पांतर्गत महत्व विषद केले. यावेळी प्रशिक्षणार्थींना डॉ. मुकुंद शिंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्नेहल कानडे व डॉ. वैभव मालुंजकर यांनी केले. डॉ. जयवंत जाधव यांनी आभार मानले. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी देश विदेशातून 250 पेक्षा जास्त सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींना कृषि हवामान शास्त्र या विषयातील देशभरातील तज्ञ शास्त्रज्ञांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Categories
गेवराई

सत्यजित तांबे यांच्याकडून गेवराई शहरातील पात्र अतिक्रमणे कायम करण्यासाठी पाठपुरावा

हिंदुसम्राट विशेष प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

गेवराई:दि.२९.गेवराई शहरातील पात्र अतिक्रमण धारकांना PTR मिळावेत यासाठी जिल्हाधिकारी बीड आणि संचालक नगर रचना पुणे यांना महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजितदादा तांबे यांनी मुंबई येथील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यालयातून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर तातडीने दिले आहेत.
आज दिनांक २९ डिसेंबर रोजी मुंबई मधील महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे कार्यालयात युवक काँग्रेसचे बीड जिल्हा अध्यक्ष अॅड.श्रीनिवास बेदरे यांनी आणि सामाजिक सुरक्षा समितीचे महाराष्ट्र राज्य समन्वयक तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे राज्य सचिव कडुदास कांबळे , अभय देशमुख,शिवराज मोरे, ब्रिजदत्त, विजय निटोरे, यांनी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सत्यजित तांबे यांना गेवराई शहरातील अतिक्रमण धारकांच्या सरकारी जागेवरील अतिक्रमणे कायम करण्याचा प्रश्न गांभीर्याने लक्षात आणून दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत दि. ०७/०९/२०१७ रोजी निर्देशीत केलेल्या शासन निर्णय दि. १२/०७/२०११ च्या नुसार पुढील कार्यवाही करण्यासाठी दिलेला चुकीचा अभिप्राय रद्द करून योग्य ती कार्यवाही करावी यासाठी जिल्हाधिकारी बीड यांना तर शासन निर्णय दिनांक १७ नोव्हेंबर २०१८ नुसार सरकारी जागेवरील अतिक्रमणे कायम करण्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ३७(१) एक नुसार गेवराई शहरातील संजयनगर सर्वे नंबर १ मधील आरक्षणा खालील क्षेत्र वगळून ते निवासी विभागात समाविष्ट करून नगर परिषद गेवराई यांनी संचालक नगर रचना व मूल्य निर्धारण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांना दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावास मंजूरी द्यावी यासाठी त्यांनी नगर रचना संचालक यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Categories
परळी

जिजामाता उद्यानाचे सुशोभीकरणाचे काम संपेपर्यंत राजमाता जिजाऊंचा पुतळा झाकण्यात यावासंभाजी ब्रिगेडच्या वतीने नगरपरिषद ला निवेदन


परळी (प्रतिनिधी)
परळी वै. येथील जिजामाता उद्यानाचे सुशोभिकरण चालू आहे. गार्डन मध्ये पूर्वी जिजाऊंचा पूर्णाकृती पुतळा महाद्वाराच्या समोर होता. पण आता महाद्वाराची दिशा बदलण्यात आली असून आऊसाहेब जिजाऊ यांचा पुतळा सुद्धा मुख्य प्रवेशद्वारावर बसवण्यात यावा. पुतळ्याची जागा बदलत असताना पूर्वीचा एकट्या जिजाऊचा पूर्णाकृती पुतळा न बसता बालशिवबा सोबत जिजाऊंचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने नगरपरिषदेला निवेदन देऊन करण्यात आली आहे. तसेच सध्या उद्यानात सुशोभीकरणाचे काम चालू असल्यामुळे काळजी म्हणून जिजाऊंचा पुतळा सुशोभीकरणाचे काम होईपर्यंत झाकण्यात यावा. अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन परळी वै. नगरपरिषदेचे कार्यालयीन अधिक्षक शिवश्री संतोष रोडे साहेब यांना देताना संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष शिवश्री सेवकराम जाधव माहिती अधिकार संरक्षण समिती बीड जिल्हाध्यक्ष शिवश्री बादल कांबळे सामाजिक कार्यकर्ते शिवश्री पवन माने आदी उपस्थित होते.

Categories
भोकर

भोकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष डाॅ. फिरोज खान इनामदार यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल.

भोकर प्रतिनिधी दत्ता बोईनवाड
भोकर येथील एका महिलेच्या तक्रारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष डाॅ. फेरोज खान इनामदार यांच्या विरुद्ध भोकर पोलिसात विनयभंग व मारहाण केल्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भोकर येथील एका महिलाने दिलेल्या फिर्यादीवरून 28 डिसेंबर 2020 रोजी रेल्वे स्टेशन रोड डॉक्टर इनामदार यांच्या दवाखान्यात दुपारी चारच्या दरम्यान केली असता माझ्या सासर्‍याच्या जमिनीवर आपण अतिक्रमण केले आहे म्हणून डॉक्टर फिरोज इनामदार यांना जाब विचारला.यावेळी डॉक्टर फिरोज इनामदार यांनी महिलेशी अश्लील शिवीगाळ करून हात धरून मारहाण केली व मी इनामदारआहे.या गावात माझी खूप जमीन आहे तुला काय करायचे ते करून घे म्हणून दवाखान्या बाहेर हाकलून दिले असी फिर्याद सुचिता मनोजकुमार शिवेवार पोलिसात दिली यावरून डॉक्टर फिरोज खान इनामदार यांच्याविरुद्ध भोकर पोलिसात कलम 354. 294. 323. 509. विनयभंग व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अधिक तपास जमादार रंगराव जाधव करीत आहे.

Categories
उमरी

भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या वतीने विमा प्रतिनिधी   सौ.दमयती कोडगीरे व मुलगा गजानन कोडगीरे शतकवीर व एम.डी.आर.टी केल्याने कौतुक 

उमरी / प्रतिनिधी;उद्धव मामडे रावधानोरकर

उमरी तालुक्यातुन कोरोनाच्या संकटमय काळात   विमाप्रतिनिधी सौ.दमयंती सूर्यकांत  कोडगिरे व  मुुलगा गजानन सुुुर्यकांत कोडगिरे यांनी शंभर विमा पॉलिसी पूर्ण करून उमरी तालुक्यातुन सर्वप्रथम शतकविर व MDRT होऊन अमेरीका (USA) संमेलनास जान्याचा बहुमान या माय लेकराना  मिळाल्याने भोकरचे विमा शाखाधिकारी आलोक बोरकर, व विमा कर्मचारी परिवाराच्या वतीने  सन्मान करण्यात आले. मागील वर्षी कोडगीरे यांनी बोळसा रेल्वे.स्टेशन हे गाव  विमा ग्राम केले होते.व भोकर शाखत २३१ विमा पाॅॅलिसी करून व्दिशतक पटकावीले होते.
या विमा प्रतिनिधी  माय लेकराचे उमरी तालुक्यातुन अनेक विमाधारकानी कौतुक केले तसेच सर्व उमरीवासीयानी सुधा त्यांचे कौतुक केले. 

Categories
Uncategorized

३० डिसेंबर २०२० दैनिक पंचांग व राशी भविष्य घ्या जाणून ज्योतिषाचार्य, विशारद, पंडित, ज्योतिष वास्तू भूषण उमेश सुतार यांच्याकडून

!! श्री विघ्नहर्त्रेः नमः !!
🗒️ दैनिक पंचांग🗒️
📅 ईंग्रजी दिनांक ३०
डिसेंबर २०२०
🔥 अग्निवास ०८|५८ पर्यंत अग्निवास पृथ्वीवर आहे.
🥄 आहुती चंद्र मुखात आहुती.
⏲️ युगाब्द -५१२२
⏱️ संवत -२०७७
🕰️ भारतीय राष्ट्रीय सौर कार्तिक शके १९४२
👑 शालिवाहन शके -१९४२
संवत्सर – शार्वरी
🧭 अयन – उत्तरायण
🌤️ सौर ऋतु शिशिर
ऋतु – हेमंत
🪐 मास – मार्गशीर्ष
🌗 पक्ष – शुक्ल
🌕 तिथी – पौर्णिमा (०८|५८)
☀️ वार – बुध (सौम्य वासरे)
🌟 नक्षत्र – आर्द्रा (१८|५५)
💫 योग – ब्रह्मा (१५|४३)
करण – बव (०८|५८)
– बालव (२१|१८)
🌝 चंद्र राशी – मिथुन
🌞 सूर्य राशी – धनु
🌟 सूर्य नक्षत्र – पूर्वाषाढा (१)
🪐 गुरू राशी – मकर
🌟 गुरू नक्षत्र – उत्तराषाढा (४)
🌅 सुर्योदय – ०७|१२

🌄 सुर्यास्त – १८|१०

🕉 दिन विशेष
इष्टि
🔅 दिशा शूल उत्तर
ताराबळ आश्विनी, कृत्तिका, मृग, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, मघा, उत्तराफाल्गुनी, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, मूळ, उत्तराषाढा, धनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा
चंद्रबळ मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु, मकर
शुभ मुहूर्त अभिजित १२|१९ ते १३|०३
🌑 अशुभ वेळ
राहूकाळ १२|४१ ते १४|०३
शिवलिखीत चौघडीया
🔅 लाभ ०७|१२ ते ०८|३५
🔅 अमृत ०८|३५ ते ०९|५७
🔅 शुभ ११|१९ ते १२|४१
🔅 लाभ १६|४८ ते १८|१०
🔅 शुभ १९|४८ ते २१|२६
🔅 अमृत २१|२६ ते २३|०४
लाभ २७|५७ ते २९|३५
🙏 उपासना 🙏
“ॐ गं गणपतये नमः ।”
“ॐ बुं बुधाय नमः ।”
ग्रहपीडा निवारणार्थ दान
मुग, तांदुळ, तूप, हिरवे वस्र सत्पात्री दान करावे. ग्रहांची अनुकुलता प्राप्त होईल.
शुभाशुभ दिन
चांगला दिवस आहे.
मार्गशीर्ष मासातील मुहूर्त
🍫 साखरपुडा मुहूर्त
जानेवारी ३, ६, ७
🐣 डोहाळ जेवण मुहूर्त
डिसेंबर ३१
जानेवारी १
🐥 बारसे
डिसेंबर ३१
जानेवारी १, १०
🪒 जावळ मुहूर्त
डिसेंबर ३१
जानेवारी ६, ७, ८,
🏬 वास्तु मुहूर्त
डिसेंबर ३१
जानेवरी ६, ८, ९
🏠 गृहप्रवेश (लौकिक)
डिसेंबर ३१
जानेवारी १, ६, १०
🎺 विवाह मुहुर्त
जानेवारी ३, ५, ६, ७, ८, ९, १०
🌱 बीज पेरण्यास
जानेवारी ६, ७, ८
🚰 कूपनलिका
डिसेंबर ३०
जानेवारी ३, ५, ६, ७, ८
✂️ कापणी
डिसेंबर ३०, ३१
जानेवारी १, ३, ६, ८,
🏞️ बागकाम
डिसेंबर ३०, ३१
जानेवारी ३, ८, १०,
🚩 सुभाषित
स्वप्नेन्द्रजालवत्पश्य दिनानि त्रीणि पञ्च वा | मित्रक्षेत्र धनागारदारादायादि सम्पदः||
मित्र,जमिन ,पैसा घर, पत्नी, आप्त,सम्पत्ति,स्वप्न ये सब इन्द्रजाल जैसे तीन या पांच दिनो के ही साथी हे | ये ध्यान रखो |

आपला दिवस सुखाचा जावो, मन प्रसन्न राहो.

🙏🏼जय गुरुदेव🙏🏼

🌺दैनिक राशी भविष्य🌺
उमेश सुतार ज्योतिषाचार्य, विशारद, पंडित, ज्योतिष वास्तू भूषण

1) मेष राशी भविष्य (Wednesday, December 30, 2020)
थोडयाशा मानसिक ताणातदेखील आरोग्य चांगले राहील. अनियोजित माध्यमातून मिळणारे पैसे तुमचा दिवस उजळून टाकतील. घरगुती प्रश्न आणि प्रलंबित घरगुती कामं पूर्ण करण्यासाठी लाभदायक दिवस. एखाद्या इंटरेस्टिंग व्यक्तीची भेट होण्याचा संभव आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा दृष्टीकोन आणि कामाचा दर्जा यात सुधारणा होईल. जर तुम्ही आपल्या घरापासून बाहेर राहून अध्ययन किंवा नोकरी करतात तर, आजच्या दिवशी तुम्ही रिकाम्या वेळी आपल्या घरच्यांसोबत बोलू शकतात. घरातील कुठली वार्ता ऐकून तुम्ही भावुक ही होऊ शकतात. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल.
उपाय :- कुठल्याही धार्मिक संस्थानात मदत आणि सेवा दिल्याने व्यापार / व्यवसाय / करिअरला बहरण्यात मदत होईल.

2) वृषभ राशी भविष्य (Wednesday, December 30, 2020)
सर्वसाधारणपणे आरोग्य चांगले असेल, पण प्रवास कटकटीचा आणि तणावपूर्ण ठरेल. ज्या लोकांची अजून सॅलरी आलेली नाही आज ते पैश्याला घेऊन खूप चिंतीत राहू शकतात आणि आपल्या मित्राकडून उधार मागू शकतात. इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल. कामुक सौंदर्यामुळे अपेक्षित निर्णय मिळू शकेल. जर तुम्ही नवीन व्यावसायिक भागीदारीचा विचार करत असाल, तर कोणताही शब्द देण्यापूर्वी सर्व महत्त्वाच्या घटकांची माहिती जमा करा. खेळणे हा जीवनातील महत्वाचा भाग आहे परंतु, खेळण्यात इतके व्यस्त होऊ नका की, त्याचा परिणाम तुमच्या शिक्षणात होईल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील हा एक उत्तम दिवस असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारावर किती प्रेम करता, हे व्यक्त करा.
उपाय :- गणपती मंदिरा जवळच्या आर्थिक रूपाने वंचित आणि गरजू लोकांना लाडू दान करा याने आर्थिक स्थिती चांगली होण्यासाठी फायदेशीर राहील.

3) मिथुन राशी भविष्य (Wednesday, December 30, 2020)
तुम्हाला शांत ठेवणा-या उपक्रमांमध्ये स्वत:ला गुंतवा. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि ऑफिस मध्ये सर्वांसोबत चांगल्या प्रकारे व्यवहार करा जर तुम्ही असे केले नाही तर, तुमची नोकरी जाऊ शकते आणि तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. संवाद, संभाषण आणि चर्चा योग्य मार्गाने जात नसतील तर तुम्ही तुमचा शांतपणा सोडून काहीतरी बोलून बसता. अर्थात त्याबद्दल नंतर क्षमादेखील मागता, पण असे बोलण्याआधी विचार करणे श्रेयस्कर. तुम्ही तुमच्या प्रिय पत्नीशी पूर्वी झालेल्या मतभेदांबद्दल तिला माफ कराल तर तुमचे जीवन सुकर होईल. नोकरी पेशाने जोडलेल्या लोकांना आज कार्य-क्षेत्रात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आज तुमची न कळत चूक होऊ शकते ज्यामुळे तुम्हाला तुमचे सिनिअर्स तुम्हाला रागावू शकतात. व्यावसायिकांसाठी दिवस सामान्य राहण्याची अपेक्षा आहे. जर तुम्ही आपल्या घरापासून बाहेर राहून अध्ययन किंवा नोकरी करतात तर, आजच्या दिवशी तुम्ही रिकाम्या वेळी आपल्या घरच्यांसोबत बोलू शकतात. घरातील कुठली वार्ता ऐकून तुम्ही भावुक ही होऊ शकतात. विवाहाचा परमोच्च आनंदाचा क्षण तुम्ही आज अनुभवू शकाल.
उपाय :- श्रीकृष्णाची पुजा करण्याने पारिवारिक आयुष्यात आनंद वाढतो.

4) कर्क राशी भविष्य (Wednesday, December 30, 2020)
बसताना कोणतीही दुखापत होणे टाळण्यासाठी काळजी घ्या. खुर्चीत किंवा कोचावर कुठेही व्यवस्थित, नीटपणे बसले तर व्यक्तिमत्व खुलून दिसते. त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे योग्य पद्धतीने बसल्यामुळे आरोग्य आणि आत्मविश्वास वाढतो. जे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक तंगीमधुन जात आहे त्यांना आज कुठून तरी धन प्राप्त होऊ शकते ज्यामुळे जीवनाच्या बऱ्याच समस्या दूर होतील. कामाच्या जागी आपण स्वत:ला खूपच खेचल्यामुळे कौटुंबिक गरजा आणि आवश्यकता, अपेक्षांकडे दुर्लक्ष होऊ शकते. प्रेमामधील तुमच्या असभ्य वर्तणुकीची माफी मागा. तुमचे सहकर्मचारी यांना तुम्ही काही विशिष्ट विषय ज्या पद्धतीने हाताळत आहात ते आवडणार नाही – परंतु ते तुम्हाला सांगू शकणार नाहीत – तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम होत नसेल – तर तुमच्या कामाची पद्धत तपासून पाहा आणि त्यानुसार आवश्यक ते बदल तुमच्यात करा. या राशीतील लोकांना आज स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे. जर तुम्हाला वाटते की, तुम्ही जगातील गर्दीत कुठे हरवलेले आहे तर, आपल्यासाठी वेळ काढा आणि आपल्या व्यक्तित्वाचे आकलन करा. तुमच्या वैवाहिक आयुष्यात अलीकडे फार मजा राहिलेली नाही; तुमच्या जोडीदाराशी बोला आणि काहीतरी कूल प्लॅन करा.
उपाय :- परिवारामध्ये कोणाचाही वाढदिवस असेल आणि त्या दिवशी पांढऱ्या वस्तु वाटल्या तर घरामध्ये सुख-शांति टिकून राहते.

5) सिंह राशी भविष्य (Wednesday, December 30, 2020)
आपल्या जीवनसाथीचे आरोग्य हे तणावाचे आणि चिंतेचे कारण ठरू शकेल. तुमचे धन कुठे खर्च होत आहे यावर तुम्हाला नजर ठेवण्याची आवश्यकता आहे अथवा येणाऱ्या काळात तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना जाणवू द्या. तुमचा चांगला वेळ त्यांच्याबरोबर व्यतीत करा. त्यांना तक्रार करायला वाव ठेऊ नका. आपल्या जीवनसाथीचा मूड फारसा चांगला वाटत नाही, त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक सर्व गोष्टी हाताळा. आपण केलेल्या कामाचे श्रेय दुस-या कोणालाही घेऊ देऊ नका. प्रवासासाठी आजचा दिवस फार काही चांगला नाही. एखादा नातेवाईक, मित्र किंवा शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण करेल.
उपाय :- चांगले आरोग्य प्राप्त करण्यासाठी अन्न आणि चारा काळे-पांढरे ठिपके असलेल्या गायीला द्या.

6) कन्या राशी भविष्य (Wednesday, December 30, 2020)
कामाच्या ताणामुळे थकवा आणि तणाव आज जाणवेल. दिवसाच्या सुरवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते ज्यामुळे संपूर्ण दिवस खराब होऊ शकतो. जुन्या ओळखी आणि संबंधाना उजाळा देण्यासाठी चांगला दिवस. प्रेम प्रकरणात तुमच्याबद्दल गैरसमज होईल. नवीन योजना आणि संयुक्त प्रकल्प सुरू करण्यासाठी चांगला दिवस. तुम्ही स्वतःला वेळ देणे जाणतात आणि आज तुम्हाला बराच रिकामा वेळ मिळण्याची शक्यता आहे. रिकाम्या वेळात आज तुम्ही काही खेळ खेळू शकतात किंवा जिममध्ये जाऊ शकतात. किराणा मालाच्या खरेदीवरून तुम्ही तुमच्या जोडीदारावर चिडाल.
उपाय :- चांगल्या आरोग्यासाठी वाहत्या पाण्यात नारळ अर्पण करा.

7) तुला राशी भविष्य (Wednesday, December 30, 2020)
विश्रांती घ्या आणि कामात व्यग्र असताना मधेमधे थोडा आराम करा. धनची आवश्यकता कधी ही पडू शकते म्हणून, आज जितके शक्य असेल आपल्या पैश्याची बचत करण्याचा विचार करा. ब-याच कालावधीपासून तब्येत बरी नसलेल्या नातेवाईकाला भेटा. तुमच्या रोमॅण्टिक जोडीदाराशी फोनवर बराच काळ न बोलून तुम्ही जोडीदाराला छळाल. व्यवसायात आपल्या स्पर्धकांच्या तोडीस तोड राहण्यासाठी आपल्या विचारांची स्पष्टता उपयोगी पडेल. त्याचबरोबर भूतकाळातील विचारातील गोंधळ नाहीसा होण्यास मदत होईल. आज आपल्या प्रेमी सोबत वेळ घालवू शकाल आणि त्यांच्या समोर आपल्या गोष्टींना व्यक्त करू शकाल. जर तुम्ही कुणालातरी भेटण्याची योजना तुमच्या जोडीदाराच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे बारगळली तरी तुम्ही एकमेकांसोबत चांगला काळ घालवाल.
उपाय :- चांगल्या आरोग्यासाठी खिशामध्ये लाल रंगाचा रुमाल ठेवा.

8) वृश्चिक राशी भविष्य (Wednesday, December 30, 2020)
आजच्या दिवशी तब्येत एकदम उत्तम असेल. जमीन किंवा कुठल्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणे आज तुमच्यासाठी घातक होऊ शकते जितके शक्य असेल तितके या गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्यापासून सावध राहा. तुमची अतिरिक्त ऊर्जा आणि प्रचंड उत्साह तुम्हाला सुयोग्य ठरतील असे निर्णय मिळतील आणि घरगुती तणाव सुकर करील. तुमच्या प्रेम जीवनात नवीन वळण येईल. तुमचा साथी आज तुमच्याशी विवाहाला घेऊन बोलणी करू शकतो. अश्यात कुठला ही निर्णय घेण्याआधी तुम्हाला विचार नक्कीच केला पाहिजे. वरिष्ठांकडून एखाद्या कामाला विरोध होऊ शकतो, पण तुम्ही डोकं शांत ठेवणे गरजेचे आहे. आज तुमची व्यस्त दिनचर्या असून ही स्वतःसाठी वेळ काढण्यात समर्थ असाल आणि या रिकाम्या वेळेत आपल्या कुटुंबातील व्यक्तींसोबत चर्चा आणि गप्पा करू शकतात. एका मिठीचे आरोग्यावर होमाणे चांगले परिणाम तुम्हाला माहीतच असतील. तुमच्या जोडीदार आज तुम्हाला या परिणामांची अनुभूती अनेकदा देणार आहे.
उपाय :- उत्पन्नाच्या प्रवाहामध्ये वाढ करण्यासाठी; देणगी द्या आणि मधाचे दान करा.

9) धनु राशी भविष्य (Wednesday, December 30, 2020)
तुमच्यातील मूल जागे होईल आणि तुम्ही एकदम खेळीमेळीच्या मूडमध्ये जाल. कमिशन-लाभांश- किंवा मानधन याद्वारे फायदे मिळतील. तुम्हाला कुटुंबातील सदस्य आणि मित्रमंडळीसमवेत आज भरपूर वेळ घालवता येईल. खाजगी घडामोडी संपूर्ण नियंत्रणाखाली राहतील. ऑफिस मध्ये आज तुम्हाला स्थितीला समजून व्यवसाय करण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला जिथे बोलण्याची गरज नाही तिथे तुम्ही बोलू नका. जबरदस्ती बोलण्याच्या कारणाने तुम्ही स्वतःला चिंतेत टाकू शकतात. आज तुम्हाला अचानक कुठे यात्रेवर जावे लागू शकते ज्यामुळे घरच्यांसोबत वेळ घालवण्याचा तुमचा प्लॅन खराब होऊ शकतो. तुमचा/तुमची जोडीदार आज तुम्हाला तळहातावरच्या फोडासारखं जपेल.
उपाय :- कुठलीही पूर्वज संपत्ती / स्मारका / उत्तराधिकाराला एका पिवळ्या कपड्यात गुंडाळा आणि वित्तीय स्थितीत सुधार आणण्यासाठी याला एका लॉकरमध्ये ठेवा.

10) मकर राशी भविष्य (Wednesday, December 30, 2020)
तुमच्यात आज उत्तम स्पुर्ती पहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देतील. आजचा दिवस फारसा लाभदायक नाही, त्यामुळे पैशांची स्थिती तपासा आणि आपल्या खर्चांवर मर्यादा घाला. कौटुंबिक आणि महत्त्वाचे कार्यक्रम समारंभ पार पाडण्यासाठी शुभ दिवस. आपल्या जीवनसाथीचा मूड फारसा चांगला वाटत नाही, त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक सर्व गोष्टी हाताळा. तुमच्याकडे खूप काही मिळविण्याची क्षमता आहे – म्हणून मिळणा-या सर्व संधींचे सोने करा. या राशीतील जातकांना आज रिकाम्या वेळेत अत्याधिक पुस्तकांचे अध्ययन केले पाहिजे. असे करण्याने तुमच्या बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.
उपाय :- आर्थिक स्थितीला चांगले बनवण्यासाठी गव्हाचे ११ दाणे सुर्योदयाच्या वेळी खा.

11) कुंभ राशी भविष्य (Wednesday, December 30, 2020)
तुमचे विनयशील वागण्याबद्दल कौतुक होईल. अनेक लोक तुमच्यावर स्तुतिसुमने उधळतील. महत्त्वाच्या व्यक्ती कधीही आर्थिक मदत द्यायला तयार असतील. पोस्टाने आलेले पत्र संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी बातमी घेऊन येईल. आज तुम्हाला तुमच्या मित्राच्या अनुपस्थितीत त्याच्या अस्तित्वाची जाणीव होईल. आपले कौशल्य दाखविण्याची संधी आजच्या दिवशी आपणास मिळेल. विना कुठल्या पूर्व सूचनेने आज तुमचा कुणी नातेवाईक तुमच्या घरी येऊ शकतो ज्यामुळे तुमचा किमती वेळ त्यांची खातिरदारी करण्यात व्यतीत होऊ शकतो. तुम्ही विवाहित झाल्याने नशीबवान ठरला आहात, असे तुम्हाला वाटेल.
उपाय :- प्रेमी/प्रेमिका ला भेटायला जाण्याच्या वेळी खडी साखर व पाणी पिऊन निघा याने प्रेम संबंधांमध्ये वाढ होईल.

12) मीन राशी भविष्य (Wednesday, December 30, 2020)
प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदलायला हवी आणि हीच त्यासाठी योग्य वेळ आहे. आज तुम्हाला आपले धन खर्च करण्याची गरज पडणार नाही कारण, घरातील कुणी मोठे व्यक्ती तुम्हाला धन देऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल. तुमच्या जोडीदाराचे मागचे पाच सोशल मीडिया स्टेटस तपासा. तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. आजच्या दिवशी नवी भागीदारी आशाजनक असेल. घरातून बाहेर जाऊन आज तुम्ही मोकळ्या हवेत फिरणे पसंत कराल. आज तुमचे मन शांत होईल ज्याचा फायदा तुम्हाला पूर्ण दिवस मिळेल. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमची जास्त काळजी घेईल.
उपाय :- चांगल्या आर्थिक जीवनासाठी ॐ गं गणपतये नमः ह्या मंत्राचे 11 वेळा जप करा.

🙏🏼इति सुर्यार्पणमस्तु🙏🏼

Categories
कोल्हापूर हातकणंगले

हातकणंगले तालुक्यातील मुदत संपणाऱ्या २१ ग्रामपंचायतील आज चौथ्या दिवशी २६९ अर्ज दाखल

हातकणंगले / प्रतिनिधी : हातकणंगले तालुक्यातील मुदत संपणाऱ्या २१ ग्रामपंचायतीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी २६९ अर्ज दाखल झाले . काहि इच्छूक उमेद्वारांसह त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यानी शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. प्रशासनानेही कोव्हीड च्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेतली आहे . त्यामुळे इच्छूक उमेद्वारासह काहि मोजक्याच लोकांना प्रशासकीय इमारतीत अर्ज भरण्यास मूभा देण्यात आली आहे . आज अर्ज भरण्याच्या चौथ्या दिवशी सर्वच २१ गावातून प्रतिसाद मिळाला. यामध्ये पाडळी (१२ ) , मनपाडळे ( ११ ), वाठार तर्फ वडगाव ( २४ ) , किणी ( २ ) , तासगांव ( १९ ) , मिण चे (११ ) , लाटवडे ( १o ) , खोची (३ ) वाठार तर्फ उदगांव ( १९ ) ,हालोंडी ( २ ) , बिरदेववाडी ( १० ) , कुंभोज ( १७ ) , दुर्गेवाडी ( ३ ) नेज ( १६ ) , माणगांव ( २ ) , माणगांव वाडी ( ७ ) , तिळवणी ( १५ ) , रुई ( ३१ ), जंगमवाडी ( १२ ) , कबणूर ( ३o ) , चंदुर ( १३ ) असे एकूण २६५ इच्छूक उमेद्वारांनी २६९ अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली .

Categories
सोलापूर

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भगीरथ दादा भालके यांनी घेतली भेट!

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

मंगळवेढा उपससिंचन योजना व इतर उजनीची उर्वरीत कामे तातडीने मार्गी लागावी. या करीता दिनांक – 29/12/2020 रोजी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात जलसंपदा विभाग यांच्या नियामक मंडळाची बैठक घेण्यात आली या बैठकीत पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावी अशी प्रमुख मागणी मा.भगिरथ (दादा )भालके ,चेअरमन ‘श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखाना वेणूनगर यांनी मा. ना .श्री जयंतराव पाटील साहेब ( जलसंपदा मंत्री ) महाराष्ट्र राज्य यांच्याकडे उपरोक्त बैठकीमध्ये केली त्यास अनुसरून, माननीय मंत्री मोहदयानी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील प्रलंबित कामे, किंवा जलसंपदा विभागाची,उजणीची अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी यांना सदर बैठकीमध्ये दिल्या.त्या प्रसंगी जलसंपदा विभागातील सचिव,व मंत्रालयीन उच्यस्तरीय अधिकारी व इतर संबंधित कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे येथील अधिकारी उपस्थित होते

Categories
Uncategorized

बरडशेवाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे भ्रष्ट अधिकारी डॉ मानसपुरे यांची चौकशी करा : कपील राठोड

जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कडे लेखी निवेदनाद्वारे मागणी


हदगाव ता.प्र.विकास राठोड याज कडून) मौजे बरडशेवाळा ता.हदगांव येथील डॉ शंकर मानसपुरे एकाच ठिकाणी गेल्या सात वर्षांपासून कार्यरत असताना त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून कार्यक्षेत्रातील तिस गावातील नागरिकांना शासनाकडून देण्यात येत असलेल्या सुविधा व ईतर आवश्यक साहित्य अफरातफर करून लाखो रुपयांचा गैरव्यवहार केला असल्याने त्यांची चौकशी करण्याची मागणी केंद्रीय मानव अधिकार आयोगाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष कपील बाबाराव राठोड यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कडे तिन आगष्ट रोजी लेखी निवेदनाद्वारे केली होती.
त्या तक्रारीवरून विस आगष्ट रोजी व सहा नोव्हेंबरला डॉ झिने मडम व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.कदम यांच्या कडे चौकशी करण्याचे आदेश दिले होते. अर्जात समोर चौकशी करताना अर्जदाराच्या समोर चौकशी करण्याची मागणी केली होती.पण आपल्या अधिका-यांनी चौकशी करताना थातुरमातुर चौकशी करून डॉ मानसपुरे या भ्रष्ट अधिकाऱ्यांसोबत हातमिळवणी करून पाठीशी घालण्याचे काम केले असल्याने त्यांच्या ठिकाणी दुसरा अधिकारी नेमुन डॉ मानसपुरे व चौकशी करण्यासाठी नेमलेल्या अधिका-यांची चौकशी त्यांच्या वर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केंद्रीय मानव अधिकार आयोगाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते कपील बाबाराव राठोड यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कडे अठरा डिसेंबर रोजी पुन्हा एकदा लेखी निवेदनाद्वारे मागणी केली असुन योग्य चौकशी करून कारवाई न केल्यास आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे कळविले आहे.

Categories
पाथर्डी

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 ठेकेदार व उपअभियंता यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी मनसेचे ठिय्या आंदोलन…

प्रतिनिधी वजीर शेख

पाथर्डी : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ चे सुरू असलेले मेहकरी ते पाथर्डी ( टाकळी फाटा ) काम अतिशय मंद गतीने चालू आहे,या मार्गावर अनेक ठिकाणी रस्ते खोदुन ठेवले असुन डायवर्शन असलेल्या ठिकाणी वाहनधारकांना समजण्यासाठी दिशादर्शक फलक लावले नसुन वाहधारकांच्या सुरक्षेची कुठल्याही प्रकारची काळजी घेण्यात आली नाही,रस्त्यावरील खड्डे चुकवताना व खड्ड्यात अादळुन अातापर्यंत अनेक निष्पाप प्रवासी व वाहधारकांचा बळी गेला,कालही याच महामार्गावर दोन अपघात होऊन चार प्रवाशांचा बळी घेतला गेला,या सर्व मृत्युंस महामार्गाचे ठेकेदार कंपनी मे.ईंगावले कन्स्ट्रक्शन कंपनी व या महामार्गावरील कामाचे देखभालीसाठी नियुक्ती असलेले महामार्ग ऊपअभियंता दि.ना.तारडे यांना जबाबदार ठरवून त्यांचेवर कर्तव्यात कसुर करने व मृत्यूस कारणीभूत होऊन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांचे दालनात सुमारे तासभर ठिय्या अांदोलन करण्यात आले,
यावेळी बोलताना संतोष जिरेसाळ यांनी सांगितले की या महामार्गाचे सदोष कामावर वाहनधारकांना किमान सुविधा देण्याबाबत ठेकेदार कंपनीने दुर्लक्ष केले आहे,मा.तहसिलदार यांचे दालनात दि. २१ /१२/२० रोजी झालेल्या मिटींग मध्ये ऊपअभियंता दि.ना.तारडे यांनी तातडीने या महामार्गाचे कामात सुधारणा करण्याचे अाश्वासन देऊनही त्यांनी अाश्वासन पाळले नाही.महामार्ग प्रशासन व ठेकेदार यांच्या भ्रष्टाचारी व निर्लज्ज कारभारामुळे या राष्ट्रीय “महामृत्युमार्गाने” अाजपर्यंत सुमारे ३४५ निरापराध बळी घेतले अाहेत,या सर्व बळींचा अाक्रोश ताजा असतानाच काल सकाळी देवराई जवळ खड्डे चुकवताना ट्रॅव्हल्स बस व कार यांचा अपघात होऊन चार प्रवाशांचा करुण अंत झाला आहे.
पाथर्डी शहर,देवराई गाव,व माळी बाभळगाव सह अनेक ठिकाणी तीन महिन्यांपासून रस्ता खोदुन ठेवला असुन या ठिकाणी अतिशय धिम्या गतीने सुरू असलेल्या व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दिशादर्शक व डायव्हर्शन फलक लावणे संदर्भात कुठल्याही प्रकारची काळजी घेतली गेलेली नाही,अनेक ठिकाणी रस्त्यावर दहा ते बारा फुट रुंद व दोन फुट खोल खड्डे पडुन यात अादळुन अनेक प्रवाशांना मनक्याचे विकार जडले अाहेत,अनेक वाहनांची मोडतोड झाल्यामुळे या महामार्गाचे नामकरण “महामृत्युमार्ग” असे केले जात आहे.
अाजपर्यंत झाले ते झाले अाता मात्र ठेकेदार व ऊपअभियंता यांच्या चुकीमुळे किती सर्व सामान्य नागरिकांनी जीवन संपवायचे अाहे ? असा सवाल करुन या अपघातास संपुर्ण पणे ठेकेदार कंपनी मे.ईंगवले कन्स्ट्रक्शन कंपनी व ऊपअभियंता दि.ना.तारडे यांना जबाबदार धरून त्यांचेवर कर्तव्यात कसुर करने व सदर अपघातात बळी पडलेल्या चार जीवांच्या मृत्युस कारणीभूत ठरवुन त्यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी अांदोलकांच्या वतीने यावेळी करण्यात आली.
सामाजिक कार्यकर्ते कौतुक चिंतामणी यांनीही त्यांचे बंधू भुषण चिंतामणी यांच्या करंजी जवळील अपघाती मृत्यूस सर्वस्वी महामार्ग प्रशासनच जबाबदार आहे असे निदर्शनास आणून दिले.
अांदोलकांनी अाक्रमक पवित्रा घेतल्याने मा.तहसीलदार श्याम वाडकर यांनी पोलीस निरीक्षक यांना या संदर्भात चौकशी करुन अपघातास कारणीभूत असल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे अाश्वासन दिल्यानंतर ठिय्या अांदोलन थांबवण्यात अाले. पोलीस निरीक्षक श्री रणजित डेरे यांनाही या संदर्भात स्वतंत्रपणे निवेदन देण्यात आले.
यावेळी मनसेचे तालुकाऊपाध्यक्ष एकनाथ सानप,विभाग अध्यक्ष बाबा सांगळे,शहर सचिव संदिप काकडे,शहर उपाध्यक्ष राजु गिरी,संजय चौनापुरे,सामाजिक कार्यकर्ते कौतुक चिंतामणी अादींनी अांदोलनात सक्रिय सहभाग घेतला.

Categories
चंद्रपूर शिरसगाव

मा . नानाभाऊ पटोले युवा मंच च्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी सूर्या अडबाले यांची निवड


चंद्रपूर ( हिंदू सम्राट शिरसगाव बोडखा विशेष प्रतिनिधी आदेश उबाळे यांच्याकडून )
नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सूर्या अडबाले यांची निवड माननीय नानाभाऊ पटोले युवा मंच महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली .
ही निवड त्यांचे सामाजिक कार्य पाहून माननीय नानाभाऊ पटोले युवामंच च्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली .
लोकनेते माननीय नानाभाऊ पटोले साहेबांच्या विचाराला अभिप्रेत असणाऱ्या सामाजिक मुद्द्याला अनुसरून समाजातील गोरगरीब वंचित विद्यार्थी शेतकरी व गरजू लोकांच्या समस्या व त्यांचे प्रश्न मार्गी लावून त्यांना न्याय मिळवून द्याल याची मला खात्री आहे भारताचे संविधान सार्वभौमत्व धर्मनिरपेक्षता हे माननीय नानाभाऊ पटोले युवामंच विचार सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचण्यास आपण कटिबद्ध राहाल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे असे नियुक्ती पत्रात नमूद केलेले आहे

Categories
इंदापूर

पर्यावरण संवर्धनासाठी 5000 वृक्ष लागवडीचा संकल्प- अंकिता हर्षवर्धन पाटील

इम्तिहाज मुलाणी :
इंदापूर (प्रतिनिधी):- इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हस्ते महाविद्यालयात बेलाचे रोप लावून वृक्षारोपण करण्यात आले. अंकिता पाटील यांच्या हस्ते विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना 105 बेलांच्या रोपांचे वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, संस्थेच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव मुकुंद शहा, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे, यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांमध्ये महाविद्यालयात मान्यवरांचा वाढदिवस महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण करून साजरा केला जातो तसेच या रोपांचे संवर्धन करण्याची देखील जबाबदारी महाविद्यालय घेते. अंकिता पाटील म्हणाल्या की,' वाढदिवस हे औचित्य असून सामाजिक बांधिलकी लक्षात घेता पर्यावरणीय जनजागृतीसाठी इंदापूर तालुक्यामध्ये 5000 वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून यामध्ये युवक युवतींचा सहभागाबरोबरच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केल्याने आनंद झाला आहे. कोरोना पार्श्वभूमी असल्याने आपण नागरिकांना सामाजिक बांधिलकीसाठी पर्यावरणीय संवर्धनाच्या उपक्रमासाठी आवाहन केले होते. नागरिकांनी या उपक्रमास मोठा प्रतिसाद दिला आहे.

अंकिता पाटील यांचे कार्य तसेच सामाजिक बांधिलकीतून त्यांनी राबवित असलेल्या विविध उपक्रमाची माहिती प्रास्ताविकात क्रीडासंचालक डॉ. भरत भुजबळ यांनी दिली.
यावेळी विज्ञान विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर, ग्रंथपाल प्रा. मनीषा गायकवाड, प्रा. कल्पना भोसले उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रोहिदास भांगे यांनी केले. आभार प्रा. सुनील सावंत यांनी मानले.

Categories
नांदेड

नांदेड ते भीमा कोरेगाव मोटार सायकल रॅलीतील 12 जणांना घेतले ताब्यात

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि.29.रोजी भिमा कोरेगाव येथील विजय स्थंभास अभिवादन करण्यासाठी ड्रा.बाबा साहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पासून सुरुवात करण्यात आली होती. ही रॅली 1जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजय स्थभास अभिवादन करणार होते पण सध्या राज्यात चालू असलेल्या कोविड-19चे कारण सांगून तेथील प्रशासनाने आज पासून येणाऱ्या तीन दिवस जमावबंदीचे आदेश काडून या इतिहासिक ठिकाणी येणाऱ्याना प्रतिबधीत केले असल्यामुळे या रॅलीचे आयोजन करणाऱ्या 12 कार्यकर्त्यांना वजिराबाद पोलिसांचे पोलीस निरीक्षक शिवले यांनी तांब्यात घेऊन स्थानबद्ध केली आहे.

पहिले कर्त्यव्य मगचं घरच्यांचा विचार

खरे तर ज्याविजयी स्थंभास ही मंडळी अभिवादन करण्यासाठी जाणार होती.त्या शूरवीरांचे वजिराबाद पोलीस निरीक्षकहे त्यांचे वंशज आहेत.

Categories
कला व मनोरंजन मुंबई

हिंदी चित्रपटातील सुरेल मधुर भक्ती गीतांची ” भक्तीरंग ” संगीत मैफल संपन्न

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी: लक्ष्मण राजे)

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात बरेच दिवस घरात बसलेल्या संगीतप्रेमी रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी आता सर्व थिएटर बंद असल्याने डिजिटल प्लॅटफॉर्म वरुन सुरेल गाण्यांची संगीत मैफल आयोजित करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे.या आॅनलाईन संगीत मैफलींना रसिक प्रेक्षकांनी पसंती दिली. त्याच अनुषंगाने निर्माता दिग्दर्शक. गायक अमित राजे प्रेझेंटस् ” भक्तीरंग ” या लोकप्रिय सुरेल हिंदी चित्रपटातील भक्तीगीतांच्या मनोरंजक कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली होती. निर्माता अमित राजे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सुमधुर, सुरेल , अविस्मरणीय लोकप्रिय भक्ती गीतांची ” भक्तीरंग ” ही सुरेल संगीत मैफल डिजिटल प्लॅटफॉर्म वरुन आॅनलाईन सादर करण्यात आली.निर्माता अमित राजे यांनी सादर केलेल्या अविस्मरणीय सुमधुर लोकप्रिय गाजलेल्या गाण्यांच्या ” भक्तीरंग ” या आॅनलाईन कार्यक्रमात कुसुम आणि अमित राजे या गायकांनी गाजलेली मधुर भक्तीगीते सादर केली.या सुरेल संगीत मैफिलीचे सुत्रसंचलन , निवेदन रत्ना हिले यांनी केले. या यशस्वी आॅनलाईन कार्यक्रमाला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. विशेषतः भारतासह कॅनडा , मास्को , यूएसए , यूएई , यूके अशा जगभरातील हिंदी चित्रपट गीतांच्या चाहत्यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. तसेच असंख्य रसिकांनी इव्हेंट आॅर्गनाईझर अमित राजे यांच्या यू ट्यूब चॅनल वरून अनेकदा आनंद घेतला . या अविस्मरणीय कार्यक्रमाच्या अभूतपूर्व यशानंतर अमित राजे यांनी डिजिटल प्लॅटफॉर्म वरुन विविध संकल्पना घेऊन सुरेल हिंदी गाण्यांच्या मैफलीचे आयोजन करून रसिकांना घरबसल्या आनंददायी सुरेल , मधुर हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहीन असे मनोगत व्यक्त केले .

Categories
लोहा

अखेर लोह्यातील छ्त्रपती शिवाजी महाराज चौक लख्ख प्रकाशाने उजळला!

लोहा, प्रतिनिधी ( शिवराज पवार)
दि.28,लोहा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे खूप दिवसापासून बंद पडलेल्या हायमॅक्सचे काम नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी, उपनगराध्यक्ष तथा भाजपा लोहा तालुकाध्यक्ष शरद पा.पवार,नगरसेवक दत्ता वाले,जिवन चव्हाण वार्डातील अन्य सदस्यांच्या पुढाकाराने आज दि.28.12.2020 रोजी सायंकाळी साडे सात वाजता लोहा न.प.चे माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार,माजी उपनगराध्यक्ष केशवराव चव्हाण,नगरसेवक दत्ता वाले, दिनेश तेललवार, हरिभाऊ चव्हाण, प्रदिप निलावार आदींच्या उपस्थितीत अखेर काम पूर्ण झाले.
लोहा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक स्थित हायमॅक्स लाईट अनेक दिवसांपासून बंद पडला होता.त्यामुळे लोहा शहरातील मुख्य चौकात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले होते.त्यातच पुर्णवेळ मुख्याधिकारी गंगाधर पेंटे नियुक्ती झाल्यावर त्यांनी लोहा वासियांना सर्वांच्या सहकार्याने आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली.लोह्यातील मुख्य चौकातचअंधाराचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे लोहा शहरातील मुख्य ठिकाणी रात्रीच्या वेळी महिला,वृद्ध,प्रवासी वर्ग,घावूक किरकोळ व्यापारी,छोटे मोठे व्यावसायिक यांच्यात अंधाराच्या साम्राज्यामुळे भीतीचे वातावरण पसरले होते.अनेकांच्या पुढाकारानेआज अखेर लोहा शहरातील छ्त्रपती शिवाजी महाराज चौकस्थित बंद पडलेले हायमॅक्स पुन्हा पुर्ववत चालू करण्यात आले.अंधाराचे साम्राज्य नाहीसे होवुन छ्त्रपती शिवाजी महाराज चौक पुन्हा लख्ख प्रकाशाने उजळून निघाला.
यावेळी लोहा न.प.चे माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार,माजी उपनगराध्यक्ष केशवराव चव्हाण,नगरसेवक दत्ता वाले, हरिभाऊ चव्हाण,दिनेश तेललवार, प्रदिप निलावार आदींसह बहुसंख्य उपस्थिती होती.

Categories
कोपरगाव

शहर आपले आहे याचे भान ठेवा- नगराध्यक्ष विजय वहाडणे


कोपरगाव बिपिन गायकवाड हिंदू सम्राट तालुका प्रतिनिधी

कोपरगाव शहरातील अनेक प्रभागांमधील सार्वजनिक शौचालय स्वच्छतागृह (मुताऱ्या) यांची तोडफोड केल्याचे आढळून आले आहे काही शौचालया चे दरवाजे, शौचालयाचे भांडे, पाण्याचे नळ इलेक्ट्रिकचे ट्यूबलाईट याचे नुकसान काही अज्ञात व्यक्ती करत असून वारंवार नगरपरिषदेने दुरुस्ती करूनही वारंवार असे प्रकार घडत आहे तसेच शौचालयात दारूच्या बाटल्या विटकरीचे तुकडे गुटख्याच्या पुड्या टाकल्याने गटारी तुबंतात तर डुकरे पाळणारे जाणीवपूर्वक ड्रेनेज फोडतात स्वच्छतेसाठी आरोग्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी सातत्याने प्रयत्न करत असतात तरीही असे गैरप्रकार घडत आहेत नागरिकांसाठी सुख सुविधा उपलब्ध करूनही असे कृत्य करणे योग्य नाही अनेक प्रभागात स्त्री व पुरुष यांच्या सोयीसाठी स्वच्छतागृहे उभारायची आहेत पण त्यासाठी जागा मिळत नाही स्वच्छता गृह हवे पण आमच्या घराजवळ घराच्या समोर किंवा शेजारी नको असे अनेकांच्या तक्रार पण आहे स्वच्छतागृह बनवता येत नाही हेही सर्वांनी लक्षात घ्यावे हे शहर आपले आहे संपूर्ण शहराचे आरोग्य सुरक्षित ठेवायचे असेल तर सर्वांनी जबाबदारीने सहकार्य करणे आवश्यक आहे घंटागाड्या असूनही कचरा कुठेही फेकणारे व शहराचे आरोग्य धोक्यात आणत आहेत तरी नागरिकांनी ओला कचरा व सुका कचरा वेगळा करूनच घंटागाड्या मध्ये टाकावा असे आवाहन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शहरवासीयांना केले आहे.

Categories
कागल कोल्हापूर

श्रीराम साळुंखे यांची अभिनंदनीय निवड


कोल्हापूर- सुभाष भोसले
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर “आजीव सेवक “पदी श्रीराम शरदचंद्र साळुंखे यांची अभिनंदनीय निवड राजश्री छत्रपती शाहू महाराज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज जुना बुधवार पेठ ,कोल्हापूर विद्यालयाचे सहशिक्षक श्रीराम शरदचंद्र साळुंखे यांची श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या “आजीव सेवक” पदी विश्वसनीय निवड झाल्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एस .जी. खाडे व सर्व गुरुदेव कार्यकर्ते यांनी सत्कार केला श्री. एस. जी. खाडे यांनी त्यानी केलेल्या कामाची दखल संस्थेने घेतली आहे असे मत व्यक्त केले .श्री. ए .बी मोहिते त्यानी शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या कार्याच्या पावलावर पाऊल ठेवून काम करणारा तरुण शिक्षक म्हणजे “श्रीराम “असा उल्लेख केला. श्री एस .के गुरव यांनी आपल्या शिष्याला हे पद मिळाल्याबद्दल स्वतःला ते भाग्यवान समजतात . संस्थेच्या पुढील कार्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. श्री. सावंत बी.जे .यांनी त्यांच्या कार्याबद्दल कौतुक केले. सत्कारास उत्तर देताना श्रीराम शरदचंद्र साळुंखे यांनी संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे संस्थेच्या सचिवा सौ शुभांगीताई गावडे त्यांचे ऋण व्यक्त केले. शिक्षण महर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या ध्येय धोरणानुसार मी काम करेन साळूंखे परिवाराचे नाव उज्ज्वल करेन अशी ग्वाही दिली. श्री स्वामी विवेकानंद संस्थेचे कार्य देशभर पसरवण्यासाठी प्रयत्न करीन असे सांगितले. कार्यक्रमाचे आभार श्री एस. टी .पाटील यांनी मानले सूत्रसंचालन सौ वाडीकर एस.डी यांनी केले कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Categories
मुंबई

ज्येष्ठ पत्रकार शरद बनसोडे यांचीभारतीय जनता पार्टी कामगार आघाडीच्या उत्तर पश्चिम जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी: लक्ष्मण राजे )

भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीच्या उत्तर पश्चिम जिल्हा उपाध्यक्ष पदी जोगेश्वरी येथील ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. ‌शरद नामदेव बनसोडे यांची निवड करण्यात आली. भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष श्री.भुपेंद्र शिरोडकर यांनी ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते श्री.शरद नामदेव बनसोडे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीच्या उत्तर पश्चिम जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली.राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी , कार्यकर्त्यांनी श्री.शरद नामदेव बनसोडे यांना अभिनंदनीय शुभेच्छा दिल्या.तसेच पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Categories
मुंबई

भारताचे संविधान उद्देशिका वाचन स्पर्धेचा निकाल जाहीर

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी:लक्ष्मण राजे )

मुंबई : राज्यस्तरीय “आम्ही तंत्रस्नेही शिक्षकमंच” समूहाच्या प्रमुख व मुख्य प्रशासिका वृषाली सुरेश खाड्ये (मुंबई) यांनी संविधान दिनाचे औचित्य साधून “भारताचे संविधान उद्देशिका वाचन स्पर्धा” आयोजित केली होती. महाराष्ट्रातील सर्व भाषिक माध्यमांतील इयत्ता ५ वी ते १० वी विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पाठ्यपुस्तकातील संविधान उद्देशिका वाचन करतानाचा व्हिडिओ गुगल फाॅर्मद्वारे स्पर्धक विद्यार्थ्यांनी आयोजकांना पाठविले. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती या माध्यमांतील बहुसंख्य विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. व्हिडिओंच्या परीक्षणानंतर “साहित्यमंच” या यू ट्यूब चॅनेलवर व्हिडिओ अपलोड करण्यात आले.

शुक्रवार दि.२५/१२/२०२० रोजी व्ह्यूज व लाईक्स यावरून निकाल घोषित करून रोख रक्कम व ई-प्रमाणपत्र देऊन विजेत्या स्पर्धकांना गौरवण्यात आले. या स्पर्धेचे “सकाळ माध्यम प्रायोजक” होते.

ऑनलाईन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश चर्‍हाटे (सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका-शिक्षण विभाग) हे होते. प्रमुख अतिथी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका-शिक्षण विभागातील वीणा सोनावणे (प्रशासकीय अधिकारी शाळा), संगीता डोईफोडे (विभाग निरीक्षिका), मीरा सुरेश डहाळे (मुख्याध्यापिका), मंदा नारायण लोहारे (मुख्याध्यापिका) तसेच मिलिंद काशिनाथ पगारे (निवृत्त मेकॅनिकल मेंटेनन्स इंजिनिअर, रिलायन्स इंडस्ट्रीज लि. जामनगर, गुजरात) यांच्या उपस्थितीत कार्यक्रम मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

प्रकाश चर्‍हाटे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात संविधान दिनानिमित्त आयोजित केलेल्या भारताचे संविधान उद्देशिका वाचन स्पर्धेत विजयी व सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करून ‘आम्ही तंत्रस्नेही शिक्षकमंच’ या समूहाशी विविध उपक्रमांच्या माध्यमांतून मी जोडलो गेलो असल्याचे सांगितले. तसेच लाॅकडाऊनचा काळात ‘आम्ही तंत्रस्नेही शिक्षकमंच’ समूहाने शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम व सुप्त कलागुणांना वाव देणार्‍या अभिनव स्पर्धा, याबरोबरच तंत्रज्ञान कार्यशाळा, विषयनिहाय बुद्धीवर्धक सामान्यज्ञान चाचण्यांचे आयोजन, समूहाचे उल्लेखनीय कार्य नियोजन व शिस्तबद्धता इ. बाबींचा उल्लेख करून समूहाचे हे कार्य वाखाणण्याजोगे आहे असे गौरवोद्गार काढले. आम्ही तंत्रस्नेही शिक्षकमंच (महाराष्ट्र राज्य) या समूहामार्फत नेहमीच विविध उपक्रम राबवले जातात याचे कौतुक करून संविधान दिनानिमित्त इ. ५ वी ते १० सर्व भाषिक विद्यार्थ्यांसाठी भारताचे संविधान उद्देशिका वाचन स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांना एक नविन दालन उघडून दिल्याबद्दल वीणा सोनावणे यांनी संयोजकांचे अभिनंदन केले. संविधान उद्देशिका वाचन असल्याने अनेक विद्यार्थी या स्पर्धेत अत्यंत उत्साहाने सहभागी झाले. समूहाने त्या सर्व स्पर्धकांचे व्हिडिओ यू ट्यूबवर अपलोड करून स्पर्धकांना एक प्रकारे प्रोत्साहन दिले आहे असे मत संगीता डोईफोडे यांनी मांडले. मीरा सुरेश डहाळे यांनी अनेक स्पर्धक समूहाच्या पुढील उपक्रमाची आतुरतेने वाट पाहत असतात हे जाणवले असल्याचे मत मांडले. आम्ही तंत्रस्नेही शिक्षक समूहाची उत्तरोत्तर प्रगती व्हावी यासाठी व समूहाच्या पुढील उपक्रमास मंदा लोहारे यांनी शुभेच्छा दिल्या. मिलिंद काशिनाथ पगारे यांनी प्लास्टीक प्रदूषण, कचरा व्यवस्थापन इ. सामाजिक बाबीवर प्रबोधन करत असतांना या समूहाशी जोडलो गेल्याची भावना आपल्या मनोगतात व्यक्त केली.

अंजू यशवंत पालवे (ए.बी.गोरेगावकर इंग्लिश हायस्कूल, गोरेगाव, मुंबई), विराजित उत्तम कुंदे (सरस्वती सेकंडरी स्कूल, ठाणे),आश्लेशा सुनील पूर्वा पाटील (ए.बी.गोरेगावकर इंग्लिश हायस्कूल, गोरेगाव, मुंबई) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविले. समृद्धी विजय चव्हाण, ऋतुजा रवींद्र फर्डे, शिवानी समीर पटवर्धन, प्रांजल निलेश गायकवाड, देवयानी राजेंद्र चव्हाण, श्रुती सुरेश बधे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला.

प्रकाश चर्‍हाटे यांच्या सौजन्याने बक्षीसाची रक्कम देय झाली असून विजयी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. संदीप सोनार (जळगाव) यांनी तयार केलेल्या आकर्षक ई-प्रमाणपत्राने सर्व विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले.

ऑनलाईन कार्यक्रमात ऋतुजा रवींद्र फर्डे (स्वातंत्र्यसैनिक किसन बाबा विद्या मंदिर, धसई, शहापूर), समृद्धी विजय चव्हाण (श.जा.ति.म.जी. परिषद हायस्कूल व ज्यू. कॉलेज, गोरेगाव, गोंदिया) सिद्धांत मनोज साळगाकर (सरस्वती सेकंडरी हायस्कूल, ठाणे) दर्पण अशोक भिरमोडे, (पराग विद्यालय, भांडूप) वेदिका प्रशांत वर्मा (आर. एस. टी. माध्यमिक विद्यालय, भांडूप) आयेशा रणजित घुगरवाल (धनाजी नाना विद्यालय, डोंबिवली) मिताली काणेकर (पराग विद्यालय, भांडूप) अनुजा यशवंत पाल्ये (ए.बी.गोरेगावकर इंग्लिश हायस्कूल, गोरेगाव, मुंबई), सिद्धी रविंद्र निचिते (स्वातंत्र्यसैनिक किसन बाबा विद्या मंदिर, धसई, शहापूर) अथर्व विजय गवस (पराग विद्यालय,भांडूप) यांनी मनोगत व्यक्त केले.

वृषाली खाड्ये यांनी अध्यक्ष व प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. उपस्थितांचे स्वागत स्वरूप सावंत (मुंबई), गजानन पुंडे (बुलढाणा), सुनिता अनभुले (मुंबई), सुनील द्रविड (कोल्हापूर), प्रास्ताविक दिलीप यशवंत जाने (जळगाव), आभारप्रदर्शन अंजली ठाकुर (यवतमाळ), सूत्रसंचालन साईली राणे (मुंबई) यांनी केले.

स्पर्धा यशस्वी होण्यासाठी नरेंद्र कांबळे (परभणी), राजेश चायंदे (अमरावती), सुनीलकुमार बडगुजर (जळगाव), वर्षा चोपदार (मुंबई), राहुल मुंढे (ठाणे) यांचेही सहकार्य लाभले.

Categories
मुंबई

‘श्रीगणेश दिनदर्शिका २०२१’चे प्रभाग ९६ मध्ये जनसेवक गणेश भगत यांच्याकडून घरोघरी वितरण


नवी मुंबई : प्रभाग क्रमांक ९६ मधील रहीवाशांकरिता उपयुक्त ठरेल अशा ‘श्रीगणेश दिनदर्शिका २०२१’ दिनदर्शिकेचे प्रकाशन लोकनेते, नवी मुंबईचे शिल्पकार, ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यानंतर जनसेवक गणेश भगत यांनी प्रभाग ९६ मधील नेरूळ सेक्टर १६,१६ अ, १८ परिसरात घरोघरी जावून रहीवाशांना ‘श्रीगणेश दिनदर्शिका २०२१’ दिनदर्शिकेचे वितरण करण्यास सुरूवात केली आहे. रहीवाशांसाठी ५००० दिनदर्शका वितरीत करण्यात येणार असल्याचे गणेश भगत यांनी सांगितले.
रविवारी, दि. २७ डिसेंबरपासून सकाळी प्रभाग ९६ मध्ये जनसेवक गणेश भगत यांनी घरोघरी जावून ‘श्रीगणेश दिनदर्शिका २०२१’ दिनदर्शिका वाटपास सुरूवात केली आहे. यावेळी गणेश भगत यांच्यासमवेत शिवाजीराव पिंगळे, अनंत कदम, चंद्रकांत महाजन, गोरशनाथ गांडाळ, रमेश नार्वेकर, शांताराम कुऱ्हाडे, अकुंश माने, हरिश्चंद्र पातारे, सुरेश बोराटे, सुरेश ठाकूर, संतोष शिंदे,अशोक गाडांळ,विजय पाथारे, दादाभाऊ लोंढे, सागर मोहिते, विमल गाडांळ, रश्मी, सावंत, रंजनी धनावडे, विकास तिकोणे, रविंद्र भगत आदी उपस्थित होते. यावेळी गणेश भगत यांनी घरोघरी जावून दिनदर्शिकेचे वितरण करताना अवघ्या काही तासावर येवून ठेपलेल्या नववर्षाच्या शुभेच्छा रहीवाशांना दिल्या.
प्रभाग ९६ चा नवी मुंबई शहरामध्ये पालिकेने आयोजित केलेल्या स्वच्छता अभियानामध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल रहीवाशी गणेश भगत यांचे व गणेश भगत हे रहीवाशांचे अभिनंदन करताना दिनदर्शिका वितरण करताना पहावयास मिळाले. ‘श्रीगणेश दिनदर्शिका २०२१’ दिनदर्शिका वितरीत करताना गणेश भगत यांनी प्रभागातील जनतेसाठी केलेल्या कामांचीही माहिती रहीवाशांना देण्यात आली आहे. प्रभाग ९६ मध्ये गेल्या १५ ते १६ वर्षात जिथे डांबरीकरण झाले नव्हते, त्या ठिकाणी सौ.रूपाली किस्मत भगत यांनी डांबरीकरण करवून घेतले.कोरोना काळात प्रभागात मुषक नियत्रंण कार्यक्रम, सोसायटी आवारात ब्लिचिंग पावडरची फवारणी, सोसायटीतील मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई, विभागात प्रथमच रस्त्यारस्त्यावर, चौकाचौकात सोसायटीच्या नावांचे फलक नगरसेवक निधीतून बसविण्यात आले. घरोघरी जावून रहीवाशांना दिपावली भेट देण्यात आली. आदिवासी बांधवानांही दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. कोरोना काळात रहीवाशांची काळजी घेताना प्रभागात मास स्क्रिनिंग शिबिराचे, अॅण्टीजेन टेस्टचे आयोजन, मोफत रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. कोरोना नियत्रंणात आणताना प्रभागात सॅनिटाईज फवारणी, मोफत धुरफवारणी करताना रहीवाशांच्या आरोग्याची काळजी घेण्यास प्राधान्य दिले. महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करताना नागरी समस्यांचे निवारण करताना नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या. प्रभागातील धोकादायक इमारतींच्या पुर्नवसनासाठी लोकनेते गणेश नाईक, महापालिका प्रशासन व पोलिसांकडेही भगत परिवाराने पाठपुरावा केला. लॉकडाऊनमध्ये परिसरातील रहीवाशांना तसेच अनाथाश्रमामध्ये सातत्याने केलेले धान्य वाटप केले. रहीवाशांना सुविधांचा लाभ मिळावा रहीवाशांना ज्येष्ठ नागरिक कार्ड, मोफत जनआरोग्य कार्ड, एम्पॅलायमेंट कार्डचे वाटप केले. लॉकडाऊन काळात नागरिकांना विरंगुळा भेटावा यासाठी ऑनलाईन चित्रकला, गीतगायन, हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन व पारितोषिक वितरण करण्यात आले. कोरोना महामारीच्या काळात मोफत आर्सेनिक अल्बममधील प्रतिकारक गोळ्या, मोफत फूट स्टेप, सॅनिटायझर स्टॅण्ड वाटप, मोफत मास्क वाटप करण्यात आले. कोरोना महामारीच्या काळात गणेश भगत व नगरसेविका सौ.रूपाली किस्मत भगत यांनी केलेल्या कार्याची माहिती दिनदर्शिकेच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

Categories
Uncategorized

अन् त्या माऊलीला घडले साक्षात विठुरायाचे दर्शन.पाटण हिंदू सम्राट प्रतिनिधी उमेश सुतार यांजकडून

विठुरायाच्या मनात असेल तर त्याचे दर्शन घडते, असे म्हणतात. त्याचा प्रत्यय सोमवारी (ता. 28) मोहोळ तालुक्‍यातील एका साठ वर्षीय माऊलीला आला. फेसबुकवर एक महिला “विठाई एसटी’वर रंगवलेल्या विठुरायाचे दर्शन घेत असल्याचा फोटो व्हायरल झाला होता. योगायोगाने त्या येथील रामकृष्ण महाराज वीर यांना पंढरपुरात दिसल्या आणि त्यांनी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल तथा सुनील जोशी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तातडीने त्या माऊलीला मंदिरात बोलावून त्यांचा सत्कार करून विठुरायाचे दर्शन घडवले.

एसटी महामंडळाच्या विठाई एसटी गाड्यांवर विठुरायाचे चित्र रंगवण्यात आलेले आहे.

काही दिवसांपूर्वी मोहोळ तालुक्‍यातील रामहिंगणी गावातील विठूभक्त महिला सईबाई प्रकाश बंडगर या मोहोळ बस स्थानकावर उभ्या होत्या. त्या वेळी विठाई बसवरील विठुरायाचा फोटो पाहून त्यांनी बसजवळ जाऊन विठुरायाच्या चित्रावर डोके टेकवून दर्शन घेतले. बस स्थानकावर उभा असलेल्या एका व्यक्तीने हा प्रसंग त्याच्या मोबाईलमध्ये टिपला आणि फेसबुकवरून फोटो व्हायरल केला होता. या फोटोला सोशल मीडियातून मोठा प्रतिसाद मिळाला होता.

दरम्यान, सोमवारी रामकृष्ण महाराज वीर यांना वासकर फडावरील भक्त असलेल्या बंडगर मावशी पंढरपुरात भेटल्या. वीर महाराज यांनी त्यांच्याकडे आपुलकीने विचारपूस केली. त्यांच्याशी बोलत असताना फेसबुकवर काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेला फोटो त्या माऊलीचा होता याची त्यांना खात्री झाली. ऑनलाइन दर्शनाचे बुकिंग केलेले नसल्यामुळे त्यांना दर्शन मिळू शकणार का, असा प्रश्न वीर महाराज यांना पडला. त्यांनी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांच्याशी त्वरित संपर्क साधला. श्री. जोशी यांनी तत्काळ गाडी पाठवून त्या माऊलीला मंदिरात आणले. रुक्‍मिणीमातेचा प्रसाद म्हणून साडी आणि श्री विठ्ठल- रुक्‍मिणीचा फोटो भेट देऊन सत्कार करून त्या माऊलीला प्रत्यक्ष विठुरायाचे मुखदर्शन घडवले. अनेक महिन्यांपासून विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ मनाशी असताना अचानकपणे साक्षात विठुरायाचे दर्शन घडल्याने त्या माऊलीला आनंदाश्रू आवरले नाहीत. वीर महाराज आणि विठ्ठल जोशी यांना त्यांनी धन्यवाद दिले.

Categories
मिरज सांगली

लढवय्या शिक्षक भारतीच्या पाठीशी ठामपणे राहू -आमदार मानसिंगराव नाईक.

मिरज:- संजय पवार
सदगुरु आश्रमशाळा शिराळा येथील सभागृहात पार पडलेल्या वाळवा-शिराळा तालुका सावित्री फातिमा आदर्श शिक्षिका पुरस्कार वितरणात ते बोलत होते.पुढे बोलताना आमदार मानसिंग नाईक बोलताना म्हणाले की विधिमंडळात शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांचे काम निश्चितच प्रभावी आहे. विविध प्रश्न घेऊन सतत शिक्षणमंत्री व इतर मंत्री यांचेकडे पाठपुरावा करण्याचे काम त्यांचे सतत चालूच असते.सांगली जिल्ह्यात आम्ही सर्वजण शिक्षक भारतीच्या पाठीशी ठामपणे राहू.यावेळी वाळवा पंचायत सभापती शुभांगी पाटील,शिराळा पंचायत समिती सभापती वैशाली माने ,श्री प्रकाश पाटील,जिल्हाध्यक्ष महेश शरणाथे,सरचिटणीस कृष्णा पोळ,कोअर कमिटी अध्यक्ष कादर अत्तार,नेते नंदकुमार पाटील,वाळवा अध्यक्ष श्री चंद्रशेखर क्षीरसागर, शिराळा अध्यक्ष दादासाहेब खोत,सरचिटणीस सुधाकर वसगडे,कार्याध्यक्ष महेश चौगुले,कोषाध्यक्ष बालम मुल्ला सरचिटणीस अमोल जाधव,जिल्हा नेते दीपक कांबळे,अन्सारअली जमादार ,संभाजी खोत,महिला सरचिटणीस सुरेखा औताडे,केंद्रप्रमुख तानाजी माने, नजमा पिरजादे, मुख्याध्यापक सर्जेराव टकले, बाजीराव जाधव,दिगंबर सावंत, उदयकुमार रकटे,महेश टकले, नितांत तांबडे,राजू जाधव, संतोष खोत, दिलीपकुमार मोरे, सुनिल पाटील ,पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर,अधिकारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर पुरस्कार 3 जानेवारी 2020 रोजी जाहीर करण्यात आले होते. परंतु कोरोना महामारीमुळे वितरण सोहळा लांबणीवर पडला होता.यानंतर बोलताना वाळवा सभापती सौ. शुभांगी पाटील यांनी शिक्षक भारतीच्या कामाचे कौतुक करत आपल्या मनोगतामध्ये इयत्ता पाचवी व आठवी ऐवजी इयत्ता चौथी व सातवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा असावी व त्यामुळे शिक्षकानाही निश्चित ध्येय मिळेल अशी आशा व्यक्त केली.
शिराळा तालुक्याच्या पंचायत समिती सभापती सौ.वैशाली माने यांनी आपल्या मनोगतातून सावित्री-फातिमा यांच्या कार्याचा आढावा घेतला व शिक्षक भारतीच्या या उपक्रमाचे कौतुक केले.जिल्हाध्यक्ष महेश शरनाथे यांनी शिक्षक भारतीच्या गेल्या पाच वर्षातील कामाचा आढावा घेतला व सावित्री-फातिमा कॅशलेस आरोग्य योजनेविषयी माहिती दिली. शिक्षक भारती शिक्षक बँक निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचे जाहीर केले. जिल्हा सरचिटणीस कृष्णा पोळ यांनी विषय शिक्षकवेतनश्रेणी विषयी असणारी त्रुटी व त्यावरील उपाय यासंदर्भात आपले मत व्यक्त केले.शिराळा तालुका अध्यक्ष दादासाहेब खोत खोत म्हणाले की महिलांचा सन्मान या पुरस्कारद्वारे होत आहे.वाळवा अध्यक्ष श्री. चंद्रशेखर क्षिरसागर आपल्या मनोगतात म्हणाले की,अन्यायाविरुद्ध आवाज उठणारी ही चळवळ असून तालुक्यात व जिल्ह्यात वादळात दिवा लावण्याचे काम आमदार कपिल पाटील यांच्याप्रेरणेने आम्ही करत आहोत व शिक्षकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतच राहू .सत्कारमूर्ती यांच्यावतीने बोलताना केंद्रप्रमुख सुनंदा पाटील म्हनाल्या की शिक्षक भारतीचे इवलेसे रोपटे कमी काळात कामाच्या जीवावर जिल्ह्यात व राज्यात विविध क्षेत्रात भरारी घेत असून लवकरच त्याचे वटवृक्षात रूपांतर होईल.आम्हा सर्वांना पुरस्कार देऊन प्रेरणा मिळाली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.श्रीरंग गायकवाड ,सौ सुवर्णा बच्चे, अनिता कदम व सौ. सुप्रिया घोरपडे यांनी केले.आभार अमोल जाधव यांनी मानले.

Categories
कोल्हापूर क्रीडा

मा.आमदार ऋतुराज पाटील यांची मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमला भेट

प्रशांत भोसले कोल्हापूर:-
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व दि डिस्ट्रीक्ट हॉकी असोसिएशन यांच्या वतीने क्रीडा कार्यालयामार्फत नाविण्यपुर्ण योजने अंतर्गत दि डीस्ट्रीक्ट हॉकी
असोसिएशन,कोल्हापूर यांना ५.०० लक्ष रू.चे क्रीडा साहित्य देण्यात आले.या साहित्याच्या उद्गाटनासाठी कोल्हापूर दक्षिणचे आमदार मा.श्री.ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.सदर उद्गाटनासाठी जिल्हा क्रिडा अधिकारी मा.श्री.डॉ.चंद्रशेखर साखरे,शासकीय योगा मार्गदर्शक मा.श्री.रवीभुषणकुमठेकर मा.श्री.कुमार
आगळगावकर,मा.श्री.सागरयवलुजे,मा.श्री.दुर्वास(बापूकदम,मा.श्री.विजय सरदार साळुखे,मा.श्री.सुदाम तोरस्कर,मा.श्री.नसीर मुल्ला,मा.श्री.ताहीर शेख,आदि मान्यवर उपस्थित होते.


सदर कार्यक्रमामध्ये खेळाडूंनी मनोगत व्यक्त केले.खेळाडूंनी त्यांच्या मनोगता मधुन हॉकी स्टेडियमला वसतीगृहाची गरज भासत असल्याचे सांगितले व खेळाडूंना क्रीडा साहित्य मिळाल्याबद्दल जिल्हा क्रीडा कार्यालयाचे आभार मानले.मा.आमदार ऋतुराज पाटील यांनी आपल्या भाषणातून वसतीगृहासाठी त्यांच्या
आमदार फंडातून २५.०० लक्ष रूपये जाहीर केले व उर्वरीत रक्कम जिल्हा नियोजन समिती व राज्यशासनाकडून अतिरीक्त तरतुद प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले व खेळाडूंना पुढील स्पर्धेस शुभेच्छा देऊन मेजर ध्यानचंद हॉकी
स्टेडियमची पाहणी केली.


सदर कार्याक्रमासाठी हॉकी या खेळाचे आंतरराष्ट्रीय पंच कु.श्वेता फाटील व कु.रमा पोतनीस तसेच हॉकी प्रशिक्षक श्री.योगेश देशपांडे,श्री.योगेश माने,श्री.ओंकार
भांडवले व प्रशिक्षण केंद्रा वरील खेळाडू आदि उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आभार श्री.सागर जाधव यांनी मानले.

Categories
Uncategorized

२९ डिसेंबर २०२० दैनिक पंचांग व राशी भविष्य घ्या जाणून ज्योतिषाचार्य, विशारद, पंडित, ज्योतिष वास्तू भूषण उमेश सुतार यांच्याकडून

!! श्री विघ्नहर्त्रेः नमः !!
🗒️ दैनिक पंचांग🗒️
📅 ईंग्रजी दिनांक २९
डिसेंबर २०२०
🔥 अग्निवास ०७|५५ पासून अग्निवास पृथ्वीवर आहे.
🥄 आहुती चंद्र मुखात आहुती.
⏲️ युगाब्द -५१२२
⏱️ संवत -२०७७
🕰️ भारतीय राष्ट्रीय सौर कार्तिक शके १९४२
👑 शालिवाहन शके -१९४२
संवत्सर – शार्वरी
🧭 अयन – उत्तरायण
🌤️ सौर ऋतु शिशिर
ऋतु – हेमंत
🪐 मास – मार्गशीर्ष
🌗 पक्ष – शुक्ल
🌕 तिथी – चतुर्दशी (०७|५५)
☀️ वार – मंगळ (भौम वासरे)
🌟 नक्षत्र – मृग (१७|३२)
💫 योग – शुक्ल (१६|१२)
करण – वणिज (०७|५५)
– विष्टि (२०|३०)
🌝 चंद्र राशी – मिथुन
🌞 सूर्य राशी – धनु
🌟 सूर्य नक्षत्र – पूर्वाषाढा (१)
🪐 गुरू राशी – मकर
🌟 गुरू नक्षत्र – उत्तराषाढा (४)
🌅 सुर्योदय – ०७|१२

🌄 सुर्यास्त – १८|१०

🕉 दिन विशेष
श्री दत्तात्रेय जयंती आग्रहायणी, कुलधर्म, गाणगापूर क्षेत्री श्री दत्त जयंती उत्सव, प्रत्यवरोहण, अन्वाधान, भद्रा ०७|५५ ते २०|३०, यमघंट १७|३२ पासून
🔅 दिशा शूल उत्तर
ताराबळ भरणी, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसु, आश्लेषा, पूर्वाफाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, ज्येष्ठा, पूर्वाषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा, रेवती
चंद्रबळ मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु, मकर
शुभ मुहूर्त अभिजित १२|१९ ते १३|०३
🌑 अशुभ वेळ
राहूकाळ १५|२५ ते १६|४७
शिवलिखीत चौघडीया
🔅 लाभ ११|१९ ते १२|४१
🔅 अमृत १२|४१ ते १४|०३
🔅 शुभ १५|२५ ते १६|४७
🔅 लाभ १९|४७ ते २१|२५
🔅 शुभ २३|०३ ते २४|४१
🔅 अमृत २४|४१ ते २६|१९
🙏 उपासना 🙏
“ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ।”
“ॐ भौं भौमाय नमः ।”
ग्रहपीडा निवारणार्थ दान
मसूर, गुळ, गहू, लाल वस्र सत्पात्री दान करावे. ग्रहांची अनुकुलता प्राप्त होईल.
शुभाशुभ दिन
०७|५५ पासून चांगला दिवस आहे.
मार्गशीर्ष मासातील मुहूर्त
🍫 साखरपुडा मुहूर्त
जानेवारी ३, ६, ७
🐣 डोहाळ जेवण मुहूर्त
डिसेंबर ३१
जानेवारी १
🐥 बारसे
डिसेंबर ३१
जानेवारी १, १०
🪒 जावळ मुहूर्त
डिसेंबर ३१
जानेवारी ६, ७, ८,
🏬 वास्तु मुहूर्त
डिसेंबर ३१
जानेवरी ६, ८, ९
🏠 गृहप्रवेश (लौकिक)
डिसेंबर ३१
जानेवारी १, ६, १०
🎺 विवाह मुहुर्त
जानेवारी ३, ५, ६, ७, ८, ९, १०
🌱 बीज पेरण्यास
जानेवारी ६, ७, ८
🚰 कूपनलिका
डिसेंबर ३०
जानेवारी ३, ५, ६, ७, ८
✂️ कापणी
डिसेंबर ३०, ३१
जानेवारी १, ३, ६, ८,
🏞️ बागकाम
डिसेंबर ३०, ३१
जानेवारी ३, ८, १०,
🚩 सुभाषित
गुणवज्जनसंसर्गात् याति स्वल्पोऽपि गौरवम् ।पुष्पमालानुषङ्गेण सूत्रं शिरसि धार्यते ॥
गुणवान् इन्सान के संपर्क मे रहकर तुच्छ इन्सान भी गौरव प्राप्त करता है जैसे की फूलों के हार मे रहकर धागा भी मस्तक के उपर स्थान प्राप्त करता है ॥

आपला दिवस सुखाचा जावो, मन प्रसन्न राहो.

🙏🏼जय गुरुदेव🙏🏼

🌺दैनिक राशी भविष्य🌺

1) मेष राशी भविष्य (Tuesday, December 29, 2020)
अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. अचानक पैसा आल्याने तुमची प्रलंबित बिले आणि ताबडतोब करावयाचे खर्च भागतील. मित्र आणि कुटुंबातील सदस्य आपणास प्रोत्साहन देतील. प्रेमामध्ये जोरजबरदस्ती टाळा. आज केलेली गुंतवणूक लाभदायक असेल, पण आपल्या भागीदाराकडून काहीसा विरोध होण्याची शक्यता आहे. अत्यंत काळजीपूर्वक वागण्याचा दिवस तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण करू शकेल.
उपाय :- आपल्या प्रियकर / प्रियसी सोबत गरीब आणि तरुण मुलींना चोकोलेट वितरित करून चांगले संबंध ठेवा.

2) वृषभ राशी भविष्य (Tuesday, December 29, 2020)
शारीरिक आजारातून बरे होण्याचे शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्ही खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकाल. तुमच्या जीवनसाथी सोबत मिळून आज तुम्ही भविष्यासाठी काही आर्थिक योजना बनवू शकतात आणि अपेक्षा आहे की, ही योजना यशस्वी होईल. कौटुंबिक जबाबदा-या या तुमच्या डोक्यावर येतील आणि तुमच्या मनावर दडपण येईल. तुमच्या जोडीदाराचे प्रेम हे तुमच्यासाठी भावपूर्ण असेल, हे तुम्हाला आज कळेल. तुम्हाला तुमची कल्पकता, कलात्मकता हरवून गेल्याचे जाणवेल आणि तुम्हाला निर्णय घेणे खूप कमालीचे जड जाईल. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. तुमच्या जोडीदाराचे आंतरिक सौंदर्य आज बाहेर येईल.
उपाय :- कावळ्याला पोळी खाऊ घाला आणि करिअर मध्ये वृद्धीचा अनुभव घ्या.

3) मिथुन राशी भविष्य (Tuesday, December 29, 2020)
दिवस भरत आलेल्या गर्भवती महिलांसाठी विशेष काळजीचा दिवस. आज तुम्ही धन संबंधाने जोडलेल्या समस्यांच्या कारणाने चिंतीत राहू शकतात यासाठी तुम्हाला आपल्या कुठल्या विश्वासपात्रचा सल्ला घेतला पाहिजे. आपल्या भावाला परिस्थिती नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी मदत करा. संघर्षाला विनाकारण हवा देऊ नका, त्याऐवजी खेळीमेळीने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्ना करा. प्रेमाची अनुभूती ही पंचेंद्रियांच्या पलीकडची असते, पण आज तुम्ही सर्वांगाने या परमानंदाची अनुभूती घेणार आहात. तुमच्या योजना बारगळविण्यासाठी कुणीतरी प्रयत्न करतील – म्हणून तुमच्या अवतीभवतीची माणसे काय करत आहेत याकडे बारकाईने लक्ष ठेवा. वेळेपेक्षा अधिक काहीच नाही म्हणून, तुम्ही वेळेचा सदुपयोग करतात परंतु, बऱ्याच वेळा तुम्हाला जीवनाला लवचिक बनवण्याची आवश्यकता ही असते आणि आपल्या घर कुटुंबासोबत वेळ घालवण्याची गरज असते. पाऊस नेहमी रोमँटिकच असतो आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत याच रोमँटिक वातावरणाचा दिवसभर आनंद लुटाल.
उपाय :- आपले आरोग्य सुधारण्यासाठी आपल्या दैनिक पोशाख / ड्रेसिंग मध्ये हिरव्या रंगाचा समावेश करा.

4) कर्क राशी भविष्य (Tuesday, December 29, 2020)
एखादे झाड जसे स्वत: उन्हातान्हात असूनदेखील दुस-यांना शीतल छाया देते, तसे आपले आयुष्य आहे.त्यामुळेच आपल्या एखाद्या मित्राने केलेली विशेष प्रशंसा ही तुमच्यासाठी आनंदाचा स्रोत असेल. आज तुमच्यासमोर सादर झालेल्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करायला हवा. वयोवृद्ध नातेवाईक अवाजवी मागण्या करण्याची शक्यता आहे. तुम्हाला प्रेमातील वेदनेचा अनुभव मिळण्याची शक्यता आहे. या राशीतील व्यावसायिक आज कुणी जवळच्या लोकांच्या सल्ल्यामुळे समस्येत येऊ शकतात. जॉब करणाऱ्या जातकांना आज कार्य-क्षेत्रात विचार करून चालण्याची आवश्यकता आहे. इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च करा, पण आपला काहीही संबंध नसताना इतरांच्या कामात लुडबूड करु नका. एखाद्या गोड आठवणीमुळे तुमच्यातील क्षुल्लक भांडण मिटून जाईल. त्यामुळे कितीही भांडण झालं तरी जुने सुंदर दिवस आठवायला विसरू नका.
उपाय :- आर्थिक परिस्थिती चांगली राहण्यासाठी कपाळावर पांढरे चंदन लावा.

5) सिंह राशी भविष्य (Tuesday, December 29, 2020)
तुम्ही संपूर्ण आराम करायला हवा अन्यथा थकव्यामुळे तुमच्या निराशावादी दृष्टिकोन कार्यरत होऊ शकतो. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा आणि ऑफिस मध्ये सर्वांसोबत चांगल्या प्रकारे व्यवहार करा जर तुम्ही असे केले नाही तर, तुमची नोकरी जाऊ शकते आणि तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. विवाह बंधनात अडकण्यासाठी उत्तम काळ. तुमच्या प्रेमसंबंधावर आज विपरीत परिणाम संभवतो. आज तुमच्या कलात्मक क्षमतेमुळे अनेक लोकांची कौतुकाची थाप मिळेल आणि अनपेक्षित बक्षिसही मिळेल. प्रवासासाठी आजचा दिवस फार काही चांगला नाही. तुमचा/तुमची जोडीदार आज स्वार्थीपणाने वागेल.
उपाय :- आपल्या प्रेमीला पिवळ्या रंगाचे फुल जसे गुलाब, कार्नेशन्स, गुलदाउदी इत्यादी भेट द्या आणि प्रेमाचे आणि स्नेहाचे घनिष्ठ संबंध ठेवा.

6) कन्या राशी भविष्य (Tuesday, December 29, 2020)
तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळेल. आज केवळ बसून राहण्यापेक्षा – काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. तुमचे जोडीदार/भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. प्रेमाचा सकारात्मक चेहरा दिसण्याची शक्यता. महागड्या प्रकल्पावर सही करताना तुमचा सुज्ञपणा वापरा. प्रवासाच्या संधी शोधाल. स्त्रिया शुक्रावरच्या असतात आणि पुरुष मंगळावरचे, पण आजच्या दिवशी शुक्र आणि मंगळ एक होणार आहेत.
उपाय :- मोठ्या भावाचे पाया पडून आशीर्वाद घेतल्याने नोकरी/बिझनेस मध्ये उन्नती देईल.

7) तुला राशी भविष्य (Tuesday, December 29, 2020)
प्रेम, आशा, विश्वास, सद्भावना, आशावादी आणि निष्ठा अशा सकारात्मक भावना स्वीकारण्यासाठी तुमच्या मनाला उद्युक्त करा. एकदा का अशा भावनांनी तुमच्या मनाचा ताबा घेतला की, कोणत्याही परिस्थितीत तुमचे मन आपसूकपणे सकारात्मक विचार करेल. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. शेजा-याशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मूड खराब होईल. परंतु, तुमच्या रागावर नियंत्रण मिळवा कारण त्यामुळे आगीत तेल ओतले जाईल. तुम्ही भांडणात सहकार्य केले नाही तर तुमच्याशी भांडायला कुणी येणार नाही. संबंध चांगले, सौहार्दपूर्ण ठेवण्यासाठी प्रयत्न करा. या लोकांच्या भाऊगर्दीमध्ये तुम्ही नशीबवान आहात हे तुम्हाला कळून चुकेल कारण तुमचा/तुमची जोडीदार उत्तम आहे. भागीदारी संदर्भात कोणताही शब्द देण्यापूर्वी आपल्या अंर्तमनाचा आवाज ऐका. रिकाम्या वेळेचा पूर्ण आनंद घेण्यासाठी तुम्हाला दोघांपासून दूर होऊन आपले आवडते काम केले पाहिजे. असे करण्याने तुमच्यात सकारात्मक बदल येतील. विवाह हे एक वरदान आहे, आणि आज तुम्हाला त्याची प्रचिती येणार आहे.
उपाय :- आपले कौटुंबिक जीवन आनंदित करण्यासाठी भगवान गणेश किंवा भगवान विष्णु मंदिरात कांस्य दिवा दान करा.

8) वृश्चिक राशी भविष्य (Tuesday, December 29, 2020)
तुमची इच्छाशक्ती जबरदस्त असल्याचे फळ तुम्हाला आज मिळेल आणि त्यामुळे एका अतिशय विचित्र, गुंतागुंतीच्या परिस्थितीशी तुम्ही सामना करू शकाल. भावनिक निर्णय घेताना तुम्ही अस्थिर होऊ नका. व्यापाऱ्यांना आज व्यापारात घाटा होऊ शकतो आणि आपल्या व्यवहाराला उत्तम बनवण्यासाठी तुम्हाला पैसा खर्च लागू शकतो. नोतवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. प्रेमातील वेदना आज तुम्हाला झोपू देणार नाहीत. मेहनत आणि सहनशीलता या आधारे तुम्ही उद्दिष्ट गाठू शकाल. वेळ भरभर निघून जाते म्हणून, आज पासूनच आपल्या किमती वेळेचा योग्य वापर करा. तुमचे शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात बिब्बा घालायचा प्रयत्न करतील, पण तुमच्यातील बंध अतुट आहे.
उपाय :- आपल्या आर्थिक परिस्थितीत सतत वाढीसाठी विद्वान, बुद्धिजीवी, ज्ञानी अश्या लोकांना सन्मान द्या आणि त्यांचा आदर करा.

9) धनु राशी भविष्य (Tuesday, December 29, 2020)
आनंदी दिवसासाठी मानसिक ताणतणाव आणि दडपण बाजूला सारा. पारंपरिक पद्धतीची गुंतवणूक कराल तर तुम्हाला त्यातून चांगली धनप्राप्ती होईल. कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा, त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावू देऊ नका. प्रणयराधन करण्याचा योग खूप उत्साहाचा असला तरी खूप काळपर्यंत रंगणार नाही. भागीदारी संदर्भात कोणताही शब्द देण्यापूर्वी आपल्या अंर्तमनाचा आवाज ऐका. आज तुम्ही ऑफिस मधून परत येऊन आपले आवडते काम करू शकतात. यामुळे मनाला शांती मिळेल. तुमच्या मानसिक तणावामुळे आणि कोणतेही कारण नसताना तुम्ही तुमच्या जोडीदाराशी कदाचित वाद घालाल.
उपाय :- प्रेमी/प्रेमिका ला भेटायला जाण्याच्या वेळी खडी साखर व पाणी पिऊन निघा याने प्रेम संबंधांमध्ये वाढ होईल.

10) मकर राशी भविष्य (Tuesday, December 29, 2020)
आपल्या पत्नीच्या कामात ढवळाढवळ करू नका, त्याचा तिला राग येऊ शकतो. स्वत:च्या कामाशी मतलब ठेवा. तिच्या कामात कमीतकमी हस्तक्षेप करा, अन्यथा परावलंबित्व येऊ शकते. आजच्या दिवशी तुम्ही मादक पदार्थांचे सेवन करू नका. नशेमध्ये तुम्ही काही किमती वस्तू हरवू शकतात. मोकळ्या वेळेचा उपयोग करून कुटूंबातील सदस्यांना मदत करा. तुमच्या प्रिय व्यक्तीस भेटलात की तुमच्या मनावर प्रणयराधन करण्याचे विचार घोळतील. आजच्या दिवशी तुमच्या कामात प्रगती झालेली दिसून येईल. तुमच्या आयुष्यात काहीतरी इंटरेस्टींग घडावे याची दीर्घकाळापासून वाट पहात असाल तर आता नक्कीच आपणास थोडाफार रिलिफ मिळणार आहे. तुमच्या नेहमीच्या दिवसापेक्षा आजचा दिवस हा वैवाहिक आयुष्यातील वेगळा दिवस असेल, तुम्हाला आज काहीतरी वेगळा अनुभव मिळणार आहे.
उपाय :- आरोग्याला चांगले बनवण्यासाठी, कुठल्या निर्जन स्थानाजवळ काळे कोहळ (काजळ) दफन करा.

11) कुंभ राशी भविष्य (Tuesday, December 29, 2020)
आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगेल दिसावे यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ मिळेल. नवीन करार लाभदायक वाटण्याची शक्यता आहे, पण तुमच्या अपेक्षेप्रमाणे लाभ होण्याची शक्यता कमी आहे. पैसे गुंतवताना घाईगडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. सायंकाळी मित्रांबरोबर बाहेर जाणे अनेक गोष्टींसाठी चांगले असेल. प्रेम म्हणजे देवाजी पुजा करण्यासाखेच आहे; ते आध्यात्मिक आणि धार्मिकही आहे. तुम्हाला आज हे कळेल. आपल्या करिअर संदर्भात महत्त्वाचा बदल करण्याचा काही काळापासूनचा आपला विचार अंमलात आणावयास हरकत नाही. आज तुम्ही निवांत वेळी काही नवीन काम करण्याचा विचार कराल परंतु, या कामात तुम्ही इतके व्यतीत होऊ शकतात की, तुमचे गरजेचे काम ही सुटून जातील. आज गुलाबांचा रंग अधिक लाल दिसेल आणि व्हायोलेट्ससुद्धा गडद निळे दिसतील, कारण प्रेमाची नशा तुम्हाला भरपूर चढणार आहे.
उपाय :- आपल्या आर्थिक परिस्थितीत निरंतर वाढीसाठी गरज असलेल्या कोणालाही मदत करा आणि आपली वेळ, ऊर्जा आणि इतर भावनिक आणि बौद्धिक संसाधने शेअर करा.

12) मीन राशी भविष्य (Tuesday, December 29, 2020)
दिवसाची सुरवात तुम्ही योग साधनेने करू शकतात. असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर असेल आणि पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील. कुणी ही अनुभव नसलेल्या व्यक्तीच्या सल्ल्याने आज असे कुठले ही काम करू नका ज्यामुळे तुम्हाला आर्थिक हानी होईल. कुटुंबात तुम्ही शांततेचे दूत म्हणून वागाल. प्रत्येकाच्या प्रश्नांकडे नीट लक्ष द्या आणि परिस्थिती नियंत्रणात आणा. त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप वैमनस्य निर्माण करू शकतो. आपण केलेल्या कामाचे श्रेय दुस-या कोणालाही घेऊ देऊ नका. तुमचा प्रेमी तुम्हाला पर्याप्त वेळ देत नाही ही तक्रार ते आज तुम्हाला मोकळेपणाने समोर ठेवतील. तुमच्या व्यस्त दिनचर्येमुळे तुमच्या जोडीदाराला कमी महत्त्व दिल्यासारखे वाटेल, आणि तो/ती याबाबतचा रोष संध्याकाळी बोलून दाखवेल.
उपाय :- आंधळ्या लोकांची मदत आणि सेवा करा आणि आपल्या प्रेम जीवनाला सकारात्मक दृष्टिकोनाने ठेवा.

🙏🏼इति सुर्यार्पणमस्तु🙏🏼

Categories
हिगोली

तलावाचे काम लवकरच मार्गी लावू: आमदार तान्हाजीराव मुटकुळेजलेश्वर

धोंडीराज पाठक हिंदूसम्राट जिल्हा प्रतिनिधी हिंगोली.

हिंदुधर्माचे जागृत देवस्थान असलेले हिंगोली शहरातील जलेश्वर मंदिराच्या परिसरातील सुशोभीकरणाचे काम व जलेश्वर मंदिरात तलावाचे घान पाणि आत येत असल्याने लवकरच वस्ती पुनर्वसन करण्यात येईल ,हिंदूधर्माचे श्रद्धास्थान असलेले जलेश्वर मंदिर आहे,मंदिरात तलावातील घान पाणी आत जाते हि दुर्दैवाची बाब आहे , या संदर्भात लवकरच बैठक घेऊन वस्तीचे पुनर्वसन करण्यात येणार आहे त्या साठी लवकरच जागा उपलब्ध करून देण्यात येईल असे आमदार तान्हाजीराव मुटकुळे यांनी सांगितले.

Categories
नांदेड

31 डिसेंबर व नववर्षासंदर्भात नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि.28.शासन निर्णयान्वये दि. 22 डिसेंबर 2020 ते 5 जानेवारी 2021 या कालावधीत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. कोविड -19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता 31 डिसेंबर 2020 व नूतन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करणे अपेक्षित आहे.त्यादृष्टीने संपूर्ण नांदेड जिल्ह्याच्या हद्दीत 31 डिसेंबर 2020 व नुतन वर्षाचे स्वागत करावयाच्या संदर्भात खालीलप्रमाणे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.

कोरोनाच्या अनुषंगाने दि. 31 डिसेंबर 2020 रोजी दिवसभर संचारबंदी नसली तरी देखील सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व दि. 1 जानेवारी 2021 रोजी नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घराबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरीच साधेपणाने साजरे करावे.

31 डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी नदी किनारी,बागेत, रस्त्यावर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन गर्दी न करता सोशल डिस्टन्सींग (सामाजिक अंतर) राहील तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.नांदेड शहरातील काही ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असते त्यादृष्टीने कोरोनाचा प्रादूर्भाव पाहता नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 60 वर्षावरील नागरिकांनी व दहा वर्षाखालील मुलांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्या दृष्टीने शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. नववर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारे धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करु नये तसेच मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी बहुसंख्य नागरिक धार्मिक स्थळी जात असतात.अशावेळी त्याठिकाणी एकाच वेळी गर्दी न करता सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे. तसेच संबंधितांनी आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनीप्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे.कोविड-19 या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पूनर्वसन, आरोग्य,पर्यावरण,वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका,पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक राहिल. तसेच या परिपत्रकानंतर 31 डिसेंबर 2020 व नूतन वर्ष सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत काही सूचना नव्याने प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी. आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती,संस्था,समुह भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005,मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहिले. परंतू आदेशाची अंमलबजावणी करताना सद्भावनेने केलेल्या कृत्यासाठी कोणत्याही अधिकारी,कर्मचाऱ्यांविरुद्ध कार्यवाही केली जाणार नाही, असे आदेश जिल्हदंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज निर्गमीत केले आहेत.

Categories
गुन्हेगारी नांदेड

भाग्यनगर पोलीसांनी एक चोरटा पकडला; चोरीची दुचाकी आणि सोन्याचे गंठण जप्त केले

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:25.डिसेंबर रोजी सप्तगिरी कॉलनीतील एका महिलेची 15 ग्रॅम सोन्याचे गंठन लुटणाऱ्या चोरट्याला भाग्यनगर पोलीसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून पकडले. त्याच्याकडून 75 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

सप्तगिरी कॉलनीतील रसिका रामराव कांबळे या आपल्या मुलीसह माणिकनगरकडे दुचाकीवर जात असतांना पाटील हॉस्पीटलसमोर एका गाडीवर आलेल्या अनोळखी माणसाने चालत्या मोटार सायकलवरून रसिका कांबळेची 15 ग्रॅम सोन्याचे एक गंठन बळजबरीने चोरून घेवून गेला होता.

27 डिसेंबर रोजी राज कॉर्नर ते चैतन्यनगर जाणाऱ्या रस्त्यावर एक दुचाकी क्रमांक एम.एच.26 बी.डी.1938 चा संशय पोलीसांना आल्याने त्यांचे सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्या दुचाकीच्या फिल्मीस्टाईल पाठलाग करून त्याला पकडले.त्याचे नाव शेख जावेद शेख जमालसाब (38) रा.लेबर कॉलनी नांदेड असे आहे.

या चोरट्याकडून पोलीसांनी 1938 क्रमांकाची 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी गाडी आणि 15 ग्रॅम सोन्याचे गंठन 45 हजार रुपयांचे असा 75 हजारांचा मुद्दमाल जप्त केला आहे. दुचाकी गाडी क्रमांक 1938 शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेली आहे.चोरट्याला पकडणाऱ्या पोलीस पथकाचे पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे,पोलीस उपअधिक्षक सिध्देश्र्वर भोरे यांनी भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक अभिमन्यु साळुंके,सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोद चव्हाण,पोलीस उपनिरिक्षक राजाभाऊ जाधव, पोलीस कर्मचारी संजय कळके, दत्ता वाणी,कमलाकर जायभाये, राजू कांबळे,प्रदीप गर्दनमारे आणि झगडे यांचे कौतुक केले आहे.

Categories
नांदेड

लोहा तालुक्यात तब्बल 6 जण कोरोना बाधित आढळले तर आरोग्य विभाग हादरले

लोहा तालुका प्रतिनिधी:शिवराज पवार

लोहा:आज दि. 28 डिसेंबर सायंकाळी 5 वाजेदरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नीळकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने निघालेल्या प्रेस नोट नुसार लोहा तालुक्यात तब्बल 6 जण कोरोना बाधित आढळल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे.
लोहा तालुक्यातील कोरोनाची साखळी पूर्णपणे खंडित करण्यासाठी नागरिकांसह आरोग्य विभागाने प्रयत्न चालविले होते.जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार व स्थानिक पातळीवर परिस्थितीचा आढावा घेवुन लोहा नगरपालीकेने वेळोवेळी जनता कर्फ्यु घोषित केला.आरोग्य विभाग प्रशासनाने देखील जीवाची पर्वा न करता लोकांची काळजी घेतली.वाखानण्याजोगे कार्य केले.कोरोनाचे बाधीतांचा आकडा दिवसागणिक कमी होत असतांनाच दिवाळी नंतर हळूहळू रुग्ण संख्येत भर पडत एक-एक करून वाढणारी संख्या कधी 2 तर आज दिनांक 28 डिसेंबर 2020 रोजी अँटीजन चाचणीद्वारे तब्बल 6 जण कोरोना बाधित आढळल्याने आरोग्य विभाग हादरलेआहे.आजच्या आकडेवारीने कोरोनाची संख्या वाढत असल्याने नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे,शासन प्रशासनाच्या कोरोना अटी, नियमांचे पालन न केल्यामुळे संभाव्य परिस्थिती निर्माण झाले असल्याचे दिसून येत आहे.सदरिल रिपोर्ट नुसार लोहा तालुक्यासहीत जिल्ह्याचीच आकडेवारी वाढल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.नागरीकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Categories
नांदेड

39 कोरोना बाधितांची भर तर दोघांचा मृत्यू 34 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि. 28 :- सोमवार 28 डिसेंबर 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 39 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 26 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 13 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 34 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आजच्या 909 अहवालापैकी 862 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 21 हजार 319 एवढी झाली असून यातील 20 हजार 263 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 285 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 13 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. रविवार 27 डिसेंबर रोजी तरोडा नाका नांदेड येथील 60 वर्षाच्या एका महिलेचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे तर देगलूर नाका नांदेड येथील 65 वर्षीय पुरुषाचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 572 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 20, माहूर तालुक्यांतर्गत 2, औरंगाबाद 1, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 1, मुखेड कोविड रुग्णालय 3, खाजगी रुग्णालय 5 असे एकूण 34 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.04 टक्के आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 20, माहूर तालुक्यात 1, कंधार 1, नांदेड ग्रामीण 1, लोहा 2, मुखेड 1 असे एकुण 26 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 5, लोहा तालुक्यात 6, मुदखेड 1, कंधार 1 असे एकुण 13 बाधित आढळले.

जिल्ह्यात 285 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 26, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 17, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 19, मुखेड कोविड रुग्णालय 21, देगलूर कोविड रुग्णालय 8, हदगाव कोविड रुग्णालय 5, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 132, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 39, हैद्राबाद येथे संदर्भीत 1, खाजगी रुग्णालय 17 आहेत.

सोमवार 28 डिसेंबर 2020 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 162, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 63 एवढी आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 78 हजार 653
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 52 हजार 831
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 21 हजार 319
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 20 हजार 263
एकुण मृत्यू संख्या-572
उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 95.04 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-4
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-3
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-869
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-285
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-13.

Categories
इचलकरंजी कोल्हापूर हातकणंगले

सहानुभूती नको न्याय हावा..! इचलकरंजी येथे एका दिव्यांग व्यक्ती अपमानास्पद वागणूक..!


वार्ताहर संजय पाटील
आज दिनांक 28 12 2019 रोजी जुनी नगरपालिका इथे दोन चाकी वाहन पार्किंग करून कापड दुकानांमध्ये खरेदीसाठी जात असताना दिव्यांग व्यक्तींनी आपली गाडी पार्किंग केलेल्या गाडीला एका अनोळखी व्यक्तीने लाथ मारुन गाडी पाडले त्यावेळी ती व्यक्ती श्री संजय पाटील भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस व श्री दत्त दिव्यांग निराधार सेवाभावी संस्था टाकवडे चे अध्यक्ष यांना शिवीगाळ करून धमकी दिली अपंग असला तर तुझा दुसरा पाय देखील काढतो गाडी अशी का लावला आहे असे तसे अपमानास्पद वागणूक दिली यावेळी संजय पाटील यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्या व्यक्तीने धमकी देऊन निघून गेले त्यानंतर संजय पटेल यांनी इचलकरंजी ट्रॅफिक ऑफिस यांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला त्या व्यक्तीचे गाडी नंबर mh 09 bj 7916 दे येऊन तक्रार देण्यास सांगितले तेथे जमलेल्या सर्व नागरिकांनी व्यक्ती समजावण्याचा प्रयत्न केला तरीदेखील तो व्यक्ती त्यांना धमकी देऊन निघून गेला यावर असे समजते की त्यांचे पोलीस ट्राफिक यांचे इतर लोकांना भीती राहिली नाही एका अपंग व्यक्तीला अशी अपमानास्पद वागणूक देणे कितपत योग्य आहे सरकार व हायकोर्टाचा आदेश असताना एखादी व्यक्ती इतर लोकांप्रमाणे सामान्य नागरिकाप्रमाणे वागणूक देणे ऐवजी त्यांना अपमानास्पद वागणूक मिळत आहे याकडे प्रशासन कधी लक्ष देणार व त्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई करणार की नाही याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे संजय पाटील म्हणाले अपंग असणे हा गुन्हा आहे का अपंगांच्या सुरक्षेची काळजी कोण घेणार तरी त्या व्यक्तीवर योग्य कारवाई करून अपंगांना न्याय द्यावे

Categories
नांदेड

नांदेड जिल्यात काँग्रेसचा 136 वर्धापन दिवस उत्साहात साजरा

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि.28.जिल्यात काँग्रेस पक्ष कार्यलयात 136 वा वर्धापन दिवस नांदेड जिल्हा काँग्रेस पक्ष्याचे जिल्हाध्यक्ष गोविंद पाटील नागेलीकर यांच्या हस्ते धोजारोहण करून उत्साहात साजरा करण्यात आला आहे. यावेळी महिला काँग्रेसच्या नांदेड जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगरानी अंबुलगेकर,महानगर पालिकेच्या महापौर मोहानीताई येवनकर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य मा. नागोराव केशवे,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मा.बी.आर.कदम,सचीव सुरेंद्र घोडजकर,कोषाध्यक्ष विजय येवनकर, अखिल भारतीय काँग्रेस कमेटी सदस्य (महिला )मंगलाताई निमकर, महिला जिल्हाध्यक्ष कविता कळसकर,मंगला धुळेकर,सुमती व्यहाळकर,एकनाथ मोरे, राम भारती, सेवा दाल जिल्हाध्यक्ष आनंद गुंडले,सतीश देशमुख, रोहिदास जाधव,निलेश पावडे,मासवर्गीय विभागाचे जिल्हाध्यक्ष गंगाधर सोंडारे,उमाकांत पवार, प्रमोद भुरेवार,संतोष देवराय,अनिता इंगोले,शिल्पा नरवाडे,नारायण श्रीरामवार,हरजीत सिंघ संधू, प्रबुद्ध बनसोडे,श्रीनिवास शिंदे, मसूद अहेमद खान,रोहिदास जाधव.बालाजी जाधव,गोविंद तोरणे,शिवराज कांबळे,सुनील अटकोरे,बालाजीराव पांडागळे, जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे.संजय पापटवार,नितीन वारपडे,नगरसेवक प्रतिनिधी सुरेश हटकर व सर्व नगरसेवक नगरसेविका.जिल्यातील काँग्रेस पदाधिकारी यांनी उपस्थितीथ होते.

Categories
इंदापूर

सुफियानखान तु इंदापूर नगरपरिषद निवडणूक लढवली पाहिजे :- सत्यजित तांबे-पाटील

इम्तिहाज मुलाणी :
इंदापूर (प्रतिनिधी):

“सुफियानखान तुला पण नगरपालिका लढवली पाहिजे” येणाऱ्या नगरपालिकेमध्ये विजयी होऊन”आता जसा फेटा बांधला आहे तसाच फेटा बांधून तुझ्या विजयी मिरवणुकीत सत्कारासाठी आम्हाला बोलव; असे वक्तव्य महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी सुफियानखान जमादार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना व्यक्त केले.

इंदापूर तालुका युवक काँग्रेसचे नवनियुक्त इंदापुर शहर उपाध्यक्ष सुफियानखान जमादार यांच्या २१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने इंदापूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आमदार संजय जगताप, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे,इंदापुर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष स्वप्नील सावंत व इतर सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराची सांगता व अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला.

यावेळी बोलताना सत्यजीत तांबे म्हणाले की “इथून पुढच्या सर्व निवडणुकांमध्ये युवकांना प्रचंड प्रमाणात वाव असून सुफियान खान जमादार यांनी सुद्धा इंदापूरची नगरपालिका लढली पाहिजे व आता फेटा बांधून बसलाय तसाच विजयी मिरवणुकीत गुलाल उधळण्यासाठी व फेटा बांधून त्याच्या सत्कारासाठी पुन्हा एकदा यायला आम्हाला आवडेल, व तू निश्चित आम्हाला बोलव अशे वक्तव्य पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांच्या उपस्थित करून सत्यजित तांबे यांनी २१ वर्षाच्या युवकाला थेट नगरपालिका लढवण्याचे जाहीर केल्याने एकच चर्चेचा विषय बनला होता यावेळी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट करत सत्यजीत तांबे यांनी दिलेल्या आदेशाचे व शुभेच्छांचे सुफियान यांनी पालन करावे अशी चर्चा त्याठिकाणी रंगू लागली.

यांसारख्या युवक कार्यकर्त्यांना या ठिकाणी बळ देण्याचे काम या वेळी सत्यजित तांबे यांनी केले आहे.

सुफियानखान जमादार यांच्या २१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात २०१ रक्तदात्यांनी रक्तदान करून सुफियान खान यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत २०१ बॉटल चे रक्त संकलन केले.यावेळी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना एक छोटीशी भेटवस्तू म्हणून सुफियान खान मित्र परिवाराच्या वतीने एक मोबाईल भेट देण्यात आला,

यावेळी बोलताना सुफियान खान जमादार म्हणाला की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पार्टी युवक काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सत्यजित दादा तांबे यांनी मला माझ्यावर जो विश्वास दाखवला मला थेट या पदासाठी लायक समजलं,मलाही त्याक्षणी आश्‍चर्याचा धक्का बसला त्याबद्दल मी दादांचे आभार मानतो,पक्षाचा छोटा कार्यकर्ता म्हणून त्यांच्या आदेशाचे पालन मी निश्चित करेल व येणाऱ्या काळामध्ये इंदापूर शहरात तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत व इतर पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल.

महाराष्ट्रात रक्त साठा कमी असल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे, त्या आदेशाचे पालन करत मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करून त्यानिमित्ताने छोटीशी भेट म्हणून रक्तदात्यास एक मोबाईल भेट दिला आहे, त्याचबरोबर रक्तदात्यांनी जे सहकार्य केलं त्यासाठी माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी मित्रमंडळींनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे, अशी मत सुफियान खान यांनी व्यक्त केले.

Categories
कागल कोल्हापूर

युवकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार ; आमदार ऋतुराज पाटील

गोकुळ शिरगाव प्रतिनिधी

कोल्हापूर दक्षिण मधील सर्व युवकाच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी दीर्घकालीन उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करणार असल्याचे प्रतिपादन आमदार ऋतुराज पाटील यांनी नेर्ली विकासवाडी येथील विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी केले आपल्या मतदारसंघातील तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न बिकट असून यासंबंधी काही वेगळं कार्य करण्याची गरज असल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांकडून सूचना आली असून यासंदर्भात सर्वांच्या विचाराने व सहकार्याने आदर्श आराखडा लवकरच तयार करण्यात येईल. यावेळी त्यांच्या हस्ते 58 लाख रुपये निधीतून अंतर्गत रस्ते गटर मराठा समाज मंदिर तांडा वस्ती सुधारयोजना नागरी सुविधा आदी विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले यावेळीमाजी न्यायाधीश अण्णासाहेब पाटील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत प स सदस्य मंगल पाटील सरपंच प्रकाश पाटील उपसरपंच संजय चौगुले सर्व ग्रामपंचायत सदस्य जनार्दन पाटील हंबीरराव पाटील अजित पाटील श्रीकांत नरके नंदकुमार पाटील सर्जेराव चौगुले भाऊसाहेब चौगुले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Categories
सोलापूर

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातून सध्या तरी पार्थ पवार यांच्या नावाची कोणतीही चर्चा प्रसिद्धीमाध्यमांनी करू नये: उपमुख्यमंत्री अजित पवार

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा होती. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. "पार्थ पवार यांच्या उमेदवारीचे वृत्त पूर्णपणे निराधार असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. या मतदारसंघात उमेदवारी देताना स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे मत विचारात घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे तथ्यहीन वृत्त माध्यमांनी थांबवावे" असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवर पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसापासून माध्यमांमध्ये येत आहेत. या बातम्यांना कोणताही आधार नाही. भारतनाना भालकेंचे निधन हा आमच्यासाठी मोठा धक्का असून स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी विचारविनिमय करुनच या पोटनिवडणुकीसाठी स्थानिक उमेदवार देण्यास प्राधान्य असणार आहे."राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार ठरविण्याचा निर्णय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व उमेदवार निवड समितीच्या माध्यमातून घेण्यात येईल. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून ही पहिलीच विधानसभा पोटनिवडणूक असून महाविकास आघाडीचा उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होईल" असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

Categories
नांदेड

तुर खरेदीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरु

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:दि. 28 :- जिल्ह्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत हंगाम 2020-21 मध्ये हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी मार्केटिंग फेडरेशनमार्फत ऑनलाईन शेतकरी नोंदणी आजपासून सुरु करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर जावून नोंदणी करावी,असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील यांनी केले आहे.

जिल्ह्यातील खरीप हंगाम 2020-21 साठी नांदेड (अर्धापूर), मुखेड,हदगाव, किनवट, बिलोली (कासराळी), देगलूर,कंधार,लोहा याठिकाणी मार्केटिंग फेडरेशनमार्फत ऑनलाईन शेतकरी नोंदणी आजपासून सुरु करण्यात आली आहे. या खरीप हंगामात तुरीचा हमीभाव प्रती क्विंटल 6 हजार रुपये आहे.जिल्ह्यातील शेतकरी बांधवानी ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी चालू हंगामातील तुर या पिकांचा ऑनलाईन पिकपेरा नोंद असलेला सातबारा उतारा, आधारकार्ड व राष्ट्रीयकृत बँकेचे पासबूक प्रत आदी कागदपत्रे तालुक्यातील खरेदी केंद्रावर देऊन शेतकऱ्यांनी नोंदणी करावी असेही आवाहन जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील यांनी केले आहे.

Categories
कवठेमहांकाळ मिरज सांगली

खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचा “दिनदर्शिका 2021” प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला.


दि. २८/१२/२०२०
कवठेमहांकाळ- विद्याधर रास्ते

खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्यावतीने प्रत्येक वर्षी पतसंस्थेच्या सभासद व हितचिंतकांना दिनदर्शिकाचे वाटप करण्यात येते. सन २०२१ च्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा महानगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी मा. श्री हनमंत बिराजदार साहेब तसेच विशेष कार्यक्रम अधिकारी मा. श्री सतीश कांबळे साहेब यांचे शुभहस्ते संपन्न झाला. प्रमुख पाहुणे मा. श्री. हनमंत बिराजदार साहेब यांनी पतसंस्थेच्या कामकाजाची माहिती घेतली व पतसंस्थेचे अनेक उपक्रम पाहून समाधान व्यक्त केले. पुढील काळात ही पतसंस्था वटवृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही! असा विश्वास त्यांनी व्यक्त केला, शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ व शिक्षकांच्या आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी पतसंस्था हातात हात घालून काम करीत आहेत. याबद्दल महासंघाच्या पदाधिकार्‍यांना व पतसंस्थेच्या सर्व संचालक मंडळाला धन्यवाद दिले. तसेच संचालक मंडळ सभासदांच्या हिताचा व पारदर्शी कारभार करत आहे. बद्दल संचालक मंडळाचे ही त्यांनी विशेष कौतुक व अभिनंदन केले. तसेच सतीश कांबळे साहेब यांनीही पतसंस्थेच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त करून अवघ्या बारा वर्षांमध्ये पतसंस्थेत जवळजवळ पाच कोटीच्या ठेवी आल्या आहेत, यावरून पतसंस्थेवरती लोकांचा विश्वास असल्याचे हे नामवंत उदाहरण आहे, असे सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक पतसंस्थेचे चेअरमन श्री मु.न.तांबोळी यांनी केले. पतसंस्थेच्या कामकाजाविषयीची माहिती खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री अरविंद गावडे सर यांनी करून दिली. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री पा.बा. पाटील सर, पतसंस्थेचे चेअरमन श्री मु.न. तांबोळी, व्हाईस चेअरमन श्री सुभाष माने, मानद सचिव श्री उमेश कुलकर्णी, खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष व विद्यमान संचालक श्री अरविंद गावडे, महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री नामदेवराव मदने, श्री डी. बी. कांबळे, महेश सपकाळ, युवराज वायदंडे, गुरुप्रसाद गुरव व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री डी.बी. कांबळे यांनी केले तर आभार श्री उमेश कुलकर्णी यांनी मानले.

Categories
नांदेड भोकर

वंचित बहुजन आघाडी भोकर नगर परिषद निवडणूक लढविणार

भोकर तालुका प्रतिनिधी:दता बोईनवाड

भोकर:दि.28.वंचित बहुजन आघाडी भोकर नगरपरिषदेची निवडणूक लढविणार असल्याची घोषणा मराठवाडा वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष तथा पक्षनिरीक्षक दीपक डोके यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केली.
भोकर येथील संगम फंक्शन हॉल मध्ये रविवार दि.27 डिसेंबर रोजी वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांचा मेळावा नुकताच संपन्न झाला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते एल.ए.हिरे हे होते.प्रथम प्रास्ताविक नवनिर्वाचित वंचित बहुजन आघाडीचे भोकर ता.अध्यक्ष सुनील कांबळे यांनी पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर अध्यक्षपदाची धुरा टाकली तालुक्यात पक्ष संघटना बांधणीसाठी जोमाने कामाला लागणार असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना दीपक डोके म्हणाले राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर हे तमाम वंचित घटकांना न्याय देण्यासाठी सतत धडपडत असतात एकेकाळी भोकर मतदार संघात भारिप बहुजन महासंघाला चांगले दिवस होते अल्पशा मताने बहुजन उमेदवारांचा पराभव झाला पक्षाची पुनर्बांधणी करून कार्यकर्त्यांनी भोकर  नगरपालिका ताब्यात घेतली पाहिजे त्यासाठी जोमाने लागावे.
  यावेळी बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष भीमराव दुधारे म्हणाले भोकर नगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता असून नगरपालिका भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे.धनशक्तीच्या जोरावर सतेत आलेल्याना खाली खेचण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कामाला लागून निवडणुकीमध्ये आव्हान निर्माण करावे लागणार आहे.
यावेळी नांदेड शहर वंचित आघाडीचे महासचिव गौतम कापुरे,इजि.राज अटकोरे,भारिपचे माजी अध्यक्ष सुभाष तेले, तालुका वंचित आघाडीचे महासचिव बालाजी आनंतवाड, सुनील कांबळे किनीकर,शेख शबीर आदींनी विचार मांडले अध्यक्षीय समारोप करताना हिरे म्हणाले एकेकाळी भोकर मतदार संघात भारिप बहुजन महासंघाचा दबदबा होता.बहुजन मतदारांनी आम्हाला भरभरून मतदान केल्याने विधानसभेचे उमेदवार तीन वेळा दुसऱ्या क्रमांकावर ह़ोते भोकर ग्रा.प.वर सता आली जि.प.,प.स.चे उमेदवार ही निवडूण आले होते 2005 नंतर भारिपला गळती लागली होती.१डिसेंबर २०१८ला झालेल्या भिमा कोरेगाव दंगल प्रकरणात बाळासाहेबानी चांगली भुमिका घेतल्यानंतर जनता त्यांच्या पाठीशी एक वठली होती लोकसभेला चांगले मतदान झाले विधान सभा निवडणूकीत मात्र मतदान घटले,कार्यकर्ते एक दिलाने काम केले. मतदारसंघात पक्षाची बांधणी करणे गरजेचे असल्याचे सांगून नगरपालिका निवडणुकीमध्ये समविचारी पक्षासोबत यूती करूणे गरजेचे असल्याचे सांगितले.यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते आनंद एडके,विजय मोरे,माणिक जाधव,दत्ता शिरवळकर,दता गटुवाड,सम्यक चौदंते,बालाजी बाबळे,प्रशांत शहाणे, पूजा बनसोडे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.आभार गजू ढोले यांनी मानले.पक्ष निरीक्षक दीपक डोके,हिगोली जिल्हा वंचित ब.आघाडीचे अध्यक्ष वसीम देशमुख यांनी शहीद प्रफुल नगर,महात्मा फुले नगर समता नगर,शेख फरीद नगर,अशा अनेक वॉर्डांमध्ये भेटी देवून नागरिकांचे मते आजमावून घेतली.
 

Categories
सातारा

शिक्षक बँकेच्या विद्यमान चेअरमन यांनीच काढले नियमबाह्य कर्ज…..

कोरेगाव तालुका प्रतिनिधी- अभिजीत लेंभे

शिक्षक समितीच्या संचालकांची जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार…..
कोरेगाव तालुका प्रतिनिधी अभिजित लेंभे
प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लि सातारा ही सातारा जिल्ह्यातील सहकारी बँकात नावलौकिक मिळवलेली एक बँक आहे. या बँकेबाबत समाजातही अजून चांगली प्रतिमा आहे. अनेक शिक्षक सभासदांचे संसार या बँकेच्या अर्थसहाय्यातून उभे राहिले आहेत. परंतु या बँकेच्या मागे लागलेला बोगस कर्ज प्रकरणांचा ससेमिरा अजूनही चालूच आहे.
मागील काही दिवसात कराड शाखेतील नियमबाह्य कर्ज प्रकरणाचा पर्दाफाश शिक्षक समितीच्या संचालकांनी अचानक भेटीवेळी केला होता. त्याबाबतची लेखी तक्रारही मा.जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे केली आहे. तदनंतर सातारा शाखा तपासणीत चक्क विद्यमान चेअरमन यांनीच नियमबाह्य कर्ज प्रकरण केल्याचे लक्षात आले. सातारा शाखेतील कर्जांचे रोखे तपासत असताना विद्यमान चेअरमन यांनी खोटे दस्तऐवज सादर करून बँकेची फसवणूक केल्याचे आढळले. पगाराचे खोटे दाखले सादर करून ६० लाख रुपये कर्जाचा लाभ चेअरमन यांनी घेतलेला आहे. दिनांक ११डिसेंबर २०२० ची सर्व कर्ज प्रकारातील विद्यमान चेअरमन यांची बँकेला येणे रक्कम तब्बल ६३ लाख २५ हजार ३४१ रुपये इतकी प्रचंड प्रमाणात असल्याचे पाहणीत आढळले.
एक महिन्यापूर्वी बँकेची कर्ज मर्यादा ६० लाख रुपये होती. मग यांच्याकडे असणारी ६३ लाख २५ हजार ३४१ रुपये येणे बाकी कोणत्या नियमात बसली? बँकेच्या प्रमुख पदावर काम करणाऱ्या व्यक्तीने सर्व नियम पायदळी तुडवले तरी चालतील असेच याला म्हणावे लागेल. नियम करणारे यांचीच कर्ज मर्यादेचे उल्लंघन केले आहे. सभासदांचा एखादा कागद राहिला असेल तरी त्याला कर्ज मिळत नाही.मग विद्यमान चेअरमन यांनी पदाचा गैरवापर करून कर्मचाऱ्यांच्या वर दबाव आणूनच ही कर्ज प्रकरणे केल्याचे निष्पन्न होत आहे . गत संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये कोणताही विषय आलेला नसताना व कोणालाही विचारात न घेता कर्जमर्यादा ६० लाखावरून ६२ लाख केली. ती केवळ स्वतःसाठीच केली हे आज यावरून स्पष्ट होते.
विद्यमान चेअरमन यांची नेमणूक ७/८/१९९२ असून यावेळी लागलेल्या शिक्षकांचा पगार साधारणपणे ७८ हजार असा आहे. परंतु त्यांनी दिनांक ३०/१२/२०१९ रोजी सादर केलेल्या पगार दाखल्यात ९४,७२०/- रुपये पगार दाखविला आहे. यामध्ये कपाती केवळ २८२० इतक्याच आहेत. गमतीची बाब म्हणजे तदनंतर दिनांक २१/९/२०२० रोजी केलेल्या कर्ज प्रकरणाचा पगार दाखला केवळ ९२,५००/- रुपयांचा आहे. म्हणजेच विद्यमान चेअरमन यांचा पगार पुढील वर्षी वाढण्याऐवजी २,२२० रुपयांनी कमी झाला. केवढी ही पगारातील तफावत व सादर केलेल्या माहितीतील दिशाभूल!
त्यांच्या पगारात ६० लाख रुपये कर्ज कसे बसले हाच मोठा संशोधनाचा विषय आहे. ६० लाख रुपये कर्ज काढण्यासाठी कोणत्याही कर्जदाराचा पगार कमीत कमी एक लाख रुपये तरी असायला हवा असे बँकेतील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.परंतु विद्यमान चेअरमन यांचा पगार ७८ हजार असून बँकेची कपात पगार पत्रकात केवळ ६००/- इतकी आहे.मग पगारातून कपात करून कर्ज हप्ते भरणेचा नियम चेअरमन यांना नाही का?
बँकेच्या प्रमुख पदावर असणाऱ्या व्यक्तीनेच अशी नियमबाह्य खोटे दस्तऐवज सादर करून कर्ज काढले असेल तर बँके चा कारभार कोणत्या थराला जाऊन पोहोचला आहे हे सर्वसामान्य स्वतःला वेगळे सांगायला नको.
“तळे राखील तो पाणी चाखील” अशी एक जुनी म्हण ऐकली होती. परंतु इथे पाणी चाखण्याऐवजी तळेच गिळंकृत करण्याचा प्रकार पुढे आला आहे.
याबाबत मागील बोगस कर्ज प्रकरणे व या बरोबरच विद्यमान चेअरमन यांच्या सर्व कर्ज प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी शिक्षक समितीचे संचालक श्री किरण यादव,श्री शिवाजी शिंदे,श्री चंद्रकांत मोरे,श्री सुभाष शेवाळे यांनी केली आहे.निःपक्षपाती पणे चौकशी न झाल्यास मा सहकार आयुक्त पुणे यांची भेट घेऊन शिक्षक बँकेचे “स्पेशल ऑडिट” करण्याची मागणी करणार असल्याचे यावेळी समितीच्या संचालकांनी सांगितले.

Categories
मुंबई

परिपूर्ण देशकल्याणासाठी लोकशाहीच आवश्यक – अशोक सावंत

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी:लक्ष्मण राजे )

लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा फायदा घेत लोकशाही विरोधातच कुणीतरी म्हणतं, “विकृत लोकशाहीपेक्षा सुसंस्कृत हुकूमशाही बरी.” अशी विधाने करण्याचे स्वातंत्र्य लोकशाही खेरीज अन्य कोणत्याही राजवटीत नाही. या उलट लोकशाहीत मात्र कुणाच्याही बरोबर किंवा चुकीच्या मताचा आदर राखला जातो. त्यामुळे लोकशाहीशी प्रतारणा करणाऱ्या या विधानाशी आपण आपली केवळ असहमती दर्शवू शकतो. त्यानंतर आपल्या हाती उरते केवळ या विधानाची चिकित्सा करणे.
जगात राजकीय प्रणाली अनेक असल्या तरी प्रत्यक्ष लोकशाही, लोकशाही, हुकूमशाही, कम्युनिजम, राजेशाही या प्रमुख आहेत. जगातील कोणतीही राजकीय प्रणाली १०० टक्के परिपूर्ण नाही. लोकशाहीही नाही. तथापि उपलब्ध राजकीय प्रणालीत लोकशाही ही सर्वात अधिक प्रगत, प्रगल्भ, सर्वात कमी दोष असलेली मानली जाते. सॉक्रेटिस, प्लेटो, ॲरिस्टॉटल हे तत्त्वज्ञही उपलब्ध राजकीय प्रणालीत लोकशाहीस सर्वोच्च स्थान देतात. देशाचे सर्वाधिक कल्याण, देशाचा सर्वांगीण परिपूर्ण विकास लोकशाहीच्या माध्यमातूनच साधता येतो, असे प्रतिपादन जगभरातील थोर अर्थतज्ज्ञही करतात. त्यासाठी ते जगातील अतिप्रगत लोकशाही असलेल्या देशांच्या अतिश्रीमंतीकडे व त्या देशांतील जनतेच्या सर्वोच्च मानव विकास निर्देशांकाकडे, बोट दाखवितात. भारतात आजही लोकशाहीच आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे असे जगभर मानले जाते आणि त्याबाबत मला अभिमान आहे. परंतु याच लोकशाहीस कुणी एखादा माणूस चक्क “विकृत लोकशाही” असे का दूषण देतो? हा माणूस जे म्हणतोय त्यात तथ्य किती? नेमकी कोणती विकृती या माणसास दिसली? अशी विकृती का निर्माण झाली? ही विकृती किती गंभीर स्वरूपाची आहे? उपाययोजना करून या विकृतीचे निर्मूलन करणे शक्य नाही का? या देशाचा एक नागरिक म्हणून ही लोकशाही निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून तिचे आपण पालन केले काय? कि स्वभावतःच लोकशाहीविषयी आपणास तिरस्कार असल्यामुळे ती लयास जावी म्हणून कळत-नकळत, अप्रत्यक्षपणे लोकशाहीच्या विरोधकांचे आपण सहायक बनलो आहोत? असे असंख्य प्रश्न मनात उभे राहतात.

परंतु ही लोकशाही बाजूला केल्यास आपण कोणती राजवट स्विकारणार? हुकूमशाही? म्हणजे रोगापेक्षा औषध भयंकर!
हुकूमशाहीत मालक फक्त एकच असतो आणि उरलेले सगळे गुलाम असतात! हुकूमशहाच्या दृष्टीने उर्वरित जनता किड्या मकोड्याच्या लायकीची असते. मग हुकूमशाहीचा स्विकार करून आपण गुलामी स्विकारायची? सुसंस्कृत हुकूमशाही? हा काय प्रकार आहे? सुसंस्कृत शब्दाची व्याख्या काय करण्यात आली आहे? कारण सुसंस्कृतपणा हा स्थल काल सापेक्ष असत़ो. ज्यास परदेशात सुसंस्कृतपणा मानला जातो त्यास भारतात असंस्कृतपणा मानला जाऊ शकतो. अमेरिकेत सार्वजनिक जागेत दांपत्याने एकमेकांचे चुंबन घेणे किंवा मुलींनी तोकडे कपडे घालणे सुसंस्कृतपणाचे लक्षण मानले जाते. या उलट भारतात हा असंस्कृतपणा मानला जातो. तसेच आज वाल्मिकी असलेल्या सुसंस्कृत हुकूमशहाचे उद्या दरोडेखोर वाल्यात रूपांतर होणार नाही कशावरून? १०० सद्गुणांनी भरलेल्या रावणाने अखेर सीतामाईच्या मोहात पडून तिचे अपहरण केलेच ना!
हुकूमशाही म्हटले की सर्वात प्रथम नावे समोर येतात ती ॲडॉल्फ हिटलर आणि बेनिटो मुसोलिनी या दोन आधी सुसंस्कृत पण नंतर सत्ता हाती येताच जगातील सर्वोच्च हिंस्र बनलेल्या क्रुरात्म्यांचे! न्यूनगंडाने पछाडलेल्या विकृत हिटलरने ६० लाख ज्युंचे अत्यंत पशूवत पद्धतीने खून पाडले. तर मुसोलिनीने ३० लाख जनतेची हत्या केली. जगावर दुसरे महायुद्ध हिटलरनेच लादले. या महायुद्धात त्याच्या जर्मनी देशातील, तसेच त्याची मित्र राष्ट्रे असलेल्या इटली, जपानसह विरोधी युरोपियन दोस्त राष्ट्रांमधील कोट्यवधी सैनिक मारले गेले. जगात सर्वत्र हाहाकार उडाला. कोट्यवधी संसार उजाड होऊन तितक्याच स्त्रिया विधवा झाल्या. कोट्यवधी स्त्रिया-मुले, वृद्ध मातापिता निराधार होऊन भूक शमवण्यासाठी रस्तोरस्ती भटकू लागली. जगातील सामाजिक स्थिती बिघडून सर्वत्र अराजक माजले. जगाची आर्थिक स्थिती घडी विस्कटून ते भिकेला लागले. हिटलरच्या छळछावणीत मारल्या गेलेल्या लक्षावधी ज्युंच्या हिंस्रभयकथा अनंत आहेत. त्याला ज्यू वंश व त्याचबरोबर त्याला वाटणारे इतर सर्व कमअस्सल मानव वंश जगातून नष्ट करायचे होते. जगात फक्त आर्य वंश शिल्लक राहील. बाकीचे उरलेच तर ते आर्यांचे गुलाम म्हणून जगतील, असे तो म्हणत असे. आजचा भारत म्हणजेच तेव्हाचा हिंदुस्थानही त्याच्या हिटलिस्टवर होता. भारतातील आर्यांच्या रक्तात भेसळ झालेली असून ते खरे आर्य राहिलेले नाहीत असा दावा तो करीत असे. हुकूमशहांची करणी अशी भयंकर असते.
बरे जर्मनीचा हिटलर किंवा इटलीचा मुसोलिनी हे दोघेही लोकशाहीतील सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊन लोकशाहीलाच संपवण्यासाठी सत्तेवर आलेले. इंग्रजीत म्हण आहे, First call him dog and then shoot. या तत्त्वानुसार त्यांनी ठरवून पद्धतशीरपणे आपल्या देशातील तत्कालीन प्रस्थापित लोकशाहीस बदनाम केले. लोकशाही विकृत असल्याचे भयचित्र त्यांनी सातत्यपूर्वक प्रचार करून जनतेच्या मनावर ठसविले. त्यासाठी त्यांनी राष्ट्रभक्तीचा मुद्दा जनतेच्या अंत: पटलावर बिंबविला. जे नागरिक आपल्या बाजूने बोलतील त्यांना राष्ट्रभक्त ठरवून त्यांना सन्मानित करायचे व जे विरोधात बोलतील त्यांना देशद्रोही ठरवून त्यांच्या विरुद्ध प्रचार करून त्यांना जीवनातून उठवायचे हे तंत्र शास्त्रशुद्धरित्या अवलंबिले. तत्कालीन लेखक व समाज शास्त्रज्ञ उंबर्टो इको यांनी याबाबत हुकूमशाही प्रतिष्ठापना प्रक्रियेची काही लक्षणे मांडली आहेत. याबाबतचे त्यांचे निरीक्षण दांडगे आहे. त्यांनी हिटलर, मुसोलिनी यांच्या बरोबर इतरही अनेक हुकूमशाह्या, कम्युनिजम, राजेशाही प्रत्यक्ष अनुभवलेल्या असल्यामुळे त्यांच्या अर – फॅसिजम या प्रबंधास जागतिक पातळीवर अनन्यसाधारण महत्त्व आहे.
उंबर्टो म्हणतात, हुकूमशाही प्रतिष्ठापना प्रक्रियेची १४ लक्षणे आहेत.
१) Cult of tradition – एखाद्या पारंपरिक पंथाचा उदय होतो. त्या माध्यमातून जुन्या परंपरांचा आपणास हवा तसा, आपल्याला सोयीस्कर असलेला अर्थ काढून तो जनतेच्या गळी उतरवला जातो.
२) Rejection of modernism. आधुनिक आचार विचार, कृती सर्वच ठोकरून देणे.
३) The cult for action for action’s sake. जशास तसे. कृतीला कृती करून उत्तर देणे. तर्कहीन विरोध.
४) Disagreement is treason. विरोधकांना देशद्रोही ठरविणे.
५) Fear of difference. विरोधकांच्या मनात वेगळे मत मांडण्याबाबत भीती, दहशत निर्माण करणे.
६) Appeal to social frustration. सामाजिक नैराश्य अधिक गडद करून मध्यमवर्गाला आपल्याकडे आकर्षित करणे.
७) Obsession with a plot. कटकारस्थानांचे आकर्षण असणे.
८) The enemy is both weak and strong. शत्रू्ला कमजोर तसेच बलवान, दोन्ही एकाच वेळी ठरवून तसा प्रचार करणे.
९) Pacifism is trafficking weak. (Life is permanent warfare.) जीवनासाठी संघर्ष नसून संघर्ष हेच जीवन आहे, हे जनतेच्या मनावर ठसविणे.
१०) Contempt for weak. सर्व क्षेत्रात अभिजन वर्गाची मक्तेदारी निर्माण करून कनिष्ठ वर्गाला वंचित ठेवणे.
११) Everybody is educated to become hero. येथे प्रत्येक माणसाला नायक बनवले जाते. आपण आहोत म्हणून राष्ट्र आहे. आपल्या शिवाय राष्ट्र् जगू शकत नाही. म्हणून जगायचे तर राष्ट्रासाठी, मरायचे तर राष्ट्रासाठी ही भावना प्रत्येकाच्या मनात भरविली जाते. अशाच भावनेने भारलेले पाकिस्तानी दहशतवादी मानवी बॉम्ब बनून भारतात घातपात घडवित असतात.
१२) Machismo and weaponry. स्त्रियांना गौण स्थान देणे. त्यांना कमी लेखणे. त्यांना आधुनिक विचारांपासून दूर ठेवणे. आधुनिक सुखसोयी शिक्षणापासून वंचित ठेवणे. त्यांच्या लैंगिक आवडीनिवडी वर बंधने घालणे. थोडक्यात तथाकथित पुरुषार्थ गाजविण्याचा उपदेश केला जातो.
१३) Selective populism. टिव्ही-इंटरनेट व इतर समाज माध्यमांतून विशिष्ट लोकांच्या गटांना बोलते करणे व ते जे बोलत आहेत तोच जनतेचा आवाज आहे असे भासविणे.
१४) Newspeak. प्रचलित शिक्षण पद्धती बंद करून स्वतःला पुरक असलेली शिक्षणपद्धती राबविणे. अभ्यासक्रमात बदल करून स्वतःचे गौरविकरण करणारे किंवा जुना इतिहास बदलून स्वतःला सोयीस्कर असलेला नवा इतिहास लिहून घेऊन स्वतः ची श्रेष्ठ प्रतिमा निर्माण केली जाते.
अशी ही हुकूमशाही लोकशाहीची शत्रू असून त्याखेरीज राजेशाही, धर्मशाही, कम्युनिजम, समाजवादी, प्रांतवादी, प्रादेशिक एकतंत्री पक्ष हे देखील शत्रू असतात. हे सर्व शत्रू मिळून लोकशाही बदनाम करण्याचे, तिला विकृत बनविण्याचे पराकोटीचे प्रयत्न करीत असतात. यांच्याकडूनच लोकशाही विरोधी अतिरंजित किंवा बनावट वृत्ते प्रसृत केली जातात. परंतु हे विरोधक जोपर्यंत मध्यमवर्गास स्वतःकडे आकर्षित करू शकत नाहीत तोपर्यंत लोकशाहीस कोणताही धोका नसतो. कारण मध्यमवर्ग हा कोणत्याही राजसत्तेचा प्रमुख आधारस्तंभ असतो. तो ज्याच्या बाजुने उभा असेल त्याची राजसत्ता स्थापन होईल. कनिष्ठ वर्ग हा बराचसा अज्ञानी, अंधश्रद्धाळू, अशिक्षित, अर्धशिक्षित असतो. विचार करण्याची त्याची कुवत किंवा त्याची स्मरणशक्ती जेमतेम असते. त्यामुळे मध्यमवर्गाचे केवळ अनुकरण करणे एवढेच शक्य असते, असे तत्त्वज्ञ सॉक्रेटिस सांगतो.
भारताच्या लोकशाहीत काही दोष जरुर आहेत. पण ते विकृती म्हणावेत इतके गंभीर नाहीत. असे दोष प्रत्येक व्यवस्थेत कमी अधिक प्रमाणात असतातच. बहुतांश भारतीय जनता अजूनही जातपात, धर्म, रुढी परंपरा, विभिन्न संस्कृती या बेडीत अडकलेली असल्यामुळे काही अनिष्ट गोष्टी घडत असतात. परंतु त्या विकृतीच्या पातळीवर पोहोचल्या आहेत असे म्हणणे अतिरेकी, तसेच अन्यायकारक आणि भारतीय जनतेच्या हितास मारक आहे.
भारतीय राज्यघटनेनुसार संसद, प्रशासन यंत्रणा आणि न्यायपालिका हे भारतीय लोकशाहीचे तीन प्रमुख आधारस्तंभ असून ते आजही ठाम भक्कमपणे उभे आहेत हे अभिमानास्पद आहे.
भारताचा सर्वांगीण विकास, परिपूर्ण राष्ट्रकल्याण केवळ लोकशाहीच्या माध्यमातूनच होऊ शकते.

Categories
मुंबई

निवाराच्या पुढाकाराने संघर्षनगर वसाहतीतील शाळेच्या इमारतीत गरीब मुलं बृहन्मुंबई मनपाच्या माध्यमातून गिरवणार शिक्षणाचे धडे

निवारा हक्क सुरक्षा समिती

शिक्षणसमिती अध्यक्षा मा. संध्या दोषी यांच्या दालनातील सभेत शाळेची इमारत बृहन्मुंबई मनपाला हस्तांतर करून शाळा सुरू करण्याचा एक मताने निर्णय

एक यशस्वी प्राथमिक शाळा मनपा चालवत असताना दुसरी शाळा सुरू झाल्याने गोरगरीब संघर्ष नगर वासीयांना पायपीट करण्यापासून व आर्थिक बचतीचा फायदा होणार

मुंबई :- सिद्धार्थ काळे
दिनांक 28 डिसेंबर 2020

संघर्ष नगर मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथून आलेल्या 12000 हजार कुटुंबातील मुलांना शिक्षण मिळावे म्हणून अनेक संघर्षानंतर एक प्राथमिक शाळा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत 2014 साली बृहन्मुंबई मनपाला हस्तांतरण करण्यात आली. व आज ही त्या ठिकाणी विविध माध्यमाची एकूण 2800 विद्यार्थी उत्कृष्ट शिक्षण घेत आहेत. त्याच प्रमाणे संघर्ष नगर वसाहतीची लोकसंख्या पाहता त्या शाळेची जागा अपुरी पडते आहे त्याच प्रमाणे संघर्ष नगरात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ( इयत्ता 9 वी ते 12 वी ) उपलब्ध नाही.
उपलब्ध व्हावी म्हणून निवाराच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून पाठपुरावा चालू होता.
त्यांचाच परिपाक म्हणून आज शिक्षण समिती अध्यक्षा मा. संध्या दोषी यांच्या दालनात मनपाच्या विविध खात्याचे अधिकारी, एस आर ए , वन विभाग, यांचे अधिकारी व निवाराचे प्रतिनिधी यांची शिक्षण समिती अध्यक्षा मा. संध्या दोषी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

सदर बैठकीत जनतेच्या मागणीनुसार व हितासाठी आर्थिक दृष्टिकोनातून परवडेल अशी शाळा पहिली शाळा ज्या धर्तीवर मनपाने घेतली त्याच धर्तीवर शाळा इमारत ताब्यात घेऊन शाळा चालू करावी. या साठी गृहनिर्माण मंत्री यांनीही मनपाला हस्तांतर करावे असे निर्देश दिले आहेत त्यामुळे सदर शाळा इमारत हस्तांतर करून मनपाच्या वतीने शाळा सुरू करावी अशी मागणी निवाराच्या वतीने संजय डावरे सर यांनी मांडली.
यावर सर्व अधिकारी यांनी आपले म्हणणे मांडून शेवटी सदर शाळा मनपाला हस्तांतर करण्याचे सर्वानुमते ठरले. याची कार्यवाही त्वरित करावी असे निर्देश दोषी मॅडम यांनी दिले.

संघर्ष नगर वासीयांच्या वतीने दोषी मॅडमची आभार प्रकट करण्यात आले. या वेळी निवाराच्या वतीने संजय डावरे सर यांच्या सह रावण गायकवाड, अशोक पाटील ,वसंत, खाडे, अनंत जोशी, प्रकाश शिंदे उपस्थित होते.

Categories
उमरी नांदेड

ऑनलाईन सेवा विस्कळीत नेटवर्क डाऊन मुळे फॉर्म भरण्यासाठी अडचणीचा सामना करीत कडाक्याच्या थंडीत इच्छुक उमेदवाराची धावपळ!!

उमरी तालुका प्रतिनिधी;उद्धव मामडे रावधानोरकर
उमरी;तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीसाठीचा अर्ज भरण्याची कालवधी कमी असल्याने उमेदवार निवडणुकीसाठी अर्जासोबत लागणाऱ्या कागदपत्र काढण्यासाठी धावपळ करीत असल्यांचे चित्र तहसील कार्यालयाच्या परिसरात दिसून येत आहे.
तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूकाचे रंगधुमाळी सुरु झाले असुन या ग्रामपंचायतील सरपंच पदाचे आरक्षण ही जिल्हाधिकारी यांच्या सुचणेनुसार सोडण्यात आले होते. पण शासनाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत घोडे बाजार होऊ नये म्हणून सोडलेले आरक्षण रद्द करण्याचे आदेश देऊन सदरील आरक्षण हे निवडणुकीच्या नंतर सोडणार असल्याने इच्छुक उमेदवारांचे हिरमोड झाले असल्याने निवडणूकीत इच्छुक उमेदवारांचा खर्च व निवडणुकीसाठी लागणारे कागदपत्रे यांची जुळवाजुळवी करणार कोण? असा प्रश्न उपस्थित झाल्याने उमेदवारांना लागणारे कागदपत्रे काढण्यासाठी विलंब झाला असून आत्ता निवडणूकीसाठीचा अर्ज स्वीकारण्याची तारीख जवळ येताच उमेदवारांची पळापळी करून कागदपत्राची जुळवाजुळवी करीत आहेत.
ग्रामपंचायत निवडणूकीसाठी दि. २३ डिसेंबर ते 30 डिसेंबर पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत यात प्रत्येक गावातील इच्छुक उमेदवार आपले भवितव्य शोधण्यासाठी धावपळ धावपळ करून निवडणुकीसाठी लागणारे कागदपत्रे काढण्यासाठी जिवाचा आटापिटा करतांना दिसून येत आहे.

Categories
मुंबई

विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव – धडक कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत नाताळ सणानिमित्त आयोजित मोफत आरोग्य शिविर संपन्न

(हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी: लक्ष्मण राजे )

रविवार दि. 27 डिसेंबर, 2020 रोजी बेहराम बाग, जोगेश्वरी पश्चिम,मुंबई येथे मनराज प्रतिष्ठान चे विश्वस्त श्री मनोज राजन नाथानी यांच्या तर्फे व विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव – धडक कामगार युनियन) यांच्या सहकार्याने नाताळ सणानिमित्त मोफत आरोग्य शिविरचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमात  डोळे तपासणी, रक्तदाब,  ऑक्सीजन लेवल, मधुमेह, बाॅडी फॅट व इतर चेक अप मोफत करण्यात आले तसेच कमी दरात गरजु लोकांसाठी चष्मा व कानाची मशीन उपलब्ध करण्यात आली. श्री विनय डोळस (महाराष्ट्र संपर्क प्रमुख -धडक कामगार युनियन महासंघ), श्री विन्स्टन परेरा (महाराष्ट्र सचिव – धडक माथाडी जनरल कामगार युनियन), श्री नेहाल सय्यद (महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य -धडक कामगार युनियन), श्री अशोक कदम व धडक कामगार युनियनचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Categories
गेवराई बीड

गेवराई येथे जनतेच्या प्रश्नावर जनसुनवाई घेऊन काँग्रेस स्थापना दिवस साजरा

हिंदुसम्राट विशेष प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

गेवराई:दि.२८.काँग्रेस पक्षाचा १३६ वा स्थापना दिवस गेवराई शहरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या गोरगरीब जनतेच्या प्रश्नावर जनसुनवाई घेऊन यशराज नगर गेवराई येथे साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र काँग्रेस सेवा दलाचे राज्य सचिव तथा सामाजिक सुरक्षा समितीचे प्रदेश समन्वयक कडुदास कांबळे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून युवक काँग्रेस बीड जिल्हा अध्यक्ष अॅड. श्रीनिवास बेदरे उपस्थित होते.
या कार्यक्रमास प्रामुख्याने असंघटित कामगार काँग्रेस संघटनेचे राज्य सचिव मधुकर वारे,जिल्हा अध्यक्ष संतोष निकाळजे,महाराष्ट्र सामाजिक सुरक्षा समितीचे बीड जिल्हा अध्यक्ष सोनाजी कारके,गेवराई तालुका अध्यक्ष शेषराव सदाफुले, संगीता हतागळे,शेख मुसा, महादेव रोकडे,काँग्रेस सेवा दलाचे गेवराई तालुका अध्यक्ष तुकाराम खरात,युवक काँग्रेसचे गेवराई तालुका अध्यक्ष किरण आजबकर,बळीराम गिराम, जीजा जगताप,राहुल घेणे, इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन सोनाजी कारके यांनी केले.यावेळी युवक काँग्रेस बीड जिल्हा अध्यक्ष अॅड. श्रीनिवास बेदरे यांनी काँग्रेस स्थापनेचा थोडक्यात ईतिहास सांगत मोदी सरकारचे शेतकरी विरोधी ३ काळे कायदे आम्ही रद्द केल्याशिवाय शांत बसणार नाहीत असे ठणकावून सांगितले. यावेळी उपस्थित सय्यद मन्सूर, राजु पठाण,संगीता हतागळे, वाणी अप्पा,यांनी झोपडपट्टी धारकांचे प्रश्न मांडले.
शेवटी अध्यक्षीय भाषणात कडुदास कांबळे यांनी काँग्रेस पक्ष हा स्वातंत्र्याच्या पुर्वी पासून ते आजपर्यंत सर्व सामान्य जनतेला केंद्रस्थानी ठेवून काम करत आला आहे. त्याप्रमाणे आम्ही आपण मांडलेल्या प्रश्नावर कालबद्ध नियोजन करून गोरगरीबांना न्याय मिळवून देवू असा विश्वास जनतेसमोर व्यक्त केला.
कार्यक्रमासाठी यशराज नगर येथील बहुसंख्य महिला पुरुष उपस्थित होते.शेवटी राष्ट्रगीता नंतर कार्यक्रम संपला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार सामाजिक सुरक्षा समितीचे गेवराई तालुका अध्यक्ष शेषराव सदाफुले यांनी मानले.

Categories
नांदेड

स्थानिक गुन्हा शाखेत परमेश्र्वराची परमेश्र्वरी ताकत

इतरांच्या बीटमध्ये हस्तक्षेप करून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:वरिष्ठ अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देवून दोन अधिकाऱ्यांमध्ये दरी निर्माण करणाऱ्या स्थानिक गुन्हा शाखेतील एका सहाय्यक पोलीस उपनिरिक्षकाने आपले बीट सांभाळून इतरांच्या बीटमध्ये हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली असून गुपचूपपणे खंडणीचे प्रकार त्यात घडतात अशी धक्कादायक माहिती हाती आली आहे.

भ्रष्टाचार कायदा 1988 पासून आला असला तरी भ्रष्टाचार हा अर्वाचीन काळापासून सुरू आहे. अनेक कारणांनी कुटूंबात सुध्दा भ्रष्टाचार होत असतो.पण त्यावर कार्यवाही होत नसते.त्यामुळे भ्रष्टाचार हा विषय खुप मोठा आहे किंवा त्यावर चर्चा करण्याची गरज आहे.अशी आजची परिस्थिती नाही.भारतीय पोलीस सेवेत राज्य पोलीस सेवेत कार्यरत होतांना आपल्याला दिलेली शपथ आपण लक्षात ठेवली तर आपल्या हातून कांही वाईट घडणार नाही.पण नेमके तेच आपण करत नाही.अशी परिस्थिती आज आहे आणि या परिस्थितीला कधी चर्चेत आणले तर चर्चा करणाऱ्यांना मुर्खात काढले जाते आणि आम्हीच बरोबर आहोत असे प्रमाणपत्र निर्गमित केले जाते.त्यामुळे भ्रष्टाचाराबद्दल बोलण्याची कांही एक मुभा नाही आणि कोणी बोललेच तर त्याची किंमत पण केली जात नाही.कारण भ्रष्टाचार हा पुर्णपणे आपल्या शरीरातील रक्त वाहिण्यातून वाहणाऱ्या रक्ताप्रमाणे आपल्या जीवनाला भिनला आहे.

नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेत एक सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक (ए.एस.आय.) परमेश्र्वर थानुसिंग चव्हाण असे त्यांचे नाव आहे.स्थानिक गुन्हा शाखेत त्यांचे नाव सहाय्यक पोलीस निरिक्षक (ए.पी.आय.) असे संबोधले जाते. त्यांनी आणि त्यांच्या एका सहकाऱ्याने मिळून दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांबदल आपसात मोठी दरी निर्माण होईल असे सादरीकरण केल्यानंतर दोघांची तैनाती मांडवी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानंतर श्री.परमेश्र्वरजी चव्हाण यांनी अनेक उंबरठे झिजवल्यानंतर पुन्हा त्यांना स्थानिक गुन्हा शाखेत घेण्यात आले.त्यानंतर कांही दिवसांनी त्यांचा दुसरा सहकारी पण आला. या दोघांना पुन्हा स्थानिक गुन्हा शाखेत आणले तेंव्हा त्यांना बऱ्याच सुचना देण्यात आल्या होत्या. पण उगवणारे पिक कोणालाच नको नसते ना आणि हे पिक कसे उगवायचे यामध्ये श्री परमेश्र्वरजी चव्हाण यांचा मोठा हातखंडा आहे. त्याचा वापर करत त्यांनी आपल्यासाठी एक स्वतंत्र कक्ष तयार करण्याची भली मोठी योजना आखली होती. त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी त्यांच्या या योजनेला पाठींबा सुध्दा दाखवला होता. पण कोठे माशी शिंकली हे कोणालाच कळले नाही आणि त्यांचा कक्ष आज दि.28 डिसेंबर पर्यंत तरी तयार झाला नव्हता.

शेतातील पिके त्यांच्या वेळेप्रमाणे उगवतात आणि शेतकऱ्याला उत्पादन देतात.पण परमेश्र्वर चव्हाणमध्ये पोलीस शेतीत हंगाम नसतांना पिक उगविण्याची कला भली मोठी आहे. खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक हंगाम संपला म्हणजे एक महिना संपला कि नवीन महिन्यात त्या हंगामाला दुपटीने उगवण आणण्याची शक्ती श्री पमेश्र्वरजी चव्हाण यांच्यात आहे. असे ना का? पण नांदेडमध्ये जगणाऱ्या लोकांना परमेश्र्वर चव्हाण यांची ही कला भारतीय दंडसंहितेच्या कलम 384, 385, 392 सारखी वाटते. कांही लोक आता आत्महत्या करण्याच्या तयारीत आले आहेत. परमेश्र्वरजी चव्हाण यांच्याकडे 20 लाख रुपये किंमतीची चार चाकी गाडी आहे म्हणे, नांदेडपासून 130 किलो मिटर अंतरावर एक तीन मजली इमारत ज्याची किंमत एखाद्या खोक्याची असेल अशी ती इमारत त्यांच्या मालकीची आहे म्हणे.आपल्या सेवाकाळात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा सोसण्याची ताकत श्री परमेश्र्वर चव्हाण यांना परमेश्र्वराने दिलेली आहे.

पोलीस खात्यात बीट हा एक प्रकार आहे. त्यांच्यातील परमेश्र्वरी ताकतीप्रमाणे त्यांना बरेच बीट प्राप्त आहेत.स्थानिक गुन्हा शाखेत एकच बीट मिळविण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना गुढगे घासावे लागतात.आपल्या बीटला सांभाळून इतरांच्या बीटमध्ये हस्तक्षेप करण्याची परमेश्र्वरी ताकत आणखी पाच-दहा इमारती,दहा-वीस गाड्या मिळेपर्यंत कायम राहो अशीच परमेश्र्वराकडे प्रार्थना.मुझको भी तो लिफ्ट करादे,थोडीसी तो भी लिफ्ट करा दे,कैसे कैसे को दिया है हे अदनान सामीचे गाणे किती छान आहे.
स्थानिक गुन्हा शाखेतील परमेश्र्वराने आपली ताकत गुन्हेगारांवर वापरली तर किती छान होईल.जे गुन्हेगार सर्वसामान्य माणसाला त्रासदायक आहेत.त्याबद्दल भारतीय दंडसंहितेतील कोणतेही कलम वापरले तर परमेश्र्वरावर त्याबद्दल कोणी आक्षेप घेणार नाही.पोलीस दलाच्या माध्यमातून समाजाचे भले करण्याचे व्रत अंगीकारून गुन्हेगारांना भिती निर्माण केली तर किती मोठे कर्तव्य ते मानले जाईल.

Categories
गुन्हेगारी नांदेड

महिला पोलीस कर्मचाऱ्याची चार चाकी गाडी चोरीला गेली

सहा घटनांमध्ये 6 लाख 84 हजारांचा ऐवज लंपास

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:बाळापूर ता.धर्माबाद येथील एक प्राथमिक शाळा फोडून चोरट्यांनी 24 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. हिमायतनगर येथील एक दुकान फोडून चोरट्यांनी 60 हजारांचा ऐवज लंपास केला आहे. शहरातील वजिराबाद आणि शिवाजीनगर तसेच नायगाव येथून 1 लाख 10 हजार रुपये किंमतीच्या तीन दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत.पोलीस कॉलनी स्नेहनगर येथून एका महिला पोलीसाचे चार चाकी वाहन चोरीला गेले आहे.एकूण 6 प्रकारांमध्ये 6 लाख 84 हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला आहे.

शहरातील स्नेहनगर येथे असलेल्या पोलीस वसाहतीमध्ये उकाताई मालू जाधव या महिला पोलीस कर्मचारी(बकल नंबर 2961) ह्या राहतात.त्यांचे घर वैनगंगा इमारतीमध्ये आहे. 23 डिसेंबरच्या रात्री 10 ते 24 डिसेंबरच्या पहाटे 7 वाजेदरम्यान त्यांची चार चाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.क्यू.5072 ही गाडी चोरीला गेली.या गाडीची किंमत 4 लाख 90 हजार रुपये आहे.भाग्यनगर पोलीसांनी या प्रकरणी गुन्ह दाखल केला असून पोलीस नाईक मंगनाळे अधिक तपास करीत आहेत.

शहरातील वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंगोली गेट येथून राजेश केंद्रे यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.एस.0717 ही 50 हजार रुपये किंमतीची गाडी 26 नोव्हेंबरच्या सकाळी 9.30 ते 9.45 या वेळेदरम्यान चोरीला गेली.या गाडीची किंमत 50 हजार रुपये आहे.वजिराबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस हवालदार शिंदे हे करीत आहेत. परसराम भोसले यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 बी.बी.1938 ही दुचाकी गाडी 24 डिसेंबरच्या दुपारी 3 वाजेच्यादरम्यान चोरीला गेली आहे.या गाडीची किंमत 25 हजार रुपये आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस नाईक पाटील करीत आहेत.अंकुश चंद्रकांत पाटील यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.12 एल.एन.6303 ही दुचाकी 24 नोव्हेंबर ते 25 डिसेंबर दरम्यान त्यांच्या घरासमोरून मौजे रातोळी येथून चोरीला गेली.या गाडीची किंमत 35 हजार रुपये आहे. नायगाव पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार वडजे अधिक तपास करीत आहेत.

बाळापूर ता.धर्माबाद येथील जि.प.शाळेचे मुख्याध्यापक संतोष दिनकरराव नाईक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 24 डिसेंबरच्या पहाटे 4.30 ते 26 डिसेंबरच्या सकाळी 9.30 वाजेदरम्यान शाळेचे दक्षीण बाजूकडील खिडकीचे गज काढून कोणी तरी चोरट्यांनी आत प्रवेश केला आणि संगणकाचे विविध साहित्य असा एकूण 24 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.धर्माबाद पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरिक्षक सनगले हे करीत आहेत.

हिमायतनगर येथील रुक्मीणीनगर भागातील गिरीष अरविंद चिंतावार यांचे दुकान चोरट्यांनी 20 डिसेंबरच्या रात्री 8 ते 21 डिसेंबरच्या पहाटे 4.30 वाजेदरम्यान फोडले.त्यातून वेगवेगळे साहित्य असा 60 हजारांचा ऐवज चोरून नेल आहे. हिमायतनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केल असून पोलीस नाईक लक्षटवार अधिक तपास करीत आहेत.

Design a site like this with WordPress.com
Get started