Categories
कला व मनोरंजन

कलाकार लेखक संतोष आनंद यांच्या सोनी इंडियन आयडल मधील हृदयस्पर्शी भावना

त्यांच्या लेखणीने त्यांना काय नाही मिळवून दिलं? .. नाव, पैसा, प्रसिद्धी, इभ्रत… पण नशिबाचे चक्र असे फिरले की ना पॆसा उरला ना इभ्रत … सर्वात महत्वाचं म्हणजे ना एकुलता एक मुलगा उरला आणि ना सून! .. अगदी एकाकी आयुष्य त्यांच्या वाटेला आलं. थोडी कृपा झाली ईश्वराची म्हणून त्यांची नात त्यांच्यासोबत आहे! संतोष आनंद हा तो दुर्दैवी कलाकार!

इक प्यार का नगमा है…
मेघा रे मेघा रे…
तेरा साथ है जो मुझे क्या कमी है…
मोहब्बत है क्या चीज…

सारखी कितीतरी अर्थपूर्ण आणि सुपरहिट गाणी लिहिणारा… त्याकाळी नावाजलेला… दोन फिल्मफेअर आणि प्रतिष्ठित यश भारती अवॉर्ड्स जिंकणारा … एकेकाळी प्रसिद्धीच्या, आप्त मित्र यांच्या वलयात रहाणारा गीतकार..!

सगळं ठीक होतं… एकुलता एक मुलगा, सून आणि एक गोड नात… पण मुलगा कसल्याशा फ्रॉडमध्ये अडकला… अडकवला गेला आणि अडकतच गेला… फ्रॉड वाढत वाढत २५० करोडपर्यंत गेलं… खूप प्रयत्न केले वर निघायचे पण त्या दलदलीतून अधिकच रुतत गेला! एक दिवस निर्णय घेतला आणि पत्नी व ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलीसमवेत एका भरधाव आगगाडीखाली झोकून दिलं. तो आणि त्याची पत्नी तर गेले पण अंगावर गंभीर जखमा झालेली मुलगी सुदैवाने वाचली. कदाचित संतोष आनंद यांना आधार द्यायलाच असावी!

मुलाने मृत्यूपूर्वी १० पानांची सुसाईड नोट लिहून ठेवली.. मोठमोठ्या पदाधिकाऱ्यांवर आरोप केले पण त्यावर अजूनपर्यंत तरी काही झालं नाही.. झालं तरी मुलगा, सून परत मिळणार नाहीत.. ते दिवस फिरून येणार नाहीत!

जो बीत गया वो दौर अब फिर न आएगा
मेरे दिल में तेरे सिवा कोई और न आएगा
घर फुक दिया हमने, अब राख उठानी है..
जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है…

आजोबा आणि नात दोघंच उरले एकमेकांसाठी पण दुर्दैवाचा फेरा अजून सुटला नाही… गीतकार संतोष आनंद अपंग झाले… ३-४ वेळा पायाचं ऑपरेशन झालं. व्हील चेअरवर आले… हातपाय प्रचंड थरथरतो… आवाज कापतो… जगायला पैसा नसला तरी लेखणीत दम मात्र पाहिलेसारखाच आहे..!

कुछ पाकर खोना है,
कुछ खोकर पाना है
जीवन का मतलब तो,
आना और जाना है

दो पल के जीवन से,
इक उम्र चुरानी है
जिंदगी और कुछ भी नहीं,
तेरी मेरी कहानी है…

काल इंडियन आयडॉल कार्यक्रमात संतोष आनंद यांची कथा ऐकून अगदी भडभडून आलं. कौतुक वाटलं ते नेहा कक्करचं. त्यांना पाहून ती अगदी हमसून हमसून रडली.. त्यांच्या गळ्यात पडून रडली.. त्यांच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला… त्यांना भावनिक धीर दिला… मुख्य म्हणजे ५ लाखांची आर्थिक मदत केली!…

स्वाभिमानी संतोष आनंद यांनी ती त्याही परिस्थितीत नम्रपणे नाकारली.. ‘मी अजूनही काम करतो… इकडे तिकडे जातो…’ हे सांगताना त्यांना आवाज भरून आला आणि ऐकताना आमचे डोळे! नेहाने त्यांना ती भेट तितक्याच स्नेहाने स्वीकारायला भाग पाडलं. नेहाबद्दल मी वर्षांपूर्वीच एफबीवर पोस्ट लिहिली होती जेव्हा तिने अशाच एका फुटपाथवर हार्मोनियमवर कला सादर करून गुमनामीत जगणाऱ्या बॉलिवूडच्याच एका अवलियाला १ लाखाची मदत जाहीर केली… मला तिचं रडणं कधीच नाटकी वाटलं नाही… यापूर्वीदेखील तिने कितीतरी गरीब स्पर्धकांना १ लाख -२ लाख अशी आर्थिक मदत केली आहे. तशी ती नावाजलेली असली तरी इतर अनेक सेलिब्रिटीजसारखी वर्षानुवर्षे प्रस्थापित नाही. १० वर्षांपूर्वी इंडियन आयडॉलमधूनच वर आली आहे … गरिबी पाहिलेली आहे… वयाने लहान आहे… पण दानत असायला सामाजिक जाण असावी लागते, ती तिच्यात ठासून भरली आहे. कुणाचीही समस्या ऐकली की तिचा हात लगेच पुढे येतो मदतीसाठी… पैसा असला तरी दानत असतेच असं नाही! गायिका पलक मुच्छल नंतर मला मनापासून आदर वाटलेली ही दुसरी संवेदनशील गायिका! ईश्वर तिला खूप सुखी आयुष्य आणि भरभरून यश देवो!!..

कालचा इंडियन आयडॉल कार्यक्रम फारच सुंदर झाला.. हृदयस्पर्शी झाला…अगदी पुन्हा पहावा असा!… संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांची अवीट गाणी.. . तोडीचे स्पर्धक… सर्वात महत्वाचं म्हणजे काळाआड गेलेल्या एका अशा असामान्य गीतकाराची ओळख ज्याबद्दल आपण कधी ऐकलं नाही आणि तशी शक्यताही नाही! … तसेही आपण गाणी ऐकतो पण त्यामागील गीतकार संगीतकार यांच्याबद्दल फार कधी जाणूनही घेत नाही! संतोष आनंद यांना जगासमोर आणल्याबद्दल इंडियन आयडॉलचे खूप खूप आभार!…

त्यांचे ‘किसी ने तो याद किया..’ हे शब्द काळजाला घर करून गेले! घळघळा रडले मी आणि ते सर्वच रडले असतील ज्यांनी हा कार्यक्रम पाहिला…

आँखों में समंदर है,
आशाओं का पानी है
ज़िंदगी और कुछ भी नहीं,
तेरी मेरी कहानी है…

असामान्य शब्दांचे धनी गीतकार संतोष आनंद यांना ईश्वर सुदृढ आयुष्य देवो ही मनःपूर्वक इच्छा!

– ✍………आसावरी इंगळे

Categories
कला व मनोरंजन मुंबई

एच आर एस कराओके सिंगिंग हबच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांची ” गीत गाता चल ” संगीत मैफल संपन्न

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी: लक्ष्मण राजे )

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात बरेच दिवस घरात बसलेल्या संगीतप्रेमी रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी आता सर्व थिएटर सुरू झाली आहेत.वसई पश्चिम येथील मनश्री हाॅल मध्ये निर्माते हेतल आशर आणि हितेन आशर यांच्या एच आर एस कराओके सिंगिंग हबच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त “गीत गाता चल” ही सुरेल गाण्यांची संगीत मैफल आयोजित करण्यात आली होती. या संगीत मैफलीला मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या रसिक प्रेक्षकांनी पसंती दिली. “गीत गाता चल” या लोकप्रिय सुरेल हिंदी चित्रपटातील गीतांच्या मनोरंजक कार्यक्रमाची संकल्पना निर्माती आणि गायिका हेतल आशर यांची होती. “गीत गाता चल ” हा हिंदी गीतांचा नजराणा रसिकांना खुप आवडला . हेतल आशर , हितेन आशर , अनिष्का, अरूण, अशोक, गीता, हरीश, जितेंद्र ,माला ममता , माला सावर्डेकर, फातीमा , प्रशांत , राम प्रताप , रिया , सुनिल, संचिता, उदय, जोसेफ, निष्ठा , दिप्ती , रोहीत, सकीना,आणि सीमा या गायकांनी एका पेक्षा एक सरस हिंदी गाणी सादर केली आणि रसिकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन निवेदन हेतन आशर यांनी केले ‌. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत, साहिल, सुकमल, विलीता, रिद्धी यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच सूर म्युझिक ने सहकार्य केले. “गीत गाता चल” या सुरेल संगीत श्रवणीय मैफिलीला रसिकांचा टाळ्यांच्या कडकडाटात प्रचंड प्रतिसाद मिळाला.

Categories
कला व मनोरंजन मुंबई

सुरेल मधुर हिंदी मराठी चित्रपट गीतांची “आओ झुमे गाये ” संगीत मैफल संपन्न

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी: लक्ष्मण राजे )

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात बरेच दिवस घरात बसलेल्या संगीतप्रेमी रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी आता सर्व आता थिएटर सुरू झाली आहेत. बोरीवली येथील प्रबोधकार ठाकरे मिनी थिएटर मध्ये निर्माती गायिका नीता पवार यांच्या रसिका प्रेझेंट तर्फे “आओ झुमे गाये ” ही सुरेल गाण्यांची संगीत मैफल आयोजित करण्यात आली होती. या संगीत मैफलीला मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या रसिक प्रेक्षकांनी पसंती दिली. “आओ झुमे गाये या लोकप्रिय सुरेल हिंदी मराठी चित्रपटातील गीतांच्या मनोरंजक कार्यक्रमाची संकल्पना निर्माती नीता पवार यांची होती. रसिका प्रेझेंट ” आओ झुमे गाये ” हा मराठी हिंदी गीतांचा नजराणा रसिकांना खुप आवडला . गायिका नीता पवार आणि १६ सहकारी गायकांनी उठ महागणपती , आओ झुमे गाये , हे चिंचेचे झाड ,बदन पे सितारे ,ही चाल तुरुतुरु, ओ मेरी शर्मिली , हसता हुआ नुरानी चेहरा अशी एका पेक्षा एक सरस मराठी हिंदी गाणी सादर केली आणि रसिकांना मंत्रमुग्ध केले. “आओ झुमे गाये” या सुरेल संगीत श्रवणीय मैफिलीला रसिकांचा टाळ्यांच्या कडकडाटात प्रचंड प्रतिसाद मिळाला.

Categories
कला व मनोरंजन

सह्याद्री फिल्म चा “ईस्कुट”मराठी चित्रपटाचा मुहूर्त संपन्न


मिरज–अशोक मासाळ नवीन वर्षाचे औचित्य साधुन‌ स्थानिक कलाकारांना न्याय देण्याकरिता सह्याद्री फिल्म अँड इव्हेंट मँनेजमेंटचे लेखक, दिग्दर्शक, कलाकार तथा संस्थापक अध्यक्ष आयु.गणेश वाईकर यांच्या कुशल नेतृत्वाखाली ,व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आयु. गौतम प्रज्ञासूर्य यांच्या शुभहस्ते पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्यात ऐतिहासिक मिरज भागात टाकळी या गावशिवारात "ईस्कुट"या मराठी चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला. त्यावेळी बोलताना आयु.गौतम प्रज्ञासूर्य यांनी "कोविड19"काळात कलाकारांची झालेली व्यथा मांडुन सह्याद्री फिल्म च्या माध्यमातून मा.गणेश वाईकरांनी कलाकारांना केलेल्या मदतीची माहिती दिली. आणि 'ईस्कुट'या आगामी मराठी चित्रपटास शुभेच्छा दिल्या. तर मा.गणेश वाईकरांनी. परंपरागत कलेचा वारसा जपत स्थानिक कलाकारांना न्याय देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे जाहीर केले. शेवटी प्रसिद्ध लेखक, नाटककार मा.आशोकरावजी गस्ते सर, व सिनेकलावंत मा.बापू भाजीवाले यांनी मनोगत व्यक्त केले. व चित्रपटास शुभेच्छा दिल्या. प्रसंगी स्थानिक कलाकार डान्सर मा.अजय कांबळे, अभिनेत्री मोरे मँडम,सचिन कांबळे, व टाकळी गावचे ग्रामस्थ हजर होते... लवकरच "ईस्कुट'या मराठी चित्रपटाचे टाकळी गावात शुटिंग सुरू करण्याचे आश्वासित करून मुहूर्त संपन्न झाल्याचे जाहीर करण्यात आले..🌸🌸

Categories
कला व मनोरंजन सातारा

ग्रामिण तरुणांनी मराठी सोबतच हिंदी चित्रपटसुष्टीत करीअर करावे – रोहीत काटे


सातारा पाटण तालुका प्रतिनिधी महेश मस्कर
चित्रपट सृष्टी मध्ये करीअर करण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत . ग्रामिण कलाकारांच्यात टँलेंट असुन शाँर्टफिल्म , वेबसिरीज या माध्यमातुन अनेक ग्रामिण कलाकारांनी आपल्यातील कला दाखवुन दिली आहे . तरीसुद्धा मराठी हिंदी टि.व्ही.सिरीयल व चित्रपटांमध्ये योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने ग्रामिण कलाकारांना अनेक आवाहनांना सामोरे जावे लागते.ग्रामिण कलाकारांनी चित्रपटसृष्टी मध्ये करीअर करावे या साठी मुंबई येथील मराठी व हिंदी चित्रपट क्षेत्रातील प्रोडक्शन मँनेजर रोहीत काटे R. K. लवकरच बारामती मध्ये SHOW TALENT – आर्टस & एन्टरटेनमेंट या नावाने कार्यालय सुरू करत आहेत व त्या माध्यमातुन चित्रपटांची निर्मिती करणार आहेत तसेच आगामी बहुचर्चित 9वी पास या चित्रपटाचे शुटींग सुद्धा याच भागात करणार असुन स्थानिक कलाकारांना प्राधान्य राहील असे यावेळी स्पष्ट केले. तरी स्थानिक कलाकारांनी 7998313236 या नंबर वर संपर्क साधुन अधिक माहीती घेत रहावी अशी विनंती केली.

Categories
कला व मनोरंजन जागतिक मुंबई

सुपरस्टार राजेश खन्ना फॅन क्लब इंडियाचे प्रमुख विलास घाटे यांच्या कडील राजेश खन्ना संग्रहाची लिम्का बुकमध्ये नोंद

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी: लक्ष्मण राजे )

ठाण्यातील सुपरस्टार राजेश खन्ना फॅन क्लब इंडियाचे प्रमुख आणि सुपरस्टार राजेश खन्ना यांचे जबरदस्त चाहते श्री. विलास घाटे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी 29 डिसेंबर रोजी, सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या जन्मदिनी सुपरस्टार राजेश खन्ना यांचे फॅन क्लब इंडियाची स्थापना करण्यात आली. त्यावेळी नामांकित सिने पत्रकार , चित्रपट समीक्षक , लेखिका अनिता पाध्ये , उत्कर्षा मालिया , संजीव पाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच सुपरस्टार राजेश खन्ना यांचे असंख्य चाहते उपस्थित होते. श्री. विलास घाटे यांच्याकडे सुपरस्टार राजेश खन्ना संबंधित माहिती संग्रह , राजेश खन्ना यांच्या सर्व चित्रपटांच्या , गीतांच्या व्हिडिओ / आॅडिओ कॅसेट , सीडी , एल पी रेकाॅर्ड , अनेक चित्रपट परिक्षणे , आणि लेखांची पेपर कात्रणं असे जे मोठे कलेक्शन आहे ते या देशात बहुतेक कुणाकडेच नाही. श्री.विलास घाटे ह्यांच्या सुपरस्टार राजेश खन्ना या मोठ्या संग्रहाची नोंद लिम्का बुक मध्ये झाली आहे. श्री.विलास घाटे यांना सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या असंख्य चाहत्यांनी मनःपुर्वक अभिनंदनीय हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत ‌.

Categories
कला व मनोरंजन मुंबई

हिंदी चित्रपटातील सुरेल मधुर भक्ती गीतांची ” भक्तीरंग ” संगीत मैफल संपन्न

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी: लक्ष्मण राजे)

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात बरेच दिवस घरात बसलेल्या संगीतप्रेमी रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी आता सर्व थिएटर बंद असल्याने डिजिटल प्लॅटफॉर्म वरुन सुरेल गाण्यांची संगीत मैफल आयोजित करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे.या आॅनलाईन संगीत मैफलींना रसिक प्रेक्षकांनी पसंती दिली. त्याच अनुषंगाने निर्माता दिग्दर्शक. गायक अमित राजे प्रेझेंटस् ” भक्तीरंग ” या लोकप्रिय सुरेल हिंदी चित्रपटातील भक्तीगीतांच्या मनोरंजक कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली होती. निर्माता अमित राजे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सुमधुर, सुरेल , अविस्मरणीय लोकप्रिय भक्ती गीतांची ” भक्तीरंग ” ही सुरेल संगीत मैफल डिजिटल प्लॅटफॉर्म वरुन आॅनलाईन सादर करण्यात आली.निर्माता अमित राजे यांनी सादर केलेल्या अविस्मरणीय सुमधुर लोकप्रिय गाजलेल्या गाण्यांच्या ” भक्तीरंग ” या आॅनलाईन कार्यक्रमात कुसुम आणि अमित राजे या गायकांनी गाजलेली मधुर भक्तीगीते सादर केली.या सुरेल संगीत मैफिलीचे सुत्रसंचलन , निवेदन रत्ना हिले यांनी केले. या यशस्वी आॅनलाईन कार्यक्रमाला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. विशेषतः भारतासह कॅनडा , मास्को , यूएसए , यूएई , यूके अशा जगभरातील हिंदी चित्रपट गीतांच्या चाहत्यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. तसेच असंख्य रसिकांनी इव्हेंट आॅर्गनाईझर अमित राजे यांच्या यू ट्यूब चॅनल वरून अनेकदा आनंद घेतला . या अविस्मरणीय कार्यक्रमाच्या अभूतपूर्व यशानंतर अमित राजे यांनी डिजिटल प्लॅटफॉर्म वरुन विविध संकल्पना घेऊन सुरेल हिंदी गाण्यांच्या मैफलीचे आयोजन करून रसिकांना घरबसल्या आनंददायी सुरेल , मधुर हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहीन असे मनोगत व्यक्त केले .

Categories
कला व मनोरंजन पुणे

पुण्याच्या अभिनेत्री पुष्पा चौधरी यांनी पटकावले मुंबई ग्लोबल इंडिया स्पर्धेत मिसेस कॉन्फिडेंट अवार्ड

प्रतिनिधी. पौर्णिमा प्रकाश बुचके

ती आली ,तिने पाहिले,ती बोलली आणि ती जिंकली…खरं तरुण तरुणींचा हा मुंबई ग्लोबल इंडिया स्पर्धा कार्यक्रम… पण आपले वय बाजूला ठेऊन तरुणींना लाजवेल असा दृढ आत्मविश्वास व जिद्द या जोरावर मिसेस कॉन्फिडेंट हा किताब पटकावत देवमाणूस या झी वाहिनीवरून वंदू आत्या ही भूमिका साकारत घराघरात पोचलेल्या पुण्याच्या वारजे येथील अभिनेत्री पुष्पा चौधरी यांनी स्पर्धेत पुण्याचे नाव रोषण केले.16 डिसेंबर ला नुकतीच मुंबईत ही स्पर्धा संपन्न झाली.स्पर्धेत सर्वजण इंग्रजी झाडत असताना पुष्पा चौधरी यांनी मी विद्येचे माहेरघर पुणे येथील अभिनेत्री पुष्पा चौधरी प्रेक्षकांना अभिवादन करते.असं म्हणत मराठीची शान वाढवली.एकंदरीत सर्व स्पर्धेत त्यांचा उत्साह व आत्मविश्वास परीक्षक व प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होता.त्यांचा प्रचंड आत्मविश्वास व कामाची जिद्द या जोरावर त्यांनी हा किताब पटकावला.

या कार्यक्रमाला बाॕलीवुड मधील बऱ्याच सेलेब्रेटींनी आपली उपस्थिती दर्शविली होती. जसे की पृथ्वी, अली खान, आरती नागपाल, राजपाल यादव,सुनील पाल. शो चे अॕकरींग बाॕलीवुड अभिनेता आणि अमन वर्मा यांनी केले.संपूर्ण देशातून 30 तरुणींनी या स्पर्धेत भाग घेतला होता.

Categories
कला व मनोरंजन मुंबई

आक्रीत फिल्ममधील “धिंगाणा” सुपरहिट गीत यु ट्यूब वर प्रदर्शित

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी: लक्ष्मण राजे )

प्रसिद्ध कवी, लेखक, गीतकार, संपादक, साहित्यिक, समाजसेवक, निर्माता व दिग्दर्शक डॉ. शांताराम कारंडे निर्मित व दिग्दर्शित डॉ. शांताराम कारंडे फॅन्स फाउंडेशन प्रोडक्शन हाऊस प्रस्तुत सिद्धांत पिक्चर्सचा नवीन मोठ्या पडद्यावर प्रदर्शित चित्रपट “आक्रीत” मधील “धिंगाणा” गीत यु ट्यूबवर प्रदर्शित करण्यात आले. सदर चित्रपटात प्रमुख भूमिकेत प्रो. विवेक शिंदे सर व अभिनेत्री संजीवनी जाधव आहेत. सोबत प्रसिद्ध अभिनेत्री नूतन जयंत, दिपाली मोरे, भाऊ कदम व डॉ. शांताराम कारंडे देखील आहेत.
सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेते असलेले डॉ. कारंडे व्यवसायाने आर्किटेक्ट व बिल्डर असून त्यांना मराठी नाटक व चित्रपट निर्माण करण्याची आवड आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी आत्तापर्यंत १३ मराठी नाटक व १५ मराठी, हिंदी व तामिळ शॉर्टफिल्मची निर्मिती केली आहे. लवकरच त्यांचा आक्रीत हा मोठ्या पडद्यावरील सिनेमा येत आहे.
डॉ. कारंडे यांचं साहित्यिक क्षेत्रातदेखील मोठं योगदान आहे. त्यांचे आत्तापर्यंत १० कथासंग्रह, ११ कवितासंग्रह व शेकडो विविध विषयांवरील लेख प्रकाशित आहेत. काळजाचा वेध घेणारा संवेदनशील मराठी चित्रपट आक्रीत मधील गाणे पाहण्यासाठी
https://youtu.be/Q8MdzLPoai4
या लिंकवर प्रेस करा…
कृपया dr. Shantaram Karande हे चॅनेल SUBSCRIBE करायला विसरू नका. तसेच कृपया आपली महत्वपूर्ण प्रतिक्रिया
चॅनेलच्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या !

Categories
कला व मनोरंजन मुंबई

‘रात्रीस खेळ चाले’ फेम सुप्रसिध्द अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरला नाट्य चित्रपट क्षेत्रातील कलाकारांनी दिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी: लक्ष्मण राजे )

“रात्रीस खेळ चाले” मधली शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर. सुप्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचा जन्म २७ डिसेंबर १९८८ रोजी मुंबईतील दादर येथे झाला. अपूर्वा दादर भागातच लहानाची मोठी झाली. किंग जॉर्ज विद्यालयातून ती दहावीपर्यंत शिकली व त्यानंतर तिने रुपारेल कॉलेजमधून महत्वपूर्ण Managament मधील BMS डिग्री घेतली. अपूर्वा नेमळेकर BMS शाखेतील पदवीधर आहे. अपूर्वा नेमळेकरनं आपल्या करिअरची सुरुवात एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीतून केली. ती इव्हेंट प्रमोटर म्हणून काम पाहात असे. इतकेच काय तर तिच्या पहिल्या पगाराचा चेक केवळ १००० रुपयांचा होता.अपूर्वाला अभिनय क्षेत्रात कधीच यातिला नव्हतं. शिक्षण घेताना तिला ग्रॅज्युएशननंतर एमबीए करायचं होतं. परंतु , आपली मुलगी टीव्हीवर दिसावी अशी तिच्या आई-वडिलांची खूप इच्छा होती. ‘अभिनय क्षेत्रात काम करणे हे माझ्या नशिबातच लिहिले होते’ असं अपूर्वा सांगते.अपूर्वा स्वत: ज्वेलरी डिजाइनर आहे. तिच्या नावाचा इमिटेशन ज्वेलरीचा ब्रँडदेखील आहे.
सर्वात आधी ती आभास हा, या झी मराठीवरील मालिकेमधून सर्वांसमोर आली. तू जीवाला गुंतवावे मधील सौम्या तर आराधना मधील पूजा बनून ती आपल्यासमोर आली. रात्रीस खेळ चाले मधल्या शेवंताने तिला यशाच्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. दुसऱ्याच्या घरात घुसणारी बाई अस बोल्ड रोल तिने लीलया साकारलेला आहे‌.अण्णा नाईक आणि तीच जमलेलं सुत सगळीकडे चर्चेचा विषय झालेलं आहे. इश्क वाला लव, भाकरखाडी, अन यावर्षी आलेला accidental Prime minister मध्ये सुद्धा तिने काम केलय. अत्यंत मनाचा असा २०१६ चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा नाट्य परिषद पुरस्कारही तिने प्राप्त केला आहे. २०१४ मध्ये अपुर्वाचे रोहन देशपांडेसोबत लग्न झाले. २७ डिसेंबर रोजी तिला नाट्य चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवरांनी , निर्माते , कलाकार , तंत्रज्ञांनी , आणि असंख्य चाहत्यांनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Design a site like this with WordPress.com
Get started