Categories
कोल्हापूर

ज्योतिर्लिंग ग्राम विकास पॅनेलच्या शोभा पाटील यांची नेर्लेच्या सरपंचपदी निवड

कोल्हापूर:संजय पाटील

नेर्ले, ता.शाहूवाडी येथील ज्योतिर्लिंग ग्रामविकास पॅनेलच्या शोभा आण्णा पाटील यांची सरपंचपदी निवड तर उपसरपंचपदी कोमल योगेश पाटील यांची निवड झाली आहे.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत शिवसेना – राष्ट्रवादीच्या आघाडीने विजयश्री खेचून आणली. नेर्लेच्या इतिहासात २५ वर्षानंतर प्रथमच शिवसेना व राष्ट्रवादी या पक्षाचा सरपंच व उपसरपंच झाला आहे. अटीतटीच्या या निवडणुकीमध्ये शिवसेनेला लढतीमध्ये सात पैकी पाच जागांवरती यश खेचून आणण्यामध्ये बांधकाम व आरोग्य सभापती हंबीराव पाटील (बापू) तसेच मा.आम.सत्यजित पाटील (आबा) यांचे मार्गदर्शन तसेच गावातील तरुण वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
नेर्लेच्या सरपंचपदी शोभा आण्णा पाटील तर उपसरपंचपदी कोमल योगेश पाटील काल दि.२५ फेब्रुवारी रोजी निवडी एकमताने बिनविरोध करण्यात आल्या. या निवडीसाठी सरपंच एक-एक अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी पराग कानडे यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
या निवडीप्रसंगी तलाठी हिंदुराव कुंभार,ग्रामसेवक विजय पाटील, कोतवाल निवास कांबळे ,निवृत्ती पाटील (दाजी), आण्णा पाटील, पांडुरंग डांगे,महिपती दिंडे (माजी सरपंच), विनायक पाटील.सागर पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

Categories
कोल्हापूर

कोजीमाशि’ सभासदांच्या सुख दुःखात आम्ही सहभागी: दादासाहेब लाड


मुरगूड विद्यालयात चेअरमन बाळ डेळेकर यांचा सत्कार


कोल्हापूर -सुभाष भोसले
कोजीमाशी पत संस्था सभासदांच्या सुखदुःखात नेहमीच सहभागी झाल्याने राज्यात एक आदर्श संस्था म्हणून नावलौकिक प्राप्त झाला असल्याचे मत शिक्षक भारतीचे पुणे विभागीय अध्यक्ष दादासाहेब लाड यांनी केले तर मुरगूड विद्यालयाचे संस्कार हेच माझ्या जीवनाची प्रेरणा आहे. या प्रेरणेतून आणि शिक्षण प्रसारक मंडळाच्या आशिर्वादाने मिळालेल्या अध्यक्षपदाच्या संधीचे सोने करेन. असे उदगार कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष व शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे कौन्सिल सदस्य बाळ डेळेकर यांनी केले.
मुरगुड विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज मुरगूड ता. कागल येथे आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी शिक्षक नेते दादा लाड प्रमुख उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य एस.आर. पाटील होते.कोल्हापूर जिल्हा शिक्षक पत संस्थेच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा बाळ डेळेकर यांचा सत्कार प्राचार्य एस.आर. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य एस.आर.पाटील यांनी केले.यावेळी उपप्राचार्य एस.पी.पाटील,पर्यवेक्षक एस.वाय.बेलेकर,प्रा बी.एस. मडीवाल,मनोहर पाटील,संजय सूर्यवंशी,एस.बी. बोरवडेकर,ए.एच. भोई,फुलसिंग जाधव,पी एस पाटील,सौ.वाय.ई.देशमुख,
शशांक कोंडेकर,विराजित घोरपडे,आर जी पाटील,वाय. आर बेलेकर,एम एस कांबळे, संपत कोळी उपस्थित होते.
सूत्रसंचालन एम.बी.टेपुगडे,
आभार एस.पी.पाटील यांनी मानले

Categories
कोल्हापूर

श्रीमती सुशिलादेवी मल्हारराव देसाई युवती सचेतना फौंडेशन शाखेचे उद्धाटन.

कोल्हापूर- सुभाष भोसले
श्रीमती सुशिलादेवी मल्हारराव देसाई यांच्या स्मरणार्थ दिनांक १७/०२/२०२१ रोजी श्री शाहू हायस्कूल ज्युनिअर काॅलेज मध्ये गोपाळराव गोखले महाविद्यालयाच्या प्राध्यापिका व संस्थेच्या प्रशासन अधिकारी डाॅ.मंजिरीताई देसाई मोरे यांच्या प्रेरणेने झालेल्या सुशिलादेवी मल्हारराव देसाई युवती सचेतना फौंडेशन शाखेचा उद्घाटन सोहळा काॅलेजच्या प्रांगणात पार पडला. शिक्षण प्रसारित मंडळ कोल्हापूर संचलित श्री शाहू हायस्कूल ज्युनिअर काॅलेज कागल येथे सुशिलादेवी मल्हारराव देसाई स्मृतिदिन व सुशिलादेवी मल्हारराव देसाई युवती सचेतना फौंडेशन कोल्हापूर शाखा श्री शाहू हायस्कूल ज्युनिअर काॅलेज येथे संयुक्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला . अध्यक्षस्थानी काॅलेजचे प्राचार्य जे.डी.पाटील उपस्थित होते. शिक्षण महर्षी एम.आर.देसाई यांच्या पत्नी श्रीमती सुशिलादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.श्री एन एन गिरी यांनी केले.व्याख्याता प्रा.सौ. एस. एस. पाटील यांनी युवती सचेतना फौंडेशनच्या उदिष्टावर प्रकाश टाकून आईसाहेबांच्या जीवनकार्याची माहिती दिली.तसेच प्राचार्य श्री जे.डी.पाटील यांनी अध्यक्षिय मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प्राचार्य श्री जे.डी.पाटील उपमुख्याध्यापक श्री बाळ डेळेकर , उपप्राचार्य श्री बी.के.मडीवाळ पर्यवेक्षिका सौ.एस.ए.कुलकर्णी आदी मान्यवरांसह सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Categories
कोल्हापूर शैक्षणिक

आमदार तुपाशी शिक्षक उपाशी

कोल्हापूर:संजय पाटील

आमदार स्थानिक विकास निधीमध्ये एक कोटीची वाढ करणारे महाविकास आघाडी शासनाने अनेक वर्षे वेतनपासून वंचित ठेवलेल्या शिक्षक शिक्षकेत्तर प्रति असणारी असलेली दृष्ट मानसिकता संपुष्टात आणून सदर बांधवाना तात्काळ न्याय देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कार्याध्यक्ष तथा नागपूर विभाग शिक्षक आमदार नागो गाणार यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शासन निर्णय दिनांक २३ फेब्रुवारी२०२१ अन्वये आमदार स्थानिक विकास कार्यक्रमा अंतर्गत सन २०२०-२१ या आर्थिक वर्षापासून प्रतिवर्षी रुपये एक कोटीची वाढ करण्यात आली ही वाढ करताना शासनाला कोरोना संकट आडवे आले नाही. परंतु राज्य मंत्रिमंडळाने तीन वेळा घेतलेले निर्णय त्या आधारावर निर्गमित केलेली शासन निर्णय विधिमंडळात मंजूर केलेल्या निधी या सर्व संवैधानिक बाबी पूर्ण झाल्या असताना शासनाने शिक्षकांना दिनांक १ एप्रिल २०१९ पासून २०टक्के वेतन अनुदान व वीस टक्के वाढीव वेतन अनुदान वितरित करण्याचा शासन आदेश निर्गमित केला नाही . तसेच व घोषित शाळा व नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांना निधी सह अनुदानास पात्र घोषित करण्याचा निर्णय घेऊन आदेश निर्गमित केला नाही . शिक्षक शिक्षकेतर प्रति शासनाची दृष्ट मानसिकता सुस्पष्ट करणाऱ्या या घटनेचा शिक्षक शिक्षकेत्तर समुदायाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त होत आहे. म्हणून शासनाने आपली दृष्ट मानसिकता संपुष्टात आणून २० टक्के वेतन अनुदान व २० टक्के वाढीव वेतन अनुदान वितरित करण्याचा आदेश तसेच घोषित शाळा व नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांना निधी सह अनुदानास पात्र घोषित करण्याचा आदेश तात्काळ निर्गमित करण्याची मागणी सदर निवेदनात करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभाग कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिली आहे .

Categories
कोल्हापूर

संत गाडगेबाबांचे विचार आत्मसात करा- अनिल चव्हाण

लोकराज्य जनता पार्टीच्या वतीने संत गाडगे महाराज जयंती साजरी.


कोल्हापूर: सुभाष भोसले
संत गाडगेबाबांनी आपल्या उभ्या आयुष्यात अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता ,जातीभेद निर्मूलन याबरोबरच समाजसुधारणेचे महान कार्य केले. गावोगावी स्वच्छता मोहीम राबविण्या बरोबरच कीर्तनातून लोकप्रबोधनाचे महान कार्य केले. ‘कर्ज काढून तीर्थयात्रा करू नका, देव देवळात नसून तो दीनदु:खीतापाशी आहे ,म्हणून गोरगरिबांना मदत करावी ‘असा उपदेश गाडगेबाबांनी कीर्तनातून केला. संत गाडगेबाबांचे महान कार्य व विचार प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजेत असे प्रतिपादन लोकराज्य जनता पार्टीचे अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी केले .सानेगुरुजी वसाहत येथील लोकराज्य जनता पार्टीच्या कार्यालयात संत गाडगेबाबा यांची 145 वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी अनिल चव्हाण बोलत होते. गाडगेबाबांच्या प्रतिमेस पुष्पहार सौ. संध्या कुराडे यांच्या हस्ते घालण्यात आला. प्रास्ताविक सुधाकर डोनोलिकर यांनी केले. आभार सर्जेराव भोसले यांनी मानले.यावेळी सौ .जयश्री चव्हाण, मनोहर कुराडे, सुनील कुंभार ,शशिकांत जाधव ,अभिजित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Categories
कोल्हापूर शिराळा

मा. खासदार धैर्यशील माने यांची शिरोळतालुक्यातील दत्तवाड व नवे दानवाड या गावांना भेटी

मा. खासदार धैर्यशील माने यांनी शिरोळतालुक्यातील
दत्तवाड व नवे दानवाड या गावांना भेट दिली. दरम्यान भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये मयत झालेल्या नागरिकांच्या घरी भेटून सांत्वन केले तसेच हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या नागरिकांची दत्तवाड ग्रामीण रुग्णालयामध्ये भेट घेऊन चौकशी केली व डॉक्टरांना योग्य उपचारांबाबत सूचना केली. मयत झालेल्या नागरिकांच्या वारसांना व जखमी नागरिकांना शासनाकडून मदत मिळण्याच्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करण्याच्या सुचना संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी दिल्या. तसेच दत्तवाड व नवे दानवाड ग्रामपंचायतीमध्ये विविध विकासकामे व कोरोनाबाबात आढावा बैठक घेतली.


यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख वैभव उगळे, सहाय्यक
पोलिस निरीक्षक विकास आडसुळ, गुरुदत्त शुगर्स संचालक बबन चौगले, माजी सरपंच बी.वाय. शिंदे, प्रा.चंद्रकात मोरे, सौ. वंदना कांबळे सरपंच नवे दानवाड, माजी सरपंच प्रकाश परीट, लाडखान डे.सरपंच, हरिश्चंद्र कांबळे, तानाजी मोहिते, हरिश्चंद्र कांबळे, प्रकाश परीट, माजी सरपंच, सुरेश दळवी,
अशोक पाटील, बादशहा मुल्ला, पोपट चौगुले, रजपूत सर, शिवाजी साळुखे, सागर परीट, नवे दानवाड ग्रामपंचायत सदस्य, दत्तवाड नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य, शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Categories
कोल्हापूर क्रीडा

राष्ट्रीय सबज्युनियर व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी कागलच्या खेळाडू व प्रशिक्षक यांची अभिनंदनीय निवड


कोल्हापूर- सुभाष भोसले
पन्हाळा येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय सबज्युनियर व्हॉलीबॉल स्पर्धेमधून कागल मधिल शाहू हायस्कूल ज्युनियर कॉलेजचे व क्रीडा विकास फाउंडेशन कागल,भगवा रक्षक व्हॉलीबॉल क्लब कागल चे खेळाडू कुमार मयूर सुतार व कुमारी स्मृती पोटले यांची महाराष्ट्र राज्य संघामध्ये निवड झाली आहे.तसेच महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी महेश शेडबाळे व सहाय्यक प्रशिक्षक कधी प्रवीण मोरबाळे यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्याचा संघ वेल्लूर तामिळनाडू येथे होणाऱ्या राष्ट्रीय सबज्युनिअर व्हॉलीबॉल स्पर्धेत सहभागी होणार आहे सदर स्पर्धा 24 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2021 दरम्यान संपन्न होणार आहेत.
खेळाडूंना भारतीय व्हॉलीबॉल संघाचे सह सचिव व महाराष्ट्र राज्य हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव बाळासाहेब सुर्यवंशी, शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव जयकुमार देसाईसो, पेट्रन कौन्सील सदस्य दौलत देसाई ,प्रशासन अधिकारी मंजिरी मोरे(देसाई),उपाध्यक्ष शिवाजी सावंत यांचे प्रोत्साहन व शाहू हायस्कूल ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य जे.डी पाटील, कोजिमाशि चेअरमन व उपमुख्याध्यापक बाळ डेळेकर,उपप्रचार्य बी . के . मडीवाळ, श्री एस जी पाटील पर्यवेक्षिका सविता कुलकर्णी, श्री एस यु देशमुख ,भगवा रक्षक व्हॉलीबॉल क्लबचे अध्यक्ष नितीन दिंडे ,चंद्रकांत कासोटे,वैभव आडके यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सर्व खेळाडू व प्रशिक्षक यांचे अभिनंदन होत आहे .

Categories
कोल्हापूर

कोल्हापूर अहमदाबाद विमान सेवेचा शुभारंभ

प्रवाशांच्या लक्षणीय प्रतिसाद

गोकुळ शिरगाव प्रतिनिधी
डॉ राजेंद्र सूर्यवंशी
कोल्हापूर ते अहमदाबाद या विमान सेवेचा आज शुभारंभ झाला असून पहिल्याच विमानांमधून ५९ प्रवासी कोल्हापूरला आले असून कोल्हापूर हून अहमदाबादला ५४ प्रवाशांनी प्रयाण केले. सकाळी ठीक अकरा वाजून अकरा मिनिटांनी अहमदाबादहून आलेल्या इंडिको कंपनीच्या विमानाने कोल्हापूर विमानतळावर लँडिंग केले. प्रथेप्रमाणे कोल्हापूर विमानतळावर विमानाचे मान्यवरांच्या उपस्थितीत वाॅटर सॅल्यूट ने स्वागत करण्यात आले. इंडिगो एअरलाईन्सच्या कोल्हापूर अहमदाबाद विमान सेवेमुळे कोल्हापुर , इचलकरंजी, कराड व सातारा येथील व्यापारी व उद्योजकांची मोठी सोय झाली असून विमान सेवेला मिळत असलेला प्रतिसाद पाहता सदर विमानसेवा आठवड्यातील सातही दिवस सुरू करण्याचे सूतोवाच विमानतळ प्रशासन व खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी केले.
यावेळी कोल्हापूर विमानतळावरून देशातील प्रमुख शहरांना जोडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे खासदार संजय मंडलिक यांनी सांगितले तसेच बऱ्याच वर्षापासून मागणीअसलेली अहमदाबाद विमानसेवा सुरू झाल्याचा आनंद असून विमानतळाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले. तसेच विमानतळ अधिकाऱ्यांनी विमानतळावरील विकासकामांना अधिकाधिक गतीमान करण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज असल्याचे मत आमदार चंद्रकांत जाधव यांनी केले विमानतळाच्या विमानतळ संचालक कमल कुमार कटारिया यांनी विकासासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मंत्री खासदार आमदार चेंबर ऑफ कॉमर्सचे व कमिटीचे सदस्य यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी अहमदाबाद साठी प्रथम प्रवासी म्हणून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री एग्रीकल्चर चे ललित गांधी यांनी प्रवास केला.
यावेळी खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, कोल्हापूर विमानतळाचे संचालक कमल कुमार कटारिया, अॅड. सुरेश कुराडे, विजय अग्रवाल, विज्ञान मुंडे, अमर गांधी, अमित हुक्केरी, विजय घाडगे, विक्रांत सिंह कदम, इंडिगो एअरलाइन्सचे एअरपोर्ट मॅनेजर विशाल भार्गव आदी मान्यवर उपस्थित होते.


तिरुपती कोल्हापूर तिरुपती विमान सेवा ही सुरू
कोल्हापूर विमानतळावरून कोरोणा संसर्गामुळे खंडित झालेली तिरुपती मार्गावरील विमानसेवा आजपासून सुरू झाली असून या विमान सेवेलाही प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

Categories
कोल्हापूर

अनंतशांती संस्थेचे कार्य समाजाला प्रेरणादायी हिताचे : अमित वेंगुर्लेकर


कोल्हापूर- सुभाष भोसले
तळागाळात काम करणाऱ्या आणि समाजासाठी आपले योगदान देणाऱ्या लोकांची निवड करून त्यांना पाठबळ देण्याचे काम अनंतशांती सामाजिक संस्था करत आहे.असे प्रतिपादन ह्युमन राइट्स प्रोटेक्शन ट्रस्ट चे प्रदेश महासचिव अमित वेंगुर्लेकर यांनी केले. ते अनंतशांती सामाजिक संस्थेने वितरित केलेल्या सामाजिक आणि जिजाऊ पुरस्कार प्रसंगी बोलत होत.अध्यक्षस्थानी महंमद शेख हे होते.
रविश पाटील पुढे म्हणाले.आजकाल समाजात असे पुरस्कार देऊन पाठबळ देणारे लोक मोजकेच आहेत.अनंतशांतीने सर्वसामान्य लोकांना पुरस्कार देऊन आणखीन काम करण्याची त्यांच्यात उर्जा निर्माण केली आहे.असेच कार्य या संस्थेने राबवावे.
कार्यक्रमात रविश पाटील, अमित वेंगुर्लेकर ,अनिशा पाटील,प्रकाश कांनकेकर सर,संजय शिंदे आदींनी आपली मनोगते व्यक केलीत
कार्यक्रमात ४०च्या वर माहिला व पुरुष यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.प्रमाणपत्र व ट्रॉफी व मानाचा फेटा असे पुरस्काराचे स्वरूप होते.
जिजाऊ पुरस्कार असे- श्वेता पोवार,अनिशा पाटील, वैशाली चौगले,सविता जाधव, शैलजा कांनकेकर ,सविता बुगडे,सविता कवडे, सुवर्णा पाटील,आश्विनी शिंदे,सुजाता हुंदळकर,रेश्मा पाटील,मदिना मुजावर ,ज्योती नगारे आदी तर स्वामी विवेकानंद पुरस्कार कर्ते -रविष पाटील,सुभाष चौगले,रणजित जाधव,सम्राट शेंडगे,साताप्पा कुरणे,उमेश पोवार, एकनाथ पाटील,डॉ.एस. डी. पाटील,सचिन चौगले,सर्जेराव पाटील,शाम चौगले,समीर मकांनदार,सतीश शिंदे,सागर सावंत,चंद्रकांत बुगडे,आदी
कार्यक्रमास संस्थापक अद्यक्ष भगवान गुरव,मदन कोरे,राविष पाटील,महंमद शेख,अमित वेंगुर्लेकर,संजय शिंदे,महेश नंदे, प्रकाश कांनकेकर सर,अभिजित शिंदे,श्वेता पोवार,अनिशा पाटील ,आदी मान्यवर उपस्थित होते,या कार्यक्रमास मदन कोरे (सर) संकल्प अॕकडमी यांनी मोलाचे सहकार्य केले.
स्वागत संदीप कांबळे यांनी, सूत्रसंचालन शाम चौगले यांनी तर आभार अभिजित कांबळे यांनी मानले.

Categories
कोल्हापूर

शिक्षकांना न्याय द्या अन्यथा भविष्यात याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील माजी खासदार श्री. राजू शेट्टी यांनी आझाद मैदानावर दिली आंदोलनास भेट

दै.हिंदुसम्राट / प्रतिनिधी संतोष चव्हाण
मुबंई:-आज सोमवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार श्री.राजू शेट्टी यांनी आझाद मैदानावर विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनला भेट दिली. राज्यातील विविध विनाअनुदानित शिक्षक संघटना एकत्र येऊन शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रलंबित न्याय मागण्यांसाठी गेल्या 18 दिवसांपासून सुरू आहे.राज्यातील जवळपास साठ हजारहुन अधिक शिक्षकांची गेल्या 20 वर्षांपासून होत असलेली अवहेलना व शिक्षकांच्या अनुदानबाबतची सद्य परिस्थिती समन्वय संघाचे समन्वयक श्री.खंडेराव जगदाळे सर यांनी शेट्टी साहेबांसमोर कथन केली.तसेच हे सरकार निधी उपलब्ध असूनही हेतुपुरस्सर कसे दुर्लक्ष करत आहे याचा पाढा वाचला.
यावेळी बोलताना श्री.राजू शेट्टी म्हणाले की आजच्या या परिस्थितीला सद्याचे व पुर्वीचे दोन्ही राज्यकर्ते जबाबदार असून आता तरी त्यांनी एकमेकांना दोष देणे थांबवावे.ते पुढे म्हणाले की भारतीय संस्कृतीत गुरूला अनन्यसाधारण महत्त्व असून ते वंदनीय आहेत.मात्र आज त्यांना हक्काचा पगार नाकारून राज्यकर्ते मोठे पाप करत आहेत.या शिक्षकांना उपाशीपोटी राबवून घेणे अजिबात व्यवहारार्य नसून संतापजनक आहे.तसेच या प्रश्नांवर सर्व शिक्षक संघटना एकत्र आल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.शांततेत व सनदशीर मार्गाने जर सरकार जुमानत नसेल तर मग मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा गनिमी कावा वापरून यश खेचून आणण्याचा कानमंत्र त्यांनी यावेळो दिला. शिवाय औरंगाबाद आंदोलनमध्ये शिक्षकांवर दाखल झालेले खोटे गुन्हे व आजवरच्या शिक्षकांच्या संघर्षाचा देखील उहापोह केला.तसेच खंडेराव जगदाळे सर हे माझ्या शिरोळ गावचेच असून त्यांचे विनाअनुदानितसाठीचे कार्य प्रशंसनीय आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

यावेळी समन्वय संघाचे श्री.ज्ञानेश्वर शेळके,सौ.नेहा गवळी,श्री.दीपक कुलकर्णी, श्री.राहुल कांबळे,श्री.कर्तारसिंग ठाकूर आणि इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते.

Categories
कोल्हापूर

बाबासो कुंभार यांचा गुरुवर्य डी. डी. आमगावकर शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा विकास ट्रस्टकडून सन्मान

कोल्हापूर:संजय पाटील

बाबासो मारुती कुंभार
सहा. शिक्षक, श्री. विलासराव शामराव तळप – पाटील माध्यमिक विद्यालय,
गोगवे ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर या ठिकाणी कार्यरत आहेत.विज्ञान विषयाचे तज्ज्ञ अध्यापक या नात्याने विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड निर्माण व्हावी; म्हणून सतत कार्यरत. विज्ञान विषयाचा पुनर्रचित पाठ्यक्रम, अविरत प्रशिक्षण आणि आय.सी.टी. विषयाचे राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले आहे. याशिवाय कला, कार्यानुभव व शारीरिक शिक्षण विषयाचेही जिल्हास्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शन म्हणून काम केले आहे. शाळेतील सांस्कृतिक, क्रीडा आणि महाराष्ट्र छात्र सेना विभागात सक्रिय सहभाग असतो.
त्यांच्या या बहुमोल कार्याचा गौरव व्हावा; म्हणून
आणि यापुढेही त्यांच्या हातून उत्तुंग कार्य घडण्यासाठी प्रेरणा मिळावी या हेतूने त्यांना
‘डी. डी. आसगावकर गौरव पुरस्कार’
देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
गुरुवर्य डी.डी.आसगावकर संस्थापक,सचिव, सांगरुळ शिक्षण संस्था, सांगरुळ यांनी कोल्हापूरच्या पश्चिमेकडील डोंगराळ, दुर्गम भागात कार्यरत असलेल्या सांगरुळ शिक्षण संस्थेचा शाखाविस्तार केला. या हीरकमहोत्सवी संस्थेच्या कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यात एकंदर १७ शाखा कार्यरत आहेत. संस्थेचे एकूण
३०० कर्मचारी असून सुमारे ७००० विद्यार्थी संस्थेत शिक्षण घेत आहेत. संस्थेच्या सचिव पदावरुन संस्थेचा हा डोलारा यशस्वीपणे सांभाळत डी. डी. आसगावकर सरांनी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ व कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाला उर्जितावस्था प्राप्त करुन दिली. श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस या संस्थेच्या विकासात सक्रिय सहभाग घेतला. तसेच संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या आर्थिक गरजा भागविणेसाठी सहकारी पतसंस्थेची स्थापना केली.त्यामुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थतीतही असंख्य गोरगरिबांचे संसार उभे
राहिले. त्यांचे असंख्य माजी विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर, उद्योजक, उच्चपदस्थ अधिकारी बनून सेवा बजावत आहेत. असे अलौकिक कार्य करणाऱ्या या विभूतीच्या नावे हा पुरस्कार दिला जातो.या पुरस्कार वितरण प्रसंगी आम.प्रा.जयंत आसगावकर,शिक्षणाधिकारी किरण लोहार आम.चंद्रकांत जाधव,आम. ऋतुराज पाटील तसेच शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
मा. आमदार प्रा. जयंत दि.आसगावकर अध्यक्ष
गुरुवर्य डी. डी. आमगावकर शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा विकास ट्रस्ट यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
बाबासो कुंभार यांना पुरस्कार मिलेल्याबद्दल शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातुन त्यांच्यावर कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

Categories
कागल कोल्हापूर

कागल मध्ये मोफत महिला आरोग्य मेळावा संपन्न.


खास महिलांसाठी वाण आरोग्याचं मोफत तपासणी केली गेली. महिला राष्ट्रवादी काँग्रेस,कागल नगरपरिषद व राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेवेच्या वतीने आयोजित.


कागल/प्रतिनिधी◆गोरख कांबळे.
ग्रामविकास मंत्री नाम. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा सौ. शितल फराकटे, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. हरीश पाटील, नगराध्यक्षा सौ माणिक माळी,आरोग्य सभापती शोभा लाड, महिला बालकल्याण सभापती नूतन गाडेकर, नगरसेविका माधवी मोरबाळे, कागल शहर महिला अध्यक्ष पद्मजा भालबर, सुषमा पाटील आदी उपस्थित होते.
कागल ग्रामीण रुग्णालतील डॉ.सुनिता पाटील, डॉ. घेवडे, डॉ सादिलगे, डॉ मगदूम, डॉ संदीप पाटील, डॉ गीता पिलाई, डॉ जयंता पाटील, डॉ. नीलिमा पाटील, डॉ सुनिता पाटील, डॉ शैलेश पाटील,डॉ पुनम पाटील यांनी रुग्णांची तपासणी केली.
या शिबिरामध्ये हृदयरोग, मधुमेह, अस्थीरोग, स्त्रीरोग, नेत्ररोग, दंतरोग, हाडाचे रोग व इतर सर्व रोगांवरील तपासणी करण्यात आली व गरजू रुग्णांची मोफत ब्लड टेस्ट घेऊन औषधे वाटप करण्यात आली. कागल व परिसरातील 380 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.

Categories
कागल कोल्हापूर

भारती कांबळे यांनी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून ज्ञानदानाचे काम प्रामाणिकपणे केले: सुवर्णा सावंत यांचे प्रतिपादन.


कागल/प्रतिनिधी◆गोरख कांबळे.
भारती कांबळे यांनी विध्यार्थी केंद्रबिंदू मानून ज्ञानदानाचे काम प्रामाणिकपणे केल्याचे प्रतिपादन एस.एस.सी बोर्डाच्या सहसचिव सुवर्णा सावंत यांनी केले.त्याव्हन्नूर (ता.कागल)येथील श्री. दौलतराव निकम माध्यमिक विद्यालयातील सहाय्यक शिक्षिका सौ.भारती कांबळे यांच्या सेवानिवृत्ती प्रसंगी बोलत होत्या.अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्षा श्रीमती.सुनंदा निकम होत्या.सौ.सावंत पुढे म्हणाल्या, प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारती कांबळे यांनी आपल्या प्रभावी व उत्कृष्ट अध्यापनाद्वारे आदर्श विद्यार्थी निर्माण केले.
कागल तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस.टी.चौगुले म्हणाले,भारती कांबळे यांनी महिलाशिक्षकांसाठी आदर्शवत काम करून समूहगीत व गीतगायन प्रकारात प्रशंसनीय काम केले आहे.
यावेळी मनोज जिरगे,कांबळे सर,माजी विद्यार्थीनी रोहिणी पाटील,कृष्णाबाई पाटोळे, समृद्धी पाटील तर प्रशालेच्या विद्यार्थिनी समृद्धी निकम,अमृता पोवार यांनी आपली मनोगते व्यक्त केली.प्रशालेच्या वतीने सौ.कांबळे यांना मानपत्र देण्यात आले.
यावेळी गावातील विविध संस्था,ग्रामपंचायत,माजी विद्यार्थी,नातेवाईक, यांच्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आला व कांबळे यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दौलतराव निकम यांचा आदर्श मानून आपण काम करत असल्याचे सांगून शेवटच्या श्वासापर्यंत या शाळेच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील राहू असे सांगितले.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक व्ही.जी.पोवार यांनी केले.सूत्रसंचालन एम.जी.मोरे यांनी केले तर आभार बी.बी खाडे यांनी मानले.

Categories
कागल कोल्हापूर

जीवनात आई व गुरु हेच आपले मार्गदर्शक- शिक्षक नेते दादासाहेब लाड


बाळ डेळेकर व जे .डी.पाटील यांचा सत्कार संपन्न
कोल्हापूर- सुभाष भोसले
जीवनाला आकार देणारे शिक्षक, आई-वडील हेच आपले खरे मार्गदर्शक असतात ,त्यांचा आपण आदर, सन्मान राखला पाहिजे असे प्रतिपादन शिक्षक नेते श्री दादासाहेब लाड यांनी केले ते श्री शाहू हायस्कूल,ज्युनियर कॉलेज कागल येथे आयोजित सत्कार समारंभात बोलत होते. शिक्षण प्रसारक मंडळाच्या कौन्सिल सदस्य पदी निवड झाल्याबद्दल बाळ डेळेकर यांचा तर महाराष्ट्र मुख्याध्यापक संघाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल प्राचार्य जे .डी.पाटील यांचा सत्कार शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या हस्ते करण्यात आला.माझ्या वाटचालीत शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी जयकुमार देसाईसो, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, युवा नेते व पेट्रन सदस्य दौलतराव देसाईसो, प्रशासन अधिकारी मंजिरी मोरे -देसाईसो ,शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच शिक्षक नेते दादासाहेब लाड यांचेही योगदान मोलाचे आहे असे प्रतिपादन शाहू हायस्कूलचे उपमुख्याध्यापक व कोजिमाशिचे नूतन चेअरमन बाळ डेळेकर यांनी केले.माझा सन्मान हा माझ्या प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान आहे असे प्रतिपादन प्राचार्य जे.डी.पाटील यांनी केले यावेळी उपप्राचार्य बी .के. मडिवाळ,पर्यवेक्षिका सौ एस. ए .कुलकर्णी , श्री एस जी पाटील, श्री एस यु देशमुख ,एस आर पोतदार,के एच भोकरे, टी सी सुतार,सर्व शिक्षक- शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते सूत्रसंचालन के. आय. जमादार तर आभार पर्यवेक्षिका सौ .एस. ए .कुलकर्णी यांनी मानले.

Categories
कागल कोल्हापूर

कागल येथे विभागीय व्हॉलीबॉल निवड चाचणी संपन्न


कोल्हापूर- सुभाष भोसले
कागल मधील शाहू हायस्कूल मौदानात १६ वर्षाखालील मुलांची विभागीय व्हॉलीबॉल निवड चाचणी संपन्न झाली.सदर संघ पन्हाळा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सब ज्युनियर अजिंक्य स्पर्धेसाठी खेळणार आहे. या निवडी प्रसंगी महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव बाळासाहेब सुर्यवंशी,माजी उपनगराध्यक्ष नितीन दिंडे, राष्ट्रीय व्हॉलीबॉल कोच महेश शेडबाळे, चंद्रकांत कासोटे, प्रंशात दळवी,माजी राष्ट्रीय खेळाडू समीर खोडवे,संदिप शिंदे, योगेश माडवकर,प्रंशात म्हातुकडे,अमोल सुतार उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रविण मोरबाळे तर आभार वैभव आडके यांनी मानले. विभागीय संघ पुढील प्रमाणे करण फराकटे कोच,अभिषेक भुरले संघव्यवस्थापक,विवेक साळोखे कर्णधार, जीवक वाघमारे, विनित चव्हाण, मयुर सुतार, सुमित पाचगावे,मयुर कदम, विजय निमंग्रे, राजवर्धन पाटील, कुणाल साळगावकर, आदित्य मांगले, मानव साठे,तनिष खरात

Categories
कोल्हापूर गुन्हेगारी

कोल्हापूर येथे खुनाचा काही तासातच उलगडा: सोन्यासाठी केली ८० वर्षांच्या वृद्धेची हत्या

पन्हाळा हिंदूसम्राट प्रतिनिधी प्रदिप सुतार यांजकडून

कोल्हापूर :: राजाराम तलाव इथं अर्धवट जळालेल्या स्थितीत एक मृतदेह आहे, अशी वर्दी पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता राजराम तलाव परिसरात धाव घेतली. क्षणाचाही उसंत न घेता पोलिसांनी या प्रकरणात कसून तपास केला आणि सायंकाळपर्यंत संशयिताच्या हाती बेड्या ठोकल्या. प्रथम दर्शनी तपासासाठी अत्यंत किचकट असणारा या गुन्ह्याचा तपास पोलिसांनी काही तासात लावला. या खुनाच्या गुन्ह्यात पोलिसांनी संतोष निवृत्ती परीट या ३५ वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे.
संतोष हा कर्जबाजारी असून या वृद्ध महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरण्यासाठी हा खून केल्याचे निष्पन्न झालेले आहे. तर मयत महिलेचे नाव शांताबाई श्यामराव आगळे (८०, रा. जगताप कॉलनी) पाचगाव असे निष्पन्न झाले आहे.एक महिलेचा अर्धवट स्थितीत जळालेला मृतदेह मिळल्याची बातमी कोल्हापूर शहरात वाऱ्यासारखी पसरली होती. पोलिसही या गुन्ह्यामुळे चक्रावून गेले होते. या महिलेची ओळख पटवणे हे पोलिसांसमोरील सर्वांत मोठे आव्हान होते.पोलिसांनी तातडीने गेल्या काही दिवसांतील मिसिंग रेकॉर्ड तपासण्यास सुरुवात केली. त्यातून त्यांना पाचगावमधील शांताबाई आगळे बेपत्ता असल्याची तक्रार नोंद असल्याचं दिसून आलं. पोलिसांनी तातडीने त्यांच्या नातेवाईकांना बोलवून घेत मृतदेहाच्या अंगावरील कपडे इतर काही वस्तू यावरून नातेवाईकांनी शांताबाई यांचाच हा मृतदेह असल्याचं सांगितलं.यानंतर पोलिसांनी चौकशी सत्र सुरू केले. पोलिसांना सूत्रांकडून संतोष परिट या व्यक्तीबद्दल संशयास्पद माहिती मिळाली. संतोष हा टाकाळा येथील रहिवाशी असून तो गेली ५ वर्ष शांताबाई आणि त्यांच्या नातेवाईकांना ओळखतो.पोलिसांनी संतोषला ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली.संतोष हा कर्जबाजारी आहे. शांताबाई यांच्या अंगावर सोन्याचे दागिने असतात याची माहिती त्याला होती. ५ फेब्रुवारीला त्यांने शांतबाई यांना देवकार्य करण्याच्या बहाण्याने स्वतःच्या घरी बोलवले आणि तिथं त्यांचा खून करून त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेतले.पोलिस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत.
तपास पथक – पोलीस अधीक्षक डॉ.शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, उप विभागीय पोलिस अधिकारी मंगेश चव्हाण, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, राजारामपुरी पोलिस ठाणेचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल, पोलिस निरीक्षक संदिप कोळेकर पोलिस निरीक्षक अनिल गुजर, सहा पोलिस निरीक्षक सत्यराज घुले, महिला सहा पोलिस निरीक्षक जौंजाळ, पोलिस उप निरीक्षक विवेक राळेभात, विनायक सपाटे, समाधान घुगे, पोलिस अमलदार अमित सर्जे, खराडे, सागर कांडगावे, अमोल कोळेकर, संदिप कुंभार, राम कोळी, अजय वाडेकर, सुरेश पाटील, अर्जुन बंदरे, तानाजी गुरव, फिरोज मुल्ला, तसेच आरसीपी टीम.

Categories
कोल्हापूर शैक्षणिक

महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा ग्लोबल टीचर अवार्ड-2020 शिक्षक मच्छिंद्र कुंभार यांना मिळाला .


कोल्हापूर- सुभाष भोसले

आदर्श हायस्कूल भामटे ता. करवीर जि. कोल्हापूर या विद्यालयातील सहाय्यक शिक्षक
श्री मच्छिंद्र रघुनाथ कुंभार यांना नुकताच मानाचा 110 देशांचा सहभाग असलेला ग्लोबल टीचर पुरस्कार 2020 ने सन्मानित करण्यात आले.

श्री कुंभार हे गणित विषयाचे अध्यापक आहेत. त्यांनी गणित विषयांमध्ये तयार केलेली 105 ॲप्स, अनेक व्हिडिओ ई- कन्टेन्ट , गणित विषयासाठी बनविलेल्या 5000 हून अधिक कृतीपत्रिका, वर्गामध्ये राबविलेले विविध नवोपक्रम त्याचबरोबर भूमितीसारखा काठिण्य पातळीचा विषय सुलभ व्हावा यासाठी त्यांनी राबवलेल्या कृतीतून शिक्षण या नवोपक्रमांची दखल विद्या प्राधिकरण पुणे (SCERT) यांनी घेतली आहे.

त्याचबरोबर नवोपक्रमाविषयीचे त्यांचे पाच लेख आंतराष्ट्रीय जर्नल मध्ये झळकले आहेत. इयत्ता नववी व दहावीच्या गणित विषयासाठी *इंटरॅक्टिव्ह ॲनिमेटेड फ्लिपबुक ही संकल्पना राबवून एका क्यूआर कोड मध्ये संपूर्ण पाठ्यपुस्तक तयार करून शिक्षकांचे अध्यापन व विद्यार्थ्यांचे अध्ययन त्यांनी सुलभ केले आहे. गणित भाग 1 व गणित भाग 2 या दोन्ही पाठ्यपुस्तकातील प्रत्येक घटकाला एक स्वतंत्र क्यूआर कोड तयार करून त्याचे पाठ्यपुस्तक तयार केले आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः QR कोड तयार करून आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये ते चिकटवलेले आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या साह्याने अध्ययन व अध्यापन या दोन्ही प्रक्रिया अत्यंत सुलभ होण्यास मदत झाली आहे. नियमित उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत आहेच शिवाय जर एखादा विद्यार्थी गैरहजर राहिल्यास त्याचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी QR कोडयुक्त पाठ्यपुस्तक एक वरदान ठरले आहे.

विद्यार्थ्यांच्यासाठी त्यांनी केलेल्या या व अशा विविध शैक्षणिक कार्याची दखल घेऊन AKS फाउंडेशन, दिल्ली यांनी त्यांना मानाचा ग्लोबल टीचर-2020 हा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

श्री कुंभार यांनी हे यश आपल्या सर्व विद्यार्थ्यांना, तंत्रस्नेही मित्रांना व आपल्या गुरुवर्यांना समर्पित केले आहे.
त्यांना हे सुयश मिळण्यामागे डायटचे प्राचार्य डॉ.श्री. आय. सी. शेख , माध्यमिकचे शिक्षणाधिकारी . श्री. किरण लोहार उपशिक्षणाधिकारी श्री डी. एस. पोवार करवीरचे गटशिक्षणाधिकारी श्री. एस. के. यादव , विस्तार अधिकारी मा. श्री ओतारी , श्री. डी. सी. कुंभार व श्री विश्वास सुतार , कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव श्री दत्ता पाटील व संघाचे सर्व पदाधिकारी व संचालक, आदर्श हायस्कूल भामटे ता करवीर जि. कोल्हापूरचा सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद, त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा तंत्रस्नेही टिम (TSTS) चे सर्व सन्माननीय तंत्रस्नेही शिक्षक मित्र व मुख्याध्यापक संघातील गणित-विज्ञान विषय समितीतील सर्व सन्माननीय सदस्य या सर्वांचे लाख मोलाचे सहकार्य, प्रसंगी मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले आहे. या सर्वांच्या सहकार्यामुळेच मला हे सुयश मिळाले आहे. अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
ग्लोबल टीचर अवार्ड-2020 हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या श्री मच्छिन्द्र कुंभार यांचे कौतुक होत आहे.

Categories
कोल्हापूर क्रीडा

जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा व निवड चाचणीचे १३ तारखेला आळते येथे आयोजन

जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा (१६ व १८ वर्षाखालील मुले व मुली) व निवड चाचणीचे आयोजन १३ तारखेला आळते येथे

महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन मार्फत राज्यस्तरीय १६ वर्षाखालील (२७ फेब ते १ मार्च २०२१,उस्मानाबाद) व १८ वर्षाखालील (०५ ते ०७ मार्च २०२१, बीड) या ठिकणी या स्पर्धेंचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर स्पर्धेमध्ये कोल्हापूर विभागाचा संघ साहभागी होणार आहे.त्या पूर्वी कोल्हापूर जिल्ह्याचा संघ निवड चाचणी कोल्हापूर पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या वतीने शनिवार,दिनांक १३ फेब्रुवारी २०२१ रोजी,मॉडर्न विद्यानिकेतन आळते ता.हातकणंगले या ठिकाणी स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. या स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील व्हॉलीबॉल खेळाडू,शाळा व क्रीडा मंडळानी सहभाग घ्यावा

सदर स्पर्धेमध्ये जे खेळाडू,शाळा व मंडळ सहभागी होणार आहेत त्यांनी मा.श्री.गौरव खामकर (९५११८२३७८७) व इब्राहीम शेख (८६६८७३३०४२) यांना संपर्क करावा असे संघटनेचे सचिव मा.श्री.शिवाजी पाटील यांनी कळविले आहे. सदर स्पर्धेमध्ये सहभागी होण्या-या खेळाडूंची जन्म तारीख :-१६ वर्षाखालील मुले व मुली (०१/०१/२००५) व १८ वर्षाखालील मुले व मुली (०१/०१/२००३) च्या नंतर जन्मलेले असावेत.

Categories
कागल कोल्हापूर

कागलमध्ये पोलिओ लसीकरण मोहीमेला उस्फुर्त प्रतिसाद.


कागल गोरख कांबळे.
कागलमध्ये आज रविवार दिनांक ३१ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ लसीकरणाचा डोस देण्यात आला. कागल ग्रामीण कार्यक्षेत्र नगरपरिषद कागल मधील ० ते ५ वयोगटातील बालकांना पोलिओ लस देण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिता पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कागल ग्रामीण रुग्णालय कार्यक्षेत्र नगरपरिषद कागल येथे विविध बुथवर पोलीओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. यामध्ये कागलमध्ये एकूण १९ बुथ तयार करण्यात आले आहेत. या बुथवर वेगवेगळ्या वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ती, एवढे मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे. यामध्ये ट्रान्झिट टीम व मोबाईल टीम कार्यरत राहणार आहेत.
३१ जानेवारी रोजी पोलीओपासून वंचित राहिलेल्या बालकांना २ ते ४ फेब्रुवारी २०२१ असे ३ दिवस आरोग्य कर्मचारी आशा कार्यकर्ते घरोघरी, वाडी-वस्ती, ऊसतोड टोळी,वीट भट्टी या ठिकाणी भेटी देऊन लस देणार आहेत. अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.रवी बल्लुरगी,डॉ.मदने डॉ. तृप्ती भोसले तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुनीता पाटील मॅडम यांनी दिली आहे. सर्व पालकांनी आपल्या ० ते ५ वयोगटातील बालकांना पोलिओ केंद्रावर नेऊन लस पाजून घ्यावी.कागल शहरांमध्ये २८३५बालकांना १००% लस देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे. यापैकी ७५% बालकाना पोलिओ डोस देण्यात आला आहे.
या लसीकरण मोहीमेत वैद्यकीय अधिकारी डॉ.रवी बल्लुरगी,डॉ.मदने,डॉ. तृप्ती भोसले वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनीता पाटील,पर्यवेक्षक जगन्नाथ खोत,अरुण कांबळे,श्री मुजावर, सतीश ढेकळे,डॉ. किल्लेदार मॅडम, डॉ. सुलभा पाटील ,डॉ.वाघमारे,डॉ.रत्नदिप कांबळे, रत्नाकर सिस्टर,द्रविड सिस्टर, नर्सिंग प्रशिक्षण ए.एन.एम.व सर्व ग्रामीण रुग्णालय स्टाफ उपस्थित होता.

Categories
कोल्हापूर शैक्षणिक

संचमान्यतेचे अधिकार शिक्षण उपसंचालक यांना देण्यात यावे – श्री खंडेराव जगदाळे

हिंदुसम्राट प्रतिनिधी/ संतोष चव्हाण कोल्हापूर
संचमान्यता बाबत शिक्षण उपसंचालक यांना अधिकार देण्यात यावे याकरिता मा शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांची मुंबई येथे मा पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, व मा आ.जयंत आसगावकर यांच्या समवेत काही दिवसापूर्वी भेट घेतली होती, त्यावेळी शिक्षणमंत्री महोदया यांनी ही मागणी मान्य केली होती,त्या अनुषंगाने आज पुणे येथे मा आयुक्त कार्यालय, व शिक्षण संचालक येथील अधिकारी यांच्या भेटी घेतल्या ,संचमान्यता नसल्याने अनुदानासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत, पदे असताना ही संचमान्यता चुकल्यामुळे सतत पुणे येथे येण्यास राज्यातील विविध जिल्ह्यातील मुख्याध्यापक,शिक्षकांना त्रासाचे होत आहे, त्यामुळे या अडचणी समजून पूर्वीप्रमाणे शिक्षण उपसंचालक यांना अधिकार देण्यात यावेत जेणेकरून राज्यातील विविध लोकांना होणारा त्रास होणार नाही, याबाबत यापूर्वी मा शिक्षणमंत्री महोदया यांना याबाबत सविस्तर माहिती दिली आहे,
याबाबत आपल्या स्तरावरून लवकर निर्णय घ्यावा ही विनंती
मा आयुक्तसो व मा संचालक सो यांना करण्यात आली यावेळी म.रा.का.वि.कृ.समितीचे राज्य उपाध्यक्ष मा.श्री.खंडेराव जगदाळे, मा प्रकाश पाटील, मा गजानन काटकर, जनार्धन दिंडे, रामराजे सुतार, सावंता माळी, हे उपस्थित होते,

Categories
कागल कोल्हापूर

कागल तालुक्यातील १२ गावांमध्ये सरपंचपदाचे आरक्षण अनु. जाती प्रवर्गाकडे.


कागल◆गोरख कांबळे.
कागल तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये स्थापनेपासून आजतागायत सरपंच पदासाठी होत असलेल्या आरक्षण सोडतीमध्ये अनुसुचित जाती प्रवर्ग हा काही ठिकाणी या आरक्षणापासून अजूनही वंचीतच राहिला होता. रोटेशन पद्धतीनुसार ग्रामपंचायत स्थापनेपासून झालेल्या सर्व निवडणूकीत अनुसुचित जाती प्रवर्ग सोडता सर्व इतर प्रवर्गासाठी आरक्षण आरक्षित झाले.मात्र अनुसुचित जातीचे आरक्षण रोटेशन पद्धतीनुसार अद्याप का आले नाही?. हा संशोधनाचा विषय बनला होता.व याची गावामध्ये चर्चाही होत होती.त्यामुळे दलित असलेल्या या समाजातील नागरिकांना सरपंच पदाची संधी कधी मिळणार ? असा प्रश्न गावातील अनु.जाती समाजातील नागरिकामध्ये निर्माण झाला होता. ग्रामपंचायतीमध्ये दर पंचवार्षीक निवडणूकीत सोयीच्या युतीच्या आघाड्या होतात.प्रशासनातील प्रमुख पद या समाजापासून वंचीतच राहिल्यामुळे या समाजाचा विकास खुंटला होता. त्यामुळे दलित समाजाच्या भौतिक सुविधा व समस्या आहे तशाच राहील्या आहेत.
या सर्व गोष्टींचा विचार करून कागल तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतीचा निवडणूक निकाल जाहीर झाला असून सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत २७ जानेवारी रोजी पार पडली आहे. त्यामध्ये साके,सोनाळी,शेंडूर, कौलगे,लिंगनूर कापशी, बोळावी,कापशी सेनापती व बाळीक्रे,बेलेवाडी काळम्मा,नंद्याळ,मांगनूर,केनवडे,आलाबाद येथील ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण अनुसुचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.या सर्व गोष्टींचा विचार करून कागल तालुक्यातील १२ गावांमध्ये सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जाती प्रर्वगासाठी राखीव झाले.त्यामुळे कागल तालुक्यातील १२ गावामध्ये ही आनंद व्यक्त केला जात आहे.

Categories
कोल्हापूर क्रीडा

पुणे येथील ज्युनियर राज्यस्तरीय स्पर्धेत मोमेंटम अकॅडमीचे उज्ज्वल यश

पिंपरी चिंचवड पुणे येथे चालू असणाऱ्या ज्युनियर राज्यस्तरीय स्पर्धेत मोमेंटम अकॅडमीचे विजेते खेळाडू पुढील प्रमाणे
18 वर्षाखालील मुले 100 मीटर

  1. दिग्विजय चौगुले -प्रथम क्रमांक (१०.९५से.)
  2. सार्थक शेलार -द्वितीय क्रमांक(११.११से.)

18 वर्षाखालील मुले 400 मीटर

  1. अविनाश पाटील- द्वितीय क्रमांक(४९.९०से.)

20 वर्षाखालील मुले लांब उडी

  1. रामेश्वर महाडिक -तृतीय क्रमांक(६.५१मी.)
    या खेळाडूंच्या सत्कार प्रसंगी कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र राष्ट्रीय खेळाडू पीएसआय मा.नंदकुमार कदम व पीएसआय मा. पुजारी यांचे हस्ते झाला.या प्रसंगी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष श्री. अमर सासणे, उपाध्यक्ष श्री.महेश पोवार , संस्थेचे सचिव व आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स मार्गदर्शक श्री. सुभाष पवार, प्रशिक्षक श्री दिग्विजय मळगे व गौरेश पोवार
Categories
कोल्हापूर क्रीडा ब्रेकिंग न्युज

पै.खाशाबा जाधव यांची जयंती यानिमित्त जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार

प्रशांत भोसले
दिनांक 15 जानेवारी 2021 स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते स्वर्गीय खाशाबा जाधव यांची जयंती यानिमित्त जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने ऑलिम्पिक स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी पात्र ठरलेल्या व शासनाचे अनुदान मिळालेल्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या सत्काराचा कार्यक्रम भवानी मंडपामध्ये आयोजित करण्यात आला होता. सकाळी साडे आठ वाजता भवानी मंडप परिसरातील किर्तिस्तंभला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली योग प्रशिक्षक श्री रवी भूषण कुमठेकर यांची विद्यार्थिनी कुमारी गार्गी भट हे योगाची प्रात्यक्षिके करून दाखवले.
कार्यक्रमातऑलम्पिक निवडचाचणीसाठी पात्र ठरलेले व खेळाडू श्रीमती तेजस्विनी सांवत,राहि सरनोबत, स्वरुप उन्हाळकर,आंतरराष्ट्रीय खेळाडू ज्याना शासनाकडून अनुदान प्राप्त झाले आहे.उज्वला चव्हाण,अभिषेक जाधव,अफ़्रिद अत्तर,विवेक मोरे,स्वप्निल पाटील,आरती पाटील,वैष्णवी सुतार ,प्रथमेश कापडे,दत्तप्रासद चौगले,खुशबु रिकिबादर,तसेच मान्तेश पाटील,पृथ्वीराज पाटील,सुरज आसवले ,कोमल देसाई इ.खेळाडुंचा सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना शालेय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा सांगितला शासनाच्या वतीने खेळाडूंना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा आधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षण शिबिराचे आयोजन यातून भविष्यात देखील अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू कोल्हापूर उघवते खेळाडु स्व.खाशाबा जाधव यांच्याकडून प्रेरणा घेऊन कोल्हापूरचे नाव जागतिक स्तरावर पोहोचतील असा मानस व्यक्त केला. अर्जुनअवार्डीआंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू कुमारी शैलजा साळोखे यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना पूर्वीच्या काळी असणारी सुविधांची कमतरता व त्या प्रतिकूल परिस्थितीत जुन्या काळातील खेळाडू मेहनतीच्या जोरावर आपली कामगिरी अति उच्च स्तरावर नेत असल्याचे सांगितले तसेच याप्रसंगी खाशाबा जाधव यांचे पुतणे यांनी खाशाबा जाधव यांना केंद्रशासनाकडून भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणीही केली केली. राज्य शासनाकडुन खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणीही केली. खाशाबा जाधव यांचे शिक्षण कोल्हापूर मध्ये राजाराम कॉलेज व कुस्तीचा सराव मोतीबाग तालीम येथे झाल्याचे सांगून कोल्हापूरच त्यांची कार्य कर्मभूमी होते, याची आठवण करून दिली. आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत यांनीही याप्रसंगी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे नावाच्या किट घातल्यानंतर ज्या भावना मनामध्ये येतात तशाच भावना मी कोल्हापूरची असल्याचे सागून जर खेळाडुच्या किट्च्या पाठीवर कोल्हापूरचे नाव असेल तर नक्कीच अभिमान व आनंद होईल असे सांगून जिल्हा क्रीडा अधिकारी यांना त्यांनी पुढील येणाऱ्या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याचे खेळाडूंसाठी स्वतंत्र कोल्हापूरची ओळख असेल असे कीट देण्याची विनंती केली. माननीय आमदार श्री चंद्रकांत जाधव यांनीही सत्कारमूर्ती आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे कौतुक करून त्यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या व कोल्हापुरात सुसज्ज दर्जाच्या खेळ सुविधा भविष्यामध्ये निर्माण करण्यात येणार असल्याचे सांगून येणार असल्याचे आश्वासन याप्रसंगी त्यांनी दिली माननीय जिल्हाधिकारी श्री दौलत देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना कोल्हापूरला क्रीडा परंपरेची असणारी परंपराही किती जुन्या काळापासून आहे याची माहिती दिली , 1920 सालच्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतही कोल्हापूरचा रंगनाथ पाटील यांनी सहभाग घेतल्याचे त्यांनी सांगितले या प्रसंगी कोल्हापूरच्या लोकांमध्ये कुस्तीविषयी असणाऱ्या प्रेमाची आठवण सांगत असताना ते विद्यार्थ्यांची विद्यार्थीदशेत असताना पैलवान युवराज पाटील आणि पैलवान सतपाल यांच्या मध्ये कोण जिंकणार याची घराघरांमध्ये चर्चा रंगत असे अशी आठवणही त्यांनी सांगितली या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर श्रीमती शैलजा साळुंखे टेबल-टेनिस अर्जुन वीर माननीय आमदार चंद्रकांत जाधव माजि महापौर श्रीमती निलोफर आजगेकर, श्रीमती शोभाताई बोंद्रे , हिंदकेसरी दीनानाथ सिंह व जीवनगौरव पुरस्कार ते बिभीषण पाटील तसेच स्व.खाशाबा जाधव यांचे पुतणे शामराव पुतणे व सचिन चव्हाण आंतरराष्ट्रीय क्रीडा नेमबाज सचिन च्व्हाण जिल्हा अधिकारी सर्व कर्मचारी व शिक्षक वृंद उपस्थित होता.क्रीडा कार्यालयाचे क्रीडा अधिकारी माने सर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Categories
कागल कोल्हापूर

ऊर्जा संवर्धन व ऊर्जा व्यवस्थापन पुरस्काराने संताजी घोरपडे साखर कारखाना सन्मानित


कागल●गोरख कांबळे.
महाराष्ट्र राज्य ऊर्जा विकास अधिकरण, पुणे (महाऊर्जा) अंतर्गत 14 व्या राज्यस्तरीय ऊर्जा संवर्धन व ऊर्जा व्यवस्थापन पुरस्कार वितरण सोहळ्यात सन 2018- 2019 या वर्षीचा ऊर्जा संवर्धन व व्यवस्थापनाचा कार्य अहवाल इलेक्ट्रिकल मॅनेजर बी.ए पाटील यांनी सादर केला होता. सदर अहवालाची दखल घेऊन कारखान्याने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव म्हणून या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दरवर्षी मोठ्या उत्साहात होणारा हा सोहळा यावेळी कोरोना महामारीचा विचार करता हा पुरस्कार कारखान्याच्या कार्यस्थळावर पाठवण्यात आलेला आहे. या पुरस्कारासाठी विशेष मार्गदर्शन कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ, कारखान्याचे चेअरमन नविद मुश्रीफ यांचे लाभले आहे.
या प्रसंगी कारखान्याचे चेअरमन नविद मुश्रीफ कारखान्याचे जनरल मॅनेजर संजय घाटगे, चीफ इंजिनियर हुसेन नदाफ, इलेक्ट्रिकल मॅनेजर बी.ए.पाटील, को- जन मॅनेजर मिलिंद पंडे, लेबर ऑफिसर संतोष मस्ती, अकाउंट विभागाचे विवेक पाटील आदी उपस्थित होते.

Categories
कोल्हापूर पन्हाळा

कचरा टाकण्याच्या वादातून तरुणाचा खुन

कोल्हापूर :

पन्हाळा प्रतिनिधी प्रदीप सुतार यांजकडून
कचरा टाकण्याच्या कारणातून उद्भवलेल्या वादातून तिघा सख्ख्या भावांनी धारदार शस्त्राने हल्ला करून आकाश आनंदा वांजळे (वय 25, रा. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर) या तरुणाचा खून केल्याची घटना बुधवारी रात्री एकच्या सुमारास क्रांतिसिंह नाना पाटीलनगर येथे घडली. करवीर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

या प्रकारामुळे क्रांतिसिंह नाना पाटीलनगर येथे तणाव निर्माण झाला आहे.
खून झालेला तरुण आणि संशयित शेजारी राहतात. त्यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होता. बुधवारी सायंकाळी कचरा टाकण्यावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला, त्यातून मध्यरात्रीनंतर त्यांच्यात हाणामारी झाली.
त्यातूनच संशयित भारत कचरे, दिलीप कचरे आणि सुरेश कचरे या तिघांनी आकाश वांजळे याच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यास शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर या घटनेची माहिती वांजळे यांच्या नातेवाईकांसह मित्रांना मिळताच त्यांनी शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी गर्दी केली होती. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. या घटनेची माहिती मिळताच करवीर पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळासह रुग्णालयात दाखल झाले होते.

Categories
कागल कोल्हापूर

गोकुळ शिरगाव श्रीकृष्ण यात्रा रद्द


गोकुळ शिरगाव प्रतिनिधी

गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील ग्रामदैवत श्रीकृष्णाची १३ जानेवारी रोजी होणारी विशाळी यात्रा कोरोणा संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, शासनाच्या व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार रद्द करण्यात आली असल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे. तसेच भाविकांनी गर्दी न करण्याचे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच श्रीकृष्ण मूर्तीची पूजा-अर्चा अभिषेक व इतर धार्मिक विधी गावातील हक्कदार पुजारी गुरव यांच्याकडून अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात येणार आहे.
ग्रामदैवत श्री कृष्ण यात्रेसाठी गोकुळ शिरगाव मध्ये जिल्ह्यातून व सीमाभागातील लाखो भाविक गर्दी करत असतात. प्रथमच कोरोणा महामारी मुळे सदर यात्रा रद्द करावी लागत असल्याचे सांगण्यात आले.

Categories
कोल्हापूर क्रीडा

पवित्र पोर्टल मध्ये बी.पी.एड व बी.एड फिजिकल आर्हतेचा समावेश करण्यात या मागणीचे निवेदन शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावर यांना महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने देण्यात आले .

महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने शिक्षक आमदार प्रा . जयंत आसगावकर यांना निवेदन देताना उपाध्यक्ष आर .डी पाटील,सचिव संदीप पाथरे विभागीय सचिव महेश सूर्यवंशी ,संदीप पाटील दिलीप राऊत.

प्रशांत भोसले
महाराष्ट्र राज्यात शारीरिक शिक्षण शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये या पदाला प्राधान्य मिळणे आवश्यक असताना राज्य स्तरावर शिक्षक संचमान्यता (पोर्टल)ऑनलाइन भरती प्रक्रियेत बीपीएड व एमपीएड अर्हतेचा उल्लेख नाही त्यामुळे 2012 पासून शेकडो शारीरिक शिक्षण शिक्षकांची पदे रिक्त आहेत . अनेक शाळांमध्ये शारीरिक शिक्षणाचे शिक्षक उपलब्ध नाही यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासावर प्रश्न उभा राहिला आहे .शालेय स्पर्धांमध्ये सहभाग नोंदणी कमी होत आहे राज्याच्या क्रीडा विकासावर याचे गंभीर व दूरगामी परिणाम होण्याची शक्यता असल्याने शासनाच्या 14 मे 1987 च्या परिपत्रकाद्वारे नमूद केल्याप्रमाणे भरती प्रक्रियेमध्ये बीएड समकक्ष बीपीएड अर्हता समजून त्याचा समावेश पोर्टलमध्ये होणे अत्यावश्यक आहे .अशी मागणी राज्य महासंघाचे उपाध्यक्ष आर.डी.पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी विभागीय सचिव महेश सूर्यवंशी ,कोल्हापूर संघटनेचे सचिव संदीप पाथरे,दिलीप राऊत,संदीप पाटील उपस्थित होते .

Categories
कागल कोल्हापूर

असंघटित स्थलांतरित कामगारांसाठी युवा ग्रामीण विकास संस्थेचे मोफत आरोग्य जनजागृतीसाठीचे उपक्रम  दिशादर्शक:निर्मळे

युवा ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने मोफत एचआयव्ही/एड्स आरोग्य जनजागृती प्रसंगी मोहन सातपुते व टीम युवा

करवीर पूर्व:प्रतिनिधी : गजानन रानगे

असंघटित स्थलांतरित कामगारांसाठी गोकुळ शिरगावच्या युवा ग्रामीण विकास संस्थेचे मोफत आरोग्य जनजागृतीसाठीचे उपक्रम समाजाला दिशादर्शक आहेत असे मत प्रकल्प संचालक नंदकुमार निर्मळे  यांनी व्यक्त केले.
 एक डिसेंबर २० ते ३१ डिसेंबर २० अखेर युवा संस्थेच्या वतीने विविध घटकातील स्थलांतरीत कामगारासाठी मोफत आरोग्य जनजागृती उपक्रम घेण्यात आले या  सांगता समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी  युवा ग्रामीण विकास संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक मोहन सातपुते म्हणाले
समाजातील सर्वच घटकांनी जागतिक एकता, सामूहिक जबाबदारी स्वीकारून एचआयव्ही/एड्स विरुद्ध लढा देण्यासाठी पुढाकार घ्यावा . एड्स मुक्त महाराष्ट्र ,स्वप्न नव्हे ध्येय गाठण्यासाठी  एकत्रितपणे लढा देण्याची गरज आहे.स्थलांतरित कामगार लक्षगट हस्तक्षेप प्रकल्प ,गोकुळ शिरगाव यांच्या वतीने  ऊसतोड मजूर,वित्तभट्टी कामगार,हॉटेल कामगार,स्टोन क्रशर कामगार,गुऱ्हाळ घर कामगार,ट्रक डायव्हर,हमाल यांच्यासाठी मोफत आरोग्य जनजागृती शिबीर घेण्यात आली.
 जागतिक एड्स दिना निमित्य पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत” जागतिक एकता व सामूहिक जबाबदारी ” या घोष् वाक्याचे प्रकाशन करण्यात आले, यावेळी पोस्टर प्रदर्शन,माहिती पत्रक वाटप करण्यात आले. त्यानंतर गेली महिनाभर विविध ठिकाणी एचआयव्ही/ एड्स गुप्तरोग, क्षयरोग या विषयी प्रबोधन करण्यात आले.या शिबिराचा लाभ मोठ्या प्रमाणात घेतला.  ऐच्छिक एचआयव्ही तपासणीही मोफत  करण्यात आली.
यावेळी प्रकल्प संचालक नंदकुमार निर्मळे, समुपदेशक हेमंत सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ती सौ. दीपाली सातपुते, सुजाता कांबळे, पौर्णिमा गुरव,अजय कांबळे, कौस्तुभ भोसले,प्रल्हाद कांबळे, सूरज मांडे,डॉ. स्वप्नील जाधव,डॉ. सत्येंन माळकर,यांच्यासह स्टेक होल्डर,१५ पिअर लीडर ,समाजातील विविध घटक यांचे सहकार्य लाभले.

Categories
कागल कोल्हापूर

चिंचवाड येथे तीस एकरातील ऊस पीक जळाले

चिंचवड( ता करवीर) येथील जळीत ऊस पिकांची पाहणी करताना सरपंच सुदर्शन उपाध्ये , रविंद्र कांबळे,ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग.

करवीर पूर्व : प्रतिनिधी : गजानन रानगे

चिंचवाड (ता करवीर ) येथील पीरपाणंद रस्ता ते सुर्यापा पाणंद रस्ताच्या दरम्यान उसाच्या फडाला आग लागली .या आगीमध्ये तीस एकरातील ऊसपीक जळाले .यामध्ये ऊस उत्पादक शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने जळीत ऊस पीक क्षेत्राचे पंचनामे केले.
गेली दोन वर्षे २०१८ साली वातावरणातील बदलामुळे ऊसाचे टनेज मोठ्या प्रमाणावर घसरले, तर २०१९ मध्ये हाता तोंडाशी आलेले पीक अतिवृष्टीमुळे १०० टक्के नुकसानग्रस्त झाले या सगळ्यातुन बाहेर पडत असताना व कोरोनाजण्य परिस्थितीतून जात असताना पिकवलेल्या शेतीतील ऊस पिकाना आग लागून झालेल्या नुकसानीने शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी गावातील ग्रामस्थांनी वेळीच आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले म्हणून मोठे नुकसान टळले. यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्यात आले . तसेच कारखान्यानी जळीत ऊस कपात करु नये अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. यावेळी चिंचवाड गावचे सरपंच सुदर्शन उपाध्ये, पोलिस पाटील रविंद्र कांबळे,ग्रामसेवक विजय माळी तलाठी शामराव कांबळे ,कोतवाल तेजस्विनी कोळी,आण्णासो कोळी(गुरुजी),यशवंत खानविलकर,राजगोंडा नांद्रे,महादेव कोळी,बाबा सरकार यांच्या सह जळीत ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते

Categories
कागल कोल्हापूर Uncategorized

गडमुडशिंगीत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन उत्साहात

गडमुडशिंगी (ता करवीर) येथे सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष प्राविण्य मिळवलेल्या मुलींचा यावेळी सत्कार करण्यात आला

करवीर पूर्व : प्रतिनिधी : गजानन रानगे

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दिन गडमुडशिंगी तालुका करवीर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ‘पीढी घडविते भारी माता कोल्हापुरी ‘ याविषयी चर्चासत्र व सावित्री उत्सव साजरा करण्यात आला.
पीढी घडविते भारी माता कोल्हापुरी कोल्हापूर उत्सव अंतर्गत क्रीडा स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या मुलींच्या मातांचा तसेच स्पर्धा परीक्षेत निवड झालेल्या मुलींच्या मातांचा एक किंवा दोन मुलीवर शस्त्रक्रिया केलेल्या मातांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच विशेष प्राविण्य मिळवलेल्या मातांना ताराराणी प्राधान्य कार्डचे वाटप करण्यात आले. एकात्मिक बाल विकास प्रकल्प कोल्हापूर ग्रामीण यांच्या अनुषंगाने स्त्री भ्रूण हत्या तसेच मुलींचे संगोपन याविषयी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे मार्गदर्शन आयसीडीएस सुपरवायझर प्रज्ञा भांगरे ,आरोग्यसेविका संध्या महाजन, म.बा.क. विभाग जिल्हा कार्यक्रम अधिकारी सोमनाथ रसाळ प्रकल्प अधिकारी ज्योती पाटील यांनी याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांतर्गत मुलींच्या शिक्षणा विषयी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास अंगणवाडी सेविका स्नेहल पाटील, नंदा गवळी, महादेवी माळी, रेखा खोत ,विश्रांती कोगले, माया गाडगीळ, नंदा सोनुले. विद्यार्थिनी पालक माता आदी उपस्थित होत्या.

Categories
कोल्हापूर

सावित्रिबाई फुले यांचे स्त्रीशिक्षणातील योगदान मोलाचे : भगवान गुरव


साके येथे बालिकादिन उत्सहात ः, अनंतशांती,फिरंगोजी संस्थेमार्फत विद्यार्थ्यीना शालेय वस्तू वाटप
कोल्हापूर
महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या हेतून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात शिक्षण देवून त्यांना शिक्षणाची योग्य दिशा देण्याचे काम सावित्रिबाई फुले यांनी केले आहे. त्यांच्या या कार्याचा जागर अखंड स्त्रीशक्तीसाठी महत्वाचे योगदान ठरला आहे. शिवाय स्त्रियांच्या मुक्ती दात्या असणा-या सावित्रिबाई फुले यांनी दिलेले शैक्षणिक योगदान त्यांनी आचरणात आणलेली स्त्री उद्धारासाठीची मुल्ये भावी पिढीसाठी अत्यंत मोलाची आहेत. क्रांतीजोती सावित्रिबाई फुले यांचे स्त्रीशिक्षणातील योगदान व त्यांचे कार्य समाजाजित सर्व घटकापर्यंत पोहचवने व त्यांनी रूजवलेली शैक्षणिक मुल्य पुढील पीढीस सक्रमीत होणे गरजेचे आहे. सावित्रिबाई फुले यांचे स्त्रिशिक्षणातील योगदान मोलाचे असल्याचे प्रतिपादन अनंतशांतीचे संस्थापक भगवान गुरव यांनी केले.
साके ता.कागल येथे बालिका दिनानिमित्त ओयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अनंतशांती,फिरंगोजी शिंदे, संस्थेमार्फत अंगणवाडीतील मुलींना पाटी,पेन्शील, अंकलपी, शैक्षणिक साहित्य खाऊ वाटप संस्थापक भगवान गुरव,वस्ताद प्रमोद पाटील यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी सावित्रिबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन अनंतशांतीच्या अध्यक्षा माधुरी खोत,सचिव अरूणा पाटील, अंगणवाडी सेविका मंगल पाटील, तेजस्वीनी पाटील,यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माधुरी खोत म्हणाल्या, सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून 1995 पासून 3 जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा “बालिकादिन ” म्हणून साजरा केला जातो. 19 व्या शतकाच्या मध्यार्थात भारतासारख्या रूढीवादी परंपरा असणाऱ्या देशात स्त्रीला समाजात ‘चूल आणि मूल ‘ एवढेचं स्थान होतं. त्याकाळात स्त्रियांना शिक्षणाच्या माध्यमातून एक नवी दिशा, नव संजीवनी देण्याचे काम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
बालिकादिनानिमित्त आंगणवाडीतील मुलींनी साडी चोळी असा सावित्रिबाई फुले यांच्या वेशभूषा परिधान केल्या होत्या. कार्यक्रमास रामचंद्र कांबळे, विश्वजीत पाटील, सैा.प्रियंका पाटील,उज्वला जाधव,आनंदी पाटील, शोभा जाधव, मगल तुरंबे,सरिता कांबळे आदी उपस्थीत होत्या .
स्वागत रेखा पाटील यांनी केले आभार जयश्री निऊंगरे यांनी मानले.
फोटो ओळी ः साके ता.कागल येथे बालिकादिनानिमित्त आंगणवाडीतील मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप करतांना अनंतशांतीचे भगवान गुरव ,वस्ताद प्रमोद पाटील आदी छाया ः सागर लोहार,साके

Categories
कागल कोल्हापूर

श्री . शाहू हायस्कूल,ज्यूनि कॉलेज कागलमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जंयती महिला शिक्षण दिन म्हणून संपन्न


कोल्हापूर- सुभाष भोसले
श्री शाहू हायस्कूल ज्यूनि कॉलेज कागल येथे सावित्रीबाई फुले जंयती महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करणेत आला . या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक सौ .एस .ए .फकीर यांनी केले .
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य श्री जे.डी पाटील, उपप्राचार्य श्री बी. के .मडिवाळ, पर्यवेक्षिका सौ .एस ए . कुलकर्णी, तंत्र विभागप्रमुख श्री . एस .ए.देशमुख यांनी केले .
या दिनाचे औचित्य साधून माता पालक सौ . रूपाली पिसे यांचा सत्कार सौ .आर. आर .कुलकर्णी यांनी तर माधवी कांडेकरी यांचा सत्कार सौ . कुडतरकर यांनी केला . कु वैष्णवी पाटील, कु सानिका गुरव यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जंयती निमित्त आपले मनोगत व्यक्त केले .
पर्यवेक्षिका सौ . एस . ए . कुलकर्णी यांनी सावित्रीबाई फुले व ज्ञानसूर्य ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाची सुरवात समाजातील विरोध झुगारून कशा प्रकारे केली यांची माहिती दिली . तसेच उच्च शिक्षणामुळे माणसातील माणूसपण हरविले आहे तसेच शिक्षणामुळे विद्वतेबरोबरच नम्रता प्रामाणिकपणा निर्माण होणे गरजेचे आहे . त्यांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट विशद केला .
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री . जे . डी . पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सावित्रीबाई यांना अभिवादन केले व कु . वैष्णवी कु . सानिका या मुलींचे अभिनंदन केले . ते म्हणाले की महिलांना आज जे सर्व क्षेत्रात आरक्षण मिळाले आहे त्याचे श्रेय ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जाते . त्यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ उभी केली त्यामुळे आज सर्वच क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत . दरवर्षी हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो . त्यांनी आवाहन केले की महिलांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा . मुलींनी उच्य शिक्षण घेवून आपले कुंटुब व देशाचे नाव उज्ज्वल करावे .
कार्यक्रमाचे आभार सौ . एस . ए .फकीर यांनी मानले . या कार्यक्रमाला शाहू हायस्कूल, ज्यूनि कॉलेज व तंत्रविभाग चे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .

Categories
कागल कोल्हापूर

श्री . शाहू हायस्कूल,ज्यूनि कॉलेज कागलमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जंयती महिला शिक्षण दिन म्हणून संपन्न


कोल्हापूर- सुभाष भोसले
श्री शाहू हायस्कूल ज्यूनि कॉलेज कागल येथे सावित्रीबाई फुले जंयती महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करणेत आला . या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक सौ .एस .ए .फकीर यांनी केले .
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य श्री जे.डी पाटील, उपप्राचार्य श्री बी. के .मडिवाळ, पर्यवेक्षिका सौ .एस ए . कुलकर्णी, तंत्र विभागप्रमुख श्री . एस .ए.देशमुख यांनी केले .
या दिनाचे औचित्य साधून माता पालक सौ . रूपाली पिसे यांचा सत्कार सौ .आर. आर .कुलकर्णी यांनी तर माधवी कांडेकरी यांचा सत्कार सौ . कुडतरकर यांनी केला . कु वैष्णवी पाटील, कु सानिका गुरव यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जंयती निमित्त आपले मनोगत व्यक्त केले .
पर्यवेक्षिका सौ . एस . ए . कुलकर्णी यांनी सावित्रीबाई फुले व ज्ञानसूर्य ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाची सुरवात समाजातील विरोध झुगारून कशा प्रकारे केली यांची माहिती दिली . तसेच उच्च शिक्षणामुळे माणसातील माणूसपण हरविले आहे तसेच शिक्षणामुळे विद्वतेबरोबरच नम्रता प्रामाणिकपणा निर्माण होणे गरजेचे आहे . त्यांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट विशद केला .
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री . जे . डी . पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सावित्रीबाई यांना अभिवादन केले व कु . वैष्णवी कु . सानिका या मुलींचे अभिनंदन केले . ते म्हणाले की महिलांना आज जे सर्व क्षेत्रात आरक्षण मिळाले आहे त्याचे श्रेय ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जाते . त्यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ उभी केली त्यामुळे आज सर्वच क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत . दरवर्षी हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो . त्यांनी आवाहन केले की महिलांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा . मुलींनी उच्य शिक्षण घेवून आपले कुंटुब व देशाचे नाव उज्ज्वल करावे .
कार्यक्रमाचे आभार सौ . एस . ए .फकीर यांनी मानले . या कार्यक्रमाला शाहू हायस्कूल, ज्यूनि कॉलेज व तंत्रविभाग चे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .

Categories
कागल कोल्हापूर

कागलमध्ये ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण.


कागल■गोरख कांबळे.
कागल तालुक्यातील होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूकीचे प्रशिक्षण आज राज्य निवडणूक आयोग नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार शिल्पा ठोकडे व नायब तहसीलदार शिवाजी गवळी यांनी कर्मचाऱ्यांना दिले.कागल तालुक्यातील ५५ गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे मतदान प्रक्रियेचे प्रत्यक्ष कामकाज ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया याविषयी प्रशिक्षण दिले.निवडणूक प्रक्रियेत प्रत्यक्ष कामकाज कसे करावे? याविषयीची माहिती देण्यात आली. कागल तालुक्यात ५५ गावातील ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.याचाच एक भाग म्हणून आज कागल तालुक्यातील ५५ गावातील ग्रामपंचायत निवडणूकीत मतदान केंद्रावर कामकाज पहाणारे केंद्राध्यक्ष, सहाय्यक कर्मचारी, मतदान अधिकारी क्रमांक १ व मतदान अधिकार क्रमांक 2 व 3 अशा सर्व लोकांना प्रशिक्षण आरटीओ गोदाम नवीन पोस्ट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ पश्चिम बाजू कागल येथे देण्यात आले.
या प्रशिक्षणात प्रत्यक्ष मतदान केंद्रावर आदर्श आचारसंहिता नियमांचे पालन,मतदान यंत्र हाताळणी, व मतदान यंत्राची प्राथमिक माहिती,तसेच कोरोना संसर्ग काळात घ्यावयाची काळजी यासह मतदान प्रक्रियेबाबत मोठ्या पडद्यावर चलचित्र दाखवून मार्गदर्शन केले. हे प्रशिक्षण सकाळी ९ ते १२ व दुपारी २ ते ५ या दोन सत्रात देण्यात आले. पुढील प्रशिक्षण शनिवार दि.९ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे. सदर प्रशिक्षणास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, इतर सर्व प्रशिक्षणार्थी व कागल तहसील कार्यालय,व कागल नगरपरिषद कार्यालयातील नियुक्त कर्मचारी उपस्थित होते.

Categories
कोल्हापूर

ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा कोल्हापूर व करवीर तहसील कार्यालय यांच्यावतीने राष्ट्रीय ग्राहक दिन वरणगे पाडळी येथे उत्साहात साजरा


कोल्हापूर- सुभाष भोसले
२४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन या निमित्ताने ग्राहक पंचायत महाराष्ट्र करवीर तालुक्याच्या वतीने वरणगे पाडळी येथे सदर कार्यक्रमाचे नियोजन करवीर तालुका अध्यक्ष श्री यशवंतराव शेळके व सदस्य जनार्दन पाटील यांनी केले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून करवीर पुरवठा अधिकारी श्री. दत्तात्रय पाडळकर साहेब उपस्थित होते. यावेळी ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले….!
प्रथम पाहुण्यांचे स्वागत सरपंच अनिता पाटील यांनी केले….!
यानंतर प्रमुख पाहुणे मां.दत्तात्रय पाडळकर साहेब यांनी ग्राहक पंचायतचे काम उत्कृष्ट पध्दतीने सूरू असून गावो गावी ग्राहक जाग्रुती व प्रबोधन करणेचे काम ग्राहक पंचायत करत आहे. अनेक संघटना काम करत असतात पण हि संघटना शासनाशी संलग्न राहून लोकांचे प्रश्न सोडवते खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांच्या मार्फत आम्ही बर्याच लोकांचे प्रश्न सोडवण्यास सहकार्य केले आहे व ईथून पुढे ही असेच सहकार्य राहिल अशी ग्वाही त्यांनी दिली. यानंतर जिल्हाध्यक्ष बी.जे.पाटील यांनी ग्राहक पंचायतच्या कामाचा आढावा सांगताना खते, बि बियाने घेताना शेतकर्याची होणारी फसवणूक, विज वितरणाच्या तक्रारी, बॅका,पत संस्था,बचत गट मधील फसवणूक, गॅस सिलिंडर व पेट्रोल मध्ये होणारी फसवणूक व ग्राहकांनी घ्यावयाची काळजी या विषयी सविस्तर माहिती सांगितली. यानंतर उपाध्यक्ष जगदीश पाटील यांनी गेली तिन चार वर्षे ग्राहक पंचायत मार्फत शेतकऱ्या पासुन उदयोजगापर्यंत अनेक तक्रारी सोडवणेत आल्या या विषयावर उदाहरणासह केलेल्या कामाची माहिती सांगितली. यानंतर महानगर अध्यक्ष अशोक पोतनीस यांनी ग्राहक पंचायतची स्थापना व ग्राहक पंचायतचे कार्य या विषयावर आपल्या विनोदी शैलीत आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर करवीर तालुका अध्यक्ष श्री यशवंतराव शेळके यांनी करवीर तालुक्यातील ग्राहकांचे सोडवलेले प्रश्न, ग्राहक जाग्रुती व भविष्यातील नियोजन या विषयावर मार्गदर्शन केले. सरपंच अनिता पाटील यांनी ग्राहक पंचायतचे काम निश्चितच वाखानन्याजोगे असुन लवकरच गावातील ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी गावपातळीवर शाखा काढणेसाठी प्रयत्न करणार असे सांगितले. यानंतर पोलीस पाटील सौ.कांबळे यांनी ग्राहक पंचायत मार्फत गावातील ग्राहकांच्या तक्रारींचे निरसन करावे अशी सुचना करत आपले मनोगत व्यक्त केले….!
यानंतर ग्राहकांच्या तक्रारी ऐकुन घेऊन अनेक लोकांच्या तक्रारी सोडवणेत आल्या….!
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा संघटक सुरेश माने यांनी केले व आभार शाहू सेवा सोसायटी चेअरमन संदिप पाटील यांनी मानले.
यावेळी गावातील अनेक मांन्यवर, शेतकरी, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते…

Categories
कागल कोल्हापूर

शेवटच्या दिवशी ग्रामपंचायत निवडणूकीसाठी लागणाऱी कागदपत्रे दाखल करण्यासाठी उमेदवारांची धावपळ,मात्र सोशल डिस्टन्सचा नियम धाब्यावर.


कागल/प्रतिनिधी●गोरख कांबळे.
कागल तालुक्यातील एकूण ५५ गावातील ग्रामपंचायत निवडणूकीचा हंगाम सुरू असल्याने अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांची कागल तहसील कार्यालयातील धान्य गोडाऊन व शासकीय सभागृह येथे गर्दीच गर्दी दिसून येत आहे. कालावधी कमी असल्याने उमेदवार निवडणुकीसाठी अर्जासोबत लागणाऱ्या कागदपत्रे काढण्यासाठी धावपळ करीत असल्यांचे चित्रही कागल तहसील कार्यालयाच्या परिसरात दिसून येत आहे.मात्र सँनिटाइजचा वापर,सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर या गोष्टी टाळल्याचे चित्र परीसरात पहायला मिळाले.
पण ग्रामपंचायत पदासाठी १६ प्रकारची कागदपत्रे व ४ प्रमाणपत्रे अशी सर्व कागदपत्रे सादर करावी लागणार असल्याने उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे कागल तहसील कार्यालयातील धान्य गोडाऊन येथे मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.त्यामुळे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला आहे.तसेच ग्रामपंचायतीच्या निवडणूकाचे रंगधुमाळी जोरदार सुरु झालीे असुन या ग्रामपंचायतील सरपंच पदाचे आरक्षणही जिल्हाधिकारी यांच्या सुचणेनुसार जाहीर केले होते.
पण शासनाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत घोडे बाजार होऊ नये यासाठी सोडलेले आरक्षण रद्द करण्याचे आदेश देऊन सदर आरक्षण हे निवडणुकीच्या निकालानंतर नंतर जाहीर होणार असल्याने इच्छुक उमेदवारांची निराशा झाली असल्याने निवडणूकीत इच्छुक उमेदवारांचा खर्च व निवडणुकीसाठी लागणारी कागदपत्रे यांची जुळवाजुळवी कोण करणार? असा प्रश्न उपस्थित झाल्याने उमेदवारांना लागणारे कागदपत्रे काढण्यासाठी विलंब होत असून सर्व्हरही सारखा डाऊन होत असल्याने दिवसभर ताटकळत बसावे लागते.
त्याचबरोबर आता निवडणूकीसाठीचा अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीखही संपत आल्यानंतर उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे. ग्रामपंचायत निवडणूकीसाठी दि. २३ डिसेंबर ते 30 डिसेंबर पर्यंतच अर्ज स्वीकारले जाणार आहेत.आजची शेवटची सायंकाळी ५.३० पर्यंत मुदत असल्याने त्यामुळे प्रत्येक गावातील इच्छुक उमेदवार आपले भवितव्य अजमावसाठी धावपळ करून निवडणुकीसाठी लागणारे कागदपत्रे मिळवण्यासाठी धावपळ करत असल्याने तहसील कार्यालय धान्य गोडाऊन व शासकीय सभागृहात जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

Categories
कागल कोल्हापूर

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात तीन लाख ६१ हजार साखर पोत्यांचे पूजन.

कार्यस्थळावरील दत्त मंदिर परिसराचा सुशोभीकरणाचे उद्घाटन


    .
कागल/प्रतिनिधी●गोरख कांबळे.
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या तीन लाख, ६१ हजार साखर पोत्याचे पूजन अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. कारखाना कार्यस्थळावरील श्री दत्त मंदिर परिसर सुशोभीकरण कामाचे उद्घाटनही झाले. श्री दत्त मंदिर परसिर सुशोभिकरण उट्घाटनासह,  या हंगामात उत्पादित ३ लाख ६१ हजार पोती पुजन,दोन कोटी १० लाख युनिट विज निर्यात टर्बाईन पुजन व एक कोटी ३३ हजार इथेनॉल
करारापैकी सात लाख लिटर्स इथेनॉल पुरवठा टॅकर्स पुजन अशा संयुक्त कार्यक्रमासाठी अध्यक्ष नवीद मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
    यावेळी बोलताना अध्यक्ष नवीद मुश्रीफ म्हणाले, या हंगामाच्या ५८ दिवसात तीन लाख, ४५ हजार टन ऊस गाळपानंतर तीन लाख, ६१ हजार क्विटल साखर उत्पादित झाली आहे. सरासरी साखर उतारा १०.४६ टक्के असून बी हेवी मळीपासून इथेनॉल निर्मितीचा उतारा धरून एकूण सरासरी ११.९६ टक्के होतो. सध्या देशात वाढत चाललेल्या साखर उत्पादनाचा विचार करता बी हेवी मळीपासून इथेनॉल निर्मीतीचा निर्णय संस्थापक व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतलेला आहे.या हंगामात ९०.४७ युनिट विज निर्मीती प्रतीटन सरासरीने आजअखेर एकूण तीन कोटी १० लाख  युनिट विजनिर्मीती केली आहे. त्यापैकी दोन कोटी १० लाख युनिट निर्यात केले आहेत.    
चौकट…….
ऊस विकास योजना
हेक्‍टरी उत्‍पादन वाढीसाठी ऊस लागण व खोडवा पिकासाठी बेसलडोस, सूक्ष्म अन्नद्रव्यांची खते व कांडी बियाणे तसेच ऊस रोपांचे बिनव्याजी क्रेडिटवर वाटप…..ठिबक सिंचन प्रणाली करीता सवलतीच्या दरात कर्ज पुरवठा व शेतकऱ्यांना रोख अनुदान……ऊस शेतीचा शास्त्रशुद्ध पॅटर्न तयार करून आदर्श उस प्लॉट योजना कार्यरत…….उसावरील कीड नियंत्रणासाठी रासायनिक, जैविक कीटकनाशके व बुरशीनाशकांचा क्रेडिट वर बिनव्याजी पुरवठा……
     श्री.मुश्रीफ पुढे म्हणाले, पेटोलमध्ये १०% इथेनॉल मिसळण्याच्या शासनाच्या धोरणानुसार ऑईल कंपनीना एकूण एक कोटी ३३ हजार लिटर्स इथेनॉल पुरवठ्याचा करार आहे. आजअखेर सात लाख लिटर्स इथेनॉलचा पुरवठा केलेला आहे. पेट्रोलिअम कंपनीच्या इथेनॉल मागणी विचारात घेता डिस्टीलरी प्लॅन्टची क्षमता प्रतिदिनी ३०,००० लिटर्स वरुन प्रतिदिनी ५०,००० लिटर्स इतके विस्तारीकरण केले आहे.
चालू हंगामामध्ये एकूण ३२ लाख, २५ हजार लिटर्स इतके अल्कोहोलचे उत्पादन घेतले असून त्यापैकी २१ लाख, २५ हजार लिटर्स रेक्टीफाईड स्पिरीट व ११ लाख लिटर्स इथेनॉलचे उत्पादन झाले आहे.तसेच डिस्टीलरीमधून निघणारे सांडपाणी (स्पेट वॉश) याची घनता वाढवून,बॉयलरला त्याचा इंधन म्हणून वापर केला आहे व त्यापासून निर्माण होणारी स्टीम ही पुन्हा डिस्टीलरीसाठी वापरलेली आहे. त्यामधून निघणारे कंन्डेंसेट याच्यावरती प्रकिया करुन निघणारे पाणी हे पुन्हा डिस्टीलरीकरीता वापरलेले आहे. यामुळे डिस्टीलरी प्रकल्पासाठी कमीत कमी पाण्याचा वापर करावा लागतो व कोणत्याही प्रकारचे प्रदुषण होत नाही.ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पिकविलेल्या सर्वच्या सर्व ऊस गाळपासाठी कारखान्याकडे पाठवावा, असे आवाहन अध्यक्ष श्री. मुश्रीफ यांनी यावेळी केले.
    

Categories
कागल कोल्हापूर

श्रीराम साळुंखे यांची अभिनंदनीय निवड


कोल्हापूर- सुभाष भोसले
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर “आजीव सेवक “पदी श्रीराम शरदचंद्र साळुंखे यांची अभिनंदनीय निवड राजश्री छत्रपती शाहू महाराज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज जुना बुधवार पेठ ,कोल्हापूर विद्यालयाचे सहशिक्षक श्रीराम शरदचंद्र साळुंखे यांची श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या “आजीव सेवक” पदी विश्वसनीय निवड झाल्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एस .जी. खाडे व सर्व गुरुदेव कार्यकर्ते यांनी सत्कार केला श्री. एस. जी. खाडे यांनी त्यानी केलेल्या कामाची दखल संस्थेने घेतली आहे असे मत व्यक्त केले .श्री. ए .बी मोहिते त्यानी शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या कार्याच्या पावलावर पाऊल ठेवून काम करणारा तरुण शिक्षक म्हणजे “श्रीराम “असा उल्लेख केला. श्री एस .के गुरव यांनी आपल्या शिष्याला हे पद मिळाल्याबद्दल स्वतःला ते भाग्यवान समजतात . संस्थेच्या पुढील कार्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. श्री. सावंत बी.जे .यांनी त्यांच्या कार्याबद्दल कौतुक केले. सत्कारास उत्तर देताना श्रीराम शरदचंद्र साळुंखे यांनी संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे संस्थेच्या सचिवा सौ शुभांगीताई गावडे त्यांचे ऋण व्यक्त केले. शिक्षण महर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या ध्येय धोरणानुसार मी काम करेन साळूंखे परिवाराचे नाव उज्ज्वल करेन अशी ग्वाही दिली. श्री स्वामी विवेकानंद संस्थेचे कार्य देशभर पसरवण्यासाठी प्रयत्न करीन असे सांगितले. कार्यक्रमाचे आभार श्री एस. टी .पाटील यांनी मानले सूत्रसंचालन सौ वाडीकर एस.डी यांनी केले कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Categories
कोल्हापूर क्रीडा

मा.आमदार ऋतुराज पाटील यांची मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमला भेट

प्रशांत भोसले कोल्हापूर:-
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व दि डिस्ट्रीक्ट हॉकी असोसिएशन यांच्या वतीने क्रीडा कार्यालयामार्फत नाविण्यपुर्ण योजने अंतर्गत दि डीस्ट्रीक्ट हॉकी
असोसिएशन,कोल्हापूर यांना ५.०० लक्ष रू.चे क्रीडा साहित्य देण्यात आले.या साहित्याच्या उद्गाटनासाठी कोल्हापूर दक्षिणचे आमदार मा.श्री.ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.सदर उद्गाटनासाठी जिल्हा क्रिडा अधिकारी मा.श्री.डॉ.चंद्रशेखर साखरे,शासकीय योगा मार्गदर्शक मा.श्री.रवीभुषणकुमठेकर मा.श्री.कुमार
आगळगावकर,मा.श्री.सागरयवलुजे,मा.श्री.दुर्वास(बापूकदम,मा.श्री.विजय सरदार साळुखे,मा.श्री.सुदाम तोरस्कर,मा.श्री.नसीर मुल्ला,मा.श्री.ताहीर शेख,आदि मान्यवर उपस्थित होते.


सदर कार्यक्रमामध्ये खेळाडूंनी मनोगत व्यक्त केले.खेळाडूंनी त्यांच्या मनोगता मधुन हॉकी स्टेडियमला वसतीगृहाची गरज भासत असल्याचे सांगितले व खेळाडूंना क्रीडा साहित्य मिळाल्याबद्दल जिल्हा क्रीडा कार्यालयाचे आभार मानले.मा.आमदार ऋतुराज पाटील यांनी आपल्या भाषणातून वसतीगृहासाठी त्यांच्या
आमदार फंडातून २५.०० लक्ष रूपये जाहीर केले व उर्वरीत रक्कम जिल्हा नियोजन समिती व राज्यशासनाकडून अतिरीक्त तरतुद प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले व खेळाडूंना पुढील स्पर्धेस शुभेच्छा देऊन मेजर ध्यानचंद हॉकी
स्टेडियमची पाहणी केली.


सदर कार्याक्रमासाठी हॉकी या खेळाचे आंतरराष्ट्रीय पंच कु.श्वेता फाटील व कु.रमा पोतनीस तसेच हॉकी प्रशिक्षक श्री.योगेश देशपांडे,श्री.योगेश माने,श्री.ओंकार
भांडवले व प्रशिक्षण केंद्रा वरील खेळाडू आदि उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आभार श्री.सागर जाधव यांनी मानले.

Categories
कागल कोल्हापूर

युवकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार ; आमदार ऋतुराज पाटील

गोकुळ शिरगाव प्रतिनिधी

कोल्हापूर दक्षिण मधील सर्व युवकाच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी दीर्घकालीन उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करणार असल्याचे प्रतिपादन आमदार ऋतुराज पाटील यांनी नेर्ली विकासवाडी येथील विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी केले आपल्या मतदारसंघातील तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न बिकट असून यासंबंधी काही वेगळं कार्य करण्याची गरज असल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांकडून सूचना आली असून यासंदर्भात सर्वांच्या विचाराने व सहकार्याने आदर्श आराखडा लवकरच तयार करण्यात येईल. यावेळी त्यांच्या हस्ते 58 लाख रुपये निधीतून अंतर्गत रस्ते गटर मराठा समाज मंदिर तांडा वस्ती सुधारयोजना नागरी सुविधा आदी विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले यावेळीमाजी न्यायाधीश अण्णासाहेब पाटील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत प स सदस्य मंगल पाटील सरपंच प्रकाश पाटील उपसरपंच संजय चौगुले सर्व ग्रामपंचायत सदस्य जनार्दन पाटील हंबीरराव पाटील अजित पाटील श्रीकांत नरके नंदकुमार पाटील सर्जेराव चौगुले भाऊसाहेब चौगुले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Categories
कोल्हापूर

सुनील खोत यांना शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान

बिद्री ( प्रतिनिधी ) : येथील दूधसाखर विद्यानिकेतन व कनिष्ठ महाविद्यालयचे कलाशिक्षक सुनिल भाऊसो खोत यांना दौंड (जि. पुणे) येथील ज्ञान संकल्प सामाजिक संस्थेच्यावतीने राज्यस्तरीय गुणवंत गुरुगौरव शिक्षणरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.पुणे जिल्हा बँकेचे चेअरमन व माजी आमदार रमेशआप्पा थोरात यांच्या हस्ते आणि तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष आप्पासाहेब पवार, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष सोहेल शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
गेली वीस वर्षे कलाशिक्षक म्हणून सेवेत असलेले सुनील खोत यांनी शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यासाठी विविध उपक्रम राबविले आहेत. त्यांनी कला विषयावरील शासकीय ( एलेमेंटरी व इंटरमिजीएट) ग्रेड परीक्षेस उपयुक्त पुस्तकाची निर्मिती केली आहे.कलाक्षेत्रातील त्यांच्या योगदानाची दखल घेत श्री. खोत यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
पुरस्कार वितरण सोहळ्यास शिवसेना जिल्हाध्यक्ष राजेंद्र काळे, ज्ञानसंकल्प संस्थेचे अध्यक्ष सदाशिव रणदिवे, उपाध्यक्ष सुभाष भोसले, प्रदेश उपाध्यक्ष रोहिणी पवार , कोजिमाशिचे संचालक प्रा.हिंदूराव पाटील, मनसे तालुकाध्यक्ष सचिन कुलथे, मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनायक दोरगे उत्तम कागले आदी मान्यवर उपस्थित होते.

Categories
अजब गजब कोल्हापूर

२६/११ चे “हिरो” राष्ट्रपती शौर्यचक्र विजेते मरीन कमांडो वीर योद्धा प्रवीण तेवतिया यांनी दोन लाख रूपये करोना लढ्यासाठी दान केले


* कोल्हापूर- सुभाष भोसले
आम्ही परमवीरचक्र विजेते वीर योद्धा अब्दुल हमीद यांना पाहिले नाही, पण अतिरेक्यांच्या चार गोळ्या बुलेट फ्रुफवर झेलणाऱ्या व एक गोळी कानाला चाटून गेल्याने कायमचा कान निकामी झालेले, एका अतिरेक्यास यमसदनी पाठविलेले व १५० पेक्षा जास्त लोकांचे प्राण वाचविणारे प्रवीण तेवतिया यांना पाहतोय

२६/११ च्या ताज हॉटेलवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचे वेळी अतिरेक्यांना सामोरे जाणारे आघाडीचे पूर्व मरीन कमांडो प्रवीण अतिरेक्यांना पहिल्यांदा सामोरे गेले. अतिरेक्याने एके-40 तून झाडलेल्या चार गोळ्या बुलेटप्रुफ जॅकेटवर लागल्या, तर एक गोळी कानाला चाटून गेल्याने कान कायमचा निकामी झाला. याही स्थितीत त्यांनी एका अतिरेक्याला लोळविले. पाच महिने हॉस्पिटलमध्ये राहावे लागले. पाच सर्जरी झाल्या. ते सामोरे गेल्याने अतिरेकी माघारी फिरले. ते मागे फिरल्यामुळे १५० पेक्षा जास्त लोकांचे प्राण वाचले.
प्रवीण तेवतिया बुलंद शहराच्या गुलावठी क्षेत्रातील भटौना गावात राहणारे. २६/११/२००८ च्या ताज हल्ल्यानंतर दाखल झालेल्या ऑपरेशन टीमचे आघाडीचे कमांडो.
प्रवीण यांच्या अतूल शौर्यामुळे त्यांना महामहीम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी राष्ट्रपती शौर्यचक्र पदकाने सन्माणित केले होते. प्रवीण यांनी साऊथ आफ्रिका, मलेशिया, अमेेरिका आयर्न मॅन पुरस्कार जिंकला आहे.
कौन बनेगा करोडपती मध्ये या योद्ध्याला मा अमिताभ बच्चन यांनी बोलावून सॅलूट केला होता. त्यांची हेलावून टाकणारी शौर्यगाथा ऐकली. या खेळात प्रवीण यांना १२,५०,००० रूपये जिंकता आले होते.हे पैसेही त्यानी समाजासाठी खर्च केले होते
रिटायर प्रवीण हे मुंबई कमौडो ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रक्टिकल ट्रेनिंग, एअर रायफल शूटिंग, योगा आणि धावण्याचे प्रशिक्षण देतात. मेरेथाॅनचे प्रशिक्षण Online देतात.
भटौना गावास या योद्ध्याचा अभिमान वाटतो. गावच्या मुलांनी देशसेवेसाठी सैन्यदलात यावे असे प्रवीण यांना वाटते.
प्रवीण यांना आतापर्यंत मिळालेली तीन डझन सुमारे ३६ पेक्षा जास्त मेडल Online विकून गरीबांसाठी मदत करणार आहेत. कहर म्हणजे दोन मेडल दोन लाख रूपयांना विकून सर्व पैसे करोना विरोधातील लढ्यासाठी पीएम करोना फंडास दान केले आहेत.
प्रवीण तेवतिया आपण अस्सल देशप्रेमी आहात. आपली पेन्शन समाजासाठी खर्च करताच, पण मेडलही विकून देशाला संकटमुक्त करण्यासाठी रक्कम दान करत आहात.
२६ जानेवारी, १५ ऑगष्ट व क्रांतीदिनाच्या दिवशी बेगडी प्रेम दाखवून नंतर वर्षभर शहीद वा माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेत नसल्याबद्दल व्यवस्थेविरूद्घ प्रवीण यांना प्रचंड राग आहे. सैन्यासाठी विमा असावा यासाठी ते आग्रह धरतात.
प्रवीण तेवतिया २६/११ च्या हिरोला साष्टांग दंडवत. तुम्हाला परमेश्वर आरोग्यदायी दीर्घायुष्य देऊ दे. तुमच्या सर्व आशा, इच्छा व अपेक्षा भविष्यात पूर्ण होऊ देत.
संपक गायकवाड
(माजी सहाय्यक शिक्षण संचालक)

Categories
अजब गजब कोल्हापूर

देवकी देवी तुम्हाला सांष्टाग दंडवतच

  • कोल्हापूर- सुभाष भोसले
    श्रीम देवकीदेवी हुकूमसिंह भंडारी (वय ६०) अजूनही भाड्याच्या घरात राहतात, तरीही फडी व पेन्शन मधून जमा झालेले दहा लाख रूपये पीएम केअर्स फंडास दिले. वडील स्वातंत्र्य सेनानी होते. देवकी देवी तुम्हाला सांष्टांग दंडवतच
    उत्तराखंड देवभूमी ऐवजी ” देवीभूमी” म्हटले पाहिजे. उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्याच्या गौचर गावात देवकी देवी राहतात. पती रेशम विभागात कार्यरत होते. स्वर्गवासी आहेत.
    गौचर गाव महिलांच्या दातृत्वासाठी भविष्य काळात प्रसिद्ध होईल. कारण याच गावातील शांतीदेवी गुसांई यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी एक लाख तर, कमला देवी यांनी वयाच्या सत्तावण्णाव्या वर्षी पती आणि मुलाचा मृत्यूचे दु:ख बाजूला ठेऊन दीड लाख रूपये करोना लढ्यासाठी दान केले आहेत.
    देवकीदेवी एकट्या राहात असूनही त्यांनी भारत वर्षास परिवार मानला. कर्ण व बळीराज्याचे दातृत्व आपण पुस्तकात वाचतो, पण साक्षात दहा लाख जमा पुंजी दान करून दाखवून दिले आहे. देवकीदेवी यांनी काही मुलांना दत्तक घेऊन त्यांचा उच्च शिक्षणापर्यंतचा सर्व शिक्षण खर्चही केला आहे.
    उत्तराखंडचे मान. मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी गौचरच्या तिन्ही महिलांनी पंतप्रधान केअर्स फंडास करोना विरोधातील लढ्यासाठी दिलेल्या मदतीमुळे भारावून जाऊन पुढील गौरव उद्गार काढले, “देवभूमी करोनापासून मुक्त व्हावी म्हणून डोंगरातील महिलांनी वैश्विक संकटामुळे देश आर्थिकदृष्ट्या संकटात असताना निस्वार्थी भावनेने केलेल्या मदतीमुळे त्याग आणि दान ही भारतीय संस्कृती मूल्ये पुनर्जिवीत झाली आहेत. देशासाठी ही घटना प्रेरणास्रोत्र ठरणारी आहे.
    देवकीदेवी यांचे दिवंगत वडील स्वातंत्र्य संग्राम सेनानी होते. देशप्रेम, देशाभिमान त्यांच्या नसानसात ठासून भरला आहे.
    नवऱ्याची मिळणारी पेन्शन म्हातारपणासाठी साठवली होती. करोनाच्या संकटामुळे लोकांची उपासमार होऊ नये म्हणून त्यांनी मदतीचा निर्णय घेतला व गौचर भारतीय स्टेट बँकेत दहा लाखाचा धनादेश दिला.
    देशाचे महामहिम राष्ट्रपती व देशाचे प्रधानमंत्री यांचेसह अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे.
    माझ्या सारखे लोक मी, माझे कुटुंब, माझी मुले-मुली, माझा what’s app ग्रुप यामध्ये आनंद घेत असताना, चर्चा करत असताना, वितंडवाद करत असताना या महिला समाजाचा विचार करून भरभरून मदत करत आहेत. या देशाच्या देवभूमीतील “देवींना” सांष्टांग दंडवतच

देवकी देवी यांनी दहा लाख रूपये करोना विरोधातील लढ्यासाठी दिल्यानंतर काही दिवसांनी मोबाईलवर फोन करून तुमचे ATM कार्ड बिघडले असून तुम्ही कार्डचा नंबर सांगा. सुरू करतो म्हणून नंबर सांगितल्यावर ATM मधील ४७,७०० रूपये काढून घेतले हे देशाचे दुर्देव्य आहे. देवकी देवींना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अज्ञाता विरूद्घ गुन्हा नोंद करावा लागला
दहा लाख दान केल्यावर उर्वरित सर्व ४७,७०० रूपये रक्कम या देशातीलच हरामखोराने लांबविली याला काय म्हणावे???
देवकी देवी तुमची क्षमा मागतो. तुमचे पैसे लांबविणारे भामटे लवकर सापडू देत. तुम्हाला परमेश्वर आरोग्यदायी दीर्घायुष्य देऊ दे ही महालक्ष्मीचे चरणी प्रार्थना करतो अशी प्रतिक्रिया संपत गायकवाड (माजी सहाय्यक शिक्षण संचालक) यांनी व्यक्त केली

Categories
कोल्हापूर

सौ कल्पना शिवाजी भाईगडे यांना ज्ञानसंकल्प सामाजिक संस्थेचा राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला नारीरत्न गौरव पुरस्कार प्रदान


  • कोल्हापूर- सुभाष भोसले
    सौ कल्पना भाईगडे यांना ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था, दौंड, जि. पुणे यांच्यावतीने या वर्षीचा प्रतिष्ठेचा ‘ राज्यस्तरीय कतृत्ववान महिला नारीरत्न पुरस्कार देणेत आला. पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष,माजी आमदार रमेशअप्पा थोरात, विद्यमान आमदार राहूल कुल, राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष सोहेल शेख यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
    सौ कल्पना भाईगडे यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन ज्ञानसंकल्प सामाजिक संस्थेच्यावतीने पुरस्कार देण्यात आला.
    याप्रसंगी शिवसेना जिल्हाध्यक्ष डॉ. राजेंद्र काळे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, मनसे तालुकाध्यक्ष सचिन कुलथे, कोजिमाशिचे माजी अध्यक्ष हिंदुराव पाटील, मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनायक दोरगे, ज्ञानसंकल्प संस्थेचे अध्यक्ष सदाशिव रणदिवे, प्रदेश उपाध्यक्षा रोहिणी पवार, सुभाष भोसले, दिपक जाधव, प्रा दिनेश पोवार आदी मान्यवर उपस्थित होते. श्री जितेंद्र सावंत यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान करताना माजी आमदार रमेशअप्पा थोरात, राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष सोहेल शेख,शिवसेना जिल्हाध्यक्ष डॉ. राजेंद्र काळे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार, आदी.
Categories
कोल्हापूर सातारा

रणजित देशमुख यांची कोल्हापूर महानगरपालिका निवडणूकीसाठी निरीक्षक पदी निवड


खटाव तालुका प्रतिनिधी:-(रामदास देशमुख)
काँग्रेस पक्ष राज्यात पक्ष मजबूत करण्यासाठी ताकदीने उतरला आहे.येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीसाठी उत्कृष्ट नियोजन केले आहे.

येणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निरीक्षक म्हणून सातारा जिल्ह्यातील माण खटाव तालुक्याचे काँग्रेस नेते मा.रणजीत देशमुख यांची निवड केली आहे.तसेच त्यांच्या सोबत पुणे शहरातील काँग्रेस नेते मा.अभय छाजेड यांची पण निवड केली आहे.

रणजित देशमुख यांना काँग्रेस राज्यस्तरीय निवडणूक कमिटी मध्ये पण पक्षाने स्थान दिले आहे.रणजित देशमुख माध्यमांशी बोलताना म्हणाले काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर माझ्यावर शिक्षक आणि पदवीधर निवडणूकीची जबाबदारी दिली होती ती मी यशस्वी पध्दतीने पार पाडली. नंतर मला राज्यस्तरीय काँग्रेस निवडणूक कमिटी मध्ये स्थान दिले. आणि येणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणूकीसाठी निरीक्षक पदी निवड केली.

मी पक्षाने दिलेले जबाबदारी यशस्वी पध्दतीने पार पाडण्यासाठी प्रयत्न करेल आणि कोल्हापूर निवडणूक मध्ये जास्तीत जास्त काँग्रेस नगरसेवक कसे निवडणून येथील आणि पक्ष कसा मजबूत होईल यावर भर देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

तसेच त्यांनी कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक याचा प्राथमिक आढावा घेतला आहे.सध्या त्यांच्या तालुक्यात १५० ग्रामपंचायत निवडणूक आहेत त्यामुळे ते तालुक्यात ग्रामीण भागात पक्ष वाढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. असे आमच्या माध्यमांशी बोलताना सांगितले.

Categories
कोल्हापूर मुंबई

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या आजीव सेवकपदी —प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांची निवड

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी: लक्ष्मण राजे )

उस्मानाबाद येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांची श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था,कोल्हापूरच्या आजीव सेवकपदी अभिनंदनीय निवड झाली आहे. प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी या अगोदर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादच्या, उस्मानाबाद येथील उपकेंद्रात संचालक म्हणून कार्य केले होते. तसेच ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद च्या व्यवस्थापन परिषदेचे विध्यमान सदस्य म्हणून कार्यरत आहेत.ते सध्या उस्मानाबाद जिल्हा प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष म्हणून हि कामकाज पहात आहेत. या अगोदरच त्यांची श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था,कोल्हापूरच्या व्यवस्थापन मंडळात सदस्यपदी निवड झाली होती.सध्या ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण ,मुंबईच्या उस्मानाबाद विभागीय केंद्राचे उपाध्यक्ष म्हणून हि कार्य करत आहेत.
या त्यांच्या कार्याची दखल घेऊन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने त्यांची आजीव सेवकपदी निवड केली आहे या निवडीबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमारजी साळुंखे ,संस्थेच्या सचिव शुभांगी गावडे , सहसचिव (प्रशासन)प्राचार्य डाॅ.युवराज भोसले,सहसचिव अर्थ प्राचार्य डाॅ.राजेंद्र शेजवळ यांनी प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुखांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे तर प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी वरील संस्था पदाधिकारी यांचे आभार मानले आहेत.

Categories
कोल्हापूर क्रीडा

कोल्हापूर जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशनची सर्वसाधारण सभा अत्यंत उत्साहात संपन्न

कोल्हापूर जिल्हा पासिंग व्हाँलीबाँल असोसिएशन मार्फत आयोजित18 वर्षाखालील राष्ट्रीय मुला-मुलींच्या व्हॉलीबॉल स्पर्धा कोल्हापूर / बाचणी / पेठवडगाव या तिन्ही पैकी एका ठिकाणी व्हाँलीबाँल सामने रंगणार : सचिव शिवाजी पाटील यांनी केली उदघोषणा

महाराष्ट्र राज्य व्हाँलीबाँल सघटनेचे अध्यक्ष मा.विजयभाऊ डांगरे , यांचे मार्गदर्शन आणि सुचनेनुसार आपल्या जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू , प्रशिक्षक ,पंच , आणि संघटक यांना योग्य न्याय दिला जावा या सुचनेनुसार व्हाँलीबाँल खेळाचे विविध उपक्रम राबविणेबाबत वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते या मध्ये पुढील विषयावर चर्चा झाली १)जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजन आचार संहिता तयार करणे . २ )जिल्हा विभाग राज्य स्पर्धा आयोजन मागणी पत्र ३) जिल्हास्तर पंच परीक्षा प्रशिक्षण व संघटक उजळणी व प्रशिक्षण वेळापत्रक तयार करणे ४ ) विविध वयोगट खेळाडू पंच प्रशिक्षक नोंदणी करणे ५ ) जिल्हा संघटनेशी सर्व मंडळे शिक्षण संस्था व तालुका संघटना जिल्हा संघटनेशी संलग्न करून घेणे ६ )कोल्हापूर जिल्ह्यात होणाऱ्या 18 वर्षाखालील राष्ट्रीय हॉलीबॉल स्पर्धेच्या नियोजन संबंधी प्राथमिक चर्चा करणे ७ ) महाराष्ट्र राज्य हॉलीबॉल संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री विजय भाऊ डोंगरे यांची भारतीय हॉलीबॉल महासंघाच्या कार्य कार्य उपाध्यक्षपदी तसेच सचिव माननीय श्री संजय नाईक यांची भारतीय हॉलीबॉल महासंघाच्या सचिव पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन ठराव संमत करणे ७ ) सभा अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करणे सभे करीता कोल्हापूर जिल्हा व्हाँलीबाँल असो.चे अध्यक्ष मा.रमेश तोडकर , सचिव मा.शिवाजी पाटील ( सर ) , आंतरराष्ट्रीय व्हाँलीबाँल कोच मा.अजित पाटील ( सर ) व सर्व पदाधिकारी व कोल्हापूर जिल्ह्यातील विविध व्हॉलीबॉल क्रीडा मंडळाचे सन्माननीय पदाधिकारी विविध शाळेतील क्रीडाशिक्षक तसेच व्हाँलीबाँल प्रेमी यांच्या उपस्थितीत बाचणी येथे सभा संपन्न झाली सभेकरिता पन्हाळा मुरगुड जयसिंगपूर पेटवडगाव वारणा देवाळे शिरोली कोल्हापूर शहर चंदगड कागल लिंगनूर बाचणी राधानगरी भोगावती आधी ठिकाणावरून 22 सेंटरची चाळीस लोकांची उपस्थिती होती कोल्हापूर जिल्ह्यातील व्हॉलीबॉल खेळाच्या विकासासाठी आजची सभा निश्चितच प्रेरणादायी व मार्गदर्शक असे ठरली

Categories
कोल्हापूर

विश्वास ट्रेडर्सचे दत्तात्रय पाटील राष्ट्रीय गुणीजन रत्नमोती पुरस्काराने सन्मानित .


  • कोल्हापूर- सुभाष भोसले
    विश्वास ट्रेडर्सचे संचालक दत्तात्रय पाटील यांना केलेल्या उत्कृष्ट कार्यामुळे ए .जे .फौडेंशनच्या राष्ट्रीय गुणीजन रत्नमोती पुरस्काराने महेश क्लब इचलकंरजी येथील महासन्मान सोहळ्यात गौरविणेत आले . दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतीक,उदयोग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तीनां हा पुरस्कार देणेत येतो .
    सिने अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अरूण नलावडे यांच्या हस्ते हरूण भाई ईनामदार, निसार सुतार, अॅड सचिन माने , धनाजीराव जगदाळे, पृथ्वीसिंग नाईक, सुरेश उमप, शाहीन शेख, कौशिक गायकवाड
    संस्थेच्या अध्यक्षा सौ अबोली मुल्ला, प्रा खरात यांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार बहाल करणेत आला .
    त्यांना राष्ट्रीय गुणीजन रत्नमोती पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .
Categories
कागल कोल्हापूर

कागलमध्ये सामाजिक न्याय मंत्री मा. ना. रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबीर व मसाले दुधाचे वाटप.


कागल/प्रतिनिधी●गोरख कांबळे. . कागलमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. मा. रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हाध्यक्ष उत्तम दादा कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या मार्फत करण्यात आले यावेळी कागल स्टॅंडवर मसाले दूध वाटप करण्यात आले तसेच रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते.या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी रक्तपेढीच्या नर्स व स्टाफ तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बऱ्याच युवकांनी रक्तदान केले. तसेच प्रत्येकाने रक्तदान करावे. आपण केलेल्या रक्तदानामुळे कुणाचा तरी जीव वाचू शकतो जीवदान मिळू शकते. आपण नेहमी रक्तदान करतो अशाच प्रकारे इतरांनीही रक्तदान करावे.असे आवाहनही यावेळी करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. उत्तमदादा कांबळे (जिल्हाध्यक्ष)यांच्या हस्ते झाले.
यावेळी तालुकाध्यक्ष श्री बाबासो कागलकर.कार्याध्यक्ष श्री बी. आर. कांबळे.सचिव श्री सचिन मोहिते.कागल तालुका युवा आघाडी अध्यक्ष श्री विनोद कांबळे.संघटक श्री सातापा हेगडे. कागल तालुका उपाध्यक्ष श्री चंद्र शेखर कोरे. तथा अजित भोसले.सामाजिक कार्यकर्ते श्री भिकाजी कांबळे, मंजुनाथ वराळे, श्रीकांत मालेकर, आनंदा कांबळे, पंडित कांबळे, दिलीप कांबळे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Categories
अजब गजब कोल्हापूर

श्रीम कमलादेवी नेगी( वय ५७) पती व मुलांच्या मृत्यूनंतरही पीएम केअर्स फंडास वृद्धापकाळाची ठेव ठेवलेलेे दीड लाख रूपये दान केले

  • कोल्हापूर- सुभाष भोसले
    उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यातील गौचर परिसरातील दुसरी दातृत्ववान दुर्गा. पती कमलसिंह नेगी शिक्षण विभागात परियोजना अधिकारी होते. त्यांचे निधन झाले आहे. पती ग्राम पंचायत झिरकोटीचे रहिवासी होते. चार वर्षापूर्वी दुर्घटनेत दोन्ही मुलांचे अकाली निधन झाले आहे. कमला देवी स्वत: राजकीय इंटर कॉलेज लंगासू येथे प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करतात.
    गौचर क्षेत्रातील देवकीदेवी भंडारी यांनी दहा लाख तर शांतीदेवी गुंसाई यानी एक लाख करोना विरोधातील लढ्यासाठी दिले होते. त्यांचाच आदर्श समोर ठेऊन कमलादेवी नेगी यांनी दीड लाख रूपये पंतप्रधान केअर्स फंडास दान केले आहेत. गौचर येथील भारतीय सेंट्रल बँकेत त्यांनी धनादेश सुपूर्द केला.
    कमलादेवी नेगी यांनी करोनामुळे बेरोजगारी व उपासमारीमुळे जनता होरपळून निघत असल्याने आपण दान दिल्याचे सांगितले. देवभूमीतून करोना लवकर नाहिसा व्हावा व जनजीवन पूर्वपदावर यावे असे कमलादेवी यांना वाटते.
    आयुष्याच्या उत्तरार्धात नोकरीचे अखेरचे वर्ष असताना आयुष्यभर साथ दिलेला नवरा गेला आहे. दोन्ही मुलांचे दुर्घटनेत निधन झाले आहे. एकाकी आयुष्याची संध्याकाळ असताना समजातील दु:ख पाहून मदतीचा हात पुढे करणे साधी सोपी गोष्ट नाही. कमला देवी तुम्हाला आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभू दे. दु:खाचा डोंगर कोसळला तरी रक्तातील दातृत्व उफाळून आले त्या दातृत्वास सांष्टांग दंडवत.
    उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी कमलादेवी यांचे भरभरून कौतुक केले. कमलादेवी यांची कृती समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
    समाज हेच कुटंब मानणाऱ्या कमलादेवी तुमचा अभिमान वाटतो.

  • संपत गायकवाड
    (माजी सहाय्यक शिक्षण संचालक)
Categories
अजब गजब कोल्हापूर

डॉ संकेत मेहता यांनी स्वत: ऑक्सिजवर असताना रुग्णावर उपचार करण्यासाठी देवदूत बनणे पडले ६० लाख रूपयांना व ९६ दिवस गेले दवाखान्यात


कोल्हापूर- सुभाष भोसले
डॉ संकेत मेहता भूलतज्ञ सूरत ( गुजरात) स्वत: ऑक्सिजनवर उपचार घेत असताना ICU मध्ये ७१ वर्षांच्या पेशन्टला ऑक्सिजन ट्यूब लावायला डॉक्टर लवकर न आल्याने डॉ मेहता यांच्यातला देवदूत जागा झाला त्यांनी स्वत:चा ऑक्सिजन मास्क काढून रूग्णाला ऑक्सिजन ट्यूब टाकली. बावीस मिनीटे डॉ मेहता यांना स्वत:ला ऑक्सिजन न मिळाल्याने फुफ्फुसावर गंभीर परिणाम होऊन ९६ दिवस दवाखान्यात राहावे लागले. चेन्नई येथे जाऊन केलेल्या उपचाराचा खर्च साठ लाख (६०,००,०००) रुपये आला.
डॉ संकेत मेहता हे सूरत येथील हॉस्पिटलमध्ये भूलतज्ज्ञ म्हणून सेवा बजावत आहेत. डॉ मेहता यांना करोनाची लागण होऊन त्यांचे ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने ते स्वत: ऑक्सिजनवर उपचार घेत होते. ICU मध्ये ७१ वर्षीय रुग्ण उपचाराखाठी आले. त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होत होता. तात्काळ ऑक्सिजन लावणे आवश्यक होते. डॉक्टरांना यायला उशीर होतोय हे लक्षात येताच रूग्णाचा जीव वाचावा म्हणून डॉ मेहता यांच्यातील देवदूत जागा झाला. त्यांनी आपला ऑक्सिजन मास्क काढून आलेल्या रूग्णास व्हेंटीलेटरवर ठेऊन ट्यूब टाकली. हे सर्व करेपर्यंत २२ मिनीटे डॉ मेहता विना ऑक्सिजन मास्क होते. याचा त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊन फुफ्फुस खराब झाले. फुफ्फुस प्रत्यारोपन करण्याची शक्यता निर्माण झाली.
फुफ्फुस प्रत्यारोपन करण्यासाठी डॉ मेहता यांना चेन्नई येथे एअर अॅम्बुलन्स ने हलविले. चेन्नई येथे फुफ्फुस प्रत्यारोपन न करता हॉस्पिटलमधील डॉक्टरांना बरे करण्यात यश आले. एकूण एक कोटी रूपये खर्च आला. पण हॉस्पिटलने साठ लाख रूपये बील केले. सुरत येथील डॉक्टर व डॉ मेहतांच्या मित्रांनी क्राऊड फंडींग सुरू केले, कारण हा प्रचंड कुवतीच्या पलिकडचा खर्च होता. सुरतच्या हॉस्पिटलमध्ये उपचाराचा खर्च माफ केला.
२२ दिवस व्हेंटिलेटरवर, ९६ दिवस हॉस्पिटलमध्ये, एकूण उपचाराचा खर्च ६० लाख रूपये भरून घरी आले. वॉकरचा आधार घेऊनच अजूनही चालावे लागते.
डॉ संकेत यांचे वय केवळ ३७ वर्ष आहे. रूग्णावर डॉक्टर लवकर न आल्याने आपला जीव धोक्यात घालून रुग्णावर उपचार करणे केवढ्या पडले? स्वत: ऑक्सिजनवर उपचार घेत असताना कोणीही दुसऱ्या रूग्णावर स्वप्नातही वा कल्पनेतही उपचार करणार नाही. तरीही डॉ मेहता यांनी धाडस केले ते त्यांना खूपच महागात पडले
डॉ संकेत मेहता यांना हॉस्पिटलचे बील साठ लाख म्हणजे प्रचंड आहे. लोकांनी जीव धोक्यात घालून उपचार केले म्हणून कौतुक झाले, वर्तमानपत्रांचे रकाणे भरून आले. टी व्ही चॅनलवर प्रशंसा झाली. आता मात्र त्यांना आर्थिक अडचणीस सामोरे जावे लागत आहे. सुरतबरोबर संपूर्ण देशासाठी नव्हे तर जगासाठी मिसाल बनलेले डॉ संकेत यांना सर्व स्तरातून मदत मिळावी ही परमेश्वराचे चरणी प्रार्थना.
रक्कम उभी राहील, आर्थिक संकट दूर जाईल पण तब्बेतीचं काय??बायको मुले, आई -वडील यांचं काय ??? डॉ संकेत मेहता तुम्ही परमेश्वराचे अवतार नव्हे तर परमेश्वरच आहात. देशाच्या वैद्यकीय इतिहासात आपले नाव सुवर्णअक्षरांनी लिहीले जाईल. डॉक्टर तुमच्या पायावर नतमस्तकच. तुम्हाला परमेश्वर आरोग्यदायी दीर्घायुष्य देऊ दे
जीवावर उदार होऊन सेवा बजावणाऱ्यासाठी ही गोष्ट शंभरवेळा वाचून विचार करण्यासारखी आहे. शेवटी सर्व स्वत:ला, पत्नीला, मुलांना व आई-वडील यांनाच निस्तरावे लागते.


संपत गायकवाड (माजी सहाय्यक शिक्षण संचालक)

Categories
कोल्हापूर

ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर महानगर तर्फे ‘ राष्ट्रीय ग्राहक दिन ‘ उत्साहात साजरा


कोल्हापूर- सुभाष भोसले
कोल्हापूर येथे ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या कोल्हापुर महानगर शाखेच्या वतीने सानेगुरुजी वसाहत केदारलींग बेकरी येथील पाटील हाॅल मध्ये ‘ राष्ट्रीय ग्राहक दिन ‘ साजरा करणेत आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा कायदेशीर सल्लागार अँड राजेंद्र वायगणकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष बी. जे. पाटील हे होते. सुरवातीला प्रथम एज्युकेशन फाऊंडेशन मार्फत सल्लागार सुधाकर भदरगे यांनी महाराष्ट्र राज्य शासन आयोजित लोकसंवाद ऑनलाईन वेबीनारचे प्रक्षेपण स्क्रीनवर दाखवणेत आले. त्यानंतर मान्यवरांचे हस्ते फोटो पुजन करून महानगर सदस्या आरती पोतनीस यांच्या गणेश आराधनेने कार्यक्रमास सुरवात झाली…..!
सुरवातीला महानगर अध्यक्ष अशोक पोतनीस यांनी पाहूण्यांचे स्वागत केले. त्यानंतर अॅड वायगणकर यांनी ग्राहक संरक्षण कायद्याचे महत्व विशद करताना ग्राहक कायद्याची निर्मीती व २०१९ च्या सुधारीत कायद्याची तरतुदीची विस्तारीत माहिती दिली. यानंतर उपाध्यक्ष जगदीश पाटील यांनी ग्राहक पंचायतचे काम करत असताना खुप काही शिकायला मिळते असे अपले मनोगत व्यक्त केले.यानंतर सल्लागार राजन पाटील यांनी ग्राहक पंचायतचे काम उत्कृष्ट पध्दतीने सुरू असून सदर कामाची व्याप्ती वाढत असून आपण बॅक, आरोग्य, राशन, शैक्षणिक, विज वितरण आशा विविध कामाच्या कमिटी नेमून कामं करणेचा सल्ला दिला. अध्यक्ष बी. जे .पाटील यांनी थोडक्यात केलेल्या कामाचा आढावा सांगीतला व ग्राहक पंचायतच्या माध्यमातून पदाधिकारी यांनी वर्षभर कोणते कार्यक्रम कशा पद्धतीने राबवायचे यांचे यांची सविस्तर माहिती दिली.
यानंतर उपस्थितीत पदाधिकारी यांना महानगर तर्फे प्रशस्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन महानगर अध्यक्ष अशोक पोतनीस, सचिव सचिन गणबावले, उपाध्यक्ष ई.जी.खोत यांनी केले. यावेळी महानगरचे नुतन सदस्य पदी सत्वशिल खाडे यांची निवड झाले बद्दल पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक पोतनीस यांनी केले व आभार दिप्ती कदम यांनी मानले यानंतर प्रीती भोजनाचा कार्यक्रम पार पाडून कार्यक्रमाची सांगता झाली…!
यावेळी जिल्हा सचिव दादासो शेलार, जिल्हा संघटीका पूनम देसाई, जिल्हा सदस्य संजय पोवार, इचलकरंजी अध्यक्ष सुरेंद्र दास, करवीर अध्यक्ष यशवंतराव शेळके, महानगर पदाधिकारी मणीषा जाधव, प्रज्ञा यादव, प्रसन्नता चव्हाण, तानाजी पाटील, इचलकरंजीचे पदाधिकारी लालचंद पारीख, सुरेश सारवडे, संजय शिरदवडे, अशोक ठोमके, अमोल पराडकर, निळकंठ देसाई, शिवाजी पाटील, अक्षय पोतनीस इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते…..!

Design a site like this with WordPress.com
Get started