Categories
मुंबई

मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू ; कुटुंबावर शोककळा

विरेंद्र म्हात्रे नवी मुंबई प्रतिनिधी

  : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर पाच जण जखमी झाले आहेत. जखमीनां जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले असून मृतांमध्ये नवी मुंबईतील एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे. मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर खालापूर टोलनजीक फुडमॉलजवळ सोमवारी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमाराला हा भीषण अपघात झाला.

याबाबत वृत्त असे की पुणे एक्सप्रेस वेवर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका कंटेनरने टेम्पोला मागून धडक दिली. त्यामुळे पलटी झालेल्या टेम्पोला मागून येणाऱ्या दोन कार धडकल्या. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या टेम्पोने या दोन्ही गाड्यांनी धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात नवी मुंबईतील डॉक्टर वैभव झुंजारे यांची आई, पत्नी आणि 5 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून ११ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. तर, दुसऱ्या कारमधील एका महिलेचा मृत्यू झाला आहे
डाॅ. वैभव झुंजारे नवी मुंबई महानगरपालिकेत पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. डाॅ. वैभव झुंझारे हे आपल्या कुटुंबासमवेत पुण्याला एका कार्यक्रमासाठी गेले होते. पुण्याहून मुंबईला परतत असताना फुडमॉल जवळ हा अपघात घडला आहे. या अपघातात मंजू नाहर, डॉ. वैभव झुंझारे, उषा झुंझारे, वैशाली झुंझारे, श्रिया झुंझारे यांचा मृत्यू झाला आहे. तर स्वप्नील कांबळे, प्रकाश नाहर, अर्णव झुंझारे, किशन चौधरी, काळूराम जाट हे जखमी झाले आहेत.

Categories
कला व मनोरंजन मुंबई

एच आर एस कराओके सिंगिंग हबच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त लोकप्रिय हिंदी चित्रपट गीतांची ” गीत गाता चल ” संगीत मैफल संपन्न

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी: लक्ष्मण राजे )

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात बरेच दिवस घरात बसलेल्या संगीतप्रेमी रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी आता सर्व थिएटर सुरू झाली आहेत.वसई पश्चिम येथील मनश्री हाॅल मध्ये निर्माते हेतल आशर आणि हितेन आशर यांच्या एच आर एस कराओके सिंगिंग हबच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त “गीत गाता चल” ही सुरेल गाण्यांची संगीत मैफल आयोजित करण्यात आली होती. या संगीत मैफलीला मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या रसिक प्रेक्षकांनी पसंती दिली. “गीत गाता चल” या लोकप्रिय सुरेल हिंदी चित्रपटातील गीतांच्या मनोरंजक कार्यक्रमाची संकल्पना निर्माती आणि गायिका हेतल आशर यांची होती. “गीत गाता चल ” हा हिंदी गीतांचा नजराणा रसिकांना खुप आवडला . हेतल आशर , हितेन आशर , अनिष्का, अरूण, अशोक, गीता, हरीश, जितेंद्र ,माला ममता , माला सावर्डेकर, फातीमा , प्रशांत , राम प्रताप , रिया , सुनिल, संचिता, उदय, जोसेफ, निष्ठा , दिप्ती , रोहीत, सकीना,आणि सीमा या गायकांनी एका पेक्षा एक सरस हिंदी गाणी सादर केली आणि रसिकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन निवेदन हेतन आशर यांनी केले ‌. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत, साहिल, सुकमल, विलीता, रिद्धी यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच सूर म्युझिक ने सहकार्य केले. “गीत गाता चल” या सुरेल संगीत श्रवणीय मैफिलीला रसिकांचा टाळ्यांच्या कडकडाटात प्रचंड प्रतिसाद मिळाला.

Categories
मुंबई

नवी मुंबई महानगर पालिका स्वच्छता अभियानातील स्वच्छ शहरी क्षेत्रातील प्रथम क्रमाकांचा पुरस्कार प्रभाग ९६ ला प्रदान


विरेंद्र म्हात्रे नवी मुंबई प्रतिनिधी : स्वच्छता अभियानामध्ये शहरी विभागात नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात प्रथम क्रमाकांचा पुरस्कार प्रभाग ९६ ला गुरूवारी (दि. ७ जानेवारी) नेरूळ विभाग कार्यालयात प्रदान करण्यात आला. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त तथा नेरूळ विभाग अधिकारी दत्तात्रेय नागरे यांच्या हस्ते नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांना देण्यात आला. सन्मानपत्र व ट्राफी असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या महापालिका स्तरावरील स्वच्छता प्रभाग स्पर्धेत नवी मुंबईमध्ये प्रभाग ९६ ला काही दिवसापूर्वीच जाहीर झाला होता, तो आज वितरीत करण्यात आला. या कार्यक्रमास पालिका प्रशासनाचे स्वच्छता अधिकारी राजेंद्र इंगळे, स्वच्छता निरीक्षक जयश्री आढळ, उपस्वच्छता निरीक्षक विरेंद्र पवार यांच्यासह जनसेवक गणेश भगत, गोरक्षनाथ गांडाळ, परविन कौर मॅडम, विशाल जाधव, वैभव जाधव, रमेश नार्वेकर, सागर मोहिते, रवींद्र भगत उपस्थित होते.
प्रभाग ९६ मधील गृहनिर्माण सोसायट्यांना दोन वेळा कचऱ्याचे डब्बे वितरीत करण्यात आले, प्रभागात तीन वेळा स्वच्छता अभियान राबविण्यात आले. विभागात प्रथमच गृहनिर्माण सोसायट्यांचे नामफलक उभारण्यात आले. प्रभागातील अंर्तगत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात आले. यातील परिसरात यापूर्वी न झालेल्या परिसरातील रस्त्यांचेही प्रथमच डांबरीकरण झाले. डेब्रिजने भरलेली गटारे वेळोवेळी स्वच्छ करण्यात आली. जनसामान्यांमध्ये स्वच्छतेविषयी वेळावेळी जनजागृती करण्यात आली.
प्रभागातील रस्ते, पदपथ व उद्यानासह, रस्त्यांची दुरावस्था यासह प्रभागातील अंर्तगत भागातही रंगरंगोटी व प्रबोधनात्मक सुभाषितांबाबत आग्रही पाठपुरावा गणेश भगत आणि सौ. रुपाली किस्मत भगत यांनी प्रशासन दरबारी केला होता. महापालिका अधिकाऱ्यांना घेवून गणेश भगत आणि सौ. रुपाली किस्मत भगत यांनी वेळोवेळी पाहणी अभियान राबवून समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. महापालिका प्रशासनाकडून स्वच्छता प्रभाग स्पर्धेत जाहिर करण्यात आलेल्या निकालामध्ये प्रभाग ९६चा प्रथम क्रमांक जाहिर झाला आहे. हा पुरस्कार गणेश भगत व माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांच्या पाठपुराव्यामुळे व कार्यामुळे प्राप्त झाला असल्याची प्रभागातील रहीवाशांकडून व्यक्त केली जात आहे.
या पुरस्काराचे खरे श्रेय विभागातील जनतेचे व सफाई कामगारांचे आहे. स्वच्छता अभियानात सहभागी होताना बकालपणा हटविताना परिसरातील जनतेने मनापासून सहकार्य केलेले आहे. सफाई कामगारांनी सफाई करताना कोठेही कुचराई केली नाही. पुरस्कार आम्ही स्विकारला असला तरी खरे मानकरी प्रभागातील जनता व सफाई कामगारच असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
विभाग अधिकारी कार्यालयात पुरस्कार सोहळा संपल्यावर नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत आणि जनसेवक गणेश भगत यांनी तात्काळ परिसरात जावून कार्यरत असणाऱ्या सर्वच सफाई कामगारांचा सत्कार करत कृतज्ञता व्यक्त केली.

Categories
मुंबई

खामगांव जालना रेल्वे मार्ग सिंदखेड राजा देऊळगाव राजा या शहरांमधून व्हावा यासाठी स्थानिक रहिवाशाचे प्रयत्न.

खामगांव – जालना रेल्वे मार्गाच्या फिल्ड सर्वेसाठी आलेल्या पथकाशी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची चर्चा*

मुंबई: सिद्धार्थ काळे.

खामगाव – जालना रेल्वेमार्ग होणे आपल्या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी किती गरजेचा आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. या रेल्वे मार्गाच्या प्रत्यक्षात येण्यासाठी सर्वेक्षणाच्या कामाला सुरूवात झाली आहे. खामगांव- जालना रेल्वे मार्गाच्या तांत्रिक सर्वेक्षणासाठी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या सेंट्रल रेल्वेची ट्राफिक सर्वे टीम जिल्ह्यात आली आहे. पथक बुधवारी आणि गुरुवारी आपल्या जिल्ह्यात येत आहे. या पथकाचे प्रमुख उपआयुक्त (सर्वेक्षण) श्री. जैन यांच्यासोबत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे साहेबांनीं चर्चा केली.
चर्चेदरम्यान पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी या भागातील बाजारपेठेसोबतच औद्योगिक महत्व विषद करीत रेल्वे मार्गाचे महत्व पटवून दिले. ते म्हणाले, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, चिखली, खामगाव या चार तालुक्यांमधून हा रेल्वे मार्ग जात आहे. या भागातील कृषी व व्यापारी बाजारपेठेचे महत्व मोठी आहे. कृषी, व्यापार व औद्योगिक विकासासोबतच या भागातील रेल्वेमार्ग हा रोजगाराची गरज आहे. या भागापासून मुंबई- नागपूर सारखी औद्योगिक शहरे दूर असल्याकारणाने या भागातील उद्योजक, व्यापारी यांना दळणवळण व वाहतूक खर्च जास्त येतो. त्यामुळे निश्चितच या परीसराच्या कृषी, व्यापार व औद्योगिक विकासावर परिणाम होतो. हा मार्ग झाल्यास या परिसरातील वाहतुक खर्च कमी लागून परिणामी जिल्ह्यातील व्यापार वृद्धीसोबतच बेरोजगारी कमी होण्यास मदत मिळणार आहे. वाहतुक सोपी झाल्यास औद्योगिक वसाहतींचा विकास होऊन उद्योगांना चालना मिळणार आहे, असेही पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी पथकातील अधिकाऱ्यांना सांगितले.
चर्चेदरम्यान पालकमंत्री म्हणाले, या रेल्वे मार्गामुळे केवळ दळण वळणाची सुविधा होणार नसून जिल्ह्यातील पर्यटनीय स्थळांचाही विकास होणार आहे. जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील जिजाऊ जन्मस्थान, लोणार येथील जागतिक किर्तीचे सरोवर तसेच शेगाव येथील संत गजानन महाराज समाधी स्थळ येथील पर्यटनास चालना मिळणार आहे. हा मार्ग विदर्भ व मराठवाड्यातील पर्यटन, उद्योग, कृषी विकासासाठी महत्वाचा दुवा ठरणार आहे. या भागातील औद्योगिक मागासलेपण दूर सारण्यासाठी हा रेल्वे मार्ग होणे काळाची गरज आहे.
या रेल्वे मार्गामुळे जिल्ह्यातील अनेक वर्षातील प्रतिक्षेत असलेल्या विकास कामास नवी चालना मिळुन विकासाचे नवे पर्व सुरु होणार आहे. सेंट्रल रेल्वेची ट्राफिक सर्वे टीम फिल्ड सर्वे साठी आलेल्या अधिकाऱ्यांसोबत पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या चर्चेनंतर हा रेल्वे मार्ग निश्चितच मंजुर होईल व जिल्ह्याच्या विकासाचे विकासपर्वाला गती मिळेल, अशी आशा व्यक्त केली.
तत्पूर्वी पालकमंत्री यांनी सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, चिखली, खामगाव तालुक्यातील तहसीलदार यांच्याशी व जिल्हाधिकारी यांच्याशी यांना पथकातील सर्वे करणाऱ्या अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याच्या सुचनाही दिल्या.

Categories
कला व मनोरंजन मुंबई

सुरेल मधुर हिंदी मराठी चित्रपट गीतांची “आओ झुमे गाये ” संगीत मैफल संपन्न

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी: लक्ष्मण राजे )

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात बरेच दिवस घरात बसलेल्या संगीतप्रेमी रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी आता सर्व आता थिएटर सुरू झाली आहेत. बोरीवली येथील प्रबोधकार ठाकरे मिनी थिएटर मध्ये निर्माती गायिका नीता पवार यांच्या रसिका प्रेझेंट तर्फे “आओ झुमे गाये ” ही सुरेल गाण्यांची संगीत मैफल आयोजित करण्यात आली होती. या संगीत मैफलीला मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या रसिक प्रेक्षकांनी पसंती दिली. “आओ झुमे गाये या लोकप्रिय सुरेल हिंदी मराठी चित्रपटातील गीतांच्या मनोरंजक कार्यक्रमाची संकल्पना निर्माती नीता पवार यांची होती. रसिका प्रेझेंट ” आओ झुमे गाये ” हा मराठी हिंदी गीतांचा नजराणा रसिकांना खुप आवडला . गायिका नीता पवार आणि १६ सहकारी गायकांनी उठ महागणपती , आओ झुमे गाये , हे चिंचेचे झाड ,बदन पे सितारे ,ही चाल तुरुतुरु, ओ मेरी शर्मिली , हसता हुआ नुरानी चेहरा अशी एका पेक्षा एक सरस मराठी हिंदी गाणी सादर केली आणि रसिकांना मंत्रमुग्ध केले. “आओ झुमे गाये” या सुरेल संगीत श्रवणीय मैफिलीला रसिकांचा टाळ्यांच्या कडकडाटात प्रचंड प्रतिसाद मिळाला.

Categories
मुंबई

टाटा सुमुहाचे सर्वेसर्वा ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी घेतली पुण्यातील जुने मित्र इनामदार यांची सदिच्छा भेट !

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी: लक्ष्मण राजे )

टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा रविवारी दुपारी तीनच्या सुमारास मुंबई ते पुणे असा प्रवास करत पुण्यातील कोथरूड येथील गांधी भवना शेजारी असलेल्या वूडलँड सोसायटीत आले होते. कोणताही बडेजाव किंवा सुरक्षिततेचा बाऊ न करता टाटा तिथे आले. या सोसायटीत राहणाऱ्या इनामदार यांच्या घरी जाऊन त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. सुमारे पाऊण तास त्यांनी आपल्या मित्रासह गप्पांची मैफल रंगवली. इनामदार यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देऊन टाटा तितक्याच सहजतेने परतलेही!
जुन्या मित्राला आवर्जून भेटायला आलेले ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचा अकृत्रिम स्नेह आणि साधेपणा रविवारी कोथरूड मधील एका सोसायटीतील रहिवाशांनी अनुभवला. त्यांची ही भेट जरी अल्पकालीन असली, तरी त्यांच्या सहवासाने आणि साधेपणाने त्यांना भेटलेल्यांच्या मनात कायमचे घर केले.
टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा रविवारी दुपारी तीनच्या सुमारास पुण्यातील कोथरूड येथील गांधी भवना शेजारी असलेल्या वूडलँड सोसायटीत आले होते. कोणताही बडेजाव किंवा सुरक्षिततेचा बाऊ न करता टाटा तिथे आले. या सोसायटीत राहणाऱ्या इनामदार यांच्या घरी जाऊन त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. सुमारे पाऊण तास त्यांनी आपल्या मित्रासह गप्पांची मैफल रंगवली. इनामदार यांना उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देऊन टाटा तितक्याच सहजतेने परतलेही!
‘रतन टाटा स्नेह्याच्या भेटीसाठी अगदी अल्पकाळ आमच्या सोसायटीत आले होते; परंतु या भेटीत कुठेही सुरक्षेचा किंवा श्रीमंतीचा बडेजाव आम्हाला जाणवला नाही. त्यामुळेच ते येऊन गेल्याची माहितीही फारशी कोणाला समजली नाही,’ अशी माहिती सोसायटीतील रहिवासी अंजली पारडीकर यांनी दिली. ‘रविवारी दुपारी त्या बाहेरून सोसायटीत परत आल्या होत्या. त्या वेळी सोसायटीत टाटा मोटर्सच्या दोन नव्या गाड्या उभ्या होत्या. त्यातून रतन टाटांसारखी एक व्यक्ती उतरली आणि पटकन लिफ्टमध्ये शिरली. ते रतन टाटाच आहेत, हे समजायलाच काही क्षण लागले. त्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या कर्मचाऱ्यांना आम्ही विचारले, तेव्हा टाटा त्यांच्या मित्राला भेटण्यासाठी आले आहेत असे समजले,अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष अभिजित मकाशीर यांनी दिली. ‘रतन टाटा आवर्जून टाटा समूहाच्याच गाडीतून आले होते. त्यांचा साधेपणा पदोपदी जाणवत होता. त्यांची ही भेट कायम स्मरणात राहील,’ असेही ते म्हणाले.टाटांनी दिला कानमंत्र या भेटीनंतर रतन टाटा परतत असताना पार्किंगमध्ये अभिजित मकाशीर व त्यांची मुलगी आदिश्री यांनी त्यांच्याशी संवाद साधला. ‘टाटा यांच्या अनपेक्षित भेटीमुळे जणू काही परमेश्वराचीच भेट व्हावी, अशी आमची मन:स्थिती झाली होती. कोणताही बाऊ न करता त्यांनीही आमच्याशी गप्पा मारल्या. अवघ्या काही मिनिटांच्या संवादात रतन टाटांनी आम्हाला स्वत:च्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, त्यापासून कधीही विचलित होऊ नका, असा कानमंत्र दिला,’ असे मकाशीर म्हणाले.

Categories
मुंबई

जनसेवा सामाजिक संस्था मार्फत नूतन वर्षानिमित्त सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

पालघर/दिपेश पष्टे: जनसेवा सामाजिक संस्थे मार्फत संपूर्ण जिल्हात मोठ्या प्रमाणात सामाजिक उपक्रम वर्षभर राबविण्यात येत असतात. तसेच वाडा तालुक्यातील खरीवली गावात गेल्या अनेक वर्षापासुन या संस्थेमार्फत नूतन वर्षाची सुरवात सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करून केली जाते.यावर्षी सुद्धा दि.०१व ०२ जानेवारी २०२१ रोजी या दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन खरीवली गावातील साई मंदिर परिसरात केले होते.
सदर या दोन दिवसीय सामाजीक उपक्रमात पहिल्या दिवशी परिसरातील गरजू व आदिवासी कुटुंबाना एक मदतीचा हात म्हणुन ब्लॅंकेट व गृहउपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच यावेळी लहान मुलांना कपडे व खाऊ सुद्धा देण्यात आली. कोविड-१९ महामारी मध्ये ज्यांनी आपल्या आरोग्याची पर्वा न करता इतरांचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी सेवा केली अश्या पत्रकार, आरोग्य सेविका,आशा वर्कर, डॉक्टर यांना कोविड योद्धा सन्मानपत्र देवून मानसन्मान करण्यात आला.तर दुसऱ्या दिवशी परीसरातील तरुणांनी राज्य शासनाने केलेल्या आवाहनाला एक प्रतिसाद म्हणून व राज्यातील रुग्ण सेवेत आपलं सुद्धा हातभार असावा यासाठी मोठ्या संख्येने रक्तदान केले.
तसेच याठिकाणी मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर मध्ये नागरिकांनी सहभाग घेऊन तपासणी केली. यामध्ये आरोग्य तपासणी मध्ये साखरेचे प्रमाण,ईसीजी,ब्लडप्रेशर,अस्थी रोग इत्यादी आजाराची तपासणी मोफत करण्यात आली. ही तपासणी ऑरेंज हॉस्पिटल भिवंडी व स्किलमिट अकॅडमी अंबाडी यांच्या मार्फत करण्यात आली.तर नेत्र तपासणी शिबिर मध्ये ज्या वयोवृद्ध नागरिकांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया गरज आहे अश्या नागरीकांची मोफत शस्त्रक्रिया भुमीऑप्टिक्स अंबाडी-कुडूस यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे .
सदर या दोन दिवसीय कार्यक्रम अनेक मान्यवरांनी उपस्थिती दाखवली यामध्ये भाजपा पालघर जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील, वाडा पंचायत सभापती योगेश गवा,जिल्हा परिषद सदस्य शशिकांत पाटील,शिवसेना नालासोपारा विधानसभा सह समन्वयक गोविंद पाटील,मुबंई मधील दानशूर व्यक्तिमत्त्व नीलेश शहा, शशिकांत शाह,अल्पा बेन बेन,हरखचंदजी गड्डा,कल्पेश संगोइ,नितीनजी धरोड,योगेश जोशी,सिद्धार्थ जोशी,समाजसेवक रामचरण नाईक,मानवाधिकार सुरक्षा संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा सचिव दिपेश पष्टे,प्रहार अपंग क्रांती संघटनेचे वाडा तालुका अध्यक्ष संतोष निखुर्डे,समाजेवक केशव पाटील, भाई ठाकरे, रोहित ठाकरे, चर्मकार सेवा सोसायटी अध्यक्ष विजय माने आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रम प्रसंगी जनसेवा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नरेश जाधव यांनी सांगितले की या संस्थेच्या माध्यमातून येणाऱ्या काळात महिला बचत गटांना स्वयंरोजगार निर्मिती साठी मदत त्याच बरोबर निराधार व विधवा महिलांना अर्थिक स्वरूपात मदत करणार आहोत.
यावेळी जनसेवा सामाजिक संस्थेचे सचिव पत्रकार जयेश घोडविंदे, खजिनदार भूषण ठाकरे, सदस्य सुरज जाधव,वैभव भोईर, मयुरी बागुल,वत्सला पवार, जयवंती पाडोसा यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विषेश मेहनत घेतली.

Categories
मुंबई

लोकप्रिय सुरेल मधुर अविस्मरणीय गीतांची “रेअर ऑफ आर डी बर्मन” संगीत मैफल संपन्न

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी: लक्ष्मण राजे )

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात बरेच दिवस घरात बसलेल्या संगीतप्रेमी रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी आता सर्व थिएटर बंद असल्याने डिजिटल प्लॅटफॉर्म वरुन सुरेल गाण्यांची संगीत मैफल आयोजित करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे.या आॅनलाईन संगीत मैफलींना रसिक प्रेक्षकांनी पसंती दिली. त्याच अनुषंगाने निर्माता दिग्दर्शक. गायक अमित राजे प्रेझेंटस् ” रेअर ऑफ आर डी बर्मन ” या लोकप्रिय सुरेल हिंदी चित्रपटातील गीतांच्या मनोरंजक कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली होती. भारतीय चित्रपट सृष्टीतील महान संगीतकार आणि गायक आर डी बर्मन यांच्या ( ४ जानेवारी, २६ व्या पुण्यतिथी) स्मृतिदिना निमित्त निर्माता अमित राजे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सुमधुर, सुरेल, अविस्मरणीय, लोकप्रिय गीतांची “रेअर ऑफ आर डी बर्मन” ही सुरेल संगीत मैफल डिजिटल प्लॅटफॉर्म वरुन आॅनलाईन सादर करण्यात आली.निर्माता अमित राजे यांनी सादर केलेल्या आर डी बर्मन यांच्या अविस्मरणीय सुमधुर लोकप्रिय गाजलेल्या गाण्यांच्या “रेअर ऑफ आर डी बर्मन” या आॅनलाईन कार्यक्रमात गायक अमित राजे यांनी आर डी बर्मन – किशोर कुमार या जोडीची गाजलेली मधुर गीते सादर केली.या ऑनलाईन कार्यक्रमात तुम हो मेरे दिल की धडकन , ना जाने दिन कैसे जीवन में आए है,रूप ये तेरा किसने बनाया है , बहौत दूर हो के बहौत पास हो तुम, कहो कैसे रास्ता भुल पडे, ओ मेरे हेमराज कैसा है ये राज,रास्ता देखके तेरा अशी एका पेक्षा एक सरस मधुर हिंदी चित्रपट गीते सादर केली.या सुरेल संगीत मैफिलीचे सुत्रसंचलन , निवेदन रत्ना हिले यांनी केले. या यशस्वी आॅनलाईन कार्यक्रमाला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. विशेषतः भारतासह कॅनडा , मास्को , यूएसए , यूएई , यूके अशा जगभरातील संगीतकार आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या हिंदी चित्रपट गीतांच्या चाहत्यांनी या सुपरडुपर सुपरहिट कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. तसेच असंख्य रसिकांनी इव्हेंट आॅर्गनाईझर अमित राजे यांच्या यू ट्यूब चॅनल वरून अनेकदा आनंद घेतला. या सुरेल संगीतमय यशस्वी आॅनलाईन कार्यक्रमाला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. तसेच या अविस्मरणीय कार्यक्रमाच्या अभूतपूर्व यशानंतर अमित राजे यांनी डिजिटल प्लॅटफॉर्म वरुन विविध संकल्पना घेऊन सुरेल हिंदी गाण्यांच्या मैफलीचे आयोजन करून रसिकांना घरबसल्या आनंददायी सुरेल , मधुर हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहीन असे मनोगत व्यक्त केले .

Categories
मुंबई

सारसोळे व नेरूळ सेक्टर सहामधील मार्गफलकांची दुरावस्था दूर करा : मनोज मेहेर

विरेंद्र म्हात्रे नवी मुंबई प्रतिनिधी : प्रभाग ८६ मधील सारसोळे व नेरूळ सेक्टर सहामधील मार्गफलकांची दुरावस्था दूर करून डागडूजी तसेच सुशोभीकरण करण्याची मागणी सारसोळे  गावचे ग्रामस्थ व  महापालिका ‘ब’ प्रभाग समितीचे माजी सदस्य  मनोज यशवंत मेहेर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.महापालिका प्रभाग ८६ मध्ये सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहा परिसराचा समावेश होत आहे. या परिसरात आपण अंर्तगत भागातील रस्त्यावर तसेच चौकात फिरल्यास येथील मार्गफलकांची पूर्णपणे दुरावस्था झालेली असून त्या ठिकाणी बकालपणा आलेला आहे. मार्गफलकावरील माहिती असणाऱ्या पाट्या नाहीशा झाल्या असून केवळ  चौथरेच पहावयास मिळतात. अनेक ठिकाणचे चौथरेही तुटलेले आहेत. अन्य सेक्टर व गावांमध्ये नव्याने स्टील रॉड व फायबरमध्ये मार्गफलक बसविण्यात आले आहेत. मग प्रभाग ८६ मधील सारसोळे गाव आणि नेरूळ सेक्टर सहा परिसरात अशा प्रकारे मार्गफलक का बसविण्यात आले नाहीत. अनेक वर्षापासून मार्गफलकांची दुरावस्था असतानाही पालिका प्रशासनाकडून डागडूजी तसेच सुशोभीकरण करण्यात आलेले नाही. यासंदर्भात विभाग कार्यालयात १३ ऑक्टोबर २०२० रोजी निवेदनही सादर केलेले आहे. तथापि प्रशासनाकडून या पत्राची दखल न घेण्यात आल्याने पुन्हा समस्येचे गांभीर्य निदर्शनास आणून देण्यासाठी हा पत्रव्यवहार करत असल्याचे मनोज मेहेर यांनी निवेदनात म्हटले आहे.

Categories
मुंबई

क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन तर्फे पनवेल मधील शिक्षकांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार सोहळा दिमाखात संपन्न…


विरेंद्र म्हात्रे नवी मुंबई प्रतिनिधी : भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा, ३ जानेवारी जयंतीदिन. स्त्री उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा ज्योतिराव फुले यांनी हाती घेतलेल्या समाजोद्धाराचा वसा तितक्याच नेटाने पुढे नेणाऱ्या सावित्रीबाईंना त्यांच्या १८९ व्या जयंती दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन! त्यांच्याच पाऊलांवर पाऊल टाकत आज समाजातील प्रत्येक स्त्री समाजात अभिमानाने वावरत आहे,स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करून यशाचा डोंगर सर करीत आहे. समाजातील अश्याच सुशिक्षित, कर्तृत्वान,जिज्ञासू,मेहनती शिक्षका यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांसारखे विदयार्थी घडवण्याचे अमूल्य कार्य केले आहे, त्यामुळेच पनवेल मधील शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणार्‍या शिक्षकांचा सत्कार सोहळा दिमाखदार पद्धतीत आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्याची सुरवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली, त्यानंतर उपस्थित सर्व मा. महिलावर्गाची फॉउंडेशन च्या सदस्यांनी महिलांना हळदीकुंकू लावून ओटी भरली व कार्यक्रमाला प्रारंभ झाला. उपस्थित सर्व मान्यवरांनी व्यासपीठावर जाऊन आपले मनोगत व्यक्त केले. क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन च्या कार्याचे कौतुक केले,त्यांना पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या. तसेच या सोहळ्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या ३ जानेवारी जयंतीनिमित्त दिनांक ५ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी 4 वाजता विसपुते महिला वसतिगृह नवीन पनवेल सेक्टर १५, प्लॉट नंबर ४१,पनवेल (पूर्व ) याठिकाणी क्रांतिज्योत महिला विकास फॉउंडेशन तर्फे पनवेल मधील शिक्षकांना सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
या सत्कार सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय श्री विसपुते कॉलेज व आदर्श शैक्षणिक समूह चे चेअरमन धनराजजी विसपूते,उद्योजक मा.श्री सतिशजी मोरे, माजी महापौर मा.सौ. चारुशीला घरत, ऍड सौ.संगीता रोकडे ,ऍड सौ.दीपाली बांद्रे, माजी नगरसेविका सौ.नीता माळी,
मा.श्री कादिरभाई कच्छी, ज्येष्ठ नेते शेतकरी कामगार पक्ष आर.डी.घरत, डी डी विसपुते प्राध्यापिका सौ.सीमा कांबळे, प्राध्यापिका श्रीमती इंदुमती ठक्कर, मुख्याध्यापक एम.यु.एम.इंटरनॅशनल स्कुल चंद्रकांत सूर्यवंशी,
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष मा.श्री रत्नाकर पाटील, उद्योग नगरी वृत्तपत्राचे पत्रकार कुमारी रुपाली वाघमारे, दैनिक हिंदू सम्राट वृत्तपेपर चे पत्रकार
मा.श्री विरेंद्र म्हात्रे, जागरूक महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे पत्रकार मा.श्री एकनाथ गोपाळ, सौ.मा.जयश्रीमाई सावार्डेकर
भारतीय महाक्रांन्ती सेना राष्र्टिय अथ्यक्ष महिला आघाडी, समाजसेविका वंदना बामणे, सह शिक्षक, शिक्षिका आदी उपस्थित होते तसेच क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ. रुपालिताई शिंदे व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.यावेळी क्रांतीज्योत महिला विकास फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ. रुपालिताई शिंदे, सदस्या सौ.मौसमी तटकरे, विचुंबे विभागीय अध्यक्षा सौ.रत्नमाला पाबरेकर, सदस्या सौ. यामिनी महाजन,सदस्या सौ. माणिनी घोडके व डी.डी.विसपुते कॉलेज चे शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.

Categories
मुंबई

महाराष्ट्र कुंभार विकास संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना मातीकलेचे प्रशिक्षण

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी: लक्ष्मण राजे )

महाराष्ट्र कुंभार विकास संस्थेच्या संकल्पनेनुसार नवीन वर्षाची वाटचाल सुरू करण्यासात आली*
श्री गणेशाय नमः श्री संत शिरोमणी गोरोबाकाका आशीर्वादाने दिनांक ०१/०१/२०२१ रोजी अखिल महाराष्ट्र कुंभार विकास संस्था रजिस्टर मुंबई, शाखा जिल्हा सातारा , सातारा तालुका कार्यकारिणी ग्रुपच्या संकल्पनेनुसार सातारा तालुक्यातून सेंट्रल विलेज पॉटरी इन्स्टिट्यूट खानापुर जिल्हा बेळगाव येथे मातीकला प्रशिक्षणासाठी मातीकला बोर्डाचे अध्यक्ष श्री दत्ताजी डाळजकर व श्री प्रकाश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आले.यावेळी सेंट्रल विलेज पाॅटरी इन्स्टिट्यूटचे प्राचार्य श्री प्रभाकरजी , आणि महाराष्ट्र कुंभार विकास संस्थेच्या सातारा तालुका कार्यकारिणीतील सदस्य उपस्थित होते.

Categories
मुंबई

उत्तर मुंबईचे खासदार मा.गोपाळ शेट्टी देशातील सर्वोत्कृष्ट खासदार

५३९ खासदारांमध्ये पटकावला ४ था क्रमांक

( हिंदू सम्राट मुंबई प्रतिनिधी: लक्ष्मण राजे)

मुंबईच्या भाजपा उत्तर मुंबईचे लोकप्रिय खासदार मा.गोपाळ शेट्टी हे देशातील सर्वोत्कृष्ट खासदार ठरल्याने भाजपा आमदार योगेश सागर, नगरसेवक व चारकोप विधानसभा अध्यक्ष बाळा तावडे, नगरसेवक आणि मुंबई महानगरपालिका गट उपनेते कमलेश यादव तसेच स्थानिक नगरसेविका ,भाजपाचे पदाधिकारी , कार्यकर्ते व सर्व सामान्य नागरिक यांनी बोरीवली पश्चिम येथील लोकमान्य नगर येथील गोपाळ शेट्टीं यांच्या कार्यालयात हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी व अभिनंदन करण्यासाठी गर्दी केली होती. खासदार गोपाळ शेट्टी यांना संसदीय क्षेत्रातील काम , जनतेतील लोकप्रियता, संपर्क, संसदीय उपस्थिती, व विकासाचे स्थानिक मुद्दे , अशा विषयां मध्ये ५ पैकी ४.९ असे भरघोस गुण मिळाले आहेत. त्यांनी ५३९ खासदारांमध्ये ४ था क्रमांक पटकावला आहे. प्रशासनाकडून रितसर मार्गाने जर प्रश्न सुटत नसतील तर रस्त्यावर उतरून, आंदोलन करून प्रश्न सोडविण्यासाठी प्रथम गोपाळ शेट्टी नगरसेवक,आमदार व आता खासदार असल्यापासूनच प्रयत्नशील असल्याने भाजपात व नागरिकात त्यांची लोकप्रियता वरचेवर वाढतच आहे.खासदार गोपाळ शेट्टी यांना सर्वोत्कृष्ट कामगिरी बद्दल प्रथम क्रमांक व सर्व खासदारात ४ था क्रमांक मिळाल्याने भाजपा उत्तर मुंबई भटके विमुक्त आघाडीचे अध्यक्ष दत्तात्रय महाजन , मार्गदर्शक गिरीधर साळुंके, अनंत भालेकर, व चारकोप विधानसभा ( भटके विमुक्त ) अध्यक्ष भारत कवितके यांनी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या कार्यालयात जाऊन पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.व पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Categories
मुंबई

नववर्षाच्या शुभारंभीच गणेश भगतांकडून अनाथ मुलांना चॉकलेट व बिस्किटचे वाटप

विरेंद्र म्हात्रे नवी मुंबई प्रतिनिधी : नववर्षाच्या सुरूवातीला अनेक रथी-महारथी थर्टी फर्स्टच्या पार्टीचा थकवा  घालविण्यासाठी बिछान्यात निद्रादेवीच्या आधीन असताना नवी मुंबईचे लोकनेते आ. गणेश  नाईक यांचे नेरूळमधील कडवट समर्थक असणारे भाजपाचे गणेश भगत मात्र सकाळीच उठून अनाथ  मुलांना चॉकलेट व बिस्किटचे वाटप करून त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देताना नेरुळवासियांना  पहावयास  मिळाले. गणेश भगत यांच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमांची  नेरुळवासियांकडून प्रशंसा  करण्यात येत आहे.
शुक्रवार, दि. १ जानेवारी, नववर्षाचा पहिलाच दिवस.  अनेक जण थर्टी फर्स्टचा थकवा घालवत निद्रादेवीच्या स्वाधीन असताना गणेश भगत हे सकाळी साडे नऊ-दहा  वाजण्याच्या सुमारास आपल्या सहकाऱ्यांसमवेत नेरूळ सेक्टर  १६ एमधील जीवनज्योती  आशालय ट्रस्ट येथे पोहोचले.  या ट्रस्टकडून सांभाळ केल्या जाणाऱ्या अनाथ मुलांना गणेश भगत यांनी बिस्किट व  चॉकलेटचे वाटप करत या मुलांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. या  मुलांचा  सांभाळ करणाऱ्या ट्रस्टींचे व कर्मचाऱ्यांचे कौतुक  करताना  त्यांचे कार्य हे खरोखरीच  देवपुजेसम असल्याचे गणेश भगत यांनी यावेळी सांगितले. यावेळी गणेश भगत  यांच्यासमवेत विभागातील ज्येष्ठ नागरिक शिवाजी पिंगळे, गोरक्षनाथ गांडाळ, विश्वास देसाई, धनाजी कचरे, हरिश्चंद्र पातेरे, वासुदेव पाटील, रामदास गर्जे, मंगेश कदम, विशाल पाटील, रविंद्र भगत उपस्थित होते.

Categories
मुंबई

वसईत धडक कामगार युनियनचे आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न!कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते उद्घाटन

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी:लक्ष्मण राजे )

वसई : धडक कामगार युनियनचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष उत्तम कुमार यांनी वसईत आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचे धडक कामगार युनियनचे सर्वेसर्वा संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या शुभहस्ते उदघाटन करण्यात आले.
यूनिव्हर्सल हेल्थ केअर सेंटर हॉस्पिटल व प्राथमिक आरोग्य केंद्र नवघर वसई यांच्या विशेष सहयोगातून उत्तम कुमार यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 500 हुन अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
अभिजीत राणे यांनी यावेळी बोलताना, आज उत्तम कुमार यांचा वाढदिवस आहे त्यांना त्यांच्या भावीवाटचालीस शुभेच्छा देतो. त्यांच्याकडून भविष्यात वसई-विरारमधील जास्तीत जास्त कामगारांना न्याय मिळवून द्यावा. असे यावेळी ते म्हणाले.
उत्तम कुमार यांनी यावेळी बोलताना, साहेब तुमचा फक्त आशीर्वाद माझ्या पाठीशी खंबीरपणे राहू द्या अशी ग्वाही अभिजीत राणे यांना दिली.

Categories
मुंबई

वसईत धडक कामगार युनियनचे आरोग्य शिबिर उत्साहात संपन्न!कामगार नेते अभिजीत राणे यांच्या हस्ते उद्घाटन

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी:लक्ष्मण राजे )

वसई : धडक कामगार युनियनचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष उत्तम कुमार यांनी वसईत आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचे धडक कामगार युनियनचे सर्वेसर्वा संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या शुभहस्ते उदघाटन करण्यात आले.
यूनिव्हर्सल हेल्थ केअर सेंटर हॉस्पिटल व प्राथमिक आरोग्य केंद्र नवघर वसई यांच्या विशेष सहयोगातून उत्तम कुमार यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 500 हुन अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
अभिजीत राणे यांनी यावेळी बोलताना, आज उत्तम कुमार यांचा वाढदिवस आहे त्यांना त्यांच्या भावीवाटचालीस शुभेच्छा देतो. त्यांच्याकडून भविष्यात वसई-विरारमधील जास्तीत जास्त कामगारांना न्याय मिळवून द्यावा. असे यावेळी ते म्हणाले.
उत्तम कुमार यांनी यावेळी बोलताना, साहेब तुमचा फक्त आशीर्वाद माझ्या पाठीशी खंबीरपणे राहू द्या अशी ग्वाही अभिजीत राणे यांना दिली.

Categories
मुंबई

सामाजिक कार्यकर्ते गणेश हिरवे यांनी ३१ व्या वेळी रक्तदानाचे कर्तव्य बजावून २०२० या सरत्या वर्षाला दिला निरोप !

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी:लक्ष्मण राजे )

जोगेश्वरी पूर्व येथील सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, वृत्तपत्रलेखक, पत्रकार व जॉय ऑफ गिविंग चे संस्थापक गणेश हिरवे सर यांनी २०२० या वर्षीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ३१ डिसेंबर २०२० ला ३१ व्या वेळी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जपत थर्टीफर्स्ट एका वेळग्या पद्धतीने साजरा कसा करता येईल याचे उत्तम उदाहरण दाखवून दिले. आजकाल थर्टीफस्ट लोक अनेक प्रकारे साजरा करीत असतात,पण हा दिवस एका वेगळ्या कारणाने सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान करून साजरा करण्याचं भाग्य मला मिळाले अशी भावना हिरवे सरांनी बोलून दाखविली. तरुणाईने गणेश हिरवे सर यांचा आदर्श समोर ठेवून जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान करावे. विशेषत: याआधी देखील अनेक सामाजिक उपक्रम व कामे स्वतः सरांनी अग्रेसर राहून पदरमोड करत , तसेच आपल्या जॉय संस्थेच्या माध्यमातून केली आहेत. एक गुणी व्यक्तिमत्त्व म्हणून सरांना सर्वजण मुंबई व महाराष्ट्रात ओळखतात. लॉकडाउन काळातही हजारो गरजू, गोर-गरीब व वंचित कुटुंबीयांना किराणा समान,आरोग्य व स्वच्छता किट, मास्क, अल्पोपहार , सॅनिटायझर व इतर अनेक जीवनावश्यक वस्तू वितरण केल्या आहेत , त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल दिल्ली व महाराष्ट्रतील अनेक सामाजिक संस्थानी घेऊन त्यांना जवळपास ६३ कोविड योध्दा सन्मानपत्र देऊन गौरव केला. गणेश हिरवे सर अनेक संस्था व मंडळांवर सल्लागार व मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. यापुढेही आपण करीत असलेलं हे सामाजिक काम असच सुरू राहणार असल्याचे मनोगत गणेश हिरवे यांनी यानिमित्ताने व्यक्त केले.

Categories
मुंबई

किंगस्टार स्पोर्ट्स अकॅडमीे आयोजीत दिएगो मेरोडना फुटबॉल चॅम्पियन चषक २०२० संपन्न…!

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी:लक्ष्मण राजे )

अहमदाबाद किंगस्टार स्पोर्ट्स ग्राऊंड
अहमदाबाद येथे नुकतेच 7A साईड फुटबॉल लीग आयोजित करण्यात आली होती. १५ ते १७ वयोगटातील
या टुर्नामेंट मध्ये अहमदाबाद, सुरत, राजकोट आणि वडोदरा येथून
जवळजवळ १२ संघांनी सहभाग दर्शवला.
यामध्ये मुंबईची फूटी फर्स्ट टीम आणि कॉसमॉसच्या फुटबॉल संघात अंतिम सामना झाला. संपुर्ण स्पर्धेत फूटी फर्स्टच्या संघाने आपले वर्चस्व कायम ठेवले. आणि गोल करण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण कॉसमॉस संघाचा गोलरक्षक मानस याने तो गोल रोखला आणि संघाला पराभवापासून वाचवून पेनल्टी शूटआऊटसाठी नेले आणि कॉसमॉस संघाने पेनल्टी शूटमध्ये फूटी फर्स्ट संघाचा पराभव केला. प्रशिक्षक तुषार सर आणि चौहान सर यांनी आपल्या संघाला चांगले प्रशिक्षण दिले जेणेकरुन फूटी फर्स्ट संघाने अंतिम फेरी गाठली. कॉसमॉस टीम अहमदाबादचे प्रशिक्षक मयूर आणि गोल्डी सायनी यांनी आपल्या संघाला अंतिम फेरीत आणण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आणि कॉसमॉस संघ अंतिम विजेता ठरला. या महत्त्वपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट गोलकीपर मानस, उत्कृष्ट खेळाडू ब्रिज शहा आणि संपुर्ण संघातील उत्कृष्ट खेळाडू म्हणुन क्रिश चौहान यांना गौरविण्यात आले. क्रिश संपूर्ण स्पर्धेत एक अतिशय लोकप्रिय खेळाडू असल्याचे सिद्ध झाले. उपस्थित मान्यवरांनी त्याचे खुप कौतुक केले आणि तो पुढे जाऊन भारतीय संघाकडून खेळू शकेल, अशी ग्वाही दिली. किंग स्टार स्पोर्ट्स अकॅडमीचे हितेंद्र वाघेला म्हणाले की आम्ही जगद्विख्यात फुटबॉलपटू दिएगो मेरोडनाच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आयोजीत केली. त्यामुळे आम्हाला त्यांना श्रद्धांजली वाहण्याची संधी मिळाली आणि त्यासाठी आम्हाला मुंबईतील फूटी फर्स्ट टीमचे प्रशिक्षक चौहान सर आणि टूर्नामेंटच्या सर्व सदस्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.अशी माहिती महेश्वर भिकाजी तेटांबे यांनी दिली.

Categories
मुंबई

उद्यानांची स्थिती सुधारण्यासाठी झोकून देऊन काम करावे : आयुक्त अभिजीत बांगर

विरेंद्र म्हात्रे नवी मुंबई प्रतिनिधी : उद्यानांची नियमित स्वच्छता आणि देखभाल तसेच तातडीने आवश्यक दुरूस्ती या महत्वाच्या बाबींची दक्षता घेत  उद्यान सहाय्यकांनी आपापल्या क्षेत्रातील उद्यानांची स्थिती सुधारण्याकडे बारकाईने लक्ष द्यावे, त्यासाठी दररोज उद्यानांना भेटी द्याव्यात व आवश्यक सुधारणा करून घ्याव्यात असे निर्देश देत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी यापुढील काळात उद्यानांची स्थिती पाहण्यासाठी कुठेही अचानक भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करणार असून कामात निष्काळजीपणा आढळल्यास जबाबदारी निश्चित करण्यात येईल असे स्पष्ट संकेत दिले.
उद्यान विभागाच्या १६ डिसेंबर रोजीच्या बैठकीत दिलेल्या निर्देशांचा आढावा घेताना प्रत्येक ठिकाणची आधीची व आत्ताची छायाचित्रे पाहून आयुक्तांनी सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती जाणून घेतली. या आढावा बैठकीस अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, उद्यान उप आयुक्त  मनोज महाले, उद्यान सहाय्यक आयुक्त अनंत जाधव तसेच सर्व विभागांचे उद्यान सहाय्यक उपस्थित होते.
प्रत्येक काम करताना आपले त्या कामाशी असलेल्या उत्तरदायित्वाची जाणीव ठेवली पाहिजे. उद्यानांची स्वच्छता व देखभाल दुरुस्ती तत्परतेने झालीच पाहीजे अशाप्रकारे काम करावे अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. लेखी अथवा सोशल मिडीयावरून प्राप्त झालेल्या तक्रारींचे निवारण २४ तासापेक्षा कमी वेळेत झालेच पाहिजे व तक्रार प्राप्त झाल्यानंतर १ तासात त्याठिकाणी पोहचलेच पाहिजे असे कडक निर्देशही त्यांनी दिले.
कंत्राटदाराकडून व त्याच्या कामगांराकडून काम करून घेणे ही आपली जबाबदारी आहे असे उद्यान सहाय्यकांना सूचित करण्यात आले. सध्या उद्यानाच्या कामासाठी उपयोगात असलेल्या ॲपमध्ये उद्यान सहाय्यकाने दाखल केलेल्या तक्रारींबाबत कंत्राटदाराकडून तक्रार निवारण झाले नसले तरी निवारण केल्याचे दाखविले जात असल्याचे निदर्शनास येत आहे. ही नोंद चुकीची असल्याचे नमूद करण्याचा पर्याय ॲपवर उपलब्ध असणे आवश्यक आहे. तशा प्रकारचा बदल ॲपमध्ये करून घेण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिले.
आपल्या उद्यानांना पूर्वीपेक्षा अधिक आकर्षकता प्राप्त करून देणे हे उद्दीष्ट नजरेसमोर ठेवून काम करताना उद्यानांची केवळ नियमित देखभाल व दुरुस्ती यापुढे जात उद्यानातील हिरवळ, झाडे आवश्यकतेनुसार पुनर्जिवित करण्यावर भर द्यावा अशाही सूचना आयुक्तांनी केल्या. सध्या बंद असलेल्या उद्यानांचा आढावा घेऊन ती कार्यान्वित करण्यासाठी नियोजन करावे तसेच महापालिका क्षेत्रातील सर्व उद्यानांची वेळ समान असावी व ती ठळकपणे प्रदर्शित करावी असे आयुक्तांनी सूचित केले.
जास्त वर्दळ असणाऱ्या उद्यानांकडे विशेष लक्ष द्यावे असे निर्देश देत उद्यानांप्रमाणेच शहरातील सुशोभित जागा, चौक यांच्याही सुशोभिकरणाकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. यामध्ये विशेषत्वाने चौकांमध्ये लावण्यात आलेली वृक्षरोपे, फुलझाडे यांची सलगता मधली काही फुलझाडे नसली तर खंडीत झाल्यासारखी विशोभित दिसते. त्याठिकाणी तशीच वृक्षरोपे लावून गॅप फिलींग करून शोभा वाढविण्यावर भर देण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या. उद्यान उप आयुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांनीही विविध उद्यानांना दररोज भेटी द्याव्यात आणि त्यांचे स्वरुप चांगले होण्यासाठी सूचना कराव्यात तसेच सूचनांच्या पूर्ततेवर बारकाईने लक्ष द्यावे असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले, उद्याने ही शहराचे वैभव असल्याने उद्यान विभागातील प्रत्येक घटकाने आपली जबाबदारी ओळखून झोकून देऊन काम करावे व उद्यानांच्या स्थितीत आमुलाग्र सुधारणा घडवून आणावी असे आयुक्त अभिजीत बांगर यांनी सूचित केले.

Categories
मुंबई

श्री स्वामी समर्थ मठ येथे दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न.

विरेंद्र म्हात्रे नवी मुंबई प्रतिनिधी-
श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट, जुईनगर,येथे ट्रस्ट चे संस्थापक/अध्यक्ष श्री.संतोष सुतार दादा यांच्या ५० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने श्री स्वामी समर्थ दिनदर्शिका-२०२१ चे प्रकाशन ह.भ.प श्री. हरीश्चंद्र सुतार(दत्त संप्रदाय), श्री.अशोक ठाकुर, श्री.नाना काका, ह.भ.प श्री.मुरलीधर गावडे, ट्रस्ट चे सचिव श्री.प्रदिप पाटील सर, कार्यध्यक्ष श्री .गोविंद साटम व श्री.अशोक मोहीते ह्या मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रकाशीत करण्यात आले.

Categories
मुंबई

कनिष्क कांबळे अध्यक्षपदी तर डॉ. माकणीकर सह अन्य 4 विविध महामंडळावर नियुक्त. पक्षाची शिफारस

विरेंद्र म्हात्रे नवी मुंबई प्रतिनिधी इंजि. कनिष्क कांबळे, डॉ. राजन माक्निकर व कॅ. श्रावण गायकवाड सह अन्य 3 जणांना विविध महामंडळावर नियुक्त करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक पक्षाकडून शिफारस करण्यात आली आहे.

प्रमुख पदाधिकारी व निष्ठवंत कार्यकर्त्यांची नुकतीच एक बैठक संपन्न झली त्यात हा निर्णय घेण्यात आला. पक्षाध्यक्षा नंदाताई कांबळे यांच्या आदेशाने या नावांची शिफारस राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या कडे करण्यात आली आहे.

पक्षसंथापक, आमदार टी एक कांबळे यांच्या नंतर युवाध्यक्ष कनिष्क कांबळे यांनी पक्षाची धुरा उत्तमपणे सांभाळून लोकसभा व विधानसभा निवडणुकीत घटक पक्ष म्हणून यशस्वी कामगिरी बजावली. आंबेडकरी समूहात एक वेगळे स्वच्छ आणि स्वाभिमानी व्यक्तिमत्व प्रस्थापित केले. समाज हितासाठी लढा उभारत असंख्य संकटांना चार हात करून खंबीरपणे पक्षनेतृत्व सांभाळले. त्यामुळे कनिष्क कांबळे यांना महामंडळावर घटक पक्ष या नात्याने अध्यक्ष पद द्यावे असा ठराव पास करण्यात आला.

तसेच राष्ट्रीय पदाची सूत्रे हातात घेऊन पक्षाला खऱ्या अर्थाने बळकटी देऊन भारतीय संविधान शालेय शिक्षणात सक्तीने शिकवले जावे यासाठी मागील 10 वर्षांपासून प्रयत्न करणारे, समाज व देश सेवेसाठी संबंध आयुष्य समर्पित समाजभूषण, पत्रकार, ग्रेट पँथर पारितोषिक विजेते डॉ. राजन माकणीकर.

अंगावरची कपडे ही कुणी मागितली तर काढून देणारे, कुणी आपल्या जवळ मागणी केली आणी ती पूर्ण होऊ नये, लग्न समारंभ अंत्यविधी, आदी सर्व ठिकाणी आवर्जून उपस्तिथी दर्शविणारे, रात्री अपरात्री कोणत्याही प्रसंगाला मदतीस धावून जाणारे व्यक्तिमत्व कॅप्टन श्रावण गायकवाड.

उल्हास नगर येथे टी. एम. कांबळे साहेबांच्या हयातीत विधानसभा लोकसभा व महापालिकेत उमेदवार उभे करून निवडून आणण्यासाठी कसोसिने प्रयत्न करून पक्षनिष्ठा जोपासणारे महाराष्ट्र राज्य उपनिरीक्षक श्रीधर गुडदे.

सर्वसमावेशक धर्मनिरपेक्ष तत्वे जोपासून टी एम कांबळे साहेबांचे सहकारी पक्ष व चळवळीसाठी स्वतःला झोकुन समाज हितावह कार्य करणारे पक्षाचे जेष्ठ निष्ठावंत व्यक्तिमत्व, राज्याचे समन्वय समिती अध्यक्ष बळवंतराव पाटील.

या पक्ष पदाधिकारी व निष्ठवंतांचा शासनाच्या विविध महामंडळाच्या कार्यकरणीवर नियुक्ती करण्यात यावी यासाठी शिफारस करन्यात आली आहे.

Categories
मुंबई

लोकशाही विघातक ईडी क्षेपणास्त्राचे मास्टर माईंड मोदी शहा फडणवीस – स्वातीताई मोराळे

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी: लक्ष्मण राजे )

सत्तेचा व कायद्याचा दुरुपयोग करून विरोधी पक्षातील लोकांना संपुष्टात आणण्याचा प्रयत्न आज केला जात आहे. ईडी, इनकम टॅक्स यासारख्या कायद्याचा वापर सत्ता आणण्यासाठी व ती टिकवून ठेवण्यासाठी केला जात आहे. याचे मास्टरमाईंड पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शहा व माजी मुख्यमंत्री फडणवीस आहेत. विरोधी पक्ष संपुष्टात आणण्यासाठी याचा सर्रास वापर केला जात आहे. तसेच यामुळे विरोधी पक्ष खिळखिळा होऊन लोकशाही दुबळी करणे व हुकूमशाहीला बळ देऊन सत्ता मिळवणे आणि टिकवण्याचा प्रयत्न केला जात आहे , असे विधान करून स्वाती ताई मोराळे यांनी पुण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. मा. एकनाथराव खडसे जोपर्यंत भाजपात होते तोपर्यंत त्यांना क्लीन चीट देणारा भाजपा त्यांनी विरोधी पक्षात प्रवेश करताच त्यांच्यावर ईडीची चौकशी लावली आहे. शिवसेना जो पर्यंत मित्रपक्ष होती तोपर्यंत चांगली आणि बाहेर पडली की त्यांच्या नेत्यांवर त्यांच्या कुटूंबावर ईडीच्या चौकशीचा ससेमिरा मागे लावून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न हे मास्टर माईंड करत आहेत. आम्ही लोकशाहीचे रखवालदार म्हणणारे लोकशाहीचा कणा विरोधी पक्ष नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. राज्यपाल यांना भाज्यपाल करून टाकले आहे. विधान परिषदे वर शिफारस केलेल्या लोकांची नियुक्तीही करायची नाही आणि त्यांना नकारायचे ही नाही त्यामुळे या नियुक्तीला जो विलंब होत आहे हेही लोकशाहीला विघातक आहे. जे लोक त्या कॅटेगिरीमध्ये बसत नाहीत त्यांना नाकारून बाकीच्या नियुक्त्या करणे व बाकीच्या रिक्त जागासाठी योग्य सूचना देणे राज्यपाल महोदयाने करणे अपेक्षित आहे.
शेतकरी विरोधी व अंबानी अदानी पोषक कायदे करून हे मास्टर माईंड कोणाची रखवालदारी करत आहेत.BSNL चे Jio करण करून त्यांना काय साध्य करायचे आहे. आणि याबद्दल कोणी बोलले तर ते देशद्रोही बनवत असतील तर मास्टर माईंड यांचे पाय चाटणे म्हणजे देशप्रेम होय काय ? असा जाब स्वातीताई मोराळे यांनी या त्रिकुटाला विचारला आहे.

Categories
मुंबई

बेलापूर किल्ल्याच्या सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

सिडकोच्या शहर अभियंताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसने घातला घेराव

विरेंद्र म्हात्रे नवी मुंबई प्रतिनिधी : नवी मुंबई शहरातील बेलापुर किल्ल्याचे सुरू असलेले काम समाधानकारक होत नसल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसने सिडको अधिकाऱ्यांना धाऱ्यावर धरले आहे.
राज्य पुरातत्व विभाग यांनी पाहणी केल्यानंतर देखील पुरातन व संवर्धनाचे नियम डावलून बेलापूर किल्ल्याचे केलेले सिमेंटीकरणाचे काम अद्यापि सिडकोकडून हटवले न गेल्याने राष्ट्रवादी युवक कॉग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष नितीन नाना चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्त्यासमवेत सिडको शहर अभियंता यांना घेराव घातला.
किल्याच्या कामासाठी नेमलेले ‘किमया कन्सलटंट’ यांनी सिडकोला दिलेल्या अर्धवट माहिती व सिडको कार्यकारी अभियंता यांच्या निष्काळजीपणामुळे किल्ल्याच्या झालेल्या 10 टक्के कामामध्ये साधारण 50 लाखाचे सिमेंटिकरण झाले असून ते तात्काळ हटवावे व अशा कंत्रातदारावर कारवाई करून झालेली नुकसान भरपाई वसूल करावी, तसेच या कामावर अंकुश ठेवण्यासाठी पुरातत्व विभागाने 10 दिवसात संवर्धन अधिकारी नेमावा, तोपर्यंत काम थांबवावे अशी मागणी नितीन चव्हाण यांनी केली.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बेलापुर विधानसभा उपाध्यक्ष आकाश पाटील, संदीप मोहिते, अमोल मापारी, विशाल भिलारे, राम पुजारे, विश्‍वजित भोईटे व इतर पदाधिकारी होते.

Categories
मुंबई

७५१ वी नामदेवमहाराज जयंती वर्षाची सुरुवात विशेषांकाने

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी:लक्ष्मण राजे )

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७५१ व्या जयंती वर्षाची सुरुवात नामदेव समाजोन्नती परिषद, पुणे शहर संस्थेचे अध्यक्ष संदिप लचके व प्रशांत सातपुते यांच्या पुढाकाराने सचिव सुभाष वासुदेव मुळे यांनी संपादित कलेला नामदेव महाराज यांचे जीवनचरित्र परिपूर्ण विशेषांकाचे पुनर् प्रकाशन रविवार दि. १३ डिसेंबर २०२० रोजी सा. फु. पुणे विद्यापीठ येथे कुलपती महामहीम राज्यपाल मा. भगत सिंह कोश्यारी, व कुलगुरू, डॉ. नितीन करमळकर सर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे मा. उपकुलगुरू डाॅ. एन. एस. उमराणी सर, कुलसचिव मा. डाॅ. प्रफुल्ल पवार सर, शिख समाजाचे नेते संत सिंग मोखा, नामदेव अध्यापन प्रमुख डाॅ. सदानंद मोरे सर, श्री. राजेश पांडे सर, संजय नहार, मा. आ. रामदास फुटाणे, डाॅ. अशोक कामत, सतीश पोरे सर, मा. नगरसेवक किरण बारटक्के आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.

नामदेव समाजोन्नती परिषदेचे सरचिटणीस डाॅ. अजय फुटाणे, विभागीय उपाध्यक्ष संजय नेवासकर यांचे सह मोहन मुळे, विजय कालेकर, सुभाष पांढरकामे, अरूण काळे, महेश मांढरे, संजय वैद्य, विक्रांत सदरे, रामचंद्र होमकर, राजेंद्र भुतकर, अक्षय मांढरे, सागर मांढरे, रमेश हिरवे, प्रकाश शिंदेकर, दिंगबर क्षीरसागर, रजनीकांत निखळ, राजकीशोर सुपेकर यांचे सह नामदेव समाजोन्नती परिषद, ना.स.प पुणे शहर, पुणे, पिंपरी, चिंचवड शहरातील शहरातील ज्ञातीसंस्थाचे प्रमुख पदाधिकारी, विद्यापीठातील सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी व यांच्यासह पुणे शहरातील निमंत्रित उपस्थित होते. अशी माहिती गणेश हिरवे यांनी दिली.

Categories
मुंबई

भारतीय जनता पार्टी उत्तर मुंबई जिल्हा भटके विमुक्त आघाडी पदाधिकारी यांची निवड व कार्यकर्ता मेळावा संपन्न

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी: लक्ष्मण राजे )

उत्तर मुंबई जिल्हा कार्यालयाच्या सभागृहात भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीवर पदाधिकारी यांची निवड पत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच येत्या महानगरपालिका निवडणूकीत भाजपाचाच महपौर आणून महानगर पालीकेत भाजपाची सत्ता आणणे साठी आता पासूनच पक्ष संघटन मजबूत करण्याच्या उद्देशाने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे.या साठी भटके विमुक्त आघाडीच्या पदाधिकारी यांची निवड करून गौरविण्यात आले.सदर कार्यक्रम सरकारी नियमांचे पालन करून संपन्न झाला. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष गणेश खणकर , दत्तात्रय महाजन , गिरीधर साळुंके , आनंद कुराडे, नरेंद्र राठोड , दिलीप पंडीत, कमलाकर कोलपाटे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच भारत कवितके,किरण कुचेकर, मल्हारी लाळगे, विजय पाल,उदयराज यादव, निवृत्ती भोजणे, संतोष चांगण, संतोष भोजणे, बाळासाहेब कुचेकर , ध्रुपद रवंदळे हे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Categories
मुंबई Uncategorized

ग्रामपंचायत निवडणूकीत रत्नागिरी , संगमेश्वर मतदार संघात शिवसेनेची बाजी

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी:लक्ष्मण राजे )

राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री व रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी केली पहिल्याच दिवशी विरोधकांवर मात, मतदार संघात मोठ्या प्रमाणात शिवसेना उमेदवार बिनविरोध , सामंत यांच्या खेळीने विरोधक निष्प्रभ झाले आहेत. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात देखील शिवसेनेचाच आवाज आणि दबदबा आहे.
शिवसेनेचे बिनविरोध निवडून आलेले उमेदवार
पाली ११ पैकी १० शिवसेना
खानु ९ पैकी ६ शिवसेना
कापडगाव ९ पैकी ७ शिवसेना
कशेळी ७ पैकी ३ शिवसेना
हातखंबा ११ पैकी १ शिवसेना
उकक्षी ७ पैकी ७ शिवसेना
खलगाव ११ पैकी ८ शिवसेना
चावे ७ पैकी ७ शिवसेना
पानवल ७ पैकी ७ शिवसेना
नाचणे १७ पैकी ५ शिवसेना
हरचेरी ११ पैकी ९ शिवसेना
कुरताडे ९ पैकी ७ शिवसेना
चिंद्रावली९ पैकी व ७ शिवसेना
झरेवाडी ९ पैकी ५ शिवसेना
गावखडी ११ पैकी ३ शिवसेना
मांजरे ७ पैकी ६ शिवसेना
परचुरी ९ पैकी ९ शिवसेना
मेढे ७ पैकी ७ शिवसेना
डावखोल ७ पैकी ७ शिवसेना
कोंडे ९ पैकी ७ शिवसेना
कुरधुंडा ७ पैकी २ शिवसेना
खरवते ७ पैकी ६ शिवसेना
जांभरून ७ पैकी ७ शिवसेना.
येत्या ४ जानेवारीला शिवसेनेच्या बिनविरोध होणा-या उमेदवारांच्या संख्येत वाढ होईल अशी माहिती बंड्या साळवी यांनी दिली आहे.

Categories
मुंबई

उदगीर नगरपालिकेच्या हद्द वाढीला शासनानाची मान्यता

*शासनाचा एतिहासिक निर्णय *उदगीर शहराचा भुगोल बदलला

*राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या प्रयत्नास यश

मुंबई :उदगीर नगरपालिकातील सर्वे नंबर .3,155 ते 338.
यांना शासनाने उदगीर नगरपालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे .अनेक दिवसांपासून येथील नागरिकाची हद्दीत समाविष्ट करण्याची मागणी होती शासनाने या मागणीला मान्यता दिली आहे अशा माहिती राज्याचे पर्यावरण, पाणी पुरवठा राज्यमंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी दिली आहे.
राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले की उदगीर शहराचा विकास झपाट्याने होत आहे शहरात विविध विकास कामे सुरू आहेत शहराचा विस्तार होत आहे सर्वे नंबर 3,155,ते 338 येथील नागरिकाची अनेक दिवसांपासून नगरपालिका क्षेत्रात समाविष्ट करण्याची मागणी होती हे सर्वे नंबर लगतच्या ग्रामपंचायत मघ्ये समाविष्ट नव्हते त्यामुळे येथील नागरिकांना खरेदी खत बनविणे,अशा अनेक महसूली समस्या निर्माण होत होत्या याबाबत राज्य शासनाकडे हद्द वाढीचा प्रस्ताव सादर केला होता. याला शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये मलकापूर, सोमनाथ पुर ,निडेबन,पिंपरी मादलापुर येथील काही सर्वे नंबर नगरपालिका हद्दीत समाविष्ट करण्यात येणार आहेत यात उदगीरच्या
उत्तरेस सर्वे नं 97 च्या उत्तर पश्चिम कोपरा ते सर्वे नं 193 च्या उत्तर पुर्व कोपरा पर्यंत
पूर्व दिशेला
सर्वे नंबर 193 च्या उत्तर पुर्व कोपरा पासून सर्वे नंबर 254च्या दक्षिण पुर्व कोपरा
दक्षिण दिशेला
सर्वे नंबर 254 दक्षिण पुर्व कोपरा ते सर्वे नंबर 332 च्या पश्चिम दक्षिण कोपऱ्या पर्यंत
पश्चिम दिशेला
सर्वे नंबर 333 च्या दक्षिण पश्चिम कोपरा ते सर्वे नंबर 97 उत्तर पश्चिम पर्यंत हद्द वाढीस शासनाने मान्यता दिली आहे. नगरपालिकेच्या हद्दी मुळे या परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे नागरिकांच्या महसूली अडचणी दुर होणार आहेत अनेक वर्षी पासून शासन स्तरावर प्रलंबित असलेली हद्द वाढीची मागणी सहा माहिण्यात पाठपुराव्याने मार्गि लागली आहे लातूर जिल्हा परिषद, औरंगाबाद विभागीय आयुक्त, व मंत्रालयातील नगरविकास विभागात या संदर्भात सतत पाठपुरावा केला गेला होता आज शासनाने या हद्द वाढीस मान्यता दिली आहे अशी माहिती राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.

Categories
मुंबई

विजेँद्र पवार यांची होणारी नाहक बदनामी थांबेल कां…!

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी:लक्ष्मण राजे )

केवळ भटक्या कुत्रीच्या अपघाती निधन प्रकरणामुळे होणारी मानहानी रहिवाश्यांकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक त्याचबरोबर अर्वाच्य शिव्या हे कितपत योग्य आहे… असा सवाल केला आहे नालासोपारा येथील छेडा नगर मधील विनी हाईट सोसायटी मधिल स्थानिक रहिवाशी विजेँद्र पवार यांनी. सकाळी नेहमीप्रमाणे विजेँद्र पवार कामाला जायला निघाले कारण व्यावसायिक दृष्ट्या महत्त्वाच्या मिटिंगसाठी दुसऱ्या शहरात जाणं आवश्यक होतं. पत्नी आणि मुलांचा निरोप घेऊन नियमितपणे गाडीत बसून कामाचा रस्ता धरला. डोक्यात कामासंबंधी विचार चालले असल्यामुळे आणि त्यांत नेहमीच्या जागी गाडी लावता न आल्याने गेटबाहेर यायला थोडा उशीरच झाला होता. रोजची कामं मार्गी लावून मिटिंग आटपेपर्यंत नवं रामायण विजेँद्रची वाट पाहत होतं. सकाळी सोसायटी बाहेर निघताना नेमकं एक भटक्या कुत्र्याचं पिल्लू विजेंद्रच्या गाडीखाली आलं आणि मृत पावलं. रस्ता खडबडीत असल्याने विजेँद्रला काहीच कळलं नाही. कुण्या एका विक्षिप्त बाईने विजेँद्र पवार यांची पोलिसात अशी काय तक्रार केली जसं काय त्याने एखाद्याचा खून केला की काय… इतकंच नव्हे तर या बाईने सोशल मिडीयावर सोसायटी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व्हायरल करून त्यांची नाहक बदनामी केली. सोबत अँनिमल राईटस् संघटना सामील झाल्याने गोंधळ आणखी वाढला होता. नक्की कोणत्या क्षणी कुत्र्याचं पिल्लू आपल्या गाडीखाली आलं ते विजेँद्र पवार यांना कळेना. जेव्हा त्यांनी स्वतः सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमे-यातलं फूटेज पाहिलं. ते सर्व त्याच्या नजरचुकीने म्हणा किंवा अनावधानाने घडले असं त्या फुटेज मध्ये पाहताक्षणी आढळले. तरीही विजेँद्र पवार यांनी झाल्या प्रकाराची माफी मागून प्रकरण मिटवा अशी याचना देखील केली. या आधी सुद्धा विजेँद्र पवार यांनी भटक्या कुत्र्यांसदर्भात पालिकेत तक्रार केली होती पण पालिकेच्या थंड प्रतिसादामुळे कुत्र्यांची पैदास जास्तच वाढू लागली FIR दाखल झाल्यामुळे विजेँद्र पवार जेव्हा पोलिस स्टेशनमध्ये गेल्यावर त्यांच्यावर प्राणीहत्येचं कलम लावण्यात आलं होतं. शिवाय अपघाताला हत्येचा रंग देऊन सोशल मिडीयावर सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यामुळे त्याला शिव्याशाप देणारे फोन सुद्धा येऊ लागले होते.
याचा परिणाम बराच तीव्र झाला. पोलिस स्टेशनच्या चकरा, त्यात गेलेला वेळ, बिघडलेलं रूटीन, पत्नी-मुलांची काळजी, कॅन्सल कराव्या लागलेल्या मिटींग्ज, त्यामुळे व्यावसायिक नुकसान तर झालंच शिवाय मानसिक त्रास झाला हा वेगळाच. केवळ बदनामी करून दुस-याला त्रास देणं हाच त्या बाईचा हेतू असावा हे निश्चित झालं. पण यामागचं कारण कळत नव्हतं. अनेकदा नकळत अपघात होतो पण त्याचा इतका बाऊ केला जातो की आपण फार मोठा अपराध केलाय. पण आपण जे काही पाहतो, वाचतो त्याची दुसरी बाजू माहित नसताना सहजपणे आपलं मत व्यक्त करून मोकळे होतो पण सत्य काय आहे याचा उलगडा न लावता एखाद्या निरपराध व्यक्तीची सोशल मीडियावर केलेली नाहक बदनामी हीं त्याच्या व्यवसायावर.. त्याच्या जनजीवनावर किती घातक ठरते हे या विक्षिप्त बाईला आणि तिला साथ देणाऱ्या विक्रुत प्रवृत्तीच्या लोकांना कसं समजणार. तेव्हा अशा प्रकारामुळे विजेँद्र सारखे अनेक युवक बळी पडताहेत त्याचं काय…! तेव्हा हे कुठंतरी थांबलं पाहिजे.
अशी माहिती महेश्वर भिकाजी तेटांबे यांनी दिली.

Categories
मुंबई

कै वीर लक्ष्मणराव अण्णाजी राणे पत्रभूषण व समाजभूषण पुरस्कार सोहळ्यातचे २ जानेवारी २०२१ रोजी आयोजन

(हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी:लक्ष्मण राजे )

अभिजित राणे युथ फौंडेशन,महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने ऑगस्ट २०२० मध्ये आयोजित करण्यात आलेल्या वृत्तपत्र लेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा शनिवार दि २ जानेवारी २०२१ रोजी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विजेते पत्रलेखक, निवडक पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या निवडक गुणिजनांना प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते कै वीर लक्ष्मणराव अण्णाजी राणे पत्रभूषण व समाजभूषण पुरस्कार २०२० देऊन सन्मान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाचे स्थळ :-
केशव गोरे स्मारक ट्रस्ट हॉल, गोरेगाव पश्चिम, (स्टेशनजवळ) मुंबई ,
दिनांक व वेळ :- २ जानेवारी २०२१ सायंकाळी ५.०० वा
सर्व पुरस्करप्राप्त मान्यवरांनी वेळेवर उपस्थित रहावे.अशी माहिती स्पर्धाप्रमुख गणेश हिरवे यांनी दिली.

Categories
मुंबई

बाळासाहेब ठाकरे की दि. बा. पाटील; नवी मुंबई विमानतळाचा नामांतर प्रश्न चर्चेत

नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रकल्पाचे काम सिडकोच्या माध्यमातून प्रगतिपथावर असून या विमानतळाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. मात्र या मागणीला नवी मुंबई परिसरातील प्रकल्पग्रस्तांनी विरोध दर्शविला आहे. नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, अशी मागणी करण्यात येत असून याबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
         नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामकरण करण्याच्या मागणीचे निवेदन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल सर्वांनाच नितांत आदर आहे, परंतु नवी मुंबई विमानतळासाठी दि. बा पाटील यांचेच नाव द्यावे, अशी मागणी स्थानिक प्रकल्पग्रस्तांकडून करण्यात येत आहे. नवी मुंबईची उभारणी करताना भूमिपुत्रांच्या जमिनी सिडकोने सक्तीने संपादित केल्या. त्यावेळी भूमिपुत्रांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी दि. बा. पाटील यांनी लढा उभारला आणि सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी ते लढले. आज भूमिपुत्रांना मिळणारा मोबदला दि. बा. पाटील यांच्याच त्यागामुळे मिळाला आहे. मात्र आतापर्यंत नवी मुंबईत उभ्या राहिलेल्या कोणत्याच मोठ्या प्रकल्पाला त्यांचे नाव देण्यात आलेले नाही. त्यामुळे आता उभ्या राहत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचे नाव मिळावे, अशी भूमिपुत्रांची इच्छा आहे. 
        नवी मुंबई विमानतळाच्या नामांतर प्रश्नाचे राजकारण होऊ नये, अशी भावना प्रकल्पग्रस्तांकडून व्यक्त केली जात आहे. नवी मुंबई विमानतळासाठी दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी सुरवातीपासूनच केली जात आहे. या मागणीला येथील राजकीय नेत्यांनीही पाठिंबा दर्शविला आहे. परंतु एकनाथ शिंदे यांनी विमानतळास बाळासाहेबांचे नाव देण्याची मागणी केल्याने हा प्रश्न पुन्हा चर्चेला आला आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल सर्वांच्या मनात आदर आहे. महाराष्ट्रात अनेक प्रकल्पांना बाळासाहेबांचे नाव देण्यात आले आहे. नवी मुंबईची उभारणी करताना भूमिपुत्रांच्या जमिनी सिडकोने सक्तीने संपादित केल्या. त्यावेळी भूमिपुत्रांना जमिनीचा योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी दि. बा. पाटील यांनी लढा उभारला आणि सर्वांना न्याय मिळवून देण्यासाठी ते लढले. असे असताना नवी मुंबईत उभ्या राहिलेल्या कोणत्याच मोठ्या प्रकल्पाला त्यांचे नाव देण्यात आलेले नाही. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव द्यावे, अशी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.

Categories
कला व मनोरंजन जागतिक मुंबई

सुपरस्टार राजेश खन्ना फॅन क्लब इंडियाचे प्रमुख विलास घाटे यांच्या कडील राजेश खन्ना संग्रहाची लिम्का बुकमध्ये नोंद

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी: लक्ष्मण राजे )

ठाण्यातील सुपरस्टार राजेश खन्ना फॅन क्लब इंडियाचे प्रमुख आणि सुपरस्टार राजेश खन्ना यांचे जबरदस्त चाहते श्री. विलास घाटे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी 29 डिसेंबर रोजी, सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या जन्मदिनी सुपरस्टार राजेश खन्ना यांचे फॅन क्लब इंडियाची स्थापना करण्यात आली. त्यावेळी नामांकित सिने पत्रकार , चित्रपट समीक्षक , लेखिका अनिता पाध्ये , उत्कर्षा मालिया , संजीव पाध्ये आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच सुपरस्टार राजेश खन्ना यांचे असंख्य चाहते उपस्थित होते. श्री. विलास घाटे यांच्याकडे सुपरस्टार राजेश खन्ना संबंधित माहिती संग्रह , राजेश खन्ना यांच्या सर्व चित्रपटांच्या , गीतांच्या व्हिडिओ / आॅडिओ कॅसेट , सीडी , एल पी रेकाॅर्ड , अनेक चित्रपट परिक्षणे , आणि लेखांची पेपर कात्रणं असे जे मोठे कलेक्शन आहे ते या देशात बहुतेक कुणाकडेच नाही. श्री.विलास घाटे ह्यांच्या सुपरस्टार राजेश खन्ना या मोठ्या संग्रहाची नोंद लिम्का बुक मध्ये झाली आहे. श्री.विलास घाटे यांना सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या असंख्य चाहत्यांनी मनःपुर्वक अभिनंदनीय हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत ‌.

Categories
कला व मनोरंजन मुंबई

हिंदी चित्रपटातील सुरेल मधुर भक्ती गीतांची ” भक्तीरंग ” संगीत मैफल संपन्न

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी: लक्ष्मण राजे)

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात बरेच दिवस घरात बसलेल्या संगीतप्रेमी रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी आता सर्व थिएटर बंद असल्याने डिजिटल प्लॅटफॉर्म वरुन सुरेल गाण्यांची संगीत मैफल आयोजित करण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे.या आॅनलाईन संगीत मैफलींना रसिक प्रेक्षकांनी पसंती दिली. त्याच अनुषंगाने निर्माता दिग्दर्शक. गायक अमित राजे प्रेझेंटस् ” भक्तीरंग ” या लोकप्रिय सुरेल हिंदी चित्रपटातील भक्तीगीतांच्या मनोरंजक कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली होती. निर्माता अमित राजे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सुमधुर, सुरेल , अविस्मरणीय लोकप्रिय भक्ती गीतांची ” भक्तीरंग ” ही सुरेल संगीत मैफल डिजिटल प्लॅटफॉर्म वरुन आॅनलाईन सादर करण्यात आली.निर्माता अमित राजे यांनी सादर केलेल्या अविस्मरणीय सुमधुर लोकप्रिय गाजलेल्या गाण्यांच्या ” भक्तीरंग ” या आॅनलाईन कार्यक्रमात कुसुम आणि अमित राजे या गायकांनी गाजलेली मधुर भक्तीगीते सादर केली.या सुरेल संगीत मैफिलीचे सुत्रसंचलन , निवेदन रत्ना हिले यांनी केले. या यशस्वी आॅनलाईन कार्यक्रमाला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. विशेषतः भारतासह कॅनडा , मास्को , यूएसए , यूएई , यूके अशा जगभरातील हिंदी चित्रपट गीतांच्या चाहत्यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. तसेच असंख्य रसिकांनी इव्हेंट आॅर्गनाईझर अमित राजे यांच्या यू ट्यूब चॅनल वरून अनेकदा आनंद घेतला . या अविस्मरणीय कार्यक्रमाच्या अभूतपूर्व यशानंतर अमित राजे यांनी डिजिटल प्लॅटफॉर्म वरुन विविध संकल्पना घेऊन सुरेल हिंदी गाण्यांच्या मैफलीचे आयोजन करून रसिकांना घरबसल्या आनंददायी सुरेल , मधुर हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा देण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहीन असे मनोगत व्यक्त केले .

Categories
मुंबई

ज्येष्ठ पत्रकार शरद बनसोडे यांचीभारतीय जनता पार्टी कामगार आघाडीच्या उत्तर पश्चिम जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी: लक्ष्मण राजे )

भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीच्या उत्तर पश्चिम जिल्हा उपाध्यक्ष पदी जोगेश्वरी येथील ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. ‌शरद नामदेव बनसोडे यांची निवड करण्यात आली. भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे उत्तर पश्चिम जिल्हा अध्यक्ष श्री.भुपेंद्र शिरोडकर यांनी ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते श्री.शरद नामदेव बनसोडे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीच्या उत्तर पश्चिम जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली.राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी , कार्यकर्त्यांनी श्री.शरद नामदेव बनसोडे यांना अभिनंदनीय शुभेच्छा दिल्या.तसेच पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Categories
मुंबई

भारताचे संविधान उद्देशिका वाचन स्पर्धेचा निकाल जाहीर

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी:लक्ष्मण राजे )

मुंबई : राज्यस्तरीय “आम्ही तंत्रस्नेही शिक्षकमंच” समूहाच्या प्रमुख व मुख्य प्रशासिका वृषाली सुरेश खाड्ये (मुंबई) यांनी संविधान दिनाचे औचित्य साधून “भारताचे संविधान उद्देशिका वाचन स्पर्धा” आयोजित केली होती. महाराष्ट्रातील सर्व भाषिक माध्यमांतील इयत्ता ५ वी ते १० वी विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पाठ्यपुस्तकातील संविधान उद्देशिका वाचन करतानाचा व्हिडिओ गुगल फाॅर्मद्वारे स्पर्धक विद्यार्थ्यांनी आयोजकांना पाठविले. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती या माध्यमांतील बहुसंख्य विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. व्हिडिओंच्या परीक्षणानंतर “साहित्यमंच” या यू ट्यूब चॅनेलवर व्हिडिओ अपलोड करण्यात आले.

शुक्रवार दि.२५/१२/२०२० रोजी व्ह्यूज व लाईक्स यावरून निकाल घोषित करून रोख रक्कम व ई-प्रमाणपत्र देऊन विजेत्या स्पर्धकांना गौरवण्यात आले. या स्पर्धेचे “सकाळ माध्यम प्रायोजक” होते.

ऑनलाईन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश चर्‍हाटे (सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका-शिक्षण विभाग) हे होते. प्रमुख अतिथी म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका-शिक्षण विभागातील वीणा सोनावणे (प्रशासकीय अधिकारी शाळा), संगीता डोईफोडे (विभाग निरीक्षिका), मीरा सुरेश डहाळे (मुख्याध्यापिका), मंदा नारायण लोहारे (मुख्याध्यापिका) तसेच मिलिंद काशिनाथ पगारे (निवृत्त मेकॅनिकल मेंटेनन्स इंजिनिअर, रिलायन्स इंडस्ट्रीज लि. जामनगर, गुजरात) यांच्या उपस्थितीत कार्यक्रम मोठ्या दिमाखात संपन्न झाला.

प्रकाश चर्‍हाटे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात संविधान दिनानिमित्त आयोजित केलेल्या भारताचे संविधान उद्देशिका वाचन स्पर्धेत विजयी व सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करून ‘आम्ही तंत्रस्नेही शिक्षकमंच’ या समूहाशी विविध उपक्रमांच्या माध्यमांतून मी जोडलो गेलो असल्याचे सांगितले. तसेच लाॅकडाऊनचा काळात ‘आम्ही तंत्रस्नेही शिक्षकमंच’ समूहाने शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम व सुप्त कलागुणांना वाव देणार्‍या अभिनव स्पर्धा, याबरोबरच तंत्रज्ञान कार्यशाळा, विषयनिहाय बुद्धीवर्धक सामान्यज्ञान चाचण्यांचे आयोजन, समूहाचे उल्लेखनीय कार्य नियोजन व शिस्तबद्धता इ. बाबींचा उल्लेख करून समूहाचे हे कार्य वाखाणण्याजोगे आहे असे गौरवोद्गार काढले. आम्ही तंत्रस्नेही शिक्षकमंच (महाराष्ट्र राज्य) या समूहामार्फत नेहमीच विविध उपक्रम राबवले जातात याचे कौतुक करून संविधान दिनानिमित्त इ. ५ वी ते १० सर्व भाषिक विद्यार्थ्यांसाठी भारताचे संविधान उद्देशिका वाचन स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांना एक नविन दालन उघडून दिल्याबद्दल वीणा सोनावणे यांनी संयोजकांचे अभिनंदन केले. संविधान उद्देशिका वाचन असल्याने अनेक विद्यार्थी या स्पर्धेत अत्यंत उत्साहाने सहभागी झाले. समूहाने त्या सर्व स्पर्धकांचे व्हिडिओ यू ट्यूबवर अपलोड करून स्पर्धकांना एक प्रकारे प्रोत्साहन दिले आहे असे मत संगीता डोईफोडे यांनी मांडले. मीरा सुरेश डहाळे यांनी अनेक स्पर्धक समूहाच्या पुढील उपक्रमाची आतुरतेने वाट पाहत असतात हे जाणवले असल्याचे मत मांडले. आम्ही तंत्रस्नेही शिक्षक समूहाची उत्तरोत्तर प्रगती व्हावी यासाठी व समूहाच्या पुढील उपक्रमास मंदा लोहारे यांनी शुभेच्छा दिल्या. मिलिंद काशिनाथ पगारे यांनी प्लास्टीक प्रदूषण, कचरा व्यवस्थापन इ. सामाजिक बाबीवर प्रबोधन करत असतांना या समूहाशी जोडलो गेल्याची भावना आपल्या मनोगतात व्यक्त केली.

अंजू यशवंत पालवे (ए.बी.गोरेगावकर इंग्लिश हायस्कूल, गोरेगाव, मुंबई), विराजित उत्तम कुंदे (सरस्वती सेकंडरी स्कूल, ठाणे),आश्लेशा सुनील पूर्वा पाटील (ए.बी.गोरेगावकर इंग्लिश हायस्कूल, गोरेगाव, मुंबई) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविले. समृद्धी विजय चव्हाण, ऋतुजा रवींद्र फर्डे, शिवानी समीर पटवर्धन, प्रांजल निलेश गायकवाड, देवयानी राजेंद्र चव्हाण, श्रुती सुरेश बधे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला.

प्रकाश चर्‍हाटे यांच्या सौजन्याने बक्षीसाची रक्कम देय झाली असून विजयी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. संदीप सोनार (जळगाव) यांनी तयार केलेल्या आकर्षक ई-प्रमाणपत्राने सर्व विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले.

ऑनलाईन कार्यक्रमात ऋतुजा रवींद्र फर्डे (स्वातंत्र्यसैनिक किसन बाबा विद्या मंदिर, धसई, शहापूर), समृद्धी विजय चव्हाण (श.जा.ति.म.जी. परिषद हायस्कूल व ज्यू. कॉलेज, गोरेगाव, गोंदिया) सिद्धांत मनोज साळगाकर (सरस्वती सेकंडरी हायस्कूल, ठाणे) दर्पण अशोक भिरमोडे, (पराग विद्यालय, भांडूप) वेदिका प्रशांत वर्मा (आर. एस. टी. माध्यमिक विद्यालय, भांडूप) आयेशा रणजित घुगरवाल (धनाजी नाना विद्यालय, डोंबिवली) मिताली काणेकर (पराग विद्यालय, भांडूप) अनुजा यशवंत पाल्ये (ए.बी.गोरेगावकर इंग्लिश हायस्कूल, गोरेगाव, मुंबई), सिद्धी रविंद्र निचिते (स्वातंत्र्यसैनिक किसन बाबा विद्या मंदिर, धसई, शहापूर) अथर्व विजय गवस (पराग विद्यालय,भांडूप) यांनी मनोगत व्यक्त केले.

वृषाली खाड्ये यांनी अध्यक्ष व प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. उपस्थितांचे स्वागत स्वरूप सावंत (मुंबई), गजानन पुंडे (बुलढाणा), सुनिता अनभुले (मुंबई), सुनील द्रविड (कोल्हापूर), प्रास्ताविक दिलीप यशवंत जाने (जळगाव), आभारप्रदर्शन अंजली ठाकुर (यवतमाळ), सूत्रसंचालन साईली राणे (मुंबई) यांनी केले.

स्पर्धा यशस्वी होण्यासाठी नरेंद्र कांबळे (परभणी), राजेश चायंदे (अमरावती), सुनीलकुमार बडगुजर (जळगाव), वर्षा चोपदार (मुंबई), राहुल मुंढे (ठाणे) यांचेही सहकार्य लाभले.

Categories
मुंबई

‘श्रीगणेश दिनदर्शिका २०२१’चे प्रभाग ९६ मध्ये जनसेवक गणेश भगत यांच्याकडून घरोघरी वितरण


नवी मुंबई : प्रभाग क्रमांक ९६ मधील रहीवाशांकरिता उपयुक्त ठरेल अशा ‘श्रीगणेश दिनदर्शिका २०२१’ दिनदर्शिकेचे प्रकाशन लोकनेते, नवी मुंबईचे शिल्पकार, ऐरोलीचे भाजप आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यानंतर जनसेवक गणेश भगत यांनी प्रभाग ९६ मधील नेरूळ सेक्टर १६,१६ अ, १८ परिसरात घरोघरी जावून रहीवाशांना ‘श्रीगणेश दिनदर्शिका २०२१’ दिनदर्शिकेचे वितरण करण्यास सुरूवात केली आहे. रहीवाशांसाठी ५००० दिनदर्शका वितरीत करण्यात येणार असल्याचे गणेश भगत यांनी सांगितले.
रविवारी, दि. २७ डिसेंबरपासून सकाळी प्रभाग ९६ मध्ये जनसेवक गणेश भगत यांनी घरोघरी जावून ‘श्रीगणेश दिनदर्शिका २०२१’ दिनदर्शिका वाटपास सुरूवात केली आहे. यावेळी गणेश भगत यांच्यासमवेत शिवाजीराव पिंगळे, अनंत कदम, चंद्रकांत महाजन, गोरशनाथ गांडाळ, रमेश नार्वेकर, शांताराम कुऱ्हाडे, अकुंश माने, हरिश्चंद्र पातारे, सुरेश बोराटे, सुरेश ठाकूर, संतोष शिंदे,अशोक गाडांळ,विजय पाथारे, दादाभाऊ लोंढे, सागर मोहिते, विमल गाडांळ, रश्मी, सावंत, रंजनी धनावडे, विकास तिकोणे, रविंद्र भगत आदी उपस्थित होते. यावेळी गणेश भगत यांनी घरोघरी जावून दिनदर्शिकेचे वितरण करताना अवघ्या काही तासावर येवून ठेपलेल्या नववर्षाच्या शुभेच्छा रहीवाशांना दिल्या.
प्रभाग ९६ चा नवी मुंबई शहरामध्ये पालिकेने आयोजित केलेल्या स्वच्छता अभियानामध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल रहीवाशी गणेश भगत यांचे व गणेश भगत हे रहीवाशांचे अभिनंदन करताना दिनदर्शिका वितरण करताना पहावयास मिळाले. ‘श्रीगणेश दिनदर्शिका २०२१’ दिनदर्शिका वितरीत करताना गणेश भगत यांनी प्रभागातील जनतेसाठी केलेल्या कामांचीही माहिती रहीवाशांना देण्यात आली आहे. प्रभाग ९६ मध्ये गेल्या १५ ते १६ वर्षात जिथे डांबरीकरण झाले नव्हते, त्या ठिकाणी सौ.रूपाली किस्मत भगत यांनी डांबरीकरण करवून घेतले.कोरोना काळात प्रभागात मुषक नियत्रंण कार्यक्रम, सोसायटी आवारात ब्लिचिंग पावडरची फवारणी, सोसायटीतील मल:निस्सारण वाहिन्यांची सफाई, विभागात प्रथमच रस्त्यारस्त्यावर, चौकाचौकात सोसायटीच्या नावांचे फलक नगरसेवक निधीतून बसविण्यात आले. घरोघरी जावून रहीवाशांना दिपावली भेट देण्यात आली. आदिवासी बांधवानांही दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. कोरोना काळात रहीवाशांची काळजी घेताना प्रभागात मास स्क्रिनिंग शिबिराचे, अॅण्टीजेन टेस्टचे आयोजन, मोफत रक्तदान व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. कोरोना नियत्रंणात आणताना प्रभागात सॅनिटाईज फवारणी, मोफत धुरफवारणी करताना रहीवाशांच्या आरोग्याची काळजी घेण्यास प्राधान्य दिले. महापालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करताना नागरी समस्यांचे निवारण करताना नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या. प्रभागातील धोकादायक इमारतींच्या पुर्नवसनासाठी लोकनेते गणेश नाईक, महापालिका प्रशासन व पोलिसांकडेही भगत परिवाराने पाठपुरावा केला. लॉकडाऊनमध्ये परिसरातील रहीवाशांना तसेच अनाथाश्रमामध्ये सातत्याने केलेले धान्य वाटप केले. रहीवाशांना सुविधांचा लाभ मिळावा रहीवाशांना ज्येष्ठ नागरिक कार्ड, मोफत जनआरोग्य कार्ड, एम्पॅलायमेंट कार्डचे वाटप केले. लॉकडाऊन काळात नागरिकांना विरंगुळा भेटावा यासाठी ऑनलाईन चित्रकला, गीतगायन, हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन व पारितोषिक वितरण करण्यात आले. कोरोना महामारीच्या काळात मोफत आर्सेनिक अल्बममधील प्रतिकारक गोळ्या, मोफत फूट स्टेप, सॅनिटायझर स्टॅण्ड वाटप, मोफत मास्क वाटप करण्यात आले. कोरोना महामारीच्या काळात गणेश भगत व नगरसेविका सौ.रूपाली किस्मत भगत यांनी केलेल्या कार्याची माहिती दिनदर्शिकेच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

Categories
मुंबई

परिपूर्ण देशकल्याणासाठी लोकशाहीच आवश्यक – अशोक सावंत

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी:लक्ष्मण राजे )

लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा फायदा घेत लोकशाही विरोधातच कुणीतरी म्हणतं, “विकृत लोकशाहीपेक्षा सुसंस्कृत हुकूमशाही बरी.” अशी विधाने करण्याचे स्वातंत्र्य लोकशाही खेरीज अन्य कोणत्याही राजवटीत नाही. या उलट लोकशाहीत मात्र कुणाच्याही बरोबर किंवा चुकीच्या मताचा आदर राखला जातो. त्यामुळे लोकशाहीशी प्रतारणा करणाऱ्या या विधानाशी आपण आपली केवळ असहमती दर्शवू शकतो. त्यानंतर आपल्या हाती उरते केवळ या विधानाची चिकित्सा करणे.
जगात राजकीय प्रणाली अनेक असल्या तरी प्रत्यक्ष लोकशाही, लोकशाही, हुकूमशाही, कम्युनिजम, राजेशाही या प्रमुख आहेत. जगातील कोणतीही राजकीय प्रणाली १०० टक्के परिपूर्ण नाही. लोकशाहीही नाही. तथापि उपलब्ध राजकीय प्रणालीत लोकशाही ही सर्वात अधिक प्रगत, प्रगल्भ, सर्वात कमी दोष असलेली मानली जाते. सॉक्रेटिस, प्लेटो, ॲरिस्टॉटल हे तत्त्वज्ञही उपलब्ध राजकीय प्रणालीत लोकशाहीस सर्वोच्च स्थान देतात. देशाचे सर्वाधिक कल्याण, देशाचा सर्वांगीण परिपूर्ण विकास लोकशाहीच्या माध्यमातूनच साधता येतो, असे प्रतिपादन जगभरातील थोर अर्थतज्ज्ञही करतात. त्यासाठी ते जगातील अतिप्रगत लोकशाही असलेल्या देशांच्या अतिश्रीमंतीकडे व त्या देशांतील जनतेच्या सर्वोच्च मानव विकास निर्देशांकाकडे, बोट दाखवितात. भारतात आजही लोकशाहीच आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे असे जगभर मानले जाते आणि त्याबाबत मला अभिमान आहे. परंतु याच लोकशाहीस कुणी एखादा माणूस चक्क “विकृत लोकशाही” असे का दूषण देतो? हा माणूस जे म्हणतोय त्यात तथ्य किती? नेमकी कोणती विकृती या माणसास दिसली? अशी विकृती का निर्माण झाली? ही विकृती किती गंभीर स्वरूपाची आहे? उपाययोजना करून या विकृतीचे निर्मूलन करणे शक्य नाही का? या देशाचा एक नागरिक म्हणून ही लोकशाही निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून तिचे आपण पालन केले काय? कि स्वभावतःच लोकशाहीविषयी आपणास तिरस्कार असल्यामुळे ती लयास जावी म्हणून कळत-नकळत, अप्रत्यक्षपणे लोकशाहीच्या विरोधकांचे आपण सहायक बनलो आहोत? असे असंख्य प्रश्न मनात उभे राहतात.

परंतु ही लोकशाही बाजूला केल्यास आपण कोणती राजवट स्विकारणार? हुकूमशाही? म्हणजे रोगापेक्षा औषध भयंकर!
हुकूमशाहीत मालक फक्त एकच असतो आणि उरलेले सगळे गुलाम असतात! हुकूमशहाच्या दृष्टीने उर्वरित जनता किड्या मकोड्याच्या लायकीची असते. मग हुकूमशाहीचा स्विकार करून आपण गुलामी स्विकारायची? सुसंस्कृत हुकूमशाही? हा काय प्रकार आहे? सुसंस्कृत शब्दाची व्याख्या काय करण्यात आली आहे? कारण सुसंस्कृतपणा हा स्थल काल सापेक्ष असत़ो. ज्यास परदेशात सुसंस्कृतपणा मानला जातो त्यास भारतात असंस्कृतपणा मानला जाऊ शकतो. अमेरिकेत सार्वजनिक जागेत दांपत्याने एकमेकांचे चुंबन घेणे किंवा मुलींनी तोकडे कपडे घालणे सुसंस्कृतपणाचे लक्षण मानले जाते. या उलट भारतात हा असंस्कृतपणा मानला जातो. तसेच आज वाल्मिकी असलेल्या सुसंस्कृत हुकूमशहाचे उद्या दरोडेखोर वाल्यात रूपांतर होणार नाही कशावरून? १०० सद्गुणांनी भरलेल्या रावणाने अखेर सीतामाईच्या मोहात पडून तिचे अपहरण केलेच ना!
हुकूमशाही म्हटले की सर्वात प्रथम नावे समोर येतात ती ॲडॉल्फ हिटलर आणि बेनिटो मुसोलिनी या दोन आधी सुसंस्कृत पण नंतर सत्ता हाती येताच जगातील सर्वोच्च हिंस्र बनलेल्या क्रुरात्म्यांचे! न्यूनगंडाने पछाडलेल्या विकृत हिटलरने ६० लाख ज्युंचे अत्यंत पशूवत पद्धतीने खून पाडले. तर मुसोलिनीने ३० लाख जनतेची हत्या केली. जगावर दुसरे महायुद्ध हिटलरनेच लादले. या महायुद्धात त्याच्या जर्मनी देशातील, तसेच त्याची मित्र राष्ट्रे असलेल्या इटली, जपानसह विरोधी युरोपियन दोस्त राष्ट्रांमधील कोट्यवधी सैनिक मारले गेले. जगात सर्वत्र हाहाकार उडाला. कोट्यवधी संसार उजाड होऊन तितक्याच स्त्रिया विधवा झाल्या. कोट्यवधी स्त्रिया-मुले, वृद्ध मातापिता निराधार होऊन भूक शमवण्यासाठी रस्तोरस्ती भटकू लागली. जगातील सामाजिक स्थिती बिघडून सर्वत्र अराजक माजले. जगाची आर्थिक स्थिती घडी विस्कटून ते भिकेला लागले. हिटलरच्या छळछावणीत मारल्या गेलेल्या लक्षावधी ज्युंच्या हिंस्रभयकथा अनंत आहेत. त्याला ज्यू वंश व त्याचबरोबर त्याला वाटणारे इतर सर्व कमअस्सल मानव वंश जगातून नष्ट करायचे होते. जगात फक्त आर्य वंश शिल्लक राहील. बाकीचे उरलेच तर ते आर्यांचे गुलाम म्हणून जगतील, असे तो म्हणत असे. आजचा भारत म्हणजेच तेव्हाचा हिंदुस्थानही त्याच्या हिटलिस्टवर होता. भारतातील आर्यांच्या रक्तात भेसळ झालेली असून ते खरे आर्य राहिलेले नाहीत असा दावा तो करीत असे. हुकूमशहांची करणी अशी भयंकर असते.
बरे जर्मनीचा हिटलर किंवा इटलीचा मुसोलिनी हे दोघेही लोकशाहीतील सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊन लोकशाहीलाच संपवण्यासाठी सत्तेवर आलेले. इंग्रजीत म्हण आहे, First call him dog and then shoot. या तत्त्वानुसार त्यांनी ठरवून पद्धतशीरपणे आपल्या देशातील तत्कालीन प्रस्थापित लोकशाहीस बदनाम केले. लोकशाही विकृत असल्याचे भयचित्र त्यांनी सातत्यपूर्वक प्रचार करून जनतेच्या मनावर ठसविले. त्यासाठी त्यांनी राष्ट्रभक्तीचा मुद्दा जनतेच्या अंत: पटलावर बिंबविला. जे नागरिक आपल्या बाजूने बोलतील त्यांना राष्ट्रभक्त ठरवून त्यांना सन्मानित करायचे व जे विरोधात बोलतील त्यांना देशद्रोही ठरवून त्यांच्या विरुद्ध प्रचार करून त्यांना जीवनातून उठवायचे हे तंत्र शास्त्रशुद्धरित्या अवलंबिले. तत्कालीन लेखक व समाज शास्त्रज्ञ उंबर्टो इको यांनी याबाबत हुकूमशाही प्रतिष्ठापना प्रक्रियेची काही लक्षणे मांडली आहेत. याबाबतचे त्यांचे निरीक्षण दांडगे आहे. त्यांनी हिटलर, मुसोलिनी यांच्या बरोबर इतरही अनेक हुकूमशाह्या, कम्युनिजम, राजेशाही प्रत्यक्ष अनुभवलेल्या असल्यामुळे त्यांच्या अर – फॅसिजम या प्रबंधास जागतिक पातळीवर अनन्यसाधारण महत्त्व आहे.
उंबर्टो म्हणतात, हुकूमशाही प्रतिष्ठापना प्रक्रियेची १४ लक्षणे आहेत.
१) Cult of tradition – एखाद्या पारंपरिक पंथाचा उदय होतो. त्या माध्यमातून जुन्या परंपरांचा आपणास हवा तसा, आपल्याला सोयीस्कर असलेला अर्थ काढून तो जनतेच्या गळी उतरवला जातो.
२) Rejection of modernism. आधुनिक आचार विचार, कृती सर्वच ठोकरून देणे.
३) The cult for action for action’s sake. जशास तसे. कृतीला कृती करून उत्तर देणे. तर्कहीन विरोध.
४) Disagreement is treason. विरोधकांना देशद्रोही ठरविणे.
५) Fear of difference. विरोधकांच्या मनात वेगळे मत मांडण्याबाबत भीती, दहशत निर्माण करणे.
६) Appeal to social frustration. सामाजिक नैराश्य अधिक गडद करून मध्यमवर्गाला आपल्याकडे आकर्षित करणे.
७) Obsession with a plot. कटकारस्थानांचे आकर्षण असणे.
८) The enemy is both weak and strong. शत्रू्ला कमजोर तसेच बलवान, दोन्ही एकाच वेळी ठरवून तसा प्रचार करणे.
९) Pacifism is trafficking weak. (Life is permanent warfare.) जीवनासाठी संघर्ष नसून संघर्ष हेच जीवन आहे, हे जनतेच्या मनावर ठसविणे.
१०) Contempt for weak. सर्व क्षेत्रात अभिजन वर्गाची मक्तेदारी निर्माण करून कनिष्ठ वर्गाला वंचित ठेवणे.
११) Everybody is educated to become hero. येथे प्रत्येक माणसाला नायक बनवले जाते. आपण आहोत म्हणून राष्ट्र आहे. आपल्या शिवाय राष्ट्र् जगू शकत नाही. म्हणून जगायचे तर राष्ट्रासाठी, मरायचे तर राष्ट्रासाठी ही भावना प्रत्येकाच्या मनात भरविली जाते. अशाच भावनेने भारलेले पाकिस्तानी दहशतवादी मानवी बॉम्ब बनून भारतात घातपात घडवित असतात.
१२) Machismo and weaponry. स्त्रियांना गौण स्थान देणे. त्यांना कमी लेखणे. त्यांना आधुनिक विचारांपासून दूर ठेवणे. आधुनिक सुखसोयी शिक्षणापासून वंचित ठेवणे. त्यांच्या लैंगिक आवडीनिवडी वर बंधने घालणे. थोडक्यात तथाकथित पुरुषार्थ गाजविण्याचा उपदेश केला जातो.
१३) Selective populism. टिव्ही-इंटरनेट व इतर समाज माध्यमांतून विशिष्ट लोकांच्या गटांना बोलते करणे व ते जे बोलत आहेत तोच जनतेचा आवाज आहे असे भासविणे.
१४) Newspeak. प्रचलित शिक्षण पद्धती बंद करून स्वतःला पुरक असलेली शिक्षणपद्धती राबविणे. अभ्यासक्रमात बदल करून स्वतःचे गौरविकरण करणारे किंवा जुना इतिहास बदलून स्वतःला सोयीस्कर असलेला नवा इतिहास लिहून घेऊन स्वतः ची श्रेष्ठ प्रतिमा निर्माण केली जाते.
अशी ही हुकूमशाही लोकशाहीची शत्रू असून त्याखेरीज राजेशाही, धर्मशाही, कम्युनिजम, समाजवादी, प्रांतवादी, प्रादेशिक एकतंत्री पक्ष हे देखील शत्रू असतात. हे सर्व शत्रू मिळून लोकशाही बदनाम करण्याचे, तिला विकृत बनविण्याचे पराकोटीचे प्रयत्न करीत असतात. यांच्याकडूनच लोकशाही विरोधी अतिरंजित किंवा बनावट वृत्ते प्रसृत केली जातात. परंतु हे विरोधक जोपर्यंत मध्यमवर्गास स्वतःकडे आकर्षित करू शकत नाहीत तोपर्यंत लोकशाहीस कोणताही धोका नसतो. कारण मध्यमवर्ग हा कोणत्याही राजसत्तेचा प्रमुख आधारस्तंभ असतो. तो ज्याच्या बाजुने उभा असेल त्याची राजसत्ता स्थापन होईल. कनिष्ठ वर्ग हा बराचसा अज्ञानी, अंधश्रद्धाळू, अशिक्षित, अर्धशिक्षित असतो. विचार करण्याची त्याची कुवत किंवा त्याची स्मरणशक्ती जेमतेम असते. त्यामुळे मध्यमवर्गाचे केवळ अनुकरण करणे एवढेच शक्य असते, असे तत्त्वज्ञ सॉक्रेटिस सांगतो.
भारताच्या लोकशाहीत काही दोष जरुर आहेत. पण ते विकृती म्हणावेत इतके गंभीर नाहीत. असे दोष प्रत्येक व्यवस्थेत कमी अधिक प्रमाणात असतातच. बहुतांश भारतीय जनता अजूनही जातपात, धर्म, रुढी परंपरा, विभिन्न संस्कृती या बेडीत अडकलेली असल्यामुळे काही अनिष्ट गोष्टी घडत असतात. परंतु त्या विकृतीच्या पातळीवर पोहोचल्या आहेत असे म्हणणे अतिरेकी, तसेच अन्यायकारक आणि भारतीय जनतेच्या हितास मारक आहे.
भारतीय राज्यघटनेनुसार संसद, प्रशासन यंत्रणा आणि न्यायपालिका हे भारतीय लोकशाहीचे तीन प्रमुख आधारस्तंभ असून ते आजही ठाम भक्कमपणे उभे आहेत हे अभिमानास्पद आहे.
भारताचा सर्वांगीण विकास, परिपूर्ण राष्ट्रकल्याण केवळ लोकशाहीच्या माध्यमातूनच होऊ शकते.

Categories
मुंबई

निवाराच्या पुढाकाराने संघर्षनगर वसाहतीतील शाळेच्या इमारतीत गरीब मुलं बृहन्मुंबई मनपाच्या माध्यमातून गिरवणार शिक्षणाचे धडे

निवारा हक्क सुरक्षा समिती

शिक्षणसमिती अध्यक्षा मा. संध्या दोषी यांच्या दालनातील सभेत शाळेची इमारत बृहन्मुंबई मनपाला हस्तांतर करून शाळा सुरू करण्याचा एक मताने निर्णय

एक यशस्वी प्राथमिक शाळा मनपा चालवत असताना दुसरी शाळा सुरू झाल्याने गोरगरीब संघर्ष नगर वासीयांना पायपीट करण्यापासून व आर्थिक बचतीचा फायदा होणार

मुंबई :- सिद्धार्थ काळे
दिनांक 28 डिसेंबर 2020

संघर्ष नगर मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथून आलेल्या 12000 हजार कुटुंबातील मुलांना शिक्षण मिळावे म्हणून अनेक संघर्षानंतर एक प्राथमिक शाळा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत 2014 साली बृहन्मुंबई मनपाला हस्तांतरण करण्यात आली. व आज ही त्या ठिकाणी विविध माध्यमाची एकूण 2800 विद्यार्थी उत्कृष्ट शिक्षण घेत आहेत. त्याच प्रमाणे संघर्ष नगर वसाहतीची लोकसंख्या पाहता त्या शाळेची जागा अपुरी पडते आहे त्याच प्रमाणे संघर्ष नगरात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा ( इयत्ता 9 वी ते 12 वी ) उपलब्ध नाही.
उपलब्ध व्हावी म्हणून निवाराच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून पाठपुरावा चालू होता.
त्यांचाच परिपाक म्हणून आज शिक्षण समिती अध्यक्षा मा. संध्या दोषी यांच्या दालनात मनपाच्या विविध खात्याचे अधिकारी, एस आर ए , वन विभाग, यांचे अधिकारी व निवाराचे प्रतिनिधी यांची शिक्षण समिती अध्यक्षा मा. संध्या दोषी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

सदर बैठकीत जनतेच्या मागणीनुसार व हितासाठी आर्थिक दृष्टिकोनातून परवडेल अशी शाळा पहिली शाळा ज्या धर्तीवर मनपाने घेतली त्याच धर्तीवर शाळा इमारत ताब्यात घेऊन शाळा चालू करावी. या साठी गृहनिर्माण मंत्री यांनीही मनपाला हस्तांतर करावे असे निर्देश दिले आहेत त्यामुळे सदर शाळा इमारत हस्तांतर करून मनपाच्या वतीने शाळा सुरू करावी अशी मागणी निवाराच्या वतीने संजय डावरे सर यांनी मांडली.
यावर सर्व अधिकारी यांनी आपले म्हणणे मांडून शेवटी सदर शाळा मनपाला हस्तांतर करण्याचे सर्वानुमते ठरले. याची कार्यवाही त्वरित करावी असे निर्देश दोषी मॅडम यांनी दिले.

संघर्ष नगर वासीयांच्या वतीने दोषी मॅडमची आभार प्रकट करण्यात आले. या वेळी निवाराच्या वतीने संजय डावरे सर यांच्या सह रावण गायकवाड, अशोक पाटील ,वसंत, खाडे, अनंत जोशी, प्रकाश शिंदे उपस्थित होते.

Categories
मुंबई

विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव – धडक कामगार युनियन) यांच्या मुख्य उपस्थितीत नाताळ सणानिमित्त आयोजित मोफत आरोग्य शिविर संपन्न

(हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी: लक्ष्मण राजे )

रविवार दि. 27 डिसेंबर, 2020 रोजी बेहराम बाग, जोगेश्वरी पश्चिम,मुंबई येथे मनराज प्रतिष्ठान चे विश्वस्त श्री मनोज राजन नाथानी यांच्या तर्फे व विख्यात कामगार नेते श्री अभिजीत राणे (संस्थापक महासचिव – धडक कामगार युनियन) यांच्या सहकार्याने नाताळ सणानिमित्त मोफत आरोग्य शिविरचे आयोजन करण्यात आले.

या उपक्रमात  डोळे तपासणी, रक्तदाब,  ऑक्सीजन लेवल, मधुमेह, बाॅडी फॅट व इतर चेक अप मोफत करण्यात आले तसेच कमी दरात गरजु लोकांसाठी चष्मा व कानाची मशीन उपलब्ध करण्यात आली. श्री विनय डोळस (महाराष्ट्र संपर्क प्रमुख -धडक कामगार युनियन महासंघ), श्री विन्स्टन परेरा (महाराष्ट्र सचिव – धडक माथाडी जनरल कामगार युनियन), श्री नेहाल सय्यद (महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य -धडक कामगार युनियन), श्री अशोक कदम व धडक कामगार युनियनचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Categories
मुंबई शैक्षणिक

शाळा सुरू करण्याबाबत संभ्रम… गणेश हिरवे

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी:लक्ष्मण राजे )

मुंबई,ठाणे,नाशिक,पालघर व अन्य काही जिल्हे वगळता राज्यातील इयता नववी ते बारावीच्या शाळा-कॉलेज सुरू झाले आहेत व आता मुंबईसह सर्वच ठिकाणी शाळा सुरू होण्याबाबत पालक,शिक्षक, संस्थचालक व विधार्थीही आग्रही आहेत,कारण दहावी-बारावीचे महत्वाचे वर्ष असून गेल्या कित्येक महिन्यांपासून हे विधार्थी प्रत्यक्ष शाळेतील शिक्षणापासून वंचित राहिले आहेत.सध्या मुंबईतील कोरोना संख्या कमी होत आहे,पण ब्रिटन व इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा सर्व प्रशासकीय यंत्रणा सावध झाल्या असून मुंबई व इतर काही ठिकाणी रात्रीची संचारबंदी सुरू करण्यात आली आहे.तेव्हा १ जानेवारी २०२१ पासून मुंबईसह इतर ठिकाणच्या शाळा सुरू करायच्या की नाहीत याबाबत शिक्षण विभागाकडून अजूनपर्यंत कोणतीही स्पष्टता किंवा दिशानिर्देश देण्यात आलेले नसल्याने प्रशासनाने याबाबत लवकरात लवकर स्पष्टता आणून याबाबतचा संभ्रम दूर करावा अशी मागणी मुख्याध्यापक व पालकांकडून होत आहे.

Categories
मुंबई

ज्येष्ठ कॅमेरामन ईश्वर बिद्री यांचे दुःखद निधन

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी: लक्ष्मण राजे )

हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ कॅमेरामन ईश्वर बद्री यांचे दुःखद निधन झाले. बाॅर्डर , घातक , अंगार , एल ओ सी , अंदाज अपना अपना , गुनाह , फर्ज , हम कौन है , दामिनी , आपके बरस , बटवारा , गुलामी अशा अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांचे छायाचित्रण ईश्वर बद्री यांनी केले होते. तसेच तुझं थोडं माझं थोडं या मराठी चित्रपटाचे छायाचित्रण ईश्वर बद्री यांनी केले होते. त्यांच्या निधनाने चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. निर्माता दिग्दर्शक कलाकार तंत्रज्ञांनी ईश्वर बद्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि संचालक , पदाधिकाऱ्यांनी , सर्व कर्मचाऱ्यांनी ईश्वर बद्री यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

Categories
मुंबई

शरद पवारांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी ओ.बी.सी सेलच्या वतीने रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिराचे आयोजन

विरेंद्र म्हात्रे नवी मुंबई प्रतिनिधी : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व देशाचे माजी संरक्षणमंत्री, माजी गृहमंत्री तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या ८०व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेसओ.बी.सी सेलच्या वतीने प्रभाग ८५ च्या वतीने २७ डिसेंबर रोजी आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ ओ.बी.सी सेलच्या वार्ड क्रमांक ८५च्याअध्यक्षां शालीनीताई म्हात्रे यांनी दिली.
२७ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ५ या वेळेत नेरूळ सेक्टर ६ मधील लोकमान्य समाज मंदीर येथे हे शिबिर आयोजित  केले होते. कोरोना महामारीमुळे राज्यात रक्तसाठा घटत चालला असून रक्त मिळविण्यासाठी रूग्णाच्या नातलगांना धावपळ करावी लागत आहे. त्यामुळे या शिबिराचे आयोजन केले असून नेरूळ नोडमधील रक्तदात्यांनी शिबिरात सहभागी होवून रक्तदान केले असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेरूळ ओ.बी.सी सेलच्या वार्ड क्रमांक ८५च्याअध्यक्षां शालीनीताई म्हात्रे यांनी सांगितले.
तसेच या कार्यक्रमा प्रसंगी नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील ,नवी मुंबई प्रभारी तेजस शिंदे , नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष अशोक गावडे,नवी मुंबई कार्याध्यक्ष जी.एस. पाटील,राष्ट्रवादी कॉंग्रेस ओ.बी.सी सेल जिल्हा अध्यक्ष रुपेश ठाकूर,समाजसेवक अंकुश म्हात्रे, महादेव पवार, निशांताई सोनावणे, सुनिता देशमुख, प्रजक्ता मोडकर व ईतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Categories
मुंबई

सामाजिक कार्यकर्त्या त्रिवेणी माने यांना समाजभूषण २०२० पुरस्कार जाहीर !

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी: लक्ष्मण राजे )

सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून आरोग्य सेवा, शिक्षण सेवा , तसेच वस्ती पातळीवरील पोलीस ठाण्याच्या संबंधित केसेस मध्ये अन्यायग्रस्त नागरिकांना अधिकार आणि कायदा या बाबत मार्गदर्शन करुन न्याय मिळवून देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आणि निर्भय परिवर्तन संस्थेच्या संस्थापिका त्रिवेणी माने यांना दैनिक मुंबई मित्र चे संपादक आणि धडक कामगार युनियनचे संस्थापक अध्यक्ष यांच्या अभिजीत राणे युथ फाऊंडेशचा समाज भूषण २०२० हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. दिनांक २ जानेवारी २०२१ रोजी गोरेगाव येथील केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या सभागृहात आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रदान करण्यात येणार आहे.

Categories
कला व मनोरंजन मुंबई

आक्रीत फिल्ममधील “धिंगाणा” सुपरहिट गीत यु ट्यूब वर प्रदर्शित

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी: लक्ष्मण राजे )

प्रसिद्ध कवी, लेखक, गीतकार, संपादक, साहित्यिक, समाजसेवक, निर्माता व दिग्दर्शक डॉ. शांताराम कारंडे निर्मित व दिग्दर्शित डॉ. शांताराम कारंडे फॅन्स फाउंडेशन प्रोडक्शन हाऊस प्रस्तुत सिद्धांत पिक्चर्सचा नवीन मोठ्या पडद्यावर प्रदर्शित चित्रपट “आक्रीत” मधील “धिंगाणा” गीत यु ट्यूबवर प्रदर्शित करण्यात आले. सदर चित्रपटात प्रमुख भूमिकेत प्रो. विवेक शिंदे सर व अभिनेत्री संजीवनी जाधव आहेत. सोबत प्रसिद्ध अभिनेत्री नूतन जयंत, दिपाली मोरे, भाऊ कदम व डॉ. शांताराम कारंडे देखील आहेत.
सामाजिक कार्यकर्ते व राजकीय नेते असलेले डॉ. कारंडे व्यवसायाने आर्किटेक्ट व बिल्डर असून त्यांना मराठी नाटक व चित्रपट निर्माण करण्याची आवड आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी आत्तापर्यंत १३ मराठी नाटक व १५ मराठी, हिंदी व तामिळ शॉर्टफिल्मची निर्मिती केली आहे. लवकरच त्यांचा आक्रीत हा मोठ्या पडद्यावरील सिनेमा येत आहे.
डॉ. कारंडे यांचं साहित्यिक क्षेत्रातदेखील मोठं योगदान आहे. त्यांचे आत्तापर्यंत १० कथासंग्रह, ११ कवितासंग्रह व शेकडो विविध विषयांवरील लेख प्रकाशित आहेत. काळजाचा वेध घेणारा संवेदनशील मराठी चित्रपट आक्रीत मधील गाणे पाहण्यासाठी
https://youtu.be/Q8MdzLPoai4
या लिंकवर प्रेस करा…
कृपया dr. Shantaram Karande हे चॅनेल SUBSCRIBE करायला विसरू नका. तसेच कृपया आपली महत्वपूर्ण प्रतिक्रिया
चॅनेलच्या कॉमेंट बॉक्समध्ये द्या !

Categories
कला व मनोरंजन मुंबई

‘रात्रीस खेळ चाले’ फेम सुप्रसिध्द अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरला नाट्य चित्रपट क्षेत्रातील कलाकारांनी दिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी: लक्ष्मण राजे )

“रात्रीस खेळ चाले” मधली शेवंता म्हणजेच अपूर्वा नेमळेकर. सुप्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचा जन्म २७ डिसेंबर १९८८ रोजी मुंबईतील दादर येथे झाला. अपूर्वा दादर भागातच लहानाची मोठी झाली. किंग जॉर्ज विद्यालयातून ती दहावीपर्यंत शिकली व त्यानंतर तिने रुपारेल कॉलेजमधून महत्वपूर्ण Managament मधील BMS डिग्री घेतली. अपूर्वा नेमळेकर BMS शाखेतील पदवीधर आहे. अपूर्वा नेमळेकरनं आपल्या करिअरची सुरुवात एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीतून केली. ती इव्हेंट प्रमोटर म्हणून काम पाहात असे. इतकेच काय तर तिच्या पहिल्या पगाराचा चेक केवळ १००० रुपयांचा होता.अपूर्वाला अभिनय क्षेत्रात कधीच यातिला नव्हतं. शिक्षण घेताना तिला ग्रॅज्युएशननंतर एमबीए करायचं होतं. परंतु , आपली मुलगी टीव्हीवर दिसावी अशी तिच्या आई-वडिलांची खूप इच्छा होती. ‘अभिनय क्षेत्रात काम करणे हे माझ्या नशिबातच लिहिले होते’ असं अपूर्वा सांगते.अपूर्वा स्वत: ज्वेलरी डिजाइनर आहे. तिच्या नावाचा इमिटेशन ज्वेलरीचा ब्रँडदेखील आहे.
सर्वात आधी ती आभास हा, या झी मराठीवरील मालिकेमधून सर्वांसमोर आली. तू जीवाला गुंतवावे मधील सौम्या तर आराधना मधील पूजा बनून ती आपल्यासमोर आली. रात्रीस खेळ चाले मधल्या शेवंताने तिला यशाच्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. दुसऱ्याच्या घरात घुसणारी बाई अस बोल्ड रोल तिने लीलया साकारलेला आहे‌.अण्णा नाईक आणि तीच जमलेलं सुत सगळीकडे चर्चेचा विषय झालेलं आहे. इश्क वाला लव, भाकरखाडी, अन यावर्षी आलेला accidental Prime minister मध्ये सुद्धा तिने काम केलय. अत्यंत मनाचा असा २०१६ चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा नाट्य परिषद पुरस्कारही तिने प्राप्त केला आहे. २०१४ मध्ये अपुर्वाचे रोहन देशपांडेसोबत लग्न झाले. २७ डिसेंबर रोजी तिला नाट्य चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवरांनी , निर्माते , कलाकार , तंत्रज्ञांनी , आणि असंख्य चाहत्यांनी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Categories
मुंबई

शेतकरी देशोधडीला लागणार?- रवींद्र जांभळे

( हिंदसम्राट मुंबई प्रतिनिधी:लक्ष्मण राजे )

इंदिरा गांधीच्या काळात कामगारांचा दीर्घकाळ चाललेला संप इंदिरा गांधींनी चिरडून टाकला होता. या संपामुळे कामगार देशोधडीला लागला. कामगार चळवळीवर त्याचे फार मोठे परिणाम झाले. कामगारांची लढण्याची हिमत च नष्ट झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात सरकारी कंपन्या बंद होऊन त्यांचे खाजगीकरण करण्याचा जोरदार सपाटा सुरू आहे. कामगारांच्या आंदोलनांना कोणत्याही मिडीयामधून, वृत्तपत्रांतून वाचा फोडली जात नाही. वृत्तपत्रे, मिडीया मोदींचे गुलाम झाले आहेत. त्यामुळे सरकारी कंपन्यातील कामगार देशोधडीला लागला आहे. आता देशोधडीला लागण्याची शेतकऱ्यांची वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या संपाला २८ दिवस उलटून गेले आहेत. तरी देखील, नरेंद्र मोदी संप मिटवण्यासाठी कोणत्याही हालचाली करताना दिसत नाहीत. शेतकऱ्यांच्या अन्यायाला वाचा फुटू नये, यासाठी संसदेचे अधिवेशन रद्द करण्याची पाळी नरेंद्र मोदींवर आली आहे. नरेंद्र मोदी यांचे विचारवंतांशी काहीही देणे घणे नाही. शेतकरी आंदोलन मिटविण्यासाठी कोणाबरोबरही चर्चा काढण्यास, माघार घेण्यास ते तयार नाहीत. नरेंद्र मोदींच्या या अहंकारामुळे कामगार वर्गाबरोबरच शेतकरीही देशोधडीला लागणार आहे.

Categories
मुंबई

नवी मुंबई येथील ज्ञानेश्वर शैलार समाज मंदीरामध्ये ७९ बाटल्या रक्तसंकलन

 

स्वप्निल तांडेल कारावेगाव प्रतिनिधी :-
नवी मुंबई – राज्यात सर्वत्र रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईने विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईच्या सदस्यानी यांनी शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवला. त्यामुळे एका दिवसात ७९ बाटल्या रक्त संकलित झाले आहे.
लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे संस्थापक अध्यक्ष विरेंद्र उर्फ गुरु म्हात्रे,लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई, उपाध्यक्ष अक्षय पाचारणे. लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईसचिव सचिन कोकरे ,लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई खजिदार रोशन पाटील, लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई उपखजिदार आलताफ शेख,लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई सदस्य प्रशांत पाटील, सोपनिल सोनवणे, किरण पंतगे,सोमनाथ बारवे,विक्की वांडे यांनी रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
रक्तदान
राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक नैसर्गिक संकट आणि राष्ट्रीय आपत्ती यांमध्ये लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईमधील सदि आणि अन्य घटक नेहमीच साहाय्यासाठी पुढे येत असतात. त्यामुळे रक्तदानाचा तुटवडा भरून काढण्यासाठी आवाहन केल्यानंतर लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईमध्ये रांगा लागल्या होत्या.

Categories
मुंबई सातारा

सातारा येथील कुंभार कारागिरांचा सेंट्रल व्हिलेज पॉटरी इन्स्टिट्यूटचा महत्वपूर्ण अभ्यास दौरा

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी:लक्ष्मण राजे )

अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. मोहनराव जगदाळे साहेब व प्रदेशाध्यक्ष मा. श्यामशेठ राजेसाहेब यांच्या उपस्थितीत सातारा शाखेच्या वतीने एक दिवसीय व्यावसायिक – शिक्षण सहलीचे आयोजन सेंट्रल व्हिलेज पॉटरी इन्स्टिट्यूट खानापूर (कर्नाटक) या ठिकाणी करण्यात आले. सातारा येथील कुंभार समाजाचे 100 तरुण कारागीर एकत्र येऊन राज्य परिवहन महामंडळाच्या दोन एस टी बस करून कर्नाटक राज्यातील, बेळगाव मधील, खानापूर या ठिकाणी असणारे खादी ग्रामोद्योग संचलित सेंट्रल व्हिलेज पॉटरी इन्स्टिट्यूटला भेट देऊन त्या ठिकाणी आधुनिक यंत्रसामग्रीद्वारे चालणाऱ्या मातीकामाचा अभ्यास केला. यामध्ये इन्स्टिट्यूटचे उपप्राचार्य मा. गोवर्धन साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार तेथील सर्व प्राध्यापकांनी 100 कारागिरांचे प्रत्येकी 10-10 चे गट तयार करून दुपारी 12:00 ते सायंकाळी 5:30 पर्यंत संपूर्ण माती कामाचे आधुनिक स्वरूप, त्यासाठी वापरली जाणारी आधुनिक मशनरी व प्रात्यक्षिक समजावून सांगितले. यामध्ये मातीचे एखादे विशिष्ट उपकरण बनवण्यासाठी कोणत्या प्रकारची माती किती प्रमाणात घ्यावी, त्यामध्ये विविध मातींचे मिश्रण कसे तयार करावे, माती चाळून – भिजवून त्यावर पगमिल व ब्लंजर मधून परिपूर्ण मातीचा गोळा कसा तयार करावा, विविध विद्युत उपकरणावर त्या मातीला कसा आकार द्यावा, त्यामधून शोभेच्या वस्तू, स्वयंपाक घरातील भांडी, बागेतील वस्तू , अन्नधान्य साठवणुकीच्या वस्तू कमीत कमी वेळात जास्तीत जास्त उच्च दर्जाच्या कशा बनवाव्यात हे प्रात्यक्षिकाने दाखविले. पूर्ण झालेल्या वस्तूंवर रंगकाम करून ते कसे सुशोभित करावे याचे मार्गदर्शनही ही खूप छान पद्धतीने केले. बरीच उपकरणे तरुण कारागिरांनी विविध मशीनवर तयार करूनही पाहिली. या मार्गदर्शनामध्ये इन्स्टिट्यूटचे प्राचार्य मा. प्रभाकर साहेब यांनी शेवटी समारोपाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. इन्स्टिट्यूटमध्ये चालणारे विविध अभ्यासक्रम, उपलब्ध असणाऱ्या सर्व सोयीसुविधा, केंद्र सरकारच्या असणाऱ्या विविध योजना यांचीही सखोल माहिती दिली. अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. मोहनरावजी जगदाळे साहेब यांनी आपल्या भाषणात कुंभार कलेचा समावेश विद्यापीठामध्ये व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमासाठी करावा, त्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे आणि याकडे आपण लक्ष देणार असल्याचे सांगितले. अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेचे राज्य प्रदेशाध्यक्ष मा. श्यामशेठ राजेसाहेब यांनी खादीच्या माध्यमातून, अखिल महाराष्ट्र कुंभार समाज विकास संस्थेच्या प्रयत्नाने कुंभार समाजा साठी महाराष्ट्रात विविध ठिकाणी 2700 विद्युत चाकांचे केलेले वितरण व राज्यातील तीन ठिकाणी अत्याधुनिक क्लस्टरची उभारणी केल्याची माहिती दिली. कुंभार समाजातील कारागिरांचे उत्पन्न पाचपट वाढविण्यासाठी उभ्या केलेल्या अभियानाची माहितीही मा. श्याम शेठ राजे साहेब यांनी दिली. विकास संस्थेचे कार्यकारिणीतील सदस्य श्री प्रकाश कुंभार बारामती यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते आपल्या भाषणामध्ये श्री प्रकाश कुंभार यांनी कुंभार समाजातील तरुण कारागिरांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी विविध योजनांची माहिती दिली. तसेच विकास संस्थेच्या सातारा कार्यकारिणीतील कार्याध्यक्ष मा.बळवंतराव कुंभार यांनी कारागिरांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. विकास संस्थेचे तालुका अध्यक्ष मा. नितीन राजे साहेब यांनी कार्यक्रमाचे आभार मानताना जिल्ह्यातील सर्व कुंभार कारागिरांना सक्षम बनविण्यासाठी साताऱ्या मध्येही क्लस्टरची योजना राबवणार असल्याची माहिती दिली. संपूर्ण अभ्यास दौऱ्याचे नियोजन मा.नितीन राजे व मा.दिनकर कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या अभ्यास दौऱ्यामध्ये सातारा येथील कार्यकारिणीतील , मारुती कुंडलिक कुंभार, दत्तात्रय जगन्नाथ कुंभार, नितीन नरहरी कुंभार, रवींद्र बाळकृष्‍ण कुंभार, धनंजय दत्तात्रय कुंभार, रामदास हरी कुंभार , संपत कुंभार,चंद्रकांत शंकर कुंभार यांनी खूप मोलाचे सहकार्य केले.

Categories
कोल्हापूर मुंबई

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या आजीव सेवकपदी —प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांची निवड

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी: लक्ष्मण राजे )

उस्मानाबाद येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांची श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था,कोल्हापूरच्या आजीव सेवकपदी अभिनंदनीय निवड झाली आहे. प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी या अगोदर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादच्या, उस्मानाबाद येथील उपकेंद्रात संचालक म्हणून कार्य केले होते. तसेच ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद च्या व्यवस्थापन परिषदेचे विध्यमान सदस्य म्हणून कार्यरत आहेत.ते सध्या उस्मानाबाद जिल्हा प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष म्हणून हि कामकाज पहात आहेत. या अगोदरच त्यांची श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था,कोल्हापूरच्या व्यवस्थापन मंडळात सदस्यपदी निवड झाली होती.सध्या ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण ,मुंबईच्या उस्मानाबाद विभागीय केंद्राचे उपाध्यक्ष म्हणून हि कार्य करत आहेत.
या त्यांच्या कार्याची दखल घेऊन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेने त्यांची आजीव सेवकपदी निवड केली आहे या निवडीबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमारजी साळुंखे ,संस्थेच्या सचिव शुभांगी गावडे , सहसचिव (प्रशासन)प्राचार्य डाॅ.युवराज भोसले,सहसचिव अर्थ प्राचार्य डाॅ.राजेंद्र शेजवळ यांनी प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुखांच्या निवडीबद्दल अभिनंदन केले आहे तर प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी वरील संस्था पदाधिकारी यांचे आभार मानले आहेत.

Categories
मुंबई

धक्कादायक बाब; नवी मुंबई, खारघर, पनवेलकर घेत आहेत प्रदूषित हवेत श्वास..!!

नवी मुंबई (बातमी/रुपाली वाघमारे) :- एका स्वयंसेवी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार वातावरन फाउंडेशनने उघड केले की खारघर, पनवेल आणि तळोजा पट्ट्यातील रहिवाशी हे प्रदूषित हवेत श्वास घेत आहेत.

पर्यावरण गटाने केलेल्या महिन्याभराच्या हवामानाच्या अभ्यासानुसार पहाटेच्या वेळी प्रदूषण हे शिगेला पोहोचले आढळून आले. यामुळे, मॉर्निंग वॉक करणारे आणि जॉगर्सना धोका निर्माण होतो आहे. तथापि, रहिवासी दररोज सुमारे १७ तास प्रदूषित हवा श्वास घेत आहेत.

या भागातील हवेमध्ये पार्टिक्युलेट मॅटर पी एम २.५ (PH2.5) चे उच्च प्रमाण पहाटे ६ ते सकाळी ८ च्या दरम्यान पहाण्यात आले आसुन. यापैकी बरीच धूळ, परागकण, काजळी आणि धूर यांचे जटिल मिश्रण आहे आणि ते मानवी जीवनास घातक आहेत, ज्यामुळे ते कमी दृश्यमानता आणि धुके यासाठी जबाबदार आहेत. ते लहान सूक्ष्म कण आहेत जे दिवस किंवा आठवडाभर हवेमध्ये राहू शकतात आणि फुफ्फुसांच्या वायुमार्गाच्या अरुंद भागावर आक्रमण करण्यासाठी आणि आरोग्यास आजार निर्माण करण्यास पुरेसे आहेत.

दरम्यान, या पट्ट्यावरून गोळा केलेल्या हवेच्या गुणवत्तेच्या आकडेवारीवरून असेही सूचित झाले आहे की पनवेलमधील १ महिन्याच्या कालावधीत ‘खराब हवा दिवस’ साचली आहे, जिथे बहुतेक दिवस हवेच्या गुणवत्तेच्या अनुज्ञेय पातळीचे भारतीय मानक पार केले होते.

सकाळी ७ वाजता सुमारास सरासरी पातळी २.५ असावी, स्वयंसेवी संस्थेने १३ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर या कालावधीत पाच ठिकाणी कमी किंमतीच्या रिअल-टाइम एअर क्वालिटी मॉनिटर्स (Real-Time Air Quality Monitors) बसवून हा अभ्यास केला.

तळोजाच्या एमआयडीसी क्षेत्रात एक मॉनिटर बसविण्यात आले, तर पनवेलमधील सेक्टर १३, सेक्टर-३६ खारघर आणि सेक्टर -७ तळोजा मधील नावडे या भागातील निवासी क्षेत्रात ४ पाचही ठिकाणी एमआयडीसी, तळोजा येथे (PM 2.5) पी एम २.५ पातळी सर्वाधिक असल्याचे दिसून आले.

कंपन्यांकडून विषारी वायू हवेत सोडल्या जाणार्‍या, सुरू असलेल्या बांधकामांमुळे आणि महामार्गावरून जाणार्या वाहनांच्या धूरांमुळे तळोजा एमआयडीसी भागातील प्रदूषणाची पातळी ही चिंताजनक पातळीवर गेली आहे.

सलग महिन्यासाठी तपासणी केलेल्या हवेच्या गुणवत्तेत सुमारे २०० पर्यंत प्रदूषण पातळी नोंदविली गेली आहे. जर वायू प्रदूषणाची पातळी सायंकाळी ६० च्या खाली असेल तर त्याचा मानवी शरीरावर परिणाम होत नाही.

Categories
मुंबई

आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टिकोन हे यश प्राप्तीचे मूलमंत्र-राजीव तांबे

( हिंदूसम्राट मुंबई प्रतिनिधी:लक्ष्मण राजे )

दिनांक 24 डिसेंबर, 2020 रोजी बॅरिस्टर नाथ पै.शिक्षण प्रसारक मंडळाच्या विक्रोळी विद्यालयात ‘ प .पू . साने गुरुजींची जयंती ‘मोठ्या उत्साहात साजरी केली. संस्थेचे अध्यक्ष श्री. अजयकुमार चोपडेकर यांनी साने गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरीय पुरस्कार प्राप्त सुप्रसिद्ध लेखक ,कवी, नाटककार व टीव्ही स्टार श्री. राजीव तांबे हे उपस्थित होते.मुलांमध्ये रमणारे श्री. राजीव तांबे यांनी त्यांच्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले . जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर चुका करा ,पण त्या उगाळत बसू नका तर काय चुकले ते शोधून तिथे लक्ष केंद्रित करा, सुधारणा करा आणि पुढे जा.आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टिकोन हे यश प्राप्तीचे मूलमंत्र आहेत. अभ्यासाचे वेळापत्रक न करता अभ्यासपत्रक तयार करा व त्याप्रमाणे अभ्यास करा. तसेच स्वतःला बदलवायचे असेल तर प्रथम कृती बदला,विचार बदला, भाषा बदला प्रत्येक गोष्ट अंतर्मनात ठसवा म्हणजे ती प्रत्यक्षात साकार होईल .लॉकडाऊन मुळे मरगळलेले आमचे विद्यार्थी कार्यक्रमाच्या निमित्ताने उत्साही झाले. त्यांनी अनेक प्रश्न पाहुण्यांना विचारले. पाहुण्यांनी ही आवडीने त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली . खरोखरच ते आमच्या विद्यार्थ्यांचे आज सानेगुरुजी झाले. या कार्यक्रमास संस्थेचे संचालक सचिव मा. श्री. गणेश बटा सर हे उपस्थित होते . सर्व शाळा समूहाचे मुख्याध्यापक श्री .येजरे सर ,श्री शेळके सर ,सौ चोपडेकर मॅडम , सौ. मनस्वी कोयंडे व कु शैला दीक्षित मॅडम उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षिका सौ .तरे मॅडम यांनी केले.पाहुणयांचा परिचय शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका सौ .अनिता जाधव मॅडम यांनी केले. पाहुण्यांचे व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप माध्यमिक विभगाचे मुख्याध्यापक श्री. भिवा येजरे यांनी केले.अशी माहिती
गणेश हिरवे यांनी दिली.

Categories
मुंबई

महापालिका स्तरावरील स्वच्छता प्रभाग स्पर्धेत नवी मुंबईत प्रभाग ९६चा प्रथम क्रमांक

विरेंद्र म्हात्रे नवी मुंबई प्रतिनिधी : नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून राबविण्यात येत असलेल्या महापालिका स्तरावरील स्वच्छता प्रभाग स्पर्धेत नवी मुंबईमध्ये प्रभाग 96चा प्रथम क्रमांक आला आहे. विभागिय जनतेने दिलेल्या योगदानामुळेच हा पुरस्कार प्राप्त झाला असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे स्थानिक नेतृत्व जनसेवक गणेश भगत यांनी व्यक्त केली आहे.
नवी मुंबई शहराचा स्वच्छता अभियानात प्रथम क्रमांक यावा यासाठी महापालिका प्रशासनाने जय्यत तयारी गेल्या काही महिन्यापासून केली आहे. या पार्श्‍वभूमीवर नवी मुंबई शहरात नेरूळ सेक्टर १६,१६ए आणि १८ या परिसराचा समावेश होत असलेल्या प्रभाग 96चा प्रथम क्रमांक यावा यासाठी जनसेवक गणेश भगत, माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांनी प्रशासन दरबारी पाठपुरावा केशला होता. महापालिका अधिकाऱ्यांचे पाहणी अभियानही वेळोवेळी राबविले होते. महापालिका आयुक्त अभिजित बांगर आणि नेरूळ विभाग अधिकारी यांना स्वच्छता अभियानात प्रभाग स्वच्छतेसाठी करावयाच्या कामाबाबतही सातत्याने पाठपुरावा केशला होता.
प्रभागातील रस्ते, पदपथ व उद्यानासह, रस्त्यांची दुरावस्था यासह प्र्रभागातील अंर्तगत भागातही रंगरंगोटी व प्रबोधनात्मक सुभाषितांबाबत आग्रही पाठपुरावा गणेश भगत आणि सौ. रुपाली किस्मत भगत यांनी प्रशासन दरबारी केला होता. महापालिका अधिकाऱ्यांना घेवून गणेश भगत आणि सौ. रुपाली किस्मत भगत यांनी वेळोवेळी पाहणी अभियान राबवून समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. महापालिका प्रशासनाकडून स्वच्छता प्रभाग स्पर्धेत जाहिर करण्यात आलेल्या निकालामध्ये प्रभाग ९६चा प्रथम क्रमांक जाहिर झाला आहे. हा पुरस्कार गणेश भगत व माजी नगरसेविका सौ. रूपाली किस्मत भगत यांच्या पाठपुराव्यामुळे व कार्यामुळे प्राप्त झाला असल्याची प्रभागातील रहीवाशांकडून व्यक्त केली जात आहे.

Categories
मुंबई

नवी मुंबईत बलात्काराची भीषण घटना घडली, एका २३ वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिला चालत्या ट्रेनमधून खाली फेकण्यात आलं.


नवी मुंबईतील वाशी येथील रेल्वे रुळांवर मंगळवारी पहाटे ती गंभीर अवस्थेत.

 विरेंद्र म्हात्रे नवी मुंबई प्रतिनिधी

नवी मुंबईत बलात्काराची भीषण घटना घडली आहे. एका २३ वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिला चालत्या ट्रेनमधून खाली फेकण्यात आलं. नवी मुंबईतील वाशी येथील रेल्वे रुळांवर मंगळवारी पहाटे ती गंभीर अवस्थेत आढळली.

मंगळवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास वाशी रेल्वे स्थानकाच्या व्यवस्थापकाने, रेल्वे स्टेशनपासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या वाशी पुलाजवळील ट्रॅकवर एक तरुणी आढळल्याची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. त्यानंतर जीआरपीचे कॉन्स्टेबल भाऊसाहेब शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता, तरुणी डोक्याला गंभीर जखमा आणि शरीरावरही जखमा असलेल्या अवस्थेत आढळली.तरुणीला गंभीर जखमा आणि डोक्यातून रक्तस्त्राव होत होता. तिला त्वरित वाशीच्या एन एम एम सी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची प्राथमिक तपासणी आणि उपचार करून तिला जेजे रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. ती तरुणीने केवळ कसंबसं आपलं नाव सांगू शकली असून, ती टिटवाळा येथे राहणारी असल्याची माहिती मिळाली आहे.

पोलिसांनी टिटवाळा येथे तिच्या कुटुंबाचा शोध घेतला असून ती पवईत नोकरी करत असल्याची माहिती मिळाली आहे. शनिवारी व रविवारी ती आपल्या कुटुंबाला भेटायला यायची. रविवारी संध्याकाळी आपल्या घरुन निघून ती पवईत येत आसताना.

सेक्शन ३०७ अंतर्गत खूनाचा प्रयत्न आणि बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसंच ठाणे, पनवेल आणि वाशीपर्यंतच्या सर्व स्थानकांचे सीसीटीव्ही फुटेज मागण्यात आले आहेत. सध्या तरुणी ऑक्सिजन सपोर्टवर असून तिचा वैद्यकीय तपासणी अहवाल अद्याप आलेला नाही. ती शुद्धीत आल्यानंतर पुन्हा तिचा जबाब नोंदवला जाणार आसल्याचे पोलिसांनी सांगितले
.

Categories
मुंबई

नवी मुंबईतील विकास कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

सिडको आणि महापालिकेने समन्वयातून नवी मुंबईचे विकास प्रकल्प वेळेत करावेत- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

विरेंद्र म्हात्रे नवी मुंबई प्रतिनिधी : नवी मुंबईतील विविध विकास कामांचा आढावा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. पाम बिच ट्रॅक, ज्वेल ऑफ नवी मुंबई, गवळ देव वन पर्यटन प्रकल्प, ऐरोलीतील धर्मवीर आनंद दिघे मैदान या सारखे प्रकल्प लवकरात लवकर पुर्ण करुन नागरिकांना त्याचा लाभ द्यावा असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीस नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. राजीव, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर आदी उपस्थित होते. नवी मुंबईतील घनसोली येथे राखीव भुखंडावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्पोर्टस कॉम्प्लेक्स बांधण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. यासंदर्भातील तांत्रिक बाजू पूर्ण करुन नवी मुंबई महापालिकेने सिडकोकडे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. नवी मुंबईला जोडणारा आणि ठाणे-बेलापूर रस्त्याला पर्यायी ठरणारा कोस्टल रोडला जोडणाऱ्या प्रकल्पाच्या कामाबाबत यावेळी चर्चा झाली. संपुर्ण नवी मुंबई विमानतळ आणि इतर शहरांना जोडणारा कोस्टल रोड हा प्रकल्प पूर्ण झाल्यास त्यामुळे वाहतूकीचा ताण कमी होईल, असे नगरविकास मंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले. घनसोली, ऐरोली उर्वरित रस्त्यावर खाडीपुल बांधण्याबाबतच्या प्रकल्पाचा आढावा यावेळी घेण्यात आला. या संदर्भात सिडको आणि नवी मुंबई महापालिका या दोन संस्थांनी समन्वयातून तांत्रिक बाबी पूर्ण कराव्यात असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. हा महत्वाचा प्रकल्प असून प्रलंबित रस्ता पूर्ण झाल्यास नागरिकांना दिलासा मिळेल. सीआरझेड आणि कांदळवन महत्वाचा विषय असून कांदळवन सुरक्षित ठेऊन पुढे जाता येईल अशा पद्धतीने काम करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Design a site like this with WordPress.com
Get started