Categories
लोहा

बुलढाणा अर्बनच्या दिनदर्शिकेचे विमोचन

लोहा, प्रतिनिधी (शिवराज पवार) बुलढाणा अर्बन को. ऑप.क्रेडिट सोसायटी लोहाच्या च्या नुतन वर्ष २०२१ च्या दिनदर्शिकेचे विमोचन लोहा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, लोहा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष तथा भाजपा तालुकाध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत थाटात संपन्न झाले. प्रसंगी विमोचन समारंभास नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी, उपनगराध्यक्ष शरद पवार,माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल, गटनेते करीम शेख,नगरसेवक नबी शेख, नगरसेवक नारायण येलरवाड,नगरसेवक बालाजी शेळके,नगरसेवक भास्कर पा.पवार,नगरसेवक अमोल व्यवहारे,दिनेश मोटे,दत्ता शेटे,आबा पाटील चव्हाण, राजु पाटील बोडके,पत्रकार केशव पवार, बाळासाहेब कतुरे,काशीनाथ शेटे, अल्प ठेव बचत प्रतीनिधी बालाजी ईरमंलवार, यांच्या उपस्थितीत करण्यात आले या वेळी शाखा व्यवस्थापक केशवराव शेटे यांनी सर्वांचे स्वागत करुनआभार मानले.या वेळी शाखेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Categories
लोहा

लोह्यात “दर्पण” दिनानिमित्त दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त पत्रकारांचा सत्कार समारंभ संपन्न

लोहा, प्रतिनिधी(शिवराज पवार)
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजल्या जाणाऱ्या तमाम पत्रकार बांधवांना आज लोहा बसस्थानकात 6 जानेवारी रोजी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकारांचा पुष्पहार,पेन देवून, पेढा भरवून सत्कार करण्यात आला.
पत्रकार दिनानिमित्त लोहा येथे राजर्षी शाहू शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन तथा धावरीचे मुख्याध्यापक बी.वाय.चव्हाण, बहुजन प्रेरक संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष पी.आर. चिखलभोसीकर, प्रताप पाटील चिखलीकर कट्टर समर्थक पारडीचे पॅनल प्रमुख माधव पाटील पवार पार्डीकर, लोकमंगल को-ऑप क्रेडिट सोसायटी शाखा लोहा च्या वतीने केले. ‘दर्पण’ दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या तमाम पत्रकार बांधवांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्याचे सत्कार्य आज घडून आल्याचे प्रेरक संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष पि.आर.चिखलभोसीकर यांनी मत व्यक्त केले.
याप्रसंगी बोलताना माजी चेअरमन चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की 6 जानेवारी 832 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली, दर्पण नावाचे प्रथम वर्तमानपत्र काढून समाजातील सामान्यांना न्याय मिळवून दिला. त्याचबरोबर दैनिक केसरी चे लोकमान्य टिळक,आचार्य प्र.के. अत्रे यांचे मराठा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ‘जनता’ ‘प्रबुद्ध ‘भारत’ ‘मूकनायक’ या वर्तमानपत्रांनी केलेले कार्य यांची प्रेरणा आजच्या पत्रकारांनी घेऊन आपले कार्य करावे, समाजातील विविध प्रश्नावर आपली लेखणी निर्भिडपणे चालवावी असे प्रतिपादन बि.वाय. चव्हाण यांनी केले.

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

लोहा येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार सुरेश जोंधळे, डी एन कांबळे, विनोद महाबळे शिवराज पा.पवार बाळासाहेब बुद्धे, तुकाराम दाढेल सह पत्रकार उपस्थित होते.

याप्रसंगी मराठी पत्रकार संघाचे माजी लोहा तालुकाध्यक्ष साहेबराव सोनकांबळे, विजयकुमार चन्नावार, रत्नाकर महाबळे, शेख अहमद, माजी तालुकाध्यक्ष केशव पा.पवार, बाळासाहेब कतुरे,शेख इमाम लदाफ, विलास सावळे,युनूस शेख, गोविंद पा. कदम,श्याम पा.नळगे, बाळासाहेब बुद्धे प्रवीण महाबळे, संजय रहाटकर,शिवराज पा. पवार, संतोष चेऊलवार आदींसह पत्रकारांची उपस्थिती होती.

Categories
लोहा

जुना लोह्यातील राजेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मावळ्यांनी केले सुशोभीकरण

लोहा तालुका प्रतिनिधी:शिवराज पवार

लोहा:दि.6.”गाव करी ते राव न करी ” याचा प्रत्यय लोहा येथील तरुणांनी दिला.जुना लोहा येथील असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह परिसराचेही सुशोभिकरण करून एक नवा आदर्श निर्माण करून राजेंच्या विचारांचा वारसा जुन्या लोह्यातील मावळ्यांनी पुढे दैदिप्यमान केला आहे.
लोहा शहर हे (जुना लोहासह) मोठ्या लोकवस्तीचे व बाजारपेठेचे,दळणवळणाचे राष्ट्रीय महामार्गावरील एक महत्त्वाचे ठिकाण असून लोहा येथील जुन्या पिढी प्रमाणेच आजची तरूण पिढीही वेगवेगळे नवोपक्रम हाती घेतेय.नाटय, कला, जयंत्यासण- उत्सव इ. साजरे करणे,व त्यातूनच सामाजिक ऐक्याची भावना निर्माण करून त्या- त्या पिढीतील नवयुवक, तरुण समोर येऊन लोहाच काय..? तर,तालुका व जिल्ह्याचेही नेतृत्व करत राजकीय-सामाजिक, सांस्कृतिक,धार्मिक व आर्थिक चित्र बदलून टाकले आहे.
आज या आधुनिक शहराकडे वाटचाल करणाऱ्या लोहा येथील प्रत्येक पिढ्यांनी तालुक्याचे नेतृत्व करण्यासाठी तरुण तयार झाले आहेत.तशी त्यांना वेळोवेळी संधीही चालून आली. तोच आदर्श समोर ठेवूनच सामाजिक समतेचा संदेश रूजवला जातोय.
याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजेच सद्यस्थितीतील जुना लोहा येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाची राबविण्यात आलेली मोहीम ही होय.येथील सर्व तरुण एकत्र येऊन सुशोभीकरणाची कार्य पार पाडले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर चकाचक करून सुशोभीकरणाचे काम पूर्णत्वास नेले.पुतळ्याच्या सभोवताली स्टीलच्या जाळीचे संरक्षक कवच उभारले.यातून भावी पिढीलाही अप्रत्यक्ष संदेशच दिला. गावातील सर्व तरुण मंडळींनी, स्वतः स्वच्छेने एकत्र येऊन , कसलाही कमीपणा वाटू न देता, हेवेदावे न करता सर्वांनी पुढाकार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण केले.व सामाजिक बांधिलकीचा,एकतेचा, समानतेचा,स्वच्छतेचा, पर्यावरणाचा संदेश,एक आदर्श, नवा पायंडा निर्माण केला. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

Categories
लोहा

ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ.वसंत बिरादार यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न


अनेक मान्यवरांसह शिक्षक, नेत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव करून

लोहा, (ता. प्रतिनिधी )
मराठवाडयातील ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक तथा ज्येष्ठ पत्रकार अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील सर यांचा ५४ वा वाढदिवस लोहा येथे साहित्यप्रेमी, नगराध्यक्ष, नगरसेवक, प्राचार्य, प्राध्यापक,शिक्षक संघटनेचे नेते, व पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत साजरा करून त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.
सद्य:स्थितीत अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे किमान साडेतीन दशकापेक्षाही अधिक कालावधी ते लोहा येथील श्री. संत गाडगे महाराज महाविद्यालय लोहा येथे मराठी या विषयाचे अध्यापन केले होते. त्यांनी महाविद्यालयात विद्यार्थी हिताचे विविध उपक्रम राबवले होते. तसेच त्यांच्या लेखणीतून अनेक गरीब पीडित सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला. त्यांची लेखणी सडेतोड व अतिशय धारदार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली. लोकमत मधील लेखणीसह, त्यांचे अन्य वर्तमानपत्रातील लेख हे तर विशेषच होत. लेखणीचे बादशहा म्हणून त्यांच्या कार्याची संबंध महाराष्ट्रभरातून आगळी वेगळी ओळख आहे.
१जानेवारी २१ या रोजी लोहा येथील ‘आविष्कार’ निवासस्थानी अनेक मान्यवरांनी सामाजिक अंतर राखून त्यांचे अभीष्टचिंतन केले.’दै. वतन वाला’ चे कार्यकारी संपादक दत्ताभाऊ शेंबाळे, शेवडी (बा.) येथील सेवा सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष बालाजी तमकुटे, शिक्षक काँग्रेसचे विभागीय उपाध्यक्ष विठूभाऊ चव्हाण, महेंद्र कांबळे, राजर्षी शाहू शिक्षक पतसंस्थेचे माजी चेअरमन तथा धावरीचे मुख्याध्यापक बी.वाय. चव्हाण, अखिल प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शेख मुर्तूज सर ,केंद्रप्रमुख विठ्ठल आचणे, सुनेगावचे केंद्रीय मुख्याध्यापक पंदेलवाड, पर्यवेक्षक बी.वाय.पाटील, दै.रिपब्लिकन गार्डचे कार्यकारी संपादक, सतीश सोणवणे,ज्येष्ठ पत्रकार सुरेश जोंधळे, साहेबराव सोनकांबळे, संजय कहाळेकर, टीकाराम कतूरे, शिवराज पवार, बाळासाहेब बुद्धे आदींनी तसेच नगराध्यक्ष, नगरसेवक, प्राचार्य, प्राध्यापक, आदिनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या व नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

लोहा बसस्थानकात पत्रकारांकडून स्वागत
लोहा बस स्थानकात पत्रकार बांधवांकडून प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांचे अभिष्टचिंतन केले. तरुण भारतचे प्रतिनिधी डी.एन.कांबळे, समीक्षाचे विजयकुमार चन्नावार, पांडुरंग रहाटकर, लोकपत्रचे केशव पवार, टीकाराम कतुरे , संतोष मद्रेवार, गोविंद कोयाडे, परमेश्वर इंगळे, आदींसह पत्रकार व इतर मान्यवरांनी वाढदिवसाच्या व नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

Categories
लोहा

राज्यपाल मा.भगतसिंघ कोश्यारी यांची सिद्धेश्वर मुंडेनी राजभवनात घेतली भेट!


लोहा,प्रतिनिधी(शिवराज पवार)
राजभवन,मुंबई येथे राज्यपाल मा.भगतसिंघ कोश्यारी व महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी २९ डिसेंबर २०२० रोजी भेट घेतली त्यात औरंगाबाद पदवीधर निवडणूकीत झालेली मतपत्रिकांची हेराफेरी,संगणकपरिचालकांना आय टी महामंडळाकडून नियुक्ती देणे,बेरोजगार पदवीधरासाठी पदवीधर महामंडळ स्थापन करणे,विना अनुदानित शिक्षक,जुनी पेन्शन योजना,तासिका तत्वावरील प्राध्यापक,उमेद योजना,कंत्राटी कर्मचारी,शासकीय नौकर भरती करणे यासह अनेक विषयांचे निवेदन देऊन व्यापक व सविस्तर चर्चा केली,झालेल्या चर्चेनुसार राज्यपाल महोदय कारवाई करतील असे सिद्धेश्वर मुंडे म्हणाले.यावेळी शिष्टमंडळात मयूर कांबळे,विजयानंद येडेकर,संग्राम डिकळे व ज्ञानेश्वर सूर्यवंशी उपस्थित होते.
याबाबत सविस्तर वृत्त की,नुकत्याच औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडली,त्यात मतपत्रिकांची हेराफेरी झाल्याचा आक्षेप सिद्धेश्वर मुंडेसह अन्य ५ उमेदवारांनी घेतला होता.त्याबाबतची तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे केली असून या विषयासह इत्तर विषयाचे निवेदन देऊन चर्चा करण्यासाठी राज्यपाल मा.भगतसिंघ कोश्यारी यांच्याकडे वेळ मागितला होता त्यानुसार २९ डिसेंबर २०२० रोजी त्यांनी दिलेल्या वेळेनुसार महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी शिष्टमंडळासोबत राज्यपाल महोदयांची भेट घेतली.त्यात औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात कशा प्रकारे मतपत्रिकांची हेराफेरी केली त्याची लेखी कागदपत्रांच्या पुराव्यानिशी निवेदन देऊन माहिती दिली व मा.राज्य निवडणूक आयोगाला सत्यता पडताळण्याचे आदेश देण्याची विनंती केली. त्याचबरोबर संग्राम व आपले सरकार प्रकल्पात मागील १० वर्षापासून काम करणार्‍या संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळात घेण्याचे आश्वासन राज्य सरकारने देऊन सुद्धा किमान वेतन व कर्मचारी दर्जा दिला नाही,त्याबाबत राज्य शासनाला आदेश द्यावेत तसेच आपले सरकार प्रकल्पात csc –spv या कंपनीने कोट्यावधींचा भ्रष्टाचार केला असून त्या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली.
या प्रश्नाबरोबर राज्यातील सुमारे ४०००० विनाअनुदानित शिक्षकांना प्रचलित नियमांनुसार १३ सप्टेंबर २०१९ च्या शासन निर्णयानुसार १ एप्रिल २०१९ पासून अनुदान देणे,अघोषित शाळांना घोषित करणे महत्वाचे असून अनेक विनाअनुदानित शाळेच्या शिक्षकांनी आत्महत्या केल्याची बाब राज्यपाल महोद्यांच्या निदर्शनास आणली व याबाबत तातडीने निर्णय घेण्याबाबत राज्य शासनाला आदेश देण्याची मागणी केली.त्याचबरोबर राज्यात तासिका तत्वावरील सुमारे ३५००० प्राध्यापक असून त्यांना कोरोना काळापासून नियुक्ती देण्यात आलेली नाही तसेच इत्तर राज्यात ११ महिन्याच्या मानधन तत्वावर त्यांची नियुक्ती असून आपले राज्य सधन असताना असा अन्याय का यासह २००५ नंतर नियुक्ती देण्यात आलेल्या राज्यातील शिक्षक,प्राध्यापक,शासकीय कर्मचारी व अधिकारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे,कंत्राटी व उमेद कर्मचारी यांची नियुक्ती csc –spv कंपनी सारख्या बाहय यंत्रणे कडून न करणे,राज्यात अनेक वर्षापासून शासकीय नौकर भरती केली नसून बेरोजगार पदवीधर/पदविका धारक यांना दिलासा देण्यासाठी नौकर भरती करणे यासह सर्व विषयांचे निवेदन दिले व राज्य शासनाला आदेश देण्याची मागणी केली.

पदवीधरांसाठी पदवीधर महामंडळ स्थापन करण्याची मागणी

राज्यात सुमारे २ कोटीच्या वर बेरोजगार पदवीधर असून बेरोजगार पदवीधर/पदविकाधारकां साठी एकीकडे शासकीय नौकर भरती नाही तर दुसरीकडे राज्य शासनाची कुठलीही योजना नाही,तसेच कुठला उद्योग–व्यवसाय नाही.पदवीधराना शासनाचा कोणत्याही प्रकारचा आधार नाही म्हणून राज्यातील अनेक युवक – युवतींनी वैतागून आत्महत्या केल्या आहेत.पदवीधर म्हणजे या राज्याचे व देशाचे उद्याचे भविष्य आहे आणि कुटुंबातील तरुण व्यक्ती निराशेपोटी जीवन संपवत असतील तर राज्य शासन गप्प का? त्यासाठी राज्य शासनाने पदवीधरांच्या विकासासाठी पदवीधर महामंडळाची स्थापना करावी व त्या अंतर्गत राज्यातील पदवीधरांच्या विकासासाठी व्यापक योजना आखून पदवीधराना सक्षम बाववावे,यासाठी राज्य शासनाला मा.राज्यपाल महोदयांनी निर्देश द्यावेत अशी मागणी प्रत्यक्ष निवेदन देऊन सिद्धेश्वर मुंडे यांनी केली आहे.यावेळी शिष्टमंडळात मयूर कांबळे,विजयानंद येडेकर,संग्राम डिकळे व ज्ञानेश्वर सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

Categories
लोहा

लोहा तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतीकरिता १५२८ अर्ज दाखल; रायवाडी,अंतेश्वर, भारसावडा,सोनमांजरी ग्रामपंचायत बिनविरोध!

लोहा, प्रतिनिधी (शिवराज पवार)
तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतीच्या ७७४ जागेची निवडणुक रनधुमाळी सुरु झाली असून या जागेसाठी १५ जानेवारीला मतदान आहे. या दिवशी १ लाख ७३ हजार महिला व पुरुष मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ग्रामपंचायतीच्या संरपचपदाचे आरक्षण निवडणुक पुर्वी जाहिर झाले होते पण शासनाच्या आदेशामुळे संर्पुण आरक्षण रद्द ठरवुन पुन्हा निकालानंतर नव्याने ते जाहीर करण्यात येणार असल्याचे जाहिर केले आहे त्यामुळे संरपंच पदाचे डोहाळे लागलेल्याचा उत्साह थंडावला आहे. निवडणुक लढवुन सरपंच होणाऱ्या सदस्याला शिक्षणाची आट लागु असा आदेश प्राप्त होताच निवडणुकिच्या रंगात भंग झाला या पुर्वी आरक्षण जाहिर झाल्याने अनेक जेष्ठाना उसने अवसान देऊन निवडणुकिच्या फडात आणले होते पुन्हा जेष्ठाचा हिरमोड झाला. १९९४ च्या पुर्वीचा जन्म असेल त्याला शिक्षणाची आट लागु नाही पुन्हा शिथीलता असल्याने पुन्हा शिक्षणाच्या कागदपञाची किट किट नको म्हणुन पुन्हा आंगठे बहारदाराना भाव आला पॅनल प्रमुखावर जेष्ठाला शोधन्याची वेळ आली या पुर्वी निवडणुकीत शक्ती प्रदर्शन करुन उमेदवारी अर्ज सादर करण्यात येत होता पण ऑनलाईन अर्जाची पोच पावती देण्यासाठीच उमेदवाराला तहसिल कार्यालयात घेवून येत आहेत .अर्ज सादर करण्याचा एकच दिवस अवधी राहिला असुन या पुर्वीच्या दिवसात एकुन ८४४ अर्ज दाखल केले आहेत या पुर्वी सहा अर्ज सादर केले होते. आता पर्यंत तहसिल कार्यालयात निवडणुक विभागाला ऑनलाईन करण्यासाठी ८४४ निवडणुक विभागात अर्ज दाखल व शेवटीच्या दिवशी ७८४ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती मिळाली आहे.लोहा तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतची निवडणुक प्रक्रिया सुरू झाली असून २८ टेबलवरुन एकूण १५२८ अर्ज दाखल झाले आहेत या निवडणुकिसाठी शनिवारी पहिले निवडणुक प्रशिक्षण झाले त्यात अनेक परिक्षिणार्थी अनुपस्थीत होते यावर तहसिलदार तथा निवडणुक निर्णय अधिकारी विठ्ठल परळीकर काय कारवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुकिसाठी नायब तहसीलदार राम बोरगावकर,अशोक मोकले,नायब तहसिलदार देवराये,प्रशांत गायकवाड,पेशकार प्रमोद बडवणे, आपशेटे,पांचाळ
निवडणुक विभागांचे टि.के.मुंगरे आदी परिश्रम घेत आहेत.

Categories
लोहा

लोह्यात गॅस सिलेंडर लिकेज होऊन आगीचा भडका,जीवितहानी नाही;

लोहा, ता.प्रतिनिधी(शिवराज पवार)
लोहा शहरातील देऊळ गल्ली भागातील रहिवासी नंदकुमार श्रीराम भोसकर यांच्या घरातील घरगुती वापराचे नवे भरलेले गॅस सिलेंडर दिनांक 30 12 2020 रोजी बुधवारी लिकेज होऊन आगीचा भडका उडाला आग एवढी प्रचंड होती की त्यामध्ये घरातील सर्व संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या त्यामध्ये अन्नधान्य कपडे कपाट दागदागिने व इतर साहित्याचा समावेश आहे हे सर्व काही क्षणातच जळून खाक झाली आगीचे रुप पाहता तात्काळ नगरपालिका लोहा येथील अग्निशमन गाडीला पाचारण करण्यात आले व गाडी आल्यानंतर अथक परिश्रमानंतर आग नियंत्रणात आली या आगीमध्ये हे जवळपास सर्व संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाले असून यात जवळपास दोन लाख रुपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे सदरील आग विझवण्यासाठी लोहा नगरपालिकेच्या अग्निशामन दलाला दीड ते दोन तास परिश्रम घ्यावे लागले यावेळी नगरसेवक अमोल व्यवहारे ,स्वप्नील दमकोंडवार, नबी शेख, लोहा नपचे अधीक्षक उल्हास राठोड, भूषण मनोज कवटीकवार, आग्निशमन गाडीचे चालक संग्राम नागरगोजे अग्निशमन कर्मचारी बालाजी मंजलवार, चांदु राजकौर, विष्णू भिसे आदींनी आग विझविण्यासाठी परिश्रम घेतले.

Categories
नांदेड लोहा

विस्तार अधिकारी रामकृष्ण पांडे:बाल विकास कार्यात विशेष योगदान

लोहा येथील बाल विकास प्रकल्प कार्यालयातील विस्तार अधिकारी सांख्यिकी रामकृष्ण पांडे यांनी आपल्या कार्यकाळात बालविकास कार्यालयामार्फत शासनाच्या विविध योजनांचा उत्कृष्ट प्रसार-प्रचार केल्यामुळे त्यांना शासनाच्या वतीने विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आज वयोमानानुसार विस्ताराधिकारी पांडे हे शासकीय सेवेतून 31 डिसेंबर 2020 रोजी सेवानिवृत्त होत आहेत एक शिस्तप्रिय सामाजिक प्रशासकीय कार्यातील उच्चशिक्षित अभ्यासू पांडे साहेब यांच्या कार्याबाबत सेवानिवृत्तीनिमित्त घेतलेला आढावा.

राम कृष्ण अंबादासराव पांडे हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर तालुक्यातील धोत्रा या गावचे त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला अत्यंत शिस्तप्रिय कठीण प्रसंगात मार्ग काढणे, संयमी दुसऱ्यांना मार्गदर्शन करण्यास सतत कार्य हे गुण त्यांच्या अंगी आई-वडिलांकडून लहानपणी त्यांना संस्काराचे बाळकडू मिळत गेले पोत्रा या गावातील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेत त्यांचे पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण झाले. त्यांचे वडील अंबादास राव हे शेतकरी असले तरी त्यांना शिक्षणाची प्रचंड आवड असल्याने व गावात पुढील शिक्षणाची सोय नसल्याने नांदेडला शिक्षण घेण्याचे ठरले. आठवी ते बारावी चे शिक्षण प्रतिभा निकेतन हायस्कूल व महाविद्यालय नांदेड येथे झालेले बहिण-भाऊ रूम करून राहत असत.
B.Sc. नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, नांदेड येथे झाले. B.Sc. चे विषय Physics, Mathematics and Stat. असे होते. M.Sc. Stat, चे शिक्षण मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे पूर्ण झाले. शिक्षण घेत असताना त्यांना खुप संघर्ष करावा लागला. अत्यंत संघर्षमय परिस्थिती सोम्यपणे, आनंदाने, हसतखेळत, तकार न करता त्यांनी उत्तम वाटचाल केली. ‘कमवा व शिका या योजनेतून काम करुन त्यांनी M.Sc. चे शिक्षण औरंगाबाद येथे पूर्ण केले. त्यांचा मुळ स्वभाव संयमी, न्यायप्रिय, परिश्रमी व शांतताप्रिय आहे. गरीबीची जान असणारा आहे.

शासकीय सेवेस प्रारंभ

4 में 1987 रोजी DRDA (जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा) नांदेड येथे विस्तार अधिकारी म्हणून शिरो बजेटच्या कालावधीत नौकरी लागलो. तेव्हा कुटुंबातील सर्वांना आनंद झाला. आई वडीलांना तर खुपच आनंद झाला. सरकारी नोकरी मिळाल्याचा आनंद काही वेगळाच असतो. या आनंदा बरोबरच त्यांना कामाची जबाबदारी समजत गेली. आणि अतिशय उत्साहात व संयमाने ऑफीस जबाबदारी पार पाडली. ते आपल्या कामात उत्साह वाढवत होते व त्याच बरोबर आत्मविश्वास वाढत होता.

नौकरीमध्ये कामाची जबाबदारी

विस्तार अधिकारी पांडे यांनी आपले कार्य चोखपणे पार पाडले. नांदेड मध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा या ऑफिसमध्ये असताना ऍडव्हान्स इन्क्रिमेंट मिळाले नेहमी ऑफिस कामासाठी दोरा करत दिल्ली मुंबईला ऑफिस कामानिमित्त जात असत.

प्रवासाची खूप आवड आहे कुटुंबांना समवेत प्रवास करण्याची खूपच आवड आहे जवळपास भारतातील पन्नास टक्के भाग बघून झाला आहे जम्मू काश्मीर, अमरनाथ, दिल्ली, म्हैसूर, बेंगलोर, कर्नाटक, गुजरात, अष्टविनायक, श्रीवर्धन ,हरिहरेश्वर, मंजूर ,जंजिरा ,गणपतीपुळे अशा अनेक प्रेक्षणीय ठिकाणे विस्ताराधिकारी पांडे यांनी पाहिली आहेत यातून त्यांनी पर्यटनाचा अभ्यास केला आहे.

उत्कृष्ट कार्याचा गौरव सत्कार

DRDA नांदेड येथून मुखेड येथे तांत्रिक बाबींमुळे बदली झाली येथील कार्यक्रम फक्त अठरा दिवस होते परत त्यांची बदली DRDA झाली. या ठिकाणी आपल्या कार्याचा वेगळा ठसा दाखवून कार्य केले. या कार्याची दखल घेऊन स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजना 2002 ते 2004 उत्कृष्ट अंमलबजावणी केल्यावर येथील पुरस्कार मिळाल व भव्य कोणत्या श्रेणीत आहे त्याविषयी वजन किती व त्यांच्या वयानुसार वजन किती असाव्यात पाहिजे याची माहिती बालका घरातील प्रत्येक व्यक्तीला होण्यासाठी बालकांचे “वज व सनियंत्रण” कार्ड केले त्यांची अंमलबजावणी केली याबाबत त्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी व सभापती व सर्व समिती सदस्य यांनी कौतुक करून हे कार्ड संपूर्ण जिल्ह्यात लागू केले. घेतली होती या विशेष कार्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली हे उल्लेखनीय कार्य त्यांच्या काळात घडले आहे.

2014 ते 2019 साडेपाच वर्ष अतिरिक्त बाल विकास प्रकल्प अधिकारी श्री डीपी म्हणून कार्यभार संभाळला या पदावर असताना पदाचे कर्तव्य व हक्क चोखपणे सांभाळून सर्वांना न्याय मिळवून दिला याचं काळात अतिशय उत्तम कार्यभार सांभाळून उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अनेक पुरस्कार मिळाले व सन्मान देऊन सत्कार केला व प्रशस्तीपत्र मिळाले.

शौचालय स्वच्छ भारत मिशन अंतर्गत काम केले पाणी फाऊंडेशनचे काम केले याबद्दल तत्कालीन आमदार श्री चिखलीकर साहेब यांच्या हस्ते सत्कार करून पांडे साहेब यांचा गौरव करण्यात आला.

दरवर्षी माळेगाव यात्रा येथील उत्कृष्ट नियोजन व आयोजन करण्यात त्यांचा हातखंडा होता ग्रामीण भागातील जनतेपर्यंत बाल विकास योजना पोचविण्याचे कार्य दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रे मधून त्यांनी केले विविध पोस्टर्स बॅनर कुपोषणमुक्त बालक महिला सशक्तिकरण यासह अनेक योजना या यात्रेतून त्यांनी प्रसार आणि प्रचार करून ग्रामीण भागापर्यंत पोहोचून बाल विकास विभागाचे विशेष कार्य केले आहे.

डीआयडी या ऑफिसमध्ये पुन्हा 2006 पर्यंत उत्कृष्ट काम केल्याबद्दल दोन आडवास इन्क्रिमेंट मिळाले.

2007 ते 2020 पर्यंत लोह्यात उत्कृष्ट कार्य

आयसीडीएस लोहा या ऑफिसमध्ये काम करताना अंगणवाडी कामकाज पाहणी दौरा करणे कर्मचार्‍यांच्या अडचणी पार त्यांना व्यवस्थित समजावून सांगणे नवीन योजनांची अंमलबजावणी करणे नवीन कल्पना व कामाचे स्वरूप कर्मचाऱ्यांना सांगून कार्य पार पाडत असत.

  • वैवाहिक जीवन आणि यशस्वी कुटुंब*

दिनांक 26/6/1992 रोजी सौ.अनिता राजाभाऊ बर्दापूरकर यांच्याशी विवाह संपन्न झाला. प्रा. रत्नाकर राजाभाऊ बर्दापूरकर अंबाजोगाई ची सासरवाडी आहे. त्यांची पत्नी खोलेश्वर महाविद्यालय अंबाजोगाई येथे प्राध्यापक म्हणून कार्य करत आहे व्यवहारिक जीवनात अतिशय आनंदात पार पाडत असताना त्यांना कौटुंबिक जबाबदारीची जाणीव आहे आई-वडील थकलेले आहेत बहीण-भावंडांची शैक्षणिक जबाबदारी व भावी आयुष्याची जबाबदारी त्यांच्यावर होती त्यांना एकूण पाच बहिणी व दोन भाऊ आहेत.

कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे व पत्नीला नोकरीची व शिक्षणाची खूप आवड असल्यामुळे अंबाजोगाई खोलेश्वर महाविद्यालयात आजही नोकरी करताहेत श्रीरामकृष्ण पांडे येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला समर्थपणे तोंड देता सुयोग्य पणे उत्तर देतात व त्यातून मार्ग काढतात ही त्यांची नैसर्गिक प्रवृत्ती आहे.

त्यांना दोन मुले आहेत चि.ओमकार राम कृष्ण आज अमेरिकेत मध्ये California State मध्ये San Diego येथे सॉफ्टवेअर इंजिनियर या पोस्टवर कार्यरत आहे.VIT college pune येथून B.E केले व CALIFORNIA STATE मध्ये M.S करून सध्या तेथेच नोकरी करत आहे.

चि. ऋषिकेश राम कृष्ण पोत्रेकर भारती विद्यापीठ पुणे येथून बीएफ 2020 सालि First class with Distinction उत्तम रीतीने पास झाला आहे पुढील उच्च शिक्षण घेणार आहे.

कुपोषण मुक्तीसाठी आरोग्य तपासणी शिबिर ठेवून प्रत्येक बालक सुदृढ झाला पाहिजे, हसता खेळता बालक झाला पाहिजे असे वाटत असे पालकांची डॉक्टरांच्या मदतीने तपासणी करून कुपोषित बालकांची व्हीसीडीसी घेऊन त्यांना शोषणातून मुक्त करण्यासाठी सतत त्यांनी प्रयत्न केले. 2012 साली नांदेड विभागात उत्कृष्ट कामाची अंमलबजावणी केल्याबद्दल यशोदामाता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अंगणवाडी सेविकांच्या वैयक्तिक पत्रिका तयार करणे त्यांना सन्मानाने वागणूक दिली. विस्तार अधिकारी पंडित सरांचे कार्य उल्लेखनीय असून त्यांचा प्रशासनात वेगळा कार्याचा ठसा त्यांनी उमटविला होता. आपले कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यामध्ये हे योगदान दिले प्रशासनातील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहण्यात येते.आज ते वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत भावी आयुष्य त्यांना सुख समृद्धी भरभराटीचे जावो.

सुर सुर चैतन्याचा

रोम रोम झाले…….

अशा आनंदी विभूतिसाठी सेवानिवृत्ती

हो केवळ तांत्रिक बाब ठरते.

कारण सतत आवरत कार्यरत……

अशा उत्साह व चैतन्याचा

निर झारा श्री राम कृष्ण पांडे

साहेबराव सोनकांबळे
पत्रकार,ता.लोहा जि.नांदेड
मो.9921893325, 9421933606

Categories
नांदेड लोहा

ए.बा.वि. प्रकल्पचे विस्ताराधिकारी राधाकृष्ण पांडे आज ३१ रोजी सेवानिवृत्त

लोहा,प्रतिनिधी (शिवराज पवार)
एकात्मिक बाल विकास सेवा योजना केंद्र लोहा येथील सांख्यिकी विस्ताराधिकारी तथा माजी प्रभारी बाल विकास अधिकारी राधाकृष्ण पांडे हे लोहा कार्यालयातुन आज ३१ डिसेंबर 2020 रोजी सेवेतून वयाच्या ५८ व्या वर्षी सेवा निवृत्त होणार आहेत.
त्यांच्या कारकिर्दीत प्रभारी राज मध्ये कुपोषण मुक्तीसाठीचे काम चांगल्याप्रकारे हाताळलेले आहे.लोहा तालुक्याला पारितोषिकाचा मानही मिळवून दिला.आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला.अनेक कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस यांना त्यांनी कधी कटू तर कधी रागाने तर कधी समजावून सांगून तर कधी पर्यवेक्षकेच्या मार्फत नोटीसा पाठवून कामे करून घेतली.तर यांना आज रोजी कार्यालयाच्या वतीने सेवानिवृत्ती घ्या शुभेच्छा देणार आहेत.

Categories
लोहा

अखेर लोह्यातील छ्त्रपती शिवाजी महाराज चौक लख्ख प्रकाशाने उजळला!

लोहा, प्रतिनिधी ( शिवराज पवार)
दि.28,लोहा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे खूप दिवसापासून बंद पडलेल्या हायमॅक्सचे काम नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी, उपनगराध्यक्ष तथा भाजपा लोहा तालुकाध्यक्ष शरद पा.पवार,नगरसेवक दत्ता वाले,जिवन चव्हाण वार्डातील अन्य सदस्यांच्या पुढाकाराने आज दि.28.12.2020 रोजी सायंकाळी साडे सात वाजता लोहा न.प.चे माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार,माजी उपनगराध्यक्ष केशवराव चव्हाण,नगरसेवक दत्ता वाले, दिनेश तेललवार, हरिभाऊ चव्हाण, प्रदिप निलावार आदींच्या उपस्थितीत अखेर काम पूर्ण झाले.
लोहा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक स्थित हायमॅक्स लाईट अनेक दिवसांपासून बंद पडला होता.त्यामुळे लोहा शहरातील मुख्य चौकात अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले होते.त्यातच पुर्णवेळ मुख्याधिकारी गंगाधर पेंटे नियुक्ती झाल्यावर त्यांनी लोहा वासियांना सर्वांच्या सहकार्याने आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली.लोह्यातील मुख्य चौकातचअंधाराचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे लोहा शहरातील मुख्य ठिकाणी रात्रीच्या वेळी महिला,वृद्ध,प्रवासी वर्ग,घावूक किरकोळ व्यापारी,छोटे मोठे व्यावसायिक यांच्यात अंधाराच्या साम्राज्यामुळे भीतीचे वातावरण पसरले होते.अनेकांच्या पुढाकारानेआज अखेर लोहा शहरातील छ्त्रपती शिवाजी महाराज चौकस्थित बंद पडलेले हायमॅक्स पुन्हा पुर्ववत चालू करण्यात आले.अंधाराचे साम्राज्य नाहीसे होवुन छ्त्रपती शिवाजी महाराज चौक पुन्हा लख्ख प्रकाशाने उजळून निघाला.
यावेळी लोहा न.प.चे माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार,माजी उपनगराध्यक्ष केशवराव चव्हाण,नगरसेवक दत्ता वाले, हरिभाऊ चव्हाण,दिनेश तेललवार, प्रदिप निलावार आदींसह बहुसंख्य उपस्थिती होती.

Categories
लोहा

बचत गटांच्या, SBIग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून, महिला चळवळीला गती देणाऱ्या : सविता सातेगावे

लोहा, प्रतिनिधी(शिवराज पवार)
भाजपा महिला मोर्चाच्या विद्यमान लोहा तालुका अध्यक्षा तथा बचत गटाच्या चळवळीला गती देणाऱ्या सविता सातेगावे या कर्तुत्ववान महिलेने धाडसी कामगीरी करून सर्व सामान्य माणसाला जणू आधारच दिला.
लोहा स्थित स्वतः चालवत असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून बचत खाते,प्रधानमंत्री जनधन योजनेचे खाते,प्रधान मंत्री बिमा योजना,अटल पेन्शन योजना,बचत गटांचे सक्षमीकरण करणे,तसेच कोरोना काळातही राबणाऱ्या सक्षमपणे आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस, पत्रकारांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सुद्धा गौरव करुन जणू त्यांच्या पाठीवर थाप दिली.
तळागाळापर्यंत पोहोचून कोरोना कालावधीत मास्क,सैनीटायजर वाटप, करण्याचे कार्य करून भल्याभल्यांना लाजवले. कोरोना कालावधीमध्ये एकीकडे बँकेत गर्दी होऊ नये म्हणून ग्राहकांना आत येण्यास परवानगी दिली नव्हती. बँकेचे व्यवहार हे खिडकीतून होताना दिसून आले. तशाही परिस्थितीमध्ये समाजाचे काही देणे लागते या भावनेतून ग्राहकांना आपल्या ग्राहक सेवा केंद्रातून कोरोनाच्या नियमांचे,अटींचे पालन करून, स्वतः चालवत असलेल्या SBI च्या ग्राहक सेवा केंद्रातून भाजपा महिला मोर्चाच्या सक्षम लोहा तालुका अध्यक्षा सविता सातेगावे यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून खंबीरपणे कोणतीही कामात कसूर न करता लोकांची सेवा केली.
नाबार्ड पुरस्कृत योजना, केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून बचत गटांना कर्ज काढून देवून महिला सक्षमीकरणाचे पाऊल उचलले. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना छोटे मोठे उद्योग उभारून देवून तालुक्यातील महिलांना स्वतःच्याच पायावर उभे राहण्यासाठी त्यांना प्रेरणा देऊन स्वयंस्फूर्तीने बचत गट चळवळीत आणण्याचे महान कार्य करतांना सुद्धा स्वतः सविता नागलगावे ४२ व्या वर्षात पदार्पण करतांना सुद्धा त्या डगमगल्या नाहीत. जणू सर्वसामान्यांच्या कुटुंबांना आधार देण्याचे पुण्य कर्म करण्याचे भाग्य त्यांना लाभले. त्यांना लोहा तालुक्यातील ग्रामीण भागातील महिलांसहित शहरातील महिलांनी सुद्धा वेळोवेळी त्यांच्या हाकेला ओ दिला. या नेतृत्वान, कर्तृत्ववान महिलेचा अनेक वेळा गौरवही केला गेला.

Categories
लोहा

आंबेसांगवी जवळ कारच्या धडकेने दुचाकीस्वार गंभीर जखमी; सोनखेड पोलिसात गुन्हा दाखल

लोहा, प्रतिनिधी (शिवराज पवार)
‌‌लोहा तालुक्यातील आंबेसांगवी जवळ भरधाव वेगातील कार चालकाने दुचाकीस्वारास पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील तीस वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी सोनखेड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोहा तालुक्यातील आंबेसांगवी जवळ भरधाव वेगातील कार MH22 3444 च्या चालकाने आपल्या ताब्यातील कार हयगय व निष्काळजीपणाने भरधाव वेगाने चालवून मोटरसायकल क्र.MH26 4817 पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामध्ये सुलेमान अब्दुल्ला चाऊस वय 30 वर्षे, व्यवसाय, व्यापार राहणार चौफाळा नांदेड त्यांना गंभीर जखमी केले या अपघातात त्यांचा उजवा पाय फॅक्चर झाला याप्रकरणी सुलेमान अब्दुल्ला चाऊस यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन सोनखेड येथे गुरंन 146 /2020 कलम 279, 237,338 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पो.हे.कॉ.हंबर्डे हे करीत आहेत.

Categories
लोहा

लोहा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुक प्रक्रिया काळजीपूर्वक पार पडावी -तहसीलदार विठ्ठल परळीकर


———————————
लोहा, प्रतिनिधी ( शिवराज पवार)
लोहा तालुक्यातील ८४ ग्रामपंचायत साठी निवडणूक होत असून ही निवडणूक स्थानिक पातळीवर उत्साहात होत असतात त्यामुळे मतदान अधिकारी कर्मचारी यांनी अंत्यत काळजीपूर्वक ही प्रक्रिया पार पाडावी येणाऱ्या समस्यांचे वेळोवेळी निराकरण केले जाईल सर्वांनी ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत पूर्ण करावी असे मार्गदर्शन तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी केले आहे
लोहा तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे त्यासाठी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात कर्मचाऱ्यांचे पाहिले प्रशिक्षण २६ रोजी पार पडले. तहसीलदार विठ्ठल परळीकर नायब तहसीलदार राम बोरगावकर यांनी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले यावेळी निवडणूक नायब तहसीलदार देवराये, नायब तहसीलदार अशोक मोकले, निवडणूक विभागाचे प्रमुख तिरुपती मुंगरे, अव्वल कारकून बडवणे, संगणक तज्ज्ञ गिरी, प्रशांत अपशेट्टे, सूर्यकांत पांचाळ तसेच तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी यांनी या प्रशिक्षणासाठी परिश्रम घेतले.
तहसीलदार परळीकर यांनी ८४ ग्रामपंचायत विषयी सविस्तर माहिती ही स्थानिक पातळीवरची निवडणूक आहे लोकसभा, विधानसभा निवडणुकी यापेक्षा काळजीपूर्वक व गावात अटीतटीच्या होत असते एक प्रभाग म्हणजे एक मतदार संघ असते त्यामुळे मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी गंभीर्याने प्रक्रिया पूर्ण करावी जेणेकरून कोणताही वाद आपल्या चुकीमुळे होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच मतदान केंद्र अधिकारी व त्यांचे सहकारी यांनी कोणत्या जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या आहेत हे संगीतले.नायब तहसीलदार राम बोरगावकर यांनी ही मार्गदर्शन केली
● प्रशिक्षण पूर्वी कर्मचाऱ्यांची तपासणी●
————————
ग्रामपंचायत साठीच्या पहिले प्रशिक्षण शनिवारी तहसील कार्यालयात सकाळी अकरा वाजता सुरू झाले त्या करीता प्रशिक्षणासाठी येणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांची थर्मर स्कॅनिंग , तसेच ऑक्सि मीटर ,व सॅनेटायझर यांचा वापर करण्यात आला .त्यानंतर प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र टेबल ठेवण्यात आले होते त्यामुळे शिस्त पळून नियोजनबद्ध हे प्रशिक्षण तहसीलदार विठ्ठल परळीकर व टिमने पार पडले

Design a site like this with WordPress.com
Get started