Categories
कागल कोल्हापूर

कागल मध्ये मोफत महिला आरोग्य मेळावा संपन्न.


खास महिलांसाठी वाण आरोग्याचं मोफत तपासणी केली गेली. महिला राष्ट्रवादी काँग्रेस,कागल नगरपरिषद व राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेवेच्या वतीने आयोजित.


कागल/प्रतिनिधी◆गोरख कांबळे.
ग्रामविकास मंत्री नाम. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा सौ. शितल फराकटे, डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. हरीश पाटील, नगराध्यक्षा सौ माणिक माळी,आरोग्य सभापती शोभा लाड, महिला बालकल्याण सभापती नूतन गाडेकर, नगरसेविका माधवी मोरबाळे, कागल शहर महिला अध्यक्ष पद्मजा भालबर, सुषमा पाटील आदी उपस्थित होते.
कागल ग्रामीण रुग्णालतील डॉ.सुनिता पाटील, डॉ. घेवडे, डॉ सादिलगे, डॉ मगदूम, डॉ संदीप पाटील, डॉ गीता पिलाई, डॉ जयंता पाटील, डॉ. नीलिमा पाटील, डॉ सुनिता पाटील, डॉ शैलेश पाटील,डॉ पुनम पाटील यांनी रुग्णांची तपासणी केली.
या शिबिरामध्ये हृदयरोग, मधुमेह, अस्थीरोग, स्त्रीरोग, नेत्ररोग, दंतरोग, हाडाचे रोग व इतर सर्व रोगांवरील तपासणी करण्यात आली व गरजू रुग्णांची मोफत ब्लड टेस्ट घेऊन औषधे वाटप करण्यात आली. कागल व परिसरातील 380 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.

Categories
कागल कोल्हापूर

भारती कांबळे यांनी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून ज्ञानदानाचे काम प्रामाणिकपणे केले: सुवर्णा सावंत यांचे प्रतिपादन.


कागल/प्रतिनिधी◆गोरख कांबळे.
भारती कांबळे यांनी विध्यार्थी केंद्रबिंदू मानून ज्ञानदानाचे काम प्रामाणिकपणे केल्याचे प्रतिपादन एस.एस.सी बोर्डाच्या सहसचिव सुवर्णा सावंत यांनी केले.त्याव्हन्नूर (ता.कागल)येथील श्री. दौलतराव निकम माध्यमिक विद्यालयातील सहाय्यक शिक्षिका सौ.भारती कांबळे यांच्या सेवानिवृत्ती प्रसंगी बोलत होत्या.अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्षा श्रीमती.सुनंदा निकम होत्या.सौ.सावंत पुढे म्हणाल्या, प्रतिकूल परिस्थितीमध्ये भारती कांबळे यांनी आपल्या प्रभावी व उत्कृष्ट अध्यापनाद्वारे आदर्श विद्यार्थी निर्माण केले.
कागल तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस.टी.चौगुले म्हणाले,भारती कांबळे यांनी महिलाशिक्षकांसाठी आदर्शवत काम करून समूहगीत व गीतगायन प्रकारात प्रशंसनीय काम केले आहे.
यावेळी मनोज जिरगे,कांबळे सर,माजी विद्यार्थीनी रोहिणी पाटील,कृष्णाबाई पाटोळे, समृद्धी पाटील तर प्रशालेच्या विद्यार्थिनी समृद्धी निकम,अमृता पोवार यांनी आपली मनोगते व्यक्त केली.प्रशालेच्या वतीने सौ.कांबळे यांना मानपत्र देण्यात आले.
यावेळी गावातील विविध संस्था,ग्रामपंचायत,माजी विद्यार्थी,नातेवाईक, यांच्याकडून त्यांचा सत्कार करण्यात आला व कांबळे यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दौलतराव निकम यांचा आदर्श मानून आपण काम करत असल्याचे सांगून शेवटच्या श्वासापर्यंत या शाळेच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील राहू असे सांगितले.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक व्ही.जी.पोवार यांनी केले.सूत्रसंचालन एम.जी.मोरे यांनी केले तर आभार बी.बी खाडे यांनी मानले.

Categories
कागल कोल्हापूर

जीवनात आई व गुरु हेच आपले मार्गदर्शक- शिक्षक नेते दादासाहेब लाड


बाळ डेळेकर व जे .डी.पाटील यांचा सत्कार संपन्न
कोल्हापूर- सुभाष भोसले
जीवनाला आकार देणारे शिक्षक, आई-वडील हेच आपले खरे मार्गदर्शक असतात ,त्यांचा आपण आदर, सन्मान राखला पाहिजे असे प्रतिपादन शिक्षक नेते श्री दादासाहेब लाड यांनी केले ते श्री शाहू हायस्कूल,ज्युनियर कॉलेज कागल येथे आयोजित सत्कार समारंभात बोलत होते. शिक्षण प्रसारक मंडळाच्या कौन्सिल सदस्य पदी निवड झाल्याबद्दल बाळ डेळेकर यांचा तर महाराष्ट्र मुख्याध्यापक संघाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल प्राचार्य जे .डी.पाटील यांचा सत्कार शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या हस्ते करण्यात आला.माझ्या वाटचालीत शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी जयकुमार देसाईसो, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, युवा नेते व पेट्रन सदस्य दौलतराव देसाईसो, प्रशासन अधिकारी मंजिरी मोरे -देसाईसो ,शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच शिक्षक नेते दादासाहेब लाड यांचेही योगदान मोलाचे आहे असे प्रतिपादन शाहू हायस्कूलचे उपमुख्याध्यापक व कोजिमाशिचे नूतन चेअरमन बाळ डेळेकर यांनी केले.माझा सन्मान हा माझ्या प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांचा सन्मान आहे असे प्रतिपादन प्राचार्य जे.डी.पाटील यांनी केले यावेळी उपप्राचार्य बी .के. मडिवाळ,पर्यवेक्षिका सौ एस. ए .कुलकर्णी , श्री एस जी पाटील, श्री एस यु देशमुख ,एस आर पोतदार,के एच भोकरे, टी सी सुतार,सर्व शिक्षक- शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते सूत्रसंचालन के. आय. जमादार तर आभार पर्यवेक्षिका सौ .एस. ए .कुलकर्णी यांनी मानले.

Categories
कागल कोल्हापूर

कागल येथे विभागीय व्हॉलीबॉल निवड चाचणी संपन्न


कोल्हापूर- सुभाष भोसले
कागल मधील शाहू हायस्कूल मौदानात १६ वर्षाखालील मुलांची विभागीय व्हॉलीबॉल निवड चाचणी संपन्न झाली.सदर संघ पन्हाळा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सब ज्युनियर अजिंक्य स्पर्धेसाठी खेळणार आहे. या निवडी प्रसंगी महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव बाळासाहेब सुर्यवंशी,माजी उपनगराध्यक्ष नितीन दिंडे, राष्ट्रीय व्हॉलीबॉल कोच महेश शेडबाळे, चंद्रकांत कासोटे, प्रंशात दळवी,माजी राष्ट्रीय खेळाडू समीर खोडवे,संदिप शिंदे, योगेश माडवकर,प्रंशात म्हातुकडे,अमोल सुतार उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रविण मोरबाळे तर आभार वैभव आडके यांनी मानले. विभागीय संघ पुढील प्रमाणे करण फराकटे कोच,अभिषेक भुरले संघव्यवस्थापक,विवेक साळोखे कर्णधार, जीवक वाघमारे, विनित चव्हाण, मयुर सुतार, सुमित पाचगावे,मयुर कदम, विजय निमंग्रे, राजवर्धन पाटील, कुणाल साळगावकर, आदित्य मांगले, मानव साठे,तनिष खरात

Categories
कागल कोल्हापूर

कागलमध्ये पोलिओ लसीकरण मोहीमेला उस्फुर्त प्रतिसाद.


कागल गोरख कांबळे.
कागलमध्ये आज रविवार दिनांक ३१ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ लसीकरणाचा डोस देण्यात आला. कागल ग्रामीण कार्यक्षेत्र नगरपरिषद कागल मधील ० ते ५ वयोगटातील बालकांना पोलिओ लस देण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनिता पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कागल ग्रामीण रुग्णालय कार्यक्षेत्र नगरपरिषद कागल येथे विविध बुथवर पोलीओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. यामध्ये कागलमध्ये एकूण १९ बुथ तयार करण्यात आले आहेत. या बुथवर वेगवेगळ्या वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ती, एवढे मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे. यामध्ये ट्रान्झिट टीम व मोबाईल टीम कार्यरत राहणार आहेत.
३१ जानेवारी रोजी पोलीओपासून वंचित राहिलेल्या बालकांना २ ते ४ फेब्रुवारी २०२१ असे ३ दिवस आरोग्य कर्मचारी आशा कार्यकर्ते घरोघरी, वाडी-वस्ती, ऊसतोड टोळी,वीट भट्टी या ठिकाणी भेटी देऊन लस देणार आहेत. अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.रवी बल्लुरगी,डॉ.मदने डॉ. तृप्ती भोसले तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुनीता पाटील मॅडम यांनी दिली आहे. सर्व पालकांनी आपल्या ० ते ५ वयोगटातील बालकांना पोलिओ केंद्रावर नेऊन लस पाजून घ्यावी.कागल शहरांमध्ये २८३५बालकांना १००% लस देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येणार आहे. यापैकी ७५% बालकाना पोलिओ डोस देण्यात आला आहे.
या लसीकरण मोहीमेत वैद्यकीय अधिकारी डॉ.रवी बल्लुरगी,डॉ.मदने,डॉ. तृप्ती भोसले वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनीता पाटील,पर्यवेक्षक जगन्नाथ खोत,अरुण कांबळे,श्री मुजावर, सतीश ढेकळे,डॉ. किल्लेदार मॅडम, डॉ. सुलभा पाटील ,डॉ.वाघमारे,डॉ.रत्नदिप कांबळे, रत्नाकर सिस्टर,द्रविड सिस्टर, नर्सिंग प्रशिक्षण ए.एन.एम.व सर्व ग्रामीण रुग्णालय स्टाफ उपस्थित होता.

Categories
कागल कोल्हापूर

कागल तालुक्यातील १२ गावांमध्ये सरपंचपदाचे आरक्षण अनु. जाती प्रवर्गाकडे.


कागल◆गोरख कांबळे.
कागल तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये स्थापनेपासून आजतागायत सरपंच पदासाठी होत असलेल्या आरक्षण सोडतीमध्ये अनुसुचित जाती प्रवर्ग हा काही ठिकाणी या आरक्षणापासून अजूनही वंचीतच राहिला होता. रोटेशन पद्धतीनुसार ग्रामपंचायत स्थापनेपासून झालेल्या सर्व निवडणूकीत अनुसुचित जाती प्रवर्ग सोडता सर्व इतर प्रवर्गासाठी आरक्षण आरक्षित झाले.मात्र अनुसुचित जातीचे आरक्षण रोटेशन पद्धतीनुसार अद्याप का आले नाही?. हा संशोधनाचा विषय बनला होता.व याची गावामध्ये चर्चाही होत होती.त्यामुळे दलित असलेल्या या समाजातील नागरिकांना सरपंच पदाची संधी कधी मिळणार ? असा प्रश्न गावातील अनु.जाती समाजातील नागरिकामध्ये निर्माण झाला होता. ग्रामपंचायतीमध्ये दर पंचवार्षीक निवडणूकीत सोयीच्या युतीच्या आघाड्या होतात.प्रशासनातील प्रमुख पद या समाजापासून वंचीतच राहिल्यामुळे या समाजाचा विकास खुंटला होता. त्यामुळे दलित समाजाच्या भौतिक सुविधा व समस्या आहे तशाच राहील्या आहेत.
या सर्व गोष्टींचा विचार करून कागल तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतीचा निवडणूक निकाल जाहीर झाला असून सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत २७ जानेवारी रोजी पार पडली आहे. त्यामध्ये साके,सोनाळी,शेंडूर, कौलगे,लिंगनूर कापशी, बोळावी,कापशी सेनापती व बाळीक्रे,बेलेवाडी काळम्मा,नंद्याळ,मांगनूर,केनवडे,आलाबाद येथील ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण अनुसुचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे.या सर्व गोष्टींचा विचार करून कागल तालुक्यातील १२ गावांमध्ये सरपंच पदाचे आरक्षण अनुसूचित जाती प्रर्वगासाठी राखीव झाले.त्यामुळे कागल तालुक्यातील १२ गावामध्ये ही आनंद व्यक्त केला जात आहे.

Categories
कागल कोल्हापूर

ऊर्जा संवर्धन व ऊर्जा व्यवस्थापन पुरस्काराने संताजी घोरपडे साखर कारखाना सन्मानित


कागल●गोरख कांबळे.
महाराष्ट्र राज्य ऊर्जा विकास अधिकरण, पुणे (महाऊर्जा) अंतर्गत 14 व्या राज्यस्तरीय ऊर्जा संवर्धन व ऊर्जा व्यवस्थापन पुरस्कार वितरण सोहळ्यात सन 2018- 2019 या वर्षीचा ऊर्जा संवर्धन व व्यवस्थापनाचा कार्य अहवाल इलेक्ट्रिकल मॅनेजर बी.ए पाटील यांनी सादर केला होता. सदर अहवालाची दखल घेऊन कारखान्याने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव म्हणून या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दरवर्षी मोठ्या उत्साहात होणारा हा सोहळा यावेळी कोरोना महामारीचा विचार करता हा पुरस्कार कारखान्याच्या कार्यस्थळावर पाठवण्यात आलेला आहे. या पुरस्कारासाठी विशेष मार्गदर्शन कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष ग्रामविकास मंत्री ना.हसन मुश्रीफ, कारखान्याचे चेअरमन नविद मुश्रीफ यांचे लाभले आहे.
या प्रसंगी कारखान्याचे चेअरमन नविद मुश्रीफ कारखान्याचे जनरल मॅनेजर संजय घाटगे, चीफ इंजिनियर हुसेन नदाफ, इलेक्ट्रिकल मॅनेजर बी.ए.पाटील, को- जन मॅनेजर मिलिंद पंडे, लेबर ऑफिसर संतोष मस्ती, अकाउंट विभागाचे विवेक पाटील आदी उपस्थित होते.

Categories
कागल कोल्हापूर

गोकुळ शिरगाव श्रीकृष्ण यात्रा रद्द


गोकुळ शिरगाव प्रतिनिधी

गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथील ग्रामदैवत श्रीकृष्णाची १३ जानेवारी रोजी होणारी विशाळी यात्रा कोरोणा संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, शासनाच्या व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार रद्द करण्यात आली असल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे. तसेच भाविकांनी गर्दी न करण्याचे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच श्रीकृष्ण मूर्तीची पूजा-अर्चा अभिषेक व इतर धार्मिक विधी गावातील हक्कदार पुजारी गुरव यांच्याकडून अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात येणार आहे.
ग्रामदैवत श्री कृष्ण यात्रेसाठी गोकुळ शिरगाव मध्ये जिल्ह्यातून व सीमाभागातील लाखो भाविक गर्दी करत असतात. प्रथमच कोरोणा महामारी मुळे सदर यात्रा रद्द करावी लागत असल्याचे सांगण्यात आले.

Categories
कागल कोल्हापूर

असंघटित स्थलांतरित कामगारांसाठी युवा ग्रामीण विकास संस्थेचे मोफत आरोग्य जनजागृतीसाठीचे उपक्रम  दिशादर्शक:निर्मळे

युवा ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने मोफत एचआयव्ही/एड्स आरोग्य जनजागृती प्रसंगी मोहन सातपुते व टीम युवा

करवीर पूर्व:प्रतिनिधी : गजानन रानगे

असंघटित स्थलांतरित कामगारांसाठी गोकुळ शिरगावच्या युवा ग्रामीण विकास संस्थेचे मोफत आरोग्य जनजागृतीसाठीचे उपक्रम समाजाला दिशादर्शक आहेत असे मत प्रकल्प संचालक नंदकुमार निर्मळे  यांनी व्यक्त केले.
 एक डिसेंबर २० ते ३१ डिसेंबर २० अखेर युवा संस्थेच्या वतीने विविध घटकातील स्थलांतरीत कामगारासाठी मोफत आरोग्य जनजागृती उपक्रम घेण्यात आले या  सांगता समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी  युवा ग्रामीण विकास संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक मोहन सातपुते म्हणाले
समाजातील सर्वच घटकांनी जागतिक एकता, सामूहिक जबाबदारी स्वीकारून एचआयव्ही/एड्स विरुद्ध लढा देण्यासाठी पुढाकार घ्यावा . एड्स मुक्त महाराष्ट्र ,स्वप्न नव्हे ध्येय गाठण्यासाठी  एकत्रितपणे लढा देण्याची गरज आहे.स्थलांतरित कामगार लक्षगट हस्तक्षेप प्रकल्प ,गोकुळ शिरगाव यांच्या वतीने  ऊसतोड मजूर,वित्तभट्टी कामगार,हॉटेल कामगार,स्टोन क्रशर कामगार,गुऱ्हाळ घर कामगार,ट्रक डायव्हर,हमाल यांच्यासाठी मोफत आरोग्य जनजागृती शिबीर घेण्यात आली.
 जागतिक एड्स दिना निमित्य पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत” जागतिक एकता व सामूहिक जबाबदारी ” या घोष् वाक्याचे प्रकाशन करण्यात आले, यावेळी पोस्टर प्रदर्शन,माहिती पत्रक वाटप करण्यात आले. त्यानंतर गेली महिनाभर विविध ठिकाणी एचआयव्ही/ एड्स गुप्तरोग, क्षयरोग या विषयी प्रबोधन करण्यात आले.या शिबिराचा लाभ मोठ्या प्रमाणात घेतला.  ऐच्छिक एचआयव्ही तपासणीही मोफत  करण्यात आली.
यावेळी प्रकल्प संचालक नंदकुमार निर्मळे, समुपदेशक हेमंत सूर्यवंशी, सामाजिक कार्यकर्ती सौ. दीपाली सातपुते, सुजाता कांबळे, पौर्णिमा गुरव,अजय कांबळे, कौस्तुभ भोसले,प्रल्हाद कांबळे, सूरज मांडे,डॉ. स्वप्नील जाधव,डॉ. सत्येंन माळकर,यांच्यासह स्टेक होल्डर,१५ पिअर लीडर ,समाजातील विविध घटक यांचे सहकार्य लाभले.

Categories
कागल कोल्हापूर

चिंचवाड येथे तीस एकरातील ऊस पीक जळाले

चिंचवड( ता करवीर) येथील जळीत ऊस पिकांची पाहणी करताना सरपंच सुदर्शन उपाध्ये , रविंद्र कांबळे,ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग.

करवीर पूर्व : प्रतिनिधी : गजानन रानगे

चिंचवाड (ता करवीर ) येथील पीरपाणंद रस्ता ते सुर्यापा पाणंद रस्ताच्या दरम्यान उसाच्या फडाला आग लागली .या आगीमध्ये तीस एकरातील ऊसपीक जळाले .यामध्ये ऊस उत्पादक शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने जळीत ऊस पीक क्षेत्राचे पंचनामे केले.
गेली दोन वर्षे २०१८ साली वातावरणातील बदलामुळे ऊसाचे टनेज मोठ्या प्रमाणावर घसरले, तर २०१९ मध्ये हाता तोंडाशी आलेले पीक अतिवृष्टीमुळे १०० टक्के नुकसानग्रस्त झाले या सगळ्यातुन बाहेर पडत असताना व कोरोनाजण्य परिस्थितीतून जात असताना पिकवलेल्या शेतीतील ऊस पिकाना आग लागून झालेल्या नुकसानीने शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी गावातील ग्रामस्थांनी वेळीच आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले म्हणून मोठे नुकसान टळले. यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्यात आले . तसेच कारखान्यानी जळीत ऊस कपात करु नये अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. यावेळी चिंचवाड गावचे सरपंच सुदर्शन उपाध्ये, पोलिस पाटील रविंद्र कांबळे,ग्रामसेवक विजय माळी तलाठी शामराव कांबळे ,कोतवाल तेजस्विनी कोळी,आण्णासो कोळी(गुरुजी),यशवंत खानविलकर,राजगोंडा नांद्रे,महादेव कोळी,बाबा सरकार यांच्या सह जळीत ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते

Categories
कागल कोल्हापूर Uncategorized

गडमुडशिंगीत क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन उत्साहात

गडमुडशिंगी (ता करवीर) येथे सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष प्राविण्य मिळवलेल्या मुलींचा यावेळी सत्कार करण्यात आला

करवीर पूर्व : प्रतिनिधी : गजानन रानगे

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व बालिका दिन गडमुडशिंगी तालुका करवीर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ‘पीढी घडविते भारी माता कोल्हापुरी ‘ याविषयी चर्चासत्र व सावित्री उत्सव साजरा करण्यात आला.
पीढी घडविते भारी माता कोल्हापुरी कोल्हापूर उत्सव अंतर्गत क्रीडा स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या मुलींच्या मातांचा तसेच स्पर्धा परीक्षेत निवड झालेल्या मुलींच्या मातांचा एक किंवा दोन मुलीवर शस्त्रक्रिया केलेल्या मातांचा यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच विशेष प्राविण्य मिळवलेल्या मातांना ताराराणी प्राधान्य कार्डचे वाटप करण्यात आले. एकात्मिक बाल विकास प्रकल्प कोल्हापूर ग्रामीण यांच्या अनुषंगाने स्त्री भ्रूण हत्या तसेच मुलींचे संगोपन याविषयी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे मार्गदर्शन आयसीडीएस सुपरवायझर प्रज्ञा भांगरे ,आरोग्यसेविका संध्या महाजन, म.बा.क. विभाग जिल्हा कार्यक्रम अधिकारी सोमनाथ रसाळ प्रकल्प अधिकारी ज्योती पाटील यांनी याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांतर्गत मुलींच्या शिक्षणा विषयी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमास अंगणवाडी सेविका स्नेहल पाटील, नंदा गवळी, महादेवी माळी, रेखा खोत ,विश्रांती कोगले, माया गाडगीळ, नंदा सोनुले. विद्यार्थिनी पालक माता आदी उपस्थित होत्या.

Categories
कागल कोल्हापूर

श्री . शाहू हायस्कूल,ज्यूनि कॉलेज कागलमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जंयती महिला शिक्षण दिन म्हणून संपन्न


कोल्हापूर- सुभाष भोसले
श्री शाहू हायस्कूल ज्यूनि कॉलेज कागल येथे सावित्रीबाई फुले जंयती महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करणेत आला . या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक सौ .एस .ए .फकीर यांनी केले .
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य श्री जे.डी पाटील, उपप्राचार्य श्री बी. के .मडिवाळ, पर्यवेक्षिका सौ .एस ए . कुलकर्णी, तंत्र विभागप्रमुख श्री . एस .ए.देशमुख यांनी केले .
या दिनाचे औचित्य साधून माता पालक सौ . रूपाली पिसे यांचा सत्कार सौ .आर. आर .कुलकर्णी यांनी तर माधवी कांडेकरी यांचा सत्कार सौ . कुडतरकर यांनी केला . कु वैष्णवी पाटील, कु सानिका गुरव यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जंयती निमित्त आपले मनोगत व्यक्त केले .
पर्यवेक्षिका सौ . एस . ए . कुलकर्णी यांनी सावित्रीबाई फुले व ज्ञानसूर्य ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाची सुरवात समाजातील विरोध झुगारून कशा प्रकारे केली यांची माहिती दिली . तसेच उच्च शिक्षणामुळे माणसातील माणूसपण हरविले आहे तसेच शिक्षणामुळे विद्वतेबरोबरच नम्रता प्रामाणिकपणा निर्माण होणे गरजेचे आहे . त्यांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट विशद केला .
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री . जे . डी . पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सावित्रीबाई यांना अभिवादन केले व कु . वैष्णवी कु . सानिका या मुलींचे अभिनंदन केले . ते म्हणाले की महिलांना आज जे सर्व क्षेत्रात आरक्षण मिळाले आहे त्याचे श्रेय ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जाते . त्यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ उभी केली त्यामुळे आज सर्वच क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत . दरवर्षी हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो . त्यांनी आवाहन केले की महिलांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा . मुलींनी उच्य शिक्षण घेवून आपले कुंटुब व देशाचे नाव उज्ज्वल करावे .
कार्यक्रमाचे आभार सौ . एस . ए .फकीर यांनी मानले . या कार्यक्रमाला शाहू हायस्कूल, ज्यूनि कॉलेज व तंत्रविभाग चे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .

Categories
कागल कोल्हापूर

श्री . शाहू हायस्कूल,ज्यूनि कॉलेज कागलमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जंयती महिला शिक्षण दिन म्हणून संपन्न


कोल्हापूर- सुभाष भोसले
श्री शाहू हायस्कूल ज्यूनि कॉलेज कागल येथे सावित्रीबाई फुले जंयती महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करणेत आला . या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक सौ .एस .ए .फकीर यांनी केले .
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य श्री जे.डी पाटील, उपप्राचार्य श्री बी. के .मडिवाळ, पर्यवेक्षिका सौ .एस ए . कुलकर्णी, तंत्र विभागप्रमुख श्री . एस .ए.देशमुख यांनी केले .
या दिनाचे औचित्य साधून माता पालक सौ . रूपाली पिसे यांचा सत्कार सौ .आर. आर .कुलकर्णी यांनी तर माधवी कांडेकरी यांचा सत्कार सौ . कुडतरकर यांनी केला . कु वैष्णवी पाटील, कु सानिका गुरव यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जंयती निमित्त आपले मनोगत व्यक्त केले .
पर्यवेक्षिका सौ . एस . ए . कुलकर्णी यांनी सावित्रीबाई फुले व ज्ञानसूर्य ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाची सुरवात समाजातील विरोध झुगारून कशा प्रकारे केली यांची माहिती दिली . तसेच उच्च शिक्षणामुळे माणसातील माणूसपण हरविले आहे तसेच शिक्षणामुळे विद्वतेबरोबरच नम्रता प्रामाणिकपणा निर्माण होणे गरजेचे आहे . त्यांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट विशद केला .
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री . जे . डी . पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सावित्रीबाई यांना अभिवादन केले व कु . वैष्णवी कु . सानिका या मुलींचे अभिनंदन केले . ते म्हणाले की महिलांना आज जे सर्व क्षेत्रात आरक्षण मिळाले आहे त्याचे श्रेय ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जाते . त्यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ उभी केली त्यामुळे आज सर्वच क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत . दरवर्षी हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो . त्यांनी आवाहन केले की महिलांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा . मुलींनी उच्य शिक्षण घेवून आपले कुंटुब व देशाचे नाव उज्ज्वल करावे .
कार्यक्रमाचे आभार सौ . एस . ए .फकीर यांनी मानले . या कार्यक्रमाला शाहू हायस्कूल, ज्यूनि कॉलेज व तंत्रविभाग चे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .

Categories
कागल कोल्हापूर

कागलमध्ये ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण.


कागल■गोरख कांबळे.
कागल तालुक्यातील होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूकीचे प्रशिक्षण आज राज्य निवडणूक आयोग नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार शिल्पा ठोकडे व नायब तहसीलदार शिवाजी गवळी यांनी कर्मचाऱ्यांना दिले.कागल तालुक्यातील ५५ गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे मतदान प्रक्रियेचे प्रत्यक्ष कामकाज ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया याविषयी प्रशिक्षण दिले.निवडणूक प्रक्रियेत प्रत्यक्ष कामकाज कसे करावे? याविषयीची माहिती देण्यात आली. कागल तालुक्यात ५५ गावातील ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.याचाच एक भाग म्हणून आज कागल तालुक्यातील ५५ गावातील ग्रामपंचायत निवडणूकीत मतदान केंद्रावर कामकाज पहाणारे केंद्राध्यक्ष, सहाय्यक कर्मचारी, मतदान अधिकारी क्रमांक १ व मतदान अधिकार क्रमांक 2 व 3 अशा सर्व लोकांना प्रशिक्षण आरटीओ गोदाम नवीन पोस्ट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ पश्चिम बाजू कागल येथे देण्यात आले.
या प्रशिक्षणात प्रत्यक्ष मतदान केंद्रावर आदर्श आचारसंहिता नियमांचे पालन,मतदान यंत्र हाताळणी, व मतदान यंत्राची प्राथमिक माहिती,तसेच कोरोना संसर्ग काळात घ्यावयाची काळजी यासह मतदान प्रक्रियेबाबत मोठ्या पडद्यावर चलचित्र दाखवून मार्गदर्शन केले. हे प्रशिक्षण सकाळी ९ ते १२ व दुपारी २ ते ५ या दोन सत्रात देण्यात आले. पुढील प्रशिक्षण शनिवार दि.९ जानेवारी २०२१ रोजी होणार आहे. सदर प्रशिक्षणास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, इतर सर्व प्रशिक्षणार्थी व कागल तहसील कार्यालय,व कागल नगरपरिषद कार्यालयातील नियुक्त कर्मचारी उपस्थित होते.

Categories
कागल कोल्हापूर

शेवटच्या दिवशी ग्रामपंचायत निवडणूकीसाठी लागणाऱी कागदपत्रे दाखल करण्यासाठी उमेदवारांची धावपळ,मात्र सोशल डिस्टन्सचा नियम धाब्यावर.


कागल/प्रतिनिधी●गोरख कांबळे.
कागल तालुक्यातील एकूण ५५ गावातील ग्रामपंचायत निवडणूकीचा हंगाम सुरू असल्याने अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांची कागल तहसील कार्यालयातील धान्य गोडाऊन व शासकीय सभागृह येथे गर्दीच गर्दी दिसून येत आहे. कालावधी कमी असल्याने उमेदवार निवडणुकीसाठी अर्जासोबत लागणाऱ्या कागदपत्रे काढण्यासाठी धावपळ करीत असल्यांचे चित्रही कागल तहसील कार्यालयाच्या परिसरात दिसून येत आहे.मात्र सँनिटाइजचा वापर,सोशल डिस्टन्स, मास्कचा वापर या गोष्टी टाळल्याचे चित्र परीसरात पहायला मिळाले.
पण ग्रामपंचायत पदासाठी १६ प्रकारची कागदपत्रे व ४ प्रमाणपत्रे अशी सर्व कागदपत्रे सादर करावी लागणार असल्याने उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे कागल तहसील कार्यालयातील धान्य गोडाऊन येथे मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.त्यामुळे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला आहे.तसेच ग्रामपंचायतीच्या निवडणूकाचे रंगधुमाळी जोरदार सुरु झालीे असुन या ग्रामपंचायतील सरपंच पदाचे आरक्षणही जिल्हाधिकारी यांच्या सुचणेनुसार जाहीर केले होते.
पण शासनाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत घोडे बाजार होऊ नये यासाठी सोडलेले आरक्षण रद्द करण्याचे आदेश देऊन सदर आरक्षण हे निवडणुकीच्या निकालानंतर नंतर जाहीर होणार असल्याने इच्छुक उमेदवारांची निराशा झाली असल्याने निवडणूकीत इच्छुक उमेदवारांचा खर्च व निवडणुकीसाठी लागणारी कागदपत्रे यांची जुळवाजुळवी कोण करणार? असा प्रश्न उपस्थित झाल्याने उमेदवारांना लागणारे कागदपत्रे काढण्यासाठी विलंब होत असून सर्व्हरही सारखा डाऊन होत असल्याने दिवसभर ताटकळत बसावे लागते.
त्याचबरोबर आता निवडणूकीसाठीचा अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीखही संपत आल्यानंतर उमेदवारांची धावपळ सुरू झाली आहे. ग्रामपंचायत निवडणूकीसाठी दि. २३ डिसेंबर ते 30 डिसेंबर पर्यंतच अर्ज स्वीकारले जाणार आहेत.आजची शेवटची सायंकाळी ५.३० पर्यंत मुदत असल्याने त्यामुळे प्रत्येक गावातील इच्छुक उमेदवार आपले भवितव्य अजमावसाठी धावपळ करून निवडणुकीसाठी लागणारे कागदपत्रे मिळवण्यासाठी धावपळ करत असल्याने तहसील कार्यालय धान्य गोडाऊन व शासकीय सभागृहात जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

Categories
कागल कोल्हापूर

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात तीन लाख ६१ हजार साखर पोत्यांचे पूजन.

कार्यस्थळावरील दत्त मंदिर परिसराचा सुशोभीकरणाचे उद्घाटन


    .
कागल/प्रतिनिधी●गोरख कांबळे.
सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या तीन लाख, ६१ हजार साखर पोत्याचे पूजन अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. कारखाना कार्यस्थळावरील श्री दत्त मंदिर परिसर सुशोभीकरण कामाचे उद्घाटनही झाले. श्री दत्त मंदिर परसिर सुशोभिकरण उट्घाटनासह,  या हंगामात उत्पादित ३ लाख ६१ हजार पोती पुजन,दोन कोटी १० लाख युनिट विज निर्यात टर्बाईन पुजन व एक कोटी ३३ हजार इथेनॉल
करारापैकी सात लाख लिटर्स इथेनॉल पुरवठा टॅकर्स पुजन अशा संयुक्त कार्यक्रमासाठी अध्यक्ष नवीद मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
    यावेळी बोलताना अध्यक्ष नवीद मुश्रीफ म्हणाले, या हंगामाच्या ५८ दिवसात तीन लाख, ४५ हजार टन ऊस गाळपानंतर तीन लाख, ६१ हजार क्विटल साखर उत्पादित झाली आहे. सरासरी साखर उतारा १०.४६ टक्के असून बी हेवी मळीपासून इथेनॉल निर्मितीचा उतारा धरून एकूण सरासरी ११.९६ टक्के होतो. सध्या देशात वाढत चाललेल्या साखर उत्पादनाचा विचार करता बी हेवी मळीपासून इथेनॉल निर्मीतीचा निर्णय संस्थापक व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतलेला आहे.या हंगामात ९०.४७ युनिट विज निर्मीती प्रतीटन सरासरीने आजअखेर एकूण तीन कोटी १० लाख  युनिट विजनिर्मीती केली आहे. त्यापैकी दोन कोटी १० लाख युनिट निर्यात केले आहेत.    
चौकट…….
ऊस विकास योजना
हेक्‍टरी उत्‍पादन वाढीसाठी ऊस लागण व खोडवा पिकासाठी बेसलडोस, सूक्ष्म अन्नद्रव्यांची खते व कांडी बियाणे तसेच ऊस रोपांचे बिनव्याजी क्रेडिटवर वाटप…..ठिबक सिंचन प्रणाली करीता सवलतीच्या दरात कर्ज पुरवठा व शेतकऱ्यांना रोख अनुदान……ऊस शेतीचा शास्त्रशुद्ध पॅटर्न तयार करून आदर्श उस प्लॉट योजना कार्यरत…….उसावरील कीड नियंत्रणासाठी रासायनिक, जैविक कीटकनाशके व बुरशीनाशकांचा क्रेडिट वर बिनव्याजी पुरवठा……
     श्री.मुश्रीफ पुढे म्हणाले, पेटोलमध्ये १०% इथेनॉल मिसळण्याच्या शासनाच्या धोरणानुसार ऑईल कंपनीना एकूण एक कोटी ३३ हजार लिटर्स इथेनॉल पुरवठ्याचा करार आहे. आजअखेर सात लाख लिटर्स इथेनॉलचा पुरवठा केलेला आहे. पेट्रोलिअम कंपनीच्या इथेनॉल मागणी विचारात घेता डिस्टीलरी प्लॅन्टची क्षमता प्रतिदिनी ३०,००० लिटर्स वरुन प्रतिदिनी ५०,००० लिटर्स इतके विस्तारीकरण केले आहे.
चालू हंगामामध्ये एकूण ३२ लाख, २५ हजार लिटर्स इतके अल्कोहोलचे उत्पादन घेतले असून त्यापैकी २१ लाख, २५ हजार लिटर्स रेक्टीफाईड स्पिरीट व ११ लाख लिटर्स इथेनॉलचे उत्पादन झाले आहे.तसेच डिस्टीलरीमधून निघणारे सांडपाणी (स्पेट वॉश) याची घनता वाढवून,बॉयलरला त्याचा इंधन म्हणून वापर केला आहे व त्यापासून निर्माण होणारी स्टीम ही पुन्हा डिस्टीलरीसाठी वापरलेली आहे. त्यामधून निघणारे कंन्डेंसेट याच्यावरती प्रकिया करुन निघणारे पाणी हे पुन्हा डिस्टीलरीकरीता वापरलेले आहे. यामुळे डिस्टीलरी प्रकल्पासाठी कमीत कमी पाण्याचा वापर करावा लागतो व कोणत्याही प्रकारचे प्रदुषण होत नाही.ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पिकविलेल्या सर्वच्या सर्व ऊस गाळपासाठी कारखान्याकडे पाठवावा, असे आवाहन अध्यक्ष श्री. मुश्रीफ यांनी यावेळी केले.
    

Categories
कागल कोल्हापूर

श्रीराम साळुंखे यांची अभिनंदनीय निवड


कोल्हापूर- सुभाष भोसले
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर “आजीव सेवक “पदी श्रीराम शरदचंद्र साळुंखे यांची अभिनंदनीय निवड राजश्री छत्रपती शाहू महाराज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज जुना बुधवार पेठ ,कोल्हापूर विद्यालयाचे सहशिक्षक श्रीराम शरदचंद्र साळुंखे यांची श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या “आजीव सेवक” पदी विश्वसनीय निवड झाल्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एस .जी. खाडे व सर्व गुरुदेव कार्यकर्ते यांनी सत्कार केला श्री. एस. जी. खाडे यांनी त्यानी केलेल्या कामाची दखल संस्थेने घेतली आहे असे मत व्यक्त केले .श्री. ए .बी मोहिते त्यानी शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या कार्याच्या पावलावर पाऊल ठेवून काम करणारा तरुण शिक्षक म्हणजे “श्रीराम “असा उल्लेख केला. श्री एस .के गुरव यांनी आपल्या शिष्याला हे पद मिळाल्याबद्दल स्वतःला ते भाग्यवान समजतात . संस्थेच्या पुढील कार्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. श्री. सावंत बी.जे .यांनी त्यांच्या कार्याबद्दल कौतुक केले. सत्कारास उत्तर देताना श्रीराम शरदचंद्र साळुंखे यांनी संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे संस्थेच्या सचिवा सौ शुभांगीताई गावडे त्यांचे ऋण व्यक्त केले. शिक्षण महर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या ध्येय धोरणानुसार मी काम करेन साळूंखे परिवाराचे नाव उज्ज्वल करेन अशी ग्वाही दिली. श्री स्वामी विवेकानंद संस्थेचे कार्य देशभर पसरवण्यासाठी प्रयत्न करीन असे सांगितले. कार्यक्रमाचे आभार श्री एस. टी .पाटील यांनी मानले सूत्रसंचालन सौ वाडीकर एस.डी यांनी केले कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Categories
कागल कोल्हापूर

युवकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार ; आमदार ऋतुराज पाटील

गोकुळ शिरगाव प्रतिनिधी

कोल्हापूर दक्षिण मधील सर्व युवकाच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी दीर्घकालीन उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून काम करणार असल्याचे प्रतिपादन आमदार ऋतुराज पाटील यांनी नेर्ली विकासवाडी येथील विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी केले आपल्या मतदारसंघातील तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न बिकट असून यासंबंधी काही वेगळं कार्य करण्याची गरज असल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांकडून सूचना आली असून यासंदर्भात सर्वांच्या विचाराने व सहकार्याने आदर्श आराखडा लवकरच तयार करण्यात येईल. यावेळी त्यांच्या हस्ते 58 लाख रुपये निधीतून अंतर्गत रस्ते गटर मराठा समाज मंदिर तांडा वस्ती सुधारयोजना नागरी सुविधा आदी विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले यावेळीमाजी न्यायाधीश अण्णासाहेब पाटील माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत प स सदस्य मंगल पाटील सरपंच प्रकाश पाटील उपसरपंच संजय चौगुले सर्व ग्रामपंचायत सदस्य जनार्दन पाटील हंबीरराव पाटील अजित पाटील श्रीकांत नरके नंदकुमार पाटील सर्जेराव चौगुले भाऊसाहेब चौगुले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Categories
कागल कोल्हापूर

कागलमध्ये सामाजिक न्याय मंत्री मा. ना. रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबीर व मसाले दुधाचे वाटप.


कागल/प्रतिनिधी●गोरख कांबळे. . कागलमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. मा. रामदासजी आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हाध्यक्ष उत्तम दादा कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या मार्फत करण्यात आले यावेळी कागल स्टॅंडवर मसाले दूध वाटप करण्यात आले तसेच रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते.या वाढदिवसाच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी रक्तपेढीच्या नर्स व स्टाफ तसेच कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी बऱ्याच युवकांनी रक्तदान केले. तसेच प्रत्येकाने रक्तदान करावे. आपण केलेल्या रक्तदानामुळे कुणाचा तरी जीव वाचू शकतो जीवदान मिळू शकते. आपण नेहमी रक्तदान करतो अशाच प्रकारे इतरांनीही रक्तदान करावे.असे आवाहनही यावेळी करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. उत्तमदादा कांबळे (जिल्हाध्यक्ष)यांच्या हस्ते झाले.
यावेळी तालुकाध्यक्ष श्री बाबासो कागलकर.कार्याध्यक्ष श्री बी. आर. कांबळे.सचिव श्री सचिन मोहिते.कागल तालुका युवा आघाडी अध्यक्ष श्री विनोद कांबळे.संघटक श्री सातापा हेगडे. कागल तालुका उपाध्यक्ष श्री चंद्र शेखर कोरे. तथा अजित भोसले.सामाजिक कार्यकर्ते श्री भिकाजी कांबळे, मंजुनाथ वराळे, श्रीकांत मालेकर, आनंदा कांबळे, पंडित कांबळे, दिलीप कांबळे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Design a site like this with WordPress.com
Get started