Categories
लोहा

जुना लोह्यातील राजेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचे मावळ्यांनी केले सुशोभीकरण

लोहा तालुका प्रतिनिधी:शिवराज पवार

लोहा:दि.6.”गाव करी ते राव न करी ” याचा प्रत्यय लोहा येथील तरुणांनी दिला.जुना लोहा येथील असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह परिसराचेही सुशोभिकरण करून एक नवा आदर्श निर्माण करून राजेंच्या विचारांचा वारसा जुन्या लोह्यातील मावळ्यांनी पुढे दैदिप्यमान केला आहे.
लोहा शहर हे (जुना लोहासह) मोठ्या लोकवस्तीचे व बाजारपेठेचे,दळणवळणाचे राष्ट्रीय महामार्गावरील एक महत्त्वाचे ठिकाण असून लोहा येथील जुन्या पिढी प्रमाणेच आजची तरूण पिढीही वेगवेगळे नवोपक्रम हाती घेतेय.नाटय, कला, जयंत्यासण- उत्सव इ. साजरे करणे,व त्यातूनच सामाजिक ऐक्याची भावना निर्माण करून त्या- त्या पिढीतील नवयुवक, तरुण समोर येऊन लोहाच काय..? तर,तालुका व जिल्ह्याचेही नेतृत्व करत राजकीय-सामाजिक, सांस्कृतिक,धार्मिक व आर्थिक चित्र बदलून टाकले आहे.
आज या आधुनिक शहराकडे वाटचाल करणाऱ्या लोहा येथील प्रत्येक पिढ्यांनी तालुक्याचे नेतृत्व करण्यासाठी तरुण तयार झाले आहेत.तशी त्यांना वेळोवेळी संधीही चालून आली. तोच आदर्श समोर ठेवूनच सामाजिक समतेचा संदेश रूजवला जातोय.
याचेच ज्वलंत उदाहरण म्हणजेच सद्यस्थितीतील जुना लोहा येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाची राबविण्यात आलेली मोहीम ही होय.येथील सर्व तरुण एकत्र येऊन सुशोभीकरणाची कार्य पार पाडले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या आजूबाजूचा संपूर्ण परिसर चकाचक करून सुशोभीकरणाचे काम पूर्णत्वास नेले.पुतळ्याच्या सभोवताली स्टीलच्या जाळीचे संरक्षक कवच उभारले.यातून भावी पिढीलाही अप्रत्यक्ष संदेशच दिला. गावातील सर्व तरुण मंडळींनी, स्वतः स्वच्छेने एकत्र येऊन , कसलाही कमीपणा वाटू न देता, हेवेदावे न करता सर्वांनी पुढाकार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण केले.व सामाजिक बांधिलकीचा,एकतेचा, समानतेचा,स्वच्छतेचा, पर्यावरणाचा संदेश,एक आदर्श, नवा पायंडा निर्माण केला. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started