Categories
कोल्हापूर क्रीडा ब्रेकिंग न्युज

पै.खाशाबा जाधव यांची जयंती यानिमित्त जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार

प्रशांत भोसले
दिनांक 15 जानेवारी 2021 स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते स्वर्गीय खाशाबा जाधव यांची जयंती यानिमित्त जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने ऑलिम्पिक स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी पात्र ठरलेल्या व शासनाचे अनुदान मिळालेल्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या सत्काराचा कार्यक्रम भवानी मंडपामध्ये आयोजित करण्यात आला होता. सकाळी साडे आठ वाजता भवानी मंडप परिसरातील किर्तिस्तंभला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली योग प्रशिक्षक श्री रवी भूषण कुमठेकर यांची विद्यार्थिनी कुमारी गार्गी भट हे योगाची प्रात्यक्षिके करून दाखवले.
कार्यक्रमातऑलम्पिक निवडचाचणीसाठी पात्र ठरलेले व खेळाडू श्रीमती तेजस्विनी सांवत,राहि सरनोबत, स्वरुप उन्हाळकर,आंतरराष्ट्रीय खेळाडू ज्याना शासनाकडून अनुदान प्राप्त झाले आहे.उज्वला चव्हाण,अभिषेक जाधव,अफ़्रिद अत्तर,विवेक मोरे,स्वप्निल पाटील,आरती पाटील,वैष्णवी सुतार ,प्रथमेश कापडे,दत्तप्रासद चौगले,खुशबु रिकिबादर,तसेच मान्तेश पाटील,पृथ्वीराज पाटील,सुरज आसवले ,कोमल देसाई इ.खेळाडुंचा सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना शालेय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा सांगितला शासनाच्या वतीने खेळाडूंना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा आधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षण शिबिराचे आयोजन यातून भविष्यात देखील अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू कोल्हापूर उघवते खेळाडु स्व.खाशाबा जाधव यांच्याकडून प्रेरणा घेऊन कोल्हापूरचे नाव जागतिक स्तरावर पोहोचतील असा मानस व्यक्त केला. अर्जुनअवार्डीआंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू कुमारी शैलजा साळोखे यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना पूर्वीच्या काळी असणारी सुविधांची कमतरता व त्या प्रतिकूल परिस्थितीत जुन्या काळातील खेळाडू मेहनतीच्या जोरावर आपली कामगिरी अति उच्च स्तरावर नेत असल्याचे सांगितले तसेच याप्रसंगी खाशाबा जाधव यांचे पुतणे यांनी खाशाबा जाधव यांना केंद्रशासनाकडून भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणीही केली केली. राज्य शासनाकडुन खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणीही केली. खाशाबा जाधव यांचे शिक्षण कोल्हापूर मध्ये राजाराम कॉलेज व कुस्तीचा सराव मोतीबाग तालीम येथे झाल्याचे सांगून कोल्हापूरच त्यांची कार्य कर्मभूमी होते, याची आठवण करून दिली. आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत यांनीही याप्रसंगी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे नावाच्या किट घातल्यानंतर ज्या भावना मनामध्ये येतात तशाच भावना मी कोल्हापूरची असल्याचे सागून जर खेळाडुच्या किट्च्या पाठीवर कोल्हापूरचे नाव असेल तर नक्कीच अभिमान व आनंद होईल असे सांगून जिल्हा क्रीडा अधिकारी यांना त्यांनी पुढील येणाऱ्या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याचे खेळाडूंसाठी स्वतंत्र कोल्हापूरची ओळख असेल असे कीट देण्याची विनंती केली. माननीय आमदार श्री चंद्रकांत जाधव यांनीही सत्कारमूर्ती आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे कौतुक करून त्यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या व कोल्हापुरात सुसज्ज दर्जाच्या खेळ सुविधा भविष्यामध्ये निर्माण करण्यात येणार असल्याचे सांगून येणार असल्याचे आश्वासन याप्रसंगी त्यांनी दिली माननीय जिल्हाधिकारी श्री दौलत देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना कोल्हापूरला क्रीडा परंपरेची असणारी परंपराही किती जुन्या काळापासून आहे याची माहिती दिली , 1920 सालच्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतही कोल्हापूरचा रंगनाथ पाटील यांनी सहभाग घेतल्याचे त्यांनी सांगितले या प्रसंगी कोल्हापूरच्या लोकांमध्ये कुस्तीविषयी असणाऱ्या प्रेमाची आठवण सांगत असताना ते विद्यार्थ्यांची विद्यार्थीदशेत असताना पैलवान युवराज पाटील आणि पैलवान सतपाल यांच्या मध्ये कोण जिंकणार याची घराघरांमध्ये चर्चा रंगत असे अशी आठवणही त्यांनी सांगितली या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर श्रीमती शैलजा साळुंखे टेबल-टेनिस अर्जुन वीर माननीय आमदार चंद्रकांत जाधव माजि महापौर श्रीमती निलोफर आजगेकर, श्रीमती शोभाताई बोंद्रे , हिंदकेसरी दीनानाथ सिंह व जीवनगौरव पुरस्कार ते बिभीषण पाटील तसेच स्व.खाशाबा जाधव यांचे पुतणे शामराव पुतणे व सचिन चव्हाण आंतरराष्ट्रीय क्रीडा नेमबाज सचिन च्व्हाण जिल्हा अधिकारी सर्व कर्मचारी व शिक्षक वृंद उपस्थित होता.क्रीडा कार्यालयाचे क्रीडा अधिकारी माने सर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Categories
कोल्हापूर हातकणंगले क्रीडा ब्रेकिंग न्युज

फिट इंडीया मुहमेंट अंतर्गत हातकणंगले तालुक्यातील शाळांची नोंदणी संदर्भात मार्गदर्शन बैठक संपन्न

क्रीडा शिक्षकांनी नेहमी विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवून रमाकांत आचरेकर यांच्यासारखे आदर्श गुरुवर्य बनावे: उपशिक्षणाधिकारी मा. श्री. डी .एस पोवार

प्रशांत भोसले

हातकलंगले इयत्ता १ ते १२ वी च्या शाळांनी आपली नोंदणी फिट इंडियाच्या पोर्टलवर नोंदणी करण्यासंदर्भात मार्गदर्शन बैठकीचे आयोजन केले होते. हातकणंगले तालुक्यातील सर्व क्रीडाशिक्षक व शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद कोल्हापूर उपशिक्षणाधिकारी मा. श्री. डी .एस पोवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीर शैक्षणिक संकुल कुंभोज येथे मार्गदर्शक बैठक संपन्न झाली

कार्यक्रमाची सुरुवात शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील व माऊली लक्ष्मीबाई पाटील यांच्या पवित्र प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. संचालक प्रा. एस .जी. मसुटगे यांनी सर्व मान्यवर पाहुण्यांचे स्वागत केले तसेच रयत शिक्षण संस्थेची प्रतिज्ञा सर्व क्रीडा शिक्षकांनी घेतली . मा. सागर चूडाप्पा खोतवाडी हायस्कूल मुख्याध्यापक यांनी आपल्या प्रस्ताविक मध्ये फिट इंडिया कार्यक्रमांतर्गत शाळांच्या नोंदणी विषयक माहिती सांगितली तसेच कोरोना काळातील परिस्थिती पाहता खेळाचे महत्व अधिक आहे. बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकासाचे महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले.

कोल्हापूर ज़िल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष ,श्री. राजेंद्र बुवा (रुकडी ) संताजी भोसले सर ( पेठ वडगांव ), भिकाजी माने सर( इचलकरंजी) प्रा. संभाजी पाटील सर ( घुणकी) व शिवाजी पाटील सर (मिणचे ) इत्यादी क्रीडा शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .

या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक उपशिक्षणाधिकारी मा.श्री. डी .एस पोवार यांनी आपल्या शैक्षणिक अनुभवाचे आलेल्या विविध दाखल्यांचे देत सर्व क्रीडा शिक्षकांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. कोल्हापूर माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत आजवर जवळजवळ दोन/ अडीच हजार शाळांची तपासणी करीत असताना आलेल्या विविध अनुभवांची त्यांनी आपल्या विशिष्ट शैलीमध्ये सर्व क्रीडा शिक्षकांना ज्ञानाची शिदोरी दिली. ज्या पद्धतीने घराचे वैशिष्ट्ये दारातील रांगोळी वरून लक्षात येते त्याच पद्धतीने शाळेचे वैशिष्ट्य हे शाळेतील क्रीडा शिक्षकांच्या कार्यावरून कळते या तपासणी अंतर्गत सर्वात जास्त भावलेला व्यक्तिमत्त्व म्हणजे क्रीडाशिक्षक होय असे ते म्हणाले. सर्व शिक्षकांनी आपली जबाबदारी व कर्तव्य लक्षात घेऊन कार्य करावे तसेच शैक्षणिक अनुभवातून त्यांनी शिक्षकांचे चार प्रकारांमध्ये वर्गीकरण केले सांगितले यामध्ये त्रस्त, सुस्त, व्यस्त व मस्त अशा गटामध्ये वर्गीकरण केले व आपण मस्त गटांमध्ये सहभागी होणारे क्रीडाशिक्षक घडावेत अशी इच्छा व्यक्त केली तसेच बैलाच्या गळ्यात बांधलेल्या घुंगराची ची गोष्ट सांगत क्रीडा शिक्षकांनी वास्तविक परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शाळेमध्ये अधिकचे काही देण्याची वृत्ती बाळगून कार्य करावे असे त्यांनी सांगितले क्रीडा शिक्षकांनी नेहमी विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवून रमाकांत आचरेकर यांच्यासारखे आदर्श गुरुवर्य बनावे असे त्यांनी सांगितले.

सर्व क्रीडा शिक्षकांनी आपल्या शाळेचे फिट इंडिया अंतर्गत नोंदणी करावी व येणाऱ्या काळामध्ये शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनासंदर्भात शाळांना लाभ घ्यावयाचा असेल तर फिट इंडिया नोंदणीची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले तसेच संचमान्यता संदर्भात देखील या नोंदणीचे महत्त्व असल्याचे निदर्शनास आणून दिले . ३१ मार्च २०२१ अखेर फिट इंडिया पोर्टलवर आधार अपडेट करणे विषयक देखील माहिती सांगितले तसेच क्रीडा शिक्षकांनी क्रीडा माहितीची ज्ञानेश्वरी जतन करणे आवश्यक असलेलेचे त्यांनी सांगितले.तसेच हातकणंगले पंचायत समिती विस्ताराधिकारी एस.बी जमादार सर यांनी आभार मानले.

यावेळी हातकणंगले विस्ताराधिकारी मा.श्री.एस.बी. जमादार, मा. सागर चुड्डाप्पा सर व महात्मा गांधी विद्यालया रुकडीचे प्राचार्य मा.श्री उत्तम शेळके सर तसेच मा. बकरे , उर्दू विभाग प्रमुख हातकणंगले मा.श्री.पटेल सर रयत गुरुकुलचे मा.श्री.सागर माने सर इत्यादी मान्यवर हातकणंगले तालुक्यातील सर्व क्रीडाशिक्षक उपस्थित होते.

Categories
ब्रेकिंग न्युज

सावधान ! व्हाट्सअ‍ॅपच्या माध्यमातुन पैशांची मागणी करुन तरुणाला लुबाडणार्‍या टोळीचा पोलिसांकडून शोध सुरु,पनवेल.

स्वप्निल तांडेल करावेगांव प्रतिनिधी ऑनलाईन फसवणूक करणार्‍या टोळ्यांनी आता सोशल माध्यमांचा वापर करुन नातेवाईक अथवा मित्र असल्याचे भासवून समोरील व्यक्तीकडून ऑनलाईन पैसे उकळण्याचे प्रकार सुरु केले आहेत. असाच काहीसा प्रकार पनवेलच्या सुकापुर भागातील तरुणासोबत नुकताच घडला आहे. अज्ञात टोळीने या तरुणाच्या मामाच्या फोटोचा वापर करुन व्हॉट्सअ‍ॅपद्वारे त्याच्याकडून 38 हजार रुपये उकळल्याचे उघडकिस आले आहे. खांदेश्‍वर पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात टोळी विरोधात फसवणुकीसह आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणात फसवणूक झालेला अभिषेक पांडे (29) हा तरुण पनवेलच्या सुकापुर भागात राहाण्यास असून त्याचा रियल इस्टेटचा व्यवसाय आहे. अभिषेकचा मामा नितेश पांडे हा कर्नाटकात बंगलोर येथे कुटुंबासह राहण्यास असून त्यांच्याकडे मोबाईलचे वेगवेगळे नंबर आहेत. यातील मुख्य नंबरवर अभिषेक नियमित आपल्या मामासोबत व्हॉटसअ‍ॅपवरुन चॅटींग तसेच संपर्क साधत होता. 

अभिषेकचा मामा त्याच्याकडे असलेल्या वेगवेगळ्या नंबरवरुन अभिषेक सोबत संपर्क साधत होता. याचाच फायदा ऑनलाईन फसवणुक करणार्या टोळ्यांनी घेतला. या टोळीने अभिषेकचा मामा नितेश पांडे याच्या फोटोचा वापर करुन अभिषेकचा मामा असल्याचे भासवून अज्ञात नंबरवरुन अभिषेक सोबत व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातुन संपर्क साधला. तसेच अभिषेकला इंग्रजीमधुन हिंदी भाषेत मित्राला हॉस्पीटलमध्ये पैशांची अर्जंट गरज असल्याचे व गुगल पेच्या माध्यमातून अर्जंट पैसे पाठविण्याबाबत मेसेज पाठविला. तसेच दुसर्या दिवशी सकाळी सदर पैसे परत करण्याबाबत देखील मेसेज पाठविला. सदर व्हॉट्अ‍ॅप नंबरवर अभिषेकचा मामा नितेश पांडे याचा फोटो असल्याने सदरचा मेसेज नितेश पांडे यानेच पाठविल्याचा समज झाल्याने अभिषेकने सदर मोबाईल नंबरवर फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो नंबर न लागल्याने अभिषेकने त्यांना किती पैसे पाठवायचे असा मेसेज पाठविला असता, समोरुन प्रथम 18हजार रुपये व त्यांनतर 10-10 हजार रुपये अर्जंट पाठविण्यास सांगितले. त्यानुसार अभिषेकने तत्काळ समोरील व्यक्तीने पाठविलेल्या युपीआय आयडी नंबरवरुन दोन वेळा 38 हजार रुपये पाठवून दिले. त्यानंतर समोरील व्यक्तीने पुन्हा 22 हजार रुपये पाठविण्या बाबतचा मेसेज अभिषेकला पाठविला. त्यानुसार अभिषेकने पुन्हा 22 हजार रुपये ऑनलाईन पाठवून दिले. 

मात्र सदरची रक्कम न गेल्याने ती रक्कम दोन दिवसानंतर अभिषेकच्या खात्यात परत आली. दरम्यान, अभिषेकने पाठविलेली रक्कम त्याच्या मामाने दुसर्‍या दिवशी परत न पाठविल्याने अभिषेकने आपला मामा नितेश पांडे यांच्या मुख्य नंबरवर फोन करुन आपल्या पैशांची मागणी केली. यावेळी नितेश पांडे यांनी अभिषेकला कुठल्याही प्रकारचा मेसेज पाठविला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे अभिषेकने व्हॉट्अ‍ॅपवरुन त्याला मेसेज पाठविणार्‍या व्यक्तीला मेसेज पाठवून त्याच्याकडे पैशांची मागणी केली असता, समोरील व्यक्तीने त्याची फसवणूक केल्याचे सांगून तो त्याला ओळखत असल्याचे तसेच त्याचे पैसे 15 दिवसात परत करणार असल्याचे त्याला मेसेजद्वारे सांगितले. त्यानंतर आपली अज्ञात व्यक्तीकडून फसवणुक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने खांदेश्‍वर पोलीस ठाणे गाठुन तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात टोळीविरोधात फसवणुकिसह आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.

Categories
कोल्हापूर हातकणंगले ब्रेकिंग न्युज

पंचगंगा नदीसाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

कोल्हापूर ,ता.२: कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायी असलेली पंचगंगा नदी उद्योगधंद्यात बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे प्रदूषित झाली आहे. त्यामुळे या प्रदूषणावर नियंत्रण करण्यासाठी आवश्यक निधीसह पंचगंगा नदीसाठी स्वतंत्र अधिकार असलेले प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. सदर बैठक मुंबई येथील मुख्यमंत्री निवासस्थान वर्षा बंगल्यावर झाली.यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व संपर्कमंत्री कोल्हापूर उदय सामंत,नाम.राजेंद्र पाटील यड्रावकर,संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर, खासदार प्रा.संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, मा.आमदार उल्हास पाटील, मा.आमदार राजेश क्षिरसागर, मा.आमदार चंद्रदिप नरके, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, मा.आमदार सत्यजित पाटील, मा.आमदार डॉ.सुजित मिणचेकर आदी उपस्थित होते. दरम्यान,कोल्हापूर जिल्ह्यासाठी जिवनदायीनी असलेली पंचगंगा नदी उद्योगधंद्यातून बाहेर पडणाऱ्या प्रदुषित
पाण्यामुळे दुषित झाली आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघातील इचलकरंजी सह हातकणंगले व शिरोळ तालुक्यातील अनेक गावांना नदी प्रदूषणाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे पंचगंगा प्रदूषण मुक्त होण्यासाठी भरीव निधी सह स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी खासदार धैर्यशील माने यांनी केली आहे प्रदूषणाचा विळखा मोठ्या प्रमाणात असल्याने जलचर प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून याचा परिणाम नदीकिनारी असलेल्या गावातील नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे सदर प्रश्नाचे गांभीर्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिल्याने या प्रश्नाबाबत लवकरच उच्चस्तरीय बैठक घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली.

पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.यासाठी पक्षाचे माजी आमदार बळ देणार आहेत.खासदार धैर्यशील माने.

मुंबई: येथे पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी निवेदन देताना खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक,संपर्कमंत्री उदय सामंत,मंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर,संपर्कप्रमुख अरुणभाई दूधवाडकर व आदी.
Categories
ब्रेकिंग न्युज

राज्यात ३१ जानेवारीपर्यंत लॉकडाऊन कायम; ‘या’ सवलती सुरु राहणार


पाटण हिंदू सम्राट प्रतिनिधी उमेश सुतार यांजकडून
राज्यात करोनामुक्तांचं प्रमाण वाढत असलं तरी नवीन करोना स्ट्रेनचं संकट अद्यापही राज्यावर आहे. भारतात करोनाच्या नव्या विषाणूची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. राज्यात नवीन करोना स्ट्रेनचा अद्याप एकही रुग्ण सापडला नसला तरी खबरदारी म्हणून राज्यातील लॉकडाऊन ३१ जानेवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा आदेश आज ठाकरे सरकारकडून जारी करण्यात आला आहे. राज्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये हा लॉकडाऊन असणार असल्याचंही या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

राज्यात आत्तापर्यंत मिशन बिगिन अगेन अंतर्गंत अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. आतापर्यंत ज्या सवलती देण्यात आल्या आहेत त्या यापुढेही कायम ठेवतानाच कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊन ३१ जानेवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच, लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करण्यात यावं, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

राज्यात करोनाच्या नवीन स्ट्रेनचा धोका कितपत?; आरोग्यमंत्र्यांनी दिलं दिलासादायक

तसंच याआधी ३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबरला मिशन बिगीन अगेन अंतर्गत निर्बंध शिथील करत प्रसिद्ध करण्यात आलेल्या गाईडलाइन्स ३१ जानेवारीपर्यंत लागू राहतील असंही आदेशात स्पष्ट केलं आहे. तसंच, याआधी परवानगी देण्यात आलेल्या सर्व गोष्टी नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहेत.

Categories
इंदापूर ब्रेकिंग न्युज

विठोबा (तात्या) भरणे अनंतात विलीन; भरणे कुटुंबाचे छत्र हरपले.

इम्तिहाज मुलाणी :
इंदापूर (प्रतिनिधी):

इंदापूर 30 // राज्याचे सार्वजनिक बांधकाम,वने, दुग्ध व पशुसंवर्धन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना पित्रृशोक झाला. त्यांचे वडील विठोबा (तात्या ) रामा भरणे यांचे वयाच्या 92 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्यावर आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भरणेवाडीत हजारोंच्या उपस्थिती अंत्यसंस्कार करण्यात आले.

गेल्या काही दिवसापासून तात्या आजारी असल्यामुळे त्यांना पुणे येथे उपचारासाठी हलवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान मंगळवारी रात्री सव्वाअकरा वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या पाठीमागे पत्नी,राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह चार मुले व तीन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे

अंत्यविधीस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी सहकार व संसदीय मंत्री हर्षवर्धन पाटील, दौंडचे आमदार राहुल कुल,करमाळाचे आमदार संजय शिंदे, माजी आमदार रामहरी रुपनवर, दौंडचे माजी आमदार व पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, महाराष्ट्र राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक ,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, युवानेते राजवर्धन पाटील यांच्यासह हजारो जनसमुदाय उपस्थित होता.

Categories
अहमदनगर ब्रेकिंग न्युज सातारा

माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे जानेवारीत सातारा येथे राज्यस्तरीय अधिवेशन


अहमदनगर- कमलेश शेवाळे


महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांच्या ऑनलाइन गूगल मिटद्वारे बैठकीत निर्णय–दिपक कांबळे.

मनुष्य हा समाजशील प्राणी असून समाजात वावरतांना त्याला अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो. समाजाच्या तळागाळातील लोकांवर होणारा आत्याचार अधिकारी वर्गाची दडपशाही विविध संस्थांमध्ये होत असलेला भ्रष्टाचार आधी सर्वच गोष्टींवर जाणीवपूर्वक लक्ष ठेवून त्यांना न्याय कसा मिळवून देता येईल व संघटनेच्या मजबूत बांधणीसाठी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती चे राज्यस्तरीय अधिवेशन लवकरच सातारा येथे घेण्यात येणार असून पत्रकारांवर होत असलेले हल्ले रोखण्यासाठी व त्यांना शासनाच्या मार्फत संरक्षण मिळावे हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून राज्यस्तरीय माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती आणि पोलिसमित्र समितीच्या महाराष्ट्रातील सर्व पदाधिकारी यांची ऑनलाईन गुगल मिट द्वारे बैठक घेण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष दीपक कांबळे यांनी दिली आहे.
यावेळी २४ जानेवारी रोजी सातारा येथील राज्य स्तरावर होणाऱ्या मेळाव्याचे नियोजना संदर्भात महत्वाची व साधक बाधक चर्चा करण्यात आली असून या बैठकीत राष्ट्रीय महासचिव कमलेश शेवाळे यांनी संघटनेचे उद्दिष्ट सांगितले व कामकाज कशाप्रकारे करावे ? याबद्दलचे मार्गदर्शन केले तसेच महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेश सारणीकर, राष्ट्रीय अध्यक्ष दिपक कांबळे यांनी संघटनेच्या कामात पुढील काळात कोणते बदल केले जातील व आपली संघटना कशाप्रकारे वाढवावी लागेल ? संघटनेची ध्येय धोरणे कशा पद्धतीने अमलात आणता येतील? याबद्दलची सविस्तर माहिती दिली.तसेच महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अमर बेंद्रे व आपल्या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक कांबळे यांनी भविष्यात राज्यस्तरीय अधिवेशन घेण्यासंदर्भात माहिती दिली.
या बैठकीत माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती मार्फत महाराष्ट्रामध्ये भव्यदिव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे, तसेच मेळाव्यास अधिकाधिक पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवावी, विभागीय, जिल्हा व तालुका कार्यकारिणी नियुक्त्या.व्हॉटस अप ग्रुप अनावश्यक मेसेज ग्रुप वर टाकण्यास मनाई,मेळाव्याच्या नियोजनासंदर्भात सर्व पदाधिकारी यांच्यामध्ये चर्चा, संघटनेच्या कामकाजा संदर्भात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणून संघटनेचे मोबाईल ॲप बनवणार आहेत या ॲपचे मेळाव्या दरम्यान ओपनिंग करण्याचे आयोजन तसेच मेळावा संदर्भात अधिक माहिती येत्या दिनांक ६ किंवा ७ जानेवारी दरम्यान “पूर्व नियोजन बैठक” घेऊन संपूर्ण माहिती प्रसारित करण्यात येणार आहे.,हा संघटनेचा मेळावा होत असल्याने संघटनेतील सर्व पदाधिकारी विभागीय अधिकारी जिल्हाधिकारी यांनी मेळाव्यास संदर्भात आपल्या विभागातून किती पदाधिकारी उपस्थित राहणार आहे यासंदर्भात पूर्वसूचना द्यावयाच्या आहेत,या मिटिंग मध्ये संघटनेचे फेसबुक अकाउंट मध्ये जॉईन होण्यास विनंती केली आहे हे अधिकाधिक पदाधिकारी व सर्वसामान्य लोकांपर्यंत या फेसबुक अकाउंट पोचवण्याची जबाबदारी सर्वांनी घ्यावी.
मेळाव्यादरम्यान सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नियुक्ती पत्र मान्यवरांच्या हस्ते देण्याचे योजले आहे आदी विषयांवर साधक-बाधक चर्चा करण्यात आली.

यावेळी या गुगल मिटद्वारे घेण्यात आलेल्या बैठकीत माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीचे
दिपक कांबळे(राष्ट्रीय अध्यक्ष), कमलेश शेवाळे(राष्ट्रीय महासचिव),महेश सारणीकर(महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष),
वजीर शेख (पोलीस मित्र समिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष )
अमर बेंद्रे (महाराष्ट्र उपाध्यक्ष),पुष्कर सराफ (महाराष्ट्र उपाध्यक्ष),तुळशीराम जांभूळकर (महाराष्ट्र उपाध्यक्ष),
उमेश काशीकर (महाराष्ट्र उपाध्यक्ष),दिनेश शिंदे (महाराष्ट्र संघटक),सुभाष भोसले (महाराष्ट्र सचिव), चांदभैय्या शेख (महाराष्ट्र समन्वयक ),रामभाऊ आवारे (उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख), सुरेश संकपाळ्, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष,प्रशांत भोसले (पश्चिम महाराष्ट्र कार्याअध्यक्ष),नितीन गुरव (पुणे जिल्हाध्यक्ष),
शेखर बडगे(अमरावती जिल्हाध्यक्ष),सौ श्वेता व्हनमाने
(पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा ),सौ सोनाली पोतदार
(पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा),सौ शिल्पा बनपुरकर
(चंद्रपूर महिला जिल्हाध्यक्षा),महेंद्रकुमार देशमुख
(पोलीस मित्र सोलापूर जिल्हाध्यक्ष),पोपटराव कोळेकर
(पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष),दिलिप जाधव(पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष), विवेक कुंभे जकर पश्चिम महाराष्ट्र सचिव राजु कुलकर्णी(पुणे जिल्हा उपाध्यक्ष) आदींनी बैठकीत सहभाग नोंदवुन अडी अडचणी सोडविण्यासाठी अतिशय खेळीमेळीच्या व आनंदी वातावरणात ही बैठक पार पडली. तर पोलीस मित्र समितीचे प्रदेशाध्यक्ष वजीर शेख यांनी सांगितले की लवकरच पोलीस मित्र समिती ची महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात येईल. सर्व मान्यवरांनी आपली मते, विचार मांडले त्यामुळे संघटनेची माहिती मिळाली अशाप्रकारे महिन्यातून एकदा बैठक बोलावली म्हणजे संघटनेचे कार्य कसे चालले आहे व पुढील कार्य कसे करायचे आहे यांचे मार्गदर्शन होईल .

Design a site like this with WordPress.com
Get started