Categories
गुन्हेगारी पुणे

चिनी लोन अँपवर बंदी घाला आणि चिनी अँप साठी वसुलीचे काम करणाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा- माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती


पुणे दिनांक १०- (प्रतिनिधी )
सध्या संपुर्ण भारतात चिनी लोन अँपचा सुळसुळाट झाला आहे.कमी वेळात आणि झटपट कर्जाचे आमिष दाखवून या चिनी कंपन्या अक्षरशः खाजगी सावकारा प्रमाणे लूटमार करत आहे.अशा चिनी लोन अँपवर सरकारने कठोरपणे कारवाई करून त्यांच्यावर बंदी घालावी आणि त्यांच्यासाठी वसुली एजंट म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने सरकारला करण्यात आली आहे.
या चिनी कंपन्याचा कर्जाच्या नावाखाली अक्षरशः नंगानाच सुरू आहे, भरमसाठ व्याज आकारून कर्जदारांना मेटाकुटीला आणत आहेत.यांच्या कर्जवसुलीला कुणाचेही नियंत्रण नाही.प्रोसेसिंग फीच्या नावाखाली अवाच्या सव्वा रक्कम आकारत आहे. यांच्यावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने यांचे चांगलेच फावले आहे. या चिनी कंपन्याच्या कर्ज वसुलीसाठी एजंट म्हणून काम करणाऱ्या भारतीय लोकांना जरा सुद्धा आपल्या भारतीय कर्जदाराबद्दल सहानुभूती नाही, हे लोक चिनी कंपनीला कर्जवसुलीला मदत करून एकप्रकारे देशद्रोहाचा गुन्हा करत आहेत. हे वसुली एजंट कर्जदारांना अर्वाच्य भाषा, शिवीगाळ तसेच दमदाटी आणि धमकी देतात तसेच सतत वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरुन नातेवाईकांना फोन करून मानसिक त्रास देतात या वसुली एजंटच्या त्रासामुळे काही लोकांनी आत्महत्या पण केली आहे ,त्यामुळे सरकारने त्वरित या चिनी लोन अँपवर बंदी घालून त्यांच्या वसुली एजंट आणि कॉल सेंटरवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावे अशीही मागणी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीने केली आहे.

Categories
पुणे

प्रिया घाडगे यांची पुणे जिल्हा युवती सचिव पदी निवड

दौंड,प्रतिनिधी:-

क्षत्रिय मराठा परिवाराच्या पुणे जिल्हा युवती सचिव पदी प्रिया दत्तात्रय घाडगे यांची निवड करण्यात आली, या नियुक्तीचे पत्र पुणे जिल्हा प्रमुख तसेच प्रदेश संघटक संपर्क प्रमुख वैभव सयाजी पाटील,पुणे जिल्हा युवक प्रमुख दत्तात्रय गोपाळ सपकाळ यांनी दिले आहे,प्रिया घाडगे यांनी युवती संघटन,महिला सबलीकरण,निर्भय कन्या आशा उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन युवती साठी कार्य केले आहे, याही पुढे क्षत्रिय मराठा परिवाराच्या वतीने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पुढे करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले

Categories
कला व मनोरंजन पुणे

पुण्याच्या अभिनेत्री पुष्पा चौधरी यांनी पटकावले मुंबई ग्लोबल इंडिया स्पर्धेत मिसेस कॉन्फिडेंट अवार्ड

प्रतिनिधी. पौर्णिमा प्रकाश बुचके

ती आली ,तिने पाहिले,ती बोलली आणि ती जिंकली…खरं तरुण तरुणींचा हा मुंबई ग्लोबल इंडिया स्पर्धा कार्यक्रम… पण आपले वय बाजूला ठेऊन तरुणींना लाजवेल असा दृढ आत्मविश्वास व जिद्द या जोरावर मिसेस कॉन्फिडेंट हा किताब पटकावत देवमाणूस या झी वाहिनीवरून वंदू आत्या ही भूमिका साकारत घराघरात पोचलेल्या पुण्याच्या वारजे येथील अभिनेत्री पुष्पा चौधरी यांनी स्पर्धेत पुण्याचे नाव रोषण केले.16 डिसेंबर ला नुकतीच मुंबईत ही स्पर्धा संपन्न झाली.स्पर्धेत सर्वजण इंग्रजी झाडत असताना पुष्पा चौधरी यांनी मी विद्येचे माहेरघर पुणे येथील अभिनेत्री पुष्पा चौधरी प्रेक्षकांना अभिवादन करते.असं म्हणत मराठीची शान वाढवली.एकंदरीत सर्व स्पर्धेत त्यांचा उत्साह व आत्मविश्वास परीक्षक व प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होता.त्यांचा प्रचंड आत्मविश्वास व कामाची जिद्द या जोरावर त्यांनी हा किताब पटकावला.

या कार्यक्रमाला बाॕलीवुड मधील बऱ्याच सेलेब्रेटींनी आपली उपस्थिती दर्शविली होती. जसे की पृथ्वी, अली खान, आरती नागपाल, राजपाल यादव,सुनील पाल. शो चे अॕकरींग बाॕलीवुड अभिनेता आणि अमन वर्मा यांनी केले.संपूर्ण देशातून 30 तरुणींनी या स्पर्धेत भाग घेतला होता.

Design a site like this with WordPress.com
Get started