Categories
कोल्हापूर क्रीडा

राष्ट्रीय सबज्युनियर व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी कागलच्या खेळाडू व प्रशिक्षक यांची अभिनंदनीय निवड


कोल्हापूर- सुभाष भोसले
पन्हाळा येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय सबज्युनियर व्हॉलीबॉल स्पर्धेमधून कागल मधिल शाहू हायस्कूल ज्युनियर कॉलेजचे व क्रीडा विकास फाउंडेशन कागल,भगवा रक्षक व्हॉलीबॉल क्लब कागल चे खेळाडू कुमार मयूर सुतार व कुमारी स्मृती पोटले यांची महाराष्ट्र राज्य संघामध्ये निवड झाली आहे.तसेच महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदी महेश शेडबाळे व सहाय्यक प्रशिक्षक कधी प्रवीण मोरबाळे यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र राज्याचा संघ वेल्लूर तामिळनाडू येथे होणाऱ्या राष्ट्रीय सबज्युनिअर व्हॉलीबॉल स्पर्धेत सहभागी होणार आहे सदर स्पर्धा 24 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2021 दरम्यान संपन्न होणार आहेत.
खेळाडूंना भारतीय व्हॉलीबॉल संघाचे सह सचिव व महाराष्ट्र राज्य हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव बाळासाहेब सुर्यवंशी, शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सचिव जयकुमार देसाईसो, पेट्रन कौन्सील सदस्य दौलत देसाई ,प्रशासन अधिकारी मंजिरी मोरे(देसाई),उपाध्यक्ष शिवाजी सावंत यांचे प्रोत्साहन व शाहू हायस्कूल ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य जे.डी पाटील, कोजिमाशि चेअरमन व उपमुख्याध्यापक बाळ डेळेकर,उपप्रचार्य बी . के . मडीवाळ, श्री एस जी पाटील पर्यवेक्षिका सविता कुलकर्णी, श्री एस यु देशमुख ,भगवा रक्षक व्हॉलीबॉल क्लबचे अध्यक्ष नितीन दिंडे ,चंद्रकांत कासोटे,वैभव आडके यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सर्व खेळाडू व प्रशिक्षक यांचे अभिनंदन होत आहे .

Categories
कोल्हापूर क्रीडा

जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा व निवड चाचणीचे १३ तारखेला आळते येथे आयोजन

जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा (१६ व १८ वर्षाखालील मुले व मुली) व निवड चाचणीचे आयोजन १३ तारखेला आळते येथे

महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन मार्फत राज्यस्तरीय १६ वर्षाखालील (२७ फेब ते १ मार्च २०२१,उस्मानाबाद) व १८ वर्षाखालील (०५ ते ०७ मार्च २०२१, बीड) या ठिकणी या स्पर्धेंचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर स्पर्धेमध्ये कोल्हापूर विभागाचा संघ साहभागी होणार आहे.त्या पूर्वी कोल्हापूर जिल्ह्याचा संघ निवड चाचणी कोल्हापूर पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या वतीने शनिवार,दिनांक १३ फेब्रुवारी २०२१ रोजी,मॉडर्न विद्यानिकेतन आळते ता.हातकणंगले या ठिकाणी स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. या स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील व्हॉलीबॉल खेळाडू,शाळा व क्रीडा मंडळानी सहभाग घ्यावा

सदर स्पर्धेमध्ये जे खेळाडू,शाळा व मंडळ सहभागी होणार आहेत त्यांनी मा.श्री.गौरव खामकर (९५११८२३७८७) व इब्राहीम शेख (८६६८७३३०४२) यांना संपर्क करावा असे संघटनेचे सचिव मा.श्री.शिवाजी पाटील यांनी कळविले आहे. सदर स्पर्धेमध्ये सहभागी होण्या-या खेळाडूंची जन्म तारीख :-१६ वर्षाखालील मुले व मुली (०१/०१/२००५) व १८ वर्षाखालील मुले व मुली (०१/०१/२००३) च्या नंतर जन्मलेले असावेत.

Categories
कोल्हापूर क्रीडा

पुणे येथील ज्युनियर राज्यस्तरीय स्पर्धेत मोमेंटम अकॅडमीचे उज्ज्वल यश

पिंपरी चिंचवड पुणे येथे चालू असणाऱ्या ज्युनियर राज्यस्तरीय स्पर्धेत मोमेंटम अकॅडमीचे विजेते खेळाडू पुढील प्रमाणे
18 वर्षाखालील मुले 100 मीटर

  1. दिग्विजय चौगुले -प्रथम क्रमांक (१०.९५से.)
  2. सार्थक शेलार -द्वितीय क्रमांक(११.११से.)

18 वर्षाखालील मुले 400 मीटर

  1. अविनाश पाटील- द्वितीय क्रमांक(४९.९०से.)

20 वर्षाखालील मुले लांब उडी

  1. रामेश्वर महाडिक -तृतीय क्रमांक(६.५१मी.)
    या खेळाडूंच्या सत्कार प्रसंगी कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र राष्ट्रीय खेळाडू पीएसआय मा.नंदकुमार कदम व पीएसआय मा. पुजारी यांचे हस्ते झाला.या प्रसंगी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष श्री. अमर सासणे, उपाध्यक्ष श्री.महेश पोवार , संस्थेचे सचिव व आंतरराष्ट्रीय ॲथलेटिक्स मार्गदर्शक श्री. सुभाष पवार, प्रशिक्षक श्री दिग्विजय मळगे व गौरेश पोवार
Categories
कोल्हापूर क्रीडा ब्रेकिंग न्युज

पै.खाशाबा जाधव यांची जयंती यानिमित्त जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार

प्रशांत भोसले
दिनांक 15 जानेवारी 2021 स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते स्वर्गीय खाशाबा जाधव यांची जयंती यानिमित्त जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने ऑलिम्पिक स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी पात्र ठरलेल्या व शासनाचे अनुदान मिळालेल्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या सत्काराचा कार्यक्रम भवानी मंडपामध्ये आयोजित करण्यात आला होता. सकाळी साडे आठ वाजता भवानी मंडप परिसरातील किर्तिस्तंभला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली योग प्रशिक्षक श्री रवी भूषण कुमठेकर यांची विद्यार्थिनी कुमारी गार्गी भट हे योगाची प्रात्यक्षिके करून दाखवले.
कार्यक्रमातऑलम्पिक निवडचाचणीसाठी पात्र ठरलेले व खेळाडू श्रीमती तेजस्विनी सांवत,राहि सरनोबत, स्वरुप उन्हाळकर,आंतरराष्ट्रीय खेळाडू ज्याना शासनाकडून अनुदान प्राप्त झाले आहे.उज्वला चव्हाण,अभिषेक जाधव,अफ़्रिद अत्तर,विवेक मोरे,स्वप्निल पाटील,आरती पाटील,वैष्णवी सुतार ,प्रथमेश कापडे,दत्तप्रासद चौगले,खुशबु रिकिबादर,तसेच मान्तेश पाटील,पृथ्वीराज पाटील,सुरज आसवले ,कोमल देसाई इ.खेळाडुंचा सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करत असताना शालेय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा सांगितला शासनाच्या वतीने खेळाडूंना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा आधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षण शिबिराचे आयोजन यातून भविष्यात देखील अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू कोल्हापूर उघवते खेळाडु स्व.खाशाबा जाधव यांच्याकडून प्रेरणा घेऊन कोल्हापूरचे नाव जागतिक स्तरावर पोहोचतील असा मानस व्यक्त केला. अर्जुनअवार्डीआंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू कुमारी शैलजा साळोखे यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना पूर्वीच्या काळी असणारी सुविधांची कमतरता व त्या प्रतिकूल परिस्थितीत जुन्या काळातील खेळाडू मेहनतीच्या जोरावर आपली कामगिरी अति उच्च स्तरावर नेत असल्याचे सांगितले तसेच याप्रसंगी खाशाबा जाधव यांचे पुतणे यांनी खाशाबा जाधव यांना केंद्रशासनाकडून भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणीही केली केली. राज्य शासनाकडुन खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणीही केली. खाशाबा जाधव यांचे शिक्षण कोल्हापूर मध्ये राजाराम कॉलेज व कुस्तीचा सराव मोतीबाग तालीम येथे झाल्याचे सांगून कोल्हापूरच त्यांची कार्य कर्मभूमी होते, याची आठवण करून दिली. आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत यांनीही याप्रसंगी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे नावाच्या किट घातल्यानंतर ज्या भावना मनामध्ये येतात तशाच भावना मी कोल्हापूरची असल्याचे सागून जर खेळाडुच्या किट्च्या पाठीवर कोल्हापूरचे नाव असेल तर नक्कीच अभिमान व आनंद होईल असे सांगून जिल्हा क्रीडा अधिकारी यांना त्यांनी पुढील येणाऱ्या स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याचे खेळाडूंसाठी स्वतंत्र कोल्हापूरची ओळख असेल असे कीट देण्याची विनंती केली. माननीय आमदार श्री चंद्रकांत जाधव यांनीही सत्कारमूर्ती आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे कौतुक करून त्यांना पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या व कोल्हापुरात सुसज्ज दर्जाच्या खेळ सुविधा भविष्यामध्ये निर्माण करण्यात येणार असल्याचे सांगून येणार असल्याचे आश्वासन याप्रसंगी त्यांनी दिली माननीय जिल्हाधिकारी श्री दौलत देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना कोल्हापूरला क्रीडा परंपरेची असणारी परंपराही किती जुन्या काळापासून आहे याची माहिती दिली , 1920 सालच्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतही कोल्हापूरचा रंगनाथ पाटील यांनी सहभाग घेतल्याचे त्यांनी सांगितले या प्रसंगी कोल्हापूरच्या लोकांमध्ये कुस्तीविषयी असणाऱ्या प्रेमाची आठवण सांगत असताना ते विद्यार्थ्यांची विद्यार्थीदशेत असताना पैलवान युवराज पाटील आणि पैलवान सतपाल यांच्या मध्ये कोण जिंकणार याची घराघरांमध्ये चर्चा रंगत असे अशी आठवणही त्यांनी सांगितली या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर श्रीमती शैलजा साळुंखे टेबल-टेनिस अर्जुन वीर माननीय आमदार चंद्रकांत जाधव माजि महापौर श्रीमती निलोफर आजगेकर, श्रीमती शोभाताई बोंद्रे , हिंदकेसरी दीनानाथ सिंह व जीवनगौरव पुरस्कार ते बिभीषण पाटील तसेच स्व.खाशाबा जाधव यांचे पुतणे शामराव पुतणे व सचिन चव्हाण आंतरराष्ट्रीय क्रीडा नेमबाज सचिन च्व्हाण जिल्हा अधिकारी सर्व कर्मचारी व शिक्षक वृंद उपस्थित होता.क्रीडा कार्यालयाचे क्रीडा अधिकारी माने सर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Categories
कोल्हापूर हातकणंगले क्रीडा ब्रेकिंग न्युज

फिट इंडीया मुहमेंट अंतर्गत हातकणंगले तालुक्यातील शाळांची नोंदणी संदर्भात मार्गदर्शन बैठक संपन्न

क्रीडा शिक्षकांनी नेहमी विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवून रमाकांत आचरेकर यांच्यासारखे आदर्श गुरुवर्य बनावे: उपशिक्षणाधिकारी मा. श्री. डी .एस पोवार

प्रशांत भोसले

हातकलंगले इयत्ता १ ते १२ वी च्या शाळांनी आपली नोंदणी फिट इंडियाच्या पोर्टलवर नोंदणी करण्यासंदर्भात मार्गदर्शन बैठकीचे आयोजन केले होते. हातकणंगले तालुक्यातील सर्व क्रीडाशिक्षक व शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद कोल्हापूर उपशिक्षणाधिकारी मा. श्री. डी .एस पोवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीर शैक्षणिक संकुल कुंभोज येथे मार्गदर्शक बैठक संपन्न झाली

कार्यक्रमाची सुरुवात शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील व माऊली लक्ष्मीबाई पाटील यांच्या पवित्र प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. संचालक प्रा. एस .जी. मसुटगे यांनी सर्व मान्यवर पाहुण्यांचे स्वागत केले तसेच रयत शिक्षण संस्थेची प्रतिज्ञा सर्व क्रीडा शिक्षकांनी घेतली . मा. सागर चूडाप्पा खोतवाडी हायस्कूल मुख्याध्यापक यांनी आपल्या प्रस्ताविक मध्ये फिट इंडिया कार्यक्रमांतर्गत शाळांच्या नोंदणी विषयक माहिती सांगितली तसेच कोरोना काळातील परिस्थिती पाहता खेळाचे महत्व अधिक आहे. बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकासाचे महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले.

कोल्हापूर ज़िल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष ,श्री. राजेंद्र बुवा (रुकडी ) संताजी भोसले सर ( पेठ वडगांव ), भिकाजी माने सर( इचलकरंजी) प्रा. संभाजी पाटील सर ( घुणकी) व शिवाजी पाटील सर (मिणचे ) इत्यादी क्रीडा शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .

या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक उपशिक्षणाधिकारी मा.श्री. डी .एस पोवार यांनी आपल्या शैक्षणिक अनुभवाचे आलेल्या विविध दाखल्यांचे देत सर्व क्रीडा शिक्षकांना बहुमोल असे मार्गदर्शन केले. कोल्हापूर माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत आजवर जवळजवळ दोन/ अडीच हजार शाळांची तपासणी करीत असताना आलेल्या विविध अनुभवांची त्यांनी आपल्या विशिष्ट शैलीमध्ये सर्व क्रीडा शिक्षकांना ज्ञानाची शिदोरी दिली. ज्या पद्धतीने घराचे वैशिष्ट्ये दारातील रांगोळी वरून लक्षात येते त्याच पद्धतीने शाळेचे वैशिष्ट्य हे शाळेतील क्रीडा शिक्षकांच्या कार्यावरून कळते या तपासणी अंतर्गत सर्वात जास्त भावलेला व्यक्तिमत्त्व म्हणजे क्रीडाशिक्षक होय असे ते म्हणाले. सर्व शिक्षकांनी आपली जबाबदारी व कर्तव्य लक्षात घेऊन कार्य करावे तसेच शैक्षणिक अनुभवातून त्यांनी शिक्षकांचे चार प्रकारांमध्ये वर्गीकरण केले सांगितले यामध्ये त्रस्त, सुस्त, व्यस्त व मस्त अशा गटामध्ये वर्गीकरण केले व आपण मस्त गटांमध्ये सहभागी होणारे क्रीडाशिक्षक घडावेत अशी इच्छा व्यक्त केली तसेच बैलाच्या गळ्यात बांधलेल्या घुंगराची ची गोष्ट सांगत क्रीडा शिक्षकांनी वास्तविक परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शाळेमध्ये अधिकचे काही देण्याची वृत्ती बाळगून कार्य करावे असे त्यांनी सांगितले क्रीडा शिक्षकांनी नेहमी विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवून रमाकांत आचरेकर यांच्यासारखे आदर्श गुरुवर्य बनावे असे त्यांनी सांगितले.

सर्व क्रीडा शिक्षकांनी आपल्या शाळेचे फिट इंडिया अंतर्गत नोंदणी करावी व येणाऱ्या काळामध्ये शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनासंदर्भात शाळांना लाभ घ्यावयाचा असेल तर फिट इंडिया नोंदणीची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले तसेच संचमान्यता संदर्भात देखील या नोंदणीचे महत्त्व असल्याचे निदर्शनास आणून दिले . ३१ मार्च २०२१ अखेर फिट इंडिया पोर्टलवर आधार अपडेट करणे विषयक देखील माहिती सांगितले तसेच क्रीडा शिक्षकांनी क्रीडा माहितीची ज्ञानेश्वरी जतन करणे आवश्यक असलेलेचे त्यांनी सांगितले.तसेच हातकणंगले पंचायत समिती विस्ताराधिकारी एस.बी जमादार सर यांनी आभार मानले.

यावेळी हातकणंगले विस्ताराधिकारी मा.श्री.एस.बी. जमादार, मा. सागर चुड्डाप्पा सर व महात्मा गांधी विद्यालया रुकडीचे प्राचार्य मा.श्री उत्तम शेळके सर तसेच मा. बकरे , उर्दू विभाग प्रमुख हातकणंगले मा.श्री.पटेल सर रयत गुरुकुलचे मा.श्री.सागर माने सर इत्यादी मान्यवर हातकणंगले तालुक्यातील सर्व क्रीडाशिक्षक उपस्थित होते.

Categories
कोल्हापूर क्रीडा

पवित्र पोर्टल मध्ये बी.पी.एड व बी.एड फिजिकल आर्हतेचा समावेश करण्यात या मागणीचे निवेदन शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावर यांना महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने देण्यात आले .

महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने शिक्षक आमदार प्रा . जयंत आसगावकर यांना निवेदन देताना उपाध्यक्ष आर .डी पाटील,सचिव संदीप पाथरे विभागीय सचिव महेश सूर्यवंशी ,संदीप पाटील दिलीप राऊत.

प्रशांत भोसले
महाराष्ट्र राज्यात शारीरिक शिक्षण शिक्षकांची अनेक पदे रिक्त आहेत. शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये या पदाला प्राधान्य मिळणे आवश्यक असताना राज्य स्तरावर शिक्षक संचमान्यता (पोर्टल)ऑनलाइन भरती प्रक्रियेत बीपीएड व एमपीएड अर्हतेचा उल्लेख नाही त्यामुळे 2012 पासून शेकडो शारीरिक शिक्षण शिक्षकांची पदे रिक्त आहेत . अनेक शाळांमध्ये शारीरिक शिक्षणाचे शिक्षक उपलब्ध नाही यामुळे विद्यार्थ्यांच्या शारीरिक विकासावर प्रश्न उभा राहिला आहे .शालेय स्पर्धांमध्ये सहभाग नोंदणी कमी होत आहे राज्याच्या क्रीडा विकासावर याचे गंभीर व दूरगामी परिणाम होण्याची शक्यता असल्याने शासनाच्या 14 मे 1987 च्या परिपत्रकाद्वारे नमूद केल्याप्रमाणे भरती प्रक्रियेमध्ये बीएड समकक्ष बीपीएड अर्हता समजून त्याचा समावेश पोर्टलमध्ये होणे अत्यावश्यक आहे .अशी मागणी राज्य महासंघाचे उपाध्यक्ष आर.डी.पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी विभागीय सचिव महेश सूर्यवंशी ,कोल्हापूर संघटनेचे सचिव संदीप पाथरे,दिलीप राऊत,संदीप पाटील उपस्थित होते .

Categories
क्रीडा सोलापूर

दिवंगत स्व. भारत भालके यांच्या स्मरणार्थ पंढरपूर शहरात उभारणार भव्य क्रीडा संकुल

(क्रीडामंत्री सुनील केदार यांची माहिती)

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यातील, पंढरपूर शहरामध्ये क्रीडा प्रेमीसांठी उभारणार भव्य क्रीडा संकुल यामध्ये बॅडमिंटन हॉल,हॉकी, कुस्ती मॅट,ट्रक,इत्यादी अनेक खेळांचे प्रशिक्षण घेण्यासाठी शासकीय सुसज्ज क्रीडासंकुल उभारण्यात येईल व त्या क्रीडासंकुलास दिवंगत आमदार श्री.भारत नाना भालके यांचेच नाव देण्यात येईल असे आश्वासन क्रीडा मंत्री मा.ना.श्री. सुनील केदार यांनी दिले,तसेच समंधीत पंढरपूर क्रीडासंकुल यांचा सविस्तर प्रस्ताव शासनाकडे तातडीने सादर करावा असे आदेश माननीय क्रीडा मंत्री मोहदयांनी सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी यांना दूरध्वनीवरून आदेश दिले या पंढरपूर क्रीडा संकुल विषयी मा.भगीरथ दादा भालके (चेअरमन)श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखाना,मर्यादित वेणूनगर यांनी दिनांक:29/12/2020 रोजी माननीय क्रीडा मंत्री यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी भेट घेऊन दिवंगत आमदार भारत नाना यांचे अपूर्ण राहिलेले पंढरपूर क्रीडासंकुलाचे स्वप्न उभारणेसाठी पुढाकार घेतला असून त्यासाठी क्रीडामंत्री मोहदयानां निवेदन देऊन सदर पंढरपूर तालुक्यातील क्रीडा प्रेमींना न्याय देण्याची आग्रही विनंती केली, भगीरथ दादांची मागणी क्रीडा मंत्री यांनी तातडीने मान्य करून तात्काळ सूचना दिल्या त्यामुळे पंढरपूर मतदारसंघातील क्रीडा प्रेमी व तरुण युवकांमध्ये क्रीडा विषयीं आवड निर्माण होऊन त्या क्रिडा संकुलात शिक्षण घेऊन राज्य, देश,व आंतरराष्ट्रीय स्तरावर पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याचे नाव सातासमुद्रापार जाण्यास मदत होऊन,उत्तमोत्तम खेळाडू निर्माण होतील यात काही शंका असणार नाही-
मा. भगिरथ (दादा) भालके यांच्या प्रयत्नामुळे सर्व पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील सर्व क्रीडाप्रेमीमध्ये अतिशय आनंदाचे उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Categories
कोल्हापूर क्रीडा

मा.आमदार ऋतुराज पाटील यांची मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमला भेट

प्रशांत भोसले कोल्हापूर:-
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व दि डिस्ट्रीक्ट हॉकी असोसिएशन यांच्या वतीने क्रीडा कार्यालयामार्फत नाविण्यपुर्ण योजने अंतर्गत दि डीस्ट्रीक्ट हॉकी
असोसिएशन,कोल्हापूर यांना ५.०० लक्ष रू.चे क्रीडा साहित्य देण्यात आले.या साहित्याच्या उद्गाटनासाठी कोल्हापूर दक्षिणचे आमदार मा.श्री.ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.सदर उद्गाटनासाठी जिल्हा क्रिडा अधिकारी मा.श्री.डॉ.चंद्रशेखर साखरे,शासकीय योगा मार्गदर्शक मा.श्री.रवीभुषणकुमठेकर मा.श्री.कुमार
आगळगावकर,मा.श्री.सागरयवलुजे,मा.श्री.दुर्वास(बापूकदम,मा.श्री.विजय सरदार साळुखे,मा.श्री.सुदाम तोरस्कर,मा.श्री.नसीर मुल्ला,मा.श्री.ताहीर शेख,आदि मान्यवर उपस्थित होते.


सदर कार्यक्रमामध्ये खेळाडूंनी मनोगत व्यक्त केले.खेळाडूंनी त्यांच्या मनोगता मधुन हॉकी स्टेडियमला वसतीगृहाची गरज भासत असल्याचे सांगितले व खेळाडूंना क्रीडा साहित्य मिळाल्याबद्दल जिल्हा क्रीडा कार्यालयाचे आभार मानले.मा.आमदार ऋतुराज पाटील यांनी आपल्या भाषणातून वसतीगृहासाठी त्यांच्या
आमदार फंडातून २५.०० लक्ष रूपये जाहीर केले व उर्वरीत रक्कम जिल्हा नियोजन समिती व राज्यशासनाकडून अतिरीक्त तरतुद प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले व खेळाडूंना पुढील स्पर्धेस शुभेच्छा देऊन मेजर ध्यानचंद हॉकी
स्टेडियमची पाहणी केली.


सदर कार्याक्रमासाठी हॉकी या खेळाचे आंतरराष्ट्रीय पंच कु.श्वेता फाटील व कु.रमा पोतनीस तसेच हॉकी प्रशिक्षक श्री.योगेश देशपांडे,श्री.योगेश माने,श्री.ओंकार
भांडवले व प्रशिक्षण केंद्रा वरील खेळाडू आदि उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आभार श्री.सागर जाधव यांनी मानले.

Categories
कोल्हापूर क्रीडा

कोल्हापूर जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल असोसिएशनची सर्वसाधारण सभा अत्यंत उत्साहात संपन्न

कोल्हापूर जिल्हा पासिंग व्हाँलीबाँल असोसिएशन मार्फत आयोजित18 वर्षाखालील राष्ट्रीय मुला-मुलींच्या व्हॉलीबॉल स्पर्धा कोल्हापूर / बाचणी / पेठवडगाव या तिन्ही पैकी एका ठिकाणी व्हाँलीबाँल सामने रंगणार : सचिव शिवाजी पाटील यांनी केली उदघोषणा

महाराष्ट्र राज्य व्हाँलीबाँल सघटनेचे अध्यक्ष मा.विजयभाऊ डांगरे , यांचे मार्गदर्शन आणि सुचनेनुसार आपल्या जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू , प्रशिक्षक ,पंच , आणि संघटक यांना योग्य न्याय दिला जावा या सुचनेनुसार व्हाँलीबाँल खेळाचे विविध उपक्रम राबविणेबाबत वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते या मध्ये पुढील विषयावर चर्चा झाली १)जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजन आचार संहिता तयार करणे . २ )जिल्हा विभाग राज्य स्पर्धा आयोजन मागणी पत्र ३) जिल्हास्तर पंच परीक्षा प्रशिक्षण व संघटक उजळणी व प्रशिक्षण वेळापत्रक तयार करणे ४ ) विविध वयोगट खेळाडू पंच प्रशिक्षक नोंदणी करणे ५ ) जिल्हा संघटनेशी सर्व मंडळे शिक्षण संस्था व तालुका संघटना जिल्हा संघटनेशी संलग्न करून घेणे ६ )कोल्हापूर जिल्ह्यात होणाऱ्या 18 वर्षाखालील राष्ट्रीय हॉलीबॉल स्पर्धेच्या नियोजन संबंधी प्राथमिक चर्चा करणे ७ ) महाराष्ट्र राज्य हॉलीबॉल संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री विजय भाऊ डोंगरे यांची भारतीय हॉलीबॉल महासंघाच्या कार्य कार्य उपाध्यक्षपदी तसेच सचिव माननीय श्री संजय नाईक यांची भारतीय हॉलीबॉल महासंघाच्या सचिव पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन ठराव संमत करणे ७ ) सभा अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करणे सभे करीता कोल्हापूर जिल्हा व्हाँलीबाँल असो.चे अध्यक्ष मा.रमेश तोडकर , सचिव मा.शिवाजी पाटील ( सर ) , आंतरराष्ट्रीय व्हाँलीबाँल कोच मा.अजित पाटील ( सर ) व सर्व पदाधिकारी व कोल्हापूर जिल्ह्यातील विविध व्हॉलीबॉल क्रीडा मंडळाचे सन्माननीय पदाधिकारी विविध शाळेतील क्रीडाशिक्षक तसेच व्हाँलीबाँल प्रेमी यांच्या उपस्थितीत बाचणी येथे सभा संपन्न झाली सभेकरिता पन्हाळा मुरगुड जयसिंगपूर पेटवडगाव वारणा देवाळे शिरोली कोल्हापूर शहर चंदगड कागल लिंगनूर बाचणी राधानगरी भोगावती आधी ठिकाणावरून 22 सेंटरची चाळीस लोकांची उपस्थिती होती कोल्हापूर जिल्ह्यातील व्हॉलीबॉल खेळाच्या विकासासाठी आजची सभा निश्चितच प्रेरणादायी व मार्गदर्शक असे ठरली

Design a site like this with WordPress.com
Get started