Categories
इंदापूर

पुणे-सोलापूर महामार्गावर मोठा अपघात तिघांचा मृत्यू , तर दोन जखमी.

इम्तिहाज मुलाणी :
इंदापूर (प्रतिनिधी):

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर इंदापूर तालुक्यातील डाळज नं. २ च्या हद्दीत फाॅर्च्यूनर व ट्रॅक्टर चा अपघात झाला हा अपघात एवढा भयानक होता की या अपघातात
फाॅर्च्यूनर मधील तिघांचा मृत्यू झाला आहे.दि.०७ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.यामध्ये गीता अरूण माने वय ३६ वर्षे,मुकुंद अरुण माने वय २५ वर्षे,अरुण बाबुराव माने वय ४५ वर्षे सर्व रा.लातूर जिल्हा-लातूर अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नांवे असून साक्षी अरुण माने वय १८ व महादेव रखमाजी नेटके वय ५६ हे या भिषण अपघातात जखमी झाले आहेत.

याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेली माहिती अशी दि.०७ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर नं एम.एच ४५ एफ ७७७९ दोन ट्रेलर मौजे केत्तुर येथून ट्राॅलीमध्ये ऊस भरुन माळीनगर साखर कारखाना येथे जात असताना मौजे डाळज नं २ गावचे हद्दीत पुणे – सोलापूर हायवे रोडवर पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या फाॅर्च्यूनर (गाडी नं.- एम.एच.२४ ए.टी २००४) हीने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर च्या मागील ट्राॅलीस जोरदार धडक दिली.

हा आपघात इतका गंभीर होता की यात गीता अरूण माने,मुकुंद अरुण माने व अरुण बाबुराव माने यापैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.तर साक्षी अरुण माने व चालक महादेव रखमाजी नेटके हे जखमी झाले आहेत.या अपघातात वाहनाचे ही प्रचंड नुकसान झाले असून याबाबत ट्रॅक्टर चालक गोरख मल्हारी बिडबाग वय ६० रा.संग्रामनगर अकलूज ता – माळशिरस जि सोलापूर यांनी भिगवण पोलिसांत खबर दिली आहे.पुढील तपास सहा.पोलिस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उपनिरिक्षक सुभाष रुपनवर करीत आहेत

Categories
इंदापूर

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भरणेवाडी ग्रामपंचायत साठी बजावला मतदानाचा हक्क ;

इम्तिहाज मुलाणी :
इंदापूर (प्रतिनिधी):

इंदापूर तालुक्यातील 57 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे दि.15 जानेवारी रोजी प्रत्यक्षात मतदान झाले असून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या गावची भरणेवाडी ग्रामपंचायत देखील या प्रक्रियेत असून राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व त्यांचे बंधू मधुकर भरणे यांनी रांगेत उभे राहुन मतदानाचा हक्क बजावला .

पुणे जिल्ह्यातील महत्वाचा तालुका असलेल्या इंदापूर तालुक्यात 60 ग्रामपंचायतीची निवडणूक होती. 60 पैकी 3 ग्रामपंचायत बनविरोध झाल्या असून उर्वरित 57 ग्रामपंचायतीचे दि.15 रोजी प्रत्यक्षात मतदान झाले आहे. 556 जागांसाठी 1352 उमेदवार रिंगणात उतरले असून मतपेठीत त्यांचे भविष्य बंद झाले आहे.

काल सकाळी 7 वा.30 मि.पासून मतदान प्रक्रियेला सुरवात झाली व सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ही प्रक्रिया चालू राहिली. या ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी 18 जानेवारी 2021 रोजी होणार आहे.

Categories
इंदापूर

बहुजन मुक्ती पार्टी ने पुकारलेल्या इंदापूर बंदला शंभर टक्के प्रतिसाद इंदापूर शहर कडकडीत बंद

पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्यावर कारवाई होणार का ?

इम्तिहाज मुलाणी :
इंदापूर (प्रतिनिधी):

इंदापूर चे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी ठाण्यामध्ये आलेल्या वेगवेगळ्या फिर्यादी आणि तक्रारदार यांना योग्य तो न्याय दिला नाही म्हणून बहुजन मुक्ती पार्टी चे राष्ट्रीय महासचिव अँड.राहुल मखरे यांनी त्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली होती.या कारवाईच्या मागणीसंदर्भात बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आज (दि.९)रोजी इंदापूर शहर बंद पुकारण्यात आले होते.बहुजन मुक्ती पार्टी च्या कार्यकर्त्यांनी इंदापूर शहरातील व्यापारी वर्गाला बंद पाळण्याचे आवाहन केले होते.या बंदला व्यापारी वर्गाने प्रतिसाद देत शंभर टक्के कडकडीत बंद पाळला.

दरम्यान इंदापूरचे पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या कारभारावर प्रश्न चिन्ह उपस्थित करत त्यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव अँड.राहुल मखरे यांनी इंदापूर पोलीस स्टेशन समोर दि.१९ डिसेंबर रोजी अमरण उपोषण सुरू केले होते. ते आंदोलन चिघळणार त्याचवेळी दि.२० डिसेंबर रोजी राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी उपोषण स्थळास भेट देत अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांना फोन केला.यावेळेस मोहिते यांनी भीमा कोरेगाव च्या बंदोबस्तामध्ये व्यस्त असल्याने दि.६ जानेवारी पर्यंत आम्ही इंदापूर चे पोलीस निरीक्षक सारंगकर यांच्यावर कारवाई करतो असे आश्वासन दिले होते व सदरील उपोषण मागे घेण्यात आले होते.

मात्र दि.६ जानेवारी पर्यंत पोलीस निरीक्षक सारंगकर यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने आज दि.९ जानेवारी रोजी इंदापूर शहरात बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने बंद चे आव्हान करण्यात आले होते. त्यामुळे इंदापूर शहरातील मुख्य बाजार पेठे सह सर्वच व्यापारी वर्गाबरोबर नागरिकांनी कडकडीत बंद पाळला.या बंद च्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. या बंद मधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या.

सारंगकर यांच्यावर कारवाई न झाल्यास रास्ता रोको व जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याचे अँड.मखरे यांनी सांगितले.

Categories
इंदापूर

ज्ञानदेव तरंगे व अँड. विकास नारनवर या युवकांचा संकल्प “दारू नको दूध प्या”.

इम्तिहाज मुलाणी :
इंदापूर (प्रतिनिधी):

माळशिरस //: दारू नको दूध प्या’, ‘३१ ची रात्र दुधाची रात्र’, ‘द दारूचा नाही, द दुधाचा’ अशा घोषणा देत आणि रस्त्यावरून येणाऱ्या- जाणाऱ्यांना २०० लिटर मसालेे दूध वाटप करत माळशिरस तालुक्यातील उंबरे दहिगाव या गावातील ज्ञानदेव तरंगे व अँड. विकास नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यादेवी तरुण मंडळ उंबरे दहिगाव यांनी ‘नववर्षांचे स्वागत दारू पिऊन नको’, तर दूध पिऊन करा असा संदेश दिला.

या वेळी गावातील नागरिकांना दुधाचे वाटप केले. ‘दारू पिऊन वाहन चालवल्यामुळे अपघातांत मृत्यू होण्याचे प्रमाण मोठे असून नववर्षांच्या आदल्या रात्री अनेक वाहनचालक दारू पिऊन वाहन चालवतात. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी लोकांचा सहभाग वाढायला हवा.’’असे आवाहन ज्ञानदेव तरंगे व अँड.विकास नारनवर यांनी केले.

सन २००४ सालापासून अहिल्यादेवी प्रतिष्ठान तरुण मंडळामार्फत वृक्षारोपण,रक्तदान शिबिर,गरीब मुलांना वस्त्र वाटप केले जाते.कै बबन ठोंबरे यांच्या स्मरणार्थ गेली १६ वर्षांपासून पाणपोई सुरु करण्यात आली आहे, त्याचे नियोजन ज्ञानदेव तरंगे व अँड.विकास नारनवर यांच्या माध्यमातून हे उपक्रमाचे नियोजन केले जाते,यामुळे माळशिरस तालुक्यात अहिल्यादेवी प्रतिष्ठान तरुण मंडळाच्या मार्फत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाचं नेहमीच कौतुक केले जाते.

या वेळी सोपान (काका)नारनवर (तालुका अध्यक्ष भाजपा) , विष्णुपंत नारनवर (सरपंच) , शिवाजी पाटील चेरमन, संजय ढेकळे (ग्रा सदस्य) , माणिक ठोंबरे (पोलिस), अँड.महादेव वाघमोडे, अनिल पाटील, शंकर पाटिल , पांडुरंग ठोंबरे(उद्योजक), दिपक ढेकळे (उपसरपंच), राघु ठोंबरे ,नानासो नारनवर, दादा ढेकळे (मानुसकी प्रतिष्ठान), राजेंद्र वघमोडे (तालुका उपाध्यक्ष), राजेंद्र वघमोडे , रणजीत नारनवर ,सागर नारनवर , युवराज नारनवर, बापू गोरे , हनुमंत ढेकळे, सोमा वघमोड़े नवनाथ खरडेकर, हर्षल नारनवर , किरण पाटिल , विजय नारनवर ,विष्णु पाटिल, महेश पवार, विठल पाटील , सचिन पाटिल , गफूर मुलानी , राम जाधव , महेश चोरमले, पोपट वाघमोडे, स्वप्निल वाघमोडे, नितीन वाघमोडे, वैभव ठोंबरे शंकर ठोंबरे ,आदी तरुण उपस्थित होते.

Categories
इंदापूर

न्हावी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते स्थापना

इम्तिहाज मुलाणी :
इंदापूर प्रतिनिधी:-

भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी,न्हावी (ता.इंदापूर) येथे १ जानेवारी १८१८ च्या विजयी लढ्यातील शूरवीरांना विनम्र अभिवादन केले.त्यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ महाराष्ट्रातील जनता एक जानेवारी हा दिवस शौर्य दिन म्हणून विजय लढ्यातील शूरवीरांना विनम्र अभिवादन व मानवंदना देत असते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य भारतीयांना प्रेरणादायी आहे .आज याठिकाणी शौर्य दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्तीची स्थापना केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या कर्तुत्वाने आपल्या देशासाठी हजारो वर्षासाठीचे मोठे रचनात्मक महान कार्य केले आहे. राज्यघटना, समता, सदभावना, सर्वधर्मसमभावनेच्या विचाराबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील गरीब असो श्रीमंत माणूस असो या सर्वांना लोकशाहीचा मूलभूत अधिकार देण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या विचारांची उपासना या बुद्ध विहाराच्या माध्यमातून व्हावी. युवकांनी हे विचार सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवावेत.’
बापूराव घाडगे व समता सोशल क्लब न्हावी यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी ॲड.अशोक घोगरे, बापूराव घाडगे, बापू मारकड, पप्पू डोंबाळे, विजय भोसले, अनिल गायकवाड, सुनील कणसे, सुनील अवघडे, विनोद घोगरे, विशाल घाडगे, प्रकाश शिंदे उपस्थित होते.

Categories
इंदापूर

रेडणी – बोराटवाडी रस्ता डांबरीकरण निकृष्ट ….

काम होऊन महिना होत नाही तोच खडी बाहेर येऊ लागली

इम्तिहाज मुलाणी :
इंदापूर (प्रतिनिधी):

इंदापूर तालुक्यातील रेडणी – बोराटवाडी रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत एक ते दोन महिने होत नाही तोच रस्त्याची खडी बाहेर येऊ लागल्याने रस्ता किती दिवस टिकणार असा प्रश्न ग्रामस्थांन पुढे उभा राहिला आहे ? सदरील रस्ता अत्यंत वर्दळीचा असून या मार्गाने शेकडो वाहनांची ये-जा सुरू असते त्यामुळे हा रस्ता मजबूत होणे आवश्यक होते. परंतु हा रस्ता निकृष्ट दर्जाचा बनवल्या कारणाने महिन्या दोन महिन्यातच रस्त्याला खड्डे पडू लागले आहेत. त्यामुळे हा रस्ता किती दिवस तघ धरणार हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे. रस्ताचे काम करणारे ठेकेदार डांबरीकरणासाठी निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरतात. कामाची कुठलेही माहिती नसताना ठेकेदार मंडळी किती वापरावे हे ठरवत असतात.त्यामुळे सातत्याने निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण पुन्हा पुन्हा त्याच रस्त्यावर केले जाते. यात शासनाचा पैसा वाया जातो असे प्रकार रोखण्यासाठी निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अनेक सामाजिक कार्यकर्ते व रेडणी - बोराटवाडी गावातील ग्रामस्थांनी केली आहे. बराच वेळी नागरिकांनी कामाचा दर्जा लक्षात आणून दिल्यानंतरच सदरील विभागाचे अधिकारी तेथे धाव घेतात.सदरील रस्त्यावरून ये-जा करणार्‍या नागरिकांना असा मनस्ताप देण्यापेक्षा सदरील प्रशासनाने अगोदरच कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यावे. अशी देखील मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

संबंधित रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई न झाल्यास सामाजिक कार्यकर्ते व भटक्या विमुक्त जाती-जमाती महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तानाजी धोत्रे यांनी सदरील विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे.

Categories
इंदापूर

हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते प्रा. फिरोज शेख यांचा सत्कार

इम्तिहाज मुलाणी :
इंदापूर (प्रतिनिधी):

कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर येथे कार्यरत असलेले प्रा. फिरोज नसरुद्दीन शेख यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पी. एच. डी पदवी प्रधान करण्यात आली. प्रा. फिरोज शेख यांनी पी.एच.डी पदवी संपादन केल्याने महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील तसेच नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी त्यांचा यथोचित सन्मान केला
प्रा. फिरोज शेख यांनी इंग्लिश या विषयात “A Study of Speech Acts with Special Reference to Vijay Tendulkar’s Selected Plays.” या विषयावर प्रबंध सादर केला. प्रा. फिरोज शेख यांना कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनाई (अहमदनगर)येथील डॉ संदीप प्रभाकर खेडकर यांनी मार्गदर्शन केले. प्रा. शेख यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या Institute of Advanced Studies in English औंध पुणे या अभ्यास केंद्रावर आपले संशोधन पूर्ण केले.
Application Oriented Research असल्यामुळे अनेक मान्यवरांनी प्रा. फिरोज शेख आणि त्यांच्या प्रबंधाचे कौतुक केले.
संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, संस्थेच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले, संस्थेचे सचिव मुकुंद शहा, नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील, जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी प्रा. फिरोज शेख यांचे अभिनंदन केले.

Categories
इंदापूर ब्रेकिंग न्युज

विठोबा (तात्या) भरणे अनंतात विलीन; भरणे कुटुंबाचे छत्र हरपले.

इम्तिहाज मुलाणी :
इंदापूर (प्रतिनिधी):

इंदापूर 30 // राज्याचे सार्वजनिक बांधकाम,वने, दुग्ध व पशुसंवर्धन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना पित्रृशोक झाला. त्यांचे वडील विठोबा (तात्या ) रामा भरणे यांचे वयाच्या 92 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्यावर आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भरणेवाडीत हजारोंच्या उपस्थिती अंत्यसंस्कार करण्यात आले.

गेल्या काही दिवसापासून तात्या आजारी असल्यामुळे त्यांना पुणे येथे उपचारासाठी हलवण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान मंगळवारी रात्री सव्वाअकरा वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या पाठीमागे पत्नी,राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह चार मुले व तीन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे

अंत्यविधीस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी सहकार व संसदीय मंत्री हर्षवर्धन पाटील, दौंडचे आमदार राहुल कुल,करमाळाचे आमदार संजय शिंदे, माजी आमदार रामहरी रुपनवर, दौंडचे माजी आमदार व पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, महाराष्ट्र राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक ,पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, युवानेते राजवर्धन पाटील यांच्यासह हजारो जनसमुदाय उपस्थित होता.

Categories
इंदापूर

पर्यावरण संवर्धनासाठी 5000 वृक्ष लागवडीचा संकल्प- अंकिता हर्षवर्धन पाटील

इम्तिहाज मुलाणी :
इंदापूर (प्रतिनिधी):- इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या येथील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हस्ते महाविद्यालयात बेलाचे रोप लावून वृक्षारोपण करण्यात आले. अंकिता पाटील यांच्या हस्ते विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना 105 बेलांच्या रोपांचे वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, संस्थेच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव मुकुंद शहा, प्राचार्य डॉ. संजय चाकणे, उपप्राचार्य प्रा. नागनाथ ढवळे, यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांमध्ये महाविद्यालयात मान्यवरांचा वाढदिवस महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण करून साजरा केला जातो तसेच या रोपांचे संवर्धन करण्याची देखील जबाबदारी महाविद्यालय घेते. अंकिता पाटील म्हणाल्या की,' वाढदिवस हे औचित्य असून सामाजिक बांधिलकी लक्षात घेता पर्यावरणीय जनजागृतीसाठी इंदापूर तालुक्यामध्ये 5000 वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून यामध्ये युवक युवतींचा सहभागाबरोबरच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केल्याने आनंद झाला आहे. कोरोना पार्श्वभूमी असल्याने आपण नागरिकांना सामाजिक बांधिलकीसाठी पर्यावरणीय संवर्धनाच्या उपक्रमासाठी आवाहन केले होते. नागरिकांनी या उपक्रमास मोठा प्रतिसाद दिला आहे.

अंकिता पाटील यांचे कार्य तसेच सामाजिक बांधिलकीतून त्यांनी राबवित असलेल्या विविध उपक्रमाची माहिती प्रास्ताविकात क्रीडासंचालक डॉ. भरत भुजबळ यांनी दिली.
यावेळी विज्ञान विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर, ग्रंथपाल प्रा. मनीषा गायकवाड, प्रा. कल्पना भोसले उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रोहिदास भांगे यांनी केले. आभार प्रा. सुनील सावंत यांनी मानले.

Categories
इंदापूर

सुफियानखान तु इंदापूर नगरपरिषद निवडणूक लढवली पाहिजे :- सत्यजित तांबे-पाटील

इम्तिहाज मुलाणी :
इंदापूर (प्रतिनिधी):

“सुफियानखान तुला पण नगरपालिका लढवली पाहिजे” येणाऱ्या नगरपालिकेमध्ये विजयी होऊन”आता जसा फेटा बांधला आहे तसाच फेटा बांधून तुझ्या विजयी मिरवणुकीत सत्कारासाठी आम्हाला बोलव; असे वक्तव्य महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी सुफियानखान जमादार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना व्यक्त केले.

इंदापूर तालुका युवक काँग्रेसचे नवनियुक्त इंदापुर शहर उपाध्यक्ष सुफियानखान जमादार यांच्या २१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने इंदापूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आमदार संजय जगताप, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे,इंदापुर तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष स्वप्नील सावंत व इतर सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराची सांगता व अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाला.

यावेळी बोलताना सत्यजीत तांबे म्हणाले की “इथून पुढच्या सर्व निवडणुकांमध्ये युवकांना प्रचंड प्रमाणात वाव असून सुफियान खान जमादार यांनी सुद्धा इंदापूरची नगरपालिका लढली पाहिजे व आता फेटा बांधून बसलाय तसाच विजयी मिरवणुकीत गुलाल उधळण्यासाठी व फेटा बांधून त्याच्या सत्कारासाठी पुन्हा एकदा यायला आम्हाला आवडेल, व तू निश्चित आम्हाला बोलव अशे वक्तव्य पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांच्या उपस्थित करून सत्यजित तांबे यांनी २१ वर्षाच्या युवकाला थेट नगरपालिका लढवण्याचे जाहीर केल्याने एकच चर्चेचा विषय बनला होता यावेळी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट करत सत्यजीत तांबे यांनी दिलेल्या आदेशाचे व शुभेच्छांचे सुफियान यांनी पालन करावे अशी चर्चा त्याठिकाणी रंगू लागली.

यांसारख्या युवक कार्यकर्त्यांना या ठिकाणी बळ देण्याचे काम या वेळी सत्यजित तांबे यांनी केले आहे.

सुफियानखान जमादार यांच्या २१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात २०१ रक्तदात्यांनी रक्तदान करून सुफियान खान यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत २०१ बॉटल चे रक्त संकलन केले.यावेळी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना एक छोटीशी भेटवस्तू म्हणून सुफियान खान मित्र परिवाराच्या वतीने एक मोबाईल भेट देण्यात आला,

यावेळी बोलताना सुफियान खान जमादार म्हणाला की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पार्टी युवक काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सत्यजित दादा तांबे यांनी मला माझ्यावर जो विश्वास दाखवला मला थेट या पदासाठी लायक समजलं,मलाही त्याक्षणी आश्‍चर्याचा धक्का बसला त्याबद्दल मी दादांचे आभार मानतो,पक्षाचा छोटा कार्यकर्ता म्हणून त्यांच्या आदेशाचे पालन मी निश्चित करेल व येणाऱ्या काळामध्ये इंदापूर शहरात तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत व इतर पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल.

महाराष्ट्रात रक्त साठा कमी असल्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे, त्या आदेशाचे पालन करत मी माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करून त्यानिमित्ताने छोटीशी भेट म्हणून रक्तदात्यास एक मोबाईल भेट दिला आहे, त्याचबरोबर रक्तदात्यांनी जे सहकार्य केलं त्यासाठी माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी मित्रमंडळींनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे, अशी मत सुफियान खान यांनी व्यक्त केले.

Categories
इंदापूर

समाजकारणाला राजकारणाची जोड शिवधर्म फाऊंडेशन पहिल्यांदाच लढवणार ग्रामपंचायत निवडणूक..दिपकअण्णा काटे

इम्तिहाज मुलाणी :
इंदापूर (प्रतिनिधी):

राज्यात तसेच इंदापुर तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत. ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण निवडणुक निकालानंतर घोषीत करण्यात येणार आहे.
ग्रामपंचायत निवडणूकांच्या रणधुमाळीला सुरूवात झाली असून ग्रामपंचायत निवडणुकीत ऐन थंडीच्या दिवसात ग्रामीण भागात चांगलेच वातावरण तापलेले पाहायला मिळतेय.इंदापुर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विधानसभेनंतर पुन्हा एकदा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व भाजपचे नेते माजीमंञी हर्षवर्धन पाटील हे आपले आस्तित्व सिध्द करण्यासाठी पुन्हा एकदा ऐकमेंकाच्या विरोधात आमनेसामने असणार आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणूक फाँर्म भरण्यासाठी लागणारे कागदपत्रे काढण्यासाठी शासकीय कार्यलयामध्ये कार्यकर्ते पदाधिकारी यांची मोठी धावपळ चाललेली पाहायला मिळतेय. गावपातळीवर देखील ग्रामपंचायत निवडणुकीत पँनल उभा करण्यासाठी विविध पक्षाच्या वतीने घोंगडी बैठका, मतदार गाठीभेटीचे कार्यक्रम जोमाने सुरू आहेत. विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे अहोरात्र ग्रामपंचायत निवडणूक पँनल मोर्चे बांधणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मेहनत घेत आहेत. राज्यात तसेच इंदापुर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीसाठी पहिल्यांदाच शिवधर्म फाऊंडेशन ने ग्रामपंचायत निवडणुकीत समाजकारणाला राजकारणाची जोड म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय कार्यकर्तांच्या व विश्वासू सहकार्‍यांच्या अग्रहाखातर घेतला आहे, अशी माहिती शिवधर्म फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पै. दिपक काटे यांनी दिली आहे. शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिपकअण्णा काटे यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे करण्याची जोरदार चाचपणी सध्या सुरू केली आहे. शिवधर्म फाऊंडेशनचे संपूर्ण महाराष्ट्रात नवयुवकांचे मोठ्या प्रमाण जाळे आहे. शिवधर्म फाऊंडेशन संघटनेने अनेक मोठ मोठे सामाजिक उपक्रम राबिवले असून संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठे नेटवर्क तयार करण्यात आले आहे.संभाजी विडीवरील संभाजी महाराज यांचे नाव बदलण्यात यावे यासाठी शिवधर्म फाऊंडेशनच्या वतीने व्यापक असा लढा उभा केला गेला. त्यानंतर शेवटी संभाजी विडीवरील नांव साबळे -वाघिरे कंपनीला बदलण्यास भाग पाडले. इंदापुर सेतू मधील भोंगळ कारभारा विरोधात शिवधर्म फांऊंडेशनच्या वतीने मोठे आंदोलन करुन सर्व सामान्य जनतेला न्याय मिळवुन दिला. व जादा व बोगस पैसे घेणे बंद केले.

शिवधर्म फाऊंडेशने इंदापुर तालुक्यात दोनच दिवसात ५१ शाखाचे ओपनिंग केल्या आहेत .प्रत्येक गावागावात शिवधर्म फाऊंडेशनचे कार्यकर्ते पदाधिकारी बुथ बांधणी मजबूत करीत आहेत. परंतु समाजकारणाला राजकारणाची जोड म्हणून शिवधर्म फाऊंडेशनच्या वतीने ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे भविष्यात येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवधर्म फाऊंडेशनची सरपंच निवडीसाठी भुमिका मोठी निर्णायक ठरणार आहे.

Categories
इंदापूर

सत्यजित तांबे यांनी लहान तोंडी मोठा घास घेऊ नये – अंकिता पाटील

इम्तिहाज मुलाणी :
इंदापूर:(प्रतिनिधी):

दि.27/12/20
सत्यजित तांबे यांनी स्वतःची कुवत लक्षात घेऊन लहान तोंडी मोठा घास घेऊ नये. तुमचे संधीसाधू राजकारण हे तर संपूर्ण राज्याला माहित आहे. त्यामुळे आपण ज्येष्ठ नेत्याबद्दल दिशाभूल करणारी वक्तव्ये करू नयेत, असे मत पुणे जिल्हा परिषदेचे सदस्या अंकिता पाटील यांनी रविवारी व्यक्त केले.
युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी इंदापूर येथील कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांच्या बद्दल टीकाटिप्पणी केली होती. त्यासंदर्भात बोलताना अंकिता पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करणेसाठी कोणी मोठे सहकार्य केले, याची जाणीव सत्यजित तांबे यांनी ठेवणे आवश्यक होते, मात्र हर्षवर्धन पाटील यांनी केलेले सहकार्य ते विसरले आहेत.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचेवर टीकाटिप्पणी करण्यापूर्वी त्यांच्या राजकीय कार्यकीर्दीएवढे आपले वय देखील नाही याची जाणीव सत्यजित तांबे यांनी ठेवायला हवी होती. राज्यातील ज्येष्ठ नेते असलेल्या हर्षवर्धन पाटील यांचेसंदर्भात बोलताना सत्यजित तांबे यांनी राजकीय संकेत बाळगणे आवश्यक होते, असे मतही अंकिता पाटील यांनी व्यक्त केले.


Categories
इंदापूर

पुणे जिल्हा एसटी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या चेअरमन पदी नितीन देवकर -पाटील यांची बिनविरोध निवड

इंदापूर एसटी आगाराला पहिल्यांदाच मान

इम्तिहाज मुलाणी :
इंदापूर( प्रतिनीधी) :

इंदापूर : पुणे जिल्हा एसटी स्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या चेअरमन पदी नितीन देवकर -पाटील बिनविरोध निवड झाल्याबद्दल इंदापूर आगारातील कर्मचारी यांच्याकडून पाटील यांचा सत्कार करण्यात आला . या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून इंदापूर नगरीचे माजी नगराध्यक्ष प्रा. कृष्णाजी ताटे सर उपस्थित होते तर आगार प्रमुख मेहबूब मनेर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
यावेळी प्रा. कृष्णाजी ताटे सर व मेहबुब मनेर यांच्या हस्ते नितिन देवकर – पाटील यांचा हार ,शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला . तसेच इंदापूर आगरामार्फत महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे इंदापूर आगाराचे सचिव बाळासाहेब फाळके व विभागीय अध्यक्ष राजाभाऊ कांबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रा . कृष्णाजी ताटे सर यांनी नितीन देवकर यांना सोसायटी मार्फत कामगारांच्या अडचणीच्या काळात वेळेत मदत देण्याची मागणी केली व सोसायटीचा नावलौकिक वाढवावा अशी अपेक्षा केली. यावेळी आगार प्रमुख मेहबूब मनेर , वाहतूक नियंत्रक दशरथ तोरसकर , विक्रम चंदनशिवे, मिट्टू खाडे , विजकुमार गवळी ,अनिल शिंदे यांनी नितीन देवकर- पाटील यांना शुभेच्छा दिल्या .
याप्रसंगी नूतन चेअरमन नितीन देवकर – पाटील म्हणाले महाराष्ट्र एस. टी.कामगार संघटनेचे जनरल सेक्रिटरी हनुमंत ताटे ,अध्यक्ष संदीप शिंदे , विभागीय सचिव दिलीपजी परब , विभागीय अध्यक्ष मोहन जेधे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनानुसार व आपल्या आगारातील सर्व एसटी कर्मचारी वर्ग यांचे वेळोवेळी मिळालेले प्रेम व आशिर्वाद यामुळेच आज आपल्या इंदापूर आगाराला एसटी सोसायटीचे चेअरमन पदाचा मान मिळाला.
इंदापूर आगाराच्या सहकार्यामुळे ही सुवर्णसंधी मिळाली असून सभासदाच्या अडीअडचणी संबंधित सर्वोच्च प्राधान्य जाईल असे त्यांनी सांगितले. सोसायटी बद्दल बोलताना पुढे म्हणाले, ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पुणे विभाग या संस्थेची स्थापना १९६० रोजी झाली असून सोसायटी ला ६० वर्षे पूर्ण झाली असून ६० वर्षात मध्ये ही संस्था सेवेचा वसा घेऊन यशस्वीरित्या वाटचाल करत आहे .या संस्थेची पारदर्शी व सुस्तिम सेवा रा. प.कामगारांच्या नेहमीच पसंतीस उतरलेले आहे. संस्थेचे पहिले चेअरमन १९६० ते १९६२ पर्यंत एम. एन .संगम होते.तेव्हापासून आजपर्यंत संस्थेची वाटचाल प्रगतिपथावर आहे . त्याप्रमाणे संस्थेचे सतत अँडिट ‘अ’ वर्ग मिळत असून संस्थेच्या स्वारगेट, बारामती, राजगुरूनगर शाखेद्वारे सेवा दिली जाते.
संस्थेचे सभासद २२६२ असून वसूल भागभांडवल रु.८ कोटी ५० लाख आहे व गंगाजळी ४ कोटी ७२ लाख असून इमारत निधी ५६ लाख आहे. गुंतवणूक रु.९ कोटी ५० लाख असून सभासद ठेवी ५ कोटी ७७ लाख आहे. अशीही माहिती यावेळी इंदापूर एसटी आगाराचे नूतन चेअरमन नितीन देवकर – पाटील यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत खरात व महेश जाधव यांनी केले व आभार प्रदर्शन शांताराम जगताप यांनी केले


Categories
इंदापूर

इंदापूर तालुक्यातील बाभुळगाव येथे आढळले मांजराच्या दुर्मिळ प्रजातीतील रस्टी स्पॉटेड कॅट (वाघाटी) जातीचे पिल्लू

इंदापूर तालुक्यात पहिल्यांदाच वाघाटी जातीचे पिल्लू सापडल्याची माहिती

इम्तिहाज मुलाणी :
इंदापूर 😦 प्रतिनिधी ):

बाभूळगाव (ता. इंदापूर) येथील गोपीनाथ गुरगुडे यांच्या ऊस फडात दि.२४ रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास बिबट्याची हुबेहूब लहान प्रतिकृती असणारे पिल्लू आढळून आले असता काही प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या संदर्भात गोपीनाथ गुरगुडे यांचे पुतणे दीपक गुरगुडे यांनी पिल्लाचे छायाचित्रे काढून इंदापूर वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांना पाठवले.

यानंतर काळे यांनी पुण्याचे वनसंरक्षक राहुल पाटील,सहाय्यक वनसंरक्षक आशुतोष शेंडगे यांना या संदर्भातील माहिती कळवली तसेच पोलीस अधीक्षकांना त्याची कल्पना देऊन वनसंरक्षक कार्यालयाच्या सूचनेनुसार राहुल काळे यांनी वनपाल राहुल गीते,बी.एस खारतोडे यांना बाभूळगाव येथे पाठवले. पिल्लाची पाहणी केल्यानंतर ते रानमांजराच्या अत्यंत दुर्मिळ असणाऱ्या वाघाटी या जातीचे असल्याचा निष्कर्ष अधिकाऱ्यांनी काढला.या संदर्भातील माहिती देताना तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी लोकांना घाबरून जावू नये असे आवाहन केले आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी – रानमांजराच्या दुर्मिळ प्रजातीपैकी रस्टी स्पॉटेड कॅट अर्थात वाघाटी आहे. वाघासारखी कातडी असलेले हे वाघाटी हे मांजर घरगुती मांजराच्या आकाराचे रानमांजर आहे. याचा रंग व अंगावरिल ठिपके हे बिबट्याप्रमाणेच असतात व बिबट्याची हुबेहुब लहान प्रतिकृती हे मांजर दिसते. याचा वावर भारतातील पूर्वेकडील राज्ये, ब्रम्हदेश, थायलंड, इंडोनेशिया, जावा, सुमात्रा इत्यादी देशात आहे. कर्नाटक व केरळमधील सह्याद्रीच्या रांगात याचीच उपजात आढळून येते.

Categories
इंदापूर

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूरात वृक्षारोपण

देशी झाडांचे रोपण करून वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

इम्तिहाज मुलाणी :
इंदापूर (प्रतिनिधी ):

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इंदापूर तालुका यांच्या वतीने इंदापूर बसस्थानकाच्या आवारात वृक्षारोपण व डस्टबिन वाटप करून वृक्षसंवर्धनाचा व स्वच्छतेचा सामाजिक संदेश देत वाढदिवस साजरा करण्यात आला.

पर्यावरण संवर्धन, संरक्षण व जतन काळाची गरज बनली आहे. स्वच्छ, शुद्ध व ताजी हवा राखण्यासाठी वृक्ष महत्त्वाचे आहेत. या उद्देशाने यावेळी अशोका, जांभूळ,कांचन,करंज,बेहडा, पळस,इ देशी झाडांचे रोपण रिपाइंचे पुणे जिल्हा संघटक सचिव शिवाजीराव मखरे, इंदापूर एसटी आगाराचे प्रमुख मेहबूब मणेर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी रिपाइंचे बारामती लोकसभा विभागाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब सरवदे, तालुकाध्यक्ष संदिपान कडवळे, शहराध्यक्ष अमोल मिसाळ, जैन समाज संघटनेचे अध्यक्ष धरमचंद लोढा आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी रिपाइंचे नितीन आरडे,सुनील सोनवणे, शहर कार्याध्यक्ष महेश सरवदे, सरचिटणीस प्रवीण मखरे, तालुका उपाध्यक्ष विकास भोसले, प्रताप मिसाळ, राजु घाडगे,सोमनाथ चितारे, विकास जाधव,अनिल माने,देवा माने, सतीश मिसाळ, नितीन मिसाळ,अमोल गुळीक, आण्णा काळे, देवा माने, अनिल माने यांनी परिश्रम घेतले.

Design a site like this with WordPress.com
Get started