Categories
Uncategorized

शिवक्रांती हिंदवी सेना संचालित दुर्गवारी संकल्पनेतून वैराटगड चे संवर्धन चे कार्य सुरू….

आशिष चव्हाण / वाई प्रतिनिधी
दि.७

गेली ५ वर्ष स्वराज्याचे शस्त्रागार किल्ले वैराटगड येथे शिवक्रांती नित्यक्रम वैराटगड संवर्धन कार्य करीत आहे. गतवर्षी गडावरील शिवस्मारक व शिवजन्मोत्सव साठी जो उत्साह होता तोच आजही जाणवला. शिवजन्मोत्सव २०२१ साठी गडावरील माहिती फलक व संवर्धन कार्याची मोहीम दिनांक ३ जानेवारी २०२१ रोजी उत्साहात पार पडली. व्याजवाडी दिशेने प्रस्थान करीत जागोजागी फलक लावण्यात आले.पांडवटाके , शिवपिंड, तळमाची , प्राचीन गुहा , पाण्याचे तलाव, महाद्वार,पिण्याचे पाणी, सरदारांचे वाडे , पहारेकरी देवड्या, चोरवाट,ध्वजस्तंभ, उताणा मारुती , शिवकालीन विहीर,बालसिद्धनाथ मंदिर सारखे नवीन फलक गडावर लावले गेले. लोखंडी पहार, माहिती फलक, सिमेंट ,वाळू अशा वस्तू नेताना मावळ्यांना प्रचंड त्रास झाला पण शेवटी शिवकार्यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या मावळ्यांनी सादर मोहीम फत्ते केलीच..सर्व मावळ्यांचे आवर्जून कौतुक करावे वाटते कि जेवणाची सोय नसताना फक्त बिस्कीट आणि भास्कर सरानी आणलेली भाकरी सर्वानी मिळून घासातील घास खाऊन पूर्ण केलीच .या मोहिमेत आलेल्या सर्व मावळ्यांचे खूप खूप धन्यवाद… संदेश धोत्रे ,अनिकेत धनावडे, आकाश जाधव , प्रताप जगताप,विराज पिसाळ ,देवांग चव्हाण,श्रीजय कदम,भास्कर पवार, प्रविण कदम, स्वप्निल धनावडे, या मावळ्यांनी केलेले कार्य व राखलेली निष्ठा यासाठी शिवक्रांती कडून मनपूर्वक आभार …
शिवक्रांती हिंदवी सेना महाराष्ट्र …

Leave a Reply

Create your own website, free on WordPress.com.Create your own website.
Start free