
करवीर पूर्व : प्रतिनिधी : गजानन रानगे
चिंचवाड (ता करवीर ) येथील पीरपाणंद रस्ता ते सुर्यापा पाणंद रस्ताच्या दरम्यान उसाच्या फडाला आग लागली .या आगीमध्ये तीस एकरातील ऊसपीक जळाले .यामध्ये ऊस उत्पादक शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने जळीत ऊस पीक क्षेत्राचे पंचनामे केले.
गेली दोन वर्षे २०१८ साली वातावरणातील बदलामुळे ऊसाचे टनेज मोठ्या प्रमाणावर घसरले, तर २०१९ मध्ये हाता तोंडाशी आलेले पीक अतिवृष्टीमुळे १०० टक्के नुकसानग्रस्त झाले या सगळ्यातुन बाहेर पडत असताना व कोरोनाजण्य परिस्थितीतून जात असताना पिकवलेल्या शेतीतील ऊस पिकाना आग लागून झालेल्या नुकसानीने शेतकरी आर्थिक अरिष्टात सापडला आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी गावातील ग्रामस्थांनी वेळीच आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले म्हणून मोठे नुकसान टळले. यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्यात आले . तसेच कारखान्यानी जळीत ऊस कपात करु नये अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. यावेळी चिंचवाड गावचे सरपंच सुदर्शन उपाध्ये, पोलिस पाटील रविंद्र कांबळे,ग्रामसेवक विजय माळी तलाठी शामराव कांबळे ,कोतवाल तेजस्विनी कोळी,आण्णासो कोळी(गुरुजी),यशवंत खानविलकर,राजगोंडा नांद्रे,महादेव कोळी,बाबा सरकार यांच्या सह जळीत ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते