Categories
सोलापूर

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती साजरा झाला श्री विठ्ठल रुक्माई चा शाही विवाह सोहळा!

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

मंगळवारी वसंतपंचमी दिवशी श्री विठ्ठल व रूक्मिणीचा विवाह सोहळा पंढरपूरमध्ये मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
दुपारी वाजता श्री विठ्ठल रखुमाई यांचा विवाह सोहळा झाला.मंदिरे समिती सह अध्यक्ष ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनीही देवाच्या लग्नात मंगल अष्टका म्हंटल्या. व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्यासह मंदिरातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते. सभामंडपात आकर्षक सजावट करण्यात आली होती.

कोरोनाविषयक सारे आरोग्याचे नियम या सोहळ्यास लागू असल्याने मोजके लोक यासाठी हजर होते. घरी मंदिरे समितीच्या वतीने विवाहाची जय्यत तयारी करण्यात आली होती. पाच टन विविध फुलांनी मंदिर सजविले गेले होते. तर वधूवरांसाठी विवाहाचा पेहराव बंगलोर येथील प्रसिद्ध फॅशन डिझायनर सविता चौधरी यांनी डिझाईन करून अर्पण केला आहे.
श्री विठ्ठलासाठी पांढर्‍या रंगाची अंगी व उपरणे बनविण्यात आले आहे. यावर विष्णूच्या शुभ खुणा असलेला शंख, चक्र व ओम विविध प्रकारच्या रंगीबेरंगी मोत्याच्या बनविण्यात आले आहे. रुक्मिणी मातेलाही अतिशय उंची सिल्कची कांजीवरम साडी निवडण्यात आली आहे.

पुण्यातील फुल सजावटीची सेवा देणारे भारत भुजबळ हे पाच टन फुलांनी मंदिर सजविले होते.यात थोरियम, विविध रंगी गुलाब, ओर्केड ,जरबेरा, मोगर्‍यासह 36 प्रकारच्या फुलांचा वापर करण्यात आला आहे.
कोरोनाचे संकट अजूनही संपूर्णतः संपले नसल्याने या देवाच्या विवाहातही कोरोनाविषयक सर्व आरोग्य नियम पाळले गेले. या विवाह सोहळ्यानिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात रूक्मिणी स्वयंवराची कथा भागवताचार्य अनुराधाताई शेटे यांनी सांगितली.

Categories
पंढरपूर सोलापूर

सुस्ते ग्रामपंचायत विजय ऐतिहासिक! विजयी उमेदवारांचा मा.खा. धनंजय महाडिक यांच्या हस्ते जंगी सत्कार!

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

श्री अंबिका महाविकास परिवर्तन आघाडीच्या उमेदवारांचा भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. खा.धनंजय महाडिक यांच्या हस्ते जंगी सत्कार करण्यात आला.
सत्कार समारंभाला प्रसंगी श्री.अंबिका महा विकास परिवर्तन आघाडीचे सर्व आठ उमेदवार भीमा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर उपस्थित होते. यावेळी खा. महाडिक म्हणाले की सर्वांनी एकत्र येऊन चांगल्या पद्धतीने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा विकास साधावा व ग्रामपंचायतीचा कारभार चांगल्या पद्धतीने चालवुन पंढरपूर तालुक्यांमध्ये हे एक आदर्श निर्माण करावा. काही जर कमी पडले तर मला अवश्य सांगा,मी सदैव आपल्या मदतीसाठी हजर असेन!
यावेळी शिवाजीराव गुंड पाटिल, भीमा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप,भिमाचे संघटक समन्वयक
प्रा. संग्राम चव्हाण, सर ,पुळुजचे पांडुरंग ताटे, राजाराम बाबर, भारत पाटील, भिमाचे संचालक बिभिषण वाघ, भीमाचे संचालक तुषार दादा चव्हाण, तानाजी भाऊ चव्हाण, तात्या मामा नागटिळक, एस के चव्हाण सर, सप्तशृंगी पतसंस्थेचे अतुल भैय्या चव्हाण, रामदास (बापू) चव्हाण, माधव (बापू) चव्हाण, आनंता दादा चव्हाण,बालाजी नागटिळक, पांडुरंग कदम,यशवंत (बंडु) चव्हाण,महादेव गावडे,धनंजय घाडगे, विजय नागटिळक, संतोष चव्हाण, गणेश चव्हाण, संतोष सुळे, गणेश बोबडे, एस.के. चव्हाण सर, संजय चव्हाण, संभाजी चव्हाण, अमोल चव्हाण, तानाजी शिंगण, अजिंक्य वाघमारे, संजय लोखंडे, आनंदा चव्हाण, विकास चव्हाण, मुकुंद चव्हाण, बाजीराव वाघमारे, सुभाष रणदिवे, देविदास वाघमारे, दत्तात्रेय वायदंडे, संजय रणदिवे, दत्तात्रय रणदिवे, मसु वाघमारे, आदि प्रमुख मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुस्ते येथील विजयी उमेदवार विठ्ठल-भीमा परिवार पॅनल मधून राणी चव्हाण, विष्णू गावडे, स्नेहा बोबडे, उर्मिला चव्हाण, नंदाबाई वायदंडे, तुषार चव्हाण, जुबेदा शेख, कांताबाई रणदिवे हे उमेदवार विजयी झालेले सर्व उमेदवार यावेळी खा. महाडिक यांची भेट घेण्यासाठी कारखाना कार्यस्थळावर उपस्थित होते.यावेळी सर्व युवक कार्यकर्ता वर्ग मोठ्या संख्येने हजर होता.

.

पंढरपूर तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या सुस्ते ग्रामपंचायतीमधे महाडिक गटाचे पॅनल तब्बल ४० वर्षानंतर निवडून आल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. जिद्दीने ने काम करून हा विजय संपादन केल्याबद्दल मला तुम्हा सर्वांचा अभिमान वाटतो. आज भीमरावदादा असायला पाहिजे होते, मी हा विजय स्वर्गीय भीमरावदादा यांच्या पवित्र स्मृतीस अर्पण करतो असे भावविवश उद्गार श्री महाडिक यांनी काढले. ग्रामपंचायतीच्या सर्व नूतन सदस्यांना मी मनापासुन शुभेच्छा देतो व सर्व सदस्यांनी एकदिलाने काम करून गावाचा विकास साधावा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले

Categories
क्रीडा सोलापूर

दिवंगत स्व. भारत भालके यांच्या स्मरणार्थ पंढरपूर शहरात उभारणार भव्य क्रीडा संकुल

(क्रीडामंत्री सुनील केदार यांची माहिती)

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यातील, पंढरपूर शहरामध्ये क्रीडा प्रेमीसांठी उभारणार भव्य क्रीडा संकुल यामध्ये बॅडमिंटन हॉल,हॉकी, कुस्ती मॅट,ट्रक,इत्यादी अनेक खेळांचे प्रशिक्षण घेण्यासाठी शासकीय सुसज्ज क्रीडासंकुल उभारण्यात येईल व त्या क्रीडासंकुलास दिवंगत आमदार श्री.भारत नाना भालके यांचेच नाव देण्यात येईल असे आश्वासन क्रीडा मंत्री मा.ना.श्री. सुनील केदार यांनी दिले,तसेच समंधीत पंढरपूर क्रीडासंकुल यांचा सविस्तर प्रस्ताव शासनाकडे तातडीने सादर करावा असे आदेश माननीय क्रीडा मंत्री मोहदयांनी सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी यांना दूरध्वनीवरून आदेश दिले या पंढरपूर क्रीडा संकुल विषयी मा.भगीरथ दादा भालके (चेअरमन)श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखाना,मर्यादित वेणूनगर यांनी दिनांक:29/12/2020 रोजी माननीय क्रीडा मंत्री यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानी भेट घेऊन दिवंगत आमदार भारत नाना यांचे अपूर्ण राहिलेले पंढरपूर क्रीडासंकुलाचे स्वप्न उभारणेसाठी पुढाकार घेतला असून त्यासाठी क्रीडामंत्री मोहदयानां निवेदन देऊन सदर पंढरपूर तालुक्यातील क्रीडा प्रेमींना न्याय देण्याची आग्रही विनंती केली, भगीरथ दादांची मागणी क्रीडा मंत्री यांनी तातडीने मान्य करून तात्काळ सूचना दिल्या त्यामुळे पंढरपूर मतदारसंघातील क्रीडा प्रेमी व तरुण युवकांमध्ये क्रीडा विषयीं आवड निर्माण होऊन त्या क्रिडा संकुलात शिक्षण घेऊन राज्य, देश,व आंतरराष्ट्रीय स्तरावर पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्याचे नाव सातासमुद्रापार जाण्यास मदत होऊन,उत्तमोत्तम खेळाडू निर्माण होतील यात काही शंका असणार नाही-
मा. भगिरथ (दादा) भालके यांच्या प्रयत्नामुळे सर्व पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील सर्व क्रीडाप्रेमीमध्ये अतिशय आनंदाचे उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Categories
सोलापूर

पोलीस पाटील यांच्या विविध प्रलंबित मागण्या व विशेष सहाय्यक सहकारी अभियोक्ता यांच्या मानधनामध्ये वाढ होण्याकरीता आ. प्रणिती शिंदे यांनी मा. अनिल देशमुख, गृहमंत्री यांची भेट घेतली

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

आमदार प्रणिती शिंदे यांनी पोलीस पाटील यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात व विशेष सहाय्यक सहकारी अभियोक्ता यांच्या मानधनामध्ये वाढ होण्याकरीता मा. अनिल देशमुख साहेब, गृहमंत्री महाराष्ट् शासन यांची भेट घेवून निवेदनाव्दारे मागणी केली.

यामध्ये पोलीस पाटील हे पद शासन यंत्रणेतील गाव पातळीवर शासनाच्या अत्यंत जवळचा घटक म्हणून प्रशासन ओळखते गाव पातळवर गृह व महसूल विभागात अत्यंत प्रामाणिकपणे काम करीत आहेत. पोलीस पाटील हे गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व तसेच कोरोना या भयंकर महामारीमध्ये सुध्दा गांव पातळीवर आपले जिव धोक्यात घालून कार्य करत आहे. त्यांच्या प्रलंबित मागण्या 1) पोलीस पाटलांचे मानधन दरमहा 15,000/- करण्यात यावे. 2) पोलीस पाटलांची वयोमर्यादा 60 वर्षे वयोवरून 65 वर्षे करण्यात यावे. 3) पोलीस पाटलांचे नुतनीकरण कायमचे बंद करण्यात यावे. 4) पोलीस पाटलांना जिल्हा व तालुका पातळीवर पोलीस पाटील भवन करावे. 5) पोलीस पाटलांना विनाअट शस्त्र परवाना द्यावे. 6) पोलीस पाटलांना गाव पातळीवर स्वतंत्र कार्यालयाचे शासन जी.आर. आहे. त्याचे गाव पातळीवर अंमलबजावणी करण्यात यावी. आदि. पोलीस पाटील यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण होण्याबाबत.

तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये सन 1998 पूर्वी शासनाचे अभियोग पक्षाचे कामकाज पाहण्याकरीता अभियोक्ता यांची मा. पोलीस अधिक्षक व पोलीस आयुक्त यांच्यामार्फत नियुक्ती केली जात होती. त्यानंतर मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अभियोग संचनालय नव्याने निर्मित करण्यात आले व त्यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असणारे पोलीस अधियोक्ते यांना सहाय्यक सहकारी अभियोक्ता हे पद देण्यात आले. त्यांची सेवा अभियोग संचनालय यांच्या अधिपत्याखाली शासन निर्णयान्वय कायम ठेवण्यात आली. यांची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात आली व त्यानंतर त्यांना महाराष्ट्रातील कार्यरत असणातरया सर्व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयामध्ये अभियोग पक्षाचे कामकाज पाहण्याकरीता नेमण्यात आले. आजमितीस 450 सहाय्यक सहकारी अभियोक्ते व साधारण: विशेष सहकारी अभियोक्ते न्यायालयीन कामकाज पाहत आहेत. विशेष सहाय्यक सहकारी अभियोक्ते यांच्या नेमणुका या मा. जिल्हाधिकारी, मा. पोलीस आयुक्त, मा. पोलीस अधिक्षक व सहाय्यक संचालक, सरकारी अभियोक्ता यांच्यामार्फत करण्यात येते. विशेष सहाय्यक सहकारी अभियोक्ता यांना गृह विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडील दि. 21/08/1999 रोजीच्या निर्देशानुसार प्रतिदिन 450 इतके मानधन देण्यात येत होते. त्यानंतर 2009 साली रु. 700 प्रतीदिन, सन 2013 पासून रु. 1000 इतके तुटपुंज्ये मानधन प्रतिदिन देण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना महिन्याकाठी जास्तीत जास्त रु. 22 हजार इतके मानधन मिळत आहे. वास्तविक पाहता सहाय्यक सहकारी अभियोक्ता व विशेष सहाय्यक सहकारी अभियोक्ता यांचे न्यायालयीन कामकाजेचे स्वरुप एकाच प्रकारचे आहे. परंतू सहाय्यक सहकारी अभियोक्ता यांना दरमहा रु. 90 हजार पेक्षा जास्त वेतन व इतर लाभ देण्यात येत आहेत. महाराष्ट्र राज्यात कार्यरत असणाऱ्या विशेष सहाय्यक सहकारी अभियोक्ता यांना प्रतिमहा रु. 60 हजार रुपये इतके वेतन अदा करण्यात यावी व इतर सोयी-सुविधांचा लाभ मिळण्याकरीता आमदार प्रणिती शिंदे यांनी मा. अनिल देशमुख साहेब, गृहमंत्री महाराष्ट् शासन यांची भेट घेवून निवेदनाव्दारे मागणी केली.

यासंदर्भात मा. अनिल देशमुख साहेब, गृहमंत्री महाराष्ट् शासन यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून सांगितले कि, वरील विषयांसंदर्भात तात्काळ बैठक आयोजित करून त्यामध्ये निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले.

Categories
सोलापूर

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भगीरथ दादा भालके यांनी घेतली भेट!

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी

मंगळवेढा उपससिंचन योजना व इतर उजनीची उर्वरीत कामे तातडीने मार्गी लागावी. या करीता दिनांक – 29/12/2020 रोजी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात जलसंपदा विभाग यांच्या नियामक मंडळाची बैठक घेण्यात आली या बैठकीत पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावी अशी प्रमुख मागणी मा.भगिरथ (दादा )भालके ,चेअरमन ‘श्री.विठ्ठल सहकारी साखर कारखाना वेणूनगर यांनी मा. ना .श्री जयंतराव पाटील साहेब ( जलसंपदा मंत्री ) महाराष्ट्र राज्य यांच्याकडे उपरोक्त बैठकीमध्ये केली त्यास अनुसरून, माननीय मंत्री मोहदयानी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील प्रलंबित कामे, किंवा जलसंपदा विभागाची,उजणीची अपूर्ण कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकारी यांना सदर बैठकीमध्ये दिल्या.त्या प्रसंगी जलसंपदा विभागातील सचिव,व मंत्रालयीन उच्यस्तरीय अधिकारी व इतर संबंधित कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे येथील अधिकारी उपस्थित होते

Categories
सोलापूर

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातून सध्या तरी पार्थ पवार यांच्या नावाची कोणतीही चर्चा प्रसिद्धीमाध्यमांनी करू नये: उपमुख्यमंत्री अजित पवार

सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा होती. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. "पार्थ पवार यांच्या उमेदवारीचे वृत्त पूर्णपणे निराधार असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. या मतदारसंघात उमेदवारी देताना स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे मत विचारात घेऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याचे तथ्यहीन वृत्त माध्यमांनी थांबवावे" असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवर पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसापासून माध्यमांमध्ये येत आहेत. या बातम्यांना कोणताही आधार नाही. भारतनाना भालकेंचे निधन हा आमच्यासाठी मोठा धक्का असून स्थानिक कार्यकर्त्यांच्या भावना आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी विचारविनिमय करुनच या पोटनिवडणुकीसाठी स्थानिक उमेदवार देण्यास प्राधान्य असणार आहे."राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार ठरविण्याचा निर्णय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व उमेदवार निवड समितीच्या माध्यमातून घेण्यात येईल. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून ही पहिलीच विधानसभा पोटनिवडणूक असून महाविकास आघाडीचा उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होईल" असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

Design a site like this with WordPress.com
Get started