Categories
सांगली

महाराष्ट्र केसरी सांगली जिल्हा निवड चाचणी संपन्न


दि.२८/०२/२०२१
कवठेमहांकाळ- विद्याधर रास्ते.

सन २०२१ साठी च्या कुस्तीगिरांचा निवडी दिनांक २६ व २७ फेब्रुवारी रोजी सांगली जिल्हा तालीम संघाच्या विद्यमाने शांतीनिकेतन सांगली येथे पार पडलेल्या. सांगली जिल्हा निवड चाचणी स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष व सांगली जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष मा.पै. नामदेवराव (बापु) मोहीते यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी तालीम संघाचे उपाध्यक्ष मा.पै.संपतराव जाधव, मा.पै.विलास शिंदे तालीम संघाचे चिटणीस मा.पै.प्रतापराव शिंदे संचालक मा.पै.शिवाजी जाधव मा.पै.राजेंद्र शिंदे, मा.पै.सुनिल मोहिते. मा.पै.मोहन बडरे यांच्या उपस्थितीत व राष्ट्रीय पंच मा.पै.हणमंतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी पार पडल्या.
महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणारे पैलवान पुढीलप्रमाणे गादी विभाग
५७ किलो पै.निनाद मोहन बडरे (आटपाडी)
६१ किलो पै.तेजस बबन पाटील (सुरुल)
६५ किलो पै.नाथा लहु पवार (बेणापूर)
७० किलो पै.अनिकेत नंदकुमार पाटील (बेणापूर)
७४ किलो पै.वैभव श्रिकांत शिंदे (बेणापूर)
७९ किलो पै.सागर प्रकाश (पवार पेठ)
८६ किलो पै.अमर मारुती पाटील (बिळाशी )
९२ पै.सागर तामखडे (भिकवडी)
९७ किलो पै.सुबोध सुनिल पाटील (सांगली)
महाराष्ट्र केसरी गट पै.अक्षय प्रकाश कदम (बेणापूर)
माती विभाग
५७ किलो पै.रोहीत संपत तामखडे भिकवडी)
६१ किलो पै.राहुल पाटील (सुरुल)
६५ किलो पै.इंद्रजित शिंदे (बेणापूर)
७० किलो पै.मयुर जाधव (चिंचोली )
७४ किलो पै.श्रिकांत निकम (देविखिंडी)
७९किलो पै. प्रथमेश गुरव (शिराळा )
८६ किलो पै.खशाबा मदने (बेणापूर)
९२किलो पै.पृथ्वीराज पवार
सांगली
९७ किलो पै. विनय पाटील (नागठाने)
महाराष्ट्र केसरी गट
पै.सुरज निकम (नागेवाड)
वरील पैलवानांच्या निवडी करण्यात आल्या. सदर स्पर्धा पार पाडण्यासाठी शांतीनिकेतन महाविद्यालयाचे अध्यक्ष मा.गौतम (भाऊ) पटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सांगली जिल्ह्यातील जुन्या काळातील नामवंत पैलवान बाळू मुल्ला यांची शारीरिक स्थिती ठिक नसल्यामुळे व परिस्थिती बेताची असल्याने त्यांना उपचारासाठी सांगली जिल्हा तालीम संघाच्या वतीने मदत म्हणून २१,००० रुपये आर्थिक मदत करत त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. स्पर्धेसाठी पंच म्हणून पै.विनायक पाटील पै.नामदेव बडरे पै.युवराज पाटील पै.शंकर पाटील पै.रविंद्र पाटील पै.धनंजय महाडीक पै.सुहास पाटील पै.सुनिल चंदनशिवे पै.शामराव मासाळ पै.दिपक पाटील यांनी काम पाहिले. तर जोतिराम वाझे, कृष्णा शेंडगे यांनी कुस्तीचे धावते समालोचन केले. स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या सर्व मल्लांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Categories
सांगली

प्रशासनावर पकड नसलेल्या लोकप्रतिनिधींना अजित पवार कोणता कानमंत्र देणार.

इंदापूर : प्रतिनिधी

विधानसभेच्या निवडणुकीनंतरच प्रथमच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आ.अजित पवार हे इंदापूर येथे (दि. ६) रोजी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाकरिता येणार आहेत. यावेळी तालुक्याचे विद्यमान लोकप्रतिनिधी यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेली जनता तसेच बेरोजगारी, अवैध धंद्यांचा सुळसुळाट, खाजगी सावकारी, नागरिकांचा प्रशासनावरील उडालेला विश्वास याविषयी काय बोलणार याकडे संबंध तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.

सध्या तालुक्यात खाजगी सावकारकीने अक्षरशः डोके वर काढले आहे. सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने बारामतीमध्ये सावकारीला आळा घालण्यासाठी घेतलेली कठोर भूमिका तालुक्यातही घेतील का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. सध्या तालुक्यात अवैध धंदे करणे हा माझा छंद आहे, ते तर मी हे केलेच पाहिजेत असे सामान्य जनतेत बोलले जाते. कोणाचा कोणावरही दबाव राहिलेला नाही. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मिळून भिमा नदीच्या पात्रात बोटीच्या सहाय्याने खुले आम रात्रंदिवस वाळू काढत आहेत, कोणी मटका, झुगार, क्लब, वेशाव्यवसाय लाॅज वरती करत आहेत, यावर अंकुश ठेवायला पाहिजे तो प्रशासकीय अधिकारी यांनी कारवाई करताच जबाबदार व्यक्तीचा फोन येतो, तो माझाच माणूस आहे, द्या सोडून, ‘ काय चाललयं इंदापूर तालुक्यात आंधळं दळतयं आणि कुत्रं पीठ खातयं’ अशी अवस्था झाली आहे.

सुरुवातीला राज्यमंत्री भरणे यांच्याविषयी जनतेमध्ये असलेली आपुलकी नष्ट होत असल्याचे पहायला मिळत आहे. तालुक्यात पोलिस प्रशासनाकडून नागरिकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रकारावर नागरिकांना उपोषणही करावे लागले. एका महिलेला तर आपल्या पोटच्या मुलावर झालेल्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी महिलेचा उद्रेक राज्यमंत्र्यांच्या शर्टाच्या कॉलरपर्यंत पोहोचल्याचा प्रकार संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला. या प्रकाराने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शरमेने मान खाली घालायला लावणारी घटना घडली. लोकप्रतिनिधीविरुद्ध सर्वसामान्य जनतेत असलेला असंतोष, त्यांना निवडून दिले असल्याची चूक जनता उघडपणे बोलून दाखवत आहेत. याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. याविषयी अजित पवार आपल्याच पक्षाच्या मंत्री असलेल्या भरणे यांना कोणता राजकीय डोस पाजणार याकडेही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

राज्यमंत्री यांविषयी जशी नाराजी जनतेत आहे तशी ती त्यांच्या पक्षामध्ये ही पहायला मिळत आहे. आ.अजित पवार हे कडक शिस्तीचे नेते मानले जातात.एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्यातील जुणे-जाणते नेते, पदाधिकारी हे विधानसभा निवडणुकीनंतर दुरावल्याचे चित्र तालुक्यात पक्षाच्या बैठकीत, कार्यक्रमात वारंवार दिसून आले आहे. तसेच तालुक्यात पक्षांतर्गत असलेले अंतर्गत बंडाळीचे दर्शनही वारंवार घडत आहे. याबाबत पदाधिकाऱ्यांना आ. पवार कशी कान उघडणी करणार याकडेही पक्षातील निष्ठावंतांचे लक्ष लागून राहिले आहे.

Categories
कवठेमहांकाळ सांगली

सांगली जिल्हा मैदानी निवड चाचणी जिल्हा क्रीडा संकुल मिरज येथे उत्साहात संपन्न झाली.


दि.१७/०१/२०२१
कवठेमहांकाळ- विद्याधर रास्ते

आज सांगली जिल्हा क्रीडा संकुल मिरज येथे जिल्हा मैदानी चाचणी घेण्यात आली. यामध्ये जवळपास ८५० खेळाडूंनी सहभाग नोंदाविला. कोविड १९ मुळे गेल्या वर्षभरामध्ये प्रथमच मैदानी निवड चाचणी स्पर्धाचे आयोजन केले गेल्यामुळे खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण होते. या निवड चाचणी मधून पहिला व दुसरा क्रमांक मिळविलेल्या खेळाडूंची निवड १९ ते २२ जानेवारी २०२१ रोजी पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धांसाठी करण्यात येणार आहे. असे राज्य अँथलेटिक असोसिएशनचे उपाध्यक्ष व जिल्हा मैदानी संघटनेचे सचिव श्री संजय पाटील यांनी सांगीतले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राजेंद्र, कदम, बाळासाहेब माने, हिम्मत पाटील, छ्त्रपती पुरस्कार प्राप्त युवराज खटके, विजयकुमार शिंदे, उदय गायकवाड, प्रा.डॉ.गणेश सिंहासने, प्रा.अक्रम मुजावर, प्रितेश पाटील, गजानन सुतार, मंडले सर, माया खटके, गंगा शिंदगी, राहूल कांबळे, आर्यदिप लोंढे, दिपक ऐवळे, पवन घोडके, अभिजीत तासगावकर, अंकुश कलगुटगी, अविनाश वाघमारे, या सर्वांनी स्पर्धा चांगल्या पार पाडण्यासाठी उत्तम पद्धतीने नियोजन व सहकार्य केले. स्पर्धकांमध्ये खूपच उत्साही वातावरण होते. त्यामुळे स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या.

Categories
मिरज सांगली

जय भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष परशुराम जाधव यांच्या चौकशीला सुरुवात


मिरज–अशोक मासाळ
डॉ सावंत विद्यामंदिर कोल्हापूर येथे कार्यरत सर्व शिक्षक यांचे दिनांक 29 12 2020 चे निवेदन व तक्रार अर्जाची छाननी करून शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांच्या आदेशानुसार चौकशी समिती नेमून प्रशासन अधिकारी कोल्हापूर महापालिका यांच्या अध्यक्षतेखाली चौकशीला सुरुवात झाली आहे. चौकशी चालू असताना जय भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्षा सुमित्रा जाधव, खजिनदार धैर्यशील जाधव हे शिक्षकांना धमकी देत असल्याचे आढळले त्यावेळी प्रशासन अधिकारी शंकर यादव याने त्यांना चांगलेच खडसावले व तेथून निघून जाण्यास भाग पाडले. या चौकशीच्या वेळी काही गंभीर आरोप संस्थाचालक परशुराम जाधव यांच्यावर असल्याचे समोर येत आहेत तसेच ही चौकशी समिती पुढील आठ दिवस सखोल चौकशी करणार असल्याचे प्रशासन अधिकारी शंकर यादव यांनी सांगितले.

Categories
मिरज सांगली Uncategorized

शिक्षक भारती मिरज तालुका कार्यकारणी जाहीर तालुकाध्यक्षपदी चंद्रकांत कांबळे सर यांची निवड

मिरज:- संजय पवार

जिल्हाअध्यक्ष महेश शरनाथे सर,सरचिटणीस कृष्णा पोळ,कोषाध्यक्ष बालम मुल्ला,पार्लमेंटरी बोर्ड उपाध्यक्ष दीपक काळे,जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर माने,मिरज तालुका अध्यक्ष संजयकुमार कवठेकर, यांनी शिक्षक बांधवांची मिरज शिक्षक भारती संघटना पदाधिकारी निवडी केल्या.
शिक्षक भारती संघटनेच्या कामाची महेश शरनाथे यांनी माहिती दिली.आमदार कपिल पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक भारती संघटना राज्यभर कार्यरत आसून प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांची सोडवणूक करत आहे. सरचिटणीस कृष्णा पोळ यांनी शिक्षक भारती संघटनेमध्ये सहभागी होत असलेल्या शिक्षकांचे स्वागत केले.शिक्षकांच्या प्रश्नांसाठी लढत राहू अशी ग्वाही दिली.
मिरज तालुकाध्यक्ष-चंद्रकांत कांबळे,
मिरज तालुका उपाध्यक्ष-श्रीधर सुर्यवंशी,
मिरज तालुका सरचिटणीस-विकास देवके,
शिक्षक भारती सांगली जिल्हा उपाध्यक्ष -अन्वर मुजावर
शिक्षक भारती सांगली जिल्हा कार्यवाहक-विकास वायदंडे
श्रीधर सूर्यवंशी ,सदानंद सवाईराम, प्रकाश कांबळे ,दिलीप ढास ,रमेश वायदंडे ,सिकंदर मुजावर, अनिल भोळे, जितेंद्र बनसोडे ,ज्योती पाटील, सुदर्शना रकटे,राणी सूर्यवंशी या उपस्थित शिक्षक बंधू भगिनीनी शिक्षक भारती संघटनेच्या विचाराने काम करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी माध्यमिक जिल्हाध्यक्ष सुधाकर माने,संजय पवार,आरिफ गोलंदाज, सुधाकर वसगडे,अन्सारअली जमादार,राजेंद्र दोरकर,हेमंत भाट,दिगंबर सावंत,बाळासाहेब सोलनकर,मलय्या नांदगांव,सहदेव पांढरे,चंद्रकांत भोसले,अविनाश सुतार,एकनाथ जाधव,सुभाष वाघमारे,बाळासाहेब सोलनकर,प्रकाश डुबुले, सुधाकर संग्रामे,नंदकुमार पाटील,दादासो खोत,प्रताप टकले,शहानवाज मणेर,उदयकुमार रकटे,संतोष दरेकर,निलिमा शहा,वनिता बोडके,प्रिती ठाकूर,हे शिक्षक बंधू -भगिनी उपस्थित होते.

Categories
मिरज सांगली

गुंडेवाडी या श्री प्रभू रामचंद्र यांच्या पावन स्पर्शाने पवित्र हनुमानाच्या मंदिरात कपिराज (वानर) उंबर्‍यावर प्राण अर्पण केले

आज विज्ञानयुगात सुद्धा आश्चर्यचकित करणारी घटना गुंडेवाडी गावात घडली

मिरज–अशोक मासाळ

सांगली जिल्ह्यामध्ये मिरज तालुक्यात गुंडेवाडी हे गांव वसले असून गुंडेवाडी या गावास पूर्वीपासूनच पुरातन वारसा लाभला आहे गुंडेवाडी गावचे हनुमान मंदिर हे दक्षिणमुखी असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे श्री प्रभू रामचंद्र यांचे ग्रंथ करून पाहिला असता या ग्रंथामध्ये गुंडेवाडी गावालगत असलेले दंडोबा अरण्याचा उल्लेख बघायला मिळेल त्यामुळे गुंडेवाडी हे गाव त्यामुळे गुंडेवाडी हे गाव श्री प्रभू रामचंद्र यांच्या पावन स्पर्शाने पावन ठरले आहे हनुमानाचे मंदिर हे गुंडेवाडी गावचे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध आहे. आज शनिवार दिनांक 21 2021 रोजी हनुमान मंदिरात एक कपि राज (वानर) चालत आले.
आज शनिवार असल्याने कोरूना काळाची जाणीव ठेवून भाविक सोशल डिस्टन्स पाळून हनुमंताचे दर्शन घेत होते. त्याच वेळी एक कपिराज मंदिरात प्रवेश करतो व मंदिरात असलेल्या अन्य देवदेवतांचे हात जोडून दर्शन घेतो व मंदिराच्या गाभाऱ्यात असणाऱ्या हनुमंताच्या समोर उंबर्‍यावर दक्षिणेकडे तोंड करून आपला प्राण अर्पण करतो. ही घटना पाहिल्यानंतर असे वाटते की आजच्या विज्ञान युगात सुद्धा आश्चर्यचकित करणारी घटना निश्चितच घडली आहे (अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही) वास्तविकता ही घटना शंभर टक्के सत्य आहे.
यावेळी गुंडेवाडी गावचे सरपंच त्यांचे सर्व सदस्य सर्व गावकरी मंडळी वारकरी मंडळी यांनी भारतीय संस्कृतीच्या व्यक्ती रिवाजानुसार कपिराजचे दपन विधी केली आहे.

Categories
सांगली

इच्छुक बेरोजगार उमेदवारांनी मोफत प्रशिक्षणासाठी सहभाग नोंदवावासहायक आयुक्त ज. बा. करीम

मिरज–अशोक मासाळसांगली, दि. 31 ,कौशल्य विकासाच्या विविध योजनांव्दारे जिल्ह्यास लागणारे आवश्यक कुशल मनुष्यबळ उद्योगांच्या गरजेनुसार तयार करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील विशिष्ट भौगोलिक तथा सामाजिक स्थिती, परंपरागत व्यवसाय, नैसर्गिक संसाधन तथा साधनसामुग्री इत्यादीच्या आधारे जिल्ह्यातील रोजगार/स्वयंरोजगासाठी अधिक मागणी असलेली क्षेत्रे विचारात घेऊन अधिक मागणी असलेल्या क्षेत्रातील रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी युवक यवुतींना उपलब्ध करून माहे जानेवारी 2020 पासून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कौशल्य योजना 3.0 सुरू करण्यात येत आहे. यामध्ये विविध कोर्सचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रशिक्षण घेण्यासाठी http://bit.ly/3aOuFMO या लिंकवर सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे. कौशल्य विकास प्रशिक्षणाकरीता पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार दिनांक व वेळ एसएमएस अलर्टव्दारे कळविण्यात येईल. Cnc Setter cum operator - Turning, Repair - Welder, Dth Set Top Box installation and service Technician, Cctv installation Technician, Field Technician - computing and peripherals, Junior software developer अशा विविध कोर्ससचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अधिक माहिीतसाठी 0233-2600554 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. करीम यांनी केले आहे.

Categories
सांगली

लोककला आणि पथनाट्य निवडसूचीसाठीअर्ज करण्यास 21 जानेवारी पर्यंत मुदत

सांगली–सुरेश संकपाळसांगली, दि. 31, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत लोककला व पथनाट्य यांची निवडसूची तयार करण्यासाठी संबंधित क्षेत्रातील अनुभवी संस्थाकडून दि. 1 जानेवारी 2021 पासून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक संस्थांनी जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे विहीत नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रासह दि. 1 जानेवारी 2021 ते 21 जानेवारी 2021 पर्यंत मिळतील अशा बेताने पाठवावेत, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे. शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी लोककला व पथनाट्य (उदाहरणार्थ गण-गवळण, अभंग, पोवाडे, पथनाट्य, बहुरूपी, भारूड इत्यादी) निवडसूची तयार करण्याचे काम सुरू आहे. इच्छुक संस्थांनी जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधून अर्जाचा नमुना व माहितीपत्रक प्राप्त करून घ्यावे. अर्जाचे नमुना व माहितीपत्रक www.maharashtra.gov.in आणि dgipr.maharashtra.gov.in या वेबसाईटवरही उपलब्ध आहे. पथकाला विविध विषयांवर (शासकीय योजनांसह) कार्यक्रम/पथनाट्य करण्याचा अनुभव असावा. पथक किमान दहा जणांचे असावे. यामध्ये स्त्री-पुरूष, वादक यांचा समावेश असावा. लोककला/पथनाट्य पथक ज्या जिल्ह्यातील असेल त्याच जिल्ह्यातून अर्ज दाखल करावा. केंद्र सरकारच्या गीत व नाट्य विभागाकडे नोंदणीकृत असल्यास प्राधान्य. संस्थेकडे स्वत:ची ध्वनीक्षेपण यंत्रणा असणे अपेक्षित आ

Categories
सांगली

रेशनकार्डमध्ये लाभार्थ्यांचे शंभर टक्के आधार सिडींगसाठी मोहिमजिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे

सांगली—सुरेश संकपाळ
सांगली, दि. 30, केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सार्वजनिक वितरण व्यवस्थेत अधिक पारदर्शकता येण्यासाठी मोहिम राबवून लाभार्थ्यांचे आधार व मोबाईल सिडींग सुधारणे आवश्यक आहे. याकरीता रास्तभाव दुकानांतील ई पॉस उपकरणांमधील e kyc व मोबाईल सिडींग सुविधेचा अधिकतम वापर करुन आधार व मोबाईल क्रमांक सिडींगचे प्रमाण वाढवणेची मोहिम सुरु करण्यात आलेली आहे. दिनांक 31 जानेवारी 2021 पूर्वी प्रत्येक रेशनकार्डमध्ये लाभार्थ्यांचे 100 टक्के आधार सिडींग आणि किमान एक वैध मोबाईल क्रमांक सिड करण्याच्या उद्दिष्टाने सांगली जिल्ह्यात मोहिम राबविण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी दिली.
एक राष्ट्र एकच रेशनकार्ड ही केंद्रशासनाची महत्वाकांक्षी योजना असून शिधापत्रिकेस आधार सिडींग 100 टक्के पूर्ण असणे हा या मोहिमेचा महत्वाचा टप्पा आहे. ही मोहीम राज्य पातळीवर राबविण्याबाबत केंद्र शासनाने सुचना दिलेल्या आहेत. ही मोहिम फलद्रुप होण्यासाठी राष्टीय अन्नसुरक्षा योजनेतील शिधापत्रिकेतील सर्व लाभार्थ्यांचे मोबाईल क्रमांक व आधार सिडींग 100 टक्के पूर्ण असणे आवश्यक आहे. या योजनेमुळे भविष्यात देशातील कोणतीही व्यक्ती कोणत्याही ठिकाणी रेशनकार्डवर धान्य घेवू शकणार आहे. यासाठी 100 टक्के लाभार्थ्यांनी त्यांचे आधार सिडींग करणे व एक वैध मोबाईल नंबर रेशनकार्डास जोडणे आवश्यक आहे.
सांगली जिल्ह्यामध्ये प्राधान्य कुटुंब योजनेमधील एकूण 379099 शिधापत्रिकेपैकी 84 टक्के लाभार्थ्यांचे आधार सिडींग झाले असून अद्याप 269580 लाभार्थ्यांनी अजून त्यांचे आधार रेशनकार्डास जोडलेले नाही . तसेच अंत्योदय अन्न योजनेतील एकूण 31740 शिधापत्रिकेपैकी 82 टक्के शिधापत्रिकेचे आधार सिडींग पूर्ण झाले असून अद्याप 23570 लाभार्थ्यांनी अजून त्यांचे आधार रेशनकार्डास जोडलेले नाही. तसेच शिधापत्रिकेस मोबाईल नंबर ही जोडणे आवश्यक असून शिधापत्रिकाधारकांनी दिलेले बरेच मोबाईल नंबर हे अवैध आहेत. तरी राष्टीय अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट असणाऱ्या लाभार्थ्यांनी त्यांचा वैध नंबर ही शिधापत्रिकेस जोडणे आवश्यक आहे.
धान्याचे मासिक वाटप करतेवेळी ई पॉस उपकरणाव्दारे रास्तभाव दुकानदार यांच्यामार्फत शिधापत्रिकेतील लाभार्थ्यांचा आधार व मोबाईल क्रमांकाचे सिडींग करण्यात येणार आहे. तहसिल कार्यालयामार्फत रास्त भाव दुकाननिहाय आधार सिडींग न झालेल्या लाभार्थ्यांची रास्त भाव दुकाननिहाय यादी करण्यात येणार असून 31 जानेवारी 2021 पूर्वी यादीमधील लाभार्थ्यांचे आधार व मोबाईल क्रमांक 100 टक्के सिडींग करण्यात येणार आहे.
प्राधान्य कुटुंब लाभार्थी येाजना व अंत्योदय अन्न योजनेतील ज्या लाभार्थ्यांचे रेशनकार्डमधील आधार क्रमांक सिडींग केलेले नाही त्यांनी संबंधित रास्त भाव दुकानदारास संपर्क साधून आपले आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक ekyc करुन घ्यावे. केंद्र शासनाच्या सुचनेनुसार 31 जानेवारी 2021 पर्यंत आधार सिडींग न झालेल्या लाभार्थ्यांचे अनुज्ञेय धान्य पुढील महिन्यापासून आधार सिडींग होईपर्यंत निलंबित करुन त्या लाभार्थ्यास धान्य मिळणार नाही. तरी अन्नसुरक्षा लाभार्थ्यांनी आपला आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक रेशनकार्डास संलग्न करुन घ्यावा. ही मोहिम दिनांक 31 जानेवारी 2021 अखेर 100 टक्के पूर्ण करावी, असे आवाहन श्रीमती बारवे यांनी केले आहे.

Categories
सांगली

पालकमंत्री जयंत पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा


मिरज–अशोक मासाळ सांगली, दि. 30, राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील गुरूवार, दि. 31 डिसेंबर 2020 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरूवार, दि. 31 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजता मुंबईहून इस्लामपूरकडे प्रयाण. सकाळी 11 वाजता इस्लामपूर येथे आगमन व राखीव. सकाळी 11.30 वाजता राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना लि. राजारामनगरच्या डिस्टीलरी प्लांटच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती, स्थळ - कारखाना, साखराळे. दुपारी राखीव. शुक्रवार, दि. 1 जानेवारी 2021 रोजी राखीव.

Categories
मिरज सांगली

श्री उमेश नवाळे यांनी केलेल्या कामाची चौकशी करून त्यांना बडतर्फ करून त्यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल असे प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी द्वारे निवेदन

मिरज–अशोक मासाळ
श्री उमेश नवाळे हे ग्रामसेवक/ ग्रामविकास अधिकारी म्हणून त्यांनी मिरज तालुक्यामध्ये वड्डी एरंडोली नरवाड टाकळी नांद्रे सध्या माधवनगर व आटपाडी येथे केलेल्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता वगैरे व्यवहार केलेला आहे. श्री नवाळे यांनी कामकाज केलेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभा व ग्रामसभेचे प्रोसिडिंग तपासले असता अनेक गंभीर बाबी निदर्शनास येतील. श्री नवाळे यांनी आत्तापर्यंत केलेल्या कामकाजामध्ये ठेकेदारांनी कामे केलेली नसतानाही व ती केल्याचे भासवून ठेकेदारांना मूल्यांकन न करता लाखो रुपयांची बिले अदा केलेली आहेत तसेच श्री नवाळे यांनी प्रत्येक ठिकाणी शासनाचे नियम व आदेश डावलून बोगस नोंदी घातल्या आहेत व तसेच परस्पर ठराव देणे अशा गंभीर बाबीही श्री नवाळे यांनी केलेले आहेत त्यामुळे श्री नवाळे यांनी केलेल्या कामकाजाचे मस्त अधिकारी नेमून चौकशी करावी तसेच स्थानिक निधी लेखा परिक्षक कार्यालयाकडून विशेष लेखा पथक नेमून फिरलेखाकापरीक्षण केल्यास कोट्यावधी रुपयांचा घोटाळा उघडकीस येईल त्यामुळे येत्या 15 दिवसात या गंभीर बाबी चा सखोल चौकशी करून श्री नवाळे यांना बडतर्फ करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अन्यथा आम्ही पक्षाच्यावतीने मा हसन मुश्रीफ साहेब ग्राम विकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या निवासस्थानासमोर मुदत या आंदोलन करणार आहोत याची आपण दखल घेऊन कारवाई करावी असे निवेदन मा मुख्य कार्यकारी अधिकारी सो जिप सांगली यांना देण्यात आले यावेळी प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख स्वप्निल खांडेकर जिल्हा उपाध्यक्ष गौतम भगत व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Categories
मिरज सांगली

लढवय्या शिक्षक भारतीच्या पाठीशी ठामपणे राहू -आमदार मानसिंगराव नाईक.

मिरज:- संजय पवार
सदगुरु आश्रमशाळा शिराळा येथील सभागृहात पार पडलेल्या वाळवा-शिराळा तालुका सावित्री फातिमा आदर्श शिक्षिका पुरस्कार वितरणात ते बोलत होते.पुढे बोलताना आमदार मानसिंग नाईक बोलताना म्हणाले की विधिमंडळात शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांचे काम निश्चितच प्रभावी आहे. विविध प्रश्न घेऊन सतत शिक्षणमंत्री व इतर मंत्री यांचेकडे पाठपुरावा करण्याचे काम त्यांचे सतत चालूच असते.सांगली जिल्ह्यात आम्ही सर्वजण शिक्षक भारतीच्या पाठीशी ठामपणे राहू.यावेळी वाळवा पंचायत सभापती शुभांगी पाटील,शिराळा पंचायत समिती सभापती वैशाली माने ,श्री प्रकाश पाटील,जिल्हाध्यक्ष महेश शरणाथे,सरचिटणीस कृष्णा पोळ,कोअर कमिटी अध्यक्ष कादर अत्तार,नेते नंदकुमार पाटील,वाळवा अध्यक्ष श्री चंद्रशेखर क्षीरसागर, शिराळा अध्यक्ष दादासाहेब खोत,सरचिटणीस सुधाकर वसगडे,कार्याध्यक्ष महेश चौगुले,कोषाध्यक्ष बालम मुल्ला सरचिटणीस अमोल जाधव,जिल्हा नेते दीपक कांबळे,अन्सारअली जमादार ,संभाजी खोत,महिला सरचिटणीस सुरेखा औताडे,केंद्रप्रमुख तानाजी माने, नजमा पिरजादे, मुख्याध्यापक सर्जेराव टकले, बाजीराव जाधव,दिगंबर सावंत, उदयकुमार रकटे,महेश टकले, नितांत तांबडे,राजू जाधव, संतोष खोत, दिलीपकुमार मोरे, सुनिल पाटील ,पदाधिकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर,अधिकारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर पुरस्कार 3 जानेवारी 2020 रोजी जाहीर करण्यात आले होते. परंतु कोरोना महामारीमुळे वितरण सोहळा लांबणीवर पडला होता.यानंतर बोलताना वाळवा सभापती सौ. शुभांगी पाटील यांनी शिक्षक भारतीच्या कामाचे कौतुक करत आपल्या मनोगतामध्ये इयत्ता पाचवी व आठवी ऐवजी इयत्ता चौथी व सातवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा असावी व त्यामुळे शिक्षकानाही निश्चित ध्येय मिळेल अशी आशा व्यक्त केली.
शिराळा तालुक्याच्या पंचायत समिती सभापती सौ.वैशाली माने यांनी आपल्या मनोगतातून सावित्री-फातिमा यांच्या कार्याचा आढावा घेतला व शिक्षक भारतीच्या या उपक्रमाचे कौतुक केले.जिल्हाध्यक्ष महेश शरनाथे यांनी शिक्षक भारतीच्या गेल्या पाच वर्षातील कामाचा आढावा घेतला व सावित्री-फातिमा कॅशलेस आरोग्य योजनेविषयी माहिती दिली. शिक्षक भारती शिक्षक बँक निवडणूक स्वतंत्रपणे लढवण्याचे जाहीर केले. जिल्हा सरचिटणीस कृष्णा पोळ यांनी विषय शिक्षकवेतनश्रेणी विषयी असणारी त्रुटी व त्यावरील उपाय यासंदर्भात आपले मत व्यक्त केले.शिराळा तालुका अध्यक्ष दादासाहेब खोत खोत म्हणाले की महिलांचा सन्मान या पुरस्कारद्वारे होत आहे.वाळवा अध्यक्ष श्री. चंद्रशेखर क्षिरसागर आपल्या मनोगतात म्हणाले की,अन्यायाविरुद्ध आवाज उठणारी ही चळवळ असून तालुक्यात व जिल्ह्यात वादळात दिवा लावण्याचे काम आमदार कपिल पाटील यांच्याप्रेरणेने आम्ही करत आहोत व शिक्षकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतच राहू .सत्कारमूर्ती यांच्यावतीने बोलताना केंद्रप्रमुख सुनंदा पाटील म्हनाल्या की शिक्षक भारतीचे इवलेसे रोपटे कमी काळात कामाच्या जीवावर जिल्ह्यात व राज्यात विविध क्षेत्रात भरारी घेत असून लवकरच त्याचे वटवृक्षात रूपांतर होईल.आम्हा सर्वांना पुरस्कार देऊन प्रेरणा मिळाली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.श्रीरंग गायकवाड ,सौ सुवर्णा बच्चे, अनिता कदम व सौ. सुप्रिया घोरपडे यांनी केले.आभार अमोल जाधव यांनी मानले.

Categories
कवठेमहांकाळ मिरज सांगली

खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेचा “दिनदर्शिका 2021” प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला.


दि. २८/१२/२०२०
कवठेमहांकाळ- विद्याधर रास्ते

खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्यावतीने प्रत्येक वर्षी पतसंस्थेच्या सभासद व हितचिंतकांना दिनदर्शिकाचे वाटप करण्यात येते. सन २०२१ च्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा महानगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी मा. श्री हनमंत बिराजदार साहेब तसेच विशेष कार्यक्रम अधिकारी मा. श्री सतीश कांबळे साहेब यांचे शुभहस्ते संपन्न झाला. प्रमुख पाहुणे मा. श्री. हनमंत बिराजदार साहेब यांनी पतसंस्थेच्या कामकाजाची माहिती घेतली व पतसंस्थेचे अनेक उपक्रम पाहून समाधान व्यक्त केले. पुढील काळात ही पतसंस्था वटवृक्ष झाल्याशिवाय राहणार नाही! असा विश्वास त्यांनी व्यक्त केला, शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघ व शिक्षकांच्या आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी पतसंस्था हातात हात घालून काम करीत आहेत. याबद्दल महासंघाच्या पदाधिकार्‍यांना व पतसंस्थेच्या सर्व संचालक मंडळाला धन्यवाद दिले. तसेच संचालक मंडळ सभासदांच्या हिताचा व पारदर्शी कारभार करत आहे. बद्दल संचालक मंडळाचे ही त्यांनी विशेष कौतुक व अभिनंदन केले. तसेच सतीश कांबळे साहेब यांनीही पतसंस्थेच्या कामकाजाविषयी समाधान व्यक्त करून अवघ्या बारा वर्षांमध्ये पतसंस्थेत जवळजवळ पाच कोटीच्या ठेवी आल्या आहेत, यावरून पतसंस्थेवरती लोकांचा विश्वास असल्याचे हे नामवंत उदाहरण आहे, असे सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक पतसंस्थेचे चेअरमन श्री मु.न.तांबोळी यांनी केले. पतसंस्थेच्या कामकाजाविषयीची माहिती खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री अरविंद गावडे सर यांनी करून दिली. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री पा.बा. पाटील सर, पतसंस्थेचे चेअरमन श्री मु.न. तांबोळी, व्हाईस चेअरमन श्री सुभाष माने, मानद सचिव श्री उमेश कुलकर्णी, खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष व विद्यमान संचालक श्री अरविंद गावडे, महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री नामदेवराव मदने, श्री डी. बी. कांबळे, महेश सपकाळ, युवराज वायदंडे, गुरुप्रसाद गुरव व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री डी.बी. कांबळे यांनी केले तर आभार श्री उमेश कुलकर्णी यांनी मानले.

Categories
मिरज सांगली

सावित्री-फातिमा कॅशलेस योजना- शुभारभ शिक्षक आमदार कपिल पाटील याच्या हस्ते सपन्न .


मिरज:- संजय पवार दिनांक २७ डिसेंबर रोजी शिक्षक आमदार व शिक्षक भारतीचे संस्थापक कपिल पाटील यांच्या हस्ते सावित्री – फाती मा कॉशलेश योजनेच शुंभार भ कडेगाव येथेशिक्षक भारतीच्या कार्यकर्त्यांची कार्यकत्याचा मेळाव्यात करण्यात आला . यावेळी शिक्षक भारतीचे सांगली जिल्हाध्यक्ष सुधाकर माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
यावेळी शिक्षक भारतीच्या वतीने संघटनेच्या सभासद असणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी च्या सावित्री-फातिमा कॅशलेस योजनेचे उदघाटन आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
.कार्यक्रमा प्रसंगी बोलताना आमदार कपिल पाटील म्हणाले की ही कॅशलेस योजना ही शिक्षकाच्या कुटुबाची काळजी घेणारी मेडीकल क्लेम योजना आहे .असे मत नोंदवत चांगला भारतीय नागरिक घडवण्याची जबाबदारी ही आपल्या शिक्षकांची आहे. शिपाई भरती बाबतीत काढलेला शासन निर्णय मागे घेण्यास भाग पाडू व पूर्वी प्रमाणे भरती करून मूळ वेतन अदा करण्यासाठी प्रयत्नशील राहूअसे ही ते म्हणाले. यापुढील काळात शिक्षण क्षेत्रात अन्याय कारक बदल घडवण्याच घाट केंद्र शासनाने घातला आहे .त्यासाठी एकत्र येवून लढा देण्याचे आव्हान आमदार कपिल पाटील यांनी केले.
यावेळी शिक्षक भारती प्राथमिक राज्याध्यक्ष नवनाथ गेंड, राज्याचे माध्यमिकचे कार्यध्यक्ष सुभाष मोरे यांनी सावित्री _ फातिमा कॉशलेश योजने बाबत मार्गदर्शन केले. तर शिक्षक भारती प्राथमिकचे जिल्हाध्यक्ष महेश शरनाथे व महानगर अध्यक्ष आरीफ गोलंदाज यांनी शिक्षकांच्या विविध समस्या मांडले.
याप्रसंगी शिक्षक भारती कडेगाव तालुका अध्यक्ष म्हणून प्रवीण पवार व शरद शिदे यांच्या कार्य चे कौतुक करूण त्याचा गैरव करण्यात आला
पलूस येथील सहाय्यक शिक्षक सलीम सय्यद यांचे गेल्या महिन्यात आकस्मित मृत्यू झाले.सलीम सय्यद सर हे 20 टक्के अनुदान प्राप्त शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते.त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने सांगली जिल्हा उर्दू शिक्षक भारती मार्फत त्यांच्या कुटुंबाला मदत म्हणून दोन लाख सात हजार रुपये आमदार कपिल पाटील यांच्या हस्ते व राज्याध्या उर्दु मुस्ताफ पटेल याच्या वतीनेप्रदान करण्यात आला .
यावेळी शिक्षक भारती प्राथमिक राज्याध्यक्ष नवनाथ गेंड सर, राज्याचे कार्यध्यक्ष सुभाष मोरे,उर्दू शिक्षक भारती राज्याध्यक्ष मुश्ताक पटेल सर, सांगली जिल्हा माध्यमिक जिल्हाध्यक्ष सुधाकर माने,प्राथमिक चे जिल्हाध्यक्ष महेश शरनाथे,महानगरअध्यक्ष आरीफ गोलंदाज,जिल्हाउपाध्यक्ष मोहन पुजारी,जिल्हाकार्याध्यक्ष संजय पवार,जिल्हासचिव आशिष यमगर,प्राथमिक सचिव कृष्णा पोळ,वाळवा तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील,शिराळा तालुका अध्यक्ष बाजीराव जाधव,मिरज तालुका उपाध्यक्ष महेश कोळी, संघटक कोरे,उर्दू जिल्हाध्यक्ष अशरफ अशरफ प्रविण पवार अध्यक्ष कडेगाव शरद शिंदे सचिव महादेव खोत मिरज तालुका सधटक नितीन पाटील कुमटे ( तासगाव ) कोरे सर आरग हाय . सुरेश कदम आटपाडी दिगंबर सांवत . जत अध्यक्ष धडस सर पालुस चौगले जिल्हातील सर्व शिक्षक भारतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
याकार्यक्रमाचे सूत्र संचालन आशिष यमगर यांनी केले तर आभार फारूक मोमीन यांनी मांडले.

Categories
मिरज सांगली

जवाहर हायस्कूलचा एक सामाजिक व शैक्षणिक उपक्रमशिक्षक आपल्या दारी

मिरज–अशोक मासाळ
लोकांच्या ध्यानीमनी नसताना शिक्षण क्षेत्रापुढे कोरोनामुळे अनेक आव्हाने उभी राहिली, शाळा बंद झाल्या, मुले व शिक्षकांची एकमेकांपासून ताटातूट झाली. अर्धे आयुष्य शिक्षकांनी मुलांच्या संगतीत घालविली आहेत .निर्माण झालेला मुलांचा विरह शिक्षकांना पेलवेना झाला .बाळाचा विरह आई पेलवू शकत नाही तशी अवस्था शिक्षकांची झाली .मुले लॉकडाउनच्या काळात फोनवरून अभ्यासाची , कौटुंबिक, आर्थिक परिस्थितीची, आरोग्याची चर्चा करायची त्यावेळी अनेक धक्कादायक व मन हेलावणाऱ्या गोष्टी ऐकायला मिळाल्या ,काही मुलांचे नातेवाईक, आप्तस्वकीय हे जग सोडून गेले. मुले भेदरली अशा अवस्थेत त्यांना एकच आधार वाटू लागला तो म्हणजे माझा शिक्षक. अनेक अडचणी आल्या, प्रश्न निर्माण झाले परंतु संवाद साधून,एकमेकांशी चर्चा करून, विचारविनिमय करून त्यातून मार्ग काढायचा व भेदरलेल्या आणि खचलेल्या मुलांना पुन्हा पाठीवरती हात ठेवूनी लढ म्हणायचे हा विश्वास विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण करण्यासाठी जवाहर हायस्कूल चे शिक्षक आता विद्यार्थ्यांच्या घरी निघालेत. तोच विद्यार्थी पुन्हा नव्या उमेदीने घडवण्यासाठी शिक्षक आपल्या दारी!!!
मुख्याध्यापिका
जवाहर हायस्कुल अँड ज्युनिअर कॉलेज मिरज.

Categories
कवठेमहांकाळ सांगली

देवराष्ट्रे येथे सोनार समाजाचा तालुकास्तरीय मेळावा संपन्न


दि.२६/१२/२०२०
कवठेमहांकाळ- विद्याधर रास्ते

देवराष्ट्रे ता.कडेगाव जि.सांगली येथे सोनार समाजाच्या तालुकास्तरीय मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यास ओबीसी संघटनेचे प्रदेशअध्यक्ष मा.श्री.मधुकर जंगम. सोनार समाजाचे राज्य अध्यक्ष प्रकाश पोतदार व ओबीसी संघटनेचे जिल्हाअध्यक्ष सुहास पंडित उपस्थित होते. यावेळी बोलताना मधुकर जंगम यानी इ.1ली ते 12वी च्या मुलांना शिष्यवृत्ती व इतर सुविधांची माहिती दिली त्याचबरोबर विद्यार्थ्यांना. समाजातील मुला-मुलींना मोफत आयएएस,आयपीएस, एमपीएससी करण्यासाठी नागपूर येथील महाज्योती संस्था, बिनव्याजी 1लाख रुपये देत असल्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या व्यवसाय व कुटुंब उद्योगासाठी कर्ज, पुरवत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी व्यावसायिक शिक्षणासाठी वस्तीगृह सुविधेचा फायदा घ्यावा, असे सांगत विविध विषयांवर याबाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमासाठी समाजातील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे हा मेळावा अत्यंत उत्तम पद्धतीने पार पडला.

Design a site like this with WordPress.com
Get started