पाटण हिंदू सम्राट प्रतिनिधी उमेश सुतार यांजकडून महाराष्ट्रामध्ये दिवसागणिक कोरोना बाधितांची रूग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातही शाळा, कॉलेजेस पुन्हा बंद करण्याचा निर्णय झाला आहे. या निर्णयामुळे यंदा बोर्डाची परीक्षा देणार्या 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आता सरकार एक पाऊल पुढे आले आहे. शिक्षण विभागाकडून आता पुन्हा 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी डीडी सह्याद्री वर विषयनिहाय तासिकांचे आयोजन करण्यात आले आहे. 15 मार्च पासून सह्याद्री चॅनेलवर विद्यार्थ्यांना विशेष कार्यक्रम पाहता येणार आहे.
आमदार स्थानिक विकास निधीमध्ये एक कोटीची वाढ करणारे महाविकास आघाडी शासनाने अनेक वर्षे वेतनपासून वंचित ठेवलेल्या शिक्षक शिक्षकेत्तर प्रति असणारी असलेली दृष्ट मानसिकता संपुष्टात आणून सदर बांधवाना तात्काळ न्याय देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कार्याध्यक्ष तथा नागपूर विभाग शिक्षक आमदार नागो गाणार यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. शासन निर्णय दिनांक २३ फेब्रुवारी२०२१ अन्वये आमदार स्थानिक विकास कार्यक्रमा अंतर्गत सन २०२०-२१ या आर्थिक वर्षापासून प्रतिवर्षी रुपये एक कोटीची वाढ करण्यात आली ही वाढ करताना शासनाला कोरोना संकट आडवे आले नाही. परंतु राज्य मंत्रिमंडळाने तीन वेळा घेतलेले निर्णय त्या आधारावर निर्गमित केलेली शासन निर्णय विधिमंडळात मंजूर केलेल्या निधी या सर्व संवैधानिक बाबी पूर्ण झाल्या असताना शासनाने शिक्षकांना दिनांक १ एप्रिल २०१९ पासून २०टक्के वेतन अनुदान व वीस टक्के वाढीव वेतन अनुदान वितरित करण्याचा शासन आदेश निर्गमित केला नाही . तसेच व घोषित शाळा व नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांना निधी सह अनुदानास पात्र घोषित करण्याचा निर्णय घेऊन आदेश निर्गमित केला नाही . शिक्षक शिक्षकेतर प्रति शासनाची दृष्ट मानसिकता सुस्पष्ट करणाऱ्या या घटनेचा शिक्षक शिक्षकेत्तर समुदायाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त होत आहे. म्हणून शासनाने आपली दृष्ट मानसिकता संपुष्टात आणून २० टक्के वेतन अनुदान व २० टक्के वाढीव वेतन अनुदान वितरित करण्याचा आदेश तसेच घोषित शाळा व नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांना निधी सह अनुदानास पात्र घोषित करण्याचा आदेश तात्काळ निर्गमित करण्याची मागणी सदर निवेदनात करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभाग कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिली आहे .
पाटण हिंदू सम्राट प्रतिनिधी उमेश सुतार यांजकडून राज्यात करोना रुग्णांच्या वाढत्या आकडय़ांनी दहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या शिक्षण क्षेत्रासमोर पुन्हा संकट उभे केले आहे. रुग्णवाढीचा आलेख असाच राहिल्यास दोन दिवसांआधी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांच्या संभाव्य वेळापत्रकावर संकट उद्भवण्याची भीती शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, करोनामुळे पुन्हा परीक्षा पद्धतीमध्ये किंवा वेळापत्रकात बदल झाल्यास कमी मनुष्यबळावर काम करणाऱ्या शिक्षण मंडळालाही नियोजनासाठी कसरत करावी लागणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच परीक्षा फेब्रुवारी-मार्चऐवजी एप्रिल-मे या कालावधीत होणार आहे. बारावीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे 2021 या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे या कालावधीत होणार आहे. मात्र, मागील आठ दिवसांपासून राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत रोज वाढ होत आहे. त्यामुळे विदर्भातील अमरावती, अकोला आणि यवतमाळमध्ये बाधित क्षेत्र जाहीर करण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्य़ामध्ये सुरू झालेल्या इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा करोनाच्या धडकीने पुन्हा बंद करून ऑनलाइन वर्ग सुरू करण्यात आले. पालकांमध्ये भीती:इयत्ता दहावी आणि बारावी हे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची पुढील दिशा ठरवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे वर्ष असते. मात्र, करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने वेळापत्रकात बदल झाल्यास विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नियोजन बिघडणार आहे. शिवाय लेखी परीक्षा ही तीन तासांची असल्याने संक्रमणाच्या भीतीने पालक चिंतीत झाले आहेत.
आदर्श हायस्कूल भामटे ता. करवीर जि. कोल्हापूर या विद्यालयातील सहाय्यक शिक्षक श्री मच्छिंद्र रघुनाथ कुंभार यांना नुकताच मानाचा 110 देशांचा सहभाग असलेला ग्लोबल टीचर पुरस्कार 2020 ने सन्मानित करण्यात आले.
श्री कुंभार हे गणित विषयाचे अध्यापक आहेत. त्यांनी गणित विषयांमध्ये तयार केलेली 105 ॲप्स, अनेक व्हिडिओ ई- कन्टेन्ट , गणित विषयासाठी बनविलेल्या 5000 हून अधिक कृतीपत्रिका, वर्गामध्ये राबविलेले विविध नवोपक्रम त्याचबरोबर भूमितीसारखा काठिण्य पातळीचा विषय सुलभ व्हावा यासाठी त्यांनी राबवलेल्या कृतीतून शिक्षण या नवोपक्रमांची दखल विद्या प्राधिकरण पुणे (SCERT) यांनी घेतली आहे.
त्याचबरोबर नवोपक्रमाविषयीचे त्यांचे पाच लेख आंतराष्ट्रीय जर्नल मध्ये झळकले आहेत. इयत्ता नववी व दहावीच्या गणित विषयासाठी *इंटरॅक्टिव्ह ॲनिमेटेड फ्लिपबुक ही संकल्पना राबवून एका क्यूआर कोड मध्ये संपूर्ण पाठ्यपुस्तक तयार करून शिक्षकांचे अध्यापन व विद्यार्थ्यांचे अध्ययन त्यांनी सुलभ केले आहे. गणित भाग 1 व गणित भाग 2 या दोन्ही पाठ्यपुस्तकातील प्रत्येक घटकाला एक स्वतंत्र क्यूआर कोड तयार करून त्याचे पाठ्यपुस्तक तयार केले आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः QR कोड तयार करून आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये ते चिकटवलेले आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या साह्याने अध्ययन व अध्यापन या दोन्ही प्रक्रिया अत्यंत सुलभ होण्यास मदत झाली आहे. नियमित उपस्थित असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत आहेच शिवाय जर एखादा विद्यार्थी गैरहजर राहिल्यास त्याचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी QR कोडयुक्त पाठ्यपुस्तक एक वरदान ठरले आहे.
विद्यार्थ्यांच्यासाठी त्यांनी केलेल्या या व अशा विविध शैक्षणिक कार्याची दखल घेऊन AKS फाउंडेशन, दिल्ली यांनी त्यांना मानाचा ग्लोबल टीचर-2020 हा पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
श्री कुंभार यांनी हे यश आपल्या सर्व विद्यार्थ्यांना, तंत्रस्नेही मित्रांना व आपल्या गुरुवर्यांना समर्पित केले आहे. त्यांना हे सुयश मिळण्यामागे डायटचे प्राचार्य डॉ.श्री. आय. सी. शेख , माध्यमिकचे शिक्षणाधिकारी . श्री. किरण लोहार उपशिक्षणाधिकारी श्री डी. एस. पोवार करवीरचे गटशिक्षणाधिकारी श्री. एस. के. यादव , विस्तार अधिकारी मा. श्री ओतारी , श्री. डी. सी. कुंभार व श्री विश्वास सुतार , कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सचिव श्री दत्ता पाटील व संघाचे सर्व पदाधिकारी व संचालक, आदर्श हायस्कूल भामटे ता करवीर जि. कोल्हापूरचा सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद, त्याचबरोबर कोल्हापूर जिल्हा तंत्रस्नेही टिम (TSTS) चे सर्व सन्माननीय तंत्रस्नेही शिक्षक मित्र व मुख्याध्यापक संघातील गणित-विज्ञान विषय समितीतील सर्व सन्माननीय सदस्य या सर्वांचे लाख मोलाचे सहकार्य, प्रसंगी मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले आहे. या सर्वांच्या सहकार्यामुळेच मला हे सुयश मिळाले आहे. अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. ग्लोबल टीचर अवार्ड-2020 हा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या श्री मच्छिन्द्र कुंभार यांचे कौतुक होत आहे.
हिंदुसम्राट प्रतिनिधी/ संतोष चव्हाण कोल्हापूर संचमान्यता बाबत शिक्षण उपसंचालक यांना अधिकार देण्यात यावे याकरिता मा शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांची मुंबई येथे मा पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, व मा आ.जयंत आसगावकर यांच्या समवेत काही दिवसापूर्वी भेट घेतली होती, त्यावेळी शिक्षणमंत्री महोदया यांनी ही मागणी मान्य केली होती,त्या अनुषंगाने आज पुणे येथे मा आयुक्त कार्यालय, व शिक्षण संचालक येथील अधिकारी यांच्या भेटी घेतल्या ,संचमान्यता नसल्याने अनुदानासाठी अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत, पदे असताना ही संचमान्यता चुकल्यामुळे सतत पुणे येथे येण्यास राज्यातील विविध जिल्ह्यातील मुख्याध्यापक,शिक्षकांना त्रासाचे होत आहे, त्यामुळे या अडचणी समजून पूर्वीप्रमाणे शिक्षण उपसंचालक यांना अधिकार देण्यात यावेत जेणेकरून राज्यातील विविध लोकांना होणारा त्रास होणार नाही, याबाबत यापूर्वी मा शिक्षणमंत्री महोदया यांना याबाबत सविस्तर माहिती दिली आहे, याबाबत आपल्या स्तरावरून लवकर निर्णय घ्यावा ही विनंती मा आयुक्तसो व मा संचालक सो यांना करण्यात आली यावेळी म.रा.का.वि.कृ.समितीचे राज्य उपाध्यक्ष मा.श्री.खंडेराव जगदाळे, मा प्रकाश पाटील, मा गजानन काटकर, जनार्धन दिंडे, रामराजे सुतार, सावंता माळी, हे उपस्थित होते,
‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार किणी हायस्कूल किणीचे अध्यापक भिमराव मलगुंडे यांना शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या हस्ते प्रदान
किणी ,ता. १९: डी.बी. पाटील शैक्षणिक विचारमंच कोल्हापूर यांच्या वतीने देण्यात येणारा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार किणी हायस्कूल किणीचे अध्यापक भिमराव मलगुंडे यांना शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
वृक्षारोपण, निर्माल्य दान उपक्रम, इको फ्रेंडली रंगपंचमी, फटाकेमुक्त दिवाळी यासारखे विविध पर्यावरणपूरक उपक्रम त्यांनी राबवले आहेत. किणी परिसरात ते सर्पमित्र म्हणून सुपरिचित आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण संवर्धन, सर्प-शेतकऱ्यांचा मित्र या विषयांवर त्यांनी शेकडो व्याख्यानातून सामाजिक प्रबोधनाचे कार्य केले आहे.
त्यांच्या या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
त्यांना मुख्याध्यापिका सुरेखा शिरोटे ,पर्यवेक्षक डी.एच. पाटील ,किणी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आण्णासाहेब पाटील, उपाध्यक्ष सुहास माने, सचिव राजेंद्र पाटील व सर्व संचालक यांचे मार्गदर्शन लाभले.
मुंबई,ठाणे,नाशिक,पालघर व अन्य काही जिल्हे वगळता राज्यातील इयता नववी ते बारावीच्या शाळा-कॉलेज सुरू झाले आहेत व आता मुंबईसह सर्वच ठिकाणी शाळा सुरू होण्याबाबत पालक,शिक्षक, संस्थचालक व विधार्थीही आग्रही आहेत,कारण दहावी-बारावीचे महत्वाचे वर्ष असून गेल्या कित्येक महिन्यांपासून हे विधार्थी प्रत्यक्ष शाळेतील शिक्षणापासून वंचित राहिले आहेत.सध्या मुंबईतील कोरोना संख्या कमी होत आहे,पण ब्रिटन व इतर काही देशांमध्ये कोरोना विषाणूचा नवीन प्रकार आढळून आल्यामुळे राज्यात पुन्हा एकदा सर्व प्रशासकीय यंत्रणा सावध झाल्या असून मुंबई व इतर काही ठिकाणी रात्रीची संचारबंदी सुरू करण्यात आली आहे.तेव्हा १ जानेवारी २०२१ पासून मुंबईसह इतर ठिकाणच्या शाळा सुरू करायच्या की नाहीत याबाबत शिक्षण विभागाकडून अजूनपर्यंत कोणतीही स्पष्टता किंवा दिशानिर्देश देण्यात आलेले नसल्याने प्रशासनाने याबाबत लवकरात लवकर स्पष्टता आणून याबाबतचा संभ्रम दूर करावा अशी मागणी मुख्याध्यापक व पालकांकडून होत आहे.