Categories
शिरसगाव

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या श्रीगोंदा तालुका अध्यक्षपदी अंकुश शिंदे यांची सलग दुसऱ्यांदा फेर निवड


श्रीगोंदा ( हिंदू सम्राट शिरसगाव बोडखा प्रतिनिधी आदेश उबाळे यांच्याकडून )
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या श्रीगोंदा तालुका अध्यक्षपदी अंकुश शिंदे यांची नुकतीच बिनविरोध दुसऱ्यांदा फेर निवड करण्यात आली
निवडीबद्दल चे नियुक्तीपत्र महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष मा . दत्तात्रय पाचपुते यांच्या हस्ते देण्यात आले
पत्रकार अंकुश शिंदे हे गेल्या पंधरा वर्षापासून पत्रकारिता करीत तालुक्यातील भ्रष्टाचाराला वाचा फोडणे धडाडीने आपले कर्तव्य पार पाडणे . निपक्ष , निस्वार्थीपणे पत्रकारिता करणे . तसेच गोरगरिबांचे प्रश्न आपल्या लेखणीच्या माध्यमातून शासन दरबारी प्रश्न मांडणे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या श्रीगोंदा तालुका अध्यक्षपदी बिनविरोध सलग दुसऱ्यांदा फेर निवड करण्यात आली आहे
यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय पाचपुते , सार्वमत चे पत्रकार शिवाजी साळुंखे , पत्रकार सुभाष शिंदे , पत्रकार योगेश चंदन , पीटर रणसिंग पत्रकार प्रमोद आहेर , पत्रकार अनिल तुपे , अंकुश तुपे पंकज गणवीर रामदास कोळपे चंदन घोडके पत्रकार राजू शेख आदि पत्रकार बांधव मान्यवर यावेळी उपस्थित होते
सध्या ते दिव्य मराठी वृत्तपत्राचे श्रीगोंदा तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत
पत्रकार अंकुश शिंदे यांच्या निवडीबद्दल तालुक्यातील राजकीय , सामाजिक , शैक्षणिक आध्यात्मिक , पोलीस कर्मचारी नागरिकांकडून पत्रकारांसह कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

Categories
शिरसगाव

तरुणांनी वृक्षारोपण करूनच वाढदिवस साजरा करावा ; सामाजिक कार्यकर्ते अप्पा ढवळे


ढवळगाव ( हिंदू सम्राट शिरसगाव बोडखा प्रतिनिधी आदेश उबाळे यांच्याकडून )
ढवळगाव ; कोरोनाच्या काळामध्ये मनुष्याला ऑक्सिजनची किती गरज आहे याचे महत्त्व सर्व मानव जातीला कळाले आहे व सध्या होत असलेल्या वृक्षतोडीमुळे वातावरणामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले आहे व झाडे लावून पुन्हा हरित क्रांती झाली पाहिजे असे मनात ध्येय बाळगून ढवळगाव चे सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध आचारी श्री.आप्पा दादाभाऊ ढवळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त व्यर्थ खर्च टाळुन व केक न कापता गावातील खंडोबा मंदिरासमोरील परिसरामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला तसेच या वेळी गावातील सर्व तरुणांना आव्हान केले आहे की वाढदिवसाचा व्यर्थ खर्च न करता येत्या काही दिवसात मंदिर परिसरामध्ये तसेच ढवळगावांमध्ये प्रत्येकाच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात यावा असे आवाहन तरुणांना त्यांनी केले. त्यांच्या या उपक्रमाचे पंचक्रोशीतून व तरुणांमधून स्वागत केले आहे. वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे. परंतु फक्त वृक्षारोपण करून न थांबता त्यांची काळजी घेणे व संगोपन करणे ही एक मोठी जबाबदारी आहे.

यावेळी ढवळगाव चे मा.सरपंच श्री.विजय शिंदे मा.सरपंच श्री.रविंद्र शिंदे ग्रामपंचायत सदस्य गणेश ढवळे पाटील
मा.सरपंच तुकाराम बोरगे मा.सरपंच दत्तु बोरगे, माजी ग्रामपंचायत सदस्य अमोल बोरगे, युवा नेते राहुल बोरगे,गणेश शिंदे ग्रामपंचायत सदस्य बाळू शिंदे, तात्या भाऊ शिंदे, राजू बनकर, कैलास ढवळे,अरुण जांभळकर, दैनिक लोकमतचे पत्रकार पंकज गणवीर,सुरेश आढाव, रमेश सावंत,तसेच आनेक मान्यवर उपस्थित होते

Categories
शिरसगाव

ग्रामीण भागात नेत्र शिबिरांची गरज – अँड. कमल सावंत


श्रीगोंदा ( हिंदू सम्राट शिरसगाव बोडखा प्रतिनिधी आदेश उबाळे यांच्याकडून )
श्रीगोंदा – डोळ्यांचे महत्व द्रुष्टी नसलेल्या व्यक्तीला समजते , द्रुष्टी असेल तरच स्रूष्टी आहे. द्रुष्टीहिनांना ही द्रुष्टी दाखवण्यासाठी ग्रामिण भागात शिवनेरी प्रतिष्ठान च्या माध्यमातून सुरु करण्यात आलेले मोफत नेत्र तपासणी व अल्प दरातील मोतीबिंदू शिबिराचे कार्य अत्यंत कौतुकास्पद असून कोरेगव्हाण सारख्या ग्रामिण भागात या नेत्र तपासणी शिबिरांची अत्यंत गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदे च्या मा. सभापती अँड. कमल सावंत यांनी केले.
आनंद ऋषिजी नेत्रालय व फिनिक्स सोशल फाऊंडेशन अहमदनगर आणि शिवनेरी प्रतिष्ठान कोरेगव्हाण यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगव्हाण येथे रविवार , दिनांक 27 डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात मोतीबिंदू शस्रक्रिया शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अँड. कमल सावंत बोलत होत्या. यावेळी या कार्यक्रमास मा. जिल्हा परिषद सदस्य दिनकर पंधरकर , मा. पंचायत समिती सदस्य महेंद्र वाखारे , उद्योजक अतुल लोखंडे , फिनिक्स फाऊंडेशन चे अध्यक्ष जालिंदर बोरूडे , आनंद ऋषिजी नेत्रालय अहमदनगर चे डॉ. संजय शिंदे , आर्यन कराळे, किरण कवडे , सहाय्यक स्वप्नील गव्हाणे , कोरेगव्हाण चे मा. सरपंच संतोष नरोडे , मा. सरपंच संपत इधाटे , मा. सरपंच महादेव नरोडे , मा. सरपंच गणेश आढाव , क्रुषि उत्पन्न बाजार समितीचे मा. संचालक अप्पा आढाव , सामाजिक कार्यकर्ते रामदास लोंढे , विसापूर चे सरपंच अरविंद जठार , सारोळा सोमवंशी चे मा. उप सरपंच दत्तात्रय नवले , युवा उद्योजक राहुल आढाव , माहिती आधिकार कार्यकर्ता समिती चे जिल्हाध्यक्ष सोमनाथ नवले व श्रीगोंदा तालुकाध्यक्ष बाळासाहेब नवले , भारतीय जनता पार्टी चे प्रवीण मापारे , तंटामुक्त समिती चे जगन्नाथ कातोरे , गोरक्ष बारगुजे , कोंडेगव्हाणच्या मा. सरपंच बेबीताई मगर , निंबवी च्या मा. सरपंच सुरेखा शिर्के , कोरेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक रमजान सय्यद , कवी संदीप बोरगे , सामाजिक कार्यकर्ते सदाशिव गोंटे , सुदाम आढाव व शिवनेरी प्रतिष्ठान चे अध्यक्ष जितेंद्र आढाव आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात शिवनेरी प्रतिष्ठान चे अध्यक्ष जितेंद्र आढाव यांनी समाजातील गोरगरीब , शेतकरी , कष्टकरी , मजूर महिलांसह आर्थिक दुर्बल घटकातील द्रुष्टी दोष असलेल्यांसाठी शिवनेरी प्रतिष्ठान च्या वतीने हॆ शिबिर घेतले जात असून या भागातील नागरिकांनी या शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन केले. कोरेगव्हाण गावातील विठ्ठल रुख्मीनी मंदिरात घेण्यात आलेल्या या शिबिरात तब्बल अडीचशे रुग्णांची तपासणी करण्यात आली त्याचबरोबर पंचे चाळीस रुग्णांवर अल्प दरात मोतीबिंदू शस्रक्रिया केली जाणार आहे. या शिबिरासाठी कोरेगव्हाण , सारोळा सोमवंशी , निंबवी , कडूस , हिंगणी , कोंडेगव्हाण , विसापूर , पाडळी , पिंपळगाव पिसा , चांभुर्डि , सुरेगाव , मुंगुसगाव आदी गावातील नागरिकांसह महिलांनी हजेरी लावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते देवराम उदार यांनी केले. आभार युवा नेते ईश्वर आढाव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोरेगव्हाण मा. उपसरपंच निजाम सय्यद , युवा उद्योजक शरद नरोडे , मच्छिंद्र गोंटे , सोपाना आढाव गुरुजी , युवा नेते विजय आढाव , कोरेगव्हाण सोसायटी अध्यक्ष रामदास ईधाटे , संतोष गोंटे , नंदकुमार गोंटे , गणेश ईधाटे , संतोष आढाव , अशोक विटेकर व शिवनेरी प्रतिष्ठान च्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
➖➖➖➖➖➖➖➖➖
( फोटो ओळ – कोरेगव्हाण येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन करतांना जि. प. च्या मा. सभापती अँड. कमल सावंत , मा. जि. प. सदस्य दिनकर पंधरकर , मा. पं. स. सदस्य महेंद्र वाखारे , फिनिक्स चे अध्यक्ष जालिंदर बोरूडे तसेच शिवनेरी प्रतिष्ठान चे अध्यक्ष जितेंद्र आढाव व आदी.

Categories
शिरसगाव

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदी पत्रकार दत्तात्रय पाचपुते यांची तिसऱ्यांदा फेर निवड


श्रीगोंदा ( हिंदुसम्राट शिरसगाव बोडखा प्रतिनिधी आदेश उबाळे यांच्याकडून )
आज दिनांक 29 डिसेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण मंडळ कार्यालय परिसर , स्टेशन रोड , अहमदनगर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या अहमदनगर दक्षिण विभाग जिल्हाध्यक्ष व कार्यकारणी निवड बैठक पार पडली
या बैठकीत चुरशीच्या तसेच अटीतटीच्या निवडणुकीत श्रीगोंदा तालुक्याचे सुपुत्र , दैनिक पुढारीचे पत्रकार दत्तात्रय पाचपुते यांची अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदी फेर निवड , तिसऱ्यांदा करण्यात आली .
यावेळी उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष प्रवीण सपकाळे, राज्य सरचिटनिस विश्वासराव आरोटे, खान्देश विभाग प्रमुख किशोर राय साकडा, खानदेश विभागीय उपाध्यक्ष प्रवीण सोनवणे, प्रदेश कार्यकारणी सदस्य निळकंठ कराड, ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातपुते, श्रीराम जोशी, जिल्हा कार्याध्यक्ष सूर्यकांत नेटके,
यांच्या सह श्रीगोंदा,कर्जत,जामखेड,पाथर्डी,पारनेर शेवगाव येथील अनेक पत्रकार पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पत्रकार दत्तात्रय पाचपुते यांच्या तिसऱ्यांदा फेरनिवडीबद्दल त्यांच्यावर श्रीगोंदा तालुक्यासह नगर जिल्ह्यातून पत्रकारांसह नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

Categories
चंद्रपूर शिरसगाव

मा . नानाभाऊ पटोले युवा मंच च्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी सूर्या अडबाले यांची निवड


चंद्रपूर ( हिंदू सम्राट शिरसगाव बोडखा विशेष प्रतिनिधी आदेश उबाळे यांच्याकडून )
नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सूर्या अडबाले यांची निवड माननीय नानाभाऊ पटोले युवा मंच महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली .
ही निवड त्यांचे सामाजिक कार्य पाहून माननीय नानाभाऊ पटोले युवामंच च्या महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली .
लोकनेते माननीय नानाभाऊ पटोले साहेबांच्या विचाराला अभिप्रेत असणाऱ्या सामाजिक मुद्द्याला अनुसरून समाजातील गोरगरीब वंचित विद्यार्थी शेतकरी व गरजू लोकांच्या समस्या व त्यांचे प्रश्न मार्गी लावून त्यांना न्याय मिळवून द्याल याची मला खात्री आहे भारताचे संविधान सार्वभौमत्व धर्मनिरपेक्षता हे माननीय नानाभाऊ पटोले युवामंच विचार सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचण्यास आपण कटिबद्ध राहाल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे असे नियुक्ती पत्रात नमूद केलेले आहे

Categories
शिरसगाव

विद्यार्थ्यांना पुस्तके भेट अन्  बौध्दीक मेजवानी , अग्नीपंख फौंडेशनचा उपक्रम


श्रीगोंदा ( हिंदुसमाट शिरसगाव बोडखा प्रतिनिधी आदेश उबाळे यांच्याकडून )

श्रीगोंदा ; स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून यशाचे शिखर सर करण्यासाठी अग्नीपंख फौंडेशनने विद्यार्थ्यांना पुस्तकांची भेट दिली आणि अप्पर तहसीलदार चारुशीला पवार व सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर यांच्या व्याख्यानाच्या बौद्धीक मेजवानीने कार्यक्रम रंगला अध्यक्षस्थानी पांडुरंग खेतमाळीस होते.

 अप्पर तहसीलदार चारुशीला पवार यांनी आपल्या जीवनातील यशाचे पैलू उलगडताना स्पर्धा परीक्षा देताना  अभ्यासक्रम कोणता आहे! त्यासाठी चांगल्या लेखकांच्या पुस्तकांची निवड करावी आणि आपले ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम यावे नक्कीच यश मिळेल. 

दिलीप तेजनकर म्हणाले की मी  तुम्हाला काय व्हायचे एकदा ठरवून त्या दिशेने मार्गक्रमण सुरू करा चुका सुधारत चला जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत हिम्मत सोडू नका. 

यावेळी  पांडुरंग खेतमाळीस प्रशांत गोरे विजया घावटे प्रा.  प्रांजल कुलकर्णी प्रतिभा रसाळ विशाल चव्हाण यांची भाषणे झाली  प्रास्ताविक प्रा. संजय लाकुडझोडे यांनी केले. 

यावेळी विठोबा निंबाळकर संगीता तनपुरे मच्छिंद्र सुपेकर  संतोष धुमाळ  उद्धव खामकर  किरण ढवळे  अरविंद कापसे प्रशांत भोसले पोपट जाधव  बापुराव ढवळे शरद मचाले बजरंग नेटके पांडुरंग शेलार  डॉ अरुण रोडे सुरेखा शेंद्रे शुभांगी लगड बबन गोरे अंकुश घाडगे मधुकर काळाणे किसन वऱ्हाडे उपस्थित होते. 

Categories
शिरसगाव

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधत देवदैठण येथे रक्तदान शिबिर संपन्न, रक्तदान शिबीरास उत्फुर्त प्रतिसाद

रक्तदान सर्वश्रेष्ठ दान , रक्तदान म्हणजे जीवनदान “
देवदैठण

(हिंदुसम्राट शिरसगाव बोडखा प्रतिनिधी आदेश उबाळे यांच्याकडून )
देवदैठण : माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयीयांची जयंती व सुशासन दिनाचे औचित्य साधत श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील जाणता राजा प्रतिष्ठाण, वसुंधरा बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठाण व नगर येथील जनकल्याण रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .
महान तपस्वी दधिची ऋषी यांनी पुरातन काळात आपल्या अस्थींचे दान दिले . त्यापासून देवांनी बनवलेल्या अस्त्राने वत्रासुराचा वध करण्यात आला . हा दान देण्याचा वारसा दैठणकरांनी जोपासताना दधिची आश्रमात तब्बल १०० रक्तदात्यांनी रक्तदान केले .
माजी उपसरपंच विश्वास गुंजाळ, उद्योजक वसंत बनकर, सदस्य निलेश गायकवाड, सदस्य अनिल बनकर , डॉ.सुशांत पारनेरकर ,डॉ.वसंत झेंडे, वसुंधरा फाउंडेशचे अध्यक्ष सागर बनकर , चित्रपट कलाकार संदीप बोरगे सर यांच्या उपस्थित रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले.
विद्याधामचे क्रीडा शिक्षक संदीप घावटे सर यांनी सर्वात प्रथम रक्तदान केले . तर १०० वा रक्तदाते ठरले ते सोमनाथ कौठाळे .
प्रशांत ढवळे , कृष्णराज वायदंडे यांनी सपत्नीक रक्तदान केले . रविवारी विवाह संपन्न होणाऱ्या संकर्ष आहोळ व गणेश बनकर या नवरदेवांनी सुद्धा रक्तदान केले . यावेळी ५५ वर्षीय महिला मंगल सुखदेव बनकर , कल्पना ढवळे ,मिना वायदंडे यांनीही रक्तदान केले .साईकृपा कारखान्याचे जनरल मॅनेजर आर .टी . यादव यांनी सुद्धा रक्तदान केले .
कोरोना संकटकाळात १०० रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली.
रक्तदात्यांना विमा प्रतिनिधी कालिदास बनकर यांनी दिनदर्शिकेचे वाटप केले . ग्रा.सदस्य रवींद्र ढवळे ,संदीप भालेकर व गणेश बनकर यांच्यावतीने अन्नदान करण्यात आले .
रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी माजी उपसरपंच विश्वास गुंजाळ ,सागर बनकर , सुधीर ढवळे , तुषार वाघमारे , संदीप बोरगे , चतुर्भुज कौठाळे, धनंजय शिंदे , अमोल कौठाळे , संकेत अलभर , ज्ञानेश्वर बनकर , आकाश धावडे , रोहीत कौठाळे, सुजय धोत्रे , विकास धोत्रे , परवेझ मन्यार , किशोर बनकर , अमर डेंगळे ,अनिकेत धोत्रे, संचित उल्हारे, प्रतिक बनकर, यश ढवळे , सुयोग धोत्रे ,करण शिंदे , सादिक मन्यार , भूषण टकले , नागेश धोत्रे , आकाश भालेकर , अनिकेत जाधव ,जाणता राजा प्रतिष्ठाण व वसुंधरा बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठाणचे सदस्य यांनी परीश्रम घेतले .

Design a site like this with WordPress.com
Get started