राहुरी तालुका प्रतिनिधी ( जावेद शेख ) 3 जानेवारी मा. प्राजक्त तनपुरे, मंत्री, आदिवासी विकास विभाग यांची अनुदानित आश्रमशाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांनी भेट घेऊन आदिवासी विकास विभागांतर्गत असणा-या अनुदानित आश्रमशाळेतील प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली व निवेदन दिले. अनुदानित आश्रमशाळेत निवासासाठी एका निवासी खोलीत कमाल दोन विद्यार्थी ठेवणे ही अट रद्द करुन कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी आरोग्याच्या दृष्टीने योग्य मार्गदर्शक सूचना प्राप्त व्हाव्यात, आश्रमशाळेत विद्यार्थी समूहाने निवासी असल्याने विद्यार्थ्यांना कोविड- १९ वर असलेली लस अथवा आवश्यक औषधोपचार प्राधान्याने उपलब्ध करुन देण्यात यावे किंवा आरोग्य विषयक विशेष उपाय योजना करावी जेणे करुन आश्रमशाळा- वसतिगृह नियमित सुरू करता येईल, कर्मचार्यांचे वेतन सतत अनियमित होणे, मागील तिन महिन्यांपासून कर्मचा-यांचे वेतन प्रलंबित आहे , सातव्या वेतन आयोगाचा फरक तात्काळ मिळावा, अन्य विभागातील कर्मचारी तसेच आदिवासी विकास विभागातीलच शासकीय आश्रमशाळेतील कर्मचार्यांचे वेतन अथवा फरक त्यांना नियमित अदा केले जाते मात्र अनुदानित आश्रमशाळेतील कर्मचारी त्यापासून वंचित आहे. माहे जानेवारी २०१६ ते माहे डिसेंबर २०१८ या कालावधीतील सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या हप्त्यांची समान विभागणी करुन प्रत्येक वर्षी एक याप्रमाणे पाच हप्त्यांत देण्याचे शासन आदेश आहेत. यामध्ये पेंशनपात्र कर्मचा-यांचे सर्व हप्ते भविष्य निर्वाह निधी मध्ये जमा होणे तसेच अंशदान निवृत्ती वेतन धारक कर्मचार्यांचा पहिला हप्ता जुलै २०१९ पर्यंत रोखीने देणे अपेक्षित होते मात्र अद्याप ते झाले नाही. या व अन्य प्रश्नांबाबतचे निवेदन मा. मंत्री यांना देण्यात आले. यावेळी आश्रमशाळेतील कर्मचारी शिष्टमंडळात संजयकुमार शिंदे, सी. आर. शिरोळे , एस्. बी. आंत्रे , एम् . बी. पगारे , एस्. एम् पवार , डी.एस. मलाव , जी.व्ही.खर्चे,जे.व्ही.सुर्यवंशी , व्हि. टी. लोंढे आदि मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
Category: राहुरी


राहुरी तालुका प्रतिनिधी ( जावेद शेख ), दि. 31 डिसेंबर, 2020
विद्यापीठाचे प्रक्षेत्र, मालमत्ता, कर्मचारी यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे गरजेचे आहे. विद्यापीठाचे प्रक्षेत्र मोठे असून प्रक्षेत्रावर अनुचीत प्रकार घडू नये, मालमत्तेचे, प्रक्षेत्राचे संरक्षण व्हावे, मोकाट जनावरांपासून प्रक्षेत्राचे संरक्षण व्हावे तसेच हिंस्त्र प्राण्यांपासून कर्मचार्यांचे संरक्षण व्हावे या हेतूने कृषि विद्यापीठाची सुरक्षा व्यवस्था बळकटीकरणाचे काम सुरु आहे. यासाठीच महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाचे (मेस्को) 15 माजी सैनिक कंत्राटी पध्दतीने घेण्यात आले आहे. विद्यापीठातील कायम आस्थापनेवरील, कंत्राटी पध्दतीचे सुरक्षा रक्षक आणि मेस्कोचे जवान यांच्या समन्वयाने विद्यापीठाच्या सुरक्षेचे नविन वर्षापासून चांगले काम सुरु करु या असे प्रतिपादन कुलसचिव श्री. मोहन वाघ यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ (मेस्को) यांचे मार्फत माजी सैनिक मधून एक सहाय्यक सुरक्षा अधिकारी व 14 सुरक्षा पर्यवेक्षक हे सुरक्षा व्यवस्था पाहणीसाठी कंत्राटी पध्दतीने घेण्यात आले. या सर्व जवानांना मार्गदर्शन करतांना कुलसचिव मोहन वाघ बोलत होते. यावेळी बैठकीला विद्यापीठाचे नियंत्रक श्री. विजय कोते, सहयोगी संशोधन संचालक डॉ. बाबासाहेब माळी, प्रभारी सुरक्षा अधिकारी प्रा. सुनिल फुलसावंगे व अहमदनगर येथील माजी सैनिक महामंडळाचे जिल्हा पर्यवेक्षक श्री. सखाराम गवळी, महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाचे सहा. सुरक्षा अधिकारी श्री. नंदु राऊत उपस्थित होते.
श्री. गवळी यांनी सर्व सुरक्षा कर्मचार्यांची उपस्थित मान्यवरांना ओळख करून दिली. कुलसचिव यांनी सर्व सुरक्षा कर्मचारी यांचे विद्यापीठामध्ये स्वागत केले. नियंत्रक श्री. विजय कोते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. डॉ. सुनिल फुलसावंगे म्हणाले विद्यापीठामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी सर्वानी प्रयत्न करावेत. कार्यक्रमाचे सूचसंचालन व आभार डॉ. सुनिल फुलसावंगे यांनी मानले. यावेळी बियाणे विभागाचे डॉ. विवेकानंद कुलकर्णी, कामगार कल्याण विभागाचे श्री. सचिन पवार, सुधीर खेसम्हाळसकर आणि मेस्कोचे जवान उपस्थित होते.


राहुरी तालुका प्रतिनिधी
( जावेद शेख ) 30 डिसें
वरवंडी मुळानगर ग्रुप ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका 2021 करिता विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक आयोगाने हाती घेतली असून निष्क्रिय सदस्यांना जागा दाखविण्यासाठी युवकांनी निर्धार केला आहे तसेच जनतेच्या हितासाठी सदैव कार्यरत असणारे जनतेच्या विकासासाठी झटणारे उमेदवार जनतेनेच यावेळी रिंगणात उतरले आहेत. निस्वार्थपणे कायमच जनतेला मतदान करणारे माजी ग्रामपंचायत सदस्य सलीम शेख प्रियंका त्रिभुवन व मुन्नाबाई परदेशी तसेच अर्चना पवार यांची उमेदवारी विकासाच्या मुद्द्यावर जनतेने दिली असून भरघोस मतांनी निवडून देण्याची शपथ घेतली आहे.आरोग्य रस्ता पर्यटन शिक्षण पाणीपुरवठा या मुद्द्यावर सतत कार्य त्रास देऊन जनता पिण्याच्या पाण्याच्या विचाराधीन आहे. याकामी त्यांना सामाजिक कार्यकर्ते यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते प्रवीण लोखंडे,वायसे मामा,दिलीप बर्डे,कैलास बर्डे,राजेश परदेशी,शक्तीलाल गंगे,रंगलाल परदेशी,संदीप घोरपडे,अशोक गायकवाड,जावेद इमामभाई शेख,अल्ताफ पठाण,जैद खान,साहिल शेख,सुरेश बर्डे,सोन्या शेरकर,आकाश पंडीत, संतोष डूबल,विश्वास पटारे, अन्सार पठाण आदेश हाके,नागेश पवार वैभव खरात,रवी परदेशी,बाळू भाऊ जाधव साहेबराव जाधव ,विजू माळी,सुनील माळी, गणेश मोरे,अमोल शेलार,अमोल गायकवाड,अभिजित पाटोळे,शुभम त्रिभुवन,मुज्जू शेख,मुन्ना शेरकर,अनिल पवार,नितीन भोसले,दादा,पाटोळे,साजिद शेख,असिफ पठाण ,अर्जुन सूर्यवंशी, करण सूर्यवंशी,आदेश गंगे,आकाश बिराडे,हर्षद बिराडे,विजय बर्डे,रवी पवार,गणेश पवार,सागर वायसे,विनोद प्रजापती,भाऊ मणतोडे,सिद्धार्थ मणतोडे,सुमित पलघडमल,सुदाम साळुंखे,हरिष जाधव,बाळू रणदिवे,किशोर बर्डे,सुनील पवार,समस्त युवक वर्ग तसेच समस्त ग्रामस्थांनी प्रस्थापिना धडा शिकवण्यासाठी ही निवडणूक हातात घेतली आहे.
- कृषि हवामान सल्ला सेवा विभाग प्रमुख डॉ. के.के. सिंग
राहुरी तालुका प्रतिनिधी
( जावेद शेख ) दि. 29 डिसें 2020कृषि उत्पादनात सुधारणा, प्रमाण आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी पीक हवामान प्रतिमाने ही उपयुक्त प्रणाली आहे. पीक हवामान प्रतिमाने व कृषि हवामान सेवा सल्ला यांचे महत्व वेगवेगळ्या पिकांच्या हवामान परिस्थितीची मुलभुत व अचूक हवामानाची पुर्व माहिती वेळेवर मिळाली तर ती उपयुक्त ठरु शकते. कृषि सल्ला सेवेद्वारे मिळालेल्या माहितीमुळे हवामान बदलाचा कृषि पध्दतीवर होणारा परिणाम वाढविण्यासाठी उपयुक्त असल्याचे प्रतिपादन नवी दिल्ली येथील भारतीय हवामान विभागाच्या कृषि हवामान सल्ला सेवा विभागाचे प्रमुख डॉ. के.के. सिंग यांनी केले. जागतिक बँक अर्थसहाय्यीत राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत असून या प्रकल्पांतर्गत पीक हवामान प्रतिमाने, हवामान अद्ययावत शेतीची साधने या विषयावर दि. 21 ते 25 डिसेंबर, 2020 या कालावधीत एक आठवड्याचा ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या सांगता समारंभासाठी डॉ. के.के. सिंग प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. अशोक ढवण होते. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन व्हिएन्ना आंतरराष्ट्रीय केंद्र, ऑस्ट्रीया येथील बाह्य अंतराळ प्रकरण संयुक्त राष्ट्र संघ कार्यालय, यूएन स्पायडर प्रोग्राम, बिजींग कार्यालयाचे प्रमुख डॉ. शिरीष रावण यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, संशोधन तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, प्रमुख संशोधक डॉ. सुनिल गोरंटीवार, सह समन्वयक डॉ. मुकुंद शिंदे, आयोजन सचिव डॉ. रवि आंधळे, सह सचिव व कृषि हवामानशास्त्र विभाग प्रमुख डॉ. जयवंत जाधव उपस्थित होते. यावेळी कुलगुरु डॉ. अशोक ढवण प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करतांना म्हणाले की हवामान अद्ययावत शेतीसाठी पीक हवामान प्रतिमाने मोलाची भुमिका बजावत असून पीक उत्पादनवाढीसाठी त्याचा कार्यक्षम उपयोग कसा व्हावा या दृष्टीने प्रयत्न करणे जास्त गरजेचे आहे. पीक हवामान प्रतिमाने या विषयावर संशोधन व विस्तार करण्यास महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी कटीबध्द आहे. प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनिल गोरंटीवार यांनी हवामान अद्ययावत शेतीचे प्रकल्पांतर्गत महत्व विषद केले. यावेळी प्रशिक्षणार्थींना डॉ. मुकुंद शिंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्नेहल कानडे व डॉ. वैभव मालुंजकर यांनी केले. डॉ. जयवंत जाधव यांनी आभार मानले. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी देश विदेशातून 250 पेक्षा जास्त सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींना कृषि हवामान शास्त्र या विषयातील देशभरातील तज्ञ शास्त्रज्ञांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
निवडणूकीसाठी लागणाऱ्या कागदपत्राची जुळवाजुळवी
राहुरी तालुका प्रतिनिधी
( जावेद शेख ) 28 डिसे
राहुरी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकीसाठीचा अर्ज भरण्याची कालवधी कमी असल्याने उमेदवार निवडणुकीसाठी अर्जासोबत लागणाऱ्या कागदपत्र काढण्यासाठी धावपळ करीत असल्यांचे चित्र तहसील कार्यालयाच्या परिसरात दिसून येत आहे.
तालुक्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूकाचे रंगधुमाळी सुरु झाले असुन या ग्रामपंचायतील सरपंच पदाचे आरक्षण ही जिल्हाधिकारी यांच्या सुचणेनुसार सोडण्यात आले होते. पण शासनाने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत घोडे बाजार होऊ नये म्हणून सोडलेले आरक्षण रद्द करण्याचे आदेश देऊन सदरील आरक्षण हे निवडणुकीच्या नंतर सोडणार असल्याने इच्छुक उमेदवारांचे हिरमोड झाले असल्याने निवडणूकीत इच्छुक उमेदवारांचा खर्च व निवडणुकीसाठी लागणारे कागदपत्रे यांची जुळवाजुळवी करणार कोण? असा प्रश्न उपस्थित झाल्याने उमेदवारांना लागणारे कागदपत्रे काढण्यासाठी विलंब झाला असून आत्ता निवडणूकीसाठीचा अर्ज स्वीकारण्याची तारीख जवळ येताच उमेदवारांची पळापळी करून कागदपत्राची जुळवाजुळवी करीत आहेत.
ग्रामपंचायत निवडणूकीसाठी दि. २३ डिसेंबर ते 31 डिसेंबर पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत यात प्रत्येक गावातील इच्छुक उमेदवार आपले भवितव्य शोधण्यासाठी धावपळ धावपळ करून निवडणुकीसाठी लागणारे कागदपत्रे काढण्यासाठी जिवाचा आटापिटा करतांना दिसून येत आहे.


संघामार्फत दंत शिबिर संपन्न
राहुरी तालुका प्रतिनिधी
( जावेद शेख 28 डिसें वांबोरी येथे ज्येष्ठ नागरिक संघ व श्री संत सावता माळी युवक संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने वर्मा हॉल बाजारपेठ येथे डॉ गोरे डेन्टल हॉस्पिटल अहमदनगर यांचे मोफत दंतरोग तपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी कोरोनाच्या काळात घ्यावयाची काळजी म्हणून मास्क वाटप करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. व्ही एम झंवर, ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष साहेबराव ठाणगे, उपाध्यक्ष जनार्दन ढोकणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी श्री संत सावता माळी युवक संघ अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अशोकराव तुपे, संघाचे प्रदेश सोशल मीडिया प्रमुख दीपक साखरे, ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव शंकरराव शेवाळे, सहसचिव प्रकाश गोसावी, खजिनदार आसाराम रहाणे, माणिकराव तिडके, शारदाताई साळुंके, हरिभाऊ सासणे, रामकिसनजी वर्मा, राधेश्याम झंवर, विजय शिंदे, रामकिसन कुऱ्हे, सुनील शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी साहेबराव ठाणगे यांनी ज्येष्ठ नागरिक संघाचे व संत सावतामाळी संघाचे कार्यक्रमाची माहिती दिली सामाजिक भावनेतून होत असलेली सेवा आदर्शवत व असे उपक्रम कायमस्वरूपी राबत राहण्यासाठी संघामार्फत प्रयत्न करीत राहील असे प्रतिपादन केले. डॉ. सुदर्शन गोरे यांनी दाता विषयी घ्यावयाची काळजी योग्य आहार सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळी दात साफ करणे तसेच उपचार पद्धती याविषयी माहिती दिली दंत हा आरोग्याचा नव्हे तर निरोगी जीवनाचा आरसा आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला त्यावेळी त्यांना मास्क वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकरराव शेवाळे यांनी केले तर आभार आसाराम राहणे यांनी मानले.
“ख्रिसमस नाताळ सण उत्साहात साजरा”
राहुरी तालुका प्रतिनिधी
( जावेद शेख ) 26 डिसें ख्रिसमस नाताळ हा ख्रिश्चन धर्मियांचा एक महत्वपूर्ण सण आहे. २५ डिसेंबर, येशुंचा जन्मदिवस - दरवर्षी याच दिवशी नाताळाचा सण साजरा करण्यात येतो. ख्रिसमस नाताळ दिनानिमित्त 24 व 25 डिसेंबर रोजी किंग ऑफ किंग्ज चर्च इंडिया कणगर या ठिकाणी नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. येशू जन्माचा आनंद व्यक्त करण्यासाठी
नाताळ सणानिमित्त किंग ऑफ किंग्ज चर्च मध्ये विविध कार्यक्रम करण्यात आले.प्रमुख पाहुणे संजय पाटोळे
अँजल पाटोळे यांनी प्रभू येशूचे वचन सांगुन आशिर्वाद सभा घेतली. चर्चमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. पास्टर गोरख दिवे सिस्टर शितल दिवे सिस्टर छाया ताई दुशींग यांनी सभेस मार्गदर्शन केले.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले अशोक कर्डे सर व करीश्मा कर्डे त्यांच्या कुटुंबीयांनी चर्चमध्ये शालेय साहित्य वह्या पेन व खाऊचे वाटप केले कार्यक्रमासाठी कणगर ताहाराबाद दरडगाव राहुरी फॅक्टरी या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर बांधव आले होते.सर्व जग कोरोना महामारीने त्रस्त झाले आहे या आजारातून मुक्तता व्हावी यासाठी प्रार्थना करण्यात आली.कार्यक्रमास उपस्थिती असलेल्या सर्व बांधवांना दोन दिवस स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले.सर्वानी एकमेकांस शुभेच्छा दिल्या.
अनाथ मुलांसोबत वाढदिवस साजरा


राहुरी तालुका प्रतिनिधी
( जावेद शेख )26 डिसें अहमदनगर जिल्ह्यातील गुहा गावच्या गंगाधर बाबा छात्रालयातील अनाथ मुलांसोबत आज वाढदिवस साजरा केला, हे मी मोठेपणा मिरविणेसाठी सांगत नसून या मुलांसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी इतरांना प्रेरणा मिळावी व या अनाथ मुलांचा संपूर्ण वर्षाचा अन्नाचा प्रश्न मिटावा हाच यामागील एकमेव प्रांजळ हेतू. या कार्यक्रम प्रसंगी चैतन्य मिल्क चे अध्यक्ष गणेश भांड, आर.पी. आय. चे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या व महाराष्ट्र राज्य निधी फेडरेशन चे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष तथा राहुरी अर्बन निधी चे चेअरमन रामभाऊ काळे, कर्मवीर करिअर ऍकॅडमी चे संचालक मेजर राजेंद्र कडू,आप्पासाहेब ढुस, राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त पत्रकार शिवाजी घाडगे, छात्रालायचे संचालक पप्पू सपकाळ आदींसह छात्रालयातील विद्यार्थी उपस्थित होते.
राहुरी तालुका प्रतिनिधी ( जावेद शेख ) 26 डिसें. *नगर- कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षातील सर्व महापुरूषांच्या जयंती आणि पुण्यतिथी व विविध ऊत्सव कार्यक्रम विविध ठिकाणच्या आयोजकांनी रद्द केले. याच श्रुंखलेत पुणे येथे दरवर्षी १ जानेवारीला आयोजीत होणारी “१ जानेवारी फुले दांम्पत्य सन्मान दिवस महारॅली” यंदाच्या वर्षी आयोजकांना स्थगीत करावी लागली व प्रातिनिधीक स्वरूपात स्थानिक कार्यकर्त्यांनी भिडेवाडा व फुलेवाडा येथे जाऊन वंदन करावे तसेच महाराष्ट्रातील ईतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या त्यांच्या स्थानीक ठीकाणि कोविड १९ च्या नियमाधिन राहुन हा ऊत्सव साजरा करावा. असे आवाहन श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी केले आहे.*
१ जानेवारी १८४८ रोजी महात्मा जोतीराव फुले व माता सावित्रीआई फुले यांनी पहिली मुलींची शाळा भिडेवाडा पुणे येथे सुरू केली होती. या दिवसाचे व कार्यांचे औचित्य साधुन ही महारॅली दरवर्षी आयोजित करण्यात येत होती. यंदाच्या वर्षी ही महारॅली स्थगीत करण्यात आली आहे. म्हणुन गावागावात स्थानिक ठिकाणी हा ऊत्सव दिवस साजरा करावा असे आवाहन . स्थानिक पातळी वर हा ऊत्सव कसा साजरा करावा खालीलप्रमाणे…
१) १ जानेवारी फुलेदांम्पत्य सन्मान दिन ते ३ जानेवारी माता सावित्री फुले जन्मदिन ( महिला शिक्षक दिन) त्रीदिवसीय सप्ताहाचे आयोजन करावे.
२) या सप्ताहा मधे कोविड १९ च्या नियमाच्या अधिन राहुन रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा तसेच ईतर ऊपक्रम राबवावे.
३) आपल्या घरासमोर रांगोळी काढावी व शक्य असल्यास घरावर रोषणाई करावी.
४) मुख्य चौकात डिजीटल लाऊन फुले दाम्पत्य सन्मान दिनाच्या शुभेच्छा द्याव्या.
५) मुख्य चौकात मिठाई वाटप करावे.
६) स्थानिक वृत्तपत्रामधे बातम्या प्रसारीत कराव्या.
७) या शिवाय आपल्याला सुचेल असे अभिनव ऊपक्रम राबवावे.
अशा प्रकारे विविध ऊपक्रमा मार्फत हा ऊत्सव साजरा करावा असे आवाहन संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन भाऊसाहेब गुलदगड यांनी केले आहे.