भोकर प्रतिनिधी (दत्ता बोईनवाड )तालुक्यातील63 ग्रामपंचायती पैकी 12 ग्रामपंचायती बिनविरोध काढण्यात ग्रामस्थांना यश आल्याने बिनविरोध गावांची डोकेदुखी कमी झाली आहे आता 51 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत चुरस होणार आहे 141 वॉर्डातून 333 जागेसाठी 757 उमेदवार आपले भवितव्य आजमावणार आहेत तालुक्यातील 63 ग्रामपंचायती पैकी मातुळ सोनारी पाळज पाकी सोमठाणा गारगोटवाडी पां बोरवाडी सावरगाव मेट लगळुद रहाटी बु ईळेगाव कांडली ही 12 गावे ग्रामस्थाच्या सांमजस्याने बिनविरोध काढण्यात यश आल्याने गावातील ताण तणाव कमी झाला आता 51 ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक होणार आहे उर्वरित गावांमध्येही काही वार्ड बिनविरोध निघाले आहेत 63 ग्रामपंचायतीमधुन 193 पैकी 52 प्रभाग बिनविरोध निघाल्याने 141 प्रभागात 333 जागेसाठी 757 उमेदवार रिंगणात आहेत या निवडणुकीसाठी 1188 जणांनी अर्ज दाखल केले होते त्यातील 22 अर्ज अवैध ठरले होते तर1164 वैध ठरली यापैकी 234 उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली अनुसूचित जमातीचे उमेदवार न मिळाल्याने 10 जागा रिक्त आहेत
तालुका प्रतिनिधी भोकर दत्ता बोईनवाड ता.भोकर ग्रामपंचायतीच्या निवडणुका चुरशीच्या होत आहेत.परंतू प्रस्थापित पँनाल प्रमुख श्रीमंतीच्या जोरावर आपल्या मर्जीतल्या गुलामा प्रमाणे वागणाऱ्या नागरिकांना निवडणूकीत उभे करून मताची खरेदी करून निवडणूक जिंकल्यानंतर कारभार मात्र स्वतःचालवतो तेव्हा निवडून आलेल्या सरपंच,उपसरपंचानी कुणाचे बाहुले न बनता स्वतः कारभारी बनन्याचे आव्हान वंचित बहुजन आघाडीचे नेते नामदेव आयलवाड यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. ओबीसी नेते नामदेव आयलवाड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात असे म्हटले आहे की पूर्वी राजा रूढीपंरमपरे नुसार घराणेशाहीतूंन जन्माला येत असे परंतु आता भारतीय संविधानाने दिलेल्या मताचा अधिकारामुळे व लोकशाही स्वातंत्र्यामुळे तमाम वंचित घटकांना आपला राजा निवडण्याचा अधिकार आहे.म्हणून तमाम ओबीसी एससी एसटी भटक्या समाजाचे लोकप्रतिनिधी सतेत निवडून जात असतांना प्रस्थापित मंडळी ग्रामपंचायतचा कारभार आपल्याच हातात रहावा म्हणून श्रीमंतीच्या जोरावर गरीब बहुजन समाजातील मागासवर्गीय सरपंच, उपसरपंच यांचा अधिकार हिरावून स्वताच कारभार चालवतात आणि आपल्या मर्जीप्रमाणे वापर करून त्यांना सह्याजीरावा पुरते बैलोबा सारखा वागणूक देत ग्रामपंचायतीचा कारभार आपणच चालवत असतात हे कुठेतरी थांबले पाहिजे निवडूण आलेल्या सर्व वंचित बहुजन घटकातील सरपंच उपसरपंचानी कुणाच्या हातचे बाहुले न रहाता आपल्या अधिकाराचा वापर स्वतः संविधानाने दिलेल्या अधिकारानूसार चालवून गावच्या विकासासाठी काम करावे सत्तेतून पैसा पैशातून सत्ता मिळवू पहाणाऱ्या भ्रष्टाचाऱ्या पासून सावध रहावून स्वाभिमानाने गावचा कारभार चालवण्याचे आवाहन आयलवाड यांनी केले आहे.
भोकर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या भोकर तालुकाध्यक्षपदी बापूसाहेब गोरठेकर समर्थक श्रीकांत व्यंकटराव किन्हाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भोकर /अनिल डोईफोडे/येथील भाजपा पदाधिकाऱ्यांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नांदेड येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत युवा मोर्चाच्या भोकर तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी श्रीकांत किन्हाळकर यांच्यावर टाकण्यात आली. यावेळी खा. प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर , युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष किशोर देशमुख , जि प.सदस्या.सौ.प्रणिताताई देवरे , कुशाल पाटील उमरदरीकर यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले.या निवडीबद्दल जिल्हा उपाध्यक्ष दिलीप सोनटक्के, तालुकाध्यक्ष किशोर पाटील लगळुदकर, बाजार समितीचे संचालक गणेश पाटील कापसे, राजू अंगरवार, विशाल माने यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे. या निवडीनंतर किन्हाळकर म्हणाले की, खा. प्रताप पाटील आणि बापूसाहेब गोरठेकर यांनी माझ्यावर टाकलेल्या जबाबदारीला तडा जाऊ न देता मिळालेल्या पदाचा उपयोग युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी करीन. पक्षाची ध्येयधोरणे गावागावात पोहचविण्यासाठी काम करणार आहे.
भोकर (अनिल डोईफोडे) येथील नव्यानेच नावारुपास आलेली आर्चीत पॅथॉलॉजी लॅब तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त विविध रक्ताच्या तपासण्या अल्पशा दरात करण्यात येणार आहे अशी माहिती मुकुंद धानोरकर व लॅब टेक्नीशियन सय्यद अखिल यांनी दिली दिनांक 3 जानेवारी रोज रविवार सकाळी साडेसात ते दुपारी दोन वाजेपर्यंत तपासणी करण्यात येईल असेही त्यांनी कळवले नाव नोंदणीसाठी केवळ गरजू 50 जनासाठी आवश्यक असून रक्त तपासणीसाठी उपाशीपोटी येण्याचे आवाहनही त्यांनी केले तपासणीचे स्थळ स्पंदन हॉस्पिटल वेंकटेश टॉकीज भोकर असेही त्यांनी शेवटी कळवले व जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहनही करण्यात आले. शेवटी अर्चित लॅब च्या या उपक्रमाचे भोकर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष शेख युसूफ भाई यांनी कौतुक केले.
भोकर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या भोकर तालुकाध्यक्षपदी बापूसाहेब गोरठेकर समर्थक श्रीकांत व्यंकटराव किन्हाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भोकर /अनिल डोईफोडे/येथील भाजपा पदाधिकाऱ्यांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नांदेड येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत युवा मोर्चाच्या भोकर तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी श्रीकांत किन्हाळकर यांच्यावर टाकण्यात आली. यावेळी खा. प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर , युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष किशोर देशमुख , जि प.सदस्या.सौ.प्रणिताताई देवरे , कुशाल पाटील उमरदरीकर यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले.या निवडीबद्दल जिल्हा उपाध्यक्ष दिलीप सोनटक्के, तालुकाध्यक्ष किशोर पाटील लगळुदकर, बाजार समितीचे संचालक गणेश पाटील कापसे, राजू अंगरवार, विशाल माने यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे. या निवडीनंतर किन्हाळकर म्हणाले की, खा. प्रताप पाटील आणि बापूसाहेब गोरठेकर यांनी माझ्यावर टाकलेल्या जबाबदारीला तडा जाऊ न देता मिळालेल्या पदाचा उपयोग युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी करीन. पक्षाची ध्येयधोरणे गावागावात पोहचविण्यासाठी काम करणार आहे.
भोकर प्रतिनिधी दत्ता बोईनवाड भोकर येथील एका महिलेच्या तक्रारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष डाॅ. फेरोज खान इनामदार यांच्या विरुद्ध भोकर पोलिसात विनयभंग व मारहाण केल्याच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भोकर येथील एका महिलाने दिलेल्या फिर्यादीवरून 28 डिसेंबर 2020 रोजी रेल्वे स्टेशन रोड डॉक्टर इनामदार यांच्या दवाखान्यात दुपारी चारच्या दरम्यान केली असता माझ्या सासर्याच्या जमिनीवर आपण अतिक्रमण केले आहे म्हणून डॉक्टर फिरोज इनामदार यांना जाब विचारला.यावेळी डॉक्टर फिरोज इनामदार यांनी महिलेशी अश्लील शिवीगाळ करून हात धरून मारहाण केली व मी इनामदारआहे.या गावात माझी खूप जमीन आहे तुला काय करायचे ते करून घे म्हणून दवाखान्या बाहेर हाकलून दिले असी फिर्याद सुचिता मनोजकुमार शिवेवार पोलिसात दिली यावरून डॉक्टर फिरोज खान इनामदार यांच्याविरुद्ध भोकर पोलिसात कलम 354. 294. 323. 509. विनयभंग व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील अधिक तपास जमादार रंगराव जाधव करीत आहे.
भोकर:दि.28.वंचित बहुजन आघाडी भोकर नगरपरिषदेची निवडणूक लढविणार असल्याची घोषणा मराठवाडा वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष तथा पक्षनिरीक्षक दीपक डोके यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केली. भोकर येथील संगम फंक्शन हॉल मध्ये रविवार दि.27 डिसेंबर रोजी वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांचा मेळावा नुकताच संपन्न झाला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते एल.ए.हिरे हे होते.प्रथम प्रास्ताविक नवनिर्वाचित वंचित बहुजन आघाडीचे भोकर ता.अध्यक्ष सुनील कांबळे यांनी पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर अध्यक्षपदाची धुरा टाकली तालुक्यात पक्ष संघटना बांधणीसाठी जोमाने कामाला लागणार असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना दीपक डोके म्हणाले राष्ट्रीय नेते बाळासाहेब आंबेडकर हे तमाम वंचित घटकांना न्याय देण्यासाठी सतत धडपडत असतात एकेकाळी भोकर मतदार संघात भारिप बहुजन महासंघाला चांगले दिवस होते अल्पशा मताने बहुजन उमेदवारांचा पराभव झाला पक्षाची पुनर्बांधणी करून कार्यकर्त्यांनी भोकर नगरपालिका ताब्यात घेतली पाहिजे त्यासाठी जोमाने लागावे. यावेळी बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष भीमराव दुधारे म्हणाले भोकर नगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता असून नगरपालिका भ्रष्टाचाराने बरबटलेली आहे.धनशक्तीच्या जोरावर सतेत आलेल्याना खाली खेचण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कामाला लागून निवडणुकीमध्ये आव्हान निर्माण करावे लागणार आहे. यावेळी नांदेड शहर वंचित आघाडीचे महासचिव गौतम कापुरे,इजि.राज अटकोरे,भारिपचे माजी अध्यक्ष सुभाष तेले, तालुका वंचित आघाडीचे महासचिव बालाजी आनंतवाड, सुनील कांबळे किनीकर,शेख शबीर आदींनी विचार मांडले अध्यक्षीय समारोप करताना हिरे म्हणाले एकेकाळी भोकर मतदार संघात भारिप बहुजन महासंघाचा दबदबा होता.बहुजन मतदारांनी आम्हाला भरभरून मतदान केल्याने विधानसभेचे उमेदवार तीन वेळा दुसऱ्या क्रमांकावर ह़ोते भोकर ग्रा.प.वर सता आली जि.प.,प.स.चे उमेदवार ही निवडूण आले होते 2005 नंतर भारिपला गळती लागली होती.१डिसेंबर २०१८ला झालेल्या भिमा कोरेगाव दंगल प्रकरणात बाळासाहेबानी चांगली भुमिका घेतल्यानंतर जनता त्यांच्या पाठीशी एक वठली होती लोकसभेला चांगले मतदान झाले विधान सभा निवडणूकीत मात्र मतदान घटले,कार्यकर्ते एक दिलाने काम केले. मतदारसंघात पक्षाची बांधणी करणे गरजेचे असल्याचे सांगून नगरपालिका निवडणुकीमध्ये समविचारी पक्षासोबत यूती करूणे गरजेचे असल्याचे सांगितले.यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते आनंद एडके,विजय मोरे,माणिक जाधव,दत्ता शिरवळकर,दता गटुवाड,सम्यक चौदंते,बालाजी बाबळे,प्रशांत शहाणे, पूजा बनसोडे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.आभार गजू ढोले यांनी मानले.पक्ष निरीक्षक दीपक डोके,हिगोली जिल्हा वंचित ब.आघाडीचे अध्यक्ष वसीम देशमुख यांनी शहीद प्रफुल नगर,महात्मा फुले नगर समता नगर,शेख फरीद नगर,अशा अनेक वॉर्डांमध्ये भेटी देवून नागरिकांचे मते आजमावून घेतली.
भोकर प्रतिनिधी दत्ता बोईनवाड भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या भोकर तालुकाध्यक्षपदी बापूसाहेब गोरठेकर समर्थक श्रीकांत व्यंकटराव किन्हाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भोकर येथील भाजपा पदाधिकाऱ्यांची निवड करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नांदेड येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत युवा मोर्चाच्या भोकर तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी श्रीकांत किन्हाळकर यांच्यावर टाकण्यात आली. यावेळी खा. प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगांवकर , युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष किशोर देशमुख , जि प.सदस्या.सौ.प्रणिताताई देवरे , कुशाल पाटील उमरदरीकर यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले.या निवडीबद्दल जिल्हा उपाध्यक्ष दिलीप सोनटक्के, तालुकाध्यक्ष किशोर पाटील लगळुदकर, बाजार समितीचे संचालक गणेश पाटील कापसे, राजू अंगरवार, विशाल माने यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे. या निवडीनंतर किन्हाळकर म्हणाले की, खा. प्रताप पाटील आणि बापूसाहेब गोरठेकर यांनी माझ्यावर टाकलेल्या जबाबदारीला तडा जाऊ न देता मिळालेल्या पदाचा उपयोग युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी करीन. पक्षाची ध्येयधोरणे गावागावात पोहचविण्यासाठी काम करणार आहे.