Categories
परळी

जिजामाता उद्यानाचे सुशोभीकरणाचे काम संपेपर्यंत राजमाता जिजाऊंचा पुतळा झाकण्यात यावासंभाजी ब्रिगेडच्या वतीने नगरपरिषद ला निवेदन


परळी (प्रतिनिधी)
परळी वै. येथील जिजामाता उद्यानाचे सुशोभिकरण चालू आहे. गार्डन मध्ये पूर्वी जिजाऊंचा पूर्णाकृती पुतळा महाद्वाराच्या समोर होता. पण आता महाद्वाराची दिशा बदलण्यात आली असून आऊसाहेब जिजाऊ यांचा पुतळा सुद्धा मुख्य प्रवेशद्वारावर बसवण्यात यावा. पुतळ्याची जागा बदलत असताना पूर्वीचा एकट्या जिजाऊचा पूर्णाकृती पुतळा न बसता बालशिवबा सोबत जिजाऊंचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने नगरपरिषदेला निवेदन देऊन करण्यात आली आहे. तसेच सध्या उद्यानात सुशोभीकरणाचे काम चालू असल्यामुळे काळजी म्हणून जिजाऊंचा पुतळा सुशोभीकरणाचे काम होईपर्यंत झाकण्यात यावा. अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन परळी वै. नगरपरिषदेचे कार्यालयीन अधिक्षक शिवश्री संतोष रोडे साहेब यांना देताना संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष शिवश्री देवराव लुगडे महाराज संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष शिवश्री सेवकराम जाधव माहिती अधिकार संरक्षण समिती बीड जिल्हाध्यक्ष शिवश्री बादल कांबळे सामाजिक कार्यकर्ते शिवश्री पवन माने आदी उपस्थित होते.

Categories
परळी

वैद्यनाथ साखर कारखान्याच्या चोरीत ना.मुंडेंच्या कार्यकर्त्याचा हात

हिंदूसम्राट विशेष प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

परळी:दि.24.परळी तालुक्यातील वैद्यनाथ साखर कारखान्यात झालेल्या चोरी प्रकरणात राष्ट्रवादीच्या नगरसेविकेच्या पतीचा हात असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
वैद्यनाथ साखर कारखान्यातील स्टोअर गोदाम व वर्कशॉप गोदामातून नुकतेच संगणक संच, मॉनिटर, कॉपर मटेरियल, बिअरिंग, ब्रास मटेरियल, बुश राऊंड असे विविध साहित्य चोरट्यांनी लंपास केले होते, ज्याची किंमत सुमारे 37 लाख 94 हजार 914 इतकी होती. कारखान्याचे लिपीक खदीर शेख यांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी भादवि 461, 380 कलमान्वये गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली होती. या प्रकरणात काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय होता, त्यावरून पोलिसांनी रमेश उर्फ पिंटू माणिक काळे, सलाऊद्दीन गफार सय्यद, मोशीन गौस काकर (सर्व रा.परळी) व मुतजीन मुनीर शेख रा.लातूर यांना अटक केली. या चोरी प्रकरणी पोलिसांनी अजीज इस्माईल शेख रा.परळी याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.मंगलदादा हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविकेचा पती आहे.आतापर्यंत त्याच्यावर विविध प्रकरणात गुन्हे दाखल झालेले आहेत.वैद्यनाथ कारखान्यातील चोरीमागे त्याचा हात असल्याने पोलिसांनी त्याच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. काल शोध घेताना पोलिसाच्या तावडीतुन तो निसटला पण त्याच्या ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात यश मिळाले आहे.पोलिस मंगलदादाच्या मागावर असून त्याला लवकरच अटक करू असे पोलिसांनी सांगितले

Design a site like this with WordPress.com
Get started