Categories
कोल्हापूर पन्हाळा

कचरा टाकण्याच्या वादातून तरुणाचा खुन

कोल्हापूर :

पन्हाळा प्रतिनिधी प्रदीप सुतार यांजकडून
कचरा टाकण्याच्या कारणातून उद्भवलेल्या वादातून तिघा सख्ख्या भावांनी धारदार शस्त्राने हल्ला करून आकाश आनंदा वांजळे (वय 25, रा. क्रांतिसिंह नाना पाटीलनगर) या तरुणाचा खून केल्याची घटना बुधवारी रात्री एकच्या सुमारास क्रांतिसिंह नाना पाटीलनगर येथे घडली. करवीर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

या प्रकारामुळे क्रांतिसिंह नाना पाटीलनगर येथे तणाव निर्माण झाला आहे.
खून झालेला तरुण आणि संशयित शेजारी राहतात. त्यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होता. बुधवारी सायंकाळी कचरा टाकण्यावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला, त्यातून मध्यरात्रीनंतर त्यांच्यात हाणामारी झाली.
त्यातूनच संशयित भारत कचरे, दिलीप कचरे आणि सुरेश कचरे या तिघांनी आकाश वांजळे याच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यास शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर या घटनेची माहिती वांजळे यांच्या नातेवाईकांसह मित्रांना मिळताच त्यांनी शासकीय रुग्णालयाच्या आवारात मोठी गर्दी केली होती. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. या घटनेची माहिती मिळताच करवीर पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळासह रुग्णालयात दाखल झाले होते.

Categories
पन्हाळा वारणा

राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री मा नाम देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी कोरे कुटुंबियांचे केले सांत्वन…

वारणा साखर कारखान्याच्या व महिला उद्योग समूहाच्या अध्यक्षा श्रीमती शोभाताई विलासराव कोरे यांना आज विविध क्षेत्रातून मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.

राज्याचे विधानसभा विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री मा नाम देवेंद्रजी फडणवीस, भाजप चे प्रदेशाध्यक्ष मा आमदार चंद्रकांत दादा पाटील, माजी खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक,माजी आमदार सुरेशराव हाळवणकर, हिंदुराव शेळके ,पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी मा.निपुण कोरे (दादा), आमदार डाॅ.विनय कोरे (सावकर) व कोरे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.समित कदम (दादा),हातकणंगले तालुक्याचे भाजप-जनसुराज्य चे नेते व जिल्हा परिषद सदस्य दलीतमित्र डॉ अशोकराव माने ,जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे आदी उपस्थित होते…

Design a site like this with WordPress.com
Get started