Categories
इचलकरंजी

तात्यासाहेब तथा टी. डी. कुडचे यांचे निधन

टी. डी. कुडचे गुरुजी यांचे निधन
इचलकरंजी (हिंदुसम्राट प्रतिनिधी) : –
येथील शिक्षण क्षेत्रातील सेवावृत्ती व्यक्तिमत्व तात्यासाहेब तथा टी. डी. कुडचे यांचे गुरुवारी निधन झाले. ते 91 वर्षांचे होते.
शिक्षक या नात्याने त्यांनी प्रारंभी खडतर प्रवास केला. स्वर्गीय बापूजी साळुंखे यांच्या सहवासात राहून त्यांनी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या प्रगतीसाठी उल्लेखनीय योगदान देत संस्थेच्या अनेक ठिकाणी लोकवर्गणीतून वास्तू आकाराला आणल्या. निवृत्तीनंतर उसंत न घेता डीकेटीई, बाहुबली आदी शिक्षण संस्थांच्या ज्ञान मंदिराला उभारणी दिली. त्यांच्या शैक्षणिक जीवनपटाची दखल घेऊन राज्य शासनाने ‘राज्य आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांनी पत्नी वेणूताई यांना विवाहानंतर शिक्षिका बनवले. त्यांनाही राज्य आदर्श शिक्षक पर्यंत पोहोचवले. ज्ञानदान करणारी ही जोडी अनुकरणीय ठरली. मुलांनाही उच्चशिक्षण घेऊन उद्योग, वैद्यकीय, शेती अशा व्यवसायात पारंगत केले. त्यांच्यामागे डॉक्टर अभय, अनंत, लक्ष्मी औद्योगिक वसाहतीचे उपाध्यक्ष अनिल तथा राजू, अविनाश अशी चार मुले आहेत. गुरुवारी पंचगंगा नदी घाटावर गुरुजींच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आले. पंचगंगा स्मशानभूमीत झालेल्या शोकसभेत विविध मान्यवरांनी कुडचे गुरुजींच्या शैक्षणिक कार्याचा सन्मानपूर्वक उल्लेख केला.

Categories
इचलकरंजी कोल्हापूर हातकणंगले

सहानुभूती नको न्याय हावा..! इचलकरंजी येथे एका दिव्यांग व्यक्ती अपमानास्पद वागणूक..!


वार्ताहर संजय पाटील
आज दिनांक 28 12 2019 रोजी जुनी नगरपालिका इथे दोन चाकी वाहन पार्किंग करून कापड दुकानांमध्ये खरेदीसाठी जात असताना दिव्यांग व्यक्तींनी आपली गाडी पार्किंग केलेल्या गाडीला एका अनोळखी व्यक्तीने लाथ मारुन गाडी पाडले त्यावेळी ती व्यक्ती श्री संजय पाटील भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस व श्री दत्त दिव्यांग निराधार सेवाभावी संस्था टाकवडे चे अध्यक्ष यांना शिवीगाळ करून धमकी दिली अपंग असला तर तुझा दुसरा पाय देखील काढतो गाडी अशी का लावला आहे असे तसे अपमानास्पद वागणूक दिली यावेळी संजय पाटील यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्या व्यक्तीने धमकी देऊन निघून गेले त्यानंतर संजय पटेल यांनी इचलकरंजी ट्रॅफिक ऑफिस यांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला त्या व्यक्तीचे गाडी नंबर mh 09 bj 7916 दे येऊन तक्रार देण्यास सांगितले तेथे जमलेल्या सर्व नागरिकांनी व्यक्ती समजावण्याचा प्रयत्न केला तरीदेखील तो व्यक्ती त्यांना धमकी देऊन निघून गेला यावर असे समजते की त्यांचे पोलीस ट्राफिक यांचे इतर लोकांना भीती राहिली नाही एका अपंग व्यक्तीला अशी अपमानास्पद वागणूक देणे कितपत योग्य आहे सरकार व हायकोर्टाचा आदेश असताना एखादी व्यक्ती इतर लोकांप्रमाणे सामान्य नागरिकाप्रमाणे वागणूक देणे ऐवजी त्यांना अपमानास्पद वागणूक मिळत आहे याकडे प्रशासन कधी लक्ष देणार व त्या व्यक्तीवर योग्य ती कारवाई करणार की नाही याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे संजय पाटील म्हणाले अपंग असणे हा गुन्हा आहे का अपंगांच्या सुरक्षेची काळजी कोण घेणार तरी त्या व्यक्तीवर योग्य कारवाई करून अपंगांना न्याय द्यावे

Categories
इचलकरंजी

पत्रकार रंगराव बन्ने यांना राज्यस्तरीय कार्यगौरव समाजरत्न पुरस्काराने सन्मानित


आश्विन लोहार /इचलकरंजी
बारवाड येथील पत्रकार व साहित्यिक रंगराव बन्ने यांना दौण्ड जि. पुणे येथील ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय कार्यगौरव समाजरत्न पुरस्काराने 20 डिसेंबर रोजी दौण्ड जि. पुणे येथील अष्टविनायक बहुउद्देशीय सभागृह भोईटे नगर येथे डौंड चे फौजदार भगवान पालखे, माजी आमदार रमेश थोरात,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष आप्पासो पोवार,हिंदू सम्राटचे संपादक उत्तम कागले,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सचिन कुलटे, शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र काळे आदींच्या हस्ते देवून सन्मानित करण्यात आले.
रंगराव बन्ने हे गेली ३० वर्षे पत्रकार क्षेत्रात व ३३वर्षे साहित्य क्षेत्रात कार्यरत असून या कार्या बरोबरच धार्मिक,सामाजिक,सहकार क्षेत्रात पण चांगले काम करत आले आहेत.तर पत्रकारितेत व साहित्य क्षेत्रात गेली ३०वर्षे प्रामाणिक सेवा करत सर्वांशी मिळून मिसळून माणुसकी जपण्याचे काम केले आहे, त्याच बरोबर साहित्य संमेलन,भजन,सामाजिक कार्य,धार्मिक कार्य यामध्ये हिरीरीने सहभाग घेत असतात. याचीच दखल घेऊन दौण्ड येथील ज्ञानसंकल्प संस्थेने त्याना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी मानवाधिकार संघटनेचे विनायक दोरगे,प्रा.एच.आर.पाटील,ज्ञान संकल्प संस्थेचे अध्यक्ष सदाशिव रणदिवे,सुभाष भोसले, कारदगा येथील बाळासो नाडगे,तातोबा बत्ते,सिधाप्पा गावडे,बारवाडचे प्रल्हाद चौगुले,गजानन लोहार,विकास चौगुले,प्रदीप जाधव,यांच्यासह महाराष्ट्रातील मान्यवर व पुरस्कार विजेते उपस्थित होते.

डौंड येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना रंगराव बन्ने
Design a site like this with WordPress.com
Get started