Categories
अजब गजब कोल्हापूर

२६/११ चे “हिरो” राष्ट्रपती शौर्यचक्र विजेते मरीन कमांडो वीर योद्धा प्रवीण तेवतिया यांनी दोन लाख रूपये करोना लढ्यासाठी दान केले


* कोल्हापूर- सुभाष भोसले
आम्ही परमवीरचक्र विजेते वीर योद्धा अब्दुल हमीद यांना पाहिले नाही, पण अतिरेक्यांच्या चार गोळ्या बुलेट फ्रुफवर झेलणाऱ्या व एक गोळी कानाला चाटून गेल्याने कायमचा कान निकामी झालेले, एका अतिरेक्यास यमसदनी पाठविलेले व १५० पेक्षा जास्त लोकांचे प्राण वाचविणारे प्रवीण तेवतिया यांना पाहतोय

२६/११ च्या ताज हॉटेलवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचे वेळी अतिरेक्यांना सामोरे जाणारे आघाडीचे पूर्व मरीन कमांडो प्रवीण अतिरेक्यांना पहिल्यांदा सामोरे गेले. अतिरेक्याने एके-40 तून झाडलेल्या चार गोळ्या बुलेटप्रुफ जॅकेटवर लागल्या, तर एक गोळी कानाला चाटून गेल्याने कान कायमचा निकामी झाला. याही स्थितीत त्यांनी एका अतिरेक्याला लोळविले. पाच महिने हॉस्पिटलमध्ये राहावे लागले. पाच सर्जरी झाल्या. ते सामोरे गेल्याने अतिरेकी माघारी फिरले. ते मागे फिरल्यामुळे १५० पेक्षा जास्त लोकांचे प्राण वाचले.
प्रवीण तेवतिया बुलंद शहराच्या गुलावठी क्षेत्रातील भटौना गावात राहणारे. २६/११/२००८ च्या ताज हल्ल्यानंतर दाखल झालेल्या ऑपरेशन टीमचे आघाडीचे कमांडो.
प्रवीण यांच्या अतूल शौर्यामुळे त्यांना महामहीम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी राष्ट्रपती शौर्यचक्र पदकाने सन्माणित केले होते. प्रवीण यांनी साऊथ आफ्रिका, मलेशिया, अमेेरिका आयर्न मॅन पुरस्कार जिंकला आहे.
कौन बनेगा करोडपती मध्ये या योद्ध्याला मा अमिताभ बच्चन यांनी बोलावून सॅलूट केला होता. त्यांची हेलावून टाकणारी शौर्यगाथा ऐकली. या खेळात प्रवीण यांना १२,५०,००० रूपये जिंकता आले होते.हे पैसेही त्यानी समाजासाठी खर्च केले होते
रिटायर प्रवीण हे मुंबई कमौडो ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रक्टिकल ट्रेनिंग, एअर रायफल शूटिंग, योगा आणि धावण्याचे प्रशिक्षण देतात. मेरेथाॅनचे प्रशिक्षण Online देतात.
भटौना गावास या योद्ध्याचा अभिमान वाटतो. गावच्या मुलांनी देशसेवेसाठी सैन्यदलात यावे असे प्रवीण यांना वाटते.
प्रवीण यांना आतापर्यंत मिळालेली तीन डझन सुमारे ३६ पेक्षा जास्त मेडल Online विकून गरीबांसाठी मदत करणार आहेत. कहर म्हणजे दोन मेडल दोन लाख रूपयांना विकून सर्व पैसे करोना विरोधातील लढ्यासाठी पीएम करोना फंडास दान केले आहेत.
प्रवीण तेवतिया आपण अस्सल देशप्रेमी आहात. आपली पेन्शन समाजासाठी खर्च करताच, पण मेडलही विकून देशाला संकटमुक्त करण्यासाठी रक्कम दान करत आहात.
२६ जानेवारी, १५ ऑगष्ट व क्रांतीदिनाच्या दिवशी बेगडी प्रेम दाखवून नंतर वर्षभर शहीद वा माजी सैनिकांच्या समस्या जाणून घेत नसल्याबद्दल व्यवस्थेविरूद्घ प्रवीण यांना प्रचंड राग आहे. सैन्यासाठी विमा असावा यासाठी ते आग्रह धरतात.
प्रवीण तेवतिया २६/११ च्या हिरोला साष्टांग दंडवत. तुम्हाला परमेश्वर आरोग्यदायी दीर्घायुष्य देऊ दे. तुमच्या सर्व आशा, इच्छा व अपेक्षा भविष्यात पूर्ण होऊ देत.
संपक गायकवाड
(माजी सहाय्यक शिक्षण संचालक)

Categories
अजब गजब कोल्हापूर

देवकी देवी तुम्हाला सांष्टाग दंडवतच

  • कोल्हापूर- सुभाष भोसले
    श्रीम देवकीदेवी हुकूमसिंह भंडारी (वय ६०) अजूनही भाड्याच्या घरात राहतात, तरीही फडी व पेन्शन मधून जमा झालेले दहा लाख रूपये पीएम केअर्स फंडास दिले. वडील स्वातंत्र्य सेनानी होते. देवकी देवी तुम्हाला सांष्टांग दंडवतच
    उत्तराखंड देवभूमी ऐवजी ” देवीभूमी” म्हटले पाहिजे. उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्याच्या गौचर गावात देवकी देवी राहतात. पती रेशम विभागात कार्यरत होते. स्वर्गवासी आहेत.
    गौचर गाव महिलांच्या दातृत्वासाठी भविष्य काळात प्रसिद्ध होईल. कारण याच गावातील शांतीदेवी गुसांई यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी एक लाख तर, कमला देवी यांनी वयाच्या सत्तावण्णाव्या वर्षी पती आणि मुलाचा मृत्यूचे दु:ख बाजूला ठेऊन दीड लाख रूपये करोना लढ्यासाठी दान केले आहेत.
    देवकीदेवी एकट्या राहात असूनही त्यांनी भारत वर्षास परिवार मानला. कर्ण व बळीराज्याचे दातृत्व आपण पुस्तकात वाचतो, पण साक्षात दहा लाख जमा पुंजी दान करून दाखवून दिले आहे. देवकीदेवी यांनी काही मुलांना दत्तक घेऊन त्यांचा उच्च शिक्षणापर्यंतचा सर्व शिक्षण खर्चही केला आहे.
    उत्तराखंडचे मान. मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी गौचरच्या तिन्ही महिलांनी पंतप्रधान केअर्स फंडास करोना विरोधातील लढ्यासाठी दिलेल्या मदतीमुळे भारावून जाऊन पुढील गौरव उद्गार काढले, “देवभूमी करोनापासून मुक्त व्हावी म्हणून डोंगरातील महिलांनी वैश्विक संकटामुळे देश आर्थिकदृष्ट्या संकटात असताना निस्वार्थी भावनेने केलेल्या मदतीमुळे त्याग आणि दान ही भारतीय संस्कृती मूल्ये पुनर्जिवीत झाली आहेत. देशासाठी ही घटना प्रेरणास्रोत्र ठरणारी आहे.
    देवकीदेवी यांचे दिवंगत वडील स्वातंत्र्य संग्राम सेनानी होते. देशप्रेम, देशाभिमान त्यांच्या नसानसात ठासून भरला आहे.
    नवऱ्याची मिळणारी पेन्शन म्हातारपणासाठी साठवली होती. करोनाच्या संकटामुळे लोकांची उपासमार होऊ नये म्हणून त्यांनी मदतीचा निर्णय घेतला व गौचर भारतीय स्टेट बँकेत दहा लाखाचा धनादेश दिला.
    देशाचे महामहिम राष्ट्रपती व देशाचे प्रधानमंत्री यांचेसह अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे.
    माझ्या सारखे लोक मी, माझे कुटुंब, माझी मुले-मुली, माझा what’s app ग्रुप यामध्ये आनंद घेत असताना, चर्चा करत असताना, वितंडवाद करत असताना या महिला समाजाचा विचार करून भरभरून मदत करत आहेत. या देशाच्या देवभूमीतील “देवींना” सांष्टांग दंडवतच

देवकी देवी यांनी दहा लाख रूपये करोना विरोधातील लढ्यासाठी दिल्यानंतर काही दिवसांनी मोबाईलवर फोन करून तुमचे ATM कार्ड बिघडले असून तुम्ही कार्डचा नंबर सांगा. सुरू करतो म्हणून नंबर सांगितल्यावर ATM मधील ४७,७०० रूपये काढून घेतले हे देशाचे दुर्देव्य आहे. देवकी देवींना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अज्ञाता विरूद्घ गुन्हा नोंद करावा लागला
दहा लाख दान केल्यावर उर्वरित सर्व ४७,७०० रूपये रक्कम या देशातीलच हरामखोराने लांबविली याला काय म्हणावे???
देवकी देवी तुमची क्षमा मागतो. तुमचे पैसे लांबविणारे भामटे लवकर सापडू देत. तुम्हाला परमेश्वर आरोग्यदायी दीर्घायुष्य देऊ दे ही महालक्ष्मीचे चरणी प्रार्थना करतो अशी प्रतिक्रिया संपत गायकवाड (माजी सहाय्यक शिक्षण संचालक) यांनी व्यक्त केली

Categories
अजब गजब कोल्हापूर

श्रीम कमलादेवी नेगी( वय ५७) पती व मुलांच्या मृत्यूनंतरही पीएम केअर्स फंडास वृद्धापकाळाची ठेव ठेवलेलेे दीड लाख रूपये दान केले

  • कोल्हापूर- सुभाष भोसले
    उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यातील गौचर परिसरातील दुसरी दातृत्ववान दुर्गा. पती कमलसिंह नेगी शिक्षण विभागात परियोजना अधिकारी होते. त्यांचे निधन झाले आहे. पती ग्राम पंचायत झिरकोटीचे रहिवासी होते. चार वर्षापूर्वी दुर्घटनेत दोन्ही मुलांचे अकाली निधन झाले आहे. कमला देवी स्वत: राजकीय इंटर कॉलेज लंगासू येथे प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करतात.
    गौचर क्षेत्रातील देवकीदेवी भंडारी यांनी दहा लाख तर शांतीदेवी गुंसाई यानी एक लाख करोना विरोधातील लढ्यासाठी दिले होते. त्यांचाच आदर्श समोर ठेऊन कमलादेवी नेगी यांनी दीड लाख रूपये पंतप्रधान केअर्स फंडास दान केले आहेत. गौचर येथील भारतीय सेंट्रल बँकेत त्यांनी धनादेश सुपूर्द केला.
    कमलादेवी नेगी यांनी करोनामुळे बेरोजगारी व उपासमारीमुळे जनता होरपळून निघत असल्याने आपण दान दिल्याचे सांगितले. देवभूमीतून करोना लवकर नाहिसा व्हावा व जनजीवन पूर्वपदावर यावे असे कमलादेवी यांना वाटते.
    आयुष्याच्या उत्तरार्धात नोकरीचे अखेरचे वर्ष असताना आयुष्यभर साथ दिलेला नवरा गेला आहे. दोन्ही मुलांचे दुर्घटनेत निधन झाले आहे. एकाकी आयुष्याची संध्याकाळ असताना समजातील दु:ख पाहून मदतीचा हात पुढे करणे साधी सोपी गोष्ट नाही. कमला देवी तुम्हाला आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभू दे. दु:खाचा डोंगर कोसळला तरी रक्तातील दातृत्व उफाळून आले त्या दातृत्वास सांष्टांग दंडवत.
    उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी कमलादेवी यांचे भरभरून कौतुक केले. कमलादेवी यांची कृती समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
    समाज हेच कुटंब मानणाऱ्या कमलादेवी तुमचा अभिमान वाटतो.

  • संपत गायकवाड
    (माजी सहाय्यक शिक्षण संचालक)
Categories
अजब गजब कोल्हापूर

डॉ संकेत मेहता यांनी स्वत: ऑक्सिजवर असताना रुग्णावर उपचार करण्यासाठी देवदूत बनणे पडले ६० लाख रूपयांना व ९६ दिवस गेले दवाखान्यात


कोल्हापूर- सुभाष भोसले
डॉ संकेत मेहता भूलतज्ञ सूरत ( गुजरात) स्वत: ऑक्सिजनवर उपचार घेत असताना ICU मध्ये ७१ वर्षांच्या पेशन्टला ऑक्सिजन ट्यूब लावायला डॉक्टर लवकर न आल्याने डॉ मेहता यांच्यातला देवदूत जागा झाला त्यांनी स्वत:चा ऑक्सिजन मास्क काढून रूग्णाला ऑक्सिजन ट्यूब टाकली. बावीस मिनीटे डॉ मेहता यांना स्वत:ला ऑक्सिजन न मिळाल्याने फुफ्फुसावर गंभीर परिणाम होऊन ९६ दिवस दवाखान्यात राहावे लागले. चेन्नई येथे जाऊन केलेल्या उपचाराचा खर्च साठ लाख (६०,००,०००) रुपये आला.
डॉ संकेत मेहता हे सूरत येथील हॉस्पिटलमध्ये भूलतज्ज्ञ म्हणून सेवा बजावत आहेत. डॉ मेहता यांना करोनाची लागण होऊन त्यांचे ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने ते स्वत: ऑक्सिजनवर उपचार घेत होते. ICU मध्ये ७१ वर्षीय रुग्ण उपचाराखाठी आले. त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास होत होता. तात्काळ ऑक्सिजन लावणे आवश्यक होते. डॉक्टरांना यायला उशीर होतोय हे लक्षात येताच रूग्णाचा जीव वाचावा म्हणून डॉ मेहता यांच्यातील देवदूत जागा झाला. त्यांनी आपला ऑक्सिजन मास्क काढून आलेल्या रूग्णास व्हेंटीलेटरवर ठेऊन ट्यूब टाकली. हे सर्व करेपर्यंत २२ मिनीटे डॉ मेहता विना ऑक्सिजन मास्क होते. याचा त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊन फुफ्फुस खराब झाले. फुफ्फुस प्रत्यारोपन करण्याची शक्यता निर्माण झाली.
फुफ्फुस प्रत्यारोपन करण्यासाठी डॉ मेहता यांना चेन्नई येथे एअर अॅम्बुलन्स ने हलविले. चेन्नई येथे फुफ्फुस प्रत्यारोपन न करता हॉस्पिटलमधील डॉक्टरांना बरे करण्यात यश आले. एकूण एक कोटी रूपये खर्च आला. पण हॉस्पिटलने साठ लाख रूपये बील केले. सुरत येथील डॉक्टर व डॉ मेहतांच्या मित्रांनी क्राऊड फंडींग सुरू केले, कारण हा प्रचंड कुवतीच्या पलिकडचा खर्च होता. सुरतच्या हॉस्पिटलमध्ये उपचाराचा खर्च माफ केला.
२२ दिवस व्हेंटिलेटरवर, ९६ दिवस हॉस्पिटलमध्ये, एकूण उपचाराचा खर्च ६० लाख रूपये भरून घरी आले. वॉकरचा आधार घेऊनच अजूनही चालावे लागते.
डॉ संकेत यांचे वय केवळ ३७ वर्ष आहे. रूग्णावर डॉक्टर लवकर न आल्याने आपला जीव धोक्यात घालून रुग्णावर उपचार करणे केवढ्या पडले? स्वत: ऑक्सिजनवर उपचार घेत असताना कोणीही दुसऱ्या रूग्णावर स्वप्नातही वा कल्पनेतही उपचार करणार नाही. तरीही डॉ मेहता यांनी धाडस केले ते त्यांना खूपच महागात पडले
डॉ संकेत मेहता यांना हॉस्पिटलचे बील साठ लाख म्हणजे प्रचंड आहे. लोकांनी जीव धोक्यात घालून उपचार केले म्हणून कौतुक झाले, वर्तमानपत्रांचे रकाणे भरून आले. टी व्ही चॅनलवर प्रशंसा झाली. आता मात्र त्यांना आर्थिक अडचणीस सामोरे जावे लागत आहे. सुरतबरोबर संपूर्ण देशासाठी नव्हे तर जगासाठी मिसाल बनलेले डॉ संकेत यांना सर्व स्तरातून मदत मिळावी ही परमेश्वराचे चरणी प्रार्थना.
रक्कम उभी राहील, आर्थिक संकट दूर जाईल पण तब्बेतीचं काय??बायको मुले, आई -वडील यांचं काय ??? डॉ संकेत मेहता तुम्ही परमेश्वराचे अवतार नव्हे तर परमेश्वरच आहात. देशाच्या वैद्यकीय इतिहासात आपले नाव सुवर्णअक्षरांनी लिहीले जाईल. डॉक्टर तुमच्या पायावर नतमस्तकच. तुम्हाला परमेश्वर आरोग्यदायी दीर्घायुष्य देऊ दे
जीवावर उदार होऊन सेवा बजावणाऱ्यासाठी ही गोष्ट शंभरवेळा वाचून विचार करण्यासारखी आहे. शेवटी सर्व स्वत:ला, पत्नीला, मुलांना व आई-वडील यांनाच निस्तरावे लागते.


संपत गायकवाड (माजी सहाय्यक शिक्षण संचालक)

Design a site like this with WordPress.com
Get started