Categories
शैक्षणिक

10वी, 12वी च्या विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री चॅनेलवर 15 मार्चपासून पुन्हा विषयनिहाय तासिकांचे आयोजन


पाटण हिंदू सम्राट प्रतिनिधी उमेश सुतार यांजकडून
महाराष्ट्रामध्ये दिवसागणिक कोरोना बाधितांची रूग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातही शाळा, कॉलेजेस पुन्हा बंद करण्याचा निर्णय झाला आहे.
या निर्णयामुळे यंदा बोर्डाची परीक्षा देणार्‍या 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आता सरकार एक पाऊल पुढे आले आहे.
शिक्षण विभागाकडून आता पुन्हा 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी डीडी सह्याद्री वर विषयनिहाय तासिकांचे आयोजन करण्यात आले आहे. 15 मार्च पासून सह्याद्री चॅनेलवर विद्यार्थ्यांना विशेष कार्यक्रम पाहता येणार आहे.

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started