Categories
कोल्हापूर हातकणंगले

कुटुंब व्यवस्थेत प्रत्येक नातं हे पवित्र नातं असते :डॉ. एस.जी. शेख

रुकडी येथे आयोजित केलेल्या घरगुती हिंसाचार या विषयावरील व्याख्यानात बोलताना डाॕ.एस.जी.शेख सोबत डाॕ.सविता रासम, प्राचार्य डाॕ.अर्जुन राजगे व डाॕ.शर्मिला साबळे

रुकडी ( दिनांक ९ – ३- २०२१ प्रशांत भोसले ) कुटुंबातील प्रत्येक व्यक्त्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे कुटुंब व्यवस्थेत प्रत्येक नातं हे पवित्र नातं असते, मग ते वडील – मुलगा, आई – मुलगी, पती – पत्नी किंवा सासू – सून असो कुटुंबात प्रत्येकाने एकमेकांचा सन्मान केला पाहिजे. काही कुटुंबात सासू कडून सुनेचा छळ होतो किंवा तिच्या पतीकडून छळ होतो. जेव्हा मुलगी लग्न होऊन सासरी जाते, तेव्हा ती त्या कुटुंबातील एक सदस्य बनते तिला त्या घरात सन्मानाने राहण्याचा अधिकार आहे. जेव्हा मुलीचा सासरी छळ होतो तेव्हा तिने तो छळ सहन न करता कायद्याचा आधार घेऊन त्या घरात सन्मानाने राहिले पाहिजे तरच मुलीचा सासरी होणारा छळ थांबेल, घरातील सर्व सदस्यांनी एकमेकांना समजावून घेणे महत्वाचे आहे तरच कुटुंबातील सर्व सदस्य आनंदाने राहतील. घरात कायम भांडण – तंटा होत असेल तर कोणालाच स्वाथ्य मिळत नाही असे मत शहाजी लॉ कॉलेज कोल्हापूरचे डॉ. एस.जी. शेख यांनी व्यक्त्त केले ते येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात जेंडर चॕंंपिअन क्लब च्या वतीने आयोजित केलेल्या घरगुती हिंसाचार या विषयावरील व्याख्यानात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अर्जुन राजगे होते स्वागत व प्रास्ताविक डॉ.शर्मिला साबळे यांनी केले. या कार्यक्रमात महाविद्यालयातील जेंडर चॕपिअन क्लबच्या सदस्या व शहाजी लॉ कॉलेज कोल्हापूरच्या डॉ. सविता रासम यांनीही मनोगत व्यक्त्त केले, त्यांनी स्त्रीयांवर होणाऱ्या अत्याचार विरोधी कायद्याची सविस्तर माहिती दिली. त्यांनी विविध उदाहरणासह घरगुती हिंसाचार थांबवून गुण्यागोविंदाने कसे राहता येईल ते सांगितले. अध्यक्षीय भाषण डॉ.अर्जुन राजगे यांनी हिंसाचाराचे कायिक हिंसाचार, वाचिक हिंसाचार व मानसिक हिंसाचार असे तीन प्रकार सांगितले यात कायिक हिंसाचारामध्ये मारझोड किंवा शारीरिक इजा करणे, वाचिक हिंसाचारामध्ये एखाद्याचे मन बोलून दुखावणे तर मानसिक हिंसाचारामध्ये एखाद्याबद्दल मनात वाईट विचार देहबोलीतून किंवा विशिष्ट हावभावातून व्यक्त्त करणे अशा हिंसाचाराचे प्रकार उदाहरणासह स्पष्ट केले. प्राचार्य डाॕ.अर्जुन राजगे आपल्या भाषणात पुढे म्हणाले आयुष्य जगत असताना संघर्ष निर्माण न होण्यासाठी समायोजना बरोबरच परस्परांना समजून घेणे आवश्यक आहे. कौटुंबिक हिंसाचार टाळण्यासाठी जरी कायदेशीर तरतुदी असल्या तरी प्रत्येक स्त्रीने शिक्षणाच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन प्राप्त करावे तसेच स्वतःचे संरक्षण स्वतः करण्यासाठी सक्षम व्हावे कारण सेल्फ डिफेन्स इस बेस्ट डिफेन्स असे प्रतिपादन केले. या कार्यक्रमास सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळून विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. आभार बी. ए. भाग ३ मधील विद्यार्थी रोहित भोळे यांनी मानले तर सूत्रसंचालन बी.ए.भाग ३ मधील विद्यार्थीनी कु. सोनम कांबळे हिने केले

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started