
: मनपाडळे येथील सौ छाया सयाजी शिंदे वय 55 यांचे शनिवारी दिनांक 27-02-2021 रोजी हृदयविकाराने निधन झाले. मनमिळावू स्वभावाच्या प्रामाणिक सर्वांच्या लाडक्या माई अचानक कुटुंबातून गेल्यामुळे कुटुंबियांवर दुःखाचे डोंगर कोसळला आहे त्यांच्या जाण्याणे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे .वारणा कारखान्याचे इंजिनियरिंग विभागाचे कर्मचारी श्री सयाजी महादेव शिंदे यांच्या त्या पत्नी होत्या. तसेच वारणा सहकारी बँकेचे माजी असिस्टंट जनरल मॅनेजर श्री वसंतराव शिंदे व श्री विलासराव शिंदे त्या वाहिनी होत , त्यांच्या मागे दोन मुले अक्षय व रोहित आहेत. शितलकुमार ,सचिन उर्फ शरद व अधिकराव यांच्या चुलती प्राध्यापक संभाजी पाटील सर यांच्या मामी (सासू ) सौ. भारती पाटील व सौ.अर्चना बेलेकर सौ.सारिका पाटील यांच्या चुलती तसेच दीर, भावजय ,पुतणे असा शिंदे परिवार आहे. रक्षाविसर्जन त्यांचे राहते घरी मु.पो. मनपाडळे येथे सोमवार दिनांक 1-03-2021 रोजी सकाळी9:00 वाजता आहे.
