Categories
कोल्हापूर हातकणंगले

किणी हायस्कूलमध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा दिनानिमित्त कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करताना पर्यवेक्षक डी. एच. पाटील, मुख्याध्यापिका सुरेखा शिरोटे, वाय. पी. पाटील आदी

प्रशांत भोसले
किणी ,ता. २७ : येथील किणी हायस्कूल, किणी मध्ये मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

मराठी राजभाषा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी मातृभाषेचा गौरव करणारी मनोगते व्यक्त केली. इयत्ता नववीच्या विद्यार्थीनींनी मराठी गौरव गीताचे सादरीकरण केले. यानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
एस.एस. शेटे यांचे ‘ मराठी भाषेची थोरवी’ या विषयावरती व्याख्यान झाले.

प्रास्ताविक यु. एम. पाटील, सूत्रसंचालन स्वाती मतसागर यांनी केले. वाय.पी. पाटील यांनी आभार मानले.

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started