Categories
कोल्हापूर

ज्योतिर्लिंग ग्राम विकास पॅनेलच्या शोभा पाटील यांची नेर्लेच्या सरपंचपदी निवड

कोल्हापूर:संजय पाटील

नेर्ले, ता.शाहूवाडी येथील ज्योतिर्लिंग ग्रामविकास पॅनेलच्या शोभा आण्णा पाटील यांची सरपंचपदी निवड तर उपसरपंचपदी कोमल योगेश पाटील यांची निवड झाली आहे.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत शिवसेना – राष्ट्रवादीच्या आघाडीने विजयश्री खेचून आणली. नेर्लेच्या इतिहासात २५ वर्षानंतर प्रथमच शिवसेना व राष्ट्रवादी या पक्षाचा सरपंच व उपसरपंच झाला आहे. अटीतटीच्या या निवडणुकीमध्ये शिवसेनेला लढतीमध्ये सात पैकी पाच जागांवरती यश खेचून आणण्यामध्ये बांधकाम व आरोग्य सभापती हंबीराव पाटील (बापू) तसेच मा.आम.सत्यजित पाटील (आबा) यांचे मार्गदर्शन तसेच गावातील तरुण वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
नेर्लेच्या सरपंचपदी शोभा आण्णा पाटील तर उपसरपंचपदी कोमल योगेश पाटील काल दि.२५ फेब्रुवारी रोजी निवडी एकमताने बिनविरोध करण्यात आल्या. या निवडीसाठी सरपंच एक-एक अर्ज आल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी पराग कानडे यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
या निवडीप्रसंगी तलाठी हिंदुराव कुंभार,ग्रामसेवक विजय पाटील, कोतवाल निवास कांबळे ,निवृत्ती पाटील (दाजी), आण्णा पाटील, पांडुरंग डांगे,महिपती दिंडे (माजी सरपंच), विनायक पाटील.सागर पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started