Categories
कोल्हापूर हातकणंगले

अश्विनी पाटील पोलीस निरीक्षकपदी निवड


किणी ( ता. हातकणंगले) येथील सौ. अश्विनी संतोष पाटील यांची पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती झाली असून त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागात सहा. पोलीस आयुक्त पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यांनी विवाहानंतर अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २००९ साली पोलीस उपनिरीक्षक पद मिळवले होते.

त्या किणी येथील प्रतिष्ठित वकील संतोष पाटील यांच्या पत्नी व स्थानिक देवस्थान सल्लागार उपसमिती किणीचे माजी अध्यक्ष कै. आण्णासो पाटील यांच्या स्नुषा होत. किणी गावातील वर्ग-१ पदावर पदोन्नती मिळालेल्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत.

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started