
कोल्हापूर:संजय पाटील
आमदार स्थानिक विकास निधीमध्ये एक कोटीची वाढ करणारे महाविकास आघाडी शासनाने अनेक वर्षे वेतनपासून वंचित ठेवलेल्या शिक्षक शिक्षकेत्तर प्रति असणारी असलेली दृष्ट मानसिकता संपुष्टात आणून सदर बांधवाना तात्काळ न्याय देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कार्याध्यक्ष तथा नागपूर विभाग शिक्षक आमदार नागो गाणार यांनी शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शासन निर्णय दिनांक २३ फेब्रुवारी२०२१ अन्वये आमदार स्थानिक विकास कार्यक्रमा अंतर्गत सन २०२०-२१ या आर्थिक वर्षापासून प्रतिवर्षी रुपये एक कोटीची वाढ करण्यात आली ही वाढ करताना शासनाला कोरोना संकट आडवे आले नाही. परंतु राज्य मंत्रिमंडळाने तीन वेळा घेतलेले निर्णय त्या आधारावर निर्गमित केलेली शासन निर्णय विधिमंडळात मंजूर केलेल्या निधी या सर्व संवैधानिक बाबी पूर्ण झाल्या असताना शासनाने शिक्षकांना दिनांक १ एप्रिल २०१९ पासून २०टक्के वेतन अनुदान व वीस टक्के वाढीव वेतन अनुदान वितरित करण्याचा शासन आदेश निर्गमित केला नाही . तसेच व घोषित शाळा व नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांना निधी सह अनुदानास पात्र घोषित करण्याचा निर्णय घेऊन आदेश निर्गमित केला नाही . शिक्षक शिक्षकेतर प्रति शासनाची दृष्ट मानसिकता सुस्पष्ट करणाऱ्या या घटनेचा शिक्षक शिक्षकेत्तर समुदायाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त होत आहे. म्हणून शासनाने आपली दृष्ट मानसिकता संपुष्टात आणून २० टक्के वेतन अनुदान व २० टक्के वाढीव वेतन अनुदान वितरित करण्याचा आदेश तसेच घोषित शाळा व नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांना निधी सह अनुदानास पात्र घोषित करण्याचा आदेश तात्काळ निर्गमित करण्याची मागणी सदर निवेदनात करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभाग कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी यांनी दिली आहे .