लोकराज्य जनता पार्टीच्या वतीने संत गाडगे महाराज जयंती साजरी.

कोल्हापूर: सुभाष भोसले
संत गाडगेबाबांनी आपल्या उभ्या आयुष्यात अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता ,जातीभेद निर्मूलन याबरोबरच समाजसुधारणेचे महान कार्य केले. गावोगावी स्वच्छता मोहीम राबविण्या बरोबरच कीर्तनातून लोकप्रबोधनाचे महान कार्य केले. ‘कर्ज काढून तीर्थयात्रा करू नका, देव देवळात नसून तो दीनदु:खीतापाशी आहे ,म्हणून गोरगरिबांना मदत करावी ‘असा उपदेश गाडगेबाबांनी कीर्तनातून केला. संत गाडगेबाबांचे महान कार्य व विचार प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजेत असे प्रतिपादन लोकराज्य जनता पार्टीचे अध्यक्ष अनिल चव्हाण यांनी केले .सानेगुरुजी वसाहत येथील लोकराज्य जनता पार्टीच्या कार्यालयात संत गाडगेबाबा यांची 145 वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी अनिल चव्हाण बोलत होते. गाडगेबाबांच्या प्रतिमेस पुष्पहार सौ. संध्या कुराडे यांच्या हस्ते घालण्यात आला. प्रास्ताविक सुधाकर डोनोलिकर यांनी केले. आभार सर्जेराव भोसले यांनी मानले.यावेळी सौ .जयश्री चव्हाण, मनोहर कुराडे, सुनील कुंभार ,शशिकांत जाधव ,अभिजित पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.