
प्रशांत भोसले रुकडी ( दि. २३ – २- २०२१ )राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय, रोटरी कल्ब आॕफ इचलकरंजी सेंट्रल आणि रोटरी कल्ब आॕफ अतिग्रे यांच्या वतीने रुकडी येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित केलेल्या ” गुरुकुल प्रकल्प ” एक दिवसीय शिक्षक व प्रशासकीय सेवक यांच्या प्रशिक्षण कार्यशाळेत माजी खासदार डॉ. निवेदिता माने अध्यक्षीय मार्गदर्शन करताना त्यांनी शिक्षकांनी स्वतः विविध कौशल्ये आत्मसात करून विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण द्यावे म्हणजे विद्यार्थी विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतील , शिक्षक हा व्यवसाय किंवा पेशा नसून ते एक व्रत आहे हे व्रत आपण स्वइच्छेने स्वीकारलेले आहे, हे व्रत सुजाण नागरिक घडविण्याचे आहे याची जाणीव प्रत्येक शिक्षकांनी ठेवली पाहिजे. विद्यार्थ्यांचे यश हेच शिक्षकांच्या श्रमाचे फळ आहे याची जाणीव आपणाला असली पाहिजे,आपले विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत राहतील या दृष्टीने विद्यार्थ्यांना घडवावे असे मत व्यक्त्त केले. स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अर्जुन राजगे यांनी केले. या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी रयत शिक्षण संस्था सातारा येथील गुरुकुल प्रकल्पाचे शिक्षक उपस्थित होते. या कार्यशाळेत बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्टच्या कै. संभाजीराव माने गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, काकासाहेब माने हायस्कूल, संभाजीराव माने प्राथमिक विद्यालय , छत्रपती शिवाजी शिक्षणशास्त्र महाविद्यालय, राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय, श्री. कलमेश्वर हायस्कूल सांबरे, सोनाबाई बाळगोंडा पाटील हायस्कूल हारोली व नागोजीराव पाटणकर हायस्कूल कोल्हापूर या विद्यालयातील सर्व शिक्षक व प्रशासकीय सेवक सहभागी झाले होते.
दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत श्री. के. एस. महामुनी विभागीय अधिकारी, रयत शिक्षण संस्था मध्य विभाग सातारा यांनी गुरुकुल व नवोपक्रम या विषयावर बिजभाषण केले. श्री. ए. के. निकम गुरुकुल प्रकल्प प्रमुख, कर्मवीर विद्या प्रबोधिनी रयत शिक्षण संस्था सातारा यांनी प्रवेश व आर्थिक नियोजन आणि मुख्याध्यापक व प्रकल्प प्रमुख यांची भूमिका या विषयावर, श्री. ए. बी. गायकवाड माजी प्रकल्प प्रमुख अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा यांनी सूक्ष्म गुणविश्लेषण या विषयावर, श्री. डी.बी. दाभाडे उपशिक्षक संजय भैरवनाथ काळे विद्यालय तासगाव यांनी विज्ञान प्रयोग नियोजन – कार्यवाही ,फाईल व फॉर्म्स या विषयावर, श्री. एस. एम. महामुलकर पर्यवेक्षक अण्णासाहेब कल्याणी विद्यालय सातारा यांनी गुरुकुल रेकॉर्ड व विविध उपक्रम या विषयावर तर श्री. एस. आर. भोसले मुख्याध्यापक यशवंतराव चव्हाण विद्यालय पिंपोडे यांनी वार्षिक नियोजन या विषयावर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेत बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्टच्या विविध शाखांचे शाखाप्रमुख श्री. रामचंद्र पाटणकर,श्रीमती रिचा यादव,रो.संजयसिंह गायकवाड रो.विमलकुमार बंब , रो. नितीनकुमार कस्तुरे, रो. डाॕ.हिंदुराव संकपाळ उपस्थित होते श्री. रामचंद्र पाटणकर व रो. संजयसिंह गायकवाड यांनी या कार्यशाळेस शुभेच्छापर मनोगत व्यक्त्त केले. या कार्यशाळेत गुरुकुल प्रकल्प राबविण्याबाबत येणाऱ्या अडचणीवर कशी मात करायची ते उपस्थित वक्त्यांनी स्पष्ट केले तसेच सहभागी शिक्षक व प्रशासकीय सेवकांच्या शंकांचे निरसन केले. आभार या कार्यशाळेचे समन्वयक डॉ. प्रशांत कांबळे यांनी मानले तर सूत्रसंचालन डॉ. माधवी सोळांकूरकर यांनी केले.