
अतिग्रे : “समाजामध्ये महिलांकडे सहनशीलता हा मोठा गुण असतो. ज्याप्रमाणे आई घराची काळजी घेते त्याप्रमाणे शिक्षकानेही सोशिकपणाने आईच्या भूमिकेत राहून समाजाची काळजी घ्यावी. असे प्रतिपादन मा.खासदार श्रीमती निवेदिता माने यांनी केले.
यावेळी ढाकाळे विद्यामंदिरच्या अध्यापिका राणी पाटोळे यांना”आदर्श शिक्षक पुरस्कार” देऊन गौरवण्यात आले.
अतिग्रे येथील संजय घोडावत शैक्षणिक संकुल सभागृहात आनंद फौंडेशनच्यावतीने घेण्यात आलेल्या गुणवंत पुरस्कार वितरणप्रसंगी श्रीमती माने बोलत होत्या.
संजय घोडावत शिक्षण संकुलामध्ये आनंद गंगा फौंडेशनचे अध्यक्ष तानाजी पोवार यांच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमातुन हा कार्यक्रम झाला.
यावेळी विश्वस्त विनायक भोसले, कोल्हापूर जि.प.चे शिक्षण सभापती प्रविण यादव,हातकणगले पंचायत समिती सभापती डॉ.प्रदिप पाटील,प्राचार्य विराट गिरी,शिक्षक नेते अर्जुन पाटील,एन वाय पाटील,सरपंच रंजना जाधव,जीएस पाटील आदी पुरस्कारार्थी व शिक्षणप्रेमी उपस्थित होते.
प्राचार्य विराट गिरी यांनी शिक्षणक्षेत्रातील विविध बदल, अडचणी व सकारात्मक पर्याय आदींबाबत मार्गदर्शन केले.सभापती यादव यांचेही भाषण झाले. जिल्ह्यातील तीस गुणवंतांना ट्रॅाफी, प्रशस्तीपत्र व शाल देऊन गुणवंत पुरस्काराने गौरविण्यात आले.