Categories
कोल्हापूर हातकणंगले

भिमराव मलगुंडे यांची उपाध्यक्षपदी निवड

प्रशांत भोसले
घुणकी ,ता. २२ : किणी हायस्कूल किणीचे ज्येष्ठ विज्ञान शिक्षक भिमराव धोंडीबा मलगुंडे यांची शिक्षक भारती या शिक्षक संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली. या निवडीबद्दल त्यांचे शिक्षण क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

त्यांना मुख्याध्यापिका सुरेखा शिरोटे ,पर्यवेक्षक डी.एच. पाटील ,किणी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आण्णासाहेब पाटील, उपाध्यक्ष सुहास माने, राजेंद्र पाटील व सर्व संचालक यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started