















दि 19 फेब्रुवारी 2021 रोजी विश्ववारणा पब्लिक स्कूल तळसंदे ( सैनिकी निवासी पॅटर्न ) प्रशालेत छ शिवाजी महाराज जयंती निमित्त फिट ऑफ इंडिया व खेलों इंडिया या द्वारे तसेच ” चला कोरोनावर मात करू ..शालेय खेळाडूंना प्रोत्साहन देऊ ” या शासनाच्या ब्रीद वाक्या प्रमाणे विश्ववारणा पब्लिक स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .यामध्ये सांघिक खेळामध्ये कबड्डी , फुटबॉल ,हॅन्डबॉल , हॉलिबॉल या खेळाचा समावेश करण्यात आला होता तसेच वैयक्तीक स्पर्धेमध्ये 100 मी ,200 मी ,400मी 800मी धावणे तसेच लांब उडी , गोळा फेक , थाळीफेक , या खेळाचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभागी होऊन प्रथम ,द्वितीय ,तृतीय विजेत्या खेळाडूंना मान्यवर पाहुण्यांच्या शुभहस्ते गौरवण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक कॅप्टन गणपतराव घोडके ,तसेच सचिव श्री डी पी पाटील सर , व्यवस्थापक श्री दीपक महाडिक सर, तसेच यशवंत आयुर्वेदिक महाविद्यालयाचे HOD डॉ अभिजित इंगवले ,तसेच चावरे गावचे उपसरपंच श्री अमरसिह शिंदे सरकार , वारणा कारखान्याचे संचालक श्री सुभाषराव जाधव (घुणकी ) तसेच फारणेवाडी येथील सरपंच श्री रामराव देशमुख , व तंटामुक्ती अध्यक्ष व माजी सैनिक प्रकाशराव साळूखे , व इंजिनिअर मनोहर पाटील इत्यादी प्रमुख पाहुणे उपस्थित होते उपस्थित पाहुण्यांना स्कूल कमांडर कु विनायक घराळ व पायलट कु शिवतेज नाळे ,कु विनोद शिंदे यांनी मानवंदना देऊन कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख , जिमखाना अहवाल वाचन प्रा संभाजी पाटील यांनी केले तसेच कॅप्टन गणपतराव घोडके यांनी आपल्या मनोगतामध्ये छ शिवाजी महाराजांच्या इंडीयन आर्मी मराठा इन्फंट्रीचा इतिहास सांगितला तसेच सचिव श्री डी .पी .पाटील यांनी आपले मनोगतामध्ये शिवाजी महाराजांच्या शिकवण व संस्कार सांगितले तसेच डॉ अभिजीत इंगवले यांनी छ शिवाजी महाराज यांचे बालपण व सर्वसामान्य रयतेसाठी ऐतिहासिक गनिमी कावा याची जाणीव करून दिली . तसेच यावेळी संस्थेच्या संचालिका सौ व्ही डी पाटील मॅडम व डॉ दीपिका महाडिक व शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी ,पालक , विद्यार्थी व खेळाडू उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रोहित पाटील सर व श्री शंकर काळे सर यांनी केले व आभार श्री प्रशांत भोसले यांनी केले