Categories
कोल्हापूर

शिक्षकांना न्याय द्या अन्यथा भविष्यात याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील माजी खासदार श्री. राजू शेट्टी यांनी आझाद मैदानावर दिली आंदोलनास भेट

दै.हिंदुसम्राट / प्रतिनिधी संतोष चव्हाण
मुबंई:-आज सोमवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार श्री.राजू शेट्टी यांनी आझाद मैदानावर विनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनला भेट दिली. राज्यातील विविध विनाअनुदानित शिक्षक संघटना एकत्र येऊन शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रलंबित न्याय मागण्यांसाठी गेल्या 18 दिवसांपासून सुरू आहे.राज्यातील जवळपास साठ हजारहुन अधिक शिक्षकांची गेल्या 20 वर्षांपासून होत असलेली अवहेलना व शिक्षकांच्या अनुदानबाबतची सद्य परिस्थिती समन्वय संघाचे समन्वयक श्री.खंडेराव जगदाळे सर यांनी शेट्टी साहेबांसमोर कथन केली.तसेच हे सरकार निधी उपलब्ध असूनही हेतुपुरस्सर कसे दुर्लक्ष करत आहे याचा पाढा वाचला.
यावेळी बोलताना श्री.राजू शेट्टी म्हणाले की आजच्या या परिस्थितीला सद्याचे व पुर्वीचे दोन्ही राज्यकर्ते जबाबदार असून आता तरी त्यांनी एकमेकांना दोष देणे थांबवावे.ते पुढे म्हणाले की भारतीय संस्कृतीत गुरूला अनन्यसाधारण महत्त्व असून ते वंदनीय आहेत.मात्र आज त्यांना हक्काचा पगार नाकारून राज्यकर्ते मोठे पाप करत आहेत.या शिक्षकांना उपाशीपोटी राबवून घेणे अजिबात व्यवहारार्य नसून संतापजनक आहे.तसेच या प्रश्नांवर सर्व शिक्षक संघटना एकत्र आल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.शांततेत व सनदशीर मार्गाने जर सरकार जुमानत नसेल तर मग मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा गनिमी कावा वापरून यश खेचून आणण्याचा कानमंत्र त्यांनी यावेळो दिला. शिवाय औरंगाबाद आंदोलनमध्ये शिक्षकांवर दाखल झालेले खोटे गुन्हे व आजवरच्या शिक्षकांच्या संघर्षाचा देखील उहापोह केला.तसेच खंडेराव जगदाळे सर हे माझ्या शिरोळ गावचेच असून त्यांचे विनाअनुदानितसाठीचे कार्य प्रशंसनीय आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

यावेळी समन्वय संघाचे श्री.ज्ञानेश्वर शेळके,सौ.नेहा गवळी,श्री.दीपक कुलकर्णी, श्री.राहुल कांबळे,श्री.कर्तारसिंग ठाकूर आणि इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते.

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started