
रुकडी ( दि. १५-२-२०२१ बातमीदार / प्रतिनिधी ) प्रत्येक भारतीय व्यक्त्तीला राज्यघटनेने अभिव्यक्त्ती स्वातंत्र्य दिले आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्त्ती आपले विचार इतरांसमोर कोणत्याही माध्यमांतून मांडू शकते किंबहुना इतरांसमोर व्यक्त्त होण्याचा आपला हक्क आहे, परंतू अभिव्यक्त्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आहेत.आपण इतरांसमोर व्यक्त्त होत असताना देशाची एकात्मता, जातीय सलोखा यांचा आदर राखून व्यक्त्त झाले पाहिजे. एखाद्या व्यक्त्तीच्या मनाविरुद्ध त्यास फोन करणे किंवा संदेश पाठविणे हा गुन्हा आहे, याची जाणीव प्रत्येकाला असली पाहिजे. सामाजिक माध्यमांद्वारे संदेश देऊन संकटाच्या वेळी मदत करता येते, सामाजिक माध्यमे लोकांना माहिती देण्याचे काम करतात काही वेळेस आपणास काही माध्यमाद्वारे चुकीची माहिती प्राप्त होते. आपण त्या माहितीतील सत्यता न पडताळता आलेली माहिती किंवा संदेश इतरांपर्यंत पोहचवितो.चुकीचा संदेश इतरांपर्यंत पोहचविणे कायद्याने गुन्हा आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्त्तीने आलेला संदेश इतरांना पाठविताना दक्षता घ्यावी, अन्यथा आपल्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते असे मत शिवाजी विद्यापीठातील जर्न्यालिझम आणि मास कम्युनिकेशन विभागातील डॉ. शिवाजी जाधव यांनी व्यक्त्त केले ते येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात अंतर्गत तक्रारी समितीच्यावतीने आयोजित केलेल्या सामाजिक माध्यमे : फायदे व तोटे या विषयावरील ऑनलाइन व्याख्यानात बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अर्जुन राजगे होते स्वागत व प्रास्ताविक डॉ. शर्मिला साबळे यांनी केले. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. अर्जुन राजगे म्हणाले सामाजिक माध्यमे हे साधन आहे, ते वाईट नाहीत एखाद्या व्यक्त्तीने या माध्यमांचा वापर वाईट हेतूने केला तर विनाकारण माध्यमांना दोष दिला जातो ते पूर्णतः चुकीचे आहे माध्यमांचा वापर करताना सदविवेक बुद्धीने वापर करावा. मला काय वाटते त्याचबरोबर इतरांना काय वाटेल याचा विचार करावा , आपण आपले हक्क सांगतो पण कर्तव्य व जबाबदारी विसरतो. त्यामुळे हक्का बरोबरच कर्तव्य व जबाबदारीची जाणीव आपणाला असली पाहिजे,या सामाजिक माध्यमांद्वारे आपण संपूर्ण जगाशी जोडले गेलो आहोत पण कुटुंबापासून आपण दूर जात आहोत याचा दोष सामाजिक माध्यमांना देता येणार नाही. आभार डॉ. लता मोरे यांनी मानले तर सूत्रसंचालन कु.सोनम कांबळे यांनी केले. या व्याख्यानाचा लाभ विद्यार्थी व शिक्षकांनी घेतला