
प्रशांत भोसले
रुकडी ( दि.७- २-२०२१ ) आपल्या शरीरात होणाऱ्या वेदना आपल्या मनात न ठेवता डॉक्टरांना सांगितल्या तर डॉक्टर त्या वेदना पाठीमागील कारणे शोधून त्यावर योग्य ते उपचार करतील डाॕक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे उपचार केले तर कॅन्सर निश्चित बरा होतो, कॕन्सरची लक्षणे जाणवताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे कॕन्सरला घाबरण्याची गरज नाही असे मत डाॕ.माधुरी चौगुले यांनी व्यक्त्त केले, त्या रूकडी येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात कोल्हापूर कॅन्सर सेंटर यांच्या सहकार्याने व रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल, रोटरी क्लब आॕफ अतिग्रे, रोटरॕक्ट क्लब व राष्ट्रीय सेवा योजना राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय रूकडी यांच्या वतीने आयोजित केलेल्या कॅन्सर तपासणी व कॅन्सर उपचार शिबिर उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अर्जुन राजगे होते. स्वागत रो. डॉ. प्रशांत कांबळे यांनी केले तर प्रास्ताविक रो. संजयसिंह गायकवाड यांनी केले या शिबिरात रूकडी परिसरातील सुमारे पन्नास स्त्री-पुरुषांनी कॕन्सर तपासणी करून घेतली या वेळी डाॕ.माधुरी चौगुले यांनी कॕन्सरची लक्षणे सांगितली. या शिबिरासाठी कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे संचालक डॉ.अर्जुन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सर्व स्टाफने उपस्थित स्त्री-पुरुषांची तपासणी केली. यावेळी प्राथमिक आरोग्य पथक रूकडीचा सर्व स्टाफ, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराइजचे रो. श्रीकांत झेंडे रो.चंदन मिरजकर, रोटरी क्लब आॕफ इचलकरंजी सेंट्रलचे कम्युनिटी सर्व्हिस डायरेक्टर रो.सतीश पाटील, रोटरी क्लब आॕफ अतिग्रेचे अध्यक्ष डाॕ.हिंदुराव संकपाळ उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. अर्जुन राजगे म्हणाले हे महाविद्यालय विद्यार्थ्यांना फक्त्त शिकविण्याचे काम करीत नाही तर सामाजिक बांधिलकी मानून समाज उपयोगी विविध कार्यक्रमाचे आयोजन करते त्याचाच एक भाग म्हणून रुकडी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या शिबिराचे आयोजन केले आहे. त्याचा लाभ नागरिकांना होईल. आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर गिरिश मोरे यांनी मानले