Categories
कोल्हापूर हातकणंगले

रोटरी क्लब आॕफ अतिग्रेच्या वतीने व्यावसायिकांना ” रोटरी व्यवसायिक सेवा पुरस्कार ” देऊन सन्मानित करण्यात आले

रोटरी क्लब आॕफ अतिग्रेच्या वतीने देण्यात आलेले  ” रोटरी व्यवसायिक सेवा पुरस्कार ” प्राप्त व्यवसायिक व रो . नरींदर बरवाल, प्राचार्य डाॕ.अर्जुन राजगे व इतर

रुकडी ( दि. २७- १-२०२१ /प्रतिनिधी: प्रशांत भोसले) माणसाची खरी ओळख त्याच्या कार्यावरून होत असते, आपला देश समृद्ध करण्यासाठी प्रत्येक व्यक्त्तीचे योगदान महत्त्वाचे आहे माझे कार्य हे माझ्या देशासाठी आहे याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे, त्याचबरोबर आपण कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असू आपण सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे असे मत रोटरीचे डिस्ट्रिक्ट लिटरसी चेअरमन रो.नरींदर बरवाल यांनी व्यक्त्त केले ते रोटरी क्लब आॕफ अतिग्रेच्या वतीने देण्यात आलेल्या ” रोटरी व्यवसायिक सेवा पुरस्कार ” वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय रुकडीचे प्राचार्य डॉ. अर्जुन राजगे होते. स्वागत रोटरी क्लब आॕफ अतिग्रेचे अध्यक्ष रो. डॉ. हिंदूराव संकपाळ यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय व प्रास्ताविक रो. डॉ.प्रशांत कांबळे यांनी केले . यावेळी अतिग्रे परिसरातील विविध क्षेत्रातील व्यावसायिकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, यामध्ये श्री. श्रीकांत सांगावे मंडप डेकोरेशन व हॉटेल व्यवसाय, श्री.महादेव चौगुले पोल्ट्री व दुग्ध व्यवसाय, श्री. आप्पासाहेब पाटील प्रगतशील शेतकरी, श्री. विश्वास गोंधळी मंडप डेकोरेशन व्यवसाय. डॉ. धन्वंतरी जाधव- पवार वैद्यकीय सेवा श्री. सुदाम चव्हाण गारमेंट व्यवसाय,श्री. सचिन पाटील शिक्षक यांचा सन्मान करण्यात आला.

अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. अर्जुन राजगे म्हणाले प्रतिकूल परिस्थितीकडे संधी म्हणून पाहिले तर यश निश्चित मिळते किंबहुना प्रतिकूल परिस्थितीतच मनुष्य यशस्वी होऊ शकतो हे आजच्या सत्कारमूर्तीच्या यशस्वी वाटचाली वरून लक्षात येते हे सत्कार मूर्ती आजच्या समाजाचे आयडॉल आहेत असे गौरवपर मत त्यांनी व्यक्त्त केले. यावेळी पुरस्कार प्राप्त डॉ.धनवंतरी जाधव-पवार श्री.सुदाम चव्हाण श्री. महादेव चौगुले श्री.सचिन पाटील यांनी मनोगत व्यक्त्त केले. या कार्यक्रमासाठी श्रीमती रोझी बरवाल, प्रोजेक्ट चेअरमन रो.पुष्पक पाटील, रोटरी क्लब आॕफ अतिग्रेचे सर्व सदस्य सत्कार मूर्तींचे कुटुंबीय व मित्रपरिवार तसेच शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार सेक्रेटरी रो. सचिन चौगुले यांनी मांनले

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started