Categories
कोल्हापूर हातकणंगले शैक्षणिक

भिमराव मलगुंडे यांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार

‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार किणी हायस्कूल किणीचे अध्यापक भिमराव मलगुंडे यांना शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या हस्ते प्रदान

किणी ,ता. १९: डी.बी. पाटील शैक्षणिक विचारमंच कोल्हापूर यांच्या वतीने देण्यात येणारा ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार किणी हायस्कूल किणीचे अध्यापक भिमराव मलगुंडे यांना शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

वृक्षारोपण, निर्माल्य दान उपक्रम, इको फ्रेंडली रंगपंचमी, फटाकेमुक्त दिवाळी यासारखे विविध पर्यावरणपूरक उपक्रम त्यांनी राबवले आहेत. किणी परिसरात ते सर्पमित्र म्हणून सुपरिचित आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण संवर्धन, सर्प-शेतकऱ्यांचा मित्र या विषयांवर त्यांनी शेकडो व्याख्यानातून सामाजिक प्रबोधनाचे कार्य केले आहे.

त्यांच्या या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

त्यांना मुख्याध्यापिका सुरेखा शिरोटे ,पर्यवेक्षक डी.एच. पाटील ,किणी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आण्णासाहेब पाटील, उपाध्यक्ष सुहास माने, सचिव राजेंद्र पाटील व सर्व संचालक यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started