Categories
कोल्हापूर हातकणंगले

मानवाने वेळीच सावध होऊन पर्यावरणातील आपल्या वाढत्या हस्तक्षेपावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहेः डॉ.एम.ए.पाटील

प्रशांत भोसले

रूकडी ( दि. १६-१-२०२१ ) मानव स्वतःच्या विकासासाठी नैसर्गिक साधन संपत्तीचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहे, त्याचा परिणाम म्हणजे हवा प्रदूषण, जल प्रदूषण, मृदा प्रदूषण आणि सागरी प्रदूषण हे होय. मानवाने वेळीच सावध होऊन पर्यावरणातील आपल्या वाढत्या हस्तक्षेपावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, नाहीतर मानवासह संपूर्ण सजीव सृष्टीचे जीवन धोक्यात येईल असे मत श्री. विजयसिंह यादव कला व विज्ञान महाविद्यालय पेठवडगाव येथील भूगोल विषयाचे शिक्षक डॉ.एम.ए. पाटील यांनी व्यक्त्त केले ते येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात सामाजिक शास्त्रे विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या भूगोल दिन कार्यक्रमात ” बदलते पर्यावरण ” या विषयावरील व्याख्यानात बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अर्जुन राजगे होते. स्वागत व प्रास्ताविक श्री. अशोक पाटील यांनी केले डॉ.एम.ए.पाटील आपल्या भाषणात पुढे म्हणाले विविध उद्योगधंदे आणि वाढती वाहनांची संख्या यातून बाहेर पडणाऱ्या विषारी वायूमुळे हवेचे प्रदूषण झाले आहे, जागतिक तापमान वाढीमुळे ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळू लागले आहे, त्यामुळे समुद्राची पातळी वाढण्याचा धोका निर्माण होऊन समुद्र किनार्‍यावरील अनेक शहरे पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त्त केली जात आहे. जंगल म्हणजे पर्यावरणाचे फुप्फुस परंतु जंगल तोड आणि जंगलातील आगी यामुळे जंगलाचे क्षेत्र कमी होऊन पर्यावरणाचे आरोग्य धोक्यात आले आहे. बिघडणाऱ्या पर्यावरणामुळे पृथ्वीवरील जैवविविधता धोक्यात आली आहे. अनेक वनस्पती व प्राण्याच्या प्रजाती नष्ट होत आहेत म्हणून मानवाने पर्यावरणातील नैसर्गिक साधनसंपत्तीच्या वापरावर मर्यादा आणून पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न करावेत व स्वतः सह संपूर्ण सजीव सृष्टीचे संरक्षण करावे. आभार डॉ.खंडेराव शिंदे यांनी मानले. ऑनलाईन संपन्न झालेल्या या व्याख्यानास महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते.

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started