

कमी वयात कौतुकास्पद कामगिरी
पुण्याच्या पत्रकार भवन येथे आज युवक मित्र परिवार आयोजित राजमाता आई जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती (“राष्ट्रीय युवा दिन” ) निमित्ताने युवा पत्रकार पुरस्काराने मुंबईच्या शुभम रेखा शंकर पेडामकर ह्यांना गौरविण्यात आले. ह्यावेळी त्यांचे मामा-मामी (अस्मिता गणेश दगडू मोरे) त्यांच्यासोबत होते. गेली पाच वर्षे शुभम यांचा पत्रकारिता क्षेत्रातील प्रवास हा अतिशय प्रेरणादायी व उल्लेखनीय आहे. सामाजिक कामासोबत जनतेचे प्रश्न ते त्यांच्या पत्रकारितेतून नेहमी मांडत असतात. या पुरस्काराचे सर्व श्रेय ते त्यांच्या कुटूंबाला व आई- बाबा (रेखा शंकर पेडामकर) व भाऊ (अभिलाष ) यांना देतात.
शुभम ह्यांनी वयाच्या तेविसाव्या वर्षी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक इ. विषयावर ७५० हुन अधिक लेख व बातम्या केल्या आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या २६ महिलांच्या मुलाखती आणि १५ हून अधिक करिअर मंत्र मुलाखती लिहिल्या आहेत.त्याचबरोबर सध्या ते भारतातील टॉप टेन एन. जी.ओ च्या यादीत असणाऱ्या सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या मीडिया अकादमीत मीडिया प्रशिक्षक असून बी.एम.सी च्या विद्यार्थ्यांना ते मीडियाचे प्रशिक्षण देत आहेत.अनेक सामाजिक उपक्रमात ते नेहमी सक्रिय असतात. आजवर त्यांना औरंगाबादचा चौथा स्तंभ पुरस्कार, आदर्श पत्रकार पुरस्कार इ.पुरस्कार प्राप्त झाले आहेत.त्यांच्या या कामगिरी बद्दल सर्वच स्तरावरून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.