
प्रतिनिधी मुबारक शेख राजाराम धारवाट
या राजकीय व्यक्तीने जागा बळकावत असल्यामुळे जागामालक नागेंद्र भीमराव कांबळे यांनी इचलकरंजी पोलीस ठाणे व नगरपालिकेकडे लेखी तक्रारी
देऊनही प्रशासनाने दखल घेतली नसल्यामुळे नागेंद्र कांबळे यांनी जिल्हाधिकार्यालय कोल्हापूर या ठिकाणी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिना दिवशी आत्मदहन करणार असल्याचे लेखी पत्र कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांना दिले.
या लेखी अर्जात
असे म्हटले आहे की राजाराम धारवट या व्यक्तीने आम्ही राहत नसल्याचा गैरफायदा घेऊन माझा सिटी
सर्वे नंबर 12530व12531 या जागेवर अतिक्रमण करीत आहे माझ्या जागेवर अतिक्रमण का केले असे विचारायला गेल्यावर मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याबाबत मी शहर पोलीस ठाणे व इचलकरंजी नगरपालिकेमध्ये लेखी तक्रार देऊनही राजारामट धारवट या राजकीय व्यक्तीचा दबावामुळे प्रशासन कारवाईची दखल घेत नाही. नागेंद्र कांबळे म्हणाले मला न्याय मिळाला नाही तर जिल्हाधिकार्यालय समोर आत्मदहन करणार असल्याचे सांगितले असे पत्र जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांना दिलेले आहे.