
रुकडी (दि. ९-१-२०२१) व्यक्ती नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाली तरी पुढील उर्वरित आयुष्यात एखाद्या
समाजोपयोगी क्षेत्रात कार्यरत राहिली तर त्या व्यक्तीच्या ज्ञानाचा समाजाला निश्चितच फायदा होतो, शिवाय एखाद्या कार्यात गुंतुन राहिल्याने आनंदी जीवन जगता येते , असे मत मा. खास. श्रीमती निवेदिता माने यांनी
व्यक्त केले त्या येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या डॉ.सौ.आशा पाटील यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. स्वागत व प्रास्ताविक डॉ. खंडेराव शिंदे यांनी केले मा.खास. माने पुढे म्हणाल्या सेवेत असताना आपण अनेक विद्यार्थी घडविले आहेत ते आज वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. मा.खा. माने यांच्या हस्ते डॉ.सौ.आशा पाटील व त्यांचे पती श्री.भूपाल पाटील यांचा सत्कार करण्यात आला , तसेच या कार्यक्रमात हिंदी विषयात शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी पदवी मिळविल्याबद्दल डॉ.शंकर दळवी , डॉ.हिंदुराव संकपाळ यांची रोटरी क्लब ऑफ आतिग्रे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तसेच डॉ. माधवी सोळांकुरकर यांना रोटरी क्लब अतिग्रे चा शिक्षक गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. अर्जुन राजगे आपल्या मनोगतात म्हणाले नियत वयोमानानुसार प्रत्येक शिक्षकाला सेवा निवृत्त व्हावे लागते शिक्षक हे व्रत आपण स्वेच्छेने स्वीकारलेले असते,त्यामुळे सेवेत असताना प्रत्येक शिक्षकाने आपले विद्यार्थी भविष्यकाळातील जीवनात सक्षमपणे कसे तयार होतील याचा नेहमीच विचार करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.
या कार्यक्रमात डॉ.सौ.आशा पाटील, डॉ.शंकर दळवी, डॉ. माधवी सोळांरकुरकर, डॉ.हिंदुराव संकपाळ, डॉ. मुकुंद हळदकर यांनी मनोगत व्यक्त केले सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळून संस्थेतील सर्व शाखांचे प्रमुख, शिक्षक , प्रशासकीय सेवक उपस्थित
होते .आभार डॉ.विजय देसाई यांनी मानले तर सूत्रसंचालन श्री अशोक पाटील यांनी केले