Categories
कोल्हापूर हातकणंगले

राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेन्ट्रल यांच्या वतीने घेण्यात आलेल्या कै. संभाजीराव माने स्मृती राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्त्तृत्व स्पर्धेत कु. श्रुती अशोक बोरस्ते प्रथम

वक्त्तृत्व स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राचार्य डाॕ.राजेखान शानेदिवाण व प्राचार्य डाॕ.अर्जुन राजगे यांच्या हस्ते स्वीकारताना नाशिकची कु.श्रुती बोरस्ते

प्रशांत भोसले

रूकडी येथील राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेन्ट्रल यांच्या वतीने घेण्यात आलेल्या कै. संभाजीराव माने स्मृती राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्त्तृत्व स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक कु. श्रुती अशोक बोरस्ते , एच. पी. टी. कॉलेज नाशिक व्दितीय श्री. अमोल रामचंद्र गोळे , डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय महाड व तृतीय श्री. शिवम संजय माळकर, सहकारभूषण एस. के. पाटील महाविद्यालय कुरुंदवाड उत्तेजनार्थ प्रथम श्री.अक्षय मारुती ईळके , नाईट कॉलेज इचलकरंजी , व्दितीय श्री. दत्तात्रय नाश्याबा चोरमले, छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, तृतीय श्री. तेजस दिनकर पाटील , आप्पासाहेब जेधे महाविद्यालय पुणे विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक डॉ. प्रशांत कांबळे यांनी केले, अहवाल वाचन शारीरिक शिक्षण संचालक श्री.भाऊसाहेब वडार यांनी केले. विजेत्या स्पर्धकांचे व गुणी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व शुभेच्छा बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षा माजी खासदार श्रीमती निवेदिता माने व सचिव खासदार धैर्यशील माने यांनी दिल्या. प्रमुख पाहुणे डॉ.राजेखान शानेदिवाण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले वक्तृत्व स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये विचार करण्याची क्षमता विकसित होते, विचारांची दिशा कशी असावी याचे आकलन होते, विचार प्रक्रियेला चालना या स्पर्धेतून मिळत असते, विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडताना
आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत, विद्यार्थी हा महाविद्यालयाचा आत्मा आहे तो जसा पुढे जाईल तसा
महाविद्यालयाचा नावलौकिक होत असतो, विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन करणे
आवश्यक आहे.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अर्जुन राजगे म्हणाले विजेत्या स्पर्धकांबरोबरच सहभागी
स्पर्धक सुद्धा महत्त्वाचे आहेत , आपण स्पर्धेत सहभाग घेतला म्हणून संयोजकांना विजेते ठरविता आले,
स्पर्धेतून आपण बरेच काही शिकत असतो एखाद्या स्पर्धेत आपण जिंकलो नाही म्हणून हार मानू नये, पुन्हा
नव्या जोमाने प्रयत्न करा यश निश्चितच प्राप्त होते. या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल चे
अध्यक्ष रो.संजयसिंह गायकवाड,सचिव रो.विमलकुमार बंब, संस्थेच्या सर्व शाखांचे प्रमुख, शिक्षक व
प्रशासकीय सेवक सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळून उपस्थित होते.आभार डॉ. गिरीश मोरे यांनी मानले तर
सूत्रसंचालन डॉ.माधवी सोळांकुरकर यांनी केले

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started