
-हदगाव ता.प्र. विकास राठोड याज कडून ) हदगाव नगरपरिषद येथे कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्यात यावा व येथील कार्यरत असलेले प्रभारी मुख्याधिकारी विजय येरावार आणि तहसिल चे नायब पूरवठा अधिकारि यांची जिल्हा बदली करण्यात येण्याचे येथील बीजेपी शहराध्यक्ष बालाजी कर्हाळे यांनी हदगाव तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून मागणी केली.
शहराध्यक्षा कर्हले यांनी त्यांच्या निवेदनात विजय येरावार यांच्या कार्यकाळ विरोधात भडिमार केला.निवेदनात पुढे म्हणाले,
हदगाव तहसील कार्यालयात पुरवठा विभागात कार्यरत असलेले विजय येरावार हे अनेक वर्षापासून नगरपरिषदेचे प्रभारी मुख्य अधिकारी म्हणून काम कार्यरत आहेत.यांच्या कार्यकाळात नगरपरिषद शहरातील विकास कामे हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे.याशिवाय दलीत वस्तीसाठी आलेला निधी रोडवरील नाली कामात वापरण्यात आला.शहरातील विकास कामे निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या नागरिकाच्या अनेक तक्रारी त्यांच्याकडे आल्या पण येरावार यांनी कोणतीच चौकशी न करता सदरील गुतेदाराचे बिल काढन्यात आले.याबाबत गुतेदार व येरावार ह्या दोघात धागेबांध असल्याची गावात चर्चा होत असल्याचेही त्यांनी निवेदनात व्यक्त केले.तसेच आठवडी बाजारात नगरपरिषद प्रशासनाने बेरोजगारासाठी दुकान गाळे बांधण्यात आले आहेत पण त्या ठिकाणी बेरोजगार नसून मात्र दुकान गाळ्यामध्ये अनेक अवैध धंदे चालत आहेत असे श हराध्यक्ष यांनी सांगितले.या अवैध धंद्यांविषयीची त्यांना कित्येकदा माहिती देण्यात आली पण त्यांनी प्रभारी पदाचा बहाणा सांगून टाळाटाळ केली.याशिवाय शहरातील घाण कचंऱ्याविषयी म्हणाले , घाण कचऱ्यावर नालीवर, लाखो रुपये खर्च करते पण शहरातलं घाण कमी होत नाहि अशा यानिवेदनात म्हटलआहे तरि जिल्हाअधिकारि साहेबानि या बाबिवर लक्ष देतिल का. असे जनतेकडून चर्चा होत आहे. आणि भाजप चे पदाधिकारि असे निवेदनात म्हटले आहे.