Categories
कोपरगाव

श्रीमान गोकुळचंद विद्यालयाच्या वतीने पत्रकारांचा सत्कार


बिपिन गायकवाड तालुका प्रतिनिधी हिंदू सम्राट-
कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी व श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाच्या निमित्ताने कोपरगाव तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रथम श्रीमान गोकुळचंदजी यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पत्रकार नानासाहेब जवरे व पत्रकार सोमनाथ सोनपसारे यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांतजी ठोळे हे अध्यक्षस्थानी होते यावेळी बोलताना ठोळे म्हणाले की जगात वर्तमानात मोठे बदल होत असताना भारत देश त्याला अपवाद नाही परिवर्तन हा देशाचा नियम आहे व त्याला आपण सामोरे गेले पाहिजे पत्रकारांनी खरे वास्तव जनतेसमोर आणले पाहिजे तरच खऱ्या गोष्टी समाजापुढे येत असतात पाश्चात्य देशात पत्रकारितेला आजही मोठे स्थान आहे वर्तमानपत्रात एखादी बातमी येणे तेवढे सोपे राहिलेले नाही मात्र कोपरगाव चे पत्रकार अशा बातम्यांना चांगले स्थान देत असून महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या अग्रगण्य अशा महत्त्वाच्या वृत्तपत्रात कोपरगाव ची चांगली बातमी येत असल्यामुळे मनाला वाचताना बरे वाटते तसेच कोपरगाव शहरातील पाण्याचा प्रश्न फार गंभीर असून यामुळे कोपरगाव तालुक्याची प्रतिमा मलिन होत आहे आपल्या शेजारच्या तालुक्यात येवला संगमनेर राहाता श्रीरामपूर या भागात पाण्याची स्थिती अगदी चांगली आहे मात्र या पाण्याच्या प्रश्नावर तोडगा निघणे महत्त्वाचे आहे बाकी क्षेत्रात कोपरगाव तालुक्याने मोठी प्रगती केली तसेच औद्योगिक व सहकार आणि शिक्षण याबाबतीत चांगले लौकिक प्राप्त केली आहे तसेच कोरोना च्या कालावधीत पत्रकारांनी आपली भूमिका चोख पार पाडली त्यांचे कौतुक केले तर आपणा सर्व पत्रकारांची सर्वांच्या सोयीनुसार एक स्वतंत्र बैठक घेऊन सामाजिक प्रश्नाबाबत सखोल चर्चा करण्याचा माझा विचार आहे असे त्यांनी शेवटी सांगितले त्यानंतर उपस्थित पत्रकारांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत ठोळे व संस्थेचे सचिव दिलीपजी अजमेरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर यांनी केले तर उपस्थित मान्यवर पत्रकांराचे स्वागत बुचकुले सर दिलीप फुलसौंदर सर रमेश गायकवाड सर लकारे सर बडजाते सर अमृतकर सर यांनी केले तर आभार गोरे सर यांनी मांनले यावेळी शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started