Categories
गुन्हेगारी नांदेड

नांदेड मध्ये IDBI बँकेतील 14 कोटी 50 लाख हँकर्सनी गायब केले

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

नांदेड:हॅकर्स मार्फत मोठ्या प्रमाणात गडबड घोटाळे करण्याचे प्रकार सर्वत्र सुरु असून, नांदेडच्या शंकर नागरी सहकारी बॅंकेचे आरटीजीएस व एनएफटीचे खाते आयडीबीआय नांदेड येथील शाखेत एका हॅकर्सने हॅक करुन जवळपास 14 कोटी 50 लक्ष रुपये लंपास केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आल्यानंतर शंकर नागरी बॅंकेच्या वतीने या संदर्भात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.

हॅकर्सच्या माध्यमातून अनेक ठिकाणी वेगवेगळ्या खात्यामार्फत रक्कम पळविण्याचे प्रकार देशभरात सुरु आहेत. त्याचा अनेेकांना फटका बसत आहे.नांदेडच्या शंकर नागरी सहकारी बॅंकेचे आरटीजीएस व एनएफटीचे खाते हॅकर्सने हॅक करुन जवळपास 14 कोटी 50 लक्ष रुपये लंपास केल्याचा प्रकार आज दुपारी उघडकीस आला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शंकर नागरी बॅंकेचे मुख्य व्यवस्थापक विक्रम राजे यांनी सदरचा प्रकार बॅंकेच्या संचालकांना कळविला. 27 डिसेंबर ते 2 जानेवारी या काळात शंकर नागरी सहकारी बॅंकेच्या खात्यातून हॅकर्सने आयडीबीआय बॅंकेचा आधार घेत 14 कोटी 46 लाख रुपये लंपास केले.ही बाब उघडकीस आल्यानंतर बॅंकेच्या खातेदारांत एकच खळबळ उडाली आहे.

सदरचा प्रकार बघून बॅंकेचे अधिकारी देखील हतबल झाले. याबाबत खुलासा करताना बॅंकेचे मुख्य व्यवस्थापक विक्रम राजे यांनी ही सर्वस्वी चूक आयडीबीआय बॅंकेची असून, त्यांना जबाबदार ठरवून त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी,अशी मागणी त्यांनी केली आहे.याबाबत आपण रितसर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.बॅंकेच्या खातेदारांना यामार्फत आवाहन करण्यात येते की,त्यांना कुठलाही धोका यामुळे नसून त्यांची खाती सुरक्षित असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

नेमका हा प्रकार कशामुळे घडला याची चौकशी आता पोलीस करणार असून,संबंधितांनी बॅंकेला तात्काळ नुकसान भरपाई द्यावी,व संबंधितावर गुन्हा दाखल करुन रितसर चौकशी करावी,अशी मागणी विक्रम राजे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केली आहे.शिवाजीनगर पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, नांदेडच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात तपास सुरु केला आहे. नांदेड शहरात या घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started